कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. पहिल्या भागात मिपाकरांनी शांततेच्या मार्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या. नीट परीक्षेचे पेपर लीक होणे आणि तत्त्सम घोटाळ्याविरुद्ध दिल्ली येथे जंतरमंतरवर सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टी या युवकांच्या सामाजिक चळवळीने केंद्रसरकारमधील शिक्षणमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु केले आहे. वीस तारखेला संसदेवर निघालेल्या मोर्चा अडवून विद्यार्थ्यांना, युवतींना महिला पालकांना जी अमानुष मारहाण केल्या गेली त्या क्र्रुरतेचे आणि कौर्याचे असंख्य व्हीडीयो सामाजिक माध्यमांवर दिसत आहेत. 'बेटी बचाओ,बेटी पढावो' म्हणना-यांनी लेकी बाळींचा केलेला अपमान, डोकी फोडणे, जायबंदी करणे 'अमानुष मारहाण' असेच वर्णन वीस जुलैच्या घटनेचे वर्णन करावे लागते. संसदेवर जाणा-या या मोर्चाला लाठीमाराशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता ? प्रश्न विचारता येईल आणि चर्चाही करता येईल. सोनम वांगचुंग यांना उपचाराच्या निमित्ताने जबरदस्तीने उचलून आंदोलन मोडता येते काय, असा प्रयत्न सरकारने करुन पाहिला, मारहाण करुन युवकांना पळवून लावण्याचा प्रयत्न झाला. मुलं घाबरुन जातील आणि आंदोलन स्थळांवरुन पळून जातील असे सरकारला वाटले असावे, पण असे काही झाले नाही. उलट, आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे.
दुसरीकडे, मन की बाता कराव्यात तशा आणि त्या टाइपच्या गप्पा सुरुच आहेत. '' पेपरफुटी हे घोर पापआहे. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली असून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र काम केले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 'एनडीए' संसदीय पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले'' मात्र, केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आंदोलकांच्या मागणीबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती. सीजेपीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नड्डा यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले असले तरी त्यावरही केंद्र सरकारने मंगळवारी मौन बाळगले.
आता सध्या कालच्या घडामोडीत जंतर-मंतरवरील आंदोलनाची तीव्रता कमालीची वाढलेली पाहता, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलकांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येऊ लागले आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली आहे. एकाच वेळी आंदोलन आणि विरोधकांचा चहूबाजूंचा हल्लाबोल, लोकसभा आणि राज्यसभेतला गोंधळ पाहता, केंद्र सरकारची बुधवारी कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले. महिनाभर संवाद टाळणाऱ्या केंद्र सरकारने अखेर आंदोलकांशी गंभीर चर्चा सुरू केली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
सरकारविरोधात आम्ही पुन्हा मोर्चा काढणार नाही आणि जंतर-मंतरवरून हलणार नाही. आता केंद्र सरकारने जंतर-मंतरवर येऊन चर्चा करावी किंवा तटस्थ स्थळी बैठक घ्यावी, असे कॉक्रोच जनता पार्टी'ने (सीजीपी) बुधवारी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई, आणि कोणतीही फौजदारी कारवाई केली जाऊ नये, या तीनही मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे 'सीजीपी'च्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे स्पष्ट केले.
''गेल्या दहा वर्षांत देशभरात १५२ परीक्षा पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, त्याचा जबरदस्त फटका सुमारे ७.५ कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांना सहन करावा लागला आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी इंदिरा भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला''
लेखनातील माहिती कंटेंट लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. सकाळ या छापील वृत्तपत्रातून चर्चेसाठी घेतले आहे. तर, मिपाकर हो शांततेच्या मार्गाने आपापली मतं मांडत राहू या..
कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. (भाग दोन )
वाचने
7512
प्रतिक्रिया
309
मिसळपाव
प्रतिक्रिया
जंतर मांतर येथे पोलिसांनी…
जंतर मांतर येथे पोलिसांनी facial recognition system deploy केली आहे. 2000 लोकांना identify केले आहे असे अधिकाृत आकडा आहे.IMSI catcher device सुद्धा लावले आहे अशा बातमी होती खरे खोटे माहिती नाही. पण हे खरे असेल तर पोलिस कात्रजचा घाट दाखवतील. कारण हे device असेल तर फोन number, sim number आणि शेवटी address सगळे काढले जाईल. म्हणजे इकडे मागण्या मान्य झाल्या आणि तिकडे पारपत्र अर्ज फेटाळला,FIR दाखल झाली, खाजगी फर्म ने BV मधे हाकलून दिले तर आनंद साजरा करायचा की दुःख हे प्रत्येकाने आपल्या वकुबानुसार ठरवावे.दादरच्या दोन मूुलीना identify करून समज दिली आहे असे त्या मूुलीनी सांंगीतल्या चे व्हिडिओ होते. उत्तराखांडच्या गावातल्या काही जणांना सुद्धा detain केले. राहत्य ठिकाणी आजूबाजूला कुठेही गुंन्हा घडला,riot सदृश काही झाले की पोलिस ह्या रिेकॉर्ड वरच्या लोकांना आधी आत घेतात. त्यावेळी पोलिसांना आम्ही जेन झी आहोत, आम्ही कोणाला घाबरत नाही असे सांगायचे की आंदोलन करणाऱ्या नेत्यांना फोन करून आम्हाला सोडवा म्हणून विनवण्या कारायच्या हा विचार सुद्धा आंदोलकांनी आताच करून ठेवावा. राजकीय कार्यकर्ते सुद्धा हे प्रकार झेलतात, पाश्चात्ताप करतात पण त्यांना निदान आयुष्यभर आंदोलने, पोलिस केस,माोर्चा हेच कारायचं असते. इथे आंदोलक स्वतः विद्यार्थी म्हणूवून घेत आहेत त्यांना हे झेपेल का नाही माहिती नाही. कंदाचित ह्या समस्येवर सुद्धा जेन झी la काहीही जमू शकते असे सांगितले जाईल.
Fear mongering करू नये !
