Skip to main content

कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. (भाग दोन )

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 23/07/2026 06:56 या दिवशी प्रकाशित केले.

कॉकरोच जनता पार्टी आंदोलन- दिल्ली. पहिल्या भागात मिपाकरांनी शांततेच्या मार्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या. नीट परीक्षेचे पेपर  लीक होणे आणि तत्त्सम घोटाळ्याविरुद्ध दिल्ली येथे जंतरमंतरवर सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टी या युवकांच्या सामाजिक चळवळीने  केंद्रसरकारमधील शिक्षणमंत्र्याच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु  केले  आहे.  वीस तारखेला संसदेवर निघालेल्या मोर्चा अडवून विद्यार्थ्यांना, युवतींना महिला पालकांना जी अमानुष मारहाण केल्या गेली त्या क्र्रुरतेचे आणि कौर्याचे  असंख्य व्हीडीयो सामाजिक माध्यमांवर दिसत आहेत.   'बेटी बचाओ,बेटी पढावो' म्हणना-यांनी  लेकी बाळींचा केलेला अपमान, डोकी फोडणे,  जायबंदी करणे 'अमानुष मारहाण' असेच वर्णन वीस जुलैच्या  घटनेचे वर्णन करावे लागते.  संसदेवर जाणा-या या मोर्चाला लाठीमाराशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता ? प्रश्न विचारता येईल आणि चर्चाही करता येईल.  सोनम वांगचुंग यांना उपचाराच्या निमित्ताने  जबरदस्तीने उचलून आंदोलन मोडता येते काय, असा प्रयत्न सरकारने करुन पाहिला, मारहाण करुन युवकांना पळवून लावण्याचा प्रयत्न झाला. मुलं घाबरुन जातील आणि आंदोलन स्थळांवरुन पळून जातील असे सरकारला वाटले असावे, पण असे काही झाले नाही. उलट, आंदोलनाची तीव्रता वाढत चालली आहे. 

दुसरीकडे, मन की बाता कराव्यात तशा आणि त्या टाइपच्या गप्पा सुरुच आहेत. '' पेपरफुटी हे घोर पापआहे. तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली असून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी केंद्र आणि सर्व राज्य सरकारांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र काम केले पाहिजे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 'एनडीए' संसदीय पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले''  मात्र, केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आंदोलकांच्या मागणीबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नव्हती.  सीजेपीच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नड्डा यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले असले तरी त्यावरही केंद्र सरकारने मंगळवारी मौन बाळगले.

आता सध्या कालच्या घडामोडीत जंतर-मंतरवरील आंदोलनाची तीव्रता कमालीची वाढलेली पाहता, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. आंदोलकांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येऊ लागले आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाकही देण्यात आली आहे. एकाच वेळी आंदोलन आणि विरोधकांचा चहूबाजूंचा हल्लाबोल, लोकसभा आणि राज्यसभेतला गोंधळ पाहता, केंद्र सरकारची बुधवारी कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले. महिनाभर संवाद टाळणाऱ्या केंद्र सरकारने अखेर आंदोलकांशी गंभीर चर्चा सुरू केली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. 

सरकारविरोधात आम्ही पुन्हा मोर्चा काढणार नाही आणि जंतर-मंतरवरून हलणार नाही. आता केंद्र सरकारने जंतर-मंतरवर येऊन चर्चा करावी किंवा तटस्थ स्थळी बैठक घ्यावी, असे  कॉक्रोच  जनता पार्टी'ने (सीजीपी) बुधवारी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई, आणि कोणतीही फौजदारी कारवाई केली जाऊ नये, या तीनही मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे 'सीजीपी'च्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे स्पष्ट  केले. 

''गेल्या दहा वर्षांत देशभरात १५२ परीक्षा पेपरफुटीच्या घटना घडल्या असून, त्याचा जबरदस्त फटका सुमारे ७.५ कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांना सहन करावा लागला आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी इंदिरा भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला''

लेखनातील माहिती कंटेंट  लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. सकाळ या छापील वृत्तपत्रातून चर्चेसाठी घेतले आहे. तर, मिपाकर हो शांततेच्या मार्गाने आपापली मतं मांडत राहू या..


 


वाचने 7514
प्रतिक्रिया 309

प्रतिक्रिया

 जंतर मांतर येथे पोलिसांनी facial recognition system deploy केली आहे. 2000 लोकांना identify केले आहे असे अधिकाृत आकडा आहे.IMSI catcher device सुद्धा लावले आहे अशा बातमी होती खरे खोटे माहिती नाही. पण हे खरे असेल तर पोलिस कात्रजचा घाट दाखवतील. कारण हे device असेल तर फोन number, sim number आणि शेवटी address सगळे काढले जाईल. म्हणजे इकडे मागण्या मान्य झाल्या आणि तिकडे पारपत्र अर्ज फेटाळला,FIR दाखल झाली, खाजगी फर्म ने BV मधे हाकलून दिले तर आनंद साजरा करायचा की दुःख हे प्रत्येकाने आपल्या वकुबानुसार ठरवावे.दादरच्या दोन मूुलीना identify करून समज दिली आहे असे त्या मूुलीनी सांंगीतल्या चे व्हिडिओ होते. उत्तराखांडच्या गावातल्या काही जणांना सुद्धा  detain केले. राहत्य  ठिकाणी आजूबाजूला कुठेही गुंन्हा घडला,riot सदृश काही झाले की पोलिस ह्या रिेकॉर्ड वरच्या लोकांना आधी आत घेतात. त्यावेळी पोलिसांना आम्ही जेन झी आहोत, आम्ही कोणाला घाबरत नाही असे सांगायचे की आंदोलन करणाऱ्या नेत्यांना फोन करून आम्हाला सोडवा म्हणून विनवण्या कारायच्या हा विचार सुद्धा आंदोलकांनी आताच करून ठेवावा. राजकीय कार्यकर्ते सुद्धा हे प्रकार झेलतात, पाश्चात्ताप करतात पण त्यांना निदान  आयुष्यभर आंदोलने, पोलिस केस,माोर्चा हेच कारायचं असते. इथे आंदोलक स्वतः  विद्यार्थी म्हणूवून घेत आहेत त्यांना हे झेपेल का नाही माहिती नाही. कंदाचित ह्या समस्येवर सुद्धा जेन झी la काहीही जमू शकते असे सांगितले जाईल.


