Skip to main content
लेखक स्वधर्म यांनी मंगळवार, 01/09/2026 22:28 या दिवशी प्रकाशित केले.

२०२६ चा गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपला आहे. मंडळांनी नेहमीप्रमाणे उत्साहात गणपती बसवण्याची तयारी केली आहे, ते तिथेच आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून नागरिकांचा मात्र या उत्सवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पूर्वी जसे वर्षभरात गणपती आल्यावर मनोरंजनाचा, प्रबोधनाचा खजिना असायचा त्याची आता गरज उरली नाही. हवे ते मनोरंजन बोटाच्या एका क्लिक वर उपलब्ध आहे. मंडळ व त्यांचे कार्यकर्ते मात्र अजूनही आपण हे करून जनतेला काहीतरी देतोय. देवाचं, पुण्याचं काम करतोय अशा समजूतीतून उत्सव अधिकाधिक भव्य, खर्चिक, अतिक्रमण करणारा व दणदणाटी करत चालले आहेत. इथे अनेकांना विरोधी भूमिका घ्यायची असते पण ते घेऊ शकत नाहीत. शिवाय विरोधक कोणी सामान्य नागरिक नसतात, तर ते असतात दादा, भाऊ अशा नगरसेवक राजकारण्यांचे कार्यकर्ते. त्यांना यांच्यातूनच भावी नेते व कट्टर कार्यकर्ते मिळत असतात. तर अशा सगळ्या वातावरणात...

पुणे महापालिका गणेशोत्सवाबाबत नागरिकांच्या सूचना मागवण्यासाठी एक सभा आयोजित करते. पुण्याचे नागरिक विद्यानंद बापट तिथे जातात आणि ध्वनिवर्धक (लाऊड स्पीकर) मुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याने व गणेशोत्सवाच्या मंडपांमुळे रहदारीस अडथळा होत असल्याने या दोन्हीवर संपूर्ण बंदी घाला असे मत मांडतात. अर्थातच त्यांना सुरक्षा रक्षकांच्या कड्यात सभागृहाबाहेर काढले जाते. हे पूर्वीही काही वेळा झाले असेल, पण यावेळी...

बापट गप्प बसणे तर सोडाच, अधिकच बोलू लागले आहेत. जवळजवळ प्रत्येक वाहिनीने त्यांची मुलाखत घेतली आहे. त्यात त्यांनी त्यांचे आक्षेप सविस्तर व करकरीत तर्काचा आधार घेऊन मांडले आहेत. त्यासाठी कायदा, लोकशाही, धर्मस्वातंत्र्य, संस्कृती, परंपरा, इतिहास याचा आधार घेऊन ते अजिबात बोटचेपी, तडजोडीची भूमिका न घेता आपले म्हणणे मांडत सुटले आहेत. भाजपाचे शहर प्रमुख बापटांना काळं कुत्रंही विचारत नाहीत असे म्हणाले. त्यावर बापटांनी संस्कृत वचन वापरून त्यांना प्रसिध्दी का नको आहे ते सांगितले आहे...

काही म्हणा बापटांचं ऐकायला मजा येते आहे. एक स्पष्ट विचार असणारा नास्तिक केवळ बुध्दीच्या व तर्कसंगत युक्तीवादाच्या जोरावर बलाढ्य झुंडीसमोर न घाबरता उभा आहे. आणि तथाकथित दांडगट गल्लीदादा त्यांचं अजून तरी काही वाकडं करू शकलेले नाहीत. बापट नास्तिक असल्याने त्यांनी द्वैत अद्वैत वादाला चक्क बौध्दिक हस्तमैथुन म्हणण्याचे धाडस दाखवले आहे. दुवा: अस्खलित बापट ‘मराठीतले शशी थरूर’! DJ विरोधात घणाघात! CM फडणवीसांची नरोवा कुंजरोवा भूमिका!

जंतरमंतरवरील निर्भय जेन झी नंतर असे एक एक निर्भय लोक समोर येत आहेत. कुठे ना कुठे अनेक नागरिक त्यांना पाठिंबा देत आहेत. 


वाचने 5749
प्रतिक्रिया 162

प्रतिक्रिया

काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उघड आणि स्पष्ट शब्दांत बापट यांना पाठिंबा दिला आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी याही बापट यांच्याशी पक्षाच्या मर्यादेबाहेर न जाता शक्य तेवढी सहमती दर्शवत आहेत. केंद्रीय पर्यावरण समितीवर अधिकाराचे पद असूनही या संदर्भात प्रत्यक्ष कृती करण्याची शक्ती असताना पक्षातील अरेरावी आणि धटिंगणशाही बटबटीतपणे समोर येत असताना या पुरुषी आणि अर्थातच पितृसत्ताक दडपशाहीसमोर पड खात, चुकीच्या कृत्याविरुद्ध कुठलीही कायदेशीर कारवाई न करता केवळ केविलवाणा निषेध करणं हे नुकत्याच पुण्यातच प्रचंड यशस्वी   झालेल्या राहुल गांधींच्या कार्यक्रमात उस्फूर्तपणे आणि तडफदारपणे व्यक्त झालेल्या तरुण मुलींच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर फारच दुर्दैवी आणि अगदी राजकीय क्षेत्रातही लौकिक यश मिळवूनही पुरुषसत्ताक व्यवस्थेतील स्त्रियांची परावलंबी वस्तुस्थिती ढळढळीतपणे पुढं आणणारं दिसतं. राजकीय पक्षही आजसुद्धा  एकप्रकारे स्त्रियांची कोंडीच कशी करत आहेत, अगदी मुख्यमंत्रीदेखील मेधाताईंइतकं स्पष्ट बोलण्याचं धाडस दाखवत नाहीत, त्यांच्या बोलण्याला नि:संदिग्ध पाठिंबा  देत नाहीत, हे यातून पुढं येतंय.


In reply to by रामचंद्र

नेमकी नस पकडलीत तुंम्ही. कॉंग्रेसचे नेते थोडा थोडा का असेना पण कणा दाखवू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे. त्यामानाने एकचालकानुवर्तित संस्कृतीतून आलेल्या नेत्यांना खूप मर्यादा असतात हे स्पष्ट आहे. शनिवार वाड्यात कुठल्यातरी दुर्लक्षित कबरीला भगवा रंग फासण्यापासून मेधाताईंची गाडी थोडी तरी पुढे सरकली म्हणायची. 


सार्वजनिक गणेशोत्सवांत भाग घेतल्यास दशके झाली असतील पण बापट ह्यांच्या बोलण्यात तथ्य आहे का ? सार्वजनिक गणेशोत्सवांत २४ किंवा १२ तास सार्वजनिक लौड्सपकर लावला जातो का ? रस्ते अडवले जातात का ? सद्य स्थिती काय आहे ? 


In reply to by साहना

काही दुर्दैवी घटनांमध्ये नागरिकांचे, जल्लोषात सामील कार्यकर्त्यांचे जीव गेले आहेत, दृष्टी गेली आहे, कित्येकांना उत्सव, उत्सवपूर्व दोन दोन महिन्यांचा वादनसरावकाळ असह्य होतो. सर्वांनाच घर सोडून जाता येत नाही. आजारी, वृद्ध, गरोदर, घरून काम करणारे यांचा आवाजामुळे  तोंड दाबून बुक्क्यांचा मार असा होणारा छळ ही वस्तुस्थिती पुरेशी स्पष्ट नाही का? अगदी मारे ऐतिहासिक किंवा पौराणिक देखाव्यांचं कौतुक सांगितलं जातं पण अशा देखाव्यांत पार्श्वगायन, त्यात कधीकधी प्राण्यांचे चित्रविचित्र आवाज घरात बसून दिवसरात्र सक्तीने मोठ्याने ऐकावे लागतात. स्पेशल इफेक्ट्सचे, नाट्यमय प्रसंग, आवेशपूर्ण संवाद, तथाकथित जोशपूर्ण निवेदन... गणपतीबाप्पाचा कितीही धावा केला तरी या त्रासातून सुटका नसते. ११२ ला फोनवर सौजन्याने बोलतात पण प्रत्यक्षात कृती होतेच असं नाही. मात्र यंदा बापट (आणि त्यांच्यासारखे अन्य) तारणहार ठरतील अशी आशा आहे. 


In reply to by रामचंद्र

 त्सवपूर्व दोन दोन महिन्यांचा वादनसरावकाळ असह्य होतो

 

२ महिने आधी वादन सराव  ? आणि ह्या लोकांना सवड मिळते तरी कशी ? लोकांना काम धंदा नाही आहे का ?

२००९ मी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवांत शेवटचा भाग घेतला होता आणि तिथे सुद्धा फक्त विसर्जन मिरवणूक पहिली होती. गर्दीचा तिटकारा असल्याने मी नेहमीच मुंबई पुणे भागांत ह्या काळांत जाणे टाळले आहे. त्यामुळे सध्या काय स्थिती आहे हे ठाऊक नव्हते.

स्थानिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या ध्वनी आणि इतर प्रदूषणाच्या विरोधांत बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. बापट ह्यांच्या व्हिडीओ मध्ये फर्नांडिस ह्यांनी संदिग्ध भूमिका घेतली आहे असा उल्लेख आहे. त्यामुळे कदाचित सर्वच राजकीय पक्षांना ह्या एकूण प्रकारांतील डोकेदुखी लक्षांत येत असावी.

 

 

 


In reply to by साहना

९९ च्या आसपास मिरवणुकांमधे मध्ये ढोल वाजवले, त्याच्या अनुभवावरुन सांगतो, सलग तासभर मिरवणुकीमधे वाजवायचे असेल तर २ महिने सराव खरच उपयोगी असतो. प्रत्यक्षात मुख्य मिरवणुक अनेक तास (४-६) सहज लांबु शकते. पुरेसा स्टॅमिना आणि सराव नसेल तर हात भरुन येतात, ताल चुकु शकतो, आणि ताल बदलताना प्रमुख ज्या खुणा वापरतात त्यांची गडबड होउ शकते.

 

 


त्यांच्याकडून होईल तितका त्या प्रयत्न करत आहेत आणि वेळोवेळी जमेल तशी त्यांनी प्रत्यक्ष कृती करून दाखवलीही आहे ही वस्तुस्थिती आहेच. मात्र कुटुंबातील एखादी कर्ती स्त्री एखादी वावगी कृती करू नका असे सांगत असेल तर बाहेर मर्दुमकी दाखवणारे पुरुषही तिच्या म्हणण्याला मान देतात, हे भाजप ज्या भारतीय कुटुंबसंस्थेचा आदर्श मानतो त्यात दिसणारे चिरपरिचित उदाहरण ज्याप्रकारे पायदळी तुडवत आहे ते संबंधितांना भूषणावह नाही.

आणि माणूस तर सोडाच पण मुक्या प्राण्यांनाही दुखवू नये, असं सांगणाऱी म्हणे आपली संस्कृती!


पैगंबरांच्या वेळी स्पीकर होते का ? नाही ना ? बंद करा भोंगे 🚫

गणपतीत डी.जे. वाजवण्याचे प्रयोजन काय ? ह्याला बाहेर काढा रे सभेतून. ✅

आता आपापले कॉन्फर्मेशनल बायसेस घेऊन जनता सहाणेवर चंदन घासावे तसे घासत बसणार. बापट कांग्रेसी, डावे, लिब्रांडू घोषित होणे तर "पाकसिद्धी अगोदर हात धुवून घ्या" इतपत बेसिक झाले आहे. 

पुढे पुढे बापट, विद्यानंद बापट हे जॉर्ज सोरोसचे आते चुलत पुतणे असल्याचे पण जावईशोध लागतील अन् मास्टरस्ट्रोक जनतेत प्रसिद्ध पण होतील. 

टीप - खूप प्रदूषण पसरते म्हणून सरकारने २ - स्ट्रोक गाड्या बॅन केल्या आहेत तसे मास्टर - स्ट्रोक जनतेला सुद्धा करायला हवे वैचारिक प्रदूषण कमी करायला (हे आपले उगाच आमचे शाब्दिक कोटीक्रम हौस पुरवून घेणे झाले, कॅन्सल कल्चर आमचे नाही मास्टरस्ट्रोक वाल्यांचेच बरे 🤣🤣)


विद्यानंद बापटांना संपुर्ण पाठिंबा.

मागील वर्षी, मटा ने नागरिकांकडून डिजे वर, प्रतिबंध लावावा अथवा कसे यावर  महिनाभर  प्रतिक्रिया मागवल्या होत्या. 

या वर्षी, पोलीस प्रमुखांनी मिटर घेऊन काहीतरी मिटींग घेतल्याची बातमी वाचली होती.

सर्व प्रशासन डीजे माफिया समोर हतबल दिसतेय. बहिरे अंधळे झाले तरी चालतील पण डीजे हवाच.

डी जे ,लेझर,ढोलताशे हे पैसा कमावण्याचे साधन झाले आहे. एक तास ढोल बडवण्याचे पस्तीस, चाळीस, पन्नास हजार  रूपये घेतात. सन २०१३ मधे सोसायटीत डी जे आणा म्हणून  माझ्यावर  दबाव आणला होता. तेंव्हा विस हजार  रूपये मोजून दिले आणी सोसायटीतील इतर सदस्यांनी मला विस लाख शिव्या दिल्या. माझ्यावर आलेल्या दबाबाला सशक्त पणे तोंड देता न आल्यामुळे सदस्यांची बिनशर्त माफी मागीतली.

 

डी जे,लेझर,ढोलताशे बैलपोळ्याला सुद्धा आणतात. 

 

आंबेडकर जयंती,शिवजयंती वर्षातून दोन वेळा,गणेशोत्सव, गुंठामंत्र्यांची घरातली हळद,लग्न,बारसे इत्यादीं साठी डी जे लावतात.

 

डी जे के धडकने से खडकती है खिडकियां 

खिडकियौंके खडकनेसे दुबकता है खडकसिंग

 

 


In reply to by कर्नलतपस्वी

कुणालाच आवडत नाही तर का आणला जातो ? उपरोधाने नाही विचारत प्रामाणिक प्रश्न आहे. 


In reply to by साहना

 मुळात ह्या विषयाच्या खोलात जाणे महत्वाचे वाटते. एकंदरीत ब्रॉडर हिंदू ट्रेडिशन पाहता "वाद्य" हा एक अविभाज्य घटक आहे धार्मिक कर्मकांडांतील (ती उपयोजित/ कामाची असतीलच असे नाही) 

पुराणांत "आणि देवाचा आगमनासोबतच दैवी वाद्यांचा गजर झाला"

"शंखनाद"

इत्यादी references पहायला मिळतात 

ऐतिहासिक दृष्ट्या

शिवाजी महाराजांच्या काळात पण शिकार करून येता किंवा मोहिमेवरून परतताना 

"गावकऱ्यांनी करडी लेझीम/ताशा" लावला असे रेफरन्सेस सापडतात. 