In reply to जंतर मांतर येथे पोलिसांनी… by अप्पा जोगळेकर
तुम्ही पोलिस स्टेशन वर भरपूर चकरा मारल्या असत्या तर हे असले तर्कट न लिहिते आप्पा ! ह्यात स्टेप बाय स्टेप चिरफाड होऊ शकते, पण ती थोड्या वेळाने !
तूर्तास गुरुजी काय ज्ञान पेटी उघडतात ते पाहतो.
रेकॉर्ड वर असलेल्या लोकांना…
In reply to Fear mongering करू नये ! by वृषभ खोंडे
रेकॉर्ड वर असलेल्या लोकांना ही भीती नाहीये.
थोडीशी कायदेशीर अक्कल असल्यास
In reply to रेकॉर्ड वर असलेल्या लोकांना… by अप्पा जोगळेकर
ही भीती कोणालाच असणार नाही ! त्यासाठी सगळेच रेकॉर्डवर जाणे गरजेचे नसते, परत सांगतो fear mongering करू नये.
अरे बापरे! मग त्यातून…
In reply to जंतर मांतर येथे पोलिसांनी… by अप्पा जोगळेकर
अरे बापरे! मग त्यातून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी याहूनही मोठं आंदोलन व्हायचं.
जंतर मांतर येथे पोलिसांनी…
In reply to जंतर मांतर येथे पोलिसांनी… by अप्पा जोगळेकर
जंतर मांतर येथे पोलिसांनी facial recognition system deploy केली आहे. 2000 लोकांना identify केले आहे असे अधिकाृत आकडा आहे.
FRS system कशी काम करते हे सांगा अगोदर. फेस मॅच करायला आधी फेस डेटाबेसेस मध्ये असायला हवा. तो असतो पोलिसांकडे हिस्टरी शीटर जनतेचा. त्यांना शा* काय फरक पडत नाही.
IMSI catcher device सुद्धा लावले आहे अशा बातमी होती खरे खोटे माहिती नाही.
माहिती नाही/ verified नाही ते मांडून भीती पसरवण्याचे पाप का डोक्यावर घेता ? किमान IMSI catcher काम कसे करते त्याची माहिती गुगलून तरी पाहायची राजे. IMSI खूप cliche तंत्रज्ञान असून ते असे लॉ अँड ऑर्डरला सुद्धा वाटेल तसे वापरत नाहीत.
पण हे खरे असेल तर पोलिस कात्रजचा घाट दाखवतील. कारण हे device असेल तर फोन number, sim number आणि शेवटी address सगळे काढले जाईल.
कसा ? तो सांगा , राजे तुमच्या आमच्या देशात फुटपाथ वर छत्र्या लावून सिमकार्ड विकणारी एअरटेल अन् जियोची पोरे बायोमेट्रिक verification करू शकतात पण पोलिसांना ते allowed नाहीये, आधार ऍक्टचा अभ्यास करा
म्हणजे इकडे मागण्या मान्य झाल्या आणि तिकडे पारपत्र अर्ज फेटाळला,FIR दाखल झाली, खाजगी फर्म ने BV मधे हाकलून दिले तर आनंद साजरा करायचा की दुःख हे प्रत्येकाने आपल्या वकुबानुसार ठरवावे.
FIR, non-cognizable offence (अदखलपात्र गुन्हा), बाँड, स्टेटमेंट इतकी माहिती घ्या. तूर्तास तुमच्या वकुबात ह्याची गरज आहे 😂🙏🏾
अंगाशी येणार सरकारच्या …
अंगाशी येणार सरकारच्या .
आता चंद्राबाबू आणि निरतांश कुमार टेंशन मध्ये आले आहेत.
तृणमूल (२०) व शिल्लक…
In reply to अंगाशी येणार सरकारच्या … by आग्या१९९०
तृणमूल (२०) व शिल्लक शिउबाठा (६) विभागातून आधीच तरतूद करून ठेवली आहे. गरज भासल्यास ट्रोजन अश्व (८) हाताशी आहेतच जे परवाच मोदींची भेट घेऊन आले. चंद्राबाबू व नितीशचे २८ गेले तर ३४ ची तरतूद आहे.
हार्दिक पटेल, कन्हैया कुमार…
हार्दिक पटेल, कन्हैया कुमार प्रमाणे आता अभिजीत दिपकेला सुद्धा विविध पक्षांकडून आमंत्रण येईल. यातून रागा व प्रिव काहिसे मागे पडल्यासारखे भासतात. श्रीराम मंदिर देणग्या चौर्य प्रकरणही मागील शेगडीवर गेल्यासारखे भासतेय.
कोणाला कशाचं बोडकीला केसाचं
In reply to हार्दिक पटेल, कन्हैया कुमार… by श्रीगुरुजी
कोणाला कशाचं बोडकीला केसाचं
हार्दिक पटेल ?
In reply to हार्दिक पटेल, कन्हैया कुमार… by श्रीगुरुजी
म्हणजे ज्याची ती सीडी वगैरे लीक झाली होती (मायला इथे बी लीक) त्यो काय ? अर्र भारतीय जनता पार्टी चे तरुण तुर्क आमदार आहेत नाही का आता ते विरमगाम मतदारसंघातून ?
प्रश्न हा आहे विविध पक्षांकडून आमंत्रण आलेला अन् त्यातील एक आमंत्रण स्वीकारून काँग्रेस मध्ये गेलेला हार्दिक पटेल गुजरात भाजपने पक्षात घेऊन आमदार केला कसा ? का इतर पक्षांनी आमंत्रण देणे चुकीचे अन् तुमच्या पक्षात आले की पवित्र का काय? भाजपने वेगळेपणाचा अंगरखा तर झुलवूच नये आता जनता टर टर फाडणार तो ! काँग्रेसने उष्टावून सोडलेला विरोधात असणारा पाटीदार आंदोलन प्रणेता पण चालतो ह्यांना सत्तेत रहायसाठी

सगळेच विकाऊ आहेत (काही अपवाद…
In reply to हार्दिक पटेल ? by वृषभ खोंडे
सगळेच विकाऊ आहेत (काही अपवाद वगळता).
