Skip to main content

कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. (भाग दोन )

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 23/07/2026 06:56 या दिवशी प्रकाशित केले.

कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. पहिल्या भागात मिपाकरांनी शांततेच्या मार्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या. नीट परीक्षेचे पेपर  लीक होणे आणि तत्त्सम घोटाळ्याविरुद्ध दिल्ली येथे जंतरमंतरवर सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टी या युवकांच्या सामाजिक चळवळीने  केंद्रसरकारमधील शिक्षणमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु  केले  आहे.  वीस तारखेला संसदेवर निघालेल्या मोर्चा अडवून विद्यार्थ्यांना, युवतींना महिला पालकांना जी अमानुष मारहाण केल्या गेली त्या क्र्रुरतेचे आणि कौर्याचे  असंख्य व्हीडीयो सामाजिक माध्यमांवर दिसत आहेत.   'बेटी बचाओ,बेटी पढावो' म्हणना-यांनी  लेकी बाळींचा केलेला अपमान, डोकी फोडणे,  जायबंदी करणे 'अमानुष मारहाण' असेच वर्णन वीस जुलैच्या  घटनेचे वर्णन करावे लागते.  संसदेवर जाणा-या या मोर्चाला लाठीमाराशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता ? प्रश्न विचारता येईल आणि चर्चाही करता येईल.  सोनम वांगचुंग यांना उपचाराच्या निमित्ताने  जबरदस्तीने उचलून आंदोलन मोडता येते काय, असा प्रयत्न सरकारने करुन पाहिला, मारहाण करुन युवकांना पळवून लावण्याचा प्रयत्न झाला. मुलं घाबरुन जातील आणि आंदोलन स्थळांवरुन पळून जातील असे सरकारला वाटले असावे, पण असे काही झाले नाही. उलट, आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे. 

दुसरीकडे, मन की बाता कराव्यात तशा आणि त्या टाइपच्या गप्पा सुरुच आहेत. '' पेपरफुटी हे घोर पापआहे. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली असून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र काम केले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 'एनडीए' संसदीय पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले''  मात्र, केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आंदोलकांच्या मागणीबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती.  सीजेपीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नड्डा यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले असले तरी त्यावरही केंद्र सरकारने मंगळवारी मौन बाळगले.

आता सध्या कालच्या घडामोडीत जंतर-मंतरवरील आंदोलनाची तीव्रता कमालीची वाढलेली पाहता, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलकांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येऊ लागले आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली आहे. एकाच वेळी आंदोलन आणि विरोधकांचा चहूबाजूंचा हल्लाबोल, लोकसभा आणि राज्यसभेतला गोंधळ पाहता, केंद्र सरकारची बुधवारी कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले. महिनाभर संवाद टाळणाऱ्या केंद्र सरकारने अखेर आंदोलकांशी गंभीर चर्चा सुरू केली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. 

सरकारविरोधात आम्ही पुन्हा मोर्चा काढणार नाही आणि जंतर-मंतरवरून हलणार नाही. आता केंद्र सरकारने जंतर-मंतरवर येऊन चर्चा करावी किंवा तटस्थ स्थळी बैठक घ्यावी, असे  कॉक्रोच  जनता पार्टी'ने (सीजीपी) बुधवारी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई, आणि कोणतीही फौजदारी कारवाई केली जाऊ नये, या तीनही मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे 'सीजीपी'च्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे स्पष्ट  केले. 

''गेल्या दहा वर्षांत देशभरात १५२ परीक्षा पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, त्याचा जबरदस्त फटका सुमारे ७.५ कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांना सहन करावा लागला आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी इंदिरा भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला''

लेखनातील माहिती कंटेंट  लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. सकाळ या छापील वृत्तपत्रातून चर्चेसाठी घेतले आहे. तर, मिपाकर हो शांततेच्या मार्गाने आपापली मतं मांडत राहू या..


 


वाचने 7510
प्रतिक्रिया 309

प्रतिक्रिया

In reply to by अप्पा जोगळेकर

अनैश्च्छिक ब्रम्हचारी संघाने आपले जुने टूलकिट चे बाड बाहेर काढून धूळ झटकली आहे असे वाटते.

२७०० भूतपूर्व गुन्हेगार एका ठिकाणी अचानक कसे आले ? हिस्ट्री शिटर्स नावाचा टेलिग्राम ग्रुप आहे का? आणि साधे गुन्हे सोडवायला जमत नाहीत त्या पोलिसानी अचानक २८०० लोकांची माहिती गोळा करून त्याचे excel शीत इतक्या लवकर कसे बुवा गोळा केले ?

गोबी सरकार आंदोलकांसोबत वाटाघाटी करत आहेत अशी बातमी आली होती. ती ह्याच भूतपूर्व गुन्हेगारांसोबत होती का ?

थोर कतृत्ववान शिक्षकमंत्री धर्मेंद्र प्रधान ह्यांनी ह्या गुन्हेगारांना घाबरून पदत्याग केला का ? 

 

कपिल सिब्बल ह्या निमित्ताने आपली जुनी पापे धुवू शकतात. 


In reply to by अप्पा जोगळेकर

विद्यार्थी आंदोलनामागुन देशात अराजक निर्माण करायचे हाच तर तो उद्देश होता ह्या आंदोलनाचा. जेव्हा मोर्चात नासधुशीच्या घटना घडल्या तेव्हा ते लोक आमचे आंदोलनकर्ते नाहीच. ते असामाजिक तत्त्व मोर्चात पोलिसांनी येउच कसे दिले वगेरे वगेरे बाता करणारे आता त्यांच्यावर खटले लागले तेव्हा ह्या सिजेपी च्या लोकांना ह्याच असामाजिक तत्त्वांचा का पुळका आला? 

जर ते असामाजिक तत्त्व आहेत / होते तर जौ द्या ना. भोगतील ते आपल्या कर्माची फळे!  ते तर तुमचे नव्हतेच ना? मग का हा रंडीरोना? (हा जेन्झी शब्द आहे. चालवुन घ्या. आता ते नोर्मलाईझ केले आहे.)

पण काय आहे ... अराजक निर्माण करयचे असा आदेश असेल तर तो काहीही खुस्पट काढुन करावाच लागेल. 

कपील सिब्बल केस लढवायचे दाबुन पैसे घेतो. तो काय फुकट काम करणार आहे काय?