मी आत्ता चाळीस क्रॉस केलेला माणूस, मला माझ्या लहानपणाची आठवण म्हणजे गणपतीत अगडबंब ढोल नाहीत किंवा ऑफिसात सुट्ट्या टाकून ते बडवणारी पोरे पोरी नाहीत तर प्रॉपर लेझीम, ताशा, वऱ्हाडी दिंडी (विदर्भात चालणारा एक छोट्या ढोल, टिमक्या आणि पिलमपोया नावाच्या बासरीचा वाद्यसंच) इत्यादी आहेत.

 एकेकाळी गणेश मंडळांत VCR वर सिनेमे दाखवायची competition लागत असे आता डी.जे. च्या भिंतींची आहे. 

नमनाला घडाभर तेलाचे प्रयोजन असे की उत्सवप्रियता हा भारतीय माणसाचा व्यवच्छेदक गुण + मॉब/समूहाचा सब झीरो आयक्यू एकत्र केला तर जे काही होते ते म्हणजे ही कानठळ्या बसवणारी विकृती होय. डी.जे. किंवा ढोल पथके हा प्रॉब्लेम सोडवण्याचा एक उपाय म्हणजे थोडेसे relegate करणे तरुणाईला अन् थोडेसे delegate करणे. ही पोरे लॉजिकला रिस्पॉन्स देतात हे आपण कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनात बघितले आहे त्यामुळे एखाद्या केस मधे ह्यांना

"तू मूर्ख आहेस"

असे म्हणण्यापेक्षा

"असे केल्यास तू मूर्ख म्हणवला जाऊ शकतो"  ह्या पद्धतीने हॅण्डल करून सांगितल्यास जास्त उत्तम समजू शकते असे वाटते


यात अर्थकारण आहे जे मुख्य कारण. 

डिजे,ढोलताशे पथक लेझर यांची मालकी नेते,दाद लोकांची.  फंडिग कोण करणार  हेच. मलिदा कोण खाणार  हेच.

 

विचार करा, दोन महिने ढोलताशे सराव  सरासरी तीन ते चार तास.  कोण करतात, त्यांना मानधन काय मिळते.. एवढा वेळ त्यांच्याकडे कोठून येतो...हे पारंपारिक वाद्य मग एवढ्या सरावाची गरज आसते का? भर वस्ती मधे सराव  चालतो. त्याचा जनतेला होणारा त्रास  कुणालाच समजत नाही का?

अशा अनेक सेल्फ एक्सप्लनेटरी प्रश्न प्रशासनाला माहित असूनही कारवाई करता येत नाही. 

 अशा मुद्यानां धार्मिक रंग दिला जातो. जो याला विरोध  करतो तो धर्मबुडव्या समजला जातो.

 

आमच्या लहानपणी ढोलताशे होते आणी धर्मस्थळावर  लाऊडस्पीकरही होते. 


In reply to by कर्नलतपस्वी

विचार करा, दोन महिने ढोलताशे सराव  सरासरी तीन ते चार तास.  कोण करतात, त्यांना मानधन काय मिळते.. एवढा वेळ त्यांच्याकडे कोठून येतो...हे पारंपारिक वाद्य मग एवढ्या सरावाची गरज आसते का?

 

वाजविणाऱ्यांना शून्य मानधन मिळते. पथकात येण्यासाठी प्रवेश शुल्क त्यांना द्यावे लागते. वाजविणाऱ्या पथकाच्या मालकाला मंडळाकडून भरभक्कम शुल्क मिळते. त्यातील एक दिडकी सुद्धा तो वाजविणाऱ्यांना देत नाही कारण वाजविणे हा वाजविणाऱ्यांचा छंद आहे व तो छंद पुरविण्याची संधी तो मालक त्यांना देतो. 

 

ढोल वाजविणे म्हणजे तबला, मृदंग वाजविणे नाही. ही तालवाद्ये बऱ्यापैकी वाढविण्यासाठी अनेक वर्षांचे शिक्षण व सराव करावा लागतो. या तालवाद्यांसाठी अनेक ताल शिकावे लागतात. पूर्ण मात्रा, अर्धमात्रा शिकाव्या लागतात.

 

त्या तुलनेत ढोल वाजविणे अत्यंत सोपे आहे. त्यात ताल असे फारसे नसतात. कोणीही काही दिवसांच्या सरावाने व्यवस्थित वाजवू शकतो. त्यासाठी दोन तीन महिने रोज ५-६ तास सरावाची अजिबात आवश्यकता नाही.

 

तरूण मुले मुली ढोल पथकात जातात त्यामागे एक मुख्य उद्देश म्हणजे हा डेटिंग जॉईंट असतो.‌ मुलामुलींची ओळख होऊन त्यातून संबंध वाढू शकतात. 

 

ते सोडले तर ढोलवादनाचा अतिरेक झाला असून हा गंभीर स्वरूपाचा उपद्रव आहे हे नक्की. 

 

डिजे असो वा ढोलपथक वा वाद्यवृंद वा फटाके  .   .   .  रस्त्यावर वाजणारे हे सर्वच प्रकार उपद्रव आहेत.

 

दुर्दैवाने अत्यंत बोटचेपे, कणाहीन, जनवरोधी  सरकार असल्याने नागरिकांनीच आपली सर्जनशीलता वाढवायला हवी. 


In reply to by श्रीगुरुजी

ढोल ताशा वाजवणारी मंडळी मुख्यत: हौशी कलाकार असतात आणि छंद म्हणुन वाजवतात, त्यात मानधन वगैरे नसतेच उलट खिशातुन खर्च करावा लागतो. मंडळाला काय कमाई होते माहीत नाही पण बक्कळ होत असणार.

प्रत्येक मंडळ हे भावी राजकीय नेत्यांची इन्क्युबेटर आहेत. सध्याचे नेते शक्ती प्रदर्शन म्हणुन आणि भावी नेते सराव म्हणुन ईथे असतात. जसे अभाविप किवा युवक कॉग्रेस हे त्या त्या पक्षाचे ईन्क्युबेटर आहेत.

 

मूळ मुद्दा धर्म परंपरा हा नसुन वाढती बेरोजगारी, कार्यकर्ते मिळवण्याची गरज आणि त्यातुन शक्ती प्रदर्शन, त्यातुन आपापली हद्द ठरवणे थोडक्यात बिझनेस वाढवणे हा आहे. याच्याशी संबंधित माझा लेख

 

ढोल ताशा पथके की वेठबिगारी ? | मिसळपाव


In reply to by राजेंद्र मेहेंदळे

>> मूळ मुद्दा धर्म परंपरा हा नसुन वाढती बेरोजगारी, कार्यकर्ते मिळवण्याची गरज आणि त्यातुन शक्ती प्रदर्शन, त्यातुन आपापली हद्द ठरवणे थोडक्यात बिझनेस वाढवणे हा आहे.

खरे तर पथकात जाणारे तरूण बहुधा बेकार किंवा कुठेतरी छोटे मोठे काम करणारे, थोडक्यात ज्यांचे करिअर अजून नीट मार्गी लागले नाही असे असतात. अशा परिस्थितीत आपल्याला काहीही महत्त्व नाही, माझी कुणाला गरज नाही असे वैफल्य वाटत असते. त्याला वाट करून देण्यासाठी कुठेतरी महत्त्व मिळवून देण्याचा मार्ग म्हणून ही मुले यात सामील होत असावीत. ती खरोखर धार्मिक असतात असे वाटत नाही.

तुमचा धागा आठवतो. त्यावेळी कलात्मक वादन कसे असू शकते म्हणून मी एक धागा काढला होता:
सांगलीचे कर्णमधूर लेझीम


In reply to by स्वधर्म

लेझमीत तालबद्ध  नाचाला वाव असूनही या प्रकाराला तितकासा लोकप्रतिसाद का मिळत नाही ते कळत नाही. कदाचित त्यातून पुरेसं ध्वनिप्रदूषण होत नाही हे कारण असावं! 


गणेश मंडळे आहेत.  कमीत कमी बजेट असलेले मंडळ लाऊडस्पीकर आणी मिरवणुकीत ढोलताशा हवाच असा प्रयत्न करते. 

वाद्यवृंद वादग्रस्त होतो आणी त्रासदायक वाटतो तेंव्हाच आवाज  उठतो. 


डीजे वाजवायचा तर सार्वजनिक सुटी द्या! अखिल

भरतोय ग्राहक पंचायतीचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

प्रती,
माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री, 
महाराष्ट्र राज्य, 
मंत्रालय, मुंबई 400032.

*विषय: गणेश उत्सव आणि इतर सर्व सण वार ज्यात डी जे वाजवणे साठी परवानगी दिली जाते त्या सर्व दिवसांमध्ये सर्व राज्यातील मोठ्या शहरांमध्ये पगारी सरकारी सुट्टी जाहीर करणे बाबत.*

महोदय,
आपण महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय गृहमंत्री आणि मुख्य मंत्री आहात. आपल्या आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या  चांगल्या कामामुळे पुणे आणि इतर ठिकाणी भाजपची सत्ता महानगर पालिका मधे आली आहे. सर्व नागरिकांनी आपल्या वर विश्वास ठेवून कायद्याचे राज्य असावे म्हणून आपणास निवडून दिले आहे.

परंतु दुर्दैवाने दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे महानगर पालिकेमध्ये पुण्याच्या महापौर सौ मंजुषा नागपुरे, पुणे शहर भाजप अध्यक्ष श्री धीरज घाटे, पुणेचे सह पोलिस कमिशनर आणि पुणे महानगर पालिकेचे आयुक्त श्री नवल किशोर राम हे सर्व महानगर पालिकेत उपस्थित असताना गणेश उत्सव बाबत सभेत एक पुणेकर नागरिक ज्यांनी अनिर्बंध डी जे वाजवण्याबाबत आक्षेप घेतला असता  त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले.

सदर सभेत आपल्या काही लोकांनी दर्पोक्ती केली की ज्या पुणेकर नागरिकांना डी जे चा त्रास होतो त्यांनी पुण्याच्या बाहेर जाऊन राहावे. शिवाय आपल्या महापौर सौ मंजुषा नागपुरे आणि पुणे शहर भाजपचे अध्यक्ष श्री धीरज घाटे यांनी कोणत्याही बंधनाच्या शिवाय गणपती उत्सव साजरा करतील आणि त्यामुळे मंडळाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही असे जाहीर  केले आहे. तर आपले पुणे महानगर पालिकेचे आयुक्त श्री नवल किशोर राम यांनी महापौर म्हणतील तसे सर्व होईल असे जाहीर केले.

महोदय, पुणे आणि सर्वच मोठ्या शहरात विविध उत्सवांमध्ये आवाजाची पातळी खूप वाढते, डी जे मुळे खूप लोकांना त्रास होतो त्यामुळे डी जे चे आवाजावर नियंत्रण असावे अशी माफक अपेक्षा सर्व नागरिक कायम व्यक्त करत असतात.

*महोदय, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भारतीय मजदुर संघ, पुणे रिटेल व्यापारी संघ, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण फेडरेशन, स्वामी समर्थ सोसायटी आणि वरिष्ठ नागरिक यांनी श्री अमितेश कुमार, पुणे पोलिस कमिशनर यांच्या विरुद्ध मुंबई हाय कोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे कारण मागील वर्षी झालेल्या विविध उत्सवांमध्ये डी जे मुळे ध्वनी प्रदूषण हे १०० डेसिबल पेक्षा जास्त झाले होते. सरकारने २००० साली मंजूर केलेल्या कायद्यानुसार ५० डेसिबल पेक्षा जास्त म्हणजे दुप्पट ध्वनी प्रदूषण झालेले आहे आणि पोलिस प्रशासन प्रमुख म्हणून श्री अमितेश कुमार यांची सर्व पुणेकर लोकांचे संरक्षण करणेची जबदारी असताना त्यांनी हे रोखण्यासाठी कोणतेही उपाय केले नाहीत.*
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, अण्णा भाऊ साठे जयंती असो, कोणत्याही मिरवणुका असो, ईद किंवा इतर धर्माच्या सणामध्ये डी जे मुळे खूप ध्वनी प्रदूषण होत आहे आणि त्यामुळे कित्येक लोकांना न भरून येणारा त्रास सहन करावा लागत आहे.

पुणे महानगर पालिका सभागृहात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या समोर आणि भाजप अध्यक्ष श्री धीरज घाटे यांच्या समोर मंडळाच्या लोकांनी सांगितले की ज्या नागरिकांना डी जे चा त्रास होतो त्यांनी पुण्याच्या बाहेर जाऊन राहावे त्यांचा खर्च आम्ही देऊ.

महोदय आपण राज्याचे प्रमुख आहात आणि राज्यात डी जे वाजवणे सुरूच राहणार असेल तर आपण डी जे वाजवायला परवानगी देता त्या दिवशी राज्यात सरकारी सुटी जाहीर करावी. त्यात सर्व राज्यातील सर्व केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालय, सर्व अर्ध सरकारी कार्यालय, सर्व बँका, सर्व खासगी कार्यालय,  सर्व दुकाने, सर्व शाळा आणि कॉलेज यांना कलेक्टरचे आदेशा नुसार पगारी सुट्टी जाहीर करावी. तसेच शहरात राहणाऱ्या सर्व लोकांची, (वयस्कर, तरुण, शाळेतील, कॉलेज मधील )  रहायची आणि खायची प्यायची सोय शहर सोडून इतरत्र करावी. हा सर्व खर्च मंडळाकडून वसूल करावा ( नागरिक जो कर भरतात त्यातून हा खर्च भरू नये ) 
आणि खुशाल डी जे वाजवायला परवानगी द्यावी ही विनंती. 
त्यामुळे आपले कार्यकर्ते खुश होतील, सर्व वयस्कर नागरिक देखील खुश होतील, सर्वांचे राजकीय अस्तित्व अबाधित राहील.

कळावे आपले विश्वासू


विजय सागर
विलास लेले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
६३४ सदाशिव पेठ, पुणे ४११०३०

 

*डी जे बाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची भूमिका*

https://youtu.be/T30JKodA8ZA?si=7YqRxH9NLttzPi6N


पुणेकर निरंतर जागरूक असल्याने आपापल्या परीने डीजे आणि तत्सम गोष्टींना विरोध करत आलेले आहेत. बापट अचानक केंद्रस्थानी कसे आले/ आणले गेले आणि त्यामागे नेमकी काय गोम आहे हे कालांतराने समजेलच. असो. 


कोणताही धर्म हा घरातच असला पाहिजे.