मखलाशी करू नका
In reply to सगळेच विकाऊ आहेत (काही अपवाद… by श्रीगुरुजी
माझा प्रश्न अतिशय स्पष्ट आहे, अपवाद सोडता सर्व विक्रीस उपलब्ध आहेत वगैरे ठीक आहे घेणाऱ्या मध्ये तुमचा जीव का प्राण असणारी पार्टी का आहे ? त्याचे उत्तर द्या !
नुसतं श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय असली फर्लांग भर लांबडी नावे घेऊन काही होत नसते पार्टी विथ ए डिफरन्स इत्यादी धूळफेक डोळ्यात करणे बंद करा, ये पब्लिक है ये सब जानती है
नवीन शिक्षणमंत्री कदाचित…
नवीन शिक्षणमंत्री कदाचित फडणवीस असतील. कळेलच लवकर.
मराठी माणूस वर जावा म्हणून शुभेच्छा
In reply to नवीन शिक्षणमंत्री कदाचित… by श्रीगुरुजी
बाकी बामनाचा माणूस वर जातोय म्हणून कैक लोकांच्या पोटात पण दुखेलच! 😂
व्वा
In reply to नवीन शिक्षणमंत्री कदाचित… by श्रीगुरुजी
फ्रांडअंकल नी स्वतः कडे ठेवावे खाते अशी फार इच्छा आहे.
एकतर त्यांना आवड आहे. रोज वर्ग भरेल. लोक सर म्हणतील.
गुरुपद आधीपासून घेतले आहे. बाकी सगळे सोडावे जेन झी आणि अल्फा शिक्षणाचे व्रत घ्यावे.
.
महत्वाचे म्हणजे आगामी आंदोलन सोयीचे होईल.
जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद.
- राहत इंदोरी साहब का शेर अर्ज है
अगर ख़िलाफ़ हैं होने दो, जान थोड़ी है
यह सब धुआँ है, कोई आसमान थोड़ी है।
लगेगी आग तो आएँगे घर कई ज़द में
यहाँ पे सिर्फ़ हमारा मकान थोड़ी है।
सभी का ख़ून है शामिल यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है!
पोरं लढली, पोरं जिंकली खूपच आनंद झाला.
आता पोरांवरचे सर्व गुन्हे मागे घेतले पाहिजेत.
नवे मंत्री, नवे कायदे काय काय बदल होतील ते कळेलच.
येतो आता निवांत.....लोकशाही जिंदाबाद, युवाशक्ती जिंदाबाद...
-दिलीप बिरुटे
चला बरं झालं
चला बरं झालं आंदोलन एकदाचं संपलं.
नुसतं आंदोलन नाही . गोदी…
In reply to चला बरं झालं by धर्मराजमुटके
नुसतं आंदोलन नाही . गोदी मिडीया , आयटी सेल आणि येथील अंकल पार्टी सुद्धा संपली. आणि हो सामान्य माणसाला सरकाराची दहशतीही भीती वाटत होती ती पण संपली. कंगनाच्या भाषेत सांगायचं झालं तर आज देशाला स्वातंत्र्य मिळाले.
आता पोरांवरचे सर्व गुन्हे…
आता पोरांवरचे सर्व गुन्हे मागे घेतले पाहिजेत.
ज्यांनी पोलिसांना बेदम मारहाण केली त्यांचे पण गुन्हे मागे घ्यायचे का?
पोलिसांना मूलभूत हक्क मानवी हक्क वगैरे नाहीत का?
एखादद्या पोलिसाने आपल्या मानवी हक्काबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली तर काय करायचं?
शांत गदाधारी अंकल शांत…
In reply to आता पोरांवरचे सर्व गुन्हे… by सुबोध खरे
शांत गदाधारी अंकल शांत. दिर्घ श्वास घ्या बरं .
नानामाझ्या प्रश्नांची उत्तर…
In reply to शांत गदाधारी अंकल शांत… by आग्या१९९०
नाना
माझ्या प्रश्नांची उत्तर आहेत का तुमच्या कडे?
मी शांतच आहे आणि थंडही आहे.
चिडून उगाच कुणाच्यावर पातळी सोडून टीका वगैरे करत नाही.
नाही.पण निकाल तुमच्या…
In reply to नानामाझ्या प्रश्नांची उत्तर… by सुबोध खरे
नाही.
पण निकाल तुमच्या मनासारखे लागतील.
आंदोलन समाप्त झाले आहे. आता…
In reply to आता पोरांवरचे सर्व गुन्हे… by सुबोध खरे
आंदोलन समाप्त झाले आहे. आता कोणत्याही मागणीला सरकार शष्प किंमत देणार नाही. गुन्हे मागे घ्या, आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबाला एक कोटी द्या, मोदींनी माफी मागितली पाहिजे इ. मागण्यासुद्धा संपल्या. आंदोलनातील मूळ महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षून केवळ प्रधानांच्या मंत्रीपद त्यागावर संपूर्ण लक्ष दिल्याने ते वगळता काहीही हातात आले नाही.
अभिजीत दिपकेला व्यक्तिगत लाभ मिळेल. अमेरिकेत नोकरी मिळत नव्हती. पण आता विविध पक्षांकडून आमंत्रण येईल व हार्दिक पटेल, कन्हैया कुमार यांच्यासारखा अल्पकालीन लाभ मिळेल.
हार्दिक पटेल
In reply to आंदोलन समाप्त झाले आहे. आता… by श्रीगुरुजी
सिटिंग आमदार आहे, शॉर्ट टर्म फायदा हा ? तुमच्या करावर काँग्रेसने उष्टा करून सोडलेला अन् भाजपने फक्त सत्तलोलूप होऊन आमदार केलेला हा गडी जन्मभर पेन्शन खाणार !
