Skip to main content

इंधन - स्वस्त / महाग

लेखक टीपीके यांनी रविवार, 03/10/2021 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
तर ही गोष्ट त्या वेळची ज्या वेळी वेळी स्कूटर साठी दहा पंधरा वर्षे थांबावं लागायचं, गॅससाठी दहा पंधरा वर्षे थांबावं लागायचं फोन साठी पंधरा-वीस वर्षे थांबावं लागायचं, तरीपण आपण कसे महान याचा रशियन स्टाइल प्रपोगंडा चालायचा त्यावेळी वीज वाचवा पाणी वाचवा आणि इंधन वाचवा अशा आमच्यावर संस्कार केले जात होते. तसं त्यात काही चूक नाही आणि अजूनही आपल्याला हेच सांगितले जाते. इंधन वाचवा हे सांगण्याचे मुख्य कारण म्हणजे इंधन भारतात तयार होत नाही, भारत ते आयात करतो, आयात करण्यासाठी भारताला परकीय चलन द्यावे लागते आणि भारतामध्ये परकीय चलन त्या काळात नव्हते. त्यामुळे इंधन वाचणं म्हणजे देशभक्ती एक प्रकारे सांगितले जात होते. सध्या इंधनाचे भाव शंभर रुपयाच्या वरती गेल्यामुळे परत एकदा तो हॉट टॉपिक झालेला आहे. मिसळपाव वरती पण गेल्या दोन चार महिन्यात या विषयावर बरेच धागे येऊन गेले. यातील मुख्य रोख हा सरकार प्रचंड कर लावून इंधनाच्या किमती कशा वाढीव ठेवते याच्यावरती होता, जे काही प्रमाणात खरंही आहे. पण ते अर्थशास्त्राच्या दृष्टीने बघावे म्हणून हा धागा. कृपया कोणत्याही प्रकारे राजकीय चर्चा न करता फक्त अर्थ आणि मानस शास्त्राच्या दृष्टीने आपण या कडे बघायचा प्रयत्न करूया. कारण सरकार कोणतंही असलं तरी फार काही वेगळं होणार नाही. तर प्रचंड करांचे फायदे
  • सरकारला शाश्वत आणि भरपूर उत्पन्न मिळतं
  • अधिकच्या किमती लोकांना कमी इंधन वापरण्यास प्रोत्साहीत करतात (अतिश्रीमंत सोडले तर मध्यम वर्गावर नक्कीच थोडा परिणाम होतो. जिथे गरज असेल तिथेच वाहने वापरली जातात)
  • परकीय चलन वाजते आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम कमी होतो.
  • प्रवासासाठी स्वस्त पर्याय शोधण्यासाठी चांगले कारण मिळते जसे सध्या इथेनॉल किंवा इलेक्ट्रिक वाहनांसाठी संशोधन आणि प्रयत्न चालू आहेत.
प्रचंड करांचे तोटे
  • एखाद्या प्रगत अर्थव्यवस्थेत वाहतूक खर्च जीडीपीच्या आठ टक्के हा उत्तम मानला जातो. भारतात तो सुमारे १४ % आहे. महाग इंधनामुळे वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढतो त्यामुळे भारतीय उत्पादने ही आंतरराष्ट्रीय व्यापारात महाग ठरतात.
  • स्पर्धात्मकता कमी झाल्याने काही क्षेत्रांतून आपण कायमचे बाहेर फेकले जातो आणि मग इतरांकडून त्याच गोष्टी घेताना आपल्याला वाढीव किंमती वरती घ्याव्या लागतात
गेले काही महिने इंधन पण GST अंतर्गत आणावं अशी मागणी चालू आहे ज्याला अर्थातच राज्य सरकारांकडून विरोध आहे कारण केंद्र सरकारवर विसंबून न राहता उत्पन्न वाढवण्याची हि एक चांगली हमी आहे. परंतु उद्या जर इंधन स्वस्त झाले तर काय होऊ शकते? म्हणजे ज्याला What if Analysis म्हणतात ते करता येईल का? माझे काही मुद्दे कमी किमतीचे फायदे
  • वाहतूक खर्च कमी झाल्याने किमती कमी होईल होतील त्यामुळे आपली उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात योग्य पद्धतीने स्पर्धा करू शकतील. इंधन स्वस्त झाल्याने त्याचा वापरही वाढेल परंतु आपण अधिक निर्यात केल्याने मिळणाऱ्या परकीय चलनामुळे परकीय चलन गंगाजळीवरील दबाव बहुदा फार वाढणार नाही.
  • महागाई वाढली नाही तर सरकारची लोकप्रियता वाढेल आणि सरकारी तिजोरीवर पगार किंवा इतर पद्धतीने येणारा बोजा ही कमी राहील.
  • निर्यात वाढेल तशी अर्थव्यवस्था वाढीची गतीही वाढेल आणि त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत मिळेल. परत याचा फायदा सरकारची लोकप्रियता वाढण्यास होईल.
कमी किमतीचे तोटे
  • सरकारी उत्पन्न कमी होईल
  • कमी किमतीमुळे इंधन वापर अति प्रचंड प्रमाणात वाढला तर त्याचा आंतरराष्ट्रीय इंधनाच्या किमती वरती पण परिणाम होईल ज्यामुळे जागतिक मंदी सारख्या संकटांना सामोरे जावे लागू शकते
  • इंधनाचे नवीन पर्याय शोधण्यास प्रोत्साहन मिळणार नाही
  • मध्यपूर्वेतील देशावरील अवलंबित्व वाढेल
तर हे सगळे ढोबळ मुद्दे झाले परंतु यांचा निर्णय घेण्यास काहीच उपयोग नाही. नक्की किती उत्पन्न बुडेल? किती महागाई कमी होईल? किती निर्यात वाढेल? अर्थव्यवस्था किती प्रगती करेल? बेरोजगारी किती कमी होईल याचे जो पर्यंत गणित मांडता येत नाही तो पर्यंत निर्णय घेणे अशक्य आहे. तर कोणाला अशी प्रारूपे (Models) तयार करण्याचा अनुभव आहे का? त्यात तुम्ही कोणती variables घ्याल? विश्वासार्ह इनपुट डेटा कुठे मिळेल? अशा प्रकल्पात (project ) काम करायला आवडेल का? यावर आधी कोणी काम केले आहे का? टिप : परत एकदा : कृपया हा धागा राजकारणापासून दूर ठवूया.