In reply to by अप्पा जोगळेकर

तुम्ही पोलिस स्टेशन वर भरपूर चकरा मारल्या असत्या तर हे असले तर्कट न लिहिते आप्पा ! ह्यात स्टेप बाय स्टेप चिरफाड होऊ शकते, पण ती थोड्या वेळाने !

 

तूर्तास गुरुजी काय ज्ञान पेटी उघडतात ते पाहतो.

 


In reply to by अप्पा जोगळेकर

ही भीती कोणालाच असणार नाही ! त्यासाठी सगळेच रेकॉर्डवर जाणे गरजेचे नसते, परत सांगतो fear mongering करू नये.


In reply to by अप्पा जोगळेकर

अरे बापरे! मग त्यातून केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी याहूनही मोठं आंदोलन व्हायचं.


In reply to by अप्पा जोगळेकर

जंतर मांतर येथे पोलिसांनी facial recognition system deploy केली आहे. 2000 लोकांना identify केले आहे असे अधिकाृत आकडा आहे. 

 

FRS system कशी काम करते हे सांगा अगोदर. फेस मॅच करायला आधी फेस डेटाबेसेस मध्ये असायला हवा. तो असतो पोलिसांकडे हिस्टरी शीटर जनतेचा. त्यांना शा* काय फरक पडत नाही.

 

 IMSI catcher device सुद्धा लावले आहे अशा बातमी होती खरे खोटे माहिती नाही. 

 

माहिती नाही/ verified नाही ते मांडून भीती पसरवण्याचे पाप का डोक्यावर घेता ? किमान IMSI catcher काम कसे करते त्याची माहिती गुगलून तरी पाहायची राजे. IMSI खूप cliche तंत्रज्ञान असून ते असे लॉ अँड ऑर्डरला सुद्धा वाटेल तसे वापरत नाहीत. 

 

पण हे खरे असेल तर पोलिस कात्रजचा घाट दाखवतील. कारण हे device असेल तर फोन number, sim number आणि शेवटी address सगळे काढले जाईल. 

 

कसा ? तो सांगा , राजे तुमच्या आमच्या देशात फुटपाथ वर छत्र्या लावून सिमकार्ड विकणारी एअरटेल अन् जियोची पोरे बायोमेट्रिक verification करू शकतात पण पोलिसांना ते allowed नाहीये, आधार ऍक्टचा अभ्यास करा

 

म्हणजे इकडे मागण्या मान्य झाल्या आणि तिकडे पारपत्र अर्ज फेटाळला,FIR दाखल झाली, खाजगी फर्म ने BV मधे हाकलून दिले तर आनंद साजरा करायचा की दुःख हे प्रत्येकाने आपल्या वकुबानुसार ठरवावे. 

 

FIR, non-cognizable offence (अदखलपात्र गुन्हा), बाँड, स्टेटमेंट इतकी माहिती घ्या. तूर्तास तुमच्या वकुबात ह्याची गरज आहे 😂🙏🏾


In reply to by आग्या१९९०

तृणमूल (२०)  व शिल्लक शिउबाठा (६)  विभागातून आधीच तरतूद करून ठेवली आहे. गरज भासल्यास ट्रोजन अश्व (८) हाताशी आहेतच जे परवाच मोदींची भेट घेऊन आले. चंद्राबाबू व नितीशचे २८ गेले तर ३४ ची तरतूद आहे.


हार्दिक पटेल, कन्हैया कुमार प्रमाणे आता अभिजीत दिपकेला सुद्धा विविध पक्षांकडून आमंत्रण येईल. यातून रागा व प्रिव काहिसे मागे पडल्यासारखे भासतात. श्रीराम मंदिर देणग्या चौर्य प्रकरणही मागील शेगडीवर गेल्यासारखे भासतेय. 


In reply to by श्रीगुरुजी

म्हणजे ज्याची ती सीडी वगैरे लीक झाली होती (मायला इथे बी लीक) त्यो काय ? अर्र भारतीय जनता पार्टी चे तरुण तुर्क आमदार आहेत नाही का आता ते विरमगाम मतदारसंघातून ?  

प्रश्न हा आहे विविध पक्षांकडून आमंत्रण आलेला अन् त्यातील एक आमंत्रण स्वीकारून काँग्रेस मध्ये गेलेला हार्दिक पटेल गुजरात भाजपने पक्षात घेऊन आमदार केला कसा ? का इतर पक्षांनी आमंत्रण देणे चुकीचे अन् तुमच्या पक्षात आले की पवित्र का काय? भाजपने वेगळेपणाचा अंगरखा तर झुलवूच नये आता जनता टर टर फाडणार तो ! काँग्रेसने उष्टावून सोडलेला विरोधात असणारा पाटीदार आंदोलन प्रणेता पण चालतो ह्यांना सत्तेत रहायसाठीimages (1) Screenshot-20260725-154042


In reply to by श्रीगुरुजी

माझा प्रश्न अतिशय स्पष्ट आहे, अपवाद सोडता सर्व विक्रीस उपलब्ध आहेत वगैरे ठीक आहे घेणाऱ्या मध्ये तुमचा जीव का प्राण असणारी पार्टी का आहे ? त्याचे उत्तर द्या ! 