लष्करात अगदी मराठा लाईट इन्फन्ट्री च्या बटालियन मधील गणेशोत्सव कसा असतो. लोक स्वतः वर्गणी काढून श्री गणेशाची स्थानिक मंदिरात प्रस्थापना करतात. तेथे रोज सकाळ संध्याकाळ आरती होते. यासाठी पेटी तबला आणि झाँजा वाजवल्या जातात. तेथे लाऊड स्पीकर नसतोच. प्रसाद वाटला जातो लोक एकमेकांना भेटतात. त्यानंतर स्थानिक लोकांचे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम होतात.

शेवटच्या दिवशी मिरवणूक निघते ज्यात श्री मूर्ती "शक्तिमान ट्रक" मध्ये सजवून ठेवलेली असते बाकी सगळे पायी पायी श्री गणेशाच्या विसर्जनासाठी जवळच्या तलावात जातात. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषणात श्री गणेशाना निरोप दिला जातो.

मंदिरात गणेशोत्सव, दुर्गापूजा, जन्माष्टमी. बैसाखी (पंजाब रेजिमेंट) ओणम किंवा पोंगल (मद्रास रेजिमेंट) सारखे उत्सव साजरे होतात पण आरतीचा आवाज ५० मीटरच्या पलीकडे जात नाही.

युनिटच्या मशिदीत रमजान ईद किंवा चर्च मध्ये ख्रिसमस साजरा केला जातो.

जन्माष्टमी किंवा ख्रिसमस रात्री बारा वाजता साजरे केले जातात परंतु याचा आवाज बाहेर जाणार नाही याची कसून काळजी घेतली जाते.

मंदिरावर किंवा मशिदीवर बोम्बल्या( लाऊडस्पीकर) नसतोच

यापैकी कोणत्याही सणात डी जे किंवा लाऊडस्पीकर मुळे लोकांना त्रास होणार नाही याची खात्री असते.

नौदलाच्या रहिवासी भागात दिवाळी साजरी केली जाते तेंव्हा नौदलाच्या मैदानात जत्रा भरवली जाते तेथे विविध युनिट खाद्यपद्यदार्थांचे स्टॉल लावतात जेथे विविध खाद्यपदार्थ मूळ किमतीला विकले जातात. मुलान्साठी खेळणी पाळणे सारखे खेळ सुद्धा असतात. त्यानंतर नौदलाच्या खर्चाने लक्ष्मीपूजनाच्या रात्री आठ ते साडे आठ फटाक्यांची मोठ्या मैदानात आतषबाजी केली जाते.बाकी मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवायला बंदी असते.   एरिया किंवा कमांड कडूनच याचे पैसे दिले जातात त्यामुळे अत्यंत सुंदर अशी आतषबाजी पाहायला मिळते.

त्यानंतर लोक दहा पर्यंत खाणे पिणे आटोपून आपापल्या घरी जातात. रात्री अपरात्री फटके वाजवायला बंदी असते.

आपल्या सणामुळे कुणालाही उपद्रव होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते.

नागरी आयुष्यात आल्यावर याबद्दल काही बोलले तर लोक लष्करी माणसे एककल्ली (एक्सेंट्रिक) किंवा तिरसट असतात असा शिक्का मारतात.

चालायचंच.


In reply to by सुबोध खरे

पहिले एक डिस्क्लेमर टाकतो - जे काही मी बोलतोय ते सिव्हिलियन पर्सपेक्टीव मधून बोलतोय. 

आणि ह्या परस्पेक्टीव मधून बोलता तुम्ही दिलेली मराठा लाईट इन्फंट्री किंवा नोफ्रा/नौसेना बाग मधली उदाहरणे इथे टोटल गैरलागू आहेत. 

मी असे का म्हणतोय ते जरा उलगडून सांगतो. 

१. धागा विषयवस्तु - विद्यानंद बापट आणि त्यांची पुणे महापौरांनी बोलावलेल्या सभेला हजेरी लावणे आणि नॉट सो पॉप्युलर मत मांडणे. मला वाटते लोकशाहीवादी परंपरांना धरून "सण कसा साजरा करावा ?" ह्या विषयावर छावणीत पण मीटिंग होत असतील, असल्या तरी त्यात सी. ओ., त्याचा स्टाफ ऑफिसर किंवा बटालियनचा ॲडज्युडेंट मेजर, एस. एम. साब किंवा सिनियर मोस्ट जेसीओ फारतर अगदीच एखाद एन.सी.ओ . बोलावला (शक्यता धूसरच) तरीही, महापालिकेच्या सभेइतका कालवा शक्य नाही. 

२. दुसरे म्हणजे खरे साहेब, शिस्तीत जगण्यासाठी बेस/ बटालियन/ रेजिमेंटल सेंटर/ छावणीतील बहुसंख्य कर्ते स्त्री पुरुष ट्रेंड असतात. अगदी नवख्या लग्न होऊन आलेल्या पोरींना पण AWWA/NWWA/AFWWA असतात शिकवायला कसे वागायचे, बोलायचे ते सगळे. त्याशिवाय बेस मध्ये कमांडिंग ऑफिसरने एकदा फर्मान काढले की विषय संपतो त्यावर हरकती मागवणे इत्यादी नसते असे वाटते.

 ह्याची तुलना नाही होऊ शकत ह्या सिव्हिलियन एक्स्प्रेशन सोबत (तमाशा म्हणणार होतो पण मोह आवरला कारण आम्हा बिचाऱ्यांच्या आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार ? हे पण आहेच) म्हणून आपली उदाहरणे गैरलागू आहेत असे म्हणले आहे.

 

 बाकी, नागरी आयुष्यात आल्यावर याबद्दल काही बोलले तर लोक लष्करी माणसे एककल्ली (एक्सेंट्रिक) किंवा तिरसट असतात असा शिक्का मारतात 

कम ऑन डॉक्टर, असे एक्सेंट्रिक किंवा तिरसट म्हणणाऱ्या एकाच्या पाठी डिफेन्स फोर्सेस आणि पर्सनेलला पूजनीय मानून पेडिस्टल वर ठेवणारे किमान १०० असतात. शिस्तीमुळे तुम्हाला कोणी एक्सेंट्रिक म्हणणार नाही पण छावणीच्या आतील अन् बाहेरील आयुष्य तुलना केली की जी चिडचिड तुमची/ तुम्हा लोकांची होत असेल ती पाहून लोकांना असे वाटत असेल. टू वन हिज ओन टू डील विथ सर.

 

(पानसिंह तोमर) खोंडे


DJ हाच देव !! अशा प्रकारे मानसिकता असणारी लोकांच्या हाती गणेश उत्सव गेला आहे.सरकारही यावर काहीच कारवाही करण्याच्या मूड मध्ये नाही.तेव्हा बापट सारख्या सुज्ञ नागरिकाचे कौतुक होणारच.

हे मुद्दे आधी मांड्ले जात नव्हते का? तर हो आधीपासुन गणेश उत्सावात डीजे,वर्गणीची अरेरावी,दारु पत्ते अड्डा ,रस्त्यांची अड्वणुक इ.गलिच्छ गोष्टींनी शिरकाव केलेलाच आहे.

बापट का चमकत आहेत कारण ते बोलतात खुप तार्किक आणि अनेक उदाहरणे देतात.समोरच्याला फक्त वाईट पद्ध्तीने बोल लावत नाही तर त्यांचेही काही अधिकार मान्य करतात.पण ती चौकट अशी कालबाह्य आहे हेही सुनावतात.

खर म्हणजे यावेळी महाऱाष्ट्रात दुष्काळ आहे.तेव्हा काही मदत होइल का याकडे सार्वजनिक मंड्ळांनी कार्य करायला हवे.दरवर्षी असेच मोठे सामाजिक काम मंडळांनी केला तरच हा गणेश उत्सव सार्वजनिक करायची परवानगी द्यावी.

एक बापट ...लाख बापट!!

बापट यांच्यामुळे मीही मराठी शब्द जागरुकपणे अजुन वापरत आहे.खुप दिवसांनी अशी धो धो सुंदर मराठी ऐकुन कान धन्य झाले हेवेसांन!!


In reply to by Bhakti

अजुन एक मुद्दा ज्याने सार्वजनिक उत्सव केवळ धांगड्धिंगा उरलाय हे समजते.यावेळचा बत्तीस शिराळा नागपंचमी उत्सवात अत्यंत बिभित्सपद्ध्तीने बायका नाचवण्याचे प्रकार झाले,ती क्षणचित्रे पाहुन खुप खेद झाला.

काय ही डीजे कीड उत्सवांना लागली आहे 😡


In reply to by Bhakti

वार्ताहर: DJ ला पर्याय काय सुचवू शकता ?

बापट: मूर्खपणाला पर्याय नसतो. कॅन्सर ला पर्याय एड्स असू शकत नाही किंवा एड्स ला इबोला असू शकत नाही. 

 

माणूस पूर्णतः dehat-pilled आहे. 


पूर्वीचे डीजे व्यवस्थित वाजायचे! आता आत नवीन नवीन इक्विपमेंट फिट करतात त्यामुळे आवाज वाढतो.


सार्वजनिक (म्हणजे रस्ते अडवून होणारी नी रस्त्यावर मिरवणुका काढली जाणारी) गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र, आंबेडकर जयंती,  अण्णाभाऊ साठे जयंती, पैगंबर जयंती, होळी आंबे जांभळं करवंद सगळं काही बंद व्हावं! ज्यांना जास्त खाज असेल त्यानी हॉल वगैरे बुक करून तिथे गोंधळ घालावा. तुमचेसण तुमच्या घरी साजरे करा, रस्त्यावर सण साजरे करायला रस्ता काही तुमच्या बापाचा नाही असे धर्मियाना ठणकावून सांगायची वेळ आली आहे!

सार्वजनिक उत्सव बंद करा! 


ह्या ध्याग्याचा प्रिंट घेऊन मिपा मालकांनी फ्रेम करून लावावा कारण DJ आणि ढोल ताशे हे उपद्रव जास्त आहेत ह्यावर सर्वांचे एकमत होत आहे असे दिसून येत आहे.
 


गणपती मुर्तीना लावलेला रंग हे शेवटी एक विषारी रसायन आहे. कधी काळी रंग हे वनस्पती जन्य असावेत. आता काही तसे राहिले नाही. विसर्जनानंतर ते सगळे जर पिण्याच्या पाण्यात मिसळत असेल तर त्यालाही विरोध केला पाहिजे. कॄत्रिम विसर्जन करा आणि ते रसायनयुक्त पाणी कोठेही पिण्याच्या पाण्यात मिसळले जाणार नाही याची कडक व्यवस्था करा. आताचे विसर्जनाचे पाणी जर कुठे ओतायचे म्हणून पुन्हा नदीतच ओतत असतील तर त्याचा काही उपयोग नाही. 


In reply to by अकिलिज

तुंम्ही मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे. म्हणायला पर्यावणस्नेही म्हणून हौद वापरायचे, तेही अविघटनक्षम फायबरग्लासचे, आणि जर त्यातले पाणी पुन्हा नदीतच सोडणार असले, तर सगळंच मुसळ केरात!

बाकी विसर्जनाबद्दल ऐकलेले:

टिळकांनी गणेशोत्सवाला लोकांचा उत्सव बनवले. त्यांनी घरातला गणपती बाहेर काढला तेंव्हा सनातनी रुढीवादी लोकांनी म्हणे विरोध केला होता. पण टिळकांना लोकांना एकत्र आणायचे होते. पण झाले असे की, कुठल्याही जातीपातीचे लोक मंडपात येऊ लागले व मूर्तीचे दर्शन वगैरे घेऊ लागले. हे मात्र रुढीवादी कर्मकांडी शिवाशिव पाळणाऱ्या लोकांना कदापि मान्य होण्यासारखे नव्हते. म्हणून मग त्या मूर्तीचे विसर्जन करावे असा 'मध्यम मार्ग' निघाला जेणेकरून घरात पुन्हा विटाळ येणार नाही. खरे खोटे तो गणपतीच जाणे.


In reply to by स्वधर्म

> म्हणून मग त्या मूर्तीचे विसर्जन करावे असा 'मध्यम मार्ग' निघाला

ऐकलेले ? 

 

असल्या बातम्या कुठे बरे कानावर पडतात ?

समजा विसर्जन करायचे नसेल तर तर नक्की प्लॅन काय होता ? दर वर्षी नवीन गणपती आणून त्यांची सभा भरवायची ?

उगाच काहीही अफवा "ऐकलेले ते पसरवले" करायची गरज नाही. हल्ली AI आहे त्यामुळे ह्या "ऐकलेल्या" गोष्टी सहज तपासून पहिल्या जाऊ शकतात.

सार्वजनिक गणेशोत्सवाला कुणी कुणी विरोध केला.

- धर्मशास्त्री ब्राम्हण

त्यांच्या मते हे एक खाजगी कर्मकांड होते आणि ते सार्वजनिक करू नये.  सध्या बापट आणि इतर मंडळी जो मुद्दा मांडत आहेत तो हाच आहे. गणेशोत्सव हा खाजगी (सामूहिक असला तरी ) कायर्क्रम म्हणून साजरा करावा .

- सुधारक मंडळी (रानडे आगरकर इत्यादी)

ह्यामुळे हिंसा भडकेल असे त्यांचे म्हणणे होते.

- फुले  ह्यांची चळवळ

सार्वजनिक गणेशोत्सवाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या 'सत्यशोधक जलशां'ना शह देण्याचे काम केले. फुल्यांच्या चळवळीने ब्राह्मणी वर्चस्व आणि जातीय उतरंडीला आव्हान दिले असताना, ब्रिटिशांविरोधात "हिंदू एकता" प्रस्थापित करण्याचे गणेशोत्सव हे एक साधन बनले. [१]

 

- https://mumbaimirror.indiatimes.com/opinion/a-complex-origin-story/arti…


In reply to by अकिलिज

ह्यानी इंग्लंडची नदीही सोडली नाही खराब करायला.


In reply to by अकिलिज

पुण्यात विसर्जन कुठे आणि कसे केले जाते ? रंग काय असावेत ह्यावर काही नियम आहेत कि नाहीत ? 

 


डाव्या लोकांचे एक वैशिष्ट्य असतं. कामे  सगळी डावी असतात, दाखवायला ओळखी मात्र काही वेळ उजव्या असतात! 

 

१. जंतरमंतरवरील निर्भय जेन झी नंतर असे एक एक निर्भय लोक समोर येत आहेत. कुठे ना कुठे अनेक नागरिक त्यांना पाठिंबा देत आहेत. 

ऑगस्ट २०२६ पूर्वीपर्यंत भारतभरातले तरुण लोक सगळे निपचित पडले होते जणू! नंतर अचानक सगळे जागे झाले आणि कुणाला ना कुणाला पाठिंबा देऊ लागले! किती मोठा हा चमत्कार! 

 

२. म्हणून मग त्या मूर्तीचे विसर्जन करावे असा 'मध्यम मार्ग' निघाला जेणेकरून घरात पुन्हा विटाळ येणार नाही.