गुन्हे मागे घेणे मान्य केलेच आहे
In reply to आंदोलन समाप्त झाले आहे. आता… by श्रीगुरुजी
गुन्हे मागे घेणे तर मान्य केलेच आहे आणि यापुढेही या आंदोलनाशी संबंधित कोणतेही नवीन गुन्हे नोंदले जाणार नाहीत हे ही मान्य केलंय असं प्रेस कॉन्फरन्स मध्ये सरकारने सांगितलं
तसेच आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबाला नियमांप्रमणे जास्तीत जास्त रक्कम देण्याचेही मान्य केले आहे.
हे लगेच हरखून गेले पण तिकडे सरकारने मान्य केल्याच सर्व तीन मागण्या
सोयीस्कर पोझिशनिंग
In reply to आता पोरांवरचे सर्व गुन्हे… by सुबोध खरे
कायदेशीर रित्या ज्यांच्यावरचे खटले मागे घेतले जाऊ शकतात ते स्पष्ट असते, जे लोक नॉन - काँग्निझॅबल ओफेन्स मध्ये आहेत ते सरळ सरळ सी समरी (क्लास सी समरी) करून टेबलावर सोडले जातात, कैक लोक प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बसल्या जागी सोडले जातात. ज्यांनी मारहाण इत्यादी बीएनएस २०२३ अंतर्गत नॉन बेलेबल ओफेन्स केले आहेत त्यांचे मात्र तपास रिपोर्ट, पंचनामे, अटक मेमो, जप्ती पंचनामे इत्यादी कारवाई सुरू होईल, पुढेमागे त्यांना पण सरकार पॉलिटिकल consideration मध्ये सी समरी फाईल करण्याचा आदेश देईल दिल्ली पोलिस कमिशनरला आणि ते पण सुटतील. आता इतकी सरळ ढळढळीत न्यायिक प्रक्रिया तुम्हाला माहिती नव्हती असे तर म्हणू नका सुबोध सर.
पण ठीक आहे
In reply to आता पोरांवरचे सर्व गुन्हे… by सुबोध खरे
आजवर किती केसेस पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात "माझे मानवी हक्क ऑन ड्यूटी हनन झाले आहेत" अशा स्वरूपाची पेटीशंस टाकली आहेत ते सांगून टाका सर जमल्यास.
पोलिसांचं माहिती नाही.पण मीच…
In reply to आता पोरांवरचे सर्व गुन्हे… by सुबोध खरे
पोलिसांचं माहिती नाही.
पण मीच टाकला होता मुंबई उच्च न्यायालयात.
मी उच्च न्यायालयात रीट अर्ज केला होता नोकरी सोडण्यासाठी. तीन वेळेला राजीनामा देऊनही सरकार तो मंजूर करत नव्हते म्हणून
सरकारने शपथ पत्र टाकले की लष्करातील माणसाला न्यायालयात जाण्याचा धिकार नही आणि त्याच्या अर्जाची सुनावणी करण्याचा न्यायालयाला अधिकारच नाही.
(This court does not have jurisdiction).
न्यायमूर्तींनी ते ऐकून केंद्र शासनाच्या वकिलाला सांगितले अम्ही ते वाचलंय.
तुम्हाला पुढे काही बोलायचंय का?
त्यांनी गपचूप पुढे प्रतिवाद करण्यास सुरवात केली!
पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेले. तेथे सुद्धा हाच प्रकार झाला होता.
न्यायालये जर लष्कराच्या बाबतीत ढवळाढवळ करू लागली तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असे त्यांनी शपथपत्र टाकले होते.
अर्थात न्यायालयाने तेही कानाआड टाकले.
असो हा विषय येथे नको!
राजीनामा? मोदी हरले, देश…
राजीनामा? मोदी हरले, देश जिंकला!
अभिजीत दिपके ह्यांची यथेच्छ…
अभिजीत दिपके ह्यांची यथेच्छ बदनामी भाजप आयटी सेल ने केली, पण दिपके झुकले नाहीत! त्यांनी मोदीना झुकवलं नी राजीनामा घ्यायला लावला धर्मेंद्र प्रधानाचा.
मोडेन पण वाकणार नाही, हा ताठा दाखवून दिपकेनी त्यांचा ताठ मराठी कणा दाखवला, नी अक्षरशः हुकुमशाही झुकवली!
दिपके ह्यांनी आंदोलन यशस्वी केले ह्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन! आज दिपके तरुणांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. त्यांनी ईडी, सीबीआय, पोलीस यंत्रणा, लाठीमार, दहशत हे सगळे निष्प्रभ्र ठरवले. जेन झी लाही मानावे लागेल, कुठल्याही हुकुमशाही , दहशत, लाठीमार ह्याला न घाबरता त्यांनी लढा दिला. एवढ्या दहशतीच्या काळात आंदोलन चालवून यशस्वी करून दाखवणे म्हणजे खरोखर मोठे काम आहे!
आंदोलन यशस्वी झाले.♥️
जय हिंद जय महाराष्ट्र!
पंजाबी 'शेतकऱ्यांचे' आंदोलन ....
In reply to अभिजीत दिपके ह्यांची यथेच्छ… by अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली,
यावरून पंजाबातल्या तथाकथित शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आठवण झाली. त्यावेळीही मोदींनी कायदे मागे घेतले. मोदी झुकले वगैरे गाजावाजा झाला. पण मोदींनी तेच कायदे मागील दराने गुपचूप पारित केले ( वा करायच्या बेतात आहे ) ( इंग्रजी लेख ) : https://www.newindianexpress.com/states/tamil-nadu/2025/Mar/17/centre-t…
सध्याच्या बाबतीत धर्मेंद्र प्रधानांच्या जागी जो येईल तो अधिक हिरीरीने नवं शैक्षणिक धोरण राबवणार.
आ.न.,
-गा.पै.
दीपके
In reply to पंजाबी 'शेतकऱ्यांचे' आंदोलन .... by गामा पैलवान
नवीन शिक्षण धोरणाच्या विरुद्ध पेटला होता का पेपर लीक मॅटर वरून धर्मेंद्र प्रधान वर ! ? उगाच काहीही टेप लावत सुटला आहात.
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कशासाठी?