 

नुसतं श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय असली फर्लांग भर लांबडी नावे घेऊन काही होत नसते पार्टी विथ ए डिफरन्स इत्यादी धूळफेक डोळ्यात करणे बंद करा, ये पब्लिक है ये सब जानती है 


In reply to by श्रीगुरुजी

बाकी बामनाचा माणूस वर जातोय म्हणून कैक लोकांच्या पोटात पण दुखेलच! 😂


In reply to by श्रीगुरुजी

फ्रांडअंकल नी स्वतः कडे ठेवावे खाते अशी फार इच्छा आहे.

एकतर त्यांना आवड आहे. रोज वर्ग भरेल. लोक सर म्हणतील.

गुरुपद आधीपासून घेतले आहे. बाकी सगळे सोडावे जेन झी आणि अल्फा शिक्षणाचे व्रत घ्यावे.

.

महत्वाचे म्हणजे आगामी आंदोलन सोयीचे होईल.


- राहत इंदोरी साहब का शेर अर्ज है

 

अगर ख़िलाफ़ हैं होने दो, जान थोड़ी है
यह सब धुआँ है, कोई आसमान थोड़ी है।

लगेगी आग तो आएँगे घर कई ज़द में
यहाँ पे सिर्फ़ हमारा मकान थोड़ी है।

सभी का ख़ून है शामिल यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है!

 

पोरं लढली, पोरं जिंकली खूपच आनंद झाला.

आता पोरांवरचे सर्व गुन्हे मागे घेतले पाहिजेत.

नवे मंत्री, नवे कायदे काय काय बदल होतील ते कळेलच.

 

येतो आता निवांत.....लोकशाही जिंदाबाद, युवाशक्ती जिंदाबाद... 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by धर्मराजमुटके

नुसतं आंदोलन नाही .  गोदी मिडीया , आयटी सेल  आणि येथील अंकल पार्टी सुद्धा संपली. आणि हो सामान्य माणसाला सरकाराची दहशतीही भीती वाटत होती ती पण संपली.  कंगनाच्या भाषेत सांगायचं झालं तर आज  देशाला स्वातंत्र्य मिळाले.  


आता पोरांवरचे सर्व गुन्हे मागे घेतले पाहिजेत.

ज्यांनी पोलिसांना बेदम मारहाण केली त्यांचे पण गुन्हे मागे घ्यायचे का?

पोलिसांना मूलभूत हक्क मानवी हक्क वगैरे नाहीत का?

एखादद्या पोलिसाने आपल्या मानवी हक्काबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली तर काय करायचं?    


In reply to by आग्या१९९०

नाना

माझ्या प्रश्नांची उत्तर आहेत का तुमच्या कडे?  

मी शांतच आहे आणि थंडही आहे.

चिडून उगाच कुणाच्यावर पातळी सोडून टीका वगैरे करत नाही.  


In reply to by सुबोध खरे

आंदोलन समाप्त झाले आहे. आता कोणत्याही मागणीला सरकार शष्प किंमत देणार नाही. गुन्हे मागे घ्या, आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबाला एक कोटी द्या, मोदींनी माफी मागितली पाहिजे इ. मागण्यासुद्धा संपल्या. आंदोलनातील मूळ महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षून केवळ प्रधानांच्या मंत्रीपद त्यागावर संपूर्ण लक्ष दिल्याने ते वगळता काहीही हातात आले नाही. 

 

अभिजीत दिपकेला व्यक्तिगत लाभ मिळेल. अमेरिकेत नोकरी मिळत नव्हती. पण आता विविध पक्षांकडून आमंत्रण येईल व हार्दिक पटेल, कन्हैया कुमार यांच्यासारखा अल्पकालीन लाभ मिळेल. 


In reply to by श्रीगुरुजी

सिटिंग आमदार आहे, शॉर्ट टर्म फायदा हा ? तुमच्या करावर काँग्रेसने उष्टा करून सोडलेला अन् भाजपने फक्त सत्तलोलूप होऊन आमदार केलेला हा गडी जन्मभर पेन्शन खाणार !


In reply to by श्रीगुरुजी

गुन्हे मागे घेणे तर मान्य केलेच आहे आणि यापुढेही या आंदोलनाशी संबंधित कोणतेही नवीन गुन्हे नोंदले जाणार नाहीत हे ही मान्य केलंय असं प्रेस कॉन्फरन्स मध्ये सरकारने सांगितलं

तसेच आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबाला नियमांप्रमणे जास्तीत जास्त रक्कम देण्याचेही मान्य केले आहे.

हे लगेच हरखून गेले पण तिकडे सरकारने मान्य केल्याच सर्व तीन मागण्या


In reply to by सुबोध खरे

कायदेशीर रित्या ज्यांच्यावरचे खटले मागे घेतले जाऊ शकतात ते स्पष्ट असते, जे लोक नॉन - काँग्निझॅबल ओफेन्स मध्ये आहेत ते सरळ सरळ सी समरी (क्लास सी समरी) करून टेबलावर सोडले जातात, कैक लोक प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून बसल्या जागी सोडले जातात. ज्यांनी मारहाण इत्यादी बीएनएस २०२३ अंतर्गत नॉन बेलेबल ओफेन्स केले आहेत त्यांचे मात्र तपास रिपोर्ट, पंचनामे, अटक मेमो, जप्ती पंचनामे इत्यादी कारवाई सुरू होईल, पुढेमागे त्यांना पण सरकार पॉलिटिकल consideration मध्ये सी समरी फाईल करण्याचा आदेश देईल दिल्ली पोलिस कमिशनरला आणि ते पण सुटतील. आता इतकी सरळ ढळढळीत न्यायिक प्रक्रिया तुम्हाला माहिती नव्हती असे तर म्हणू नका सुबोध सर.


