कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. पहिल्या भागात मिपाकरांनी शांततेच्या मार्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या. नीट परीक्षेचे पेपर लीक होणे आणि तत्त्सम घोटाळ्याविरुद्ध दिल्ली येथे जंतरमंतरवर सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टी या युवकांच्या सामाजिक चळवळीने केंद्रसरकारमधील शिक्षणमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. वीस तारखेला संसदेवर निघालेल्या मोर्चा अडवून विद्यार्थ्यांना, युवतींना महिला पालकांना जी अमानुष मारहाण केल्या गेली त्या क्र्रुरतेचे आणि कौर्याचे असंख्य व्हीडीयो सामाजिक माध्यमांवर दिसत आहेत. 'बेटी बचाओ,बेटी पढावो' म्हणना-यांनी लेकी बाळींचा केलेला अपमान, डोकी फोडणे, जायबंदी करणे 'अमानुष मारहाण' असेच वर्णन वीस जुलैच्या घटनेचे वर्णन करावे लागते. संसदेवर जाणा-या या मोर्चाला लाठीमाराशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता ? प्रश्न विचारता येईल आणि चर्चाही करता येईल. सोनम वांगचुंग यांना उपचाराच्या निमित्ताने जबरदस्तीने उचलून आंदोलन मोडता येते काय, असा प्रयत्न सरकारने करुन पाहिला, मारहाण करुन युवकांना पळवून लावण्याचा प्रयत्न झाला. मुलं घाबरुन जातील आणि आंदोलन स्थळांवरुन पळून जातील असे सरकारला वाटले असावे, पण असे काही झाले नाही. उलट, आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे.
दुसरीकडे, मन की बाता कराव्यात तशा आणि त्या टाइपच्या गप्पा सुरुच आहेत. '' पेपरफुटी हे घोर पापआहे. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली असून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र काम केले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 'एनडीए' संसदीय पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले'' मात्र, केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आंदोलकांच्या मागणीबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती. सीजेपीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नड्डा यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले असले तरी त्यावरही केंद्र सरकारने मंगळवारी मौन बाळगले.
आता सध्या कालच्या घडामोडीत जंतर-मंतरवरील आंदोलनाची तीव्रता कमालीची वाढलेली पाहता, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलकांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येऊ लागले आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली आहे. एकाच वेळी आंदोलन आणि विरोधकांचा चहूबाजूंचा हल्लाबोल, लोकसभा आणि राज्यसभेतला गोंधळ पाहता, केंद्र सरकारची बुधवारी कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले. महिनाभर संवाद टाळणाऱ्या केंद्र सरकारने अखेर आंदोलकांशी गंभीर चर्चा सुरू केली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
सरकारविरोधात आम्ही पुन्हा मोर्चा काढणार नाही आणि जंतर-मंतरवरून हलणार नाही. आता केंद्र सरकारने जंतर-मंतरवर येऊन चर्चा करावी किंवा तटस्थ स्थळी बैठक घ्यावी, असे कॉक्रोच जनता पार्टी'ने (सीजीपी) बुधवारी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई, आणि कोणतीही फौजदारी कारवाई केली जाऊ नये, या तीनही मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे 'सीजीपी'च्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे स्पष्ट केले.
''गेल्या दहा वर्षांत देशभरात १५२ परीक्षा पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, त्याचा जबरदस्त फटका सुमारे ७.५ कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांना सहन करावा लागला आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी इंदिरा भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला''
लेखनातील माहिती कंटेंट लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. सकाळ या छापील वृत्तपत्रातून चर्चेसाठी घेतले आहे. तर, मिपाकर हो शांततेच्या मार्गाने आपापली मतं मांडत राहू या..
कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. (भाग दोन )
वाचने
7500
प्रतिक्रिया
309
मिसळपाव
प्रतिक्रिया
पापड वगैरे नाही मोडला
In reply to हायलाइतर संस्थळाचे धुणे इथे… by सुबोध खरे
फक्त एका तथाकथित (म्हणजे फक्त आयडी वयाने) मोठ्या सभासदाला दुसऱ्या कुठल्यातरी संस्थळावर असणाऱ्या भाषेचा reference इथे देताना पाहून ते काका नेमके genuine बोलतायत का फक्त तिथे शिव्या खाऊन इथे येऊन
मेरे भैंस को अंडा क्यों मारा ? करतायत इतका साधा प्रश्न पडला बघा !