अभिजीत दिपकेच्या विवाहाची चर्चा 

 

अभिजीत दिपकेला स्थळे सांगून येत आहेत.‌ त्याला नोकरी/व्यवसाय करण्याची अजिबात आवश्यकता नाही. आता त्याच्या आयुष्याची पुढील वाटचाल निश्चित झाली आहे. 

 

कन्हैया कुमार, हार्दिक पटेल, रामदास आठवले  यांच्या मार्गानेच तो जाणार. दलित असणे ही राजकारणात जाण्यासाठी  अजून एक गुणवत्ता. अमेरिकेत राहून तेथे नोकरी मिळालीच नसती.‌ भारतात येऊन आंदोलन करण्याचा निर्णय अचूक ठरला. रामदास आठवलेप्रमाणेच उच्चवर्णीय मुलीशी विवाह होण्याची दाट शक्यता. 

 

अभिजीत दिपकेला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा! 


In reply to by श्रीगुरुजी

दिपके ह्यांच्या जातीवर टिप्पणी करण्याचे प्रयोजन काय ? तुम्हाला आपली मुलगी द्यायची आहे का ?

> अमेरिकेत राहून तेथे नोकरी मिळालीच नसती.‌

तुम्हाला कसे ठाऊक ?

> दलित असणे ही राजकारणात जाण्यासाठी  अजून एक गुणवत्ता.

कुणी सांगितले ? किती दलित व्यक्ती राजकारणात आहे ? एकूण संसद मधील किती खासदार दलित आहेत  ?

> रामदास आठवलेप्रमाणेच उच्चवर्णीय मुलीशी विवाह होण्याची दाट शक्यता.

तुम्हाला काय ? आपली मुलगी द्यायचा प्रयत्न सुरु आहे का?


ज्या व्यक्तीने स्वतःच्या जातीचा बाऊ केला नाही तेंव्हा सार्वजनिक संसंकेतस्थळावर त्याची जात वर काढणे ती सुद्धा विवाह सारख्या खाजगी वैयक्तिक गोष्टीवरून हे कुठचे संस्कार ?

 

 


In reply to by साहना

का बॉ? 

आरक्षण घेताना / नोकरी घेताना जात तर कित्ती कित्ती महत्त्वाची असते. किती अभिमानाने दाखवली जाते.

मग आता काय झाले? समानता हवी आहे ना? जातीविषयी बोलले तर त्यात काय अपमान. 

बाकी ते लाईट कामेडी काय ते म्हनाले झुरळ तसे समजा 

 


In reply to by सुक्या

+१ 

 

उपरोध समजायला सुद्धा थोडी बुद्धी असावी लागते. 


In reply to by सुक्या

लोक दाखवू द्या हो पण वरील जातीविषयक कमेंट चे प्रयोजन काय ? विनोद ? 


In reply to by साहना

प्रयोजन काहीही असु द्या हो. त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? 

फायदा घेताना जात कशी न अखडता / अभिमानाने दाखवतात ना तसेच ईथेही केले तर काय प्रोबलेम आहे? फायदा असतो तिथे जातीचा अभिमान नी ईतर ठीकाणी "भावना दुकावल्या" ऐसा नई चलता ना ब्रो.


In reply to by सुक्या

> फायदा घेताना जात कशी न अखडता / अभिमानाने दाखवतात ना तसेच ईथेही केले तर काय प्रोबलेम आहे?

लोक आपल्या जातीबद्दल बोलतात दुसऱ्यांच्या नाही. दिपके ह्यांनी आपली जात पुढे करून काही साध्य केले असते तर त्यांच्या जातीवर बोलणे योग्य ठरले असते आणि ते सुद्धा त्यांच्या सार्वजनिक व्यवहाराबद्दल. विवाह किंवा इतर खाजगी बाबीबद्दल नाही. त्याशिवाय इथे वरील लेखकाने त्यांच्या भावी वधूची जात वगैरे काय असावी ह्यावर कुंठन केले आहे.

आक्षेप मला नाही पण हे शिष्टाचारास किंवा सभ्यपणाच्या मर्यादेस धरून नाही. दिपके ह्यांच्याविषयी मला काहीही प्रेम नसले आणि त्याच्या आंदोलनाला माझा पाठिंबा नसला तरी वरील लेखक सभ्यपणाचा आव आणतात, "मी माझ्या मुलीला लाथा बुक्यांनी मारले असते" अश्या प्रकारची फँटसी करतात आणि इथे आणखीन काहीही मुद्द्दा नाही म्हणून वैफल्यग्रस्त होऊन दिपके ह्यांची जात आणि त्यांच्या भावी वधूची जात ह्याबद्दल विणकर टिप्पणी करतात. आक्षेप पेक्षा विरोधाभास आणि दुट्टपीपणा जास्त दिसतो. कदाचित वैफल्य सुद्धा असावे.

अर्थांत लेखकाला दिपके ह्यांना स्थळ वगैरे सुचवायचे असेल तर गोष्ट वेगळी आहे.

 


In reply to by साहना

साहना ह्यांच्याशी सहमत, जात आणायची काहीच गरज नव्हती दिपकेंची.


In reply to by अवार्ड अंशूमन

सहमत ! 

ह्याला एक छान म्हण आहे "घेणे न देणे फुकट कंदील लावणे" दिपके अन् सिजेपी मधून थेट आरक्षण इत्यादींत शिरत बसले कीबोर्ड योद्धे विविक्षित. 

 

अन् इतका साळसूद आव आणण्याच्या वेळी लक्षात घ्या की आता जनरल जनता पार्टी पण निघाली आहे आरक्षण विरोधी लढा द्यायला पोरे उभी आहेत जनरल कॅटेगरी मधली, तिथे जाऊन उभे रहा, द्या समर्थन तिथे, त्या जुनेद ने बिर्याणी वाटली तसे वरणभात तूप मीठ लिंबू वितरण करा, रट्टे खा पोलिसांचे अन् घ्या पदरात पाडून आरक्षण रद्दीकरण ! 

 

हा का ना का ! 

 

बाकी पोटच्या पोरीला लाथा बुक्क्यांचा मार देण्याची भाषा करणारे स्वतःला हिंदू म्हणायला लागले आणि  सर्पयाग नंतर सुरू झालेला कलियुग आता रुळला आहे ह्यावर मत ठाम झाले, सार्वजनिक फोरम वर असली वाक्य लिहिणाऱ्याला असे लाथा बुक्क्यांनी तुडवणे अतिशय नॉर्मल वाटण्यासारखे संस्कार मिळाले असतील बाळकडू म्हणून तर काय सांगा !