हिंदू धर्मात पार्थिव मूर्ती नामक काही संकल्पनाच नसते जणू! काहीही करून सनातन हिंदू धर्मीय म्हणजे अक्कलशून्य मानवताविरोधीच, नाही का? 

 


In reply to by कांदा लिंबू

बाकी, इतर सगळ्याच सार्वजनिक कार्यक्रमांप्रमाणेच, श्री गणेशोत्सवाचे उत्सव स्वरूप कमालीचे रसातळाला गेले आहे यात काही वाद नाही. पण ह्याचे निमित्त करून सर्वश्रेष्ठ हिंदू धर्मावर जर कुणी दुगाण्या झाडण्याचा प्रयत्न करत असेल तर तसल्या डावखुऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्यायलाच हवी.


In reply to by कांदा लिंबू

तू पडतो भावूक त्यात रडवून जातोस तरीही शेवटी काय होते तुला लोक फोडून खातात ना भाई ! असे करू नको ! तू भावा गंगा उलटी वाहवलीस अन् मुद्दे सोडून माणसे बडवू लागलास की रे ! 

एक मैत्रीपूर्ण सल्ला, विसर्जनाचे जे काही त्यांनी लिहिलेले आहे त्याचा विदा माग पाहू, देतील ते, तुझ्याकडे विरोधात काही विदा असला तर तो मांड. दोन्हीतून जे काही ज्याला वाटेल ते ते उचलू दे, 

चर्चासत्राला स्लग फेस्ट केल्याचा आरोप बसतो नाहीतर उजव्यांच्या माथी, I hope तुला ह्या पापाचे भागीदार होण्यात रस नसेलच. 

कळावे परी बारीक होऊनी मिसळीत मेळावे. 

 

(अध्यक्ष, मिसळपाव डावे उजवे लवाद) 

खोंडे


In reply to by कांदा लिंबू

>> हिंदू धर्मात पार्थिव मूर्ती नामक काही संकल्पनाच नसते जणू! 

मलाही संदर्भ शोधले असता मिळाले नव्हते म्हणूनच मी 'ऐकलेले' व 'खरे खोटे गणपतीच जाणे' असे लिहिले होते. हिंदू धर्मात पार्थिव मूर्ती असते याची माहिती दिल्याबद्दल आभार. कोणत्याही पूजेची उत्तरपूजा असते व निर्माल्य नदीत सोडतात हे माहिती होते. नवीन माहिती मिळाल्यावर आपली मतेदुरूस्त करण्याचे औदार्य सर्वांनीच दाखवायला पाहिजे. खोंडे साहेब म्हणतात तसे तुंम्हाला जर अधिक काही अधिकृत संदर्भ मिळाले तर जरूर शेअर करा.


In reply to by कांदा लिंबू

विटाळ प्रकरणात तथ्य वाटण्याचे कारण असे होते की...

१८९२ ला गणेशोत्सवाची व विसर्जन मिरवणूकीने विसर्जनाची सुरूवात झाल्याच्या वेळी निश्चितपणे समाजातील दलित व अस्पृश्यांना मंदीरात प्रवेशच नव्हता तर मूर्तीचे दर्शन घेण्याचा प्रश्नच नव्हता. याचा आधार असा की 

- आंबेडकरांनी काळाराम मंदीरात प्रवेशासाठी आंदोलन केले होते.

- स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षांनी साने गुरूजींनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदीरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी उपोषण केले होते.

- त्या पूर्वी संत चोखामेळा यांनी गाभाऱ्याशी कैसे येऊ आंम्ही जातीहीन अस अभंग लिहिला होता. जिंतेंद्र अभिषेकींनी अतिशय सुरेल गायला आहे.

त्यामुळे मूर्तीला विटाळ होत होता यात कसलीच शंका नाही. म्हणून ऐकलेल्यात तथ्य असावे असे वाटले होते. पण मी आधीच सांगितले आहे की तुंंम्ही जर अधिक संदर्भ दिले तर ऐकीव गोष्टीवरून बनलेले मत दुरूस्त करायला काहीच अडचण नाही. 

 


In reply to by स्वधर्म

जसे सतीप्रथा नव्हतीच असे काही जण ऊर बडवत सांगत होते, तसे विटाळही नव्हताच सांगतील, धन्यवाद माहितीबद्दल! 


मुळात बापट हे स्वतः ला डावे आणि नास्तिक समजतात. परंतु त्याची विचारसरणी पाहिली तर ती बुद्धीप्रामाण्यवादी आहे, जी चार्वाक दर्शनाच्या जवळ जाणारी आहे‌. त्याउलट डिजे समर्थकांच्या कडे कोणतीही वैचारिक मांडणी नाही. हिंदू धर्म आणि परंपरेच्या आडुन त्यांना स्वतःचा उन्माद आणि दहशतवाद किंवा जमिनविक्याभाईगिरी रेटायची आहे‌. बापट ज्या तार्किक युक्तिवादाने आपलं मत मांडत आहेत ते पाहता हतबल डिजे समर्थक दाभोळकर शैलीत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असे वाटते.

 

तळटीप - आणखी एक उपद्व्यापी पुणेकर संतोष पंडित यांच्या वर चद्रकांत पाटील  आणि गोपिचंद प्रकणात  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,


In reply to by भीमराव

काल रात्री १ वाजता पंडितांना अटकही झाली आहे.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

अतिशय कर्कश्य पुणेरी बॅटमॅन अटक झाला ते बरे झाले. स्वतः पिवळ्या पट्टीबाहेर पार्क असणाऱ्या गाड्यांवर, व्हीआयपी कल्चर वर बोंबाबोंब करायची अन् हेल्मेट सारखे जीव वाचवणारे साधन वापरणार नाही म्हणून अडून बसायचे ह्यातच त्यांचा दांभिकपणा उजागर होतो.


In reply to by वृषभ खोंडे

पुण्यात हेल्मेटसक्ती नाही! आणी ही पळवाट असू शकत नाही.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

पुण्यात हेल्मेटसक्ती नाही ???????

जे भारतभर सक्तिचे आहे; पुण्यात त्याला सूट आहे म्हणताय?

पुणेकर कायद्याचे ऐकत नाहीत असे म्हणा. सूट वगैरे काहीही नाहिय्ये


In reply to by विजुभाऊ

तसेच! आधी नियम बनवणाऱ्यांनी सुधारायला हवे मग सामान्य नागरिकाना अक्कल शिकवावी. सामान्य माणूस चुकीची बांबर प्लेट लावेल तर कारवाई मग पडळकरांवर कारवाई का नाही? रस्त्यांवर खड्डे आहेत त्याची जबाबदारी कोणाची? संतोष पंडितांचे व्हिडिओ पहा, नियमाबाहेर लोक गाडीवर लाल दिवा लाऊन फिरतात, नॉनपार्किंग मधे गाड्या पार्क करतात! ती मोठी धेंडे आहेत म्हणून पोलीस कारवाई होत नाही! असे का?


In reply to by विजुभाऊ

सक्तीस विरोध आहे. 

 

माझे मस्तक माझे उत्तरदायित्व! 


In reply to by श्रीगुरुजी

+1

हेल्मेटसक्तीमागे नागरिकांची काळजी नाही तर सामान्य नागरिकाना त्रास देणे हा हेतू वाटतो! इतकी काळजी आहे तर रस्त्यांवरचे खड्डे बुजवायला हवेत खड्ड्यांमुळेही जीव जातात, खड्डे पडतात कारण काम निकृष्ट झालेल असते त्यांच्यावर कारवाई करायला हवी ते तर सरकार करत नाही.


लेख चांगला आहे पण थोडा खटकला, फक्त पुरोगामीच मराठीला विरोध करताहेत असे म्हटले आहे, पण मुळात मला तरी पुरोगामी नी मनुवादी दोन्हीही मराठीला विरोध करताना दिसतात, हिंदी लादणारे सध्याचे महाराष्ट्रातील सरकार तर पुरोगामीही नाही. 

  बाकी तामिळ, गुजराथी, मारवाडी, बंगाली जे इथे पैसे कमवायला आले ते सगळे मराठी शिकले. मराठी नोलणार नाही हिंदीतच बोलेन हा माज फक्त गोबरपट्यातील हिंदी भाषिक दाखवतात. वर कुणीतरी म्हटले आहे सगळ्या भाषा शिकणार का जिकडे तिकडे गेल्यावर, तुम्हाला पैसे कमवायला नवीन स्किल्स शिकता येतात मग भाषेनेच काय घोडे मारले आहे? मी स्वत थिडेफार तमिळ नि बंगाली बोलू शकतो कामचलाऊ, आम्ही ना, जल खाबे वगैरे तसेच तमिळ तेरीयाद, एपडी इर्किंगा, येन माडदे वगैरे. इतके बोलले तरी स्थानिक खुश होतात. पण मराठी म्हणजे पाकिस्तानची भाषा आहे असा ह्या गायपट्यातील हिंदी भाषकांचा आविर्भाव असतो. अर्थात आपलेच काही मूर्ख मराठी लोक चहा पेक्षा किटली गरम होऊन मराठीला विरोध करतात.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

अ.बा. हा लेख मराठी हिंदी विरोधाबाबत नव्हता. तुंम्ही चुकीच्या जागी तर प्रतिसाद टाकला नाही ना?


आम्ही मागील अनेक वर्षांपासून घराच्या प्रांगणात एका मोठ्या प्लास्टिक रांजणात श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करतो. साधारणपणे २४ तासांनंतर विलग झाली शाडूमाती व पाणी रोपांच्या मुळाशी टाकतो.

 

महापालिकेच्या हौदात विसर्जन करण्यात काहीही अर्थ नाही. तो हौद आधीच्या विसर्जित केलेल्या मूर्तींनी तुडुंब भरलेला असतो. तुमची पाठ वाळल्यानंतर तुम्ही विसर्जन केलेली मूर्ती बाहेर काढून ठेवतात व नंतर त्या मूर्तींचे काय करतात हे कोणालाच माहिती नाही. 

 

अंनिसचे काही जण श्रीगणेश विसर्जनाच्या दिवशी नदीतीरावर 

मूर्ती दान करा असे फलक घेऊन उभे असतात. ते दान दिलेल्या मूर्ती वापरात नसलेल्या खाणीत साठलेल्या पाण्यात विसर्जन करतात असे सांगतात. काही वर्षांपूर्वी अंनिसने जमा केलेल्या मूर्ती एका खोलीत कश्या ठेवल्या आहेत याचे प्रकाशचित्र प्रसिद्ध केले होते. अनेक मूर्ती भग्नावस्थेत होत्या. 

 

मला तरी मूर्ती घरच्या घरी प्लास्टिक रांजणात विसर्जित करणे हा सद्यपरिस्थितीत योग्य पर्याय वाटतो. अजून एक पर्याय म्हणजे एक कायमस्वरूपी पंचधातूची मूर्ती आणणे व दरवर्षी विसर्जित करून पुढील वर्षी पुनर्प्रतिष्ठापना करणे. 


विद्यानंद बापट यांना बेदम मारहाण
गणेश उत्सवात डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या आणि अल्पावधीतच प्रसिद्धीत आलेल्या विद्यानंद बापट यांना टिळक रोडवरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे.  काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना काही व्यक्तींनी त्यांना मारहाण केली आहे.

ही आपली लायकी.... महाराष्ट्र बदलत आहे. मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक झाली की नाही अद्याप समजले नाही.


In reply to by Bhakti

देवाभौंच्या मर्जीत येण्यासाठी एखाद्याला बेदम मारणे हा  सक्तीचा निकष आहे. 


विद्यानंद बापटांना मारहाण झाली. मारहाण करणाऱ्याला आपल्यावर कारवाई होण्याची अजिबात भीति नाही.‌

 

मदन शर्मा, अनंत करमुसे यांना मारहाण करणारे अजूनही मोकाट आहेत. बापटांना मारहाण करणारा सुद्धा मोकाट राहणार.

 

'खलरक्षणाय सदनिग्रहणाय' या घटनेतील तत्वाचे निष्ठापूर्वक पालन करणाऱ्या आपल्या कणाहीन व निष्क्रिय गृहमंत्र्याचे हा्दिक  अभिनंदन आणि गुंडांच्या पाठीशी सातत्याने  खंबीरपणे उभे राहण्यासाठी धन्यवाद!


In reply to by श्रीगुरुजी

कर्णपटले विद्ध होतील अशी ध्वनिनिर्मिती करणे, नेत्रपटलांच्या प्रकाशसंवेदना नष्ट होतील असे प्रकाश किरण प्रसारित करणे व माझ्या या उत्सवी महत्कार्याच्या विरोधात जे जे उभे राहतील त्यांना आडवे करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळविणारच.


In reply to by श्रीगुरुजी

गुरूजी मा. मुख्यमंत्री हे अगदी त्यांच्या पक्षाला हवं तस्सं काम करत आहेत. योग्य वेळी नरो वा कुंजरो करून त्यांनी ते अप्रत्यक्षपणे कोणाच्या पाठीशी उभे आहेत हे सूचित केलेले आहे. तुमच्या आवडत्या पक्षाचा अजेंडाच ते पुढे नेत आहेत. केंद्र सरकारने नाही का जंतर मंतर वर असेच मुलांना मारहाण केली? ऑलिंपिक विजेत्या कुस्तीगीर मुलींना नाही का फरपटत नेलं? मग आत्ताच विरोध का?


कृपया मारहाण झाली म्हणू नये, महाराष्ट्राची बदनामी होते. हे दिमागी नक्षला्यांनी घडवलेले कारस्थान आहे. अध्यक्ष महोदय आणि म्हणोन. लोकांनी यावर विश्वास ठेऊ नये.


In reply to by भीमराव

या प्रकाराची चौकशी करण्यासाठी लवकरच एक त्रिसदस्यीय समिती नेमली जाईल. संपला विषय. 


विद्यानंद बापटांवर हल्ला करणारा संतोष चव्हाण पोलिसांच्या ताब्यांत आला आहे : https://www.youtube.com/watch?v=t3GIukm12Og

 

बापटांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची खुद्द अमितेशकुमारांनी ग्वाही दिली आहे. 

 

-गा.पै.


मारहाण करणारे कार्यकर्ते (?) असेच वागणार. हे अपेक्षितच होते. बापट यांना याबाबत जेंव्हा विचारले तेंव्हा त्यांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला युध्दाच्या वेळी जो उपदेश केला तो संस्कृत श्लोक उधृत केला होता. त्यात श्रीकृष्ण म्हणतो युध्दात जय झाला तर पृथ्वीचे साम्राज्य भोगशील व मेलास तर स्वर्गात जाशील त्यामुळे युध्द करणे हाच मार्ग आहे. आता बापट नरमतील की नाही हे दिसेल पण गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांच्या कृतीमुळे दोन गोष्टी झाल्या:

- धर्माचा पगडा असलेल्या असल्या कार्यकर्त्यांमुळे हिंदू धर्माची विनाकारण बदनामी झाली.