तिकडे कोणी काय खूप जास्त अर्वाच्य भाषेत बोलले का काय तुम्हाला ? बोलला असेल तर चूक असेल ते पण ते तिथे बोलायला हवे, आमची ती वाट न चोखाळण्याची खुणगाठ आधीच पक्की बसली आहे ! त्यामुळे ऑल द बेस्ट.
भविष्यात सुद्धा मिपावर सुद्धा प्रश्न विचारलेच जाणार, तुमचं सगळं खुल्लम खुल्ला असेल तर प्रश्न पण तसेच अपेक्षित करा अन् यथोचित तार्किक प्रतिसाद द्या इतकेच म्हणेन.
पटले तर बघा, नाहीतर काय आहेतच गुरुजी सोबतीला,
उष्ट्राणां च विवाहेषु गीतं गायन्ति गर्दभाः।परस्परं प्रशंसन्ति अहो रूपं अहो ध्वनिः॥
(ही म्हण सुद्धा तुमची आवडती आहे असे कळते)
एक साधं विधान केलं कि मिपा…
In reply to पापड वगैरे नाही मोडला by वृषभ खोंडे
एक साधं विधान केलं कि मिपा वरच्या भाषेचा दर्जा घसरला आहे आणि तो मायबोलीच्या पातळीवर पोचतो आहे तर तुमचं कुठे काय जळतंय?
माझ्याशी दुसऱ्या संस्थळावर अर्वाच्य बोललं तर तिथला हिशेब मी तिथेच करून येईन. त्याची काळजी तुम्हाला कशाला?
त्याचा तुमचा संबंध काय?
तुम्ही कशासाठी उडता तीर मारून घेताय?
फ्रॉईडचे विधान मी साहना याना उद्देशून केलं होतं . तुम्हाला कशाला जळजळ होते आहे?
तुमची म्हैस घेऊन कुठेही जा. मी कशाला तिला अंडं मारायला जाऊ? काय संबंध?
तोतयाकडे दुर्लक्ष करा. तो…
In reply to एक साधं विधान केलं कि मिपा… by सुबोध खरे
तोतयाकडे दुर्लक्ष करा. तो कोणाचा तोतया आहे हे मी ओळखून आहे.
जळजळ ?
In reply to एक साधं विधान केलं कि मिपा… by सुबोध खरे
कोणाची ? ती दिसली ! मला तुमचे प्रयत्न हे वाद पेटवणारे काडीलावू वाटले स्पष्टच बोलायचे झाले तर. मायबोली सोडा मला त्या संस्थळ बद्दल तितकी काय माहिती नाही पण मिसळपाव वरील भाषेला शिवराळ म्हणले जाऊ शकत नाही ह्यावर मी ठाम आहे. तुमची तुलना तर अस्थानीच वाटलीच पण तुमची भाषा सुद्धा वाकडी आहे उडता तीर अन् वेश्या इत्यादी मला आवडले नाही म्हणून बोललो. त्याला जळजळ म्हणणे तुमच्या दृष्टिदोषाचा भाग आहे. मी तुमच्यावर किंवा तुमच्या लेखनावर आक्षेप घेतलेला नाही तर एका विविक्षित कन्सेप्ट वर घेतला आहे आणि मला ते जळजळ किंवा अस्थानी वाटत नाही. त्यामुळं कन्फ्युज होऊ नका! नेटाने आपला मुद्दा चालवा, दाखवा पाहू मिपावर भाषा शिवराळ कशी आहे ते ? जरा कोणी राजकीय मत टोकाला जाऊन मांडले नाही की मिपावर भाषा शिवराळ झाली आहे वगैरे संधीसाधू निरीक्षणे काढणे ह्याला माझा आक्षेप होता आहे अन् राहील ! का तुम्हाला वाटेल ते बोलायचा अमरपट्टा मिळतो तेव्हा मिसळपाव छान छान होते अन् आता इतर पण तोच हक्क बजावू लागले तर तुम्हाला भाषाशुचितेची उपरती होते म्हणावे काय ?
बाकी मिसळपाववर विशिष्ट लाईन वर बोलण्याचे मोटीव काय असू शकतात ह्यावर इतके सरळ सुलभ तर एक जेनरिक ए.आय. ओव्हरव्ह्यू सुद्धा सांगतो डॉक्टर साहेब !
