Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चंद्रसूर्यकुमार on Wed, 01/19/2022 - 20:43
गोव्यात प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री फिलीप नेरी रॉडरीग्ज यांनी मंत्रीपदाचा आणि आमदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर विफ्रेड डिसा या आमदारांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला आहे. हेच दोन आमदार जुलै २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. ते आता स्वगृही चालले आहेत. परवाच बघितले की २०१७ मध्ये निवडणुका झाल्यानंतर गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या ४० आमदारांपैकी २४ आमदारांनी पक्षांतर केले आहे.आता हे आणखी दोन आमदार दुसर्‍यांदा पक्षांतर करत आहेत. विधानसभेत निवडून आलेल्या ६०% आमदारांनी पक्षांतर केले असे दुसरे उदाहरण बघायला मिळणे अशक्यच वाटते. आता तरी निवडणुकीत पक्षांतर करायची शक्यता नसलेल्यांनाच लोकांनी निवडून द्यावे ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
  • 48713 views

प्रतिक्रिया

Submitted by सुबोध खरे on Fri, 01/28/2022 - 09:49

In reply to कम्युनिस्टांचा आग्रह by चंद्रसूर्यकुमार

Permalink

हमीद अन्सारी हा देशद्रोही

हमीद अन्सारी हा देशद्रोही माणूस आहे असे अनेक वेळेस पुढे आलेले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Fri, 01/28/2022 - 11:58

In reply to हमीद अन्सारी हा देशद्रोही by सुबोध खरे

Permalink

भारताच्या हिताचे रक्षण करू शकले नाहीत

तेहरानमध्ये असताना अन्सारी भारताच्या हिताचे रक्षण करू शकले नाहीत असे दिसते आहे. तेव्हा अशी चार प्रकरणे घडली होती. अन्सारीची इराणमधून बदली झाली तेव्हा भारतीय दूतावासात जल्लोष झाला होता. हा माणूस उपराष्ट्रपती असतांना काय काय विध्वंस करून गेला असेल याची कल्पना ही आपण करू शकत नाही. या शिवाय हा विविध ठिकाणी राजदूत म्हणून कार्यरत असतांना काय भानगडी होत असतील? कोणती माहिती कुणाला कशी मिळत असेल असेल? त्या काळात अन्सारीच्या तेहरानमधील पाकिस्तानी राजदूताशी झालेल्या दीर्घ भेटी चर्चेत होत्या. त्यात काय घडत असे हे कधीच बाहेर आले नाही. भारताचा उपराष्ट्रपतीच पाक धार्जिणा असणे हे केव्हढे भव्य यश आय एस आय ने मिळवले होते? भारताचे यश काय हे मात्र दिसत नाही..?
  • Log in or register to post comments

Submitted by रावसाहेब चिंगभूतकर on Fri, 01/28/2022 - 12:33

In reply to भारताच्या हिताचे रक्षण करू शकले नाहीत by निनाद

Permalink

कुलभूषण जाधव ला इराण मध्येच

कुलभूषण जाधव ला इराण मध्येच पकडलं गेलं होतं. बहुधा भारत आपल्या हेरांना बलुचिस्तान मध्ये इराण मार्गे पाठवत असणार. आणि जाधब कोण ही माहिती कुठून तरी लिक झाली असणार.
  • Log in or register to post comments

Submitted by वामन देशमुख on Fri, 01/28/2022 - 12:43

In reply to भारताच्या हिताचे रक्षण करू शकले नाहीत by निनाद

Permalink

प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहे

प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहे.
तेहरानमध्ये असताना अन्सारी भारताच्या हिताचे रक्षण करू शकले नाहीत असे दिसते आहे.
खरंतर अन्सारी या व्यक्तीने तिच्या संपूर्ण कार्यकाळात भारत-हितविरोधी कामेच केलेली आहेत असे दिसते. --- मोदी-शहा यावर जनतेला दिसेल अशी आणि भविष्यात दुसरे अन्सारी तयार होऊ नयेत अशी काय कारवाई करतात ते पाहू.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 01/27/2022 - 21:25

Permalink

भाजप आमदार राणे

भाजप आमदार राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने शरण येण्यास सांगितले . पप्पा राणे पाठोपाठ छोटा राणे जेलमध्ये नंबर लावणार !
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on गुरुवार, 01/27/2022 - 22:09