वाचने 28795
प्रतिक्रिया 106

प्रतिक्रिया

In reply to by Rajesh188

राजेश १८८ परत एकदा सांगतो .. अभ्यास वाढवा .. म्हणजे असे हास्यास्पद प्रतिसाद टाकणार नाही ... नुसते Budgetary Fiscal expenditures बघितलेत तरी सरकार कुठे आणि किती खर्च करते याचा अंदाज येईल. तसेच Artical ११२ अंतर्गत Annual Financial Statement दरवर्षी संसदेसमोर सादर करावेच लागते. या सर्व गोष्टी सरकारी संकेत स्थळावर उपलब्ध आहेत .. जरा कष्ट घ्या .. वाचा .. स्वतःचे हसे करून घेऊ नका बाकी तुमचे प्रतिसाद पाहून पडलेला प्रश्न .. तुमचा आणि त्या आर्यनचा सप्लायर एकच आहे का हो ?

उत्तम चर्चा चालू आहे .. ह्या आर्थिक वर्षात Fiscal Deficit वाढणार आहे ... (करोना / घटलेला GDP / आरोग्यसेवेवर जास्त केलेला खर्च व इतर अनेक करणे आहेत. ) अशातच पेट्रोलियम प्रॉडक्ट्स वरचे करसंकलन कमी झाले तर दोनच पर्याय उरतात : सरकारी खर्च कमी करणे (अनुत्पादक खर्चाला कात्री लावणे योग्यच) पण त्यामुळे अनेक योजनांना मिळणारा पैसा कमी होईल (त्यात तुमची मनरेगा आणि MSP ) आलीच किंवा मग इन्फ्लेशन वाढू देणे हा दुसरा पर्याय .. इन्फ्लेशन मुळे पुन्हा महागाई वाढण्याचा धोका असतो (कसे ? तर डिमांड - सप्लाय - इक्विलिब्रियम चा सिद्धांत) त्यामुळे कर कमी करा ... पेट्रोल चे दर आटोक्यात येतील .. महागाई कमी होईल ... हे इतके सोपे नाही यावर सविस्तर प्रतिसाद देतोच... पण नुसता पेट्रोल चा उत्पादन खर्चातील सहभाग इतका संकुचित विचार करू नका इतकीच विनंती