- कुंपणावर बसलेले लोक अधिकच बापटांच्या बाजूला येतील.


पूर्वी टिळकांनी समाजप्रबोधनासाठी आणि एकजुटीसाठी उत्सव सुरू केला, आज तो गल्लीबोळातील दादांच्या शक्तीप्रदर्शनाचा आणि डीजेच्या दणदणाटाचा इव्हेंट झालाय. अशा वातावरणात बापटांसारखा माणूस तर्काची भाषा बोलतोय म्हणूनच अनेकांची भंबेरी उडाली आहे. "काळं कुत्रंही विचारत नाही" म्हणणाऱ्यांनाच आज प्रत्येक टीव्ही डिबेटमध्ये बापटांना उत्तरं द्यायला पळापळ करावी लागतेय, यातच बापटांचा अर्धा विजय झाला आहे!


आवाज प्रदूषण हा खरं तर पक्षीय प्रश्न नसून तो सामान्य माणसांच्या शांततेत जगण्याच्या मूलभूत अधिकाराचा आहे.

दुर्दैवाने मूलभूत अधिकारावर वाजवी नियंत्रण नक्की किती याचे निकष नाहीत. (fundamental rights and reasonable restriction).

बऱ्याच वेळेस न्यायालयांनी घालून दिलेले निर्बंध सर्रास पायदळी तुडवले जातात.

मतांसाठी राजकारण असल्यामुळे सर्वच पक्ष आणि त्यांचे अनुयायी याला पक्षीय दृष्टिकोनातूनच पाहतात.

याशिवाय यात विविध तर्हेचे आर्थिक संबंध गुंतलेले असतात यामुळे सामान्य माणसाची कुचंबणा होत राहते.

गणेशोत्सवाचा मूळ हेतू काय याचे चर्वित चर्वण सर्वत्र झालेले आहे.

जोवर सामान्य माणसे राजकीय पक्षांना स्पष्ट शब्दात सांगत नाहीत कि यावर्षी गणेशोत्सवात डी जे वाजले तर पुढची निवडणूक तुम्हाला महाग जाईल तोवर यात बदल होणार नाही.

आता श्री बापट याना पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे याना सामान्य माणसांच्या त्रासाशी काहीही घेणेदेणे नाही.

त्यांना आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.

साधी सरळ सूचना- डी जे चा आवाज ८५ डेसिबलच्या पर गेला तर १०,००० रुपये दंड,

१०० डेसीबेलच्या वर गेला तर एक लाख रुपये दंड

आणि

१२० डेसीबेलच्या वर गेला तर डी जे चालवणाऱ्यांना सहा महिने तुरुंगवास आणि त्या मन्डळाला गणेशोत्सवासाठी कायमची बंदी.

हे ड्रोनच्या साहाय्याने पोलिसांना सहज पडताळता येईल. द्रुतगती मार्गावर असलेल्या कॅमेर्यांसारखे लक्ष ठेवून पोलिसाना असे करणे सहज शक्य आहे.

पण राजकीय इच्छाशक्ती असेल तर.

सहज संदर्भासाठीआवाजाची पातळी

60 dB: Normal conversation or a standard dishwasher.

70–80 dB: A running vacuum cleaner, busy city traffic, or a noisy restaurant (safe for continuous exposure under 70 dB).

85–90 dB: A power lawn mower, blender, or heavy traffic (prolonged exposure above 85 dB can harm hearing).100–110 dB: Motorcycle, nightclub, or sporting event.

120–140 dB: Thunder, a live rock concert, or a jet plane taking off (considered the threshold of pain and immediate risk)      


In reply to by सुबोध खरे

hsrp नंबर प्लेट नसेल तर शिक्षेची / दंडाची तरतूद आहे नां. तरीही ००७ अजूनही सेम नंबर लाऊन सात - आठ गाड्या फिरवतोय. त्याचा चालक आमाला आडवाची कोणाची हिम्मत नाय म्हणून रीला बनवतोय. त्याला अजून दंड लावू शकले नाहीत. या स्पीकरवाल्यांवर काय पोलीस कारवाई करणार. 

त्रास होतो हे ढळढळीत दिसतंय तरीही परवानग्या देताय आणि दोन बेस वगैरेच्या सबबीखाली सगळं  झाकून ठेवताय. काय पोलीसखातं झालंय की चेष्टा लावलीय. 

आता तुम्ही म्हणाल की राजकीय इच्छाशक्ती असेल तर. असं मी बोललोच आहे. पण आताचे सण आणि उत्सव हे राजकीय शक्तीप्रदर्शन करण्याची साधनं बनून राहीली आहेत त्याचं काय. ती इच्छाशक्ती नाहीच हे गॄहीत धरून पुढचा प्रवास असणार आहे. 


In reply to by सुबोध खरे

दुर्दैव हे आहे कि एकदा असले नियम केले कि ते नियम तोडणे हे शक्ती प्रदर्शन ठरते. दादा, तात्या, भाऊ च्या मंडळात आम्ही वाट्टेल तेवढ्या मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावू अशी बढाई मारली जाते. जो पर्यंत बापट म्हणतात त्या प्रमाणे "बलप्रयोग" होत नाही तो अपर्यंत शक्य नाही. नाहीतर मंडळी १५० db वर DJ लावतील आणि मागे पुढील एक वर्ष FIR वगैरे गेम्स खेळतील.
 


डाॅ सिद्धांत गांधी,हृदयविकार तज्ञ..सोलापूर यांनी डी जे चे होणारे दुष्परिणाम अतिशय सोप्या शब्दात ए बी पी माझावर सांगीतले.

 

सोलापूर मधील डाॅ नी पुढाकार घेऊन उत्सव डि जे मुक्त  केले आहेत.

 

नागपूर  मधे पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी दोन महिन्यासाठी डि जे ,लेझर बंदी लागू केली आहे.

कोल्हापूर  आयुक्तांनी डी जे ला परवानगी मिळेल पण तुमच्या वरिष्ठांना  डि जे जवळ बसवा असे म्हणल्याचे वाचले,ख खो दे जा.

 

डाॅ खरे यांनी जे प्रतिसादले आहे तेच डाॅ गांधी यांनी सागीतले.


आजवर ध्वनिप्रदूषणाच्या अतिरेकाने काही मृत्यू झाले आहेत. ध्वनिप्रदूषण करणाऱ्याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा किंवा एक लाख रुपये दंड अशी शिक्षा आहे अशी माहिती मिळते. आजवर या गु्न्ह्यासाठी एका तरी माणसाला ही तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे का? आणि यात नेमके कोण कोण आरोपी म्हणून धरले जातात? जर जरब बसेल अशी शिक्षा होतच नसेल तर मग अस  गुन्हा करताना संबंधित कशाला कचरतील? सर्लवपक्षीय नेते संरक्षण द्यायला नेहमीच सिद्ध असतात हे तर आपण पाहतोच.


In reply to by रामचंद्र

विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर काही दिवसांनी काही मंडळांवर गुन्हा दाखल करतात आणि पुढील वर्षी गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी सर्व गुन्हे काढून टाकतात. अनेक दशके हेच सुरू आहे. 

 

गुन्हा घडत असताना पोलिस थंड असतात, तेव्हा गुन्हा थांबविण्याचा शष्प प्रयत्न करीत नाहीत आणि गुन्हा करून संपल्यानंतर काही दिवसांनी गुन्हा दाखल करण्याचे नाटक करतात. 


बापट बोलू लागल्याने ध्वनीप्रदुषण्ग्रस्त लोकांसमोर आशेचे किरण दिसू लागले आहेत. 

एक बालीश  & लोचट  यूट्यूबर बापटांना वारंवार उचकवण्याच्या प्रयत्न करतो  करतो आहे पण बापटांच्या तर्कबुद्धीपुढं त्याचा नाईलाज होऊन निरूत्तर होतोय ... 

https://www.youtube.com/watch?v=c0AavG1E2kw

 

बापट या माणसाचा प्रचंड अभ्यास आहे हे वाक्या गणिक जाणवत राहते. 

 

सलाम बापटांच्या अथक प्रयत्नांना, वक्तृत्वाला, वाचनाला, वक्तव्याला, वाचनाला,  ज्ञानाला & तर्कांना  _/\_ 


पुणे बदलत चाललय, एकेकाळी सुसंस्कृत मराठी शहर नी विचारवंतांची भूमी म्हणून पुण्याचा दबदबा होता, पुण्यातील विचारवंतांना सरकारे वचकून असायची. आता एक विचारवंताला रस्त्यावर मारहाण होते तर नागरी समस्येवर बोलणाऱ्याला रात्री उचलून नेले जाते. पुणे गुंठामंत्री नी गुंडांच्या ताब्यात जातेय, बोंबलायला ही सोय राहिलेली नाही कारण वरून खालपर्यंत पुणेकरांचे आवडतेच सरकार आहे.


फडणवीस यांनी फारच बोटचेपी भूमिका घेतली ह्या प्रकरणात. निदान लोकमानस कुठं आहे हे बघून तरी बदलायला पाहिजे होते. बापाटाच्या समर्थनार्थ मोठं आंदोलन होईल असं वाटतंय.


बापट यांच्या अनेक मुलाखती पाहिल्या आणि आवडल्या.पण एक मुद्दा जरा समजुन घ्यायला अवघड जात आहे.

लाठी, अश्रूधूर, पेलेट गन, रणगाडे यांच्या वापरानं पोलिसांनी ध्वनिप्रदूषण करणार्‍यांना शिक्षा करावी.

एकाच वेळी बरोबर आणि चुकही वाटावे अशी याबाबत माझी संभ्रमावस्था झाली.

समाजकंट्काच्या  झुंड्शाहीला घाबरु नये!!! तर 

दुसरीकडे लोकांवर थेट हिंसा करावी का??


In reply to by Bhakti

बापट हे साम्यवादी म्हणतात पण कदाचित अमेरिकन libertarian विचारधारेने सुद्धा प्रभावित असावेत. मूलभूत वैयक्तिक अधिकार हे अलंघनीय असून स्टेट म्हणजे सरकारची प्रमुख जबाबदारी त्याचे रक्षण हि आहे आणि सरकारला हिंसा करण्याचा अधिकार जो आम्ही दिला आहे त्याचे प्रमुख कारण ते आहे अशी एक विचारसरणी आहे त्याचा प्रभाव त्यांच्यावर असावा. बापट हे तल्लख बुद्धीचे आणि वाक्पटुत्व असलेले व्यक्ती असल्याने त्यांच्या विरोधांत बोलणारे तुलनेने मूर्ख वाटतात आणि त्यांच्या सर्वच गोष्टींचा योग्य तो प्रतिवाद होत नाही. ते वापरणारे विविध शब्दप्रयोग आणि तर्क हे Libertarian लेखनात सर्वत्र आढळतात.

पाहिली गोष्ट म्हणजे वैयक्तिक अधिकार महत्वाचे असले तरी, शेवटी प्रत्यक्ष जगांत सगळीकडे ह्या अधिकारांवर नियमानुसार बंधने येतात आणि त्यांना "inifinite" मानणे शक्य नाही. अगदी रॉथबर्ड, नोझिक आणि माझे शेजारी आणि मिल्टन फ्रीडमन ह्यांचे सुपुत्र डेव्हिड फ्रीडमन ह्यांनी ह्यावर विपुल लेखन केले आहे.

तुम्ही एका सोसायटीत राहता. तुमच्या बाजूच्या फ्लॅट मध्ये टॉयलेट मोडली. तो मग लोक बोलावून दुरुस्त करतो आणि त्याचा प्रचंड आवाज तुम्हाला ऐकू येतो. तुमच्या right to प्रायव्हसी चे उल्लंघन होते. पण त्याला टॉयलेट नाही तर त्याने काय करावे ? इथे सोसायटी चे नियम असतात. काम सकाळी १० ते ४ पर्यंत केले जाऊ शकते इत्यादी. ह्या नियमानुसार आम्ही सर्वजण चालू असे मान्य करूनच फ्लॅट घेतला जातो. काही नियम नंतर बनवले गेले तरी नियम बनविण्याची प्रक्रिया तुम्हाला मान्य आहे असे तुम्ही फ्लॅट घेतला तेंव्हा तुम्ही मान्य केले होते. सोसाइटी मधील नियम हे बहुमताने पास होतात सर्वसंमतीने नाहीत. त्यामुळे अनेक नियम जे तुमच्या हक्कांचे उल्लंघन करतात ते तुमच्या थेट संमतीशिवाय बनवले गेले असले तरी तुमची "meta-consent" असतो असे आम्ही गृहीत धरतो. अशी गृहीतके असल्याशिवाय सुसंस्कृत समाज बनवणे कठीण आहे. 
सोसायटीचा जो तर्क आहे तोच तर्क शहर, राज्य आणि राष्ट्र स्तरावर काही थोड्या जास्त प्रमाणात लागू होतो.

पुणे शहरांतील रस्ते हे वाहतुकी साठी असले तरी सुद्धा, शहराच्या नियमा प्रमाणे वाहतूक बंदी केली जाऊ शकते. उदाहरणार्थ कुठे बांधकाम चालू असेल, चित्रपटाचे शूटिंग चालू असेल,  कुठे अपघात झाला असेल इत्यादी कारणांनी वाहुतक पोलीस विविध निर्बंध आणू शकतात. जगांत सगळीकडे सार्वजनिक जागा, खाजगी गोष्टी साठी काही प्रमाणात भाड्याला घेतल्या जाऊ शकतात आणि त्यासाठी शहराचे नियम असतात. अर्थांत, इथे नियम असणे, त्याचे पालन होणे आणि हे नियम मूर्खपणाचे नसून विवेकबुद्धीने निर्माण केले असावेत ह्यावर कुणाचेच दुमत नसावे. त्यामुळे काही ठिकाणी जर गणेशोत्सव साठी वाहतूक बदलणे, रस्ते बंद करणे इत्यादी आवश्यक असेल तर त्या प्रमाणे विवेकबुद्धीने नियम बनवणे तात्विक दृष्टया पूर्णपणे शक्य आहे.

तीच गोष्ट आहे ध्वनी प्रदूषणाची. समजा तुम्ही सोसायटीत राहता त्याच्या पुढील सोसायटीत बांधकाम सुरु आहे. ते लोक स्लेजहॅमर वगैरे वापरून ध्वनी प्रदूषण करत आहेत. मग काय ? ध्वनी प्रदूषण चुकीचे असले तर विविध मानवी गोष्टीसाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषण करणाऱ्यावर रणगाडे वगैरे घालणे ह्या भाषेला काही अर्थ नाही. ध्वनी प्रदूषणाची समस्या सुद्धा विवेकबुद्धीने, तारतम्य ठेवून योग्य ते नियम बनवून सोडवणे सहज शक्य आहे आणि सगळीकडे बापटांचीच तात्विक भूमिका सत्य म्हणून मानली पाहिजे असे नाही.