In reply to दीपके by वृषभ खोंडे
वृषभ खोंडे,
आजवर असंख्य वेळा काँग्रेसी, बिगर काँग्रेसी आणि भाजपी सरकारांत प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. कोणीतरी कधीतरी मंत्र्याचा राजीनामा मागितला होता का? मग धर्मेंद्र प्रधानांना असं काय नेमकं सोनं लागलंय की त्यांच्या राजीनाम्यावर विरोधकं हाटून बसलीत?
नवं शैक्षणिक धोरण साम्यवाद्यांना अनुकूल नाही. म्हणून धप्रविरोधी आरडाओरडा चाललाय. उघडपणे बोंबलून दाखवता येत नाही. तिथे ग्यानबाची मेख आहे.
आ.न.,
-गा.पै.
हे म्हणजे, आज पर्यंत असंख्य…
In reply to धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कशासाठी? by गामा पैलवान
हे म्हणजे, आज पर्यंत असंख्य बलात्कार झाले होते निर्भया केसवेळीच बलात्काऱ्याना शिक्षा द्या म्हणून मोर्चे का काढले असे विचारण्यासारखे आहे.
गुन्हेगार कोण, शिक्षा कोणाला .... ?
In reply to हे म्हणजे, आज पर्यंत असंख्य… by अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली,
अहो, निर्भयाच्या वेळेस कोणी राजीनामा मागितला होता का सुशीलकुमार शिंद्यांचा?
आ.न.,
-गा.पै.
यावरून पंजाबातल्या तथाकथित…
In reply to पंजाबी 'शेतकऱ्यांचे' आंदोलन .... by गामा पैलवान
यावरून पंजाबातल्या तथाकथित शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आठवण झाली. त्यावेळीही मोदींनी कायदे मागे घेतले. मोदी झुकले वगैरे गाजावाजा झाला. पण मोदींनी तेच कायदे मागील दराने गुपचूप पारित केले ( वा करायच्या बेतात आहे >>>>
ते शेतकरीही पुन्हा आंदोलनच्या बेतात आहे, मोदी हुशार असतील हो पण लोक येडे नाहीयेत!
पंजाबी लोकं येडेच आहेत
In reply to यावरून पंजाबातल्या तथाकथित… by अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली,
पंजाबी लोकं येडेच आहेत. असं एक पंजाबीच बोलतोय. विजय सरदाना यांनी प्रत्येक वेळेस एकंच प्रश्न विचारला. प्रस्तावित शेतकरी कायद्यांतलं नेमकं कोणतं कलम शेतकऱ्यांच्या विरोधात आहे? उत्तर इल्ले. आजही तोच प्रश्न उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. अधिक माहितीसाठी हे २२ मिनिटांचं हिंदी चलचित्र पाहावे : https://www.youtube.com/watch?v=0LKBgvdr3JU
आ.न.,
-गा.पै.
सरकारला शेतकऱ्यांचे हित…
In reply to पंजाबी लोकं येडेच आहेत by गामा पैलवान
सरकारला शेतकऱ्यांचे हित करायचेच आहे आणि विरोधही नको असेल तर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी १००% लागू कराव्या. काँग्रेसला तोंडावर पाडण्याची चांगली संधी आहे.
काँग्रेसला तोंडावर पाडण्याची…
In reply to सरकारला शेतकऱ्यांचे हित… by आग्या१९९०
काँग्रेसला तोंडावर पाडण्याची चांगली संधी आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वावर १०० सलग पराभव झालेली संघटना आहे काँग्रेस. अजून काय तोंडावर पाडायचं बाकी आहे?
अजूनही राहुल गांधींच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवला तर पार गाळात जायला फार वेळ लागणार नाही.
देशपातळीवर सार्वत्रिक मान्यता असलेला तो एकमेव पक्ष उरला आहे.
पण गांधी घराण्यालाच कवटाळून बसल्यामुळे सत्तेत येणे तर दूरच राहिले प्रभावी विरोधी पक्ष बनण्याची शक्यता पण धूसर होत चालली आहे.
आणि जितकी त्यांच्या विजयाची शक्यता कमी होत जाईल तितके विरोधातील चांगले लोक अंधारात चाचपडण्यापेक्षा भाजपमध्ये जाणे पसंत करतील.
गेली काही वर्षे हेच होताना दिसते आहे. यामुळे भाजप जास्त शिरजोर होत जाईल आणि त्यांच्या मूळ तत्त्वांपासून फारकत होत जाईल.
यामुळे भाजपचे काँग्रेसीकरण पूर्ण होईल.
गेली काही वर्षे हेच होताना…
In reply to काँग्रेसला तोंडावर पाडण्याची… by सुबोध खरे
गेली काही वर्षे हेच होताना दिसते आहे. यामुळे भाजप जास्त शिरजोर होत जाईल आणि त्यांच्या मूळ तत्त्वांपासून फारकत होत जाईल.
धन्यवाद!
कांग्रेसचा उल्लेख मी मुद्दामून केला होता. तुमच्या कडून मुळ मुद्याला बगल देण्याची सवय आहे हे मला माहित आहे. त्यातून तुमच्या मुखातून सत्य वदवून घ्यायचे होते. हे सरकार कधीच शेतकऱ्यांचे हिताचे धोरण राबवणार नाही. कायम बळजबरीच करणार. तुम्हाला हे कळले ह्यात आनंद झाला.
येथे आमचेच चालणार.
शेतकऱ्यांचं अहित ?
In reply to गेली काही वर्षे हेच होताना… by आग्या१९९०
आग्या१९९०,
हे तुम्ही कशाच्या आधारे म्हणंत आहात? मी वर दिलेल्या विजय सरदानायांच्या मुलाखतीच्या दुव्यात त्यांनी आंदोलकांना एकंच प्रश्न विचारला आहे. तो म्हणजे शेतकऱ्यांच्या नुकसानीचं एक कलम दाखवून द्या.
हाच प्रश्न मी तुम्हांस परत विचारतो. कृपया शेतकऱ्यांच्या नुकसानीचं एक कलम दाखवून द्यावं.
आ.न.,
-गा.पै.
