Skip to main content

बापटांचं काय करायचं? पुण्यातला गणेशोत्सव २०२६

लेखक स्वधर्म यांनी मंगळवार, 01/09/2026 22:28 या दिवशी प्रकाशित केले.

२०२६ चा गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपला आहे. मंडळांनी नेहमीप्रमाणे उत्साहात गणपती बसवण्याची तयारी केली आहे, ते तिथेच आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून नागरिकांचा मात्र या उत्सवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पूर्वी जसे वर्षभरात गणपती आल्यावर मनोरंजनाचा, प्रबोधनाचा खजिना असायचा त्याची आता गरज उरली नाही. हवे ते मनोरंजन बोटाच्या एका क्लिक वर उपलब्ध आहे. मंडळ व त्यांचे कार्यकर्ते मात्र अजूनही आपण हे करून जनतेला काहीतरी देतोय. देवाचं, पुण्याचं काम करतोय अशा समजूतीतून उत्सव अधिकाधिक भव्य, खर्चिक, अतिक्रमण करणारा व दणदणाटी करत चालले आहेत.

भले तर देऊ...

लेखक चांदणे संदीप यांनी रविवार, 29/05/2016 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी, "अशा वेळी आपण काय कराल?" या कोंबडी प्रेमींच्या धाग्यावर कट्टर मिपाकर श्री मुवि यांनी प्रतिसादातून संत तुकारामांच्या अभंगवाणीतली एक ओळ टंकली आहे. निमीत्त मुवि असले तरी सर्रास ह्या ओळी चुकीच्या लिहिल्या जातात आणि चुकीच्या शब्दानिशी स्वीकारल्याही जातात! अर्थात अश्लील शब्दांचा वापर व प्रसार टाळण्यासाठी एखादा शब्द बदलून प्रचलित केला तर हरकत नाही पण अभंगातील एकापेक्षा जास्त शब्द बदलून किंवा शब्दक्रमच बदलणे हे चूक आहे. कवीत्वाशी विश्वासघात केल्यासारखेही आहेच! अर्थ जरी एकच असला तरी मूळ शब्दांना टाकून का द्यावे? हा माझा प्रश्न आणि चर्चेचा विषय आहे.

शनीशिंगणापूरातून ग्रामस्थांनी बाहेर पडावे काय

लेखक खटासि खट यांनी शुक्रवार, 29/01/2016 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
महिलांना शनी शिंगणापुर चौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी दुसरी बाजू न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात " स्वामी अस्वस्थानंद रसवंती" हे नाव चर्चेत येत आहे . स्वामीजींची भेट झाली. त्यांच्याबद्दल नेटवर वैयक्तिक जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे. त्यांनी चर्चेत खालील मुद्दे उपस्थित केले. शनीच्या चौथर्‍यावर जाणाराने सहा महीने कुठल्याही महिलेशी संपर्क करणे निषिद्ध आहे. शास्त्राप्रमाणे हा कालावधी सहा वर्षे आहे.

कलेवराचा उत्सव?

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 06/10/2015 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ता मधे प्रकाशित झालेल्या 'कलेवराचा उत्सव' या लेखाच्या लेखकास हे पत्र. यातील मजकूर कुणा एका व्यक्तीस उद्देशून नसून तो केवळ एक विचार समजावा. नमस्कार, लोकसत्ता चा मी एक नियमित वाचक असून त्यात प्रकाशित झालेला आपला 'कलेवराचा उत्सव' हा लेख वाचला. (http://www.loksatta.com/vishesh-news/rajiv-khandekar-article-1147141/) त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून हा ई-संदेश. आपली कळकळ या लेखातून वाचकांपर्यंत नक्कीच पोचली.

बगाड परंपरा आणि परंपरेतील वगळण्याजोगे अमानुष अंश

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 02/10/2015 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
भारत आणि जगभरच्या काठीपूजेचा शोध घेता घेता मेपोल - एक आनंदोत्सव हा लेख मिपावर लिहिण्याचा योग आला. मिपा सदस्यांनी बगाड नावाच्या पश्चिम महाराष्ट्रातील परंपरे बद्दल माहिती दिली ज्यात थोडक्यात लाकडाची क्रेन बनवून त्या क्रेनने चक्क माणुस/माणसे उंच उचलली आणि फिरवली जातात. हे सर्व देवाच्या नावाने नवस करून केले जाते अर्थात अजून थोडा शोध घेतल्या नंतर हे केवळ महाराष्ट्रात नाही प्रथा पश्चिमबंगाल ते महाराष्ट्र आणि मधात येणारा आदीवासी पट्ट्यातून किंमान इंग्रजांच्या आधी पासून वेगवेगळ्या नावाने प्रचलित असावी असे दिसते आहे.

‘सवाष्ण’ नावाची गोष्ट

लेखक rutusara यांनी शुक्रवार, 02/10/2015 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज एका वेगळ्या विषयावर लिहिते आहे. विषय खरं तर नेहमीचाच…आपल्याही नकळत आपल्या आजूबाजूला घडत राहणारा…वर्षानुवर्षं हे असं चालत आलं आहे त्यामुळे ते असंच चालत राहणार असं म्हणून नकळत आपणही त्याकडे डोळेझाक केलेला…पण केवळ वर्षानुवर्षं पाळली गेल्यामुळे ती गोष्ट योग्य ठरते का? मी जे लिहिलं आहे, त्या गोष्टी मला कायमच खटकत असत. ” हे असं का?” हा प्रश्न कायमच पडत राहायचा. पण ह्याआधी त्याची झळ चटका बसण्याएवढी मोठी नव्हती. आयुष्यात घडलेल्या काही घटनांनंतर मात्र ह्या सगळ्याबद्दल लिहिण्याची मनापासून इच्छा झाली.

सरसंघचालकांचे आवाहन - अवैज्ञानिक रूढी आणि परंपरांचा त्याग

लेखक संदीप ताम्हनकर यांनी शुक्रवार, 25/09/2015 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी 13 सप्टेंबर 2015 ला जयपुर येथील एका परिसंवादामध्ये अतिशय महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की 'हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत'. 'हिंदूंनी इतिहासातही जुनाट, अशास्त्रीय आचरणांचा त्याग केला असून जगाकडून नव्या गोष्टी शिकल्या आणि स्वीकारल्या आहेत' असे ही ते म्हणाले.