Skip to main content

एक किंचित चोप्य्पस्ते कविता : ती सध्या काय करते ?

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/06/2026 17:47 या दिवशी प्रकाशित केले.

आमची पेर्णा:  (एक एकटा एकटाच.. यांची क्षमा मागून)

https://www.misalpav.com/poem/38652

 
ती सध्या काय करते ? 
चिंब पावसात  
रेशमी धुक्यात 
चांदणरातीत 
मदहोश धुंद  निशिगंधात
जुन्या वळणांवर 
ओळखीच्या खुणांवर  
गुलाबी सांजवेळी 
एकएकट्या क्षितिजावर  
चुकार बटांत   
खोट्या रुसव्यात 
गालावरल्या खळीत 
खळाळत्या हसण्यात
रात्री कवेत  
साऱ्या हवेत 
पापण्यांच्या किनारी 
ती सध्या काय करते ? 
 
... माहिती नाही. माहिती नाही. माहिती नाही..... त्रिवार माहिती नाही.
च्यामारी, कदाचित तीपण अश्याच  'किंचित चोप्य्पस्ते' कविता प्रसवत असेल.  
 

वाचने 144
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

ती सध्या काय करते ? 

सकाळी डब्यातली कवळी घासत असते.

संध्याकाळी नातवंडाना खेळवत असते

दुखणार्या गुडघ्याला आयोडेक्स चोळत असते.

नवऱ्याला ऐकण्याच्या मशीनची आठवण करून देत असते.

पाऊस  येणार असे समजले की कानटोपी शोधत असते

 

 


हहपुवा. 

 

उम्र का तकाजा है, अब ये दिल ठहर जाता है,
याद वही आता है, जिसका उम्र से नाता है।
नई महफिलें अब इस दिल को लुभाती नहीं,
पुराने रास्तों से ही अब पुराना वास्ता आता है।


In reply to by कर्नलतपस्वी

वाती वळणे , देवळात कीर्तनाला जाणे , सहाणेवर गंध उगाळणे , शेजारणीला सुनेची गाऱ्हाणी सांगणे या गोष्टी हल्ली नसतात त्यामुळे विचारात घेतलेल्या नाहिय्येत.

अरे एक लिहायचे राहीले

टीव्हीवर  दिवसभर मधुराज किचन , सास भी कभी बहू थी आणि तारक मेहता पहाते .