गणेशोत्सव पुणे शहराचा एक महत्वाचा उत्सव आहे. "ह्याला मी स्खलन अधिकार वगैरे मानतो" ह्या बापटांच्या भूमिकेला उत्तर सुद्धा देण्याची गरज नाही कारण खाजगी जागेंत कुणी आपल्या वेळेचा कसा उपयोग करावा हा १००% अलंघनीय अधिकार आहे. बापटांच्या मानण्या न मानण्याचा प्रश्नच नाही. प्रश्न आहे सार्वजनिक स्थानी काय करावे काय करू नये ह्याचा आणि इथे चर्चा आवश्यक आहे.

गणेशोत्सव आणि इतर गोष्टींसाठी  रस्ते बंद करणे, वाहतूक वळवणे इत्यादी पूर्णतः नैतिकतेस आणि वैयक्तिक अधिकार तत्वांना धरून आहेत. फक्त हि गोष्ट नियमांना धरून करणे आवश्यक आहे, हे नियम सर्वाना ठाऊक असणे, त्याला विरोध करण्याचा अधिकार रहिवाश्याना असणे इत्यादी महत्वाचे आहे.

हीच गोष्ट आहे ध्वनी प्रदूषणाची. १५० डेसिबल वर DJ वाजवणे हा शुद्ध मूर्खपणा आणि सार्वजनिक आरोग्यास धोका असला तरी सर्व अजाण ७० च्या खालीच असले पाहिजे ह्याला सुद्धा अर्थ नाही. विमाने, ट्रेन, अग्निशमन दलाचा भोंगा इतर अनेक आवाज ध्वनी प्रदूषण करतात पण ते काही थोड्या प्रमाणात असल्याने कुणी त्यामुळे त्रस्त होत नाही. त्याच प्रमाणे शहराने कुठे किती प्रमाणात ध्वनी प्रदूषण होऊ शकते आणि त्यांत रहिवाश्यांचे मत काय हे सर्व ध्यानात घेऊन नियम बनवले तर तिथे सुद्धा वैयक्तिक अधिकारांचे तत्व १००% लागू होत नाही. शहरी शासनाला तसा अधिकार आहे.

ढोल ताशे महिनो महिने बडवणे आणि ते सुद्धा कोपर्या कोपऱ्यावर ह्याचे मी समर्थन करत नाही. पण ढोल ताश्यांचा सौंदर्यपूर्ण वापर नियमांना धरून करणे सुद्धा शक्य आहे. वादन पथकांना आधी रजिस्टर करावे, संपूर्ण शहरांत किती वादन पथके असतील, त्यांना सराव करायचा असेल तर तो सराव ध्वनिरोधक खोलीत करावा. प्रत्येक ठिकाणी किती काळ आणि कोणाला वाजविण्याची अनुमती असावे हे सर्व काही ठरवणे आणि रहिवाश्याना होणार त्रास कमी करणे शक्य आहे. पण ढोल असूच नये किंवा त्यांना गोळी घालावी ह्या भाषेला काही अर्थ नाही.

पण, बापटांचे म्हणणे मला आणि इतरांना पटते ह्याचे प्रमुख कारण म्हणजे नियम धाब्यावर बसवून गुंडानी अतिरेक मांडला आहे आणि रहिवाश्यांच्या मताला किंमत राहिली नाही. बापटांची टोकाची तत्वे मानली पाहिजेत असे नाही पण मूळ मुद्दा म्हणजे ध्वनी प्रदूषण आणि उपद्रव जास्त झाला आहे आणि त्याविरोधात शासनाने जी योग्य ती भूमिका घेतली पाहिजे तिथे ती घेण्यास ते मागे पडत आहेत हा आहे.

मी पुण्यात राहत नसल्याने मला तिथे काय चालले आहे ठाऊक नाही पण किमान समाजमाध्यमांवर शोधून सुद्धा DJ प्रकारचे समर्थन करणारी व्यक्ती किंवा १५० डेसिबल चा आवाज पाहिजे म्हणणारी व्यक्ती मला तरी सापडली नाही.

-- 
अवांतर :

सामूहिक आणि सार्वजनिक पद्धतीचे उत्सव हि हिंदू धर्माचा महत्वाचा भाग आहे. मुख्य म्हणजे तारतम्य ठेवून केल्यास त्यांत आनंद आहे. होळी, गणेशोत्सव, गंगा आरती, दिवाळी, लग्नातील संगीत आणि विविध प्रथांनी हिंदू संस्कृतीला सौंदर्य दिले आहे. हिंदू धर्मत धर्मांतर (evangelism) प्रकार नाही पण हे आनंदी सोहळे त्याचेच काम करतात. हल्ली गोव्यांत ख्रिस्ती लोक "संगीत आणि मेहंदी" ठेवतात. इथे स्टॅनफर्ड होळी देशांत प्रसिद्ध आहे इत्यादी.

हिंदू धर्माचे अहित हृदयांत ठेवणाऱ्यानी हिंदू धर्माच्या ह्या प्रथांवर हल्ले चढवले आहेत. दही हंडी, गोव्यांतील धीरयो, कर्नाटकातील कंबाला, तामिळनाडूतील जल्लीकट्टू इत्यादी  गोष्टींवर सुप्रीम कोर्ट मधून बंदी आणण्याचे प्रयत्न झाले. आणि प्रश्न फक्त बंदीचा नाही तर सुप्रीम कोर्टने ह्या विविध निमीत्ताने "essential practice" नावाचा मूर्खपणा निर्माण केला जो सनातन धर्माच्या मुळावरच घाला घालतो. इस्लाम मध्ये सर्व काही "essential" आहे कारण सर्व काही पुस्तकातून येते. हिंदू धर्म सनातन आहे कारण काळाच्या अनुसार बदलत जाणारा आहे. त्यामुळे इस्लाम त्यांना पाहिजे ते करू शकतो पण हिंदू धर्मियांना आपला धर्म पालन करण्यासाठी त्याला आधी "essential" म्हणून सिद्ध करावे लागते. हिंदू समाजाकडून प्रथा बदलण्याचे स्वातंत्र्य काढून घेतले तर फक्त चोथा राहतो.

गणेशउत्सव मंडळे सगळीकडे धार्मिक कमी आणि राजकीय शक्तिप्रदर्शनची साधने जास्त झाली आहेत. त्यामुळे ह्यांना राजाश्रय मिळतो आणि जो जेव्हडा मोठा कायदा तोडणार त्याची शक्ती जास्त असे समीकरण बनले आहे असे वाटते. त्यामुळे नको त्या गोष्टी करण्याची स्पर्धाच जणू लागली आहे. वाढत्या लोकक्षोभाने आज ना उद्या इथे सुप्रीम कोर्ट वगैरे हस्तक्षेप करून समस्या निर्माण करेल. त्याच्यापेक्षा हिंदू पक्षांनी ह्यांत लक्ष घालून, मंडळांना आणि रहिवाश्याना विश्वासात घेऊन सुधारणा केल्या पाहिजेत.

बापट ह्यांच्या काही गोष्टी लोकांनी टोकाच्या म्हटल्या तरी मला त्या टोकाच्या वाटत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे मिरवणूक शहराच्या बाहेर नेणे. मिरवणूक हि मोठी महत्वाची गोष्ट असल्याने जमाव व्यवस्था आणि सुरक्षेसाठी कदाचित प्रथा चांगली ठरेल.  

 

 


In reply to by साहना

त्यामुळे ह्यांना राजाश्रय मिळतो आणि जो जेव्हडा मोठा कायदा तोडणार त्याची शक्ती जास्त असे समीकरण बनले आहे असे वाटते.

अगदी हेच कारण आहे 👍

चांगला उहापोह केला आहे.बघूया हा प्रश्न बापट यांना कोण विचारते आणि बापट काय उत्तर देतात??


In reply to by साहना

साहना,

 

तुमच्या या संदेशाशी हजार टक्के सहमत आहे. हिंदूंनी आपल्या सणांचं स्वत:च व्यवस्थापन करायला ( शिकायला ) हवं. गणपती हा देव असून मंडळाच्या बापाचा नोकर नसल्याचं कुठेतरी कोणीतरी कोणालातरी ठामपणे पटवून द्यायची गरज आहे.

 

दहीहंडीसाठीही अशीच एखादी मैदानी जागा नेमण्यांत यावी. जेणेकरून गल्लीबोळांत हंड्या लावण्याची गरज पडू नये.

 

आ.न.,

-गा.पै.


सरकारने काही मार्ग अवलंबवायला हवेत, उदा.  मिरवणुक/यात्रा/जयंतीच्या दिवशी दिवसभर कृत्रिम पाऊस पाडणे जेणेकरून डीजे पावसात भिजतील व ध्वनी प्रदूषण होणार नाही.

नागरिकांनी डीजेच्या गाड्यापढे झोपून माझ्या अंगावरून गाडी न्या म्हणणे. असे काही उपाय योजले तर काहींप्रमांत ध्वजी प्रदूषणातून लोकांची सुटका होईल.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

नागरिकांनी डीजेच्या गाड्यापढे झोपून माझ्या अंगावरून गाडी न्या म्हणणे. असे काही उपाय योजले तर काहींप्रमांत ध्वजी प्रदूषणातून लोकांची सुटका होईल.

 

आपण हे नक्की करून उदाहरण घालून द्या.

'रणवाद्ये' वाजवणारी पथके त्या जोशांत गाडी घालून नेतील. मग "जमवया नाही चिंधी नाही हाडे, आहे फक्त लक्तरे" अशी अवस्था होईल. 


In reply to by साहना

मग नवीन काय आयडिया? महापालिकेने गणपती मार्गावर पाईप लाइन टाकायचे काम काढावे जेणेकरून तिथून मिरवणुका जाऊ शकणार नाहीत! 

 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

आईडिया एकच. ध्वनिक्षेपक आणि ढोलताशे वाद्यें  ह्यांच्यावर १००% पूर्ण बंदी.  पाहिजे तर बंद सभागृहांत घालावा धिंगाणा. कुठेही आवाज दिसला कि सर्व सोसायटीने पोलिसांना फोन करून तक्रार द्यावी. त्याशिवाय प्रत्येक नागरिकाने किंवा समूहाने स्थानिक गणेशोत्सव मंडळांवर नुकसानभरपाईचा दावा ठोकावा. 


In reply to by साहना

या एकोणतीस सालच्या चित्रपटा सारखीच परिस्थिती आजही आहे. 

 

पंधरा वर्षांपुर्वी चोवीस तास पाणी पुरवठा या योजने खाली बजेट मंजूर झाले. बारा वर्षापूर्वीच हजारो लिटरच्या टाक्या बांधल्या. हजारो रूपये खर्च करून पाईपलाईन टाकली.  आजही जनता टँकरचे पाणी खरेदी करून तहान भागवत आहे. 

 

तसेच डी पी रोडचे. अनेक वर्षांपासून रोड मंजूर  झाला . बिल्डरांनी एफ एस आय घेतला. टॉवर उभे केले. आजही रोडच्या नावाखाली एक किलोमीटर सिंमेट टाकून गाजर दाखवतात.  वहातूक कोंडी  रोजचाच विषय झालाय. 

 

आंदोलन,या भागातील आर डब्ल्यू ए ने मोठे आंदोलन केले. भागातील नागरिक रस्त्यावर आले.पेपरचे रकाने भरले गेले. कुठे कळ फिरली माहित नाही पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. 

विद्यानंदा विरूद्ध धनानंदाची लढाईत धनांनदच जिंकणारा दिसत आहेत.

 

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो......

तीन तास बर्तमान पत्र वाचून रद्दि साठवतो.


घरापासून अंदाजे ३०० मीटर अंतरावर एक एकराची मोकळी जागा आहे. जागेच्या मालकाने तेथे काही लहानमोठ्या टपऱ्या टाकल्या आहेत. मधली मोकळी जागा मांडव घालून ५-६ ढोल पथकांना भाड्याने दिली आहे. १ ऑगस्ट पासून एकाच वेळी १५०-२०० ढोल बडविले जातात. त्याबरोबर ताशेही वाजतात. रोज सायंकाळी ५ पासून १० पर्यंत प्रचंड उपद्रव आहे. 

 

आज अचानक खूप कमी आवाज आणि खूप कमी वेळ आला.

 बापटांना धन्यवाद!


धार्मिक स्वातंत्र्य असलं तरी,  सण उत्सव साजरा करताना इतरांच्या जगण्याला व आरोग्याला विनाकारण त्रास होऊ नये, बापटांनी घेतलेल्या डीजे विरोधी  भूमिकेला एक मिपाकर म्हणून आपला पाठींबा आहे. 

-दिलीप बिरुटे
 


आज खूपच कमी आवाज आहे. खूप लांबून विजेचा जेमतेम आवाज येतोय. ढोलताशे सुद्धा खूप लांबून ऐकू येताहेत. 

 

बापटांना मन:पूर्वक धन्यवाद!


In reply to by श्रीगुरुजी

खरोखर! हा बदल मलाही जाणवतोय. एकच बोंबल्या (स्पीकर) 🔈 लांबून बोंबलतोय. मागच्या वर्षी सारंगला दहीहंडीला मुली आणून नाचवल्या होत्या, ह्या वर्षीही आहेत का पाहीन येतो.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

टेलिव्हिजन वर दहीहंडी रिपोर्ट बघत आहे. 

 

यावर्षी सुद्धा रंगारंग कार्यक्रम चालू आहे.🧚

सात वर्षाचा गोविंदा स्वर्गवासी झाल्याची बातमी आहे. १८८ जखमी झाल्याचेही रिपोर्ट आहे. 

मृतात्म्यास भावपूर्ण   श्रद्धांजली आणी जखमी गोविंदानां लवकरच स्वस्थ्यलाभ होओ.

यावर्षी गावातली दहीहंडी दूर नेल्यामुळे ध्वनिप्रदूषण चा आज तरी त्रास  नाही. 

 

-खडकसींग


आजच्या पुण्यातल्या ध्वनिप्रदूषणविरोधी मोर्चातल्या वर्षा जाधव यांची करुण आणि दुर्दैवी कहाणी ऐकल्यानंतर किमान माणुसकी असलेला कोणीही कुठल्याही प्रकारे ध्वनिप्रदूषणाचे समर्थन करू शकेल असं वाटत नाही. आणि आज दुपारी हा व्हिडिओ सार्वत्रिक झाला त्यानंतर यासंदर्भात कुठलीही कारवाई झाल्याची बातमी आलेली नाही. याच आठवड्यात वादग्रस्त ठरलेल्या अन्य काही पोलीस कारवायांमधल्या अतितत्परतेच्या पार्श्वभूमीवर इतक्या संवेदनशील घटनेवर संबंधित खात्याचे मौन व्यापक जनक्षोभाला कारण ठरू शकते.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण पैसा रामाच्याच तिजोरीतीला वापरला जातोय . वानरांना उच्छाद मांडायला. 


