Skip to main content

मांजर

मांजरे येती रॉयल घरा.. 😺

लेखक साहित्ययात्री यांनी गुरुवार, 02/07/2026 21:53 या दिवशी प्रकाशित केले.

मांजरे येती रॉयल घरा...🐱

 

असेच एकदा टाईमपास म्हणून ब्रिटिश न्यूज चॅनेल्स पाहत होतो. आपल्या सुनक साहेबांचे भाषण होणार होतं.  10 डाउनिंग दरवाजा उघडला आणि कॅमेराचा एकदम चकचकाट टीव्हीवर पाहायला मिळाला. पण मग नीट बघितलं तर ब्रिटनचे पंतप्रधान नाही,एक गुबगुबीत मांजर बाहेर आले होते. 

10 डाउनिंग स्ट्रीट मध्ये मांजर?? ते पण असे भटके दिसणारे??? 
आपल्याकडे दर दाराआड काठी तय्यार ठेवलेली घरे अजूनही पाहायला मिळतात. वाजले म्याव की हाण काठी!

मांजर कवटाळण्यायोग्य प्राणी आहे का?

लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 01/07/2017 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
मांजर कवटाळण्यायोग्य प्राणी आहे का? मांजर विशेषत: महिलांचा लाडाचा विषय आहे. मांजराला कवटाळून त्याचे लाड करणाऱ्या मुली पाहिल्या की मांजराचा हेवा वाटतो. पण मांजराच्या केसांमुळे दमा होतो असे ऐकले आहे. मांजराला खूप जास्त चोंबाळले की मांजर पंजा मारते असेदेखील ऐकले आहे. मांजर कवटाळण्यायोग्य प्राणी आहे का?

मांजर टाळण्यायोग्य प्राणी आहे का?

लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 01/07/2017 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
मांजर टाळण्यायोग्य प्राणी आहे का? काही दिवसाआधी मी मीत्रा कडून एक मांजरीचे पीलू आणले. ही मांजर म्हणजे मला आणी माझ्या भावाला जीव की प्राण. पण माझ्या आई वडिलांना ती मांजर क्षण भरही चालत नाही. त्यावरून रोज सुनावणी. मला हे समजत नाही की कुत्रा सर्वांना चालतो तर मांजर का नाही?