नमस्कार खाद्यप्रेमी मिपाकर्स!
तुम्हाला जर चुकून माहित नसलं तर सांगतो, आज जागतिक इडली दिन आहे हं.
दरवर्षी ३० मार्च रोजी जागतिक इडली दिन साजरा केला जातो. २०१५ साली चेन्नईमधील एनियावन नावाच्या एका बल्लवाचार्याने १३२८ प्रकारच्या इडल्या बनवल्या आणि त्याचबरोबर ४३ किलोची एकाच इडली बनवली. तेंव्हापासून इडली दिनाची सुरुवात झाली आणि मग पांढरी, वाफाळती, हलकी, फुसफुशीत अशी असलेल्या इडलीला हा दिवस समर्पित झाला.
तांदूळ आणि उडीदडाळ यांची इडली पचायला हलकी असते. इडलीसोबत शेंगदाणे, दाळवं यांची चटणी ही तेलंगणात लोकप्रिय आहे. आंध्रातही तेच. तामिळनाडूत मात्र इडलीसोबत खोबऱ्याची चटणी हवी. अर्थात सर्वच ठिकाणी इडली-सांबर, इडली-चटणी-सांबर, इडली चटणी-पूडचटणी, इडली रसम... असेही प्रकार पाहायला मिळतात.
पांढरीशुभ्र इडली म्हणजे कोरा कॅनवास आहे असं समजा, त्यावर हवे ते रंग भरता येतात!
इडली हा बहुतेक भारतातील सर्वात लोकप्रिय न्याहारीच्या प्रकार असावा. मला स्वतःलाही इडली हा पदार्थ खूप आवडतो!
अर्थात इडली हा केवळ सकाळीच खाण्याचा पदार्थ आहे असे नाही. आम्ही अनेकदा रात्री इडली खातो. खरंतर आम्ही कोणत्याही वेळी काहीही खातो म्हणून रात्री इडली, डोसा, पोहे, उपमा, शेवया, सुशीला (उग्गानी बज्जी) असे नाना प्रकार आमच्या घरी रात्रीच्या खाण्यासाठीही बनतात.
चला तर मग मिपाकर सुगरणींनो आणि बल्लवाचार्यांनो,
उद्या रविवार आहे. आता लगेच सहा वाजेपर्यंत तीनास एक प्रमाणात तांदूळ आणि उडीदडाळ भिजू घाला. झोपण्याच्या आधी, म्हणजे दहा वाजेपर्यंत मिक्सरमधून सरसरीत फिरवून घ्या आणि त्या पिठावर एक हिरवी मिरची ठेवून झाकून ठेवा. सध्या उन्हाळा आहे, पीठ मस्त आंबेल!
सकाळी उठल्यावर सांबर-चटणीची तयारी करा. आठ-नऊ वाजेपर्यंत, मस्त शेंगदाणे-दाळवांची चटणी, भरपूर फोडी-भाज्या घातलेलं, उकळतं सांबर, पांढरीशुभ्र वाफाळती इडली यांच्या आस्वाद... घेण्याआधी इथे फोटो टाका आणि मगच खायला सुरु करा!
माझ्या घरचे इडलीचे काही फोटु -
इडलीत ताजे मटारदाणे -
इडली सांबर चटणी व अद्रकचटणी -
इडली खाण्याची माझी आवडती प्लेट -
इडली चटणी व शेवग्याच्या शेंगांचे सांबर -
इडलीप्रेमींनो,
आपलं इडलीवरचं प्रेम इथे प्रतिसादरूपात व्यक्त करायला विसरू नका!
#WorldIdliDay2024
वाचने
8942
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहेत फोटो.
छान फोटोज
थोडी शिळी झालेली इडली तुकडे
छान
म्हणजे कांचिपुरम इडली.
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
मी पण इडलीप्रेमी...
आठव्या शतकातील तामिळ शिलालेखाचा शोध
- मनुस्मृती मध्ये इड्डलिका नावाच्या पदार्थाचा उल्लेख आहे, जो इडलीसारखाच असावा.
- शिलप्पदिकारम नावाच्या तमिळ महाकाव्यात इडली नावाच्या पदार्थाचा उल्लेख आहे. हे महाकाव्य दुसर्या शतकात लिहिले गेले होते आणि ते तमिळ साहित्यातील पाच महाकाव्यांपैकी एक आहे. "शिलप्पदिकारम" मध्ये, "इडली" ला एका स्वादिष्ट पदार्थाचे वर्णन आहे. "शिलप्पदिकारम" मधील "इडली" चा उल्लेख हा प्राचीन भारतातील खाद्य संस्कृतीचा एक मौल्यवान पुरावा आहे.
- वराहमिहिर यांनी लिहिलेल्या बृहत्संहिता नावाच्या ग्रंथात इड्डलिका नावाच्या पदार्थाचा संदर्भ आहे. बृहत्संहितेत इड्डलिका बनवण्याची कृती देखील दिली आहे.
ही कृती आजच्या इडली बनवण्याच्या पद्धतीसारखीच आहे आणि त्यात तांदूळ आणि उडीद डाळ भिजवणे, त्यांचे पीठ बनवणे आणि ते वाफवून तयार करणे समाविष्ट आहे.
थोडक्यात इड्डलिका हा पदार्थ इडलीच आहे. इड्डलिका हे भिजवलेले तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवलेले आणि वाफवून तयार केले जात असत. अर्थातच इडली हा प्राचीन भारतीय पदार्थ आहे यात संशय नाही. कुणी हे ग्रंथ वाचले असल्यास आणि त्यांतले संदर्भ दिल्यास आभारी असेन. या शिवाय अजून ऐतिहासिक काही उल्लेख असल्यास मला कल्पना नाही. पण असले पाहिजेत. इडली हा शब्द कन्नड भाषेतील "इडलीगे" या शब्दापासून आला असावा असा एक कयास आहे. "इडलीगे" या शब्दाचा अर्थ "इडली बनवणे" असा असावा.इडली-वडा हे प्राणप्रिय सोबती
आजची इडली -
अरे वाह !
इडली आवडता प्रकार मात्र
इडली, बेंगलोर आणि मी
In reply to इडली आवडता प्रकार मात्र by प्रचेतस
भारीय हे, इथं पुण्यात डिप
In reply to इडली, बेंगलोर आणि मी by हणमंतअण्णा शंक…
अगदी...
In reply to इडली, बेंगलोर आणि मी by हणमंतअण्णा शंक…
इडली वडे साबार उडपी लोक
वारलो !
तोंपासू!
तुमच्याकडे मिनी इडली पात्र
ह्या इडल्या छान लागतात
In reply to तुमच्याकडे मिनी इडली पात्र by Bhakti
इडलीचे सगळे प्रकार एनीटैम
इडली नेमकी कशी बनवली तर सर्वात जास्त आरोग्यदायी होते ?
चव कमी चांगली लागली तरी चालेल