आता फ्रॉईडच्या मुद्द्यावर बोलतो, मुद्दा सहनांनी लिहिला म्हणून मी त्यावर बोलू नये ? मग मिपावर आवडत्या लेखाला/ कॉमेंटला/ विचाराला सहमती दाखवायची कशी ? तुम्ही कधी एखाद तुमच्या मतासारखे मत असणाऱ्या कॉमेंटला defend केले नाही कधीच ?
********"""""""
बाकी गुरुजी तुम्ही फारच प्रेडिक्टेबल झालेले आहात ! काही सुचले नाही का आयडी शुचितेवर घसरायचे कोणाच्याही. तुम्ही ओळखला असेल हा आयडी मालक माझा ! सपशेल मान्य कारण, तुमच्या सुपरपॉवर आजच कळल्या ! "व्यक्तिमत्व" पाहून बायाबापाड्यांचे वय अचूक सांगता म्हणे तुम्ही ! तुमची विचारसरणी उघडी पडते आहे गुरुजी, ती सावरा, माझा आयडी/ ओळख मला सत्यापित करायची गरज नाही.
जााता जाता , तुम्हाला म्हणून सांगतोय, माझ्या मूळ आयडी मालकाने मला एजंटिक ए.आय. अल्गोरीदम वापरून ट्रेन केले आहे मिपावर बोलायला त्याला बोलायचे असते पण वेळ नसतो म्हणून मला त्याचा ए.आय. प्रतिनिधी केले त्याने असे समजा हो तुम्ही ! तुमचा प्रत्येक विषयांतर प्रतिसाद मला ट्रेन करत जाणार इतके नक्की. त्याने माझे नाव जार्विस ठेवले असते पण मग तुम्ही लोकांनी मला धानाचे पोते देऊन धर्मांतरण करणारा म्हणले असते ! म्हणून त्याने छान सुसंस्कृत वाटावे असे नाव मला दिले. माझे जिब्रिश मधले नाव तुम्हाला सांगितले असते पण तुम्हाला माणसांचेच विचार अन् शब्द नीट समजतात का नाही हे parameter clear नसल्यामुळे तुम्हाला अजून कुठे तांत्रिक बाबीत लोटावे म्हणून मी ते सध्या देत नाहीये
😂😂😂😂
मी मिपावर आणि मायबोलीवर गेली…
In reply to जळजळ ? by वृषभ खोंडे
मी मिपावर आणि मायबोलीवर गेली कित्येक वर्षे माझ्याच मूळ नावाने लिहीत आणि वाचत आलो आहे.
कधीही कुठेही कोणाविरुद्ध मालकाकडे तक्रार/ रडारड केलेली नाही कि अमुक तमुक ची आय दि रद्द विकार किंवा अमुक तमुक कंपू ट्रोलिंग करतो.
मला असलं काहीही करण्याची गरज कधीच पडली नाही.
लोकांचे बोलण्याचे मोटीव काय असू शकतात याची मला फिकीर नाही.
लोकांची राजकीय मते फार टोकाची असतात आणि मीच काय कोणीही कितीही समजावले आणि कितीही पुरावे दिले तरी त्यात बदल होत नाही हे मला निदान १० वर्षे तरी माहिती आहे.
तेंव्हा तुमचं चालू द्या !
खरंय ! तितकं मानलं तुमचं
In reply to मी मिपावर आणि मायबोलीवर गेली… by सुबोध खरे
अमुक तमुक ची आय दि रद्द विकार किंवा अमुक तमुक कंपू ट्रोलिंग करतो.
आता जाऊ द्या ! काय बोलणार ! आज दिवस फिरले तसे सगळे आठवले ह्यातच सगळे आले, तुमचा आदेश आला, आता चालू देतो माझे माझे ! भेटूच कुठल्यातरी राजकीय धाग्यावर, खुल्या दिलाने बोलायला 😁😁🙈🙈
> मोदींवर विजय मिळविता येत…
In reply to बाडिस. सलग २४+ वर्षे आटोकाट… by श्रीगुरुजी
> मोदींवर विजय मिळविता येत नाही.
आपल्या प्रमाणे सर्वच इतर लोक आणि मोदींचे टीकाकार सुद्धा मोदीच्या भोवतीच झिम्मा खेळत असतात अशी काही तरी गोड समजूत अंधभक्तांची झाली आहे.