 

त्रिवार निषेध


In reply to by वृषभ खोंडे

२०१४ च्या आधी जे वैफल्य काँग्रेसी कार्यकर्त्यांत दिसत होते तेच आता भाजीपाव आणि अनैच्छिक ब्रह्मचारी संघाच्या कार्यकर्त्यांत दिसत आहे. दिवसभर कायप्पा आणि इंटरनेटवर अंधभक्तीत कीबोर्ड बडवायचा आणि खाजगीत "हेचि फळ मम तपाला ?" हा प्रश्न ह्यांना भेडसावतो. Dr. Jekyll and mr. Hyde मध्ये हळू हळू Jekyll ह्यांना खलनायक Hyde मीच तर नाही हा संशय वाटू लागतो त्याच प्रमाणे ह्या अंधभक्तांना "गंगाधर हि शक्तिमान है" ह्याची जाणीव होऊ लागली आहे. नीट मधील पराकोटीचा भ्रष्टचार, त्यानंतर शून्य जबाबदारी मग सामान्य विद्यार्थ्यांना हिंसक जमाव ठरवणे, त्यांच्यावर गोळीबार मग FIR वगैरे लावून त्यांची गळचेपी. ह्या सर्वांचे दिवस रात्र समर्थन करता करता वैफल्य हे येईलच. त्यातून मग आपल्याच पोराबाळांना लाथाबुक्क्यांनी मारण्याची फँटसी वगैरे निर्माण होत असेल. आम्ही काही मानसोपचारतज्ञ् नाही पण हे सर्व रिलेटेड आहे असे वाटते. 

 

दिपके ह्यांना माझा पाठिंबा नाही किंवा आंदोलन आणि सत्याग्रह ह्यांचा सुद्धा मला तिटकारा आहे. ह्या आंदोलनात विदेशी शक्ती पैसा ओतत आहेत हे सुद्धा शक्य आहे. पण तरी सुद्धा आंदोलकांच्या मागण्या रास्त होत्या. नीट परीक्षेतील भ्रष्टाचाराला महापाप वगैरे म्हणून नेहमीचे शाब्दिक चूर्ण गोबीनी विद्यार्थ्यांना चारण्याचा प्रयत्न केला. ते चालले नाही. हे चूर्ण पिऊन लहानाची मोठी झालेली मग अंधभक्त मंडळी संतापली. आत्ताच कुठे राम मंदिरातील भ्रष्टाचार डिफेन्ड करत होती आणि एक नवीन विषय निर्माण झाला."विधवेचे गाढव सर्वांचें उकिरडे फुंकी' असली स्थिती निर्माण झाली. किती म्हणून उकिरडे फुंकणार  ? अच्छे दिन ची अपेक्षा ठेवता ठेवता ह्यांची परिस्थिती त्या गाढवा प्रमाणे झाली आहे.

 

म्हणून जे वैफल्य निर्माण झाले आहे त्यातून आता नवीन नवीन मुक्ताफळे येणार आहे. आणि हे काही एका-दुसऱ्या व्यक्तीची गोष्ट नाही. संपूर्ण अंधभक्त समाज ह्यांत गुंतणार आहे. भावनिक गुंतवणूक इतकी केली होती कि आता त्यातून बाहेर येणे शक्य नाही.

दर्द का हद से गुजर जाना है दवा हो जाना  - हाच एक उपाय आहे.

 

माझी भूमिका :

क़फ़स में मुझ से रूँदाद-ए-चमन कहते न डर हमदम
गिरी है जिस पह कल बिजली वुह मेरा आशियान क्यों हो

सरळ अर्थ:
हे मित्रा, पिंजऱ्यात मला बागेची गोष्ट (दुःखाची कहाणी) सांगताना मुळीच भिऊ नकोस. ज्या घराच्या (किंवा घरट्याच्या) वर काल वीज कोसळली, ते घर माझेच असेल कशावरून?

(भावार्थ):
कवी कैदेत किंवा हताश स्थितीत असूनही आपल्या मित्राला धीर देत म्हणतोय की, बागेत किंवा जगात इतकी संकटे येतात, त्यामुळे काल जी दुर्दैवाची घटना घडली किंवा जिथे वीज पडली, ते माझेच घर असेल असे नाही. म्हणून तू मला ती दुःखद हकिकत सांगताना संकोच करू नकोस.

 

 


नीट पेपरफुटीप्रकरणी सीजेपीने दिल्लीत जंतर-मंतरवर महिनाभर धरणे आंदोलन केले. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी  राज्यातही ठिकठिकाणी तरुणांनी आंदोलन केले होते. या आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी गृहविभागास दिले. यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. वातावरण पाहुन योग्य निर्णय घेतला आहे असे वाटते.

दुसरीकडे फुटीविरोधात तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात दिल्लीच्या जंतरमंतर येथे निदर्शने करणाऱ्या आंदोलकांविरोधात कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. त्याबरोबरच निदर्शनांदरम्यान ताब्यात घेतलेल्या निदर्शकांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसेल आणि त्यांचे वय वर्षे १८पेक्षा कमी असेल तर त्यांची सुटका करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले.

'कॉक्रोच जनता पार्टी'ने (सीजेपी) आयोजित केलेल्या २० जुलैच्या 'संसद चलो' मोर्चादरम्यान विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या कठोर कारवाईविरोधात एकापेक्षा अधिक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.

देशभर सरकारची नाचक्की झाल्यामुळे आयटीसेल आणि भक्तमंडळी आता पोरांना बदनाम करायला उतरली आहेत, पण त्यांच्या दुर्दैवाने पोरं पुढें गेली आहेत.

 

-दिलीप बिरुटे

 

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी गृहविभागास दिले. यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. वातावरण पाहुन योग्य निर्णय घेतला आहे असे वाटते.

 

न्यायालयाची आवश्यक अनुमती घेतल्यानंतर हे गुन्हे मागे घेण्यात येतील.‌


In reply to by श्रीगुरुजी

नाही हो ! कुणाची परवानगी वैगरे इथे लागणार नाही. शेपूट खाली घालण्याची आज्ञा दिल्लीहून आली आहे. . गुन्हे मागे घेण्यास फर्नांडिस ह्यांना भाग पाडले गेले आहे. त्यांना आणखीन पर्याय नाही.  ! राजकीय गरजच आहे तशी. गोबी नाही उगाच रात्री अपरात्री रिल्स बनवत फिरत आहेत. 


