वडा-सांबार खावं, नाहीतर छोले-पुरी
चमचमीत सारं शेवटी येणार घशाशी!
तरूणांची मजा आहे, येऊन आमच्या घरी,
नावालाच यजमान, पण आम्ही आपले उपाशी
आली पन्नाशी!
पोट आड येतंय, म्हंटलं
खुर्ची मागे सरकवावी जराशी
जमतंय असं वाटलं
पण टेबल पडलं तोंडघशी!
आली पन्नाशी!
'सकाळी जावं पळायला, अजून झालं नाही वय'
'जलद चालणं' बरं वाटलं, पहिल्याच दिवशी
'आधिक ताण बरा नव्हे, हळू-हळू होईल सवय'
कुणाला माहीत इथे, व्यायाम खातात कशाशी
आली पन्नाशी!
'ट्रेकींगला निघालाय? मी आहे की जोडीला'
डोंगर दिसल्यावर मात्र, आम्ही आपले पायथ्याशी
रक्तदाब थोडासा, कोलेस्टेरॉल वाढीला
सकाळ-संध्याकाळ गोळ्या, जेल्युसिल उशाशी
आली पन्नाशी!
कुरकुरी ऐकून माझ्या प्रकृतीच्या दर दिवशी
तीर्थरूप उद्गारले, "इतक्यात धापा टाकशी?
बरंच अंतर बाकी, अर्ध्यात आताशी
मी बघ पंचाहत्तरीत, अजून खातो तुपाशी
म्हणे आली पन्नाशी!"
Taxonomy upgrade extras
वाचने
6627
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
छान कविता...
मस्तच!!!
क्या बात है !
मस्त
क्लास
आयला !!!
In reply to क्लास by विसोबा खेचर
मनापासून
गमतीशीर!
आम्ही पण
In reply to गमतीशीर! by प्रमोद देव
हाहाहा!
In reply to आम्ही पण by नितिन थत्ते
लय
कविता
झकास
आहो हल्ली
ह्म्म चुचु
In reply to आहो हल्ली by जागु
फारच
वा मस्तच !!!
न विडंबन ना 'वात्रटिका'
जबरा!
लाजायचे काय?