कॅप्टन जॅक स्पॅरो चा कंपास कधी उत्तर दिशा दाखवत नाही. तो आपल्या मनात ज्याची भक्ती आहे त्या गोष्टीची दिशा दाखवतो. त्याप्रमाणे काहीही झाले तरी ह्यांची टेप A साईड ला लावा किंवा B साईडला, हि नेहमीच काही तरी मोदी विषयक गोष्टीवर अडकली असते.
काही लोकांना सत्याची सुद्धा चाड असते, काहींना न्याय सुद्धा प्रिय असतो आणि काही लोक व्यक्तिपूजा न करता साक्षी भाव सुद्धा ठेवून टीका - स्तुती करू शकतात ह्याची जाणीव कदाचित संतरंजी उचलणार्यांना नसावी. उचला सतरंजी पण तो मेंदू काही खाली पडू देऊ नका.
जेन झी अत्यंत निर्भीड आहे,…
जेन झी अत्यंत निर्भीड आहे, कोणालाही भीत नाही, कितीही दडपण आणले तरी मागे हटणार नाही हा निर्धार पुनःपुन्हा व्यक्त होतोय.
गोबीजींनी इंस्टाग्राम वर मूळ…
In reply to जेन झी अत्यंत निर्भीड आहे,… by श्रीगुरुजी
गोबीजींनी इंस्टाग्राम वर मूळ मुद्याला बगल देत आपल्याला झालेल्या शिवगळीचा मुद्दा केला पण प्रचंड मोठे हृदय दाखवून ह्या तरुणांना आपण माफ करतो अशी सुद्धा अत्यंत प्रगल्भतेची द्योतक अशी घोषणा केली. त्यानंतर कदाचित सतरंजी वाल्यानी मोदीजींच्या ह्या विशाल हृदयाच्या माफीची पर्वा न करता १५ वर्षांच्या मुलीवर गुन्हे दाखल केले. तिच्यावर दबाव आणून १५ वर्षांच्या मुलीच्या माफीचे विडिओ सर्वत्र वायरल करून आपले शौर्य दाखवले.
अंधभक्तांची एकूण भाषा आणि आंत दाबून ठेवलेल्या विकृती हल्ली वैफल्याने बाहेर येत आहेत. त्यामुळे एका १५ वर्षांच्या मुलीला आम्ही घाबरवले हे कतृत्व पुढे आणणे आणि त्यातून आपले पौरुष सिद्ध करणे सुरु आहे. सुरु ठेवा... कारण मुखवटे जितके लवकर पडतील तितके चांगले.
+1
In reply to गोबीजींनी इंस्टाग्राम वर मूळ… by साहना
लाथा बुक्क्यांनी तुडवले असते ! पण आपले पोर नाही ना ! त्यापेक्षा माफीच मागवून घेतलेली बरी ! आता त्या पोरीने स्वतः मागितली आहे का तिला काहीतरी येनकेन प्रकारेण माफी मागायला भाग पाडले आहे कोणी बघितले आहे ! जंगल मे मोर नाचा किसने देखा म्हण आहे एक !
आता तरी गार व्हा थोडे !
In reply to जेन झी अत्यंत निर्भीड आहे,… by श्रीगुरुजी
दिल्या पोरीने शिव्या, झाली भावनेच्या उद्वेगात व्यक्त, झाली उपरती, मागितली माफी ! मोदींचा दुसरा व्हिडिओ बघितला नाही का ? त्यांनी माफ केले आहे सगळ्या पोरांना, हा बघा व्हिडिओ ! आपल्या मोदींचे ऐकणार का नाही बरं तुम्ही ? एका हं, आपणच नाही ऐकलेत त्यांचे तर जग काय किंमत करेल बरं अशा सोन्यासारख्या झळाळत्या देशभक्तीची ?
ही खरोखरच १५ वर्षांची असेल …
In reply to जेन झी अत्यंत निर्भीड आहे,… by श्रीगुरुजी
ही खरोखरच १५ वर्षांची असेल (प्राथमिक चौकशीच्या वृत्तांतात २५ वर्षे वय आहे व व्यक्तिमत्त्व सुद्धा तेवढेच दिसते), तर १८ पूर्ण होईपर्यंत तिला रिमांड होम मध्ये ठेवावे.
फुलवला का ज्ञान पिसारा ?