हं तर,
तर, प्रधानांनी राजीनामा दिला, आता येत असलेले तर त्यापुढील दिव्य व्हर्जन आहे. बाकी व्यवस्थेची चड्डी काढणा-यावर देश खुश आहे, जेन-झी पीढ़ी एवढ्यावर थांबणार नाहीच. पहिले यश आहे. काही विद्यार्थ्यांना सरकारच्या बाजूने बोलण्यासाठी आमिषंही दिल्या गेली म्हणे, पण पोरं त्याला बळी पडले नाहीत. जेन झीची भाषा आणि व्यक्त होणे यावर नवा लेख धागा काढावा वाटत आहे. जरासा व्यग्र आहे लिहायला येईनच.
-दिलीप बिरुटे
(व्यग्र)
पण पोरं त्याला बळी पडले…
In reply to हं तर, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण पोरं त्याला बळी पडले नाहीत.
असा एक व्हीडीओ मी बघितला होता. तीन ते पाच मिनिटांच्या एका रिलसाठी 20,000 रु. अशी ऑफर होती.
कृपया हा प्रतिसाद प्रा . डॉ. दिलीप बिरुटे सरांना दिला आहे. दुसरे कोणी नाकातले केस दाखवत लिंक मागू नका .
काही विद्यार्थ्यांना…
काही विद्यार्थ्यांना सरकारच्या बाजूने बोलण्यासाठी आमिषंही दिल्या गेली म्हणे,
काय बिरुटे मास्तर?
एवढी शेंडी लावायची? लोकांच्या बुद्धीला इतके कम अस्सल केंव्हा पासून समजायला लागलात?
ज्यांच्याकडे आख्ख्या सरकारच्या चाव्या आहेत, अभाविप सारखी पूर्ण संघटना त्यांच्या साठी काम करत आहे ते काही विद्यार्थ्यांसाठी आवस मागतील?
सूर्य काजव्याकडे प्रकाश उसना मागतो का कधी?
डॉक्टर...
In reply to काही विद्यार्थ्यांना… by सुबोध खरे
डॉक्टर, दुर्दैवाने 2014 पासून लोकांच्या बुद्धीला गंज चढला आणि डोळ्यावर मोतीबिंदूचं प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे समाजात काय चालले दिसत नाही. अभाविपची एखादी प्रतिक्रिया असेल तर गूगलवर सर्च करुन नक्की टाका. वाचायला आवडेल.
बाकी स्वत:ला सूर्य समजाणा-या भोंदूची काजव्यांनी चड्डी काढल्याची बातमी समजलीच असेल ना ? त्रास समजू शकतो. =))
-दिलीप बिरुटे
मूळ मुद्द्याला उत्तर नाहीच…
In reply to डॉक्टर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मूळ मुद्द्याला उत्तर नाहीच?
सरकार झुरळांकडून पैसे देऊन काही रिल्स बनवून घेईल इतकी लोणकढी लोकांना पचेल का?
हम्म
In reply to काही विद्यार्थ्यांना… by सुबोध खरे
अभाविपने अभिजीत दिपकेला चॅलेंज केल्याची/ विरोध केल्याची किंवा किमान तोंडदेखला तात्विक विरोध केल्याची एखाद मुख्य धारेत आलेली बातमी दाखवता का ? अगदी ऑप इंडिया किंवा स्वराज्य मॅगझिन मधली सुद्धा चालेल.
अभाविप अन् त्यांचे राजकारण कळायला जवानी घालवावी लागते त्यांच्यात. पेिरियड. !
नाईट वॉचमन बाद झाला तरी…
नाईट वॉचमन बाद झाला तरी फलंदाजी करणाऱ्या संघाचे फारसे नुकसान नसते.
दिल को बेहलाने के लिये गालिब…
In reply to नाईट वॉचमन बाद झाला तरी… by श्रीगुरुजी
दिल को बेहलाने के लिये गालिब ये खयाल अच्छा है !
यशाचे संपूर्ण श्रेय कोबी आणि गुंदेशाह ह्यांना. भ्रष्टाचाराचे खापर इतरांवर. त्याशिवाय ज्याला MHRD नेमला त्यालाच Night Watchman म्हणून हिणवयाचे.
किती काळ मुख्य फलंदाज रात्र चौकीदारांच्या पदराच्या मागे राहून रिल्स करणार ? शेवटी मैदानावर यावेच लागेल. चौकीदार चोर है हि गोष्ट आता लोकांच्या पुढे येईलच
आता पुन्हा पेपरलिक करायची…
आता पुन्हा पेपरलिक करायची भाजपेयींची हिंमत होणार नाही! जय हो gen झ!
अभ्या.. यांना प्रतिसाद
अभ्या..,
तुमचा इथला प्रतिसाद वाचला. म्हंटलं एकेक मुद्द्याचा परामर्श घ्यायला हवा.
०१.
मीही २०१४ पासून वाट पाहतोय. आजून तरी योग आलेला दिसंत नाही. भविष्यांत कधी येईलसं वाटंत नाही.
०२.
सरकारविरुद्ध बोलायचंय तर मुद्दा धड पाहिजे ना? झुजपच्या जाहीरनाम्यात काय भंकसपणा लावलाय तो उघड्यावर दिसतो ना? धातु गळलेला जाहीरनामा पाहून आम्ही काय टाळ्या पिटायच्या का?
०३.
सोनम बेवफाच्या देशद्रोही कारवाया उघड केल्या तर ती प्रवृत्ती बेक्कार कशी काय? सोनम बेवफाची असलीयत उघड केली तर इतक्या उचक्या का बरं लागतात? तथ्यांशी इतकी प्रतारणा का?
०४.
खंडोजी खोपडे चालला नाही. पण बाजीप्रभू आणि मुरारबाजी मात्र चालले. नुसते चाललेचा नाही तर चांगले दौडले म्हणा. याच धर्तीवर राघव चढ्ढा चालतो पण दीपके नाय चालंत. काय बिघडलं?
०५.
सांगा तुम्हीच. आणि ते फंडिंग का कायसं पोत्यात भरून कसं आणतात ते ही सांगा.