In reply to by अमर विश्वास

यावर सविस्तर प्रतिसाद देतोच... पण नुसता पेट्रोल चा उत्पादन खर्चातील सहभाग इतका संकुचित विचार करू नका इतकीच विनंती >>> प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.. आत्ताच्या घडीला पेट्रोलचे दार अचानक 40 रु नि घसरणे अर्थव्यवस्थेसाठी अजून एखादा खड्डा ठरेल की काय अशी पण भीती वाटते आहे..

पेट्रोल डिझेल वरचे कर कमी करणे केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारांना परवडणार नाही हे सत्य आहे. जरी जी एस टी विक्रमी गोळा होत आहे तरी तेलाचे कर आणि त्या वरचे सेस हे अर्थव्यवस्थेला एका अर्थी टिकवून ठेवत आहेत. आपण कोरोना काळात उणे 24% जी डी पी च्या खड्ड्यात पडलो होतो, तो माझ्या अंदाजाने अजून भरला नसावा. Gst जीडीपी मधील 2019 पूर्व संख्येवरील वाढ अजून फार लांब आहे. 2019 च्या आकड्याला पोचायला आपल्याला बरीच वर्षे लागतील. स्वस्त इंधन भारताच्या फायद्याचे ही नाही आणि ते होणे ही सरकारांना शक्य होणार नाही. 100 is the new normal.

आताच्या परिस्थिती मध्ये पेट्रोल ,डिझेल वर चे कर कमी केले तर भारतीय व्यवस्था कोलमडून जाईल . असे सुचवायचे आहे की. पेट्रोल ,डिझेल वर जितका जास्त कर तितकी त्या देशाची अर्थ व्यवस्था मजबूत हा वैश्विक नियम आहे सर्व देशांना लागू होतो आणि सदा सर्वकाळ तो नियम सर्वांना लागू होतो. असे सुचवायचे आहे.

In reply to by Rajesh188

राजेश साहेब .. त्या वैश्विक नियमांची काळजी नका करू ... ते विश्व बघून घेईल .. तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या

In reply to by अमर विश्वास

आमच्या प्रश्नांची उत्तर देण्याची कुवत येत नाही तो पर्यंत अजेंडा राबवायला पण प्रतिसाद देवू नका. इंधन वर जास्त कर लावले की देशाची अर्थ व्यवस्था सुधारते.देशाची प्रगती होते. हे सत्य आहे का. आणि हाच फॉर्म्युला सदा सर्वकाळ योग्य असतो का ? मग देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी इतका सोपा उपाय असून पण बाकी सरकार नी बाकी काम करण्या पेक्षा फक्त पेट्रोल ,डिझेल वर भरमसाठ कर लावला असता तर आज भारत जगात नंबर १ झाला असता. कपाळ करंटा पना पहिल्या सर्व सरकार च

In reply to by Rajesh188

इंधन वर जास्त कर लावले की देशाची अर्थ व्यवस्था सुधारते.देशाची प्रगती होते. --- आणि मग 70 वर्षे भाजपे पेट्रोलचे दर कमी करा म्हणून बोंबलत का होते ? पेट्रोल दर वाढल्याने प्रगती होते असे बोलणारे , टिव्हीवरून ड्रग्ज दो करून बोलणारे अँकर ह्यांचा सप्लायर एकच असेल का ?

दोन चार आयडी सोडले तर ह्या विषया वरील पोस्ट वर कोणी प्रतिसाद देत नाही. ह्याचे कारण अजेंडा राबवण्यासाठी पेट्रोल भाव वाढ कशी योग्य आहे ह्या विषयावर धागे काढले जातात. आणि लोक सर्व ओळखून अशा dhagya पासून लांब राहतात. म्हणे इंधन वर कर वाढवले की देशाची अर्थ व्यवस्था सुधारते. हास्यास्पद आहे . इथे कोणी येणार नाही प्रतिसाद द्यायला ना दिव्य विचार वाचायला.