In reply to ही खरोखरच १५ वर्षांची असेल … by श्रीगुरुजी
चला आता सांगा पाहू
जुवेनाईल जस्टिस बोर्डाने कुठल्या कायद्याच्या कुठल्या कलमा अनुसार १५ वर्षाच्या पोरीला ३ वर्षे बालसुधारगृहात ठेवायचे ते लगेच सांगून टाका कसे ! ?
आणि काय हो ! अगोचरपणा करायचा तो किती त्याला काही घरबंध आहे का नाही तुम्हाला ?
व्यतिमत्व पाहून २५ वाटते म्हणजे नेमके काय पाहून असले नीच निष्कर्ष काढलात ?? इथे स्त्री सभासद हजर असताना सुद्धा असल्या कॉमेंट करताना लाज नाही वाटली तुम्हाला ?
लॉकडाऊन काळात उध्दव ठाकरेंना…
लॉकडाऊन काळात उध्दव ठाकरेंना घरकोंबडा म्हणणारे आता विश्वघाबरुला काय म्हणणार?
संसदेत येत नाही. रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर रिल करतो. काय गरज आहे हे करायची ? संवादच साधायचा आहे तर एक खुली पत्रकार परिषद घेऊन मोकळे व्हायचे. रात्रीचे गळे काढणे चांगले नसते.
खिक्क! 😂
In reply to लॉकडाऊन काळात उध्दव ठाकरेंना… by आग्या१९९०
खिक्क! 😂
रुचिका सिंह यांच्या चाहत्यांची निराशा
कॅमेरा समोर असताना अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या मंडळीचा एक चाहता वर्ग भारतात उदयाला आला आहे. रुचिका सीिंह यांनी ह्या वर्गाच्या मनात खास स्थान प्राप्त केले होते पण त्यांनी मागितलेल्या बिनशर्त माफीमूुळे चाहते नाराज झाले असून ह्या तुंबलेल्या लोकांसमोर आता मोकळे कसे व्हायचे हा मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे.
आप्पा फिर से एक बार लाँग ऑन पर !
In reply to रुचिका सिंह यांच्या चाहत्यांची निराशा by अप्पा जोगळेकर
मन की बात का आप्पा ? 😂😂
> कॅमेरा समोर असताना…
In reply to रुचिका सिंह यांच्या चाहत्यांची निराशा by अप्पा जोगळेकर
> कॅमेरा समोर असताना अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या मंडळीचा एक चाहता वर्ग भारतात उदयाला आला आहे.
आता उदयाला आला ? अर्वाच्य भाषा ह्यापूर्वी नव्हती ? आणि हा नक्की काय "वर्ग" आहे ? सोनिया गांधी ह्यांच्या वैध्यव्यावर कुठल्या नेत्याने प्रचारांत वक्तव्य केले होते ? मिपावर सध्या आपल्या पोरीला लाथाबुक्क्यांनी मारण्याची भाषा कुठला वर्ग करतोय ? २०१६ मध्ये दया शंकर ह्यांनी मायावती ह्यांच्या संबंधात काय वक्तव्य केले होते ? त्यांना २४ तासांत पदत्याग करावा लागला होता. रमेश बिदुरी ह्या भाजीपाव नेत्याने प्रियांका गांधी ह्यांच्या गालांवर काय व्यक्तव्य केले होते ? हा कुठला वर्ग आहे ? मनोहर लाल धाकड ह्या भाजप महिला नेत्याच्या पतीने तर केमेरा पुढे काय करावे ह्याचे "मार्ग-दर्शन" केले होते. हा कुठला वर्ग आहे ?
निव्वळ आताच्या आंदोलनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर मोहनदास ह्या केरळ भाजपच्या "बौद्धिक" प्रमुखाने काय म्हटले ते पहा :
अर्वाच्य शब्द मी __ केले आहेत.
AI Start
He targeted women participating in the protests—specifically characterizing them as Leftist, secular, or democratic—with deeply offensive and vulgar language. He claimed that during such crackdowns, "gang ----- will happen" and asserted baselessly and vilely that such women "enjoy being -----" or "like being -----" with "no complaints."
AI End
सर्वसाधारण व्यक्ती जी रस्त्यावर आहे तिने अश्लील किंवा अर्वाच्य बोलले ह्यांत आश्चर्य नाही आणि विशेष असे काही नाही. देशांत कुठेही गेलात तरी अशी घाणेरडी भाषा इथे तिथे ऐकू न आली तरच आश्चर्य आहे.