In reply to by सुबोध खरे

आजवर किती केसेस पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात "माझे मानवी हक्क ऑन ड्यूटी हनन झाले आहेत" अशा स्वरूपाची पेटीशंस टाकली आहेत ते सांगून टाका सर जमल्यास.


In reply to by सुबोध खरे

पोलिसांचं माहिती नाही.

पण मीच टाकला होता मुंबई उच्च न्यायालयात.

मी उच्च न्यायालयात रीट अर्ज केला होता नोकरी सोडण्यासाठी. तीन वेळेला राजीनामा देऊनही सरकार तो मंजूर करत नव्हते म्हणून

सरकारने शपथ पत्र टाकले की लष्करातील माणसाला न्यायालयात जाण्याचा धिकार नही आणि त्याच्या अर्जाची सुनावणी करण्याचा न्यायालयाला अधिकारच नाही.

(This court does not have jurisdiction).

न्यायमूर्तींनी ते ऐकून केंद्र शासनाच्या वकिलाला सांगितले अम्ही ते वाचलंय.

तुम्हाला पुढे काही बोलायचंय का?

त्यांनी गपचूप पुढे प्रतिवाद करण्यास सुरवात केली!

पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेले. तेथे सुद्धा हाच प्रकार झाला होता.

न्यायालये जर लष्कराच्या बाबतीत ढवळाढवळ करू लागली तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल असे त्यांनी शपथपत्र टाकले होते.

अर्थात न्यायालयाने तेही कानाआड टाकले.

असो हा विषय येथे नको!

 

 


अभिजीत दिपके ह्यांची यथेच्छ बदनामी भाजप आयटी सेल ने केली, पण दिपके झुकले नाहीत! त्यांनी मोदीना झुकवलं नी राजीनामा घ्यायला लावला धर्मेंद्र प्रधानाचा.
मोडेन पण वाकणार नाही, हा ताठा दाखवून दिपकेनी त्यांचा ताठ मराठी कणा दाखवला, नी अक्षरशः हुकुमशाही झुकवली! 

दिपके ह्यांनी आंदोलन यशस्वी केले ह्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन! आज दिपके तरुणांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. त्यांनी ईडी, सीबीआय, पोलीस यंत्रणा, लाठीमार, दहशत हे सगळे निष्प्रभ्र ठरवले. जेन झी लाही मानावे लागेल, कुठल्याही हुकुमशाही , दहशत, लाठीमार ह्याला न घाबरता त्यांनी लढा दिला. एवढ्या दहशतीच्या काळात आंदोलन चालवून यशस्वी करून दाखवणे म्हणजे खरोखर मोठे काम आहे!

आंदोलन यशस्वी झाले.♥️
जय हिंद जय महाराष्ट्र!


In reply to by अमरेंद्र बाहुबली

अमरेंद्र बाहुबली,

 

यावरून पंजाबातल्या तथाकथित शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आठवण झाली. त्यावेळीही मोदींनी कायदे मागे घेतले. मोदी झुकले वगैरे गाजावाजा झाला. पण मोदींनी तेच कायदे मागील दराने गुपचूप पारित केले ( वा करायच्या बेतात आहे ) ( इंग्रजी लेख ) : https://www.newindianexpress.com/states/tamil-nadu/2025/Mar/17/centre-t…

 

सध्याच्या बाबतीत धर्मेंद्र प्रधानांच्या जागी जो येईल तो अधिक हिरीरीने नवं शैक्षणिक धोरण राबवणार.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

नवीन शिक्षण धोरणाच्या विरुद्ध पेटला होता का पेपर लीक मॅटर वरून धर्मेंद्र प्रधान वर ! ? उगाच काहीही टेप लावत सुटला आहात.


In reply to by वृषभ खोंडे

वृषभ खोंडे,

 

आजवर असंख्य वेळा काँग्रेसी, बिगर काँग्रेसी आणि भाजपी सरकारांत प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. कोणीतरी कधीतरी मंत्र्याचा राजीनामा मागितला होता का? मग धर्मेंद्र प्रधानांना असं काय नेमकं सोनं लागलंय की त्यांच्या राजीनाम्यावर विरोधकं हाटून बसलीत?

 

नवं शैक्षणिक धोरण साम्यवाद्यांना अनुकूल नाही. म्हणून धप्रविरोधी आरडाओरडा चाललाय. उघडपणे बोंबलून दाखवता येत नाही. तिथे ग्यानबाची मेख आहे.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

हे म्हणजे, आज पर्यंत असंख्य बलात्कार झाले होते निर्भया केसवेळीच बलात्काऱ्याना शिक्षा द्या म्हणून मोर्चे का काढले असे विचारण्यासारखे आहे.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

अमरेंद्र बाहुबली,

 

अहो, निर्भयाच्या वेळेस कोणी राजीनामा मागितला होता का सुशीलकुमार शिंद्यांचा?

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

यावरून पंजाबातल्या तथाकथित शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आठवण झाली. त्यावेळीही मोदींनी कायदे मागे घेतले. मोदी झुकले वगैरे गाजावाजा झाला. पण मोदींनी तेच कायदे मागील दराने गुपचूप पारित केले ( वा करायच्या बेतात आहे >>>>
 ते शेतकरीही पुन्हा आंदोलनच्या बेतात आहे, मोदी हुशार असतील हो पण लोक येडे नाहीयेत! 