In reply to by आग्या१९९०

तुमच्या लक्षात येतंय का?


गणेशोत्सव पूर्वी दरवर्षी काहीना काही विवाद मोठे का केले जात आहेत?

 

मागील दहा वर्षाचा आढावा घेऊया...

 

२०१४ पूर्वी व नंतर ते २०१६-१७ मध्ये “एक गाव एक गणपती” हाच आग्रह सुरू होता. कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करून तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या सरकारने गणेशोत्सवाला आळा घालण्याचा प्रयत्न केला. नंतरही कमीअधिक प्रमाणात सुरूच आहे.

 

२०१७–१८ दरम्यान पीओपी मूर्ती की शाडूच्या मूर्ती? गणपतीच्या उंची, रासायनिक रंग आणि जलप्रदूषणाचा मुद्दा मोठा केला.

 

२०१८-१९  गणपती उत्सवाचा जनक कोण? टिळक की भाऊसाहेब रंगारी? हा निरर्थक वाद उभा केला. आणि मंडळांमध्येच फूट पाडण्याचा प्रयत्न केला.

 

२०१९ - २० मध्ये पुन्हा पीओपी मुद्दा पुढे आणला आणि केंद्रीय प्रदूषण मंडळाने त्यावर नियमावली तयार केली. आणि सार्वजनिक जलस्त्रोतामध्ये मूर्तींच्या विसर्जनावर प्रतिबंध लागला. अंनिसने यावेळी मुद्दामपणे मंडळांना डिवचण्याचे काम केले.

 

२०२१-२२ मध्ये करोना काळात पुरोगामी संघटना आणि कार्यकर्त्यांनी गणपती उत्सवामुळे करोनाचा फैलाव होईल अशी भीती पसरवत विरोध केला. परंतु सरकारने दिलेल्या मर्यादा आणि मूर्तीची उंची याविषयी मंडळांनी काटेकोर पालन केले.

 

२०२३ - २४ मध्ये गणपती मंडळांच्या वर्गण्या की खंडणी? असा विवाद उभा केला. जणुकाही गणपती मंडळे खंडण्याच गोळा करत सुटतात असे वातावरण निर्माण केले.

 

२०२४ - २५ या वर्षात गणपती उत्सवातील ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण आणि कृत्रिम विसर्जन हौदात मूर्तींचे विसर्जन करण्याचा मुद्दा चालला.

 

२०२६ यावर्षी पुरोगाम्यांनी विद्यानंद बापट नावाच्या नवीन चेहऱ्याला पुढे करून DJ आणि ध्वनी प्रदूषणाच्या नावाखाली गणपती मंडळ, त्याची संख्या, नास्तिकता आणि भलतेच मुद्दे काढून दोन आठवड्यापासून विवाद सुरू आहे.

 

विचार करा – 
दरवर्षी होणारे हे विवाद उगाच होत आहे? यामागील नियोजनबद्ध काम करणारी डाव्यांची इकोसिस्टिम समजून घ्या. विरोधकांच्या सिलेक्टिव भूमिका समजून घ्या. हिंदूंच्या उत्सवातील फॉल्टलाइन्स शोधून त्यावर जाणीवपूर्वक दरवर्षी वाद उभे केले जात आहेत. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, पुरोगामी संघटना, अंनिस, माध्यमे,काही सेलिब्रिटी सर्वच सहभागी असतात.

त्यामुळे चुकीच्या गोष्टी संवाद आणि समन्वयातून दूर करून भक्तिमय वातावरणात उत्सव साजरी करण्याची जबाबदारी सर्व उत्सवप्रिय हिंदूंची आहे.

आपण आपल्यातील दोष स्वतःहून दूर करूया आणि आपल्या विरोधातील द्वेष पेरणी करणाऱ्या इकोसिस्टमला सुध्दा एक्सपोज करूया..!

गणपती बाप्पा मोरया..

 

साभार - कायप्पा विद्यापीठ अभ्यासक्रम 


In reply to by चौथा कोनाडा

आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी ह्या नैसर्गिक नसून कोणीतरी कट कारस्थान करून पुढे आलेल्या आहेत, हा फार सुखावणारा विचार आहे. 

पण ते खरे आहे असे मानायला पुरावा काय हे वेळोवेळी स्वतःला विचारणे महत्वाचे.


In reply to by चौथा कोनाडा

हे तर काहीच नाही त्यानी असेच कट करून सती प्रथा, बाल विवाह वगैरे प्रथा बंद पाडल्या! हो ना?


In reply to by चौथा कोनाडा

बापट हे सोरोस हस्तक आहेत. बापट ह्यांची चुलतपुतणी अमेरिकेत शिकते तिथे तिचा रूममेट ज्या विषयवर Phd करत आहे त्यांत फोर्ड फौंडेशन आणि सोरोस ने देणगी दिली आहे. चेकमेट ! 


लोकहो,


गणेशोत्सव पूर्वी दरवर्षी काहीना काही विवाद मोठे का केले जात आहेत?

 

 

हे इंग्रजी निरीक्षण ओळखीचं वाटतंय का? 

 

"The press succeeded in the magical art of producing names from nowhere
within just a few weeks. They made it appear that the great hopes of the
masses were bound up with those names. And so they made those names
more popular than any man of real ability could ever hope for. All this was
done, despite the fact that such names were utterly unknown, even up to a
month before the press publicly extolled them."

 

वाटंत असल्यास पुढचं सांगतो.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

अरे वा हिटलर का ? मस्त !! अशाच पध्दतीने नाझीवादाचा आधार हिंदूंविरुध्द डावे आणि पुरोगामी घेत आहेत असे तुम्ही सुचवत आहात का?


In reply to by राज जोशी

अशाच पध्दतीने नाझीवादाचा आधार हिंदूंविरुध्द डावे आणि पुरोगामी घेत आहेत असे तुम्ही सुचवत आहात का?>>>
ह्याच हिशेबाने डीजे वाजवायचे समर्थन मनुवादी कोणत्या आधारावर घेताहेत?


In reply to by अमरेंद्र बाहुबली

ते मनुवाद्यांना विचारा की... मला का विचारता? ऑ? 

बाकी डीजेचे समर्थन मनुवादी करत आहेत की ब्राह्मणांना मनुवादी म्हणूण हिणवणा-या बहुजन समाजाकडून केले जात आहे याचा अभ्यास करा !


In reply to by राज जोशी

इथे डावे- पुरोगमींबद्दल तुम्हीच विचारत आहात ना गामाजीना? म्हणून तुम्हालाच विचारले.

ब्राह्मणांना मनुवादी म्हणूण हिणवणा-या बहुजन समाजाकडून केले जात आहे याचा अभ्यास करा ! >>>
अरे ह्यात ब्राह्मण कुठून आले? मनुवादी असण्याला काय जन्म प्रमाणपत्र लागते का? बहुजनांमध्येही मनुवादी असतात नी ब्राह्मणांमध्येही पुरोगामी असतात! बापट हे मनुवादी नाहीयेत, पण ब्राह्मण आहेत! अनेक बहुजन मनुवादी असतात पण ब्राह्मण नसतात. ब्राह्मनाना प्रत्येक वादात ऑफने बंद करा.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

>>>इथे डावे- पुरोगमींबद्दल तुम्हीच विचारत आहात ना गामाजीना? म्हणून तुम्हालाच विचारले.

 

गामाजींना विचारत होतो ना?  तुम्ही पण गामाजींनाच विचारायचे... 

 

>>>ब्राह्मनाना प्रत्येक वादात ऑफने बंद करा.

हे हे हे कोण बोलतयं बरं हे?? हा हा हा 

 

चालू द्या... :)
 


In reply to by राज जोशी

हा हा हा  >> हा हा हा  नाही, जातीला ओढणे बंद करा, ब्राह्मण म्हटले की संपूर्ण जात उभी राहते नजरेसमोर, हव तर मनुवादी ब्राह्मण म्हणू शकता, कारण १०० टक्के सगळे ब्राह्मण मनुवादी नसतात, जसे १०० टक्के बहुजन पुरोगामी नसतात तसे.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

काय सांगता? असेल ब्वा तुम्ही म्हणता तसे.. फक्त ही बाब तुम्ही विसरु नका. कसे ? :)


In reply to by अमरेंद्र बाहुबली

१०० टक्के सगळे ब्राह्मण मनुवादी नसतात, जसे १०० टक्के बहुजन पुरोगामी नसतात तसे.

 

सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे असे बोल 


In reply to by राज जोशी

राज जोशी,

 

अगदी बरोब्बर ओळखलंत पहा. फक्त एक छोटीशी अडचण अशीये की प्रसारमाध्यमांबाबत उपरोक्त वक्तव्य हिटलरने शतकभरापूर्वी केलेलं आहे. आज त्यांत काहीच फरक पडलेला नाही. माध्यमांच्या आधारेच विद्यानंद बापट रातोरात प्रसिद्ध झाले आहेत. 

 

हे वक्तव्य करतांना हिटलर कोणी य:कश्चित माणूस होता. नाझी पक्षावर त्याचा ताबा आलेला नव्हता. त्यामुळे तुमचं सुधारित वाक्य असं होतंय : अशाच पध्दतीने जर्मनीविरोधाचा आधार हिंदूंविरुध्द डावी आणि पुरोगामी प्रसारमाध्यमे घेत आहेत. ( ठळक भाग माझे )

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

अगदी योग्य. पण हिटलरने नंतर ह्याच तंत्राने अनेक गोष्टी केल्या... :) 


बापटांनी एकदा सुरुवात केल्यावर वेगवेगळ्या स्तरांवरचे अनेक लोक आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल मनापासून बोलू लागलेले दिसतात. 

बापटांना विरोध करणारे ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा नेमका दृष्टीआड करून तथाकथित कारस्थानाविषयी बोलत आहेत. सरकारसमर्थक आजवर ज्या तोंडांनी बोलत होते, नेमकी तीच तोंडं एका सुरात बोलताना आता दिसत आहेत. 

सर्वसामान्यांना त्रास होतोय हे इतकं ढळढळीतपणे दिसत असताना त्याविरुद्ध हे कारस्थान आहे असा कांगावा करणं लोक आता सहन करतील असं वाटत नाही. 


In reply to by रामचंद्र

+१

पोलिसांमध्ये एकही "तुकाराम मुंडे "..."सिंघम"नाही??

DJ ची ध्वनीपात्रता ओलांडली की मंडळावर कारवाई करायला???

बापट एकटा जनसामान्यांसाठी लढतोय.


🚨 डीजे (DJ) आणि मोठ्या आवाजाच्या त्रासाला वैतागला आहात? जाणून घ्या तुमचा कायदेशीर अधिकार! 🚨
लग्नाचा सीझन असो, सण-उत्सव असो की पार्ट्या... रात्री-अपरात्री वाजणाऱ्या डीजेच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे वृद्ध, लहान मुले, आजारी व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकांना माहीत नाही, पण या त्रासाविरुद्ध कायदा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
नवीन कायद्यानुसार (BNSS १५२) काय कारवाई होऊ शकते?
भारतात लागू झालेल्या नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम १५२ अंतर्गत, मर्यादेपलीकडील आवाज आणि ध्वनी प्रदूषण हा 'सार्वजनिक उपद्रव' (Public Nuisance) मानला गेला आहे. या कलमांतर्गत:
१) तात्काळ जप्ती: विनापरवाना किंवा रात्री १० नंतर मोठ्या आवाजात डीजे वाजवल्यास, कार्यकारी दंडाधिकारी (SDM) तो डीजे त्वरित बंद करण्याचे आदेश देऊ शकतात आणि पोलीस ते साहित्य जप्त करू शकतात.
२) सशर्त आदेश: जर एखाद्या विशिष्ट ठिकाणी (उदा. क्लब, हॉल किंवा शेजारी) सातत्याने हा त्रास होत असेल, तर दंडाधिकारी त्यांना तो आवाज किंवा व्यवसाय थांबवण्याचा कायदेशीर आदेश देऊ शकतात.
इतर महत्त्वाचे नियम जे तुम्हाला माहीत असावेत:
👉 ध्वनी प्रदूषण नियम, २०००: निवासी भागात रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत लाऊडस्पीकर किंवा डीजे वाजवण्यास पूर्णपणे बंदी आहे.
👉 BNS (भारतीय न्याय संहिता): सार्वजनिक शांतता भंग करणे आणि लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणे हा दंडनीय गुन्हा आहे.
त्रास होत असल्यास काय करावे?
१) सर्वात आधी ११२ वर कॉल करून पोलिसांकडे तक्रार नोंदवा.
२) पोलीस दखल घेत नसतील, तर परिसरातील पोलीस ठाण्यात किंवा थेट उपविभागीय दंडाधिकारी (SDM) यांच्याकडे 'BNSS कलम १५२' अंतर्गत लेखी तक्रार दाखल करा.
शांतता आणि आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. कायद्याची माहिती ठेवा आणि सजग नागरिक बना!
#LawAndOrder #SoundPollution #BNSS152 #Soc

 

कायप्पा फॉरवर्ड!


बापट 'भावना दुखावणे' या प्रकाराला शून्य महत्व महत्त्व आहे असे म्हणत आहेत. भावना म्हणजे काय डोके किंवा खांदा आहे का दुखायला? असे ते म्हणालेत.

पण भावना दुखावणे हे थेरॉटिकल असते असे वाटत नाही. मला भावना या अर्थाचा इंग्रजीतला 'emotion' हा शब्द आठवतो. emotion मध्येच motion आहे. म्हणजे भावना माणसाला कृती करण्यासाठी हलवतात. आपल्याला कोणी काही लागट बोलले, अपमान केला तर खरेखुरे दु:ख होते. त्यामुळे भावना या सत्य असून भ्रामक गोष्ट नाही, त्या दुखणार किंवा सुखावणारच. फक्त त्या अवाजवी प्रमाणात दुखत असतील तर अशा लोकांचे प्रबोधन करणे, दृष्टीकोन बदलण्यासाठी वेगळ्या पध्दतीने घटनेकडे पहायचा दृष्टीकोन देणे हे योग्य आहे, पण भावना असे काही नसतेच, सबब त्या दुखू शकत नाहीत असे म्हणणे थोडे केवळ तर्क म्हणूनही मान्य करता येण्यासारखे नाही.

 


In reply to by स्वधर्म

प्रत्यक्षात होणाऱ्या शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करून तथाकथित भावना दुखावणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सरकार/प्रशासन/संभावित नेतेमंडळींना उद्देशून ते म्हणत आहेत असे दिसते.