आंदोलना दरम्यानचा दगडांचा ट्रक हा पोलीस कस्टडीत ४ दिवसांपासून होता अशी माहिती समोर येतेय. हा ट्रक मग आंदोलनस्थळी आला कसा? कुणी आणला?


कुणाची परवानगी वैगरे इथे लागणार नाही

काय सांगताय? 

एफ आय आर न्यायालयाच्या मान्यतेशिवाय परत घेता येत नाही हा स्पष्ट कायदा आहे.

 मग तेथे मुख्यमंत्री असोत कि पंतप्रधान.  

केस मागे घेणार म्हणजे त्यासाठी आरोपीला न्यायालयात जावेच लागते हा मूलभूत नियम आहे.  

तेथे सरकार सांगणार आमची  त्याच्या  विरुध्द्व खटला मागे घेण्यास हरकत नाही असे झाले कि मगच हा खटला मागे घेतला जातो

तोवर तो पोलीस रेकॉर्ड मध्ये राहणारच.     


 


In reply to by सुबोध खरे

कायदे वगैरे ठीक आहे हो. शेपूट खाली घालण्याचा आदेश वरून आला म्हणजे इतर सर्व बदके आपोआप लाईनीत येतील. फर्नांडिस साहेब करून घेतील . 


In reply to by सुबोध खरे

उपरोध, नियम इ. समजण्यासाठी थोडी बुद्धी असावी लागते. 


कंगना मुर्ख आहे, भाजपच्या नादी लागून करिअर खराब करून घेतले, आता तिला ना जाहिराती मिळतात ना सिनेमे.


In reply to by अवार्ड अंशूमन

आधी तरि कुठे धड होती

पार इम्रान हाश्मिचा चित्रपट मिळाला पन फेमस नव्हति झालि

रास्क्ल मधे मोकार अ~ग प्रदर्शन केले पन कोणी पन बघितले नाही

 

तनु वेड्स मनु स्क्रिप्ट मुळे चालला

क्वीन फेमिनिसम मुळे

म णि कर्णीका नुकताच बाजिरओ मस्तानी मुळे आणी फेमिनिसम 

 

बाकि कोणता चिट्रपत आहेत तिचे लोकाना आठव्णार पण नाही


https://youtu.be/O8BBzF3mdA0?si=L7_ytMjJ1IKl1geN

जेनझी नंतर आता जेन अल्फा रस्त्यावर उतरून आपल्या मागण्यांवर आंदोलन करत आहेत .

वर्गात चालू पंखे , स्वच्छ स्वच्छतागृह आणि  पिण्यायोग्य पाणी अशा मागण्यांसाठी ह्या विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अर्थात त्यांना अपेक्षेप्रमाणे धमक्या जसे परिक्षेत नापास केले जाईल किंवा मुलींना मारण्याच्या , त्यांच्यावर थुंकण्याच्या धमक्या दिल्या  गेल्या. अखेर जेन अल्फा समोर झुकुन व्यवस्थापनाने मागण्या मान्य केल्या.

जेन अल्फा १६ वर्षाखालील असल्याने अद्याप पोस्कोला घाबरून आंदोलन चिरडण्यासाठी  तशा प्रकारचे उपाय कुणी सुचविले नाही  हे नशिब .

 

 


पेपरफुटीच्या ज्या घटना पंजाब आणि कर्नातकात झाल्या आहेत त्याबद्दल तेथील शिक्षण मंत्र्यांचे राजीनामे कोणीच का मागितले नाहीत?


In reply to by विजुभाऊ

पंजाबात कुठली पेपरफुटीची घटना झाली? जरा डिटेल देता का? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत वाचण्यापेक्षा जरा डोक चालवून बातम्या वाचत जा!


In reply to by विजयनवीन१

2023 ला झाली ना? मग आता बोंबलून काय फायदा? तेव्हा काय राम मंदिरात चोरीच कराय होते का? 


In reply to by विजुभाऊ

राजीनामा मागण्याची  जबाबदारी राजकीय विरोधकांची असते त्यामुळे जर पेपरफुटी झाली असेल आणि सत्ताधार्यांना जबाबदार धरले नसेल तर तेथील विरोधी पक्ष हे पूर्णतः षंढ आहेत असे समजू शकतो.

NEET परीक्षा हि NTA द्वारे दिली जाते जी एक सरकारी केंद्रीय यंत्रणा आहे. एकच पेपर संपूर्ण भारतांत एकाच वेळी उत्तरीत केला जातो त्यामुळे हा फुटला तर ह्याचा ब्लास्ट रेडियस संपूर्ण देश आणि लक्षावधी विद्यार्थी आहेतच पण असे वारंवार घडले तर एकूण वैद्यकीय शिक्षणावर त्याचा परिणाम होतो.

राज्यस्तरीय पेपर फुटले तर त्याचा परिणाम तेथील विद्यार्थी आणि स्थानिक परिणाम आहे. कदाचित फक्त त्याच्या विद्यापीठांवर त्याचा परिणाम होतो. गुन्हा असला तरी त्याचे महत्व वेगळे आहे.  


जेन झी च्या आंदोलनात आरक्षण हटवण्याची मागणी पुढे येत आहे असे ऐकण्यात आहे

अर्थातच ते होणार नाही  हे नक्की. कारण होणाऱ्या अराजकाच्या भीतीने    आरक्षण कधीच हटवले जाणार नाही. 

(   आरक्षण फक्त १० वर्षे राहील अशी तरतूद असतानाही ते तसेच ठेवले गेले. विप्र सिंगानी तर बासनात गेलेल्या मंडल आयोगाच्या सूचनांचे  पुनर्रुज्जीवन केले.


In reply to by विजुभाऊ

आरक्षण फक्त १० वर्षे राहील अशी तरतूद असतानाही ते तसेच ठेवले गेले 

शैक्षणिक म्हणत असाल तर तशी तरतूद  नव्हती. व्हाटस ॲप युनिव्हारसीटीत असू शकेल.

 


In reply to by आग्या१९९०

प्रात शाखेतील हाफ चड्डी वाल्यानी लिहिलेली बाडे सांगत की १० वर्षासाठी होते.