 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

अमरेंद्र बाहुबली,

 

पंजाबी लोकं येडेच आहेत. असं एक पंजाबीच बोलतोय. विजय सरदाना यांनी प्रत्येक वेळेस एकंच प्रश्न विचारला. प्रस्तावित शेतकरी कायद्यांतलं नेमकं कोणतं कलम शेतकऱ्यांच्या विरोधात आहे? उत्तर इल्ले. आजही तोच प्रश्न उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. अधिक माहितीसाठी हे २२ मिनिटांचं हिंदी चलचित्र पाहावे : https://www.youtube.com/watch?v=0LKBgvdr3JU

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

सरकारला शेतकऱ्यांचे हित करायचेच आहे आणि विरोधही नको असेल तर स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी १००% लागू कराव्या.  काँग्रेसला तोंडावर पाडण्याची चांगली संधी आहे.  


In reply to by आग्या१९९०

काँग्रेसला तोंडावर पाडण्याची चांगली संधी आहे.

  

राहुल गांधींच्या नेतृत्वावर १०० सलग पराभव झालेली संघटना आहे काँग्रेस. अजून काय तोंडावर पाडायचं बाकी आहे?

अजूनही  राहुल गांधींच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवला तर पार गाळात जायला फार वेळ लागणार नाही.    

देशपातळीवर  सार्वत्रिक मान्यता असलेला तो एकमेव पक्ष उरला आहे.

पण गांधी घराण्यालाच कवटाळून बसल्यामुळे सत्तेत येणे तर दूरच राहिले प्रभावी विरोधी पक्ष बनण्याची शक्यता पण धूसर होत चालली आहे.  

आणि जितकी त्यांच्या विजयाची शक्यता कमी होत जाईल तितके विरोधातील चांगले लोक अंधारात चाचपडण्यापेक्षा भाजपमध्ये जाणे पसंत करतील.

गेली काही वर्षे हेच होताना दिसते आहे.  यामुळे भाजप जास्त शिरजोर होत जाईल आणि त्यांच्या मूळ तत्त्वांपासून फारकत होत जाईल.

यामुळे भाजपचे काँग्रेसीकरण पूर्ण होईल.        

 

   


In reply to by सुबोध खरे

गेली काही वर्षे हेच होताना दिसते आहे.  यामुळे भाजप जास्त शिरजोर होत जाईल आणि त्यांच्या मूळ तत्त्वांपासून फारकत होत जाईल.

धन्यवाद!

कांग्रेसचा उल्लेख मी मुद्दामून केला होता. तुमच्या कडून मुळ मुद्याला बगल देण्याची सवय आहे हे मला माहित आहे. त्यातून तुमच्या मुखातून सत्य  वदवून घ्यायचे होते. हे सरकार कधीच शेतकऱ्यांचे हिताचे धोरण राबवणार नाही.  कायम बळजबरीच करणार. तुम्हाला हे कळले ह्यात आनंद झाला.

येथे आमचेच चालणार. 

 

 

  

 


In reply to by आग्या१९९०

आग्या१९९०,

 

हे सरकार कधीच शेतकऱ्यांचे हिताचे धोरण राबवणार नाही.

 

हे तुम्ही कशाच्या आधारे म्हणंत आहात? मी वर दिलेल्या विजय सरदानायांच्या मुलाखतीच्या दुव्यात त्यांनी आंदोलकांना एकंच प्रश्न विचारला आहे. तो म्हणजे शेतकऱ्यांच्या नुकसानीचं एक कलम दाखवून द्या.

 

हाच प्रश्न मी तुम्हांस परत विचारतो. कृपया शेतकऱ्यांच्या नुकसानीचं एक कलम दाखवून द्यावं.

 

आ.न.,

-गा.पै.


तर, प्रधानांनी राजीनामा दिला, आता येत असलेले  तर त्यापुढील दिव्य व्हर्जन आहे. बाकी व्यवस्थेची चड्डी काढणा-यावर देश खुश आहे,   जेन-झी पीढ़ी एवढ्यावर थांबणार नाहीच.  पहिले यश आहे. काही विद्यार्थ्यांना सरकारच्या बाजूने बोलण्यासाठी आमिषंही दिल्या गेली म्हणे, पण पोरं त्याला बळी पडले नाहीत.  जेन झीची  भाषा आणि व्यक्त होणे यावर नवा लेख धागा काढावा वाटत आहे.  जरासा व्यग्र आहे लिहायला येईनच. 

 

 

-दिलीप बिरुटे

(व्यग्र)


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण पोरं त्याला बळी पडले नाहीत.  

असा एक व्हीडीओ मी बघितला होता.  तीन ते पाच मिनिटांच्या एका रिलसाठी 20,000 रु. अशी ऑफर होती. 

कृपया हा प्रतिसाद प्रा . डॉ. दिलीप बिरुटे सरांना दिला आहे. दुसरे कोणी नाकातले केस दाखवत लिंक मागू नका .  

 


काही विद्यार्थ्यांना सरकारच्या बाजूने बोलण्यासाठी आमिषंही दिल्या गेली म्हणे,

काय बिरुटे मास्तर?

एवढी शेंडी लावायची?  लोकांच्या बुद्धीला इतके कम अस्सल केंव्हा पासून समजायला लागलात?

ज्यांच्याकडे आख्ख्या सरकारच्या चाव्या आहेत, अभाविप सारखी पूर्ण संघटना त्यांच्या साठी काम करत आहे ते काही विद्यार्थ्यांसाठी आवस मागतील?

सूर्य काजव्याकडे प्रकाश उसना मागतो का कधी?       


 


In reply to by सुबोध खरे

डॉक्टर,  दुर्दैवाने 2014 पासून लोकांच्या बुद्धीला गंज चढला आणि डोळ्यावर  मोतीबिंदूचं प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे समाजात काय चालले दिसत नाही. अभाविपची एखादी प्रतिक्रिया असेल तर गूगलवर सर्च करुन नक्की टाका. वाचायला आवडेल.