In reply to by रामचंद्र

अगदी,डॉल्बीने कान दुखतात, डोकं दुखतात. हा सूर्य हा जयद्रथ प्रमाणे हे सिद्ध होते. तस भावना दुखतात म्हणजे काय??शब्दछल करून विषय भरकटवणे ही पद्धतच आहे.

बापटाला थोबाडीत मारली, काळ कुत्र ओळखत का?? असं विचारलं. तेव्हा भावना दुखावल्या म्हणून तो कोपऱ्यात जाऊन बसला का?

म. फुले यांनी अनेक परंपरा यावरती शब्दाचे बाण मारले. तेव्हा भावना दुखवल्या जातील असे त्यांनीही ठरवले असते तर गोष्ट पुढे गेली असती का?

भावना दुखवतात हा शब्दछल मांडून मुद्दा भरकटवू नका असे ते म्हणतात.


In reply to by Bhakti

मुद्दा खुप सरळ सोपा आहे. लेझर प्रकाश झोताने डोळ्यांना इजा.आणी डि जे मुळे ध्वनिप्रदूषण हृदयरोग,क्वचित  मृत्यू,बहिरेपणा, मानसिक स्वास्थ्य यावर निश्र्चित परिणाम  होतो. (सोलापुरात डाॅक्टर एकत्र येऊन डी जे मुक्त करण्यात यश मिळवल्याचे कळते)   समान्यांच्या आरोग्यासाठी हा प्रकार  बंद  व्हावा एव्हढेच. 

 

सण साजरे करा,जल्लोषात करा,भक्तिभावाने करा,खुप पैसे उधळा याबद्दल काही म्हणणे नाही परंतू हे सर्व करताना एक जरी असामायीक मृत्यू किंवा आयुष्यभर अपंगत्व येत असेल तर त्यावर राजकारण, धर्मकारण न करता ते टाळणे गरजेचे आहे व त्यावर   सक्षम उपाय करा एव्हढेच.....

 

वहातूक कोंडी पुणेकरांच्या पाचविला पुजली आहे. मंडप टाकल्याने खड्डेमय रस्ता, विसर्जनानंतर जागोजाग पडलेले भग्न रथ, मंडपांचे सांगाडे..... अजून काय सांगावे....

 

गर्दीत होणारी चेन स्कॅनिंग,पर्स, पिक पॅकेटिंग, महिला, मुलीं बरोबर अभद्र  व्यवहार.... एकुणच सार्वजनिक उत्सव नकोसे वाटू लागलेत. 

 

ये उम्र का तकाजा नही,तजुर्बा है

जो रास्ते की ठोकरों को दुआ करता है।


In reply to by कर्नलतपस्वी

गर्दीत होणारी चेन स्कॅनिंग,पर्स, पिक पॅकेटिंग, महिला, मुलीं बरोबर अभद्र  व्यवहार.... >>
असे म्हणून नका, तुम्ही मग वामपंथी, कम्युनिस्ट, पुरोगमी दावे म्हणून गणले जाल आणी तुम्ही हिंदू धर्मविरुद्ध कट रचताय असा त्याचा अर्थ होतो….


In reply to by अमरेंद्र बाहुबली

डीजे व त्यामुळे होणारा त्रास खरा आहे व त्याला असलेल्या बापट यांच्या विरोधाशी मी १००% सहमत आहे. त्याला व पर्यायाने उत्सवाला, देवाला, श्रध्देला विरोध केला व आमच्या भावना दुखावल्या असे म्हणणाऱ्या उत्सवखोरांच्या मताशी व भावनांशी मी सहमत नाही. माझे म्हणणे एवढेच होते की बापट सर्वार्थाने (जनरली) भावना दुखावणे ही गोष्टच मानत नाहीत असे त्यांच्या मुलाखतीतील उद्गारांवरून वाटते. माणसाला भावना वजा करून जगणे शक्यच नाही, यंत्राला (ए आय) मात्र आहे कारण त्याला भावनाच नसतात . बाकी रामचंद्र यांनी म्हटल्याप्रमाणे डीजे, मंडपाचा हट्ट करणाऱ्यांच्या भावना दुखावण्याबाबत त्यांच्याशी सहमत आहे.


In reply to by कर्नलतपस्वी

<परंतू हे सर्व करताना एक जरी...>

यातच सगळं आलं. सरकार/प्रशासनाला/यंत्रणेला हे समजणं इतकं अशक्य झालंय?


होळीला पाणी सांडू नका, दिवाळीला फटाके उडवू नका, गणपतीला बँड लावू नका ही नेहमीची चर्चा ठीक आहे.

पण चालू घडामोडीच्या धाग्यावर ज्यांना मनुवादी ठरविले जाते त्यांनाच या धाग्यावर मात्र न-मनुवादी ठरविले जाते! मनुवादी एवढे फ्लुइड असतील असे कधी वाटले नव्हते!
 


In reply to by कांदा लिंबू

अखिल मानवजात मनुवादी आहे कारण मनू मानवजातीचा जन्मदाता आहे.


In reply to by श्रीगुरुजी

काहीही हं श्री... गुरुजी... आमचा आदम होता म्हणून आपण आदमी आहोत.... 


In reply to by कांदा लिंबू

हा मनुवादी ... तो न-मनुवादी असे प्रमाणपत्र वाटणारे नमुना-वादी म्हणावे काय?


In reply to by राज जोशी

नमोवादी ही अजून एक जात आहे. मनुवादी, न-मनुवादी, नवमनुवादी, नमुनावादी, नमोवादी हे वाद सोडा कारण आपण सर्वजण मनूची लेकरे आहोत. 

 

- आपण सारे मनुवादी 


In reply to by श्रीगुरुजी

>>आपण सारे मनुवादी 

 

मनुवादी म्हणजे मनुवरुन वाद घालतात ते मनुवादी असे अभिप्रेत असल्यास अनुमोदन,

नसल्यास मनुवादी शब्दाची फोड करुन अर्थ उकलून सांगितला तर पुढे चर्चा करता येईल. 


In reply to by राज जोशी

राज जोशी,

 

क्या कहने साहेब !!! :-D तुम्ही आमच्या विचारचक्रास लाख आरपीएमची चालना दिलीत.

 

तन्नुसार नमुनावादावर गंभीर चिंतन करून खालील व्याख्या मांडतो आहे : 

मी एक नमुना असून मी हलवेन तो हात, मारेन ती लाथ आणि घालेन तो वाद.

 

कशी वाटली?

 

आ.न.,

-गा.पै.


धागे भरकटवण्याचे कर्म स्वतंत्र धागा काढुन करा.कृपया सर्वांना वेठिस धरु नका.चालु घडामोडीचा धागा नाहिये हा🙏


In reply to by Bhakti

धागे भरकटवण्याचे कर्म स्वतंत्र धागा काढुन करा.कृपया सर्वांना वेठिस धरु नका.चालु घडामोडीचा धागा नाहिये हा

सहमत आहे. या धाग्यावर मनुवादी हा शब्द पहिल्यांदा आणला तो न-मनुवाद्याने! त्यांना विनंती आहे, या महत्वाच्या विषयाच्या धाग्यावर तरी तुमची घातक न-मनुवादी विचारसरणी आणू नका.  

- (नीरक्षीरविवेकी) कांदा लिंबू 


In reply to by कांदा लिंबू

एकाने खड्ड्यात उडी मारली म्हणून इतरांनाही खड्ड्यात उडी मारणे हा एक मेंढी-बकरीवादी पणा कशाला?


बापटांचं मत पटो वा न पटो, पण ते मांडण्याचं धाडस नक्कीच कौतुकास्पद आहे.
गणेशोत्सवाचा उत्साह असावा, पण त्यासोबत नागरिकांच्या शांततेचाही विचार व्हायला हवा.
झुंडीच्या दबावाला न घाबरता तर्काने बोलणारे आवाज महत्त्वाचे असतात.
अशा निर्भय भूमिकांमुळेच लोकशाही जिवंत राहते.


In reply to by शब्द_आणि_मी

अशा निर्भय भूमिकांमुळेच लोकशाही जिवंत राहते.>>
+१

म्हणूनच विचारवंतांनी “निर्भय बनो “ ची हाक दिली होती.

 


बाप्पांटांची टेक्निकच चुकिची आहे. बापटांनी पहिल्यांदा भरपूर दाढी वाढवावी. भगवी किंवा पांढरी कोणतीही कंफनी घालावी. आणि बाबा बनुन मठ स्थापन करावा. मठ बघून बरेच मठ्ठ गोळा होतात. त्यांच्या मनात मग डिजे बंद आणि डिजे विरोधी विचार पेरावे‌. त्या लोकांना प्रसंगी तिर्थ म्हणून मुळा मुठा पवना इंद्रायणी या पवित्र नद्यांचे सद्य स्थितीतील जल प्यावयास द्यावे आणि दुसरे दिवशी प्रसाद म्हणून पन्नास पैसे वाल्या खाकी गोळ्या ठेचून वाटाव्यात. लगे हात बाबा का चमत्कार पण होऊन जाईल. बाबांची विचारसरणी डिजे विरोधी असल्याने मग बाबा भक्त स्वतः डिजे बंद पाडतील, जसा जसा संप्रदाय वाढेल तसतसे डिजे सुद्धा बंद होत जातील. आणि शेवटी बापट बाबा विष्णू चा डिजे विरोधी अवतार म्हणून प्रसिद्धी पावतील.

 

धर्म विरोध सुद्धा नाही, साप भी मेरेगा लाठी भी नहीं टुटेगी.


"हे बापट घरात पुस्तकं वाचतात आणि लोकांना त्रास देतात. हे विचारवंत कोणाला दोन पैशाची मदत केलेली नाही, कोणाला दवाखान्यात नेले नाही"

पुण्याचे कोणतीतरी धनगेकर राजकारणी आहेत. हे ऐकून हसून हसून पुरेवाट तर झालीच 😂

पण खरंच पुस्तकं वाचलेले आणि तार्किक बोलणारे नागरिक नाहीत याचमुळे या राजकारण्यांना असे समाज अधोगती काम करता येते. यांच्या दृष्टीने पुस्तक वाचलेले नागरिक नको रस्त्यावर नाचणारे नागरिक पाहिजे🙄


यंदा गणेशोत्सवात आवाज, तुंबलेली रहदारी यांच्या जोडीला दृष्टीला घातक असे अतिप्रखर दिवे सगळीकडे दिसत आहेत. आवाजाइतकेच तेही त्रासदायक आणि घातक आहेत हे सांगायला वैद्यकीय तज्ज्ञांचीसुद्धा आवश्यकता नाही इतक्या प्रखरतेने ते सगळीकडे आता दिसत आहेत. सरकार, प्रशासन, पर्यावरण खातं यांना अर्थातच ते दिसत नसावेत. परदेशांतही ही अशी फ्लड लाईट्सची मुक्त उधळण रस्तोरस्ती असते का?


बापटांचे सगळे मुद्दे समजले आणि बरेचसे पटलेही. पण  भांडवलशाही अर्थव्यवस्थेत नागरिक ठाम भूमिका घेऊन उत्सव किंवा इतर कोणत्या सार्वजनिक हिताच्या मुद्द्यासाठी विरोध करू शकत नाहीत कारण त्यांच्या उपजिविकेचा सवाल असतो, असा काहीसा मुद्दा ते मांडतात. तो नीट समजला नाही.

बापटांनी एवढा 'आवाज' करूनही पुण्यात काल बरीच ढोल पथके दणदणाट करत होती असे टीव्ही चॅनल्सवर पाहिले. ही शतकांची लढाई होऊ नये हीच अपेक्षा.

 


In reply to by स्वधर्म

बापटांच्या मतांचा प्रतिवाद करायला अनेकजण हिरिरीने पुढं येताना दिसतात पण ज्या असंख्य लोकांना या उच्छादामुळं जगणंसुद्धा असह्य झालंय त्यांची मात्र कणवही येत नाही हे दुर्दैवी वास्तव आहे. 


In reply to by रामचंद्र

सहमत. एक डिजे पिडीत. 

ढोल ताशाला विरोध नाही.

 

बापट इफेक्ट दिसून येत आहे. बर्यापैकी शांतता आहे.

धन्यवाद  बापट आणी तत्सम नागरिकांना.


गणेशोत्सव जोरदार साजरा करा, मातीच्याच मूर्ती बसवा, ध्वनीप्रदूषण, प्रकाशप्रदूषण टाळा, कायदे नियम पाळा, पण अंनिस पासून सावध रहा. 

हे लोक गणेश विसर्जना ठिकाणी उभी राहून मूर्ती पाण्यात विसर्जित करणे ऐवजी ती ताब्यात घेतात असे समजते.‌ मुळात गणेशोत्सवासारख्या अंधश्रद्धा आधारित प्रसंगांमध्ये यांचे काय काम? आणि हे लोक मूर्ती घेऊन काय करणार? तिचे सन्मानपूर्वक विसर्जन करणार, की विल्हेवाट लावणार?  

त्यामुळे असल्या हिंदविरोधी इसमांना तिथे वावरू देऊ नका. त्यांच्या ताब्यात पवित्र गणेश मूर्ती देऊ नका. स्वतः गणेश मूर्तीचे सन्मानपूर्वक विसर्जन करा.


 आता विद्यानंद बापटांना समर्थन करायचे का नाही ते बघा बुवा ! जमात ए इस्लामी हिंदचे पदाधिकारी सदिच्छा भेट देऊन गेले आहेत वर कायदेशीर मदत पण ऑफर केली आहे

 

🤣🤣🤣🤣


किंबहुना गाव जंगलात  आहे असे म्हणले तरी चालेल.

गतवर्षी ध्वनिप्रदूषणामुळे या काळात कावळे, घारी सारखे धिट पक्षी सोडले तर बाकी सर्व   शुकशुकाट होता.

काल दिवसभर आणी संध्यकाळी ध्वनिप्रदूषण नव्हते.रात्री मस्त  झोप झाली.नेहमीप्रमाणेच आजही जंगलात फिरायला गेलो होतो. निरव शांतता होती.भरपूर पक्षी दिसत होते. एखाद  दुसरा दिसणारा स्माॅल मिनिव्हेट, आज चक्क त्याच्या विस पेक्षा जास्त  जोड्या दिसल्या. ट्रायकलर मुनिया जोडी प्रथमच आढळली. माळमुनीया ,शुभ्रकंठी, लाफिंग डव्ह, सुभग,प्रिनिया एक ना दोन अनेक पक्षी सहजरीत्या दृष्टीस पडत होते.पक्षांच्या संख्येत लाक्षणीय वाढ झालीय.  

हा ध्वनिप्रदूषण  थांबवण्याचा सकारात्मक परिणाम म्हणता येईल का?

असेच राहिले तर नक्कीच होय म्हणता येईल. 

 

जय हो बापटांची......