In reply to by अवार्ड अंशूमन

बैबैबैबैबै ! विकीपादाचार्यही प्रात:शाखेत हाफचड्डी घालून जायला लागले बरें !! : https://en.wikipedia.org/wiki/Ninety-fifth_Amendment_of_the_Constitution_of_India

 

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

गामाजी,

 

विकीपादाचार्य कलम ३३४ बद्दल बोलत आहेत. जे कलम ३३० ते ३३३ मधे नमूद केलेल्या विवीध  राजकिय आरक्षणांबद्दल आहे.

कलम ३३०: Reservation of seats for Scheduled Castes and Scheduled Tribes in the House of the People. त्यासाठीच्या मुदतीसाठी,

कलम ३३४: Reservation of seats and special representation to cease after certain period.

 

कलम १५ (६) (ब): शैक्षणिक आरक्षणाबद्दल.

(6)Nothing in this article or sub-clause (g) of clause (1) of article 19 or clause (2) of article 29 shall prevent the State from making,— (a) any special provision for the advancement of any economically weaker sections of citizens other than the classes mentioned in clauses (4) and (5); and (b) any special provision for the advancement of any economically weaker sections of citizens other than the classes mentioned in clauses (4) and (5) in so far as such special provisions relate to their admission to educational institutions including private educational institutions, whether aided or unaided by the State, other than the minority educational institutions referred to in clause (1) of article 30, which in the case of reservation would be in addition to the existing reservations and subject to a maximum of ten per cent. of the total seats in each category.

 

कलम १५(६)(ब) साठी कोणतीही कालमर्यादा संविधानात नमूद केलेली नाहीयेय.

 

संदर्भ: भारतिय संविधान

https://www.legislative.gov.in/static/uploads/2025/07/c9fe9c9b6840524844316f74bb1c556c.pdf

 

- (नम्र अभ्यासू) सोकाजी


In reply to by आग्या१९९०

बरोबरच आहे,

शेक्षणिक आरक्षण हे काही ९५ व्या घटनादुरुस्तीने आलेले नाही. ती अमेंडमेंट संसदीय आरक्षणासाठी म्हणजेच लोकसभा व विधानसभांतील राखीव मतदारसंघ ह्यासाठी आहे.

शिक्षणातील आरक्षणाची घटनात्मक तरतूद प्रामुख्याने

कलम 15(4) (पहिली घटनादुरुस्ती, 1951 नंतर)

कलम 15(5) (९३वी घटनादुरुस्ती, 2005) 

यांवर आधारित आहे.

या तरतुदींमुळे SC, ST आणि OBC यांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण देता येते (काही अपवादांसह). याला कोणतीही १० वर्षांची मर्यादा नाही. जोपर्यंत संविधानातील संबंधित कलमे अस्तित्वात आहेत किंवा त्यात बदल होत नाही, तोपर्यंत ही तरतूद लागू राहते.

म्हणजेच, संसदीय आरक्षणाला संविधानात सुरुवातीपासून १० वर्षांची "सनसेट क्लॉज" होती, त्यामुळे संसदेला ती वेळोवेळी वाढवावी लागते. पण शिक्षण आणि सरकारी नोकरीतील आरक्षणाला अशी १० वर्षांची मर्यादा संविधानात नाही. त्यामुळे दोन्हींची घटनात्मक रचना वेगळी आहे.

 

 


In reply to by अभ्या..

अभ्या..,

 

तुमचं म्हणणं बरोबर आहे. शैक्षणिक आरक्षण कधीही 'वाढवलं' गेलं नव्हतं.

 

मात्र घटनेचं कलम १५ भेदभाव नाकारण्याविषयी आहे. त्यांत शैक्षणिक आरक्षणाची थेट तरतूद नाही. कलम १५(३) आणि १५(५) ही पोटकलमे सरकारला शैक्षणिक संस्थांमध्ये जागा राखून ठेवायची अनुमती देतात. आरक्षण द्या असं बजावीत नाहीत. आरक्षण द्यायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी सरकारवर सोडला आहे.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

गामाजी,

 

>> कलम १५(३) आणि १५(५) ही पोटकलमे सरकारला शैक्षणिक संस्थांमध्ये जागा राखून ठेवायची अनुमती देतात. आरक्षण द्या असं बजावीत नाहीत. आरक्षण द्यायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी सरकारवर सोडला आहे.

 

तसं नाहीयेय. कलम १५ हे  Right to Equality  ह्याअंतर्गत येते. म्हणजे कलम १५च्या ईक्वालीटीची ढाल करून राज्यसरकारला शैक्षणीक आरक्षाणात काहीही बदल करत येणार नाहीत असं कलम १५(६)(ब) स्पष्ट करतं. 

सोर्स: https://www.legislative.gov.in/static/uploads/2025/07/c9fe9c9b6840524844316f74bb1c556c.pdf


- (नम्र अभ्यासू) सोकाजी 


In reply to by सोत्रि

सोत्रि,

 

कलम १५.६.ब चा मजकूर असा आहे : 

 


(6)
Nothing in this article or sub-clause (g) of clause (1) of article 19 or 
clause (2) of article 29 shall prevent the State from making,—

(a) ....

(b)any special provision for the advancement of any 
economically weaker sections of citizens other than the classes mentioned 
in clauses (4) and (5) in so far as such special provisions relate to their 
admission to educational institutions including private educational 
institutions, whether aided or unaided by the State, other than the minority 
educational institutions referred to in clause (1) of article 30, which in the 
case of reservation would be in addition to the existing reservations and 
subject to a maximum of ten per cent. of the total seats in each category.

 

 

यांत कुठेही शैक्षणिक आरक्षणात बदल करावयाचे संकेत दिसंत नाहीत.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

आरक्षण द्यायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी सरकारवर सोडला आहे. 

 

आणि मोदीजी ते अबाधित ठेवणारच. आता मोदी म्हणाले म्हणजे तुमच्यासाठी ते बरोबरच असणार ! त्यांचे म्हणणे आहे की नेहरू अँटी - आरक्षण होते आम्ही नाही त्यामुळे नेहरूंनी आणि काँग्रेसने देशातील एससी/ एसटी/ ओबीसी समाजाशी प्रतारणा केली असून आम्हीच काय ते ह्या समाजाचे त्राते आहोत. त्यामुळे आरक्षण कुठेच जाणार नाही, ते कायम इथे राहणारच आहे.