एका मोठया आंदोलांत, मूळ मुद्याला बगल देऊन लोकांचा बुद्धिभ्रम करण्यासाठी एका १५ वर्षांच्या मुलीला कॅमेरा पुढे बोलायला लावायचे, मग स्वतः गोबीजींनी त्या अर्वाच्य भाषेचा सार्वजनिक बाऊ करायचा, सतरंजी उचलण्यारांनी मग तिच्यावर FIR करायची आणि मग तिचा जबरदस्तीने माफी मागण्याचा व्हिडिओ निर्माण करायचा आणि "जितं मम' पद्धतीने ह्याला एक मोठे यश घोषित करायचे आणि ह्या सर्व घाणीत लोळून , "आता कसे बरे थंड वाटते" असा आव आणायचा.
सदर मुलगी अल्पवयीन असल्याने नाव सुद्धा मी इथे लिहिणार नाही. कुणाला जर अश्या मुलीला घाबरवून आपले पौरुष सिद्ध करावेसे वाटते तर सुज्ञ मंडळींना सत्य काय आहे से आणखीन स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही.
पण, अर्वाच्य भाषा वापरणारा "वर्ग", त्या वर्गांत म्हणे हि पोरगी मोठी सेलेब्रिटी आणि तिच्या माफीने ह्या तथाकथित काल्पनिक वर्गाला म्हणे शोष वगरीए झाला आणि आपली बद्धकोष्टीय शाब्दिक कोटी. ह्याला बौद्धिक दिवाळखोरी म्हणातात.
ऊहूं ! तोबा तोबा तोबा पुरा मूड खराब कर दिया !
In reply to > कॅमेरा समोर असताना… by साहना
अहो ते गुरुजींबद्दल बोलत होते हो आप्पा ! तुम्ही उगाच मध्ये लांबड लावून रसभंग केला बघा !
रुचिका सिंह ह्यांनी शिव्या दिल्या - अपडेट बाय गुरुजी,
रुचिका सिंह माफी मागतात - अपडेट बाय गुरुजी !
रुचिका सिंह १५ का २५ च्या - सीटी स्कॅन बाय गुरुजी ! ते पण फक्त व्यक्तिमत्व आधारित सेवा !
चाहता वर्ग असावा तो असा !
त्या पोरांनी केलेल्या शिवीगाळीवर इतका फोकस केला आहे जनतेने एका "वर्गातल्या" (वर्ग - परिभाषा आप्पा शब्दकोशातून साभार) लोकांनी की हे कसौटी जिंदगी की टाईप फेमस शिवीगाळ एपिसोड झाले नसते तर ह्या जनतेने कोणावर फोकस करून फ्रस्ट्रेशन काढले असते ? असा प्रश्न पडतो !
शिवीगाळीसंबंधी एक शंका
मोदींनी गलिच्छ भाषा वापरणाऱ्यांना क्षमा केली. त्यावरनं मनात एक शंका आली. मी स्वत: अत्यंत शिवराळ आहे. फक्त उघडपणे शिव्या देत नाही. कारण उघड आहे.
मी जर देशद्रोह्यांना ( विरोधी मतवाल्यांना नव्हे ) उघड शिव्या दिल्या तर मोदी मला माफ करतील काय? जाणून घेणे रोचक ठरावे.
-गा.पै.
एक हिंदू म्हणून
In reply to शिवीगाळीसंबंधी एक शंका by गामा पैलवान
आज तुम्हाला खरा uncomfortable प्रश्न पडला आहे गामा ! शैक्षणिक सुधार आंदोलन हे डावे होते म्हणले अन् वैचारिक वजा केले तरीही, राईट टू एज्युकेशनची जबाबदारी फक्त हिंदूंच्या बोडक्यावर टाकून मायनॉरिटी अंतर्गत चालणाऱ्या जैन, शीख, कॉन्व्हेन्ट आणि मदरसा ह्यांना तसे काहीच बंधन का घातले नसेल ह्या राममंदिर स्थापक सरकार ने ? एकीकडे FCRA बिलच्या बाता मारायच्या अन् हिंदू मंदिरांतून कर घेणे ते हिंदू शाळांना गोरगरीब फुकट शिकवण्याची (ते पण फक्त सेक्युलर शिक्षण) जबरदस्ती का दिसत नसेल मोदी सरकारला ?