In reply to by Rajesh188

अजेंडा राबवण्यासाठी पेट्रोल भाव वाढ कशी योग्य आहे ह्या विषयावर धागे काढले जातात. आणि लोक सर्व ओळखून अशा dhagya पासून लांब राहतात.
सहमत. अशा धाग्यांपासून आता दूर राहण्याचे ठरवले आहे. ( राहीलच असे नाही) आपण आपल्याला वाटतं ते लिहायचं. -दिलीप बिरुटे

In reply to by Rajesh188

अजेंडा राबवण्यासाठी पेट्रोल भाव वाढ कशी योग्य आहे ह्या विषयावर धागे काढले जातात. आरोप अमान्य... हजार वेळेला सांगितलं आशय सर्वेक्षणातून उलटे पण निदर्शनास आले असते आणि कदाचित हे हि सिद्ध होऊ शकले असते कि फक्त भारतातच अशी अन्यायकारी भाव वाढ होत आहे आणि इतर देशात सर्वत्र मात्र होत नाहीये . तुमचं दुर्दैवाने तसे झाले नाही म्हणून असले आरोप करताय असो राजेश तुम्ही काय आणि तुमचे प्रोफेश्वर काय प्रशनाला बगल कशी द्यायची हाच अजेंडा राबवता हे आत चांगलाच सिद्ध झालाय , आणि राजेश तुम्ही तर सतत देशापेक्षा राज्या कसे श्रेष्ट असा "देशद्रोही" विचार मांडत असता. प्रोफेश्वरांना तर मोदी नवर कुत्सित टीका करण्याची एका संधी सोडवत नाही

In reply to by चौकस२१२

+९९९९९९९९९९९९९९९९९ कोणताही विषय, कुठेही घेऊन जाण्याचं यांच कसब(?) वाखाणण्याजोगे आहे. अजेंडा यांचा, पण शिव्या दुसऱ्याला आणि सतत विक्टिम हुड कार्ड खेळत राहायचं. अर्बन नक्षली आहेत का हे? असं असेल तर चर्चा करायची तरी कशी?

In reply to by चौकस२१२

भारताची विविधता,भारतात असणारे सत्तेचे विभाजन,विविध संस्कृती,विविध भाषा,विविध धर्म ,राज्यांना विचारपूर्वक अधिकार दिले आहेत. एकच व्यक्ती च्या हातात भारताची सत्ता घटनाकार नी खूप खोल विचार करून घेतला आहे. तुमचे विचार खूप संकुचित आहे .पुढच्या १०० वर्षाचा विचार तुम्ही करू शकत नाही.. सत्तेचे विभाजन भारतात असल्या मुळे भारताचा अजुन कंबोडिया,जर्मनी झाला नाही.

राज्य विरोध करतात म्हणून पेट्रोल,डिझेल gst अंतर्गत केंद्र सरकार आणू शकतं नाही . हा दुसरा खोडसाळ पना. राज्यांना पेट्रोल ,डिझेल वरील gst मध्ये ८० % संबंधित राज्यांना हिस्सा ध्या कोणतेच राज्य सरकार विरोध करणार नाही. राज्याचे हक्काचे पैसे केंद्र सरकार वेळेवर देत नाही. योग्य हिस्स्या नुसार देत नाही. म्हणुन राज्य विरोध करतात.

@संपादक महोदय, चांगल्या मुद्देसूद चर्चेत उगाच हेतुपुरस्सर काही लिहित बसणे, हे केवळ धागे हायजॅक करण्याची दुष्प्रवृत्ती दर्शवते. अगोदरच अनेक लोक्स या कंटाळवाण्या प्रतिसादांमुळे कोणत्याही मुद्देसूद चर्चेत भाग घेईनासे झालेत. हे असेच होत राहिले तर "मिपावर चर्चेसाठी यावेच का बरे?" असे वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता, अनेकपटींनी वाढेल. या धाग्यावरील अनावश्यक राजकीय प्रतिसाद उडवावेत ही नम्र सूचना. एवढ्या प्रतिसादांमधे अभ्यासपूर्ण प्रतिसाद किती हे बघीतले तर ते ८-१०% हून जास्त नसेल. धागाकर्त्यानं विनंती करून सुद्धा हे थांबत नसेल, तर आपणांस हस्तक्षेप करणे जरूर आहे.

