Skip to main content

धर्म विचार वैदीक हिंदू परंपरा

बापटांचं काय करायचं? पुण्यातला गणेशोत्सव २०२६

लेखक स्वधर्म यांनी मंगळवार, 01/09/2026 22:28 या दिवशी प्रकाशित केले.

२०२६ चा गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपला आहे. मंडळांनी नेहमीप्रमाणे उत्साहात गणपती बसवण्याची तयारी केली आहे, ते तिथेच आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून नागरिकांचा मात्र या उत्सवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पूर्वी जसे वर्षभरात गणपती आल्यावर मनोरंजनाचा, प्रबोधनाचा खजिना असायचा त्याची आता गरज उरली नाही. हवे ते मनोरंजन बोटाच्या एका क्लिक वर उपलब्ध आहे. मंडळ व त्यांचे कार्यकर्ते मात्र अजूनही आपण हे करून जनतेला काहीतरी देतोय. देवाचं, पुण्याचं काम करतोय अशा समजूतीतून उत्सव अधिकाधिक भव्य, खर्चिक, अतिक्रमण करणारा व दणदणाटी करत चालले आहेत.

अवडंबर म्हणजे काय ? ते कसे थांबवणार?

लेखक उपयोजक यांनी रविवार, 22/12/2024 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/41837 हा धागा वाचनात आला. यातल्या काही मुद्द्यांना अजून उजाळा मिळून त्याबद्दल अधिक स्पष्टता यावी यासाठी हा धागा. सदर धाग्यात प्रामुख्याने देवावर श्रद्धा असणार्‍यांच्या श्रद्धेबद्दल विज्ञानवाद्यांना काय त्रास आहे असे विचारले आहे. माझ्या मते खर्‍या विज्ञानवाद्यांना देवावर श्रद्धा असणे याचा त्रास होत नसावा. तर त्या श्रद्धेमागून बर्‍याचदा येणार्‍या धार्मिक अवडंबराचा होत असावा. आता अवडंबर कशाला म्हणायचं ही व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असू शकेल.

मकरसंक्रांत एक जागतिक परंपरा?

लेखक निनाद यांनी सोमवार, 15/01/2024 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
मकरसंक्रांत हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि प्राचीन सण आहे. सूर्याचे मकर राशीत संक्रमण केल्यानंतर साजरा केला जातो. मकरसंक्रांत नंतर दिवस लांब होतात आणि रात्री कमी होतात. हा सण नवीन सुरुवात आणि शुभतेचे प्रतीक आहे. मकरसंक्रांतीच्या काही खास परंपरांमध्ये काही जागतिक संदर्भ दिसतात का हे आपण पाहू या. मकरसंक्रांत हा सण भारतात सर्वत्र वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांसह साजरा केला जातो. उदाहरणार्थ, दक्षिण भारतात हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो, तर पंजाबात हा सण लोहरी म्हणून ओळखला जातो.

हिंदू असणे म्हणजे काय?

लेखक स्वधर्म यांनी शुक्रवार, 08/09/2023 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र 1 व मित्र 2 हे उच्चशिक्षित असून कार्पोरेट कंपनीत काम करतात व गेली 20-25 वर्षे त्यांची मैत्री सुखाने चालू आहे. ते सतत खाली दिलेल्या विषयावर बोलत असतात. पडदा उघडतो म्हणण्यापेक्षा मोबाईलचा स्क्रीन उघडतो तेंव्हा... मित्र 1: युनाइटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी मुरारी बापू यांच्या कार्यक्रमात केलेले भाषण ऐक: https://www.youtube.com/watch?v=z3h-PLbQuF4 मित्र 2: आश्चर्यकारक! रामायण हा आपला हिंदूंचा श्रद्धाविषय आहे. आणि श्रद्धेच्या ठिकाणी प्रश्न विचारता येत नाहीत.