In reply to by वृषभ खोंडे

 आरक्षण ह्या विषयावर जेनझी आंदोलन करणार नाही. हे फुट पाडण्यासाठी पिलू सोडले आहे , त्याला कोणीही बळी पडू नका.   


The Supreme  Court on Tuesday directed that no coercive action be taken against students who participated in the nationwide protests over the NEET 2026 paper leak and other alleged irregularities, provided they have no criminal antecedents, and ordered the immediate release of all minors arrested or detained during the protests.

The Bench of Chief Justice of India (CJI) Surya Kant, Justice Joymalya Bagchi and Justice V Mohana clarified that the interim protection would not extend to persons with criminal antecedents                                                                    Facial Recognition System चा दणका. मायनर लोक वाचले हेच नशीब आहे. कायदाबाह्य कारवाई करणाऱ्या पोलिसांची सुद्धा चौकशी होणार आहे.  आंदोलकांनी ह्या कारवाईचे स्वागत केले पाहिजे कारण हे गुन्हेगार त्यांच्यातले नाहीत  असे आंदोलकांच्याच  नेत्यांनी सांगितले होते.   


In reply to by अप्पा जोगळेकर

दणका वगैरे काही नाही. ज्यांनी भूतकाळांत गुन्हे केलेले नाहीत त्याच्या विरुद्द काहीही action घेऊ नये असा साधा सोपा सरळ आदेश आहे. ह्या आंदोलनात सामील झालेल्या कुणालाही शिक्षा होणार नाही. करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा गोबीचे लोणचे घालण्यात येईल. त्यामुळे सध्या तरी पुच्छ ते मुरडिलें वङ्क्षण केले गेले आहे. एकदा सर्व काही सुम मध्ये आल्यानंतर बघू असे धोरण आहे.

एकूण गोबीच्या चिलखतात भोके कुठे आहेत हे सर्वाना दिसून आले आहे त्यामुळे आणखीन आंदोलने वगैरे होतील.

 


In reply to by साहना

दिल बहलाने के लिये खयाल अच्छा है गालिब हे नुकतेच कोणीतरी  लिहिले होते इथेच    


In reply to by अप्पा जोगळेकर

हे वाक्य तुम्हालाच कुरवाळत बसण्याची गरज आहे ! 


In reply to by अप्पा जोगळेकर

बांबू परेडला न्यायालयाने दाखवला हिरवा कंदील

 

भारतीय नागरिक तर सोडाच, स्वतःच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या जीवाचेही रक्षण ना करणारा संघ-भाजप, पोलीस व रक्षक दलांच्या सन्मानाचे रक्षण करेल असे खरंच वाटते तुम्हाला? सिरिअसली? 


In reply to by कांदा लिंबू

इथे सन्मानाचे  रक्षण वगैरे मुद्दे नंतर येतात. एकदा FIR झाली की त्याचा पाठपुरावा करावा लागतो, पोलीस दलासाठी हि एक डोकेदुखी असते आणि त्या डोकेदुखीची पुरेपूर किंमत वसूल केली जाते  हे व्यवहारात नेहमी पाहायला मिळते. जर बांबू परेडची अजिबात भीती नाहीये तर आंदोलक FIR मागे घेण्याचा हट्ट का धरत आहेत. 


In reply to by अप्पा जोगळेकर

मोदींविरोधात अत्यंत किळसवाणे गलिच्छ बोलणाऱ्या रूचिका सिंह विरोधात पोलिसांनी झिरो एफ आय आर दाखल केलाय.


भाजपात ये नाहीतर तुझ्या आई वडिलाना बघून घेऊ, अशी धमकी आलेली:- दिपके ह्यांच्या आई.

https://www.instagram.com/reel/DbX2W1ptD2T/?igsh=MW1qaHkycnljeXJydg==


In reply to by अवार्ड अंशूमन

ऑफर चांगली आहे. भाजपांत जाऊन आपली पोळी गरम करून घेणे शक्य आहे. वर हीच भक्तमंडळी दिपके ह्यांचे भजन गाण्यास सुरु करेल ! 


In reply to by साहना

ह्यांचे मूळ कॅडर उरले सतरंज्या उचलण्यासाठी अन् कालपर्यंत परिणितीचा पती अन् विदेशी एजंट असलेला राघव चढ्ढा चालतो नवीन विकत आणलेला मालक म्हणून


In reply to by अवार्ड अंशूमन

अवार्ड अंशुमन,

 

तुम्ही दिलेलं चलचित्रं खरं असेल तर घटना गंभीर आहे. झुरळपक्षी आंदोलनात गुंड घुसले त्यांना सरळ करणं गरजेचं आहे. त्यासाठी पोलीस सक्षम आहेत. पण पोलिसांनी निरपराध्यांचं अपहरण केलं तर मामला कठीण आहे. जनतेत अत्यंत चुकीचा संदेश जातो आहे. मोदींना असलेली सहानुभूती झटक्यांत कमी होऊ शकते. पोलिसांत सुद्धा मोदीविरोधक लपून बसलेत की काय अशी शंका येते.

 

आ.न.,

-गा.पै.


गा. पै,  


पोलिसात मोदींविरोधात लोक आहेत, देशात मोदींविरोधात लोक आहेत, मिपावर लोक विरोधात आहेत, संसदेत लोक विरोधात आहेत, सोशल मीडियावर ट्रेंड्स मोदींच्या विरोधात आहेत, मुख्य प्रवाहातल्या माध्यमांच्या बाहेर जनता विरोधात आहे, अर्थव्यवस्थेच्या ढासळत्या आलेखामुळे तज्ज्ञ विरोधात आहेत, आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर तरुणही विरोधात आहेत...


पण काळजी करू नका, जोपर्यंत अंधभक्त सोबत आहेत, तोपर्यंत मोदींना कसलाही धोका नाही. गोबरपुराणातल्या श्लोकात स्पष्ट म्हटलं आहे. 


यत्र गोदी चॅनेलं तत्र अंधभक्तो धनुर्धरः ।
 तत्र सत्ताजयो भूतिर्ध्रुवा मोदीमतिर्मम ॥

 

=))

 

-दिलीप बिरुटे

 

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ज्या ठिकाणी गोदी चॅनेल (आणि मीडिया) आहेत आणि ज्याप्रमाणे अर्जुनासारखे निष्ठावान अंधभक्त त्यांचे मुख्य 'धनुर्धर' (योद्धा) म्हणून सोबत आहेत, त्या ठिकाणी सत्तेचा विजय, वैभव आणि मोदींची सत्ता कायम राहील, अशी माझी ठाम मती (बुद्धी/विश्वास) आहे.