०६.
घंटा तिच्यायला प्रतिसाद. जंतर मंतर आणि भवताल सोडला तर उर्वरित दिल्लीला काही फरक पडला नाही. संदर्भ : https://www.google.com/search?q=%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0+%E…
०७.
कोणाच्या अंगावर परिस्थिती शेकायला आली असं तुमचं मत आहे? सरकार? मोदी, शाह? भाजप? ( तुमच्या भाषेत )अंधभक्त? की आजून कोणी?
०८.
बाबरी नामे कोणतीही मशीद कधीही अस्तित्वात नव्हती. पण तुम्हाला आवडतं म्हणून आपण अयोध्येतल्या वादग्रस्त वास्तूस बाबरी म्हणूया. मला आठवतं त्यानुसार ती पाडल्यावर ज्या दंगली उसळल्या त्यातनं कुठलंही सरकार सत्तेवर आलेलं नव्हतं. गोधराच्या दंगलींच्या नंतरही कसलाही सत्तापालट झाला नव्हता. हां, त्या दोन्ही जनक्षोभ मात्र जरूर होता. पण त्याचा सत्तापालटाशी संबंध नाही.
अण्णांच्या उपोषणातून निर्माण झालेल्या जनक्षोभातून केजरीवाल नामे राक्षसही पैदा झालाच ना? मग मोदी कितीतरी मवाळ आहेत. केजरीसारखे भ्रष्ट आणि देशद्रोही नाहीत.
०९.
अगदी बरोबर. तीनतीन वेळा खास चौकशी होऊनही मोदींच्या विरोधात दंगल पेटवल्याचा काडीमात्र पुरावा मिळाला नाही. तरीपण मोदींनी असला काही दावा केला नाही. यावरनं ते किती विनम्र आहेत ते दिसून येतं.
१०.
तुम्हीच सांगा काहीतरी म्हणजे नेमकं काय करायला हवं होतं ते. उघीच मोघम आरोप नकोत.
११.
अपप्रचार कोणी सुरू केला ? सरकारने ? याविषयी काही पुरावा आहे का ? आणि हा प्रचार अप म्हणजे चुकीचा कसा काय, ते ही सविस्तर सांगा.
१२.
हे एक फालतू आणि फुसके आंदोलन आहे. अण्णांचं आंदोलन कितीतरी प्रभावी होतं.
१३.
शिक्षणमंत्र्यांनी राबवलेली परीक्षापद्धती? हा काय प्रकार आहे? माझ्या माहितीतली परीक्षापद्धती सध्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या अनेक दशके आधीपासून चालंत आलेली आहे. बाकी, शिक्षणमंत्र्यांना असलेला विरोध जर पूर्ण सरकारच्या विरोधांत परावर्तीत होत असेल तर आंदोलन करणारे लोकं विद्यार्थी कसे काय म्हणवून घेतात? ते राजकीय मोहरे झाले.
१४.
साफ चूक. जंतरमंतरवर लाठीमार झालाच नाही. तो संसदभवनावर चालून जाणाऱ्या गावगुंडांवर झाला. मग असा गावगुंड स्वत:स विद्यार्थी म्हणवून घेत असला तरी तो प्रथम गुंड असतो.
१५.
ओळखा पाहू काय साध्य करताहेत पोलीस ते!
१६.
करेक्ट. याबाबत तुमचं आमचं जमलं. १५ मुद्द्यांनंतर सोळाव्या मुद्द्यावर एकमत झालं तर. म्हणतात ना सोळावं वरीस धोक्याचं.
१७.
बोंबला तिच्यायला. असे काय मोठे हक्क मिळालेत ह्या फुसक्या आंदोलनाचा बार उडवून?
आ.न.,
-गा.पै.
मस्त
In reply to अभ्या.. यांना प्रतिसाद by गामा पैलवान
धन्यवाद गामा
मस्त सजावट करून दिलीय प्रतिसादाला.
परिच्छेद पाडले पण छान.
मधले फिलर छान दिसताहेत.
थँक्यु.
दुबार आनंद लाभला
In reply to मस्त by अभ्या..
अभ्या..,
एखाद्या झुरळाच्या लायकीचा प्रतिसाद दिलात. त्यामुळे मला आनंद झाला.
तुमच्यासारख्या कलाकाराच्या उपयोगी पडलो म्हणून परत एकदा आनंद झाला. हे दोनदोन आनंद काय कामाचे! म्हणून माझी गुणग्राहकता दाखवण्यासाठी मी केवळ दुसरा आनंदच स्वीकारीत आहे.
आ.न.,
-गा.पै.
सीजेपीचा पुन्हा आंदोलन इशारा...
नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन करीत असलेल्या बिहारी विद्यार्थ्यांवर एके-४७ रायफलमधून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची ध्वनिचित्रफीत सोमवारी समाज माध्यमांवर व्हायरल होताच संबंधित पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले.
पेपरफुटीविरोधात बिहारमध्ये शनिवारी (२५ जुलै) बंद पुकारण्यात आला होता. त्या वेळी डाव्या विद्यार्थी संघटनांनी ठिकठिकाणी आंदोलन केले, त्यात वरील घटनेची माहिती मिळत आहे.
सरकारने आश्वासन दिले होते की विद्यार्थ्यांवर असलेले fir मागे घेऊ आणि नवे गुन्हे दाखल करणार नाही मात्र सरकार विद्यार्थ्यांच्या आन्दोलना नंतर विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करीत आहेत, आज मंगळवारी सरकारने त्याबाबत लेखी आश्वासन दिले नाही तर सीजेपीला पुन्हा आंदोलन करावे लागेल असे सीजेपीने म्हटले आहे..
