इंधन - स्वस्त / महाग
तर ही गोष्ट त्या वेळची ज्या वेळी वेळी स्कूटर साठी दहा पंधरा वर्षे थांबावं लागायचं, गॅससाठी दहा पंधरा वर्षे थांबावं लागायचं फोन साठी पंधरा-वीस वर्षे थांबावं लागायचं, तरीपण आपण कसे महान याचा रशियन स्टाइल प्रपोगंडा चालायचा त्यावेळी वीज वाचवा पाणी वाचवा आणि इंधन वाचवा अशा आमच्यावर संस्कार केले जात होते.
तसं त्यात काही चूक नाही आणि अजूनही आपल्याला हेच सांगितले जाते. इंधन वाचवा हे सांगण्याचे मुख्य कारण म्हणजे इंधन भारतात तयार होत नाही, भारत ते आयात करतो, आयात करण्यासाठी भारताला परकीय चलन द्यावे लागते आणि भारतामध्ये परकीय चलन त्या काळात नव्हते. त्यामुळे इंधन वाचणं म्हणजे देशभक्ती एक प्रकारे सांगितले जात होते.
सध्या इंधनाचे भाव शंभर रुपयाच्या वरती गेल्यामुळे परत एकदा तो हॉट टॉपिक झालेला आहे. मिसळपाव वरती पण गेल्या दोन चार महिन्यात या विषयावर बरेच धागे येऊन गेले. यातील मुख्य रोख हा सरकार प्रचंड कर लावून इंधनाच्या किमती कशा वाढीव ठेवते याच्यावरती होता, जे काही प्रमाणात खरंही आहे. पण ते अर्थशास्त्राच्या दृष्टीने बघावे म्हणून हा धागा.
कृपया कोणत्याही प्रकारे राजकीय चर्चा न करता फक्त अर्थ आणि मानस शास्त्राच्या दृष्टीने आपण या कडे बघायचा प्रयत्न करूया. कारण सरकार कोणतंही असलं तरी फार काही वेगळं होणार नाही.
तर
प्रचंड करांचे फायदे
- सरकारला शाश्वत आणि भरपूर उत्पन्न मिळतं
- अधिकच्या किमती लोकांना कमी इंधन वापरण्यास प्रोत्साहीत करतात (अतिश्रीमंत सोडले तर मध्यम वर्गावर नक्कीच थोडा परिणाम होतो. जिथे गरज असेल तिथेच वाहने वापरली जातात)
- परकीय चलन वाजते आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम कमी होतो.
- प्रवासासाठी स्वस्त पर्याय शोधण्यासाठी चांगले कारण मिळते जसे सध्या इथेनॉल किंवा इलेक्ट्रिक वाहनांसाठी संशोधन आणि प्रयत्न चालू आहेत.
- एखाद्या प्रगत अर्थव्यवस्थेत वाहतूक खर्च जीडीपीच्या आठ टक्के हा उत्तम मानला जातो. भारतात तो सुमारे १४ % आहे. महाग इंधनामुळे वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढतो त्यामुळे भारतीय उत्पादने ही आंतरराष्ट्रीय व्यापारात महाग ठरतात.
- स्पर्धात्मकता कमी झाल्याने काही क्षेत्रांतून आपण कायमचे बाहेर फेकले जातो आणि मग इतरांकडून त्याच गोष्टी घेताना आपल्याला वाढीव किंमती वरती घ्याव्या लागतात
- वाहतूक खर्च कमी झाल्याने किमती कमी होईल होतील त्यामुळे आपली उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात योग्य पद्धतीने स्पर्धा करू शकतील. इंधन स्वस्त झाल्याने त्याचा वापरही वाढेल परंतु आपण अधिक निर्यात केल्याने मिळणाऱ्या परकीय चलनामुळे परकीय चलन गंगाजळीवरील दबाव बहुदा फार वाढणार नाही.
- महागाई वाढली नाही तर सरकारची लोकप्रियता वाढेल आणि सरकारी तिजोरीवर पगार किंवा इतर पद्धतीने येणारा बोजा ही कमी राहील.
- निर्यात वाढेल तशी अर्थव्यवस्था वाढीची गतीही वाढेल आणि त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत मिळेल. परत याचा फायदा सरकारची लोकप्रियता वाढण्यास होईल.