असले कठीण out ऑफ syllabus…
In reply to एक हिंदू म्हणून by वृषभ खोंडे
असले कठीण out ऑफ syllabus प्रश्न विचारू नका. ह्यांची टोकन विंडो संपते. काही १०० टोकन च्या आंत आहे तेच विचारायचे. म्हणजे गणपती बाप्पा म्हणा कि हि मंडळी हिरीरीने मोरया म्हणून ओरडतील. त्याच्या पलीकडे काही विचारू नका.
विनीत जोशी हा काँग्रेसधार्जिणा बाबू जो RTE आणि CCE साठी कारणीभूत (काही प्रमाणात) होता तो इतका काळ UGC, CBSE, NTA ह्यांच्या ताब्यांत होता कसा ?
नक्की कुणी CBT ला विरोध केला ? का ? तेंव्हा मंत्री कोण होते ? त्यांची भूमिका काय होती ? असा कुठला मुद्दा होता जो JEE ला लागू होत नव्हता म्हणून JEE पूर्णपणे CBT झाली पण NEET नाही ? ह्या असल्या प्रश्नांची उत्तरे सोडा पण साधे प्रश्न विचारायला सुद्धा ह्यांची टोकन विंडो संपते. लोणी कुठे आहे हेच ह्यांना ठाऊक नाही. दाराच्या बाहेर चपला कुणाच्या आहेत इथेच ह्यांचा वेळ जातो.
प्रश्न विचारायचे असतील तर हे विचारायचे:
१.`भारत माता कि जय` आणि `वंदे मातरम` ह्यांत जास्त देशभक्ती कुठल्या घोषणेत आहे ?
२. गांधीजींची पब्लिक स्तुती किती करायची आणि खाजगीत काय निंदा करणे योग्य ?
३. मुंबईतील लोकल मधील गर्दी साठी नेहरू कसे कारणीभूत आहेत ?
४. भारत विश्वगुरू कधी झाला ? २०१४ कि २०२४ ?
५. गोबीजींनी बालवयांत कुठल्या खतरनाक श्वापदाला नमवले ? लांडगा कि मगर ?
६. सूर्य-टिळक चे पेटंट कुठल्या हाफीसांत रजिस्टर केले ?
सुरुवात तर झालीये ना ....
In reply to एक हिंदू म्हणून by वृषभ खोंडे
अभ्यासक्रम बदलायची सुरुवात तर झालीये ना. धर्मेंद्र प्रधान नाही तर इतर कोणी उद्दिष्ट साध्य करतील. वृथा चिंता नसावी.
-गा.पै.
.
काहीतर बोललो असतो, नाही बोलतोच
In reply to . by गवि
फक्त ह्याला ऍड होमिनेम मानू नका ही नम्र विनंती !
तर विषय असा आहे, वितंडवाद घातले नाहीत तर ऑनलाईन अस्तित्वाचे मजेच काय ? अर्थात हे माझे खेळकर मत झाले.
आपण otherwise घेणार नाही अशी अपेक्षा. ललित लेखनात मिसळपावचा स्टँडर्ड सेट करणारे म्हणून तुम्ही एका आदर्शांपैकी एक आमचे.
लवकरच काहीतरी खेळकर नर्म विनोदी लेखन घेऊन येईन ह्या वादविवादाचे पापक्षालन करण्यासाठी.
मिपाकर सेहवाग
ही प्रा.डॉ. च्याच त्रिशतकी खेळीला एक बाय.
अभिनंदन बिरुटे सर.
आभारी रे अभ्या.
In reply to मिपाकर सेहवाग by अभ्या..
धन्स.
"
पण, सध्या प्रा.डॉ. सध्या व्यग्र आहेत. नाय तर, तिसरा भाग काढणारच होतो.
पण, मी लवकरच येईन पोरांनी राजीनामा घेऊन जे सूख दिलं क्या कहने.
आणि मित्रो रील्स पाहून पहिल्या पावसाच्या आनंदाची सर आली, त्या सरीला
तोड नाही आणि आनंदाला पारावार उरलेला नाही. आनंदाचे डोही आनंदी तरंग ते हेच.
-दिलीप बिरुटे
छान
In reply to आभारी रे अभ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.डॉ. सध्या व्यग्र आहेत. >>>
चांगले आहे..
व्यग्र राहा, व्यस्त नको.