=)) 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यत्र रमन्ते मोदी-आलोचकाः, तत्र रमन्ते मोदी-अन्धभक्ताः 


काय वाटेल ते म्हणा. आयेगा तो मोदीही 😀

तसेही सगळ्यांच्या नाकावर टिच्चून ब्राम्हण आणि RSS वाला शिक्षणमंत्री आणला आहेच. भारीच एकदम. 

RSS आणि BJP बद्दल एवढी जळजळ म्हणजे परवाच्या प बंगालच्या निकालानंतर घरातल्या नळाला  Gelusil चे कनेक्शन घेतले असेल ना. 😁

बादवे दिपके अतिशय भंपक माणूस आहे. त्याला वाटंतय सिंघम पिक्चर मधल्यासारखं FIR फाडली की झालं. अडगं कुठलं. 
 

 

 


In reply to by पद्माक्षी

तसेही सगळ्यांच्या नाकावर टिच्चून ब्राम्हण आणि RSS वाला शिक्षणमंत्री आणला आहेच. भारीच एकदम. 

 

संपूर्ण आंदोलन हे नीट परीक्षेतील भ्रष्टाचार ह्यावर होते. परीक्षेंत भ्रष्टचार झाला, गोबीजींनी मान्य केले. परीक्षा पद्धती पूर्णपणे बदललली गेली.

आंदोलन काही जातीवरून झाले नाही. दिपके ह्यांनी स्वतःला लीडर केले किंवा वांगचुक ह्यांनी आपले अण्णात्व जागृत केले तरी दोघांनीही आपल्या जातीचा बाऊ केला नाही.  धर्मेंद्र प्रधान ह्यांच्या जातीचा सुद्धा कुठीही विषय आला नाही. (मला सुद्धा त्यांची जात ठाऊक नाही).

आता अचानक भक्तमंडळी आणि संतरंजी सेवकांना दिपके, प्रधान किंवा जोशी ह्यांची जात विषय करावासा वाटतो.

म्हणे "ब्राम्हण मंत्री नेमला" कुणावर उपकार केला ? ब्राम्हण असो व दलित, शेवटी क्षमता महत्वाची. धर्मेंद्र प्रधान ह्यांच्याच पद्धतीने जोशी सुद्धा एक अप्रकाशी लघुग्रह आहेत ह्यांचे संपूर्ण राजकीय अस्तित्व गोबी आणि तडीपार ह्यांच्यावर अवलंबून आहे. आणि त्यांच्याकडून विशेष अपेक्षा सुद्धा नसावी म्हणून काँग्रेस धार्जिणे नंदन निलकेनी ह्यांना आता नीट निस्तरायची जबाबदारी दिली आहे.


अचानक "हिंदू सारा एक" म्हणणाऱ्या हिंदुत्ववादींना आता अचानक अश्या लोकांची जात वर काढावीशी वाटते ज्यांनी आपल्या जातीचा बाऊ नाही केला. ह्यांतून हिंदुत्व सुद्धा ढोंग होते असे वाटते. 
 

 

 


In reply to by पद्माक्षी

काय वाटेल ते म्हणा. आयेगा तो मोदीही 😀 

इतका तर मोदी एक्साईट नसेल जितके हे प्रभृती ! अर्थात मोदी जाऊन इतर कोणी आला तर ह्यांनी दहा पंधरा वीस वर्षे केलेेली अश्लाघ्य बडबड, धार्मिक, जातीय इत्यादी तेढ निर्माण करणारी वक्तव्ये ह्यांचा हिशोब हाच भारत देश ह्यांना मागणार आहे, आणि त्याचीच ह्यांना आत्तापासून भीती पडली आहे. 

 

तसेही सगळ्यांच्या नाकावर टिच्चून ब्राम्हण आणि RSS वाला शिक्षणमंत्री आणला आहेच. भारीच एकदम. 

म्हणजे एकंदरीत ब्राह्मणाचे भले झाल्याचा आनंद आहे, मला वाटले होते हिंदूंसाठी चाललं आहे हे सगळं, गझवा ए हिंद , मुसलमान आक्रमण, अमेरिकेला दाबणे इत्यादीसाठी सरकार निवडले होते असा माझा समज. 

 

RSS आणि BJP बद्दल एवढी जळजळ म्हणजे परवाच्या प बंगालच्या निकालानंतर घरातल्या नळाला Gelusil चे कनेक्शन घेतले असेल ना. 😁 

दिपकेने म्हणे असेच कैक लोकांच्या वरण भात तूप मीठ लिंबात जमालगोटा मिसळल्यामुळे ज्या सरकारबद्दल राजनाथ सिंह "इस सरकार मे इस्तिफे नहीं होते" म्हणायचा त्यांना आई बहीण शिव्या खाऊन मंत्री घरी बसवावा लागला ! 

 

बादवे दिपके अतिशय भंपक माणूस आहे. त्याला वाटंतय सिंघम पिक्चर मधल्यासारखं FIR फाडली की झालं. अडगं कुठलं. 

शत्रूच समजा पण कोणालाही अतिशय क्षुल्लक समजण्याची अन् समजून सगळे आलबेल असण्याची ही जी भक्तांची दिवाभित वृत्ती आहे तिच्या मुळेच आज विश्वगुरूंना "मा फ्रेंझ" करत इंस्टाग्राम रील बनवावी लागली होती. हा काय भंपक, तो काय चू**, तिसरा काय तसलाच, चौथा काय असलाच, हे जे "दिल बहलाने के लिए" चालू आहे त्याने मोदींना त्रास होतो बरं ! बघा लक्षात आले तर ! नाहीतर सरकारी मूर्खपणा पण जागीच आहे, मोदी पण आहेत, इंस्टाग्राम पण आहे अन् आंदोलने पण आहेत.


एकंदर मायबोलीची शिवराळ आणि ग्राम्य भाषा आणि टोकाचा संताप आणि चिडचिड मिपावर प्रस्थापित होऊ लागली आहे असे दिसते.

 

तात्त्याच्या भाषेत पण शिव्या असत पण त्या वैयक्तिक पातळीवर उतरलेल्या नव्हत्या.