- सरकारी उत्पन्न कमी होईल
- कमी किमतीमुळे इंधन वापर अति प्रचंड प्रमाणात वाढला तर त्याचा आंतरराष्ट्रीय इंधनाच्या किमती वरती पण परिणाम होईल ज्यामुळे जागतिक मंदी सारख्या संकटांना सामोरे जावे लागू शकते
- इंधनाचे नवीन पर्याय शोधण्यास प्रोत्साहन मिळणार नाही
- मध्यपूर्वेतील देशावरील अवलंबित्व वाढेल
वर्गीकरण
प्रतिक्रिया
केंद्र सरकार
तुम्हाला कोण काय सांगते आहे
+१
तुम्ही इतकं एकांगी का लिहिता?
धन्यवाद.
आपण उच्च विद्याविभूषित आहात,
कृपया हा धागा राजकारणापासून
मी अर्थातच भारताबद्दल बोलत
आणि याचा मलाही अनुभव नाही, पण
सर्वांना सर्व कळत आहे
Variables/ data मिळाला तर
• अधिकच्या किमती लोकांना कमी
• अधिकच्या किमती लोकांना कमी इंधन वापरण्यास प्रोत्साहीत करतात (अतिश्रीमंत सोडले तर मध्यम वर्गावर नक्कीच थोडा परिणाम होतो. जिथे गरज असेल तिथेच वाहने वापरली जातात)इंधनाच्या किंमतीचा व वापराचा संबंध नाही. किंमत कितीही वाढली तरी वापर कमी होत नाही व किंमत कितीही कमी असली तरी वापर वाढत नाही. इंधन महाग झाले तर महागाई नक्कीच वाढते, परंतु इंधन स्वस्त झाले तर वाढलेल्या किंमती कमी होत नाहीत. त्यामुळे "परकीय चलन वाजते आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम कमी होतो." हा मुद्दा चुकीचा ठरतो.• प्रवासासाठी स्वस्त पर्याय शोधण्यासाठी चांगले कारण मिळते जसे सध्या इथेनॉल किंवा इलेक्ट्रिक वाहनांसाठी संशोधन आणि प्रयत्न चालू आहेत.इथेनॉल इंधनात मिसळणार असे किमान २ दशकांपासून ऐकत आहे. त्याची अंमलबजावणी झाल्याचे ऐकिवात नाही. कितीही इलेक्ट्रिक वाहने बाजारात आली तरी जोपर्यंत अशा वाहनांची किंमत भरमसाट आहे तोपर्यंत जनता अशी वाहने विकत घेणार नाही. सध्या गिअर नसलेल्या पेट्रोलवर चालणाऱ्या स्वयंचलित दुचाकीची किंमत ७५-८० हजारांच्या आसपास आहे. परंतु याच क्षमतेच्या इलेक्ट्रिक दुचाकीची किंमत जवळपास दुप्पट आहे. जोपर्यंत ही किंमत निम्मी होत नाही तोपर्यंत अशा वाहनांचा खप अत्यल्प राहील.Electric वाहन आणून फायदा नाही
विषय काय , तुमचा प्रतिसाद काय
नैसर्गिक स्त्रोतांपासून वीज
प्रतिसाद फार नाही पटला.
मुळात चौकस यांनी 1 ऑगस्ट ला
त्याचा काय संबंध, ते एक
जगातल्या कोणत्याही व्यक्तीला स्वस्ताई यावी असे वाटत नसते
काही मुद्द्ये
इंधनाचे दर कमी आहेत की जास्त हा विषयच नाही
राजेश १८८ ...
अमर विश्वास
तुमच्या दरडोई उत्पन्नाच्या
अप्रत्यक्ष संबंध असलेले उदाहरण
सहमत
लेखातील विषयाबद्दल
हेच मी आधीच्या प्रतिसादात
मग नक्की आरडाओरड कशाबद्दल आहे
मग नक्की आरडाओरड कशाबद्दल आहे?
५० % हे फक्त एक उदाहरण होते,
हो !
पण इंधन दर कमी असल्याचा फायदा
या लेखानुसार / बातमीनुसार
इंथनाच्या किमती कमी झाल्या
इंथनाच्या किमती कमी झाल्या
म्हणजे तुमच्या मते इंधनाच्या
पुण्यात आज प्रति लिटर पेट्रोल
महागाईच्या अनेक कारणांपैकी एक
महागाई हा विषय नाही
माझे असे म्हणणे नाही की
मेणबत्त्या जमा करा
https://www.abplive.com/news/india/electricity-problem-may-arise
भाव वाढले की
सारा देश अंधारात जाणार आहे
ते सगळे किरकोळ आहेत
महागाई म्हणजे काय
स्वस्ताई म्हणजे काय हे पण समजून घेतले पाहिजे
स्वस्ताई
असे गोलमोल बोलू नका ..