Skip to main content

आपली कुर्बानी

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 27/05/2026 14:27 या दिवशी प्रकाशित केले.

पूर्वी शिकारी शिकार करायला करात (हातात) असलेला बाण वापरत. त्यावरून करबाण, कुरबाण, कुर्बाण, कुर्बान, कुर्बानी असा शब्द बनत गेला आहे.

आपले पूर्वज किती पुढारलेले होते ते दिसते.

थोडक्यात कुर्बानी हा आपलाच प्रकार आहे.

प्राचीन अभंग बघा:-

"बाई बाई तुझ पे मेरी जान, 
मेरी जान तुझ पे कुर्बान
कुर्बानी कुर्बानी कुर्बानी
अल्ला को प्यारी है कुर्बानी"

सदर अभंगात, संतकवी इंदीवर यांनी बाईला नजरेच्या बाणापेक्षा, करबाण किती आवडत असत याचा दाखला दिला आहे.


वाचने 288
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by विजुभाऊ

आपण दिलेल्या सन्मानाबद्दल धन्यवाद. असाच लोभ असू द्यावा. कमीतकमी एक तरी प्रतिसाद येतो आहे, हे काय कमी आहे का? 


अवांतर : 

 

लेखनविषयात अंनिस कुठनं उपटली ?

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

अति अवांतर: 

 

अंनिस चा संबंध "आपले पूर्वज किती पुढारलेले होते ते दिसते"" ह्याच्य्याशी निगडित असावा 😀


In reply to by नावातकायआहे

तुम्हाला उत्तर देणे राहून गेले होते. 

काही नाही, लिहीतांना अनेक टॅग दिसत होते. मिळताजुळता दिसला अन टाकून दिला. जिलेबीचा टॅग खूप खाली असल्याने तेथपर्यंत पोहोचलो. नाहीतर तो टाकला असता. 
 

बाकी संपादकांना सांगून अवांतर टॅग कमी करायच्या मागणीसाठी संप करायचा का? सांगत असल्यास उन्हात एखादा मंडप टाकतो उपोषण करायला. कडक उन्हाळा आहे. शासकिय अधिकाऱ्यांनी जनतेची काळजी घेण्यापेक्षा साक्षात पंप्रनच उन्हाळ्यात काळजी घ्या असे सांगत असल्याने काळजीपोटी लिहीले हो. 


In reply to by गामा पैलवान

अतिअवांतर:

तुमच्या स्वाक्षरीतील "आ. न. - गा.पै." असे कुठे गेले आहे? 

खाते संपादन करून त्वरीत दुरूस्ती करून घ्या. 
 


In reply to by अभ्या..

मागे तर कुणीतरी ज्ञानपिठ पुरस्कार देणेविषयी लिहीले होते. 

असो.

मिपावर युद्धग्रस्त वातावरणात हा पूर्वीसारखी हलकीशी हवेची झुळूक कायम ही मनोकामना.


In reply to by सोत्रि

अहो, दिवसेंदिवस मटेरीअलच इतके मिळते आहे की मिपाचा सगळा डॅशबोर्ड केवळ एकाच नावाने भरून जाईल. मी तरी काय करणार?

तरी देखील माझ्या बातांवर मी नियमन लावले आहे. अन ही सद्य पोस्ट मध्ये सरकारविरोधी, कुणा एका धर्माविरोधी नाही.

बाकी काय मजेत ना? उन्हाळा आहे, उन वाढते आहे. प्रकृती सांभाळा. (आता हे देखील बोलायची चोरी समजाल. (तुम्ही नाही तर इतर) कारण कालपरवाच पंप्रनांनी काळजी घ्यायला सांगितली आहे.) (बघा, हे असे असते. एखाद्याचे नाव चोर पडले तर कुठेही चोरी झाली तरी त्यालाच पकडतात.)
बाकी, काही नाही. यंदा कुठे गेलो नाही बाहेर. उनच इतके होते की बास. अन ट्राफीक जाम किती झाले! गाडी चालवायची तरी कशी? अन टोल तरी किती? त्यात मायलेज मार खाते आहे.

मजेत घ्या हो. उगाच मोदी विरोधी, प्रो मोदी, प्रो राहूल, राहूल विरोधी, राष्ट्रवादी, बिगर राष्ट्रवादी, प्रो शिवसेना, ॲन्टी शिवसेना, प्रो योगी आदीत्यनाथ, त्यांच्या विरोधी, लडाख स्वतंत्र राज्य होणे हे करून उपयोग नाही. अन देशाची काळजी आपण करून काय करणार? आपल्याला कोण हिंग लावून विचारतो का? की का रे पाभ्या, देशावर युद्धाचे संकट आहे, एफिस्टन फाईल मध्ये नाव आले आहे, पेट्रोल महाग होते आहे, इथेनाल फाथेनाल चे लफडे आहे, राहूल काही बोलत नाही, फडणवीस लक्ष घालत नाहीत, मणीपुर कडे जाण्याला वेळ नाही, झाड तोड होते आहे, कुंभमेळा कसा साजरा करू, मेलोडी चॉकेलेट देऊ का किस्स्स्स्स्मी देऊ, काय करू? सांग रे पाभ्या, लगेच करीन बघ तू सांगशील ते. 

आपण आपले बघायचे. बॉम्ब पडला तर मरून जायचे, महागाई वाढली तर एकभुक्त व्हायचे, सरकार कोणतेही येवो, दांडखे खायचे. एवढेच आपल्या हातात आहे. 

देशाची चिंता आपण एकट्याने करून उपयोग नाही. ते मजेत असतात, कमावतात, पुढल्या पिंट्या, लाली, सखू, गोट्या यांची सोय करत असतात. 

एक लक्षात घ्या, आपला देश सुरू आहे ना तो एका गोल चाकासारखा आहे. कुणीतरी गोल चाक पर्वतावरून ढकलून दिले आहे, अन ते चाक वाट मिळेल तिकडे घरंगळत जात आहे. कुणीही त्याचा वाली नाही. जोपर्यंत त्या चाकात उर्जा आहे तो पर्यंत ते घरंगळत दिशाहीन जात राहील. एकदा का उर्जा संपली किंवा कुणाच्या ताब्यात आले तर मग ते त्याच्या इच्छेने जात राहील किंवा थांबेल.


असो, मी आता थांबतो. 


In reply to by गवि

गविजी,

छान विनोद निर्मितीसाठी गाण्याचे शब्द अयोग्य आले आहेत. 

नाहीतर एआय च्या जमान्यात लिखाण परिष्कृत (किती परिश्रम पडले टंकायला) करायला कितीसा वेळ लागला असता? 

टंचनिकेची सुट्टी करावी असे मत आहे का आपले आता?

आ.न.
-पा.पै.