Skip to main content

अप्रकाशित विनोदी साहित्य हवे आहे

लेखक विनिता००२ यांनी गुरुवार, 14/04/2022 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लेखक मित्र-मैत्रिणींनो, 'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात… आपण विनोदी साहित्य लिहीत असाल...जसे की विनोदी कथा, चुटकुले, नाटुकले इत्यादी तर आपण आपले स्वलिखित 'अप्रकाशित साहित्य' आम्हांला देऊ शकता. (फार ओढून ताणून केलेले विनोद नकोत, तसेच व्हॉट्सअप विनोद नकोत. कुठलेही कमरेखालचे विनोद नकोत.) निखळ फॅमिली ड्रामा हवा. उदा. वागळे की दुनिया, तारक मेहता का उल्टा चष्मा...आपल्या पुलंचं साहित्य. निवड झालेल्या साहित्याचे ऑडिओबुक बनेल अगदी मोफत! ( साहित्याचे मानधन मिळेल.) ...आणि नामांकित पॉडकॉस्टवर त्याचे प्रसारण होईल.....! अट एकच....साहित्य अप्रकाशित हवे...कुठल्याही माध्यमात ते प्रकाशित नको. तसा करार केला जाईल. लगेच संपर्क साधा… विनिता - ७७०९०७३००८
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5324
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

शुभेच्छा ! विनोदी लेखन करणार्‍या आमच्या मित्रांना सदर मेसेज फॉरवर्ड करत आहोत . आता अवांतर : मिसळपाववर कोणी जेन्युईन विनोदी लेखन करणारे तुम्हाला कदाचित कोणीच सापडणार नाही. २०१४ मध्ये मोदी देशाचे पंतप्रधान झाले अन मिसळपाव मोदी समर्थक अन मोदीद्वेष्टे अशा दोन गटात विभागला गेला. त्यानंतर तुम्ही कोणत्याही धाग्यावर जावा तुम्हाला कोणी ना कोणी हा वाद काढताना दिसेल. नजिकच्या मिपावर वाचलेले जेन्युईन विनोदी लेखन मला आठवतच नाही. जे काही विनोद आहेत ते सारे राजकीय ढंगानेच आहेत , काथ्याकुट ह्या विभागात ! उदाहरणार्थ : कझाकस्तान मधील अशांतता पाहुन भारतात अशांतता व्हावी हे डोहाळे लागलेले प्रतिसाद . किंवा पाच पैकी चार राज्यात बहुमताने सरकार स्थापन करुन पंजाबमध्ये मोदीला त्याच्या धोरणांचा कसा फटका बसला ह्यावर चर्चा करणारे प्रतिसाद ! किंवा स्त्री लंगिकतेच गुढ ह्या माहीतीपुर्ण धाग्यात आलेले मायावती अन ममता ह्यांचे उल्लेख . किंव्वा कश्मीरफाईल्स धाग्यावर हा चित्रपट कसा द्वेष निर्माण करतो असे प्रतिपादन करणारे प्रतिसाद ! हे सर्व आमच्यासाठी भयंकर विनोदी आहे . =)))) पण मुळ निखळ , न बोचणारा , अराजकीय विनोद मिपावरुन हरवला तो हरवलाच . हे केंद्राचे अन भाजपाचे कारस्थान आहे . मिसळपाव ला बदनाम करु नका. मिसळपाव दिल्लीपुढे झुकणार नाही =)))) आता २०२४ मध्ये राहुलजीं पंतप्रधान झाले की मिपावर रिनेसान्स होऊन परत एकदा उच्च दर्जाच्या विनोदी साहित्याची लाट येईल ह्यात आम्हाला संशय नाही . =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

आता २०२४ मध्ये राहुलजीं पंतप्रधान झाले की माझा पण हाच होरा आणी मनापासुन इच्छा आहे. एकंदरीत भारतात आणी मिसळपावावर दुखी आत्मे वाढलेत. निदान त्यांच्या निमीत्ताने तरी २०२४ पासुन विनोदांचा शिडकावा होईल भारतात. ( खरतर त्यांची कुवत जगावर विनोदांचा शिडकावा करण्याची आहे...पण ते एक असोच)

उकडीचे मोदक - एक ब्लेमगेम! (https://www.misalpav.com/node/37288) काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने (https://www.misalpav.com/node/23849) काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -२ (https://www.misalpav.com/node/23962) काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -३ (https://www.misalpav.com/node/24058)

नमस्कार. मी तुमच्या व्यक्तिगत आयडीवर संपर्क करू शकतो का ? मी भारताबाहेर राहतो म्हणून हा प्रश्न.

In reply to by सौन्दर्य

नमस्कार संपर्काला काही प्रॉब्लेम असेल तर सांगावे.

सगळे प्रतिसाद पाहीले. प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंडळी :) मला 'अप्रकाशित साहित्य' हवे आहे..जे कुठेच, कुठल्याच माध्यमात प्रकाशित नको.

In reply to by धर्मराजमुटके

अप्रकाशित विनोदी साहित्य
हा नेहमीच्या विनोद / चुटकुले यांच्यापेक्षा थोडा वेगळा प्रकार धागालेखिकेला अपेक्षित असावा. माझ्याकडे असे काही अप्रकाशित साहित्य आहे. ते मी पाठवून देईन.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

https://bookhungama1.rssing.com/chan-58572808/article312.html कदाचित असं काहीतरी अपेक्षित असावं. धागालेखिका यांनी खुलासा करावा.

In reply to by धर्मराजमुटके

अप्रकाशित म्हणजे जो ऐकणार्‍यांन्साठी नवीन असेल....आधी कुठेच ऐकलेला नसेल, छापलेला नसेल. नवा कोरा असेल....एव्हडा खुलासा पुरे असावा.

निवड झालेल्या साहित्याचे ऑडिओबुक बनेल अगदी मोफत! ( साहित्याचे मानधन मिळेल.) ...आणि नामांकित पॉडकॉस्टवर त्याचे प्रसारण होईल.....! विनोदा शिवाय इतर विषयावर भविष्यात पॉडकास्ट करण्याचा विचार आहे का?