 

बाकी स्वत:ला सूर्य समजाणा-या भोंदूची काजव्यांनी चड्डी काढल्याची बातमी समजलीच असेल ना ? त्रास समजू शकतो. =))

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मूळ मुद्द्याला उत्तर नाहीच?

सरकार झुरळांकडून पैसे देऊन काही रिल्स बनवून घेईल इतकी लोणकढी लोकांना पचेल का?


In reply to by सुबोध खरे

अभाविपने अभिजीत दिपकेला चॅलेंज केल्याची/ विरोध केल्याची किंवा किमान तोंडदेखला तात्विक विरोध केल्याची एखाद मुख्य धारेत आलेली बातमी दाखवता का ? अगदी ऑप इंडिया किंवा स्वराज्य मॅगझिन मधली सुद्धा चालेल. 

 

अभाविप अन् त्यांचे राजकारण कळायला जवानी घालवावी लागते त्यांच्यात. पेिरियड. !


In reply to by श्रीगुरुजी

दिल को बेहलाने के लिये गालिब ये खयाल अच्छा है !

यशाचे संपूर्ण श्रेय कोबी आणि गुंदेशाह ह्यांना. भ्रष्टाचाराचे खापर इतरांवर. त्याशिवाय ज्याला MHRD नेमला त्यालाच Night Watchman म्हणून हिणवयाचे.

किती काळ मुख्य फलंदाज रात्र चौकीदारांच्या पदराच्या मागे राहून रिल्स करणार ? शेवटी मैदानावर यावेच लागेल. चौकीदार चोर है हि गोष्ट आता लोकांच्या पुढे येईलच  


अभ्या..,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. म्हंटलं एकेक मुद्द्याचा परामर्श घ्यायला हवा.

०१.

उपोषण अन्न पाण्याचे नसेल, प्रसिध्दी आणि स्वस्तुतीचे असेल. त्याअभावी मेलेले दिसणारेत लौकरच.

मीही २०१४ पासून वाट पाहतोय. आजून तरी योग आलेला दिसंत नाही. भविष्यांत कधी येईलसं वाटंत नाही.

०२.

पण सरकारविरुध्द बोलणारा प्रत्येकजण देशद्रोही अन कुटील हेतूचा आहे ह्या भावनेनेच केलेला प्रत्येक हल्ला भडवेगिरीचे लक्षण आहे.

सरकारविरुद्ध बोलायचंय तर मुद्दा धड पाहिजे ना? झुजपच्या जाहीरनाम्यात काय भंकसपणा लावलाय तो उघड्यावर दिसतो ना? धातु गळलेला जाहीरनामा पाहून आम्ही काय टाळ्या पिटायच्या का?

०३.

स्तुती करणारा सोनम अगदी भारी होता, जरा विरोधी बोलला की त्याची सगळी पाळेमुळे खणून काढायची प्रवृत्ती बेक्कार आहे.

सोनम बेवफाच्या देशद्रोही कारवाया उघड केल्या तर ती प्रवृत्ती बेक्कार कशी काय? सोनम बेवफाची असलीयत उघड केली तर इतक्या उचक्या का बरं लागतात? तथ्यांशी इतकी प्रतारणा का?

०४.

सीजेपीचा दीपके आपचा कार्यकर्ता होता म्हणून चालत नाही, राघव चढ्ढा मात्र प्रेमाने घेतला जातो.

खंडोजी खोपडे चालला नाही. पण बाजीप्रभू आणि मुरारबाजी मात्र चालले. नुसते चाललेचा नाही तर चांगले दौडले म्हणा. याच धर्तीवर राघव चढ्ढा चालतो पण दीपके नाय चालंत. काय बिघडलं?

०५.

दिपके अमेरिकेत होता तर तिकडून फंडींग घेऊन आला मग सरकारातील मंत्र्यांची मुले अमेरिकेत शिकताना कुणासाठी फंडींग गोळा करतात?

सांगा तुम्हीच. आणि ते फंडिंग का कायसं पोत्यात भरून कसं आणतात ते ही सांगा.

०६.

र्स्त्यावर कितीजण उतरणार असे हिणवणाऱ्यांना दिल्लीतले २० जुलै नंतरचे आंदोलन म्हणजे थोबाडीत मारणारा जेनझीचा प्रतिसाद होता.

घंटा तिच्यायला प्रतिसाद. जंतर मंतर आणि भवताल सोडला तर उर्वरित दिल्लीला काही फरक पडला नाही. संदर्भ : https://www.google.com/search?q=%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0+%E…

०७.

परिस्थिती अंगावर शेकायली की सगळ्यांची आठवण येते. कायदा, सुव्यवस्था, संविधान, देश, संसद ह्यांचे पावित्र्य, महती गाणाऱ्यासाठी....

कोणाच्या अंगावर परिस्थिती शेकायला आली असं तुमचं मत आहे? सरकार? मोदी, शाह? भाजप? ( तुमच्या भाषेत )अंधभक्त? की आजून कोणी?

०८.

त्यांनंतर पाडलेली बाबरी मशीद अन गोध्राच्या दंगली ह्या सरकारविरुध्द जनक्षोभ होत्या    अन त्या जनक्षोभातून सत्तेत आलेले, आण्णा हजारेंच्या उपोषणातून अन त्यांनी केलेल्या आरोपामुळे निर्माण झालेल्या जनक्षोभातून सत्तेत आलेल्या लोकांनी इतरांना कायदा, सुव्यवस्था अन संविधानाचे पवित्र्य लोकांना शिकवण्याची गरज नाही.

बाबरी नामे कोणतीही मशीद कधीही अस्तित्वात नव्हती. पण तुम्हाला आवडतं म्हणून आपण अयोध्येतल्या वादग्रस्त वास्तूस बाबरी म्हणूया. मला आठवतं त्यानुसार ती पाडल्यावर ज्या दंगली उसळल्या त्यातनं कुठलंही सरकार सत्तेवर आलेलं नव्हतं. गोधराच्या दंगलींच्या नंतरही कसलाही सत्तापालट झाला नव्हता. हां, त्या दोन्ही जनक्षोभ मात्र जरूर होता. पण त्याचा सत्तापालटाशी संबंध नाही.

अण्णांच्या उपोषणातून निर्माण झालेल्या जनक्षोभातून केजरीवाल नामे राक्षसही पैदा झालाच ना? मग मोदी कितीतरी मवाळ आहेत. केजरीसारखे भ्रष्ट आणि देशद्रोही नाहीत.

०९.

सत्य, प्रामाणीकपणा, कायदा अन संविधान तुमच्या घरचे बटीक नाहियेत.

अगदी बरोबर. तीनतीन वेळा खास चौकशी होऊनही मोदींच्या विरोधात दंगल पेटवल्याचा काडीमात्र पुरावा मिळाला नाही. तरीपण मोदींनी असला काही दावा केला नाही. यावरनं ते किती विनम्र आहेत ते दिसून येतं.

१०.

सीजेपीचे आंदोलन हे कशाही परिस्थीत सुरु झाले अन कसेही असले तरी सुरुवातीसच त्याची दखल घेऊन त्यांना थांबवण्यासाठी काहीतरी करायला हवे होते.

तुम्हीच सांगा काहीतरी म्हणजे नेमकं काय करायला हवं होतं ते. उघीच मोघम आरोप नकोत.

११.

त्याउलट त्यांच्या विषयीच अपप्रचार सुरु केला.

अपप्रचार कोणी सुरू केला ? सरकारने ? याविषयी काही पुरावा आहे का ? आणि हा प्रचार अप म्हणजे चुकीचा कसा काय, ते ही सविस्तर सांगा.

१२.

परंतु प्रचंड संख्येने दिल्लीत दाखल झालेल्या जेन झी ने सगळेच अंदाज चुकवले.

हे एक फालतू आणि फुसके आंदोलन आहे. अण्णांचं आंदोलन कितीतरी प्रभावी होतं.

१३.

फक्त शिक्षणमंत्र्यांना अन त्यांनी राबवलेल्या परीक्षापध्दतीला असणारा विरोध, पूर्ण सरकारला विरोध ह्यात कधी बदलला हेच कळले नाही.

शिक्षणमंत्र्यांनी राबवलेली परीक्षापद्धती? हा काय प्रकार आहे? माझ्या माहितीतली परीक्षापद्धती सध्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या अनेक दशके आधीपासून चालंत आलेली आहे. बाकी, शिक्षणमंत्र्यांना असलेला विरोध जर पूर्ण सरकारच्या विरोधांत परावर्तीत होत असेल तर आंदोलन करणारे लोकं विद्यार्थी कसे काय म्हणवून घेतात? ते राजकीय मोहरे झाले.

१४.

विद्यार्थ्यांवर, तरुणाईंवर केले गेलेले पोलीसी लाठीमार अन अत्याचार निघृण आहेतच

साफ चूक. जंतरमंतरवर लाठीमार झालाच नाही. तो संसदभवनावर चालून जाणाऱ्या गावगुंडांवर झाला. मग असा गावगुंड स्वत:स विद्यार्थी म्हणवून घेत असला तरी तो प्रथम गुंड असतो.

१५.

आताही जंतरमंतर भागातले नेट, मेट्रो दुकाने बंद करवून काय साध्य करताहेत?

ओळखा पाहू काय साध्य करताहेत पोलीस ते!

१६.

... त्याला एक लहानसा तुकडा देऊन त्यावेळी गप्प करण्याची आईची पध्दत सरकारने राबवली असती तर फारसे काही बिघडले नसते.

करेक्ट. याबाबत तुमचं आमचं जमलं. १५ मुद्द्यांनंतर सोळाव्या मुद्द्यावर एकमत झालं तर. म्हणतात ना सोळावं वरीस धोक्याचं.

१७.

आता अशीच आजची तरुणाई पोलिसांना तुमचे उइनिफॉर्म, नेमप्लेटस वर प्रश्न विचारताहेत, धर्म, जात, वय, लिंग, शिक्षण, ठिकाण आदि न विचारता एकमेकांना मदत करत भारतातल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणांहून एकत्र येत काही एका कारणासाठी बोलताहेत, लढताहेत, जखमी होताहेत अन पुन्हा येताहेत ते कारण त्यांच्या स्वत:च्या हक्काचे आहे, त्यांच्या भविष्यासाठी निगडीत आहे हेपण प्रचंड आशादायक आहे.

बोंबला तिच्यायला. असे काय मोठे हक्क मिळालेत ह्या फुसक्या आंदोलनाचा बार उडवून?

आ.न.,
-गा.पै.

 

 

 


In reply to by गामा पैलवान

धन्यवाद गामा 

मस्त सजावट करून दिलीय प्रतिसादाला.

परिच्छेद पाडले पण छान.

मधले फिलर छान दिसताहेत.

थँक्यु.  


In reply to by अभ्या..

अभ्या..,

 

एखाद्या झुरळाच्या लायकीचा प्रतिसाद दिलात. त्यामुळे मला आनंद झाला.

 

तुमच्यासारख्या कलाकाराच्या उपयोगी पडलो म्हणून परत एकदा आनंद झाला. हे दोनदोन आनंद काय कामाचे! म्हणून माझी गुणग्राहकता दाखवण्यासाठी मी केवळ दुसरा आनंदच स्वीकारीत आहे.

 

आ.न.,

-गा.पै.


नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन करीत असलेल्या बिहारी विद्यार्थ्यांवर एके-४७ रायफलमधून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची ध्वनिचित्रफीत सोमवारी समाज माध्यमांवर व्हायरल होताच संबंधित पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले. 

पेपरफुटीविरोधात बिहारमध्ये शनिवारी (२५ जुलै) बंद पुकारण्यात आला होता. त्या वेळी डाव्या विद्यार्थी संघटनांनी ठिकठिकाणी आंदोलन केले, त्यात वरील घटनेची माहिती मिळत आहे. 

सरकारने आश्वासन दिले होते की विद्यार्थ्यांवर असलेले fir मागे घेऊ आणि नवे गुन्हे दाखल करणार नाही मात्र सरकार विद्यार्थ्यांच्या आन्दोलना नंतर विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करीत आहेत, आज मंगळवारी सरकारने त्याबाबत लेखी आश्वासन दिले नाही तर सीजेपीला पुन्हा आंदोलन करावे लागेल असे सीजेपीने म्हटले आहे..

काल एका विद्यार्थयाला पुन्हा लाठीमार करुन त्या विद्यार्थ्याचा मोबाईल पोलिसांनी फोडल्याचे माध्यमावर दिसले, सरकारचं इतकी नाचक्की होऊनही सरकारचं डोकं ठिकाणावर आलेले दिसत नाही.  आता विद्यार्थ्यांना मारहाण करुन गुन्हे दाखल करुन, धाकधपटशा करुन विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर ते शक्य नाही असे दिसते.  इंस्टावर येऊन 'माय फ्रांस' सॉरी फ्रांड म्हणून विद्यार्थ्यांची सहानूभूती मिळत नसते, तर, विद्यार्थी आणि देशाच्या प्रश्न जेव्हा सोडवाल तेव्हा लोक लाइक करीत असतात एवढी निर्बुद्ध सरकारला जाणीव नसावी अजून ते काय देशाचे दुर्दैव म्हणावे... 

 

-दिलीप बिरुटे

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शासन म्हणजे पोलीस नव्हे आणि पोलीस म्हणजे शासन नव्हे.

 

शासनाने सदर पोलिसास निलंबित केलं आहे. इंग्रजी बातमी : https://theprint.in/feature/boy-preparing-army-shot-bihar-police-leg-tejashwi-yadav/2997912/

 

बाकी लाठीमार, अश्रुधूर सोडूनही जमाव पांगला नाही तर स्वसंरक्षणार्थ गोळीबार करायचा हक्क पोलिसांना आहेच. मी स्वसंरक्षणाचं समर्थन करतो.

 

-गा.पै.


बांबू परेड सुरु झाली आणि निधड्या छातीच्या आंदोलकांचे अवसान गळू लागले आहे. म्हणजे बातम्या आणि व्हिडीओ तरी तसेच आहेत निदान. अपेक्षित होतेच.  facial recognition आणि सिम ट्रेस करणारी यंत्रणा वापरली जात आहे हे आधीही म्हटले होते. आता बसा हजेरी लावत.  


In reply to by अप्पा जोगळेकर

मुलीना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली जातेय असा व्हिडिओ काल पाहिला, मला अगदी इराण अफगाणिस्तानातला व्हिडिओ पाहतोय असे वाटले.


In reply to by अवार्ड अंशूमन

इतक्यातच धीर सोडून कसे चालेल.  अजून बरेच काही होणार आहे. क्रांती घडवून आणायची तर एवढेतरी  सहन करावेच लागते ना.    


In reply to by अप्पा जोगळेकर

लाथा बुक्क्यांनी मुलीना मारहाण? तुमची मुलगी एखाद्या आंदोलनाला गेली नी तिला अशी मारहाण झाली तर चालणार आहे का तुम्हाला?


In reply to by अवार्ड अंशूमन

माझी मुलगी जर असल्या टिनपाट आंदोलनाला गेली आनी तिथे तिला नियम मोडल्यावर पोलिसांचे रट्टे बसले तर मी तो तिचा एक लाईफ लेसन आहे म्हणुन सांगेल. क्रांती लानी है तो कुर्बानी तो देनी होगी.


In reply to by सुक्या

माझ्या मुलीने इतक्या गलिच्छ किळसवाण्या विकृत शिव्या कोणालाही दिल्या तर पोलिसांआधी मीच तिला लाथाबुक्क्यांनी तुडवीन.


In reply to by श्रीगुरुजी

आणी फक्त आंदोलनाला गेली म्हणून पोलिसानी अमानुष मारहाण केली तर?


In reply to by सुबोध खरे

गोबरयुगात म्हणजे 2014 पासून आता कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नये अशा स्थितीवर देश आणून ठेवला आहे, अजून किती विकास पाहिजे देशाचा ? घ्या.

शेठ आणि भक्तांचे आभार... :)

 

-दिलीप बिरुटे


Republic World वर अर्णव गोसावी ची डिबेट सुरू आहे. 

 

भारतीय सुरक्षा दलाचा इतका प्रचंड अपमान पाकिस्तानी लोकांनी सुद्धा केला नसेल, तितका CJP करत आहे.

#CjpAttackUniform


आदोलकांपैकी २८०० जण  हिस्टरी शीटर होते, ६० जण खुनाचा गुन्हा, ५० जण खुनाचा प्रयत्न, पॉक्सो लागलेले काही जण इत्यादी इत्यादी  असा अधिकृत आकडाच  पोलिसांनी प्रसिद्ध केला आहे. त्यांची बांबू परेड निघत असताना कपिल सिब्बल यांनी त्यांची केस मोफत लढवणार असे सांगितले आहे शिवाय CJP ला १ कोटीची मदत जाहीर केली आहे. म्हणजे विद्यार्थी  असल्याचा बुरखा पांघरून हिस्टरी sheeter लोकांनी हे आंदोलन केले होते असे असावे.