काल एका विद्यार्थयाला पुन्हा लाठीमार करुन त्या विद्यार्थ्याचा मोबाईल पोलिसांनी फोडल्याचे माध्यमावर दिसले, सरकारचं इतकी नाचक्की होऊनही सरकारचं डोकं ठिकाणावर आलेले दिसत नाही. आता विद्यार्थ्यांना मारहाण करुन गुन्हे दाखल करुन, धाकधपटशा करुन विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर ते शक्य नाही असे दिसते. इंस्टावर येऊन 'माय फ्रांस' सॉरी फ्रांड म्हणून विद्यार्थ्यांची सहानूभूती मिळत नसते, तर, विद्यार्थी आणि देशाच्या प्रश्न जेव्हा सोडवाल तेव्हा लोक लाइक करीत असतात एवढी निर्बुद्ध सरकारला जाणीव नसावी अजून ते काय देशाचे दुर्दैव म्हणावे...
-दिलीप बिरुटे
पोलीस की शासन ?
In reply to सीजेपीचा पुन्हा आंदोलन इशारा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शासन म्हणजे पोलीस नव्हे आणि पोलीस म्हणजे शासन नव्हे.
शासनाने सदर पोलिसास निलंबित केलं आहे. इंग्रजी बातमी : https://theprint.in/feature/boy-preparing-army-shot-bihar-police-leg-tejashwi-yadav/2997912/
बाकी लाठीमार, अश्रुधूर सोडूनही जमाव पांगला नाही तर स्वसंरक्षणार्थ गोळीबार करायचा हक्क पोलिसांना आहेच. मी स्वसंरक्षणाचं समर्थन करतो.
-गा.पै.
करा
In reply to पोलीस की शासन ? by गामा पैलवान
मी स्वसंरक्षणाचं समर्थन करतो.
.
करा करा.
गरज आहे त्याची....
बांबू परेड सुरु झाली आणि…
बांबू परेड सुरु झाली आणि निधड्या छातीच्या आंदोलकांचे अवसान गळू लागले आहे. म्हणजे बातम्या आणि व्हिडीओ तरी तसेच आहेत निदान. अपेक्षित होतेच. facial recognition आणि सिम ट्रेस करणारी यंत्रणा वापरली जात आहे हे आधीही म्हटले होते. आता बसा हजेरी लावत.
मुलीना लाथा बुक्क्यांनी…
In reply to बांबू परेड सुरु झाली आणि… by अप्पा जोगळेकर
मुलीना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली जातेय असा व्हिडिओ काल पाहिला, मला अगदी इराण अफगाणिस्तानातला व्हिडिओ पाहतोय असे वाटले.
इतक्यातच धीर सोडून कसे चालेल…
In reply to मुलीना लाथा बुक्क्यांनी… by अवार्ड अंशूमन
इतक्यातच धीर सोडून कसे चालेल. अजून बरेच काही होणार आहे. क्रांती घडवून आणायची तर एवढेतरी सहन करावेच लागते ना.
लाथा बुक्क्यांनी मुलीना…
In reply to इतक्यातच धीर सोडून कसे चालेल… by अप्पा जोगळेकर
लाथा बुक्क्यांनी मुलीना मारहाण? तुमची मुलगी एखाद्या आंदोलनाला गेली नी तिला अशी मारहाण झाली तर चालणार आहे का तुम्हाला?
माझी मुलगी जर असल्या टिनपाट…
In reply to लाथा बुक्क्यांनी मुलीना… by अवार्ड अंशूमन
माझी मुलगी जर असल्या टिनपाट आंदोलनाला गेली आनी तिथे तिला नियम मोडल्यावर पोलिसांचे रट्टे बसले तर मी तो तिचा एक लाईफ लेसन आहे म्हणुन सांगेल. क्रांती लानी है तो कुर्बानी तो देनी होगी.
माझ्या मुलीने इतक्या गलिच्छ…
In reply to माझी मुलगी जर असल्या टिनपाट… by सुक्या
माझ्या मुलीने इतक्या गलिच्छ किळसवाण्या विकृत शिव्या कोणालाही दिल्या तर पोलिसांआधी मीच तिला लाथाबुक्क्यांनी तुडवीन.
बाडीस!!
In reply to माझ्या मुलीने इतक्या गलिच्छ… by श्रीगुरुजी
बाडीस!!
आणी फक्त आंदोलनाला गेली…
In reply to माझ्या मुलीने इतक्या गलिच्छ… by श्रीगुरुजी
आणी फक्त आंदोलनाला गेली म्हणून पोलिसानी अमानुष मारहाण केली तर?
इतके फेक व्हिडीओ येत आहेत कि…
इतके फेक व्हिडीओ येत आहेत कि कोणत्याही व्हिडिओवर आता माझा विश्वासच उरलेला नाही.
2014 पासून सगळं असंच
In reply to इतके फेक व्हिडीओ येत आहेत कि… by सुबोध खरे
गोबरयुगात म्हणजे 2014 पासून आता कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नये अशा स्थितीवर देश आणून ठेवला आहे, अजून किती विकास पाहिजे देशाचा ? घ्या.
शेठ आणि भक्तांचे आभार... :)
-दिलीप बिरुटे
#CjpAttackUniform
Republic World वर अर्णव गोसावी ची डिबेट सुरू आहे.
भारतीय सुरक्षा दलाचा इतका प्रचंड अपमान पाकिस्तानी लोकांनी सुद्धा केला नसेल, तितका CJP करत आहे.
#CjpAttackUniform
आदोलकांपैकी २८०० जण हिस्टरी…
आदोलकांपैकी २८०० जण हिस्टरी शीटर होते, ६० जण खुनाचा गुन्हा, ५० जण खुनाचा प्रयत्न, पॉक्सो लागलेले काही जण इत्यादी इत्यादी असा अधिकृत आकडाच पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. त्यांची बांबू परेड निघत असताना कपिल सिब्बल यांनी त्यांची केस मोफत लढवणार असे सांगितले आहे शिवाय CJP ला १ कोटीची मदत जाहीर केली आहे. म्हणजे विद्यार्थी असल्याचा बुरखा पांघरून हिस्टरी sheeter लोकांनी हे आंदोलन केले होते असे असावे.
सिब्बलांबद्दल आदर दुणावला!
In reply to आदोलकांपैकी २८०० जण हिस्टरी… by अप्पा जोगळेकर
सिब्बलांबद्दल आदर दुणावला!