Skip to main content

सामाजीक प्रश्न

बापटांचं काय करायचं? पुण्यातला गणेशोत्सव २०२६

लेखक स्वधर्म यांनी मंगळवार, 01/09/2026 22:28 या दिवशी प्रकाशित केले.

२०२६ चा गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपला आहे. मंडळांनी नेहमीप्रमाणे उत्साहात गणपती बसवण्याची तयारी केली आहे, ते तिथेच आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून नागरिकांचा मात्र या उत्सवाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. पूर्वी जसे वर्षभरात गणपती आल्यावर मनोरंजनाचा, प्रबोधनाचा खजिना असायचा त्याची आता गरज उरली नाही. हवे ते मनोरंजन बोटाच्या एका क्लिक वर उपलब्ध आहे. मंडळ व त्यांचे कार्यकर्ते मात्र अजूनही आपण हे करून जनतेला काहीतरी देतोय. देवाचं, पुण्याचं काम करतोय अशा समजूतीतून उत्सव अधिकाधिक भव्य, खर्चिक, अतिक्रमण करणारा व दणदणाटी करत चालले आहेत.