ओशो आणि क्षमा
**माझ्या प्रिय मित्रांनो...**
मी तुम्हाला एक अत्यंत गमतीदार किस्सा सांगतो. तुम्हाला तर माहीतच आहे, मी नेहमीच गोष्टी जशा आहेत, तशाच मांडतो... अगदी उघडपणे! मी एकदा माझ्या एका प्रवचनात मदर तेरेसा यांच्यावर टीका केली होती [cite: 2.1.1]. मी म्हटलं होतं की, त्यांना जगभरात अनाथ मुलांची मदत करण्यासाठी आणि अनाथालये उघडण्यासाठी नोबेल पारितोषिक दिलं गेलं आहे [cite: 2.2.2]. पण जर गर्भपात कायदेशीर झाला, तर त्यांना ही अनाथ मुले कोठून मिळतील [cite: 2.2.2]? म्हणूनच त्या गर्भपाताच्या सक्त विरोधात आहेत [cite: 2.2.2]. अनाथ मुले आणि गरिबी हीच तर त्यांच्या धर्मादाय व्यवसायाची खरी गरज आहे, कारण या अनाथ मुलांमधूनच उद्याची नवी पिढी निर्माण होणार असते [cite: 2.2.2]!
आता हे ऐकल्यावर साहजिकच त्यांना राग यायला हवा होता. पण त्यांनी काय केलं? त्यांनी मला एक पत्र पाठवलं [cite: 2.1.1]. अत्यंत 'पवित्र' आणि 'नम्र' असं ते पत्र होतं.
पत्राचा सूर साधारण असा होता:
*"प्रिय ओशो, तुम्ही माझ्यावर जी टीका केलीत, त्याबद्दल मी तुम्हाला क्षमा केली आहे. आणि मी प्रार्थना करते की, देव तुमचं भलं करो."*
हे पत्र वाचून मला मनसोक्त हसू आलं. मी विचार केला, पाहा, हा मानवी अहंकार कसा वेगवेगळ्या रूपांत लपलेला असतो! हा तर सर्वात सूक्ष्म आणि धोकादायक असा 'आध्यात्मिक अहंकार' आहे.
मग मी एका पत्रातून त्यांना चोख उत्तर दिलं. मी लिहिलं:
"मदर तेरेसा, पहिली गोष्ट म्हणजे... मी तुमची क्षमा मागितलीच कधी होती? ज्या माणसाने क्षमा मागितलेलीच नाही, त्याला क्षमा करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? हा तुमचा निव्वळ अहंकार आहे! तुम्ही तुमची क्षमा तुमच्याच खिशात ठेवा, मला तिची अजिबात गरज नाही.
दुसरी गोष्ट, न मागता क्षमा करून तुम्ही स्वतःला माझ्यापेक्षा वरच्या स्थानावर (Superior) बसवण्याचा प्रयत्न करत आहात. 'मी एक महान संत आहे आणि तू एक पापी माणूस आहेस, म्हणून मी तुला क्षमा करते' - हा तुमचा छुपेपणाने केलेला अपमान आहे. खरी धार्मिकता ही अशी नसते.
आणि राहिला प्रश्न तुमच्या देवाने माझं भलं करण्याचा! तर मदर तेरेसा, जर तुमचा तो देव तुम्हाला कुठे भेटलाच, तर त्याला सांगा की, त्याने माझं भलं करण्यापेक्षा, या जगात त्याने जी काही गरिबी, दुःख आणि अनाथ मुले निर्माण करून ठेवली आहेत, त्याबद्दल आधी त्यानेच या मानवजातीची क्षमा मागावी!"
मित्रांनो, लक्षात ठेवा... 'संत' (Saint) होणं म्हणजे केवळ एक पदवी मिळवणं किंवा गरिबांवर उपकाराचं ओझं लादणं नव्हे. जिथे अहंकार आहे, तिथे खरं 'ईश्वरत्व' (Godliness) असूच शकत नाही. खरी धार्मिकता ही अतिशय सहज, निरागस आणि अहंकारापासून पूर्णपणे मुक्त असते.
*(मिश्किल हसत)* आणि म्हणूनच मी म्हणतो... या अशा 'संतां'पासून नेहमी सावध राहा!
या चटक्याचा या धाग्यातील घडामोडीश संदर्भ लागल्यास तो निव्वळ योगायोग समजू नये.😀