एखाद्या लहान मुलाने नागडे वावरावे तशा सहज होत्या. 

आणि आता  

 

एखाद्या अर्धवृत्त वेश्येने उत्तान नृत्य करावे तशा हिडिस वाटतात.

असो

कालाय तस्मै नमः       


In reply to by सुबोध खरे

आपापली फँटसी ह्या फ्रॉयडीयन पद्धतीने बाहेर येत आहे ! कुणाला आपल्याच मुलीला लाथाबुक्क्यांनी मारण्याची मनीषा तर कुणाला वेश्येचे उत्तान नृत्य वगैरे. Anyways whatever that works for you ! 


In reply to by साहना

मी फक्त मिपाच्या भाषेबद्दल बोलत होतो. 

 

फ्रॉइड आणि फँटसी याचा दुरान्वयेही  संबंध नव्हता. 

 

जे तुमच्या डोक्यात आहे त्याच्यावर आमचे काही नियंत्रण नाही.

कुन्थायचं तर कुन्था.     


In reply to by साहना

अगदी बरोबर आपापली फँटसी ह्या फ्रॉयडीयन पद्धतीने बाहेर येत आहे ! ,

काहीही खालच्या पातळीवरील उदाहरणे कशी काय टंकतात कोण जाणे?? प्रकॄती बदलणे हे केवळ कर्त्याच्या हातात असते.असो.


In reply to by सुबोध खरे

बाडिस.

 

सलग २४+ वर्षे आटोकाट प्रयत्न करूनही, वेगवेगळे असंख्य आरोप करूनही, लोकांना पेटवूनही, जनतेवर असत्याचा वर्षाव करूनही   .  .  .  मोदींवर विजय मिळविता येत नाही. यामुळे आलेल्या आत्यंतिक नैराश्यातून व वैफल्यातून आता शेवटी वैयक्तिक अवमानकारक अर्वाच्य शिवीगाळ सुरू केली आहे. 

 

अर्थात त्यातून यांना शष्प लाभ मिळणार नाही व मोदींनाच लाभ मिळेल. 


In reply to by श्रीगुरुजी

मोदींवर विजय मिळविता येत नाही. यामुळे आलेल्या आत्यंतिक नैराश्यातून व वैफल्यातून आता शेवटी वैयक्तिक अवमानकारक अर्वाच्य शिवीगाळ सुरू केली आहे. 

 

 

कोणी मोदींना अर्वाच्य शिवीगाळ केली आहे ? अन् कुठे, तुमच्या सिजेपी दुःखाचे कढ इथे काढू नका. मोदींना शेठ, किंवा मोदी युगाला गोबरयुग म्हणणे अर्वाच्य आहे ?

 

आणि डॉक्टर, इतर संस्थळांची धुणी इथे आणून धुण्याचे प्रयोजन कळेना तुमचे. एका विविक्षित संस्थळावर मी पण नाही, तिथल्या काही गोष्टी अन् परदेशस्थ माज मला खपत नाही पण म्हणून मी इथे येऊन गड्या आपण कसे भारी देशी माणसे आहोत अन् आपली चुलीवरची मिसळच्च कशी बरी आहे हे रडगाणे रडत नाही. 

 

तुमच्या सारख्या अनुभवसमृद्ध अन् दुनियादारी बघून असलेल्या माणसांकडून तरी ही अपेक्षा नव्हती.

 

 उरता उरला भाषेचा प्रश्न, मिसळपाव हे खासगी संस्थळ आहे हे वेळो वेळी स्पष्ट झाले आहे. एकेकाळी मिसळपाववर काँग्रेससाठी जी अन् जशी भाषा वापरल्या गेल्या आहेत ते त्याकाळी मालकांना मान्य होतेच न ? आज जी भाषा आहे ती पण मालकांना apparently मंजूर आहेच. तुम्हाला त्याकाळी भाषा आवडत होती कारण काँग्रेसला शिव्या बसत होत्या आज तुम्हाला कळ लागते आहे कारण मोदीला बोलतायत. 

 

त्यामुळे मिसळपाव वर अनादी काळापासून लागू नियम तुम्ही स्वतःला लागू करून घेणे ही नम्र विनंती. आहे हे असे आहे, लॉजिक असेल बोलायचे असेल तर चार देणे सोबत चार घेणे शिका नसेल जमत तर पिशवीत चपला घालण्याचा ऑप्शन तुम्हाला/ मला सगळ्यांनाच आहे उपलब्ध.

 

तुम्हाला भाषा आवडत नसेल तर सोडून जावा की मिसळपाव. एकंदरीत वेश्येची उदाहरणे देऊन लोकांना गिल्ट ट्रिपिंग देण्याचा प्रकार बंद करावा आपण ही नम्र विनंती.


In reply to by वृषभ खोंडे

हायला

इतर संस्थळाचे धुणे इथे कुठे धुतलंय. इथलय भाषेची पातळी मायबोलीसारखी झाली आहे  हे मी फक्त विधान केलंय.    

ज्याने जशी भाषा वापरायची तशी वापरावी.

संस्थळ काही मला आंदण म्हणून मिळालेले नाही.

मी कधीही कोणाही बद्दल संपादक मंडळाला तक्रार केलेली नाही.

येथे माझ्याबद्दल केलेल्या टिप्पणी बद्दल मालकांना आजतागायत तक्रार केली नाही.

आणि मी कोणतीही डू आय डी / छद्म किंवा टोपण नावाने अडून्स हरसंधान केलेलं नाही.

जे आहे ते समोर स्पष्ट खुल्लम खुलला आहे.

तुमचा पापड का मोडला?         


In reply to by सुबोध खरे

 तोतयाच्या आडून वेगळाच सदस्य दुगाण्या झाडतोय.


In reply to by श्रीगुरुजी

बोलायला काही नसले की एक दुसऱ्याच्या री ओढायला हा त्याचा डू आयडी, ती ह्याचा आयडी असली निरर्थक राळ उठवली का मूळ मुद्द्यावर बोलण्यापासून सुटका मिळते ! कोणी फ्रॉइड थिअरी काढली का ते कुंथन अन् आपण काही न सुचून लोकांचे आयडी इत्यादी निरर्थक चर्चा केली का ते बुद्धिवादी मंथन, हेच तुमचे आयटी सेल पब्लिकचे दुटप्पी वागणे !