In reply to भाजप आमदार राणे by कपिलमुनी

Permalink

भाजपच्या लोकांना महाराष्ट्र

भाजपच्या लोकांना महाराष्ट्र हा युपी नाही दादागीरी करायला हे कळाले असेल. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 01/28/2022 - 09:47

In reply to भाजपच्या लोकांना महाराष्ट्र by अमरेंद्र बाहुबली

Permalink

महाराष्ट्रातकाय द्या

महाराष्ट्रात

काय द्या

चे राज्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 01/28/2022 - 11:46

In reply to महाराष्ट्रातकाय द्या by सुबोध खरे

Permalink

म्हणूनच २०१९ ला पवारानी

म्हणूनच २०१९ ला पवारानी लत्तापालट करून महाराष्ट्र वाचवला.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 01/28/2022 - 11:51

In reply to म्हणूनच २०१९ ला पवारानी by अमरेंद्र बाहुबली

Permalink

हा हा हा

हा हा हा छान विनोद होता अजून पाठवा
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 01/28/2022 - 12:11

In reply to हा हा हा by सुबोध खरे

Permalink

विनोद? सत्ता पालट केली २०१९

विनोद? सत्ता पालट केली २०१९ ला हे खोटं का?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 01/28/2022 - 12:16

In reply to विनोद? सत्ता पालट केली २०१९ by अमरेंद्र बाहुबली

Permalink

महाराष्ट्र वाचवला.

महाराष्ट्र वाचवला.

हा हा हा ही ही ही पवारांसारख्या xxxxx माणसा मुळे महाराष्ट्र वाचायला ते काय एखादं डबक्यात बुडणारं शेम्बडं पोर आहे का? काय पण तुमच्या बुद्धीची अगाध झेप?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 01/28/2022 - 12:58

In reply to महाराष्ट्र वाचवला. by सुबोध खरे

Permalink

नाही ना. पण १०५ घरी बसवले, नी

नाही ना. पण १०५ घरी बसवले, नी आपली ऊभी हयात खर्च करून विकसीत केलेला महाराष्ट्र भाजपच्या ताब्यात जाण्यापासून वाचवला. नाहीतर भाजपने महत्वाची कार्यालये गुजरात ला हलवून, मुंबईतून मराठी माणसाला देशोधडीला लावून महाराष्ट्राचा युपी, बिहार केला असता. मोदी त्याना गुरू मानतात ते ऊगाच का? :)
  • Log in or register to post comments

Submitted by सर टोबी on Fri, 01/28/2022 - 14:46

In reply to महाराष्ट्र वाचवला. by सुबोध खरे

Permalink

डबक्यात बुडणारं शेंबडं पोर आहे का?

या वाक्याचा काय अर्थ घ्यायचा. डबक्यात जे बुडतं ते शेंबडं पोर असतं. किंवा शेंबडी पोरं डबक्यातच बुडतात. किंवा शेंबूड आल्यावर डबक्याच्या बाजूने जाऊ नये. कुमार १, यावर काही मनोरंजक खेळ तयार करता येईल का?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 01/28/2022 - 15:17

In reply to डबक्यात बुडणारं शेंबडं पोर आहे का? by सर टोबी

Permalink

खिक्क. किंवा शेंबंडं पोर असेल

खिक्क. किंवा शेंबंडं पोर असेल तरच त्याला डबक्यात बूडण्यापासून वाचवावे. बूडनार्या पोराच्या नाकाला शेंबूड आहे का ते पहावे. शेंबूड नसेल तर शेंबूड यायची वाट पहावी मगच वाचवावे?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 01/28/2022 - 19:59

In reply to खिक्क. किंवा शेंबंडं पोर असेल by अमरेंद्र बाहुबली

Permalink

शेम्बडं पोर म्हणजे ज्याला

शेम्बडं पोर म्हणजे ज्याला स्वतःचा शेम्बूड पुसता येत नाही इतका लहान मूल. डबक्यात पडल्याने आपल्याला मृत्यू येईलही समजण्याइतकी समज/ अक्कल न आलेलं प्रतीक साहेब फडतूस प्रतिवाद करण्यापेक्षा केवळ मोदी द्वेषाचे दोन ओळींचे प्रतिसाद येथे देण्यापेक्षा काहीतरी चांगली माहिती असणारे प्रतिसाद किंवा चांगले लेख टाकले तर बरं होईल. निदान श्री मोदींचं काय चुकलं आणि तेथे काय करता येऊ शकलं असतं याचे समग्र विश्लेषण असलं तर चर्चा करता येईल अन्यथा आमचे विद्वान मित्र मोगा उर्फ हितेश उर्फ चंपाबाई यांच्यासारखे केवळ भंपक प्रतिसाद दिल्यास वितंडवाद सोडून काहीच निष्पन्न होणार नाही. बघा जमतंय का? नाही तर चालु द्या तुमचे तेच ते अन तेच ते
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Fri, 01/28/2022 - 04:19

Permalink

उद्या

२९ जानेवारी रोजी शुक्र धनु राशीत प्रवेश करेल.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on Fri, 01/28/2022 - 14:09

In reply to उद्या by निनाद

Permalink

त्याने काय होणार आहे?

.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Fri, 01/28/2022 - 12:10

Permalink

ठाकरे सरकारला सुप्रीम

ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले रद्द https://maharashtratimes.com/india-news/supreme-court-quashes-one-year-suspension-from-the-maharashtra-legislative-assembly-of-12-bjp-mlas/articleshow/89172796.cms
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Fri, 01/28/2022 - 14:02

In reply to ठाकरे सरकारला सुप्रीम by प्रसाद_१९८२

Permalink

संजय राऊत उवाच

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा विधानसभेच्या अधिकारावर अतिक्रमण करणारा आहे आणि तो लोकशाहीसाठी असलेला धोका (डेंजर टू डेमॉक्रसी) आहे असे श्री.रा.रा.संजय राऊत म्हणत आहेत. हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान नाही का? त्याबद्दल राऊतविरोधात कंटेम्प्टची केस दाखल होऊ शकेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Fri, 01/28/2022 - 14:28

In reply to संजय राऊत उवाच by चंद्रसूर्यकुमार

Permalink

त्या साठी राज्य घटना काय सांगते हे महत्वाचे

सरकार येतील आणि जातील सरकार जनता निवडते आणि ते सरळ लोकांना जबाबदार असते न्यायालय किंवा प्रशासन ही फक्त यंत्रणा आहे ती लोकांना बांधील नसते. त्या मुळे घटनाकार नी न्यायालय,संसद,विधानसभा ह्यांना मर्यादा घालून दिली आहे ती सीमारेषा कोणीच ओलांडायची नाही नाही तर फक्त वाटोळे होईल . सरकार कोणाचे आहे ही फालतू बाब आहे. कोणती संस्था मर्यादा सोडून काम करत नाही ना हे महत्वाचे आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 01/28/2022 - 20:06

In reply to त्या साठी राज्य घटना काय सांगते हे महत्वाचे by sunil kachure

Permalink

ती सीमारेषा कोणीच ओलांडायची

ती सीमारेषा कोणीच ओलांडायची नाही आपण न्यायालयाचा निवाडा पूर्ण वाचला आहे का? न्यायालयाने सीमारेषा कशी ओलांडली आहे हे आपल्याला सांगता येईल का? अगणित काळासाठी आमदारांना निलंबित करता येणार नाही असे न्यायालय का म्हणते हे वाचलंय का? याचा गैरवापर किती आणि कसा होऊ शकतो हेही त्या निकालात लिहिलेले आहे. श्री राऊत काय म्हणतात त्याला अगदी शिवसैनिक सुद्धा सिरियसली घेत नाहीत. बाकीच्यांचं तर सोडाच. अन्यथा "नॉटी आणि हर्बल तंबाखू" वर एवढे शेकड्याने विनोद आले नसते. त्यांना राजकारणच करायचे आहे. तुम्ही त्यांच्या सतरंज्या कशाला उचलताय? निकाल वाचला असता तर असली भंपक विधाने केली नसती.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Fri, 01/28/2022 - 12:56

Permalink

महाराष्ट्र चे राजकरण

महाराष्ट्रात चालणारे राजकारण आणि यूपी ,बिहार सारख्या राज्यात चालणारे राजकारण ह्या मध्ये खूप फरक आहे. महाराष्ट्रात एक वेगळी परंपरा आहे .बाकी राज्यांपेक्षा नीती चे राजकारण ह्या राज्यात होते. विकास ची दृष्टी असणारे च मुख्यमंत्री ह्या राज्याने बघितले आहेत अगदी यशवंत राव ह्यांच्या पासून आज च्या ठाकरे साहेब न पर्यंत सर्व मुख्य मंत्री कार्यक्षम च ह्या राज्याला लाभले. यूपी,बिहार सारखी विरोधी मता च्या लोकांची हत्याकांड ह्या राज्यात झाली नाहीत. जाती ,धर्माचे टोकाचे राजकारण ह्या राज्यात झाले नाही ही राज्याची परंपरा बदलून,. यूपी,बिहार सारखे गलिच्छ राजकारण इथे रुजविण्याचे प्रयोग bjp करत आहे. आणि ते अयोग्य आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 01/28/2022 - 20:12

In reply to महाराष्ट्र चे राजकरण by sunil kachure

Permalink

बाकी राज्यांपेक्षा नीती चे

बाकी राज्यांपेक्षा नीती चे राजकारण ह्या राज्यात होते. हा हा हा हि हि हि सर्वात जास्त आमदार निवडून आलेला पक्ष विरोधात बसलाय त्यांच्याशी युती केलेला पक्ष मुख्यमंत्रीपदासाठी आपल्या कट्टर विरोधकांबरोबर सत्तेत बसलाय. जाती ,धर्माचे टोकाचे राजकारण ह्या राज्यात झाले नाही हा हा हा हि हि हि ब्रिगेडी लोक कोणत्या राज्यात आहेत? ओ बी सी आंदोलन नंतर मराठा आंदोलन नंतर धनगर आंदोलन कशासाठी आहे हो? कशाला उगाच फुक्या मारताय? we dont caste vote we vote caste इंग्रजीत आहे बघा समजलं तर
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Fri, 01/28/2022 - 13:50

Permalink

असे कधी ह्या राज्यात घडले होते का

एक न्यूज चॅनल चा टीव्ही anchor राज्याच्या मुख्यमंत्री असलेल्या व्यक्ती लं आरे तुरे करतो आणि विरोधी पक्ष त्या अँकर ची बाजू घेवून रस्त्यावर उतरतात. राज्याच्या मुख्यमंत्री असलेल्या व्यक्ती चा अपमान विरोधी पक्षांना राज्याचा अपमान वाटत नाही. असे ह्या राज्यात कधीच घडले नाही. एक अभिनेत्री राज्याच्या मुख्यमंत्री वर खुळचट,बावळट कॉमेंट करत असते . आणि विरोधी पक्ष त्या नटी साठी राज्याची प्रतिष्ठा सोडून रस्तावर उतरतात . असे ह्या राज्यात कधीच घडले नाहीं. Bjp विषयी वाईट मत मराठी लोकात निर्माण झाली ती ह्याच प्रसंग वरुंम
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Fri, 01/28/2022 - 13:55

Permalink

फडणवीस साहेब मुख्यमंत्री असते

आणि न्यूज अँकर आणि अभिनेत्री नी त्यांचा अपमान होईल अशी भाषा वापरली असती तर . महारष्ट्र ची जी परंपरा आहे त्याचे पालन विरोधी पक्षांनी केले असते. ते अभिनेत्री आणि अँकर साठी रस्त्यावर नक्कीच उतरले नस्तेम
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 01/28/2022 - 15:17

Permalink

नवा व्हेरियन्ट...

च्यायला, नव्या व्हेरियन्टचं आगमन. आता पुन्हा किती डोस घ्यावे लागतील. काय माहिती. २०२५ पर्यन्त दहा एक बुष्टर डोस घ्यावे लागतील वाटतं. यापेक्षा घण्टी, थाळी, मशाल मोर्चे भारी होते. आकाशातून नील किरणे येऊन व्हायरसचा ख़ात्मा होतो. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Fri, 01/28/2022 - 15:22

In reply to नवा व्हेरियन्ट... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

मला माहित नाही

तरी सांगतो हा नवीन variant आणि त्या विषयी कांगावा करणारे ब्रिटन आणि अमेरिका च असणार. हेच लस उत्पादक पण आहेत Who ह्यांची दासी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Fri, 01/28/2022 - 23:23

In reply to मला माहित नाही by sunil kachure

Permalink

१८८ साहेब. तुम्हाला काहीही

१८८ साहेब. तुम्हाला काहीही म्हणजे अगदी काहीही माहीत नसते हे सगळ्यांना माहीत आहे. जरा हात्पाय हलवा हो. त्या लिंकेत ब्रिटन आणि अमेरिका नाही तर तुमच्या लाडक्या चीन चे सायंटीस्ट तसे म्हणत आहेत. नव्या अवतारात तरी सुधरा !!
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Sat, 01/29/2022 - 13:23

In reply to १८८ साहेब. तुम्हाला काहीही by सुक्या

Permalink

ऑ!!!!

श्री. सुक्या, तुमच्यावर कंटेम्ट ऑफ १८८ ची केस का दाखल करण्यात येवु नये. साक्षात जगतगुरुंना हातपाय हलवायला नी सुधरायला सांगताय
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Tue, 02/01/2022 - 01:09

In reply to ऑ!!!! by इरसाल

Permalink

आय माय स्वारी . . .

आय माय स्वारी . . . भावनेच्या भरात लिहुन गेलो ... आता आत्मक्लेश करावा म्हणतो आळंदीला जाउन . .
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Sun, 01/30/2022 - 00:40

In reply to १८८ साहेब. तुम्हाला काहीही by सुक्या

Permalink

१८८ कोण माहीत नाही

पण ह्या वुहान लॅब नक्की कोण चालवते ह्या वर अनेक उलट सुलट माहिती नेट वर असते. अगदी बिल gate च हया लॅब शी संबंध आहे असे पण दावे आहेत. काही ही असो पण ही वुहान लॅब आणि अमेरिका ब्रिटन ह्यांचे कनेक्शन असण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक फायदा जिथे असेल तिथे दुश्मन पन मित्र होतात . भारताचे चीन शी मतभेद दाखवायला तीव्र आहेत . पण आर्थिक व्यवहार वाढत च आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 01/31/2022 - 10:59

In reply to १८८ कोण माहीत नाही by sunil kachure

Permalink

भारताचे चीन शी मतभेद दाखवायला

भारताचे चीन शी मतभेद दाखवायला तीव्र आहेत . हायला मग डॉकलाम किंवा गाल्वान खोऱ्याच्या हाडं गोठवण्याच्या थंडीत भारतीय लष्कराचे जवान काय भांगडा खेळायला उभे आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sat, 01/29/2022 - 20:52

Permalink

परत एकदा पिगॅसस

परत पिगॅसस प्रकरण चर्चेत आले आहे. २०१७ मध्ये पंतप्रधान मोदींनी इस्राएलला ऐतिहासिक भेट दिली. त्यावेळी भारत-इस्राएल संरक्षण करार झाला त्या कराराद्वारे भारत सरकारने इस्राएलकडून पिगॅसस हे हेरगिरीसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान घेतले असा दावा न्यू यॉर्क टाईम्समध्ये आलेल्या एका रिपोर्टमध्ये केला गेला आहे. एक गोष्ट कळत नाही. याविषयी सर्वोच्च न्यायालयाने तज्ञांची समिती नेमली आहे. त्या समितीकडे आमचे फोन अशाप्रकारे या हेरगिरीला बळी पडले आहेत अशाप्रकारे कोणी तक्रार केली आहे का आणि तांत्रिक तपासासाठी ते फोन सादर केले गेले आहेत का? अशाप्रकारे कोणती बातमी आलेली मी तरी वाचलेली नाही. तेव्हा त्या सर्वोच्च न्यायालयाच्या समितीकडे फोन तपासणीसाठी दिलेच नसतील तर ती समिती नक्की कसला तपास करणार आहे? सुरवातीला फ्रान्समधील कोणत्यातरी नियतकालिकात उडतउडत आलेल्या बातमीवरून विसंबून राहून मोदी सरकारने आमचे फोन बग केले असतीलच अशी कल्पना केली तर त्यातून धुराळा उडायचा तो उडू शकेल पण तो मुद्दा सिध्द करायला तांत्रिक तपासणीच करायला लागेल ना? त्याविषयी काय? आणि दुसरे म्हणजे संसदेच्या अधिवेशनाच्या वेळेसच बरे पिगॅसस संबंधी असे कोणते कोणते रिपोर्ट येतात? आणि तिसरे म्हणजे आता न्यू यॉर्क टाईम्समध्ये आलेली बातमी असा दावा करत आहे की भारत सरकारने ते तंत्रज्ञान इस्राएलकडून विकत घेतले. ते तंत्रज्ञान विकत घेतले असे क्षणभर सत्य जरी मानले तरी त्याचा अर्थ सरकारने त्या तंत्रज्ञानाचा वापर विरोधकांवर हेरगिरीसाठी केला असा होतो की तसा वापर केला जाईल ही भिती आहे? नुसती भिती असेल आणि अमुक झाले तर तमुक होईल या कल्पनांना नक्की कितपत अर्थ आहे? म्हणजे घरी असलेल्या दोरखंडाला साप मानून घाबरायला लागले तर त्या भितीचे काय करायचे?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 01/31/2022 - 11:03