In reply to by राघव

मी सुरूवातीला एकदोन प्रतिसाद दिले होते. परंतु नंतर प्रत्येक धाग्यावर येणारे नेहमीचेच बिनडोक प्रतिसाद सुरू झाल्याने आता फक्त स्क्रोल करून शेवटापर्यंत जाणे एवढेच शिल्लक आहे.

इंधन वर सरकारी कर वाढल्या मुळे इंधन भारतात प्रचंड महाग झाले आहे. इंधन महाग होण्यामुळे देशातील विविध स्तरातील लोकांवर ,केंद्र ,राज्य सरकार वर एकसारखा परिणाम करणार नाही. इंधन दर वाढी मुळे सर्व गोड गोड होत आहे हा युक्तिवाद वाद सत्य असूच शकत नाही. समाजात अनेक आर्थिक स्तरावरील लोकांसाठी तो कडू असतो. राज्यांसाठी तो कडू असतो. दुसरी कडू बाजू मांडणे म्हणजे चर्चा भरकट ने हा अर्थ गोड गोड वाले काढत असतील तर अयोग्य आहे. दुसरी बाजू मांडणे हा गुन्हा असेल तर आमचे प्रतिसाद काढून टाका. आयडी ब्लॉक करणे हा उपाय नाही.. लोकांचे मत परिवर्तन करणे हा चर्चेचा हेतू असतो विरोधी मत मांडणाऱ्या लोकांना ब्लॉक करणे हा उपाय नसतो. दुसरी बाजू मांडणारा कोणी नसेल तर चर्चेला काहीच किंमत नसते.

येथे अजेंडा कोण राबवत याची सर्वांनाच माहिती आहे .. अर्थशास्त्र (Macro Economics ) ला अनुसरून प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत असताना कुठलाही डेटा न देता हवेत केलेली विधाने रसभंग करतात .. त्यामुळे माझा पास

इंधन दर वाढीचा एक पण अनिष्ट परिणाम देशाच्या सरकार वर,विविध स्तरातील लोकांवर होत नाही का? ह्याचे उत्तर जरूर देणे.

देशाच्या एकूण उत्पादन ला लोकसंख्या नी भाग देवून येणार आकडा म्हणजे इकॉनॉमिक्स नी ठरवलेले दर डोई उत्पादन. २००%दिशाभूल करणारे. सत्य स्थिती वर आधारित मत असावीत कोणत्या शास्त्रावर आधारित नकोत. श्रीमंत देशाची गरीब जनता अनेक देशात आहे.

2020 डिझेल परवडेना म्हणून बैलगाडी वापरून कचरा उचलणार कानपूर सरकार 1920 कुठल्या तरी कानपूर संस्थानिकाचा अपमान इंग्रजाकडून घडल्याने संस्थानिकाने रोल्स रॉईसने कचरा उचलला म्हणे वा योगीजी वा

In reply to by hrkorde

व्वा .. ओवेसीच्या MIM ने बनवलेल्या क्लिप च्या आधारे गोळीबार चालू ... अर्थात हे तुमच्या अजेंड्याला धरूनच आहे .. चालुद्या

In reply to by अमर विश्वास

मी फेसबुकवर पाहिले मग बातमी शोधली सध्या तरी ही एकच क्लिप गुगलवर मिळाली , फक्त 5 तास जुनी आहे, उद्यापर्यंत गावभर बातम्या अन लिंका होतील, मग तुम्हीच शोधून द्या

In reply to by hrkorde

उगी उगी ... तुमचा अजेंडा उघडा पडला ...

In reply to by hrkorde

काय झालं कोरडे साहेब ? तुमच्या बैलगाडी कडे सर्वानी दुर्लक्ष केलं कि हो ... खोट्या बातम्यांच्या बