मांजरे येती रॉयल घरा...🐱
असेच एकदा टाईमपास म्हणून ब्रिटिश न्यूज चॅनेल्स पाहत होतो. आपल्या सुनक साहेबांचे भाषण होणार होतं. 10 डाउनिंग दरवाजा उघडला आणि कॅमेराचा एकदम चकचकाट टीव्हीवर पाहायला मिळाला. पण मग नीट बघितलं तर ब्रिटनचे पंतप्रधान नाही,एक गुबगुबीत मांजर बाहेर आले होते.
10 डाउनिंग स्ट्रीट मध्ये मांजर?? ते पण असे भटके दिसणारे???
आपल्याकडे दर दाराआड काठी तय्यार ठेवलेली घरे अजूनही पाहायला मिळतात. वाजले म्याव की हाण काठी!
इथे चक्क मांजर आरामात चालत बाहेर आले लाल कार्पेटवर आरामात अंग टाकून झोपले सुद्धा!! त्यांना कोणीही त्रास दिला नाहीच उलट फोटो मात्र निघत गेले.
मग लक्षात आलं अरे हा तर लॅरी!
ह्या लॅरी साहेबांचा जन्म अज्ञात. आपल्या कडे असता तर 1 जून अशी अधिकृत वाढदिवस तारीख लावली असती. पण साहेबांना कोणीतरी लंडनच्या बॅटरसी कॅट्स आणि डॉग शेल्टर मध्ये आणून सोडले.
2011 साली मात्र त्याचे भाग्य उजळलेच. त्यावेळचे ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जोन्सन आणि त्यांच्या पत्नीने त्याला दत्तक घेतले ते त्यांच्या लहानग्या मुलींसाठी pet म्हणून.
पण त्यांचे विशेष उंदीरमारु कौशल्य बघून त्याची नेमणूक मुख्य उंदीर-मार ( chief mouser ) म्हणून झाली. 2011 पासून लॅरी भाऊ त्या पदावर आहेत.
कित्ती आयले कित्ती गईले हे वैशाली सामंतचे 'दाजीबा' गाणे तुम्हाला नक्की आठवत असेल. लॅरी भाऊंना मराठी येत असते तर दर ब्रिटिश पंतप्रधानांना जाताना आणि येताना पाहून तो हे नक्की म्हणाला असता. 😂
लॅरीने तब्बल 6 ब्रिटिश पंतप्रधानांना येताना आणि जाताना पहिले आहे.
सध्या लॅरी 15 वर्षाचा आहे. म्हणजे माणसांच्या भाषेत वानप्रस्थाश्रमात आहे. साहेब अजून गुटगुटीत आहेत. त्याचे दुसरे बालपण आत्ता सुरु झाले आहे.
जाता जाता एक गंम्मत.
इंग्लंड ची एलिझाबेथ-2 राणी जेव्हा वारली तेव्हा तिच्या मृत्यूसंबंधी चा कोड वर्ड होता London Bridge is down.
आणि लॅरी साहेबाचा आहे Larry bridge is down.
असा हा लॅरी. ब्रिटिश सरकारचा अधिकृत कर्मचारी आहे. पण त्याला पगार वगैरे काही मिळत नाही बरका!
त्या ऐवजी 10 डाउनिंग स्ट्रीट च्या स्टाफ पडूनच त्याची सगळी काळजी घेतली जाते.
जगात असंख्य लॅरी फॅन्स आहेत. त्याच्या हालचाली, असंख्य फ़ोटोज तुम्हाला नेटवर मिळतील.
लॅरी ला उदंड आयुष्य लाभो अशी सर्वांचीच इच्छा आहे. माझीसुद्धा!
लॅरी असाच लोकांना हसवत रहा....
तुमच्या कडे आहे का असा एखादा लॅरी. प्रतिसादात नक्की सांगा.
तुमच्या कडे काही भू भू आणि माऊ बाळंच्या आठवणी असतील तरी त्या नक्की लिहा.
साहित्ययात्री (प्रणव जोशी)
मिसळपाव
प्रतिक्रिया
समर्थाघरचे श्वान...त्यास…
समर्थाघरचे श्वान...त्यास थोरही देती मान.
( हे लिहीताना अशाच एका भांडूपच्या श्वानाची आठवण झाली. )
😆
In reply to समर्थाघरचे श्वान...त्यास… by विजुभाऊ
😆
भारीच आहे लॅरीचा थाट !
भारीच आहे लॅरीचा थाट !
खफवर जस्ट दुपारीच एका…
खफवर जस्ट दुपारीच एका मांजरीविषयी लिहिले होते.तर ते असे!
आमच्या शेजारच्या काकूंच्या मुलाचं लग्न होते. लग्नासाठी जसे पाहुणे जमायला लागले तसें घरातली गर्दी वाढू लागली. काकूंची प्रिय मांजर त्यात गायब झाली.दोन दिवस झाली तरी ती परतली नाही.शेवटी लग्न झाले. पाहुणे परतले. आता आठ दिवसांनी मांजर परत आली.
तिला शांतता पाहिजे होती काय? यावर आमचा काथ्याकुट सुरुये. मांजरीचे मानसशास्त्र 😅
बर काकू म्हणतात "आमच्या आलेक्सला कॅट फूडचीच सवय, ती इतक्या दिवस काय खात होती? कोण देत होते खायला?"
ह्म्म्म, काकूंना म्हटलं "काकु ती मांजर आहे मांजर स्वतःच अन्न स्वतः मिळवतेच, तिने तिची सोय बरोबर केली असणार "
शेवटी काकूंचा जीव भांड्यात पडला हे महत्वाचे😅
आमच्या कडे ४ मनी माउ आहेत.
आमच्या कडे ४ मनी माउ आहेत.
चिनु - १० वर्ष
बनी - ७ वर्ष
बर्फी - ६ वर्ष
आणि आताच एक नवीन addition - बेला - ९ महिने
हे सर्व आमच्या कडे कसे आले यावर नक्किच कधितरी लिहेन.
आमचे जिव आहेत हे सर्व.
लॅरी सारखाच थाट आहे सर्वांचा.
आमचे युवराज आणि प्रिन्स
हे आमचे युवराज आणि प्रिन्स. गेल्या ७ वर्षांपासून आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत.
अरे वा! ७ वर्षे म्हणजे बराच…
In reply to आमचे युवराज आणि प्रिन्स by चंद्रसूर्यकुमार
अरे वा! ७ वर्षे म्हणजे बराच मोठा काळ की!
गोंड्स पिल्ले.
In reply to आमचे युवराज आणि प्रिन्स by चंद्रसूर्यकुमार
गोंड्स पिल्ले.
अवांतर : रॉयल नाय हो ....
अवांतर : दहा डाऊनिंग मार्ग हे घर पंप्रचं आहे. राजाचं नाही. तस्मात रॉयल हे विशेषण वापरू नये.
-गा.पै.
होय! ती चूक लेख upload…
In reply to अवांतर : रॉयल नाय हो .... by गामा पैलवान
होय!
ती चूक लेख upload केल्यावर लक्षात आली.
😂😂😂 मांजरांचा शाहरुख खान
😂😂😂 मांजरांचा शाहरुख खान
फोटो कुठेय?
फोटो कुठेय?
प्राणी आवडत नसल्याने लेख…
प्राणी आवडत नसल्याने लेख वाचला नाही पण हजेरी लावली यासाठी लिहीले.
वेगळा विषयावर लिहीले आहे हे नक्की.
+1 मला पण...
मला प्राणी आवडतात पण त्यांच्या नैसर्गिक अधिवासात.
पाळीव प्राणी अजीबात आवडत नाहीत.