In reply to परत एकदा पिगॅसस by चंद्रसूर्यकुमार

Permalink

हि बातमी केवळ संसदेच्या

हि बातमी केवळ संसदेच्या अधिवेशनासाठी आलेली नाही तर पंजाब उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेली आहे. आणि आता संसदेत वाटेल ते आरोप करायला विरोधक आणि त्याला प्रसिद्धी करायला डावे पत्रकार पुढे सरसावतील. सदनात केलेल्या भाषणा/आरोपांबद्दल गुन्हा दाखल करता येणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Mon, 01/31/2022 - 12:49

In reply to हि बातमी केवळ संसदेच्या by सुबोध खरे

Permalink

सदनात केलेल्या भाषणा/आरोपांबद्दल गुन्हा दाखल करता येणार नाही

राज्य घटना लिहत असताना किती खोल वर विचार करून ती लीहली आहे. ह्याचा प्रतेय नेहमी येतो संसदेची सभागृह ,आणि राज्याची सभागृह ह्यांना विशेष अधिकार दिलेले आहेत. त्यांच्या क्षेत्रात न्यायालय पण हस्तक क्षेप करू शकत नाही तसा त्यांना अधिकार नाही. खूप विचार करून हे कलम घटनेत आहे. लोकशाही मध्ये लोक सर्वोच्च स्थानी आहेत.आणि लोकांनी निवडलेले सरकार ह्यांना सर्वोच्च अधिकार आहेत. संसदेत काही ही मत बिन्धास्त मांडता यावे म्हणून त्यांना विशेष संरक्षण घटनेने दिले आहे. आणि हे अतिशय योग्य च आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 01/31/2022 - 12:59

In reply to सदनात केलेल्या भाषणा/आरोपांबद्दल गुन्हा दाखल करता येणार नाही by sunil kachure

Permalink

खूप विचार करून हे कलम घटनेत

खूप विचार करून हे कलम घटनेत आहे. काय सांगताय? असं एखादं कलम मिपाच्या घटनेत का नाही? ज्यात केवळ खूप विचार करून दिलेला प्रतिसादच प्रकट व्हावा
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Mon, 01/31/2022 - 13:41

In reply to खूप विचार करून हे कलम घटनेत by सुबोध खरे

Permalink

सुबोध खरे

तुमच्या मताचे स्वागत आहे .तुमच्या सूचनेचे पण स्वागत आहे. पण विचार करण्याचे स्वतंत्र,ते व्यक्त करण्याचे स्वतंत्र जे आपली राज्य घटना देते त्याची गळचेपी करायची का? ठराविक प्रकारचे विचार च लोकांनी करावेत,ठराविक प्रकारची मत च लोकांनी व्यक्त करावीत आणि हेच योग्य आहे. असे तुम्हाला वाटत असेल तरी त्याचे स्वागत आहे. तुम्हाला तो अधिकार भारताची राज्य घटना देते. आणि ते फक्त मत आहे कृती नाही . ही T@c आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 01/31/2022 - 14:33

In reply to सुबोध खरे by sunil kachure

Permalink

मी ठराविक प्रकारे विचार करा

मी ठराविक प्रकारे विचार करा असे म्हटलेलेच नाही तर खूप विचार करून लिहा असेच लिहिलेले आहे . उचलला हात आणि बडवला कळफलक असे होऊ नये इतकीच अपेक्षा आहे. तेंव्हा प्रतिसाद पूर्ण वाचतही चला
  • Log in or register to post comments

Submitted by रावसाहेब चिंगभूतकर on Sun, 01/30/2022 - 09:54

Permalink

https://indianexpress.com

https://indianexpress.com/article/india/it-ministry-plan-one-digital-id-that-links-7747828/ सगळ्या डिजिटल आयडेंटिटीज ना एका मास्टर डिजिटल आयडी शी जोडण्याचे IndEA 2.0 या प्रोपोजल वर आयटी मिनिस्ट्री विचार करत आहे. या द्वारे आधार, पॅन, पासपोर्ट वगैरे वगैरे सर्व एकमेकांशी जोडले जाऊन एकाच आयडी द्वारे इपलब्ध असतील.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 01/31/2022 - 17:13

In reply to https://indianexpress.com by रावसाहेब चिंगभूतकर

Permalink

अतिशय उत्तम निर्णय आहे...

घुसखोरांना थांबवण्यासाठी, ही एक महत्वाची पायरी आहे ... मध्यंतरी ह्या विषयावर एक बातमी वाचली ... लिंक देतो... https://www.lokmat.com/crime/a-young-woman-who-remained-a-hindu-for-15-years-got-married-police-arrested-bangaladeshi-women-a629/ ------- भाजपच्या काळांत, संरक्षणा बाबतीत, योग्य निर्णय घेतले जात आहेत... अर्थात, घराणेशाहीची तळी उचलत असणार्या, लोकांना, ही गोष्ट कधीच समजणार नाही....
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 01/31/2022 - 17:08

Permalink

9 राज्यांमध्ये हिंदूंना 'अल्पसंख्याक' दर्जा देण्याचं प्रकरण

9 राज्यांमध्ये हिंदूंना 'अल्पसंख्याक' दर्जा देण्याचं प्रकरण, सुप्रीम कोर्ट केंद्रावर नाराज; म्हणाले.. https://lokmat.news18.com/amp/national/grant-of-minority-status-for-hindus-in-9-states-supreme-court-fines-central-government-over-response-mh-pr-663399.html -------- राज्यांचा संदर्भ देत त्यात म्हटले आहे की, लडाख, मिझोराम, लक्षद्वीप, काश्मीर, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पंजाब आणि मणिपूरमध्ये हिंदू अल्पसंख्याक आहेत. मिझोराम, मेघालय आणि नागालँडमध्ये ख्रिश्चन बहुसंख्य आहेत तर अरुणाचल प्रदेश, गोवा, केरळ, मणिपूर, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन लोकसंख्या आहे. तरीही त्यांना अल्पसंख्याक समुदाय म्हणून वागणूक दिली जाते. -------- समान नागरी कायदा हवाच, असे माझे वैयक्तिक मत आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by टिनटिन on Mon, 01/31/2022 - 19:12

Permalink

कनेडामध्ये ट्रकचालकांचे सक्तीच्या लसीविरोधात आंदोलन

आपल्या शेतकरी आंदोलनाशी बरेच साधर्म्य आहे. ओट्टावामध्ये ट्रकचालक रस्ते ब्लॉक करत आहेत. त्यांच्या वॉर मेमोरियलजवळ नासधूस केली आहे. आंदोलनामध्ये निओ नाझींचा शिरकाव झाल्याच्या बातम्या आहेत. आपल्या शेतकरी आंदोलनाबद्दल काळजी दाखवणारे कॅनडाचे पंतप्रधान आता काय करतात ते बघूया BBC Link
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 01/31/2022 - 19:14

In reply to कनेडामध्ये ट्रकचालकांचे सक्तीच्या लसीविरोधात आंदोलन by टिनटिन

Permalink

माहिती बद्दल धन्यवाद

माहिती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Mon, 01/31/2022 - 20:49

In reply to कनेडामध्ये ट्रकचालकांचे सक्तीच्या लसीविरोधात आंदोलन by टिनटिन

Permalink

एक गोष्ट कळत नाही

एक गोष्ट कळत नाही. कॅनडासारखा टिनपाट देश नक्की कोणत्या आधारावर मागच्या वर्षी शेतकरी आंदोलनात हुषार्‍या करत होता? कॅनडा म्हणजे कायम अमेरिकेचे शेपूट म्हणून राहण्यात धन्यता मानणारा लाळघोटा प्रकार आहे. ना लष्करी महासत्ता, ना आर्थिक महासत्ता, ना तंत्रज्ञानातील प्रगती. तरी अमेरिकेचे शेपूट म्हणून आणि त्यामुळे मिळालेले नाटोचे सदस्यत्व हे सोडले तर कॅनडाकडे नक्की काय आहे? जस्टीन ट्रुडो २०१८ मध्ये भारतात आला होता तेव्हा मोदींनी त्याची फार दखल न घेता त्याची बोळवण केली होती. असल्या देशाच्या असल्या पंतप्रधानांचा असलीच वर्तणूक दिली पाहिजे.
  • Log in or register to post comments

Submitted by सर टोबी on Mon, 01/31/2022 - 21:58

In reply to एक गोष्ट कळत नाही by चंद्रसूर्यकुमार

Permalink

नेमक्या कोणत्या आधारावर

इथले काही आयडी ठराविक लोकांना आणि देशाला लाळघोटे म्हणतात ते समजून घ्यायला आवडेल. स्वतः मोदी आणि भाजपाची चाटूगिरी करायची आणि इतरांना लाळघोटे म्हणायचे म्हणजे कमाल झाली. अजून विकासाचे कोंबडे आरवले पण नाही तरी मोदींनी नुसते धोरण जाहीर केले तरी भक्तांना गुलाबी स्वप्न पडायला लागतात.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Tue, 02/01/2022 - 07:59

In reply to एक गोष्ट कळत नाही by चंद्रसूर्यकुमार

Permalink

कॅनडासारखा टिनपाट देश नक्की

कॅनडासारखा टिनपाट देश नक्की कोणत्या आधारावर मागच्या वर्षी शेतकरी आंदोलनात हुषार्‍या करत होता? हे आहे ते तेथील भरकटलेलया २-३-४ शीख पिढीचे कारस्थान ... आणि हि मंडळी फक्त या आंदोलनात नाही तर दरवेळी १५ ऑग किंवा २६ जानेवारी ला भारतविरोधी आरडाओरडा करता असतात . मी कितीदा तरी मन्ड्ले आहे कि इतर देशात जेवहा हे तथाकथित देशव्यापी आंदोलन चालू होते त्यात शिखच का होते जास्त ! भारत डेथ बाय थौसंड कट्स याचा हा भाग
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 01/31/2022 - 19:26

Permalink

Air India TaTa Group: टाटांनी शब्द पाळला!

Air India TaTa Group: टाटांनी शब्द पाळला! एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना पहिली भेट मिळाली; पीएफ, पेन्शनमध्ये मोठे बदल https://www.lokmat.com/photos/business/air-india-tata-group-epfo-onboards-air-india-for-social-security-coverage-after-tata-groups-takeover-pf-contribution-pension-increased-a607/amp/ ------- आता परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे चेले, काय मत व्यक्त करणार?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 01/31/2022 - 19:29

Permalink

माझे फॉलोअर्स कमी झाले, वाढतच नाहीत, राहुल गांधींचं ट्विटरच्या

माझे फॉलोअर्स कमी झाले, वाढतच नाहीत, राहुल गांधींचं ट्विटरच्या CEO ना पत्र... https://www.lokmat.com/national/as-my-followers-dwindle-rahul-gandhis-letter-to-parag-agarwal-a601/amp/ --------- काय बोलावं, ते सुचेना.... ------
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त अवधुत on Tue, 02/01/2022 - 00:45

In reply to माझे फॉलोअर्स कमी झाले, वाढतच नाहीत, राहुल गांधींचं ट्विटरच्या by मुक्त विहारि

Permalink

त्यांचे

संसदेतले खासदार कमी झालेत, अमेठीमधले मतदार कमी झालेत, पक्षाचे लोकांमधुन आलेले नेते कमी झालेत, लोकोपयोगी आंदोलने झालीच नाहीत, पण त्यांना काळजी आभासी जगतातल्या फॉलोअर्सच्या संख्येची. आपलीआपली प्राथमिकता!!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 01/31/2022 - 20:17

Permalink

जिल्हा परिषदेच्या आवारात जुगार....

जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील जुगार अड्ड्यावर धाड, ८ कर्मचाऱ्यांना बेड्या, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त https://maharashtratimes.com/maharashtra/yavatmal/yavatmal-awdhutwadi-police-arrest-8-accussed-who-play-gambling-in-zp-office-area/articleshow/89251206.cms ह्या राज्यात मदिरालये चालू आहेत, वाईन विक्रीला पण, मोठ्या जागेतील दुकानांत विकायला परवानगी दिली आणि आता चक्क सरकारी कार्यालयात जुगार!!!!!!
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com