तर ही गोष्ट त्या वेळची ज्या वेळी वेळी स्कूटर साठी दहा पंधरा वर्षे थांबावं लागायचं, गॅससाठी दहा पंधरा वर्षे थांबावं लागायचं फोन साठी पंधरा-वीस वर्षे थांबावं लागायचं, तरीपण आपण कसे महान याचा रशियन स्टाइल प्रपोगंडा चालायचा त्यावेळी वीज वाचवा पाणी वाचवा आणि इंधन वाचवा अशा आमच्यावर संस्कार केले जात होते.
तसं त्यात काही चूक नाही आणि अजूनही आपल्याला हेच सांगितले जाते. इंधन वाचवा हे सांगण्याचे मुख्य कारण म्हणजे इंधन भारतात तयार होत नाही, भारत ते आयात करतो, आयात करण्यासाठी भारताला परकीय चलन द्यावे लागते आणि भारतामध्ये परकीय चलन त्या काळात नव्हते. त्यामुळे इंधन वाचणं म्हणजे देशभक्ती एक प्रकारे सांगितले जात होते.
सध्या इंधनाचे भाव शंभर रुपयाच्या वरती गेल्यामुळे परत एकदा तो हॉट टॉपिक झालेला आहे. मिसळपाव वरती पण गेल्या दोन चार महिन्यात या विषयावर बरेच धागे येऊन गेले. यातील मुख्य रोख हा सरकार प्रचंड कर लावून इंधनाच्या किमती कशा वाढीव ठेवते याच्यावरती होता, जे काही प्रमाणात खरंही आहे. पण ते अर्थशास्त्राच्या दृष्टीने बघावे म्हणून हा धागा.
कृपया कोणत्याही प्रकारे राजकीय चर्चा न करता फक्त अर्थ आणि मानस शास्त्राच्या दृष्टीने आपण या कडे बघायचा प्रयत्न करूया. कारण सरकार कोणतंही असलं तरी फार काही वेगळं होणार नाही.
तर
प्रचंड करांचे फायदे
- सरकारला शाश्वत आणि भरपूर उत्पन्न मिळतं
- अधिकच्या किमती लोकांना कमी इंधन वापरण्यास प्रोत्साहीत करतात (अतिश्रीमंत सोडले तर मध्यम वर्गावर नक्कीच थोडा परिणाम होतो. जिथे गरज असेल तिथेच वाहने वापरली जातात)
- परकीय चलन वाजते आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम कमी होतो.
- प्रवासासाठी स्वस्त पर्याय शोधण्यासाठी चांगले कारण मिळते जसे सध्या इथेनॉल किंवा इलेक्ट्रिक वाहनांसाठी संशोधन आणि प्रयत्न चालू आहेत.
- एखाद्या प्रगत अर्थव्यवस्थेत वाहतूक खर्च जीडीपीच्या आठ टक्के हा उत्तम मानला जातो. भारतात तो सुमारे १४ % आहे. महाग इंधनामुळे वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढतो त्यामुळे भारतीय उत्पादने ही आंतरराष्ट्रीय व्यापारात महाग ठरतात.
- स्पर्धात्मकता कमी झाल्याने काही क्षेत्रांतून आपण कायमचे बाहेर फेकले जातो आणि मग इतरांकडून त्याच गोष्टी घेताना आपल्याला वाढीव किंमती वरती घ्याव्या लागतात
- वाहतूक खर्च कमी झाल्याने किमती कमी होईल होतील त्यामुळे आपली उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात योग्य पद्धतीने स्पर्धा करू शकतील. इंधन स्वस्त झाल्याने त्याचा वापरही वाढेल परंतु आपण अधिक निर्यात केल्याने मिळणाऱ्या परकीय चलनामुळे परकीय चलन गंगाजळीवरील दबाव बहुदा फार वाढणार नाही.
- महागाई वाढली नाही तर सरकारची लोकप्रियता वाढेल आणि सरकारी तिजोरीवर पगार किंवा इतर पद्धतीने येणारा बोजा ही कमी राहील.
- निर्यात वाढेल तशी अर्थव्यवस्था वाढीची गतीही वाढेल आणि त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत मिळेल. परत याचा फायदा सरकारची लोकप्रियता वाढण्यास होईल.
- सरकारी उत्पन्न कमी होईल
- कमी किमतीमुळे इंधन वापर अति प्रचंड प्रमाणात वाढला तर त्याचा आंतरराष्ट्रीय इंधनाच्या किमती वरती पण परिणाम होईल ज्यामुळे जागतिक मंदी सारख्या संकटांना सामोरे जावे लागू शकते
- इंधनाचे नवीन पर्याय शोधण्यास प्रोत्साहन मिळणार नाही
- मध्यपूर्वेतील देशावरील अवलंबित्व वाढेल
वर्गीकरण
वाचने
28795
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
राजेश १८८
In reply to सरकार नी मार्ग तर अवलंबले आहेत by Rajesh188
उत्तम चर्चा चालू आहे ..
यावर सविस्तर प्रतिसाद देतोच..
In reply to उत्तम चर्चा चालू आहे .. by अमर विश्वास
पेट्रोल डिझेल वरचे कर कमी
आताच्या परिस्थिती मध्ये
राजेश साहेब ..
In reply to आताच्या परिस्थिती मध्ये by Rajesh188
अमर तुम्ही अभ्यास करा
In reply to राजेश साहेब .. by अमर विश्वास
आमच्या कुवतीची काळजी नको ...
In reply to अमर तुम्ही अभ्यास करा by Rajesh188
हं
In reply to अमर तुम्ही अभ्यास करा by Rajesh188
राजेश १७ मोगा १४
In reply to हं by hrkorde
इथे कोनी प्रतिसाद देण्यास येत नाही
+१
In reply to इथे कोनी प्रतिसाद देण्यास येत नाही by Rajesh188
अमान्य
In reply to इथे कोनी प्रतिसाद देण्यास येत नाही by Rajesh188
+९९९९९९९९९९९९९९९९९
In reply to अमान्य by चौकस२१२
चोकस साहेब
In reply to अमान्य by चौकस२१२
राज्य विरोध करतात
@संपादक महोदय,
मी सुरूवातीला एकदोन प्रतिसाद
In reply to @संपादक महोदय, by राघव
संपादक महोदय
येथे अजेंडा कोण राबवत याची
इंधन दर वाढीचा
Economic
राजेश १८ मोगा १४
In reply to Economic by Rajesh188
2020
बातमीची लिंक द्याल का ?
In reply to 2020 by hrkorde
छान
In reply to 2020 by hrkorde
व्वा .. ओवेसीच्या MIM ने
In reply to छान by hrkorde
मी
In reply to व्वा .. ओवेसीच्या MIM ने by अमर विश्वास
उगी उगी ...
In reply to मी by hrkorde
काय झालं कोरडे साहेब ?
In reply to मी by hrkorde
चांगल आहे कि मग. खर्च कमी आणी
In reply to 2020 by hrkorde
इश्श !!
In reply to चांगल आहे कि मग. खर्च कमी आणी by रंगीला रतन
तेजाल्ला ते वा योगीजी वा
In reply to इश्श !! by hrkorde
तुमच्या इश्श नी नको त्या तारा
In reply to तेजाल्ला ते वा योगीजी वा by रंगीला रतन
रंगिला
In reply to चांगल आहे कि मग. खर्च कमी आणी by रंगीला रतन
राजेश १८ मोगा १५
In reply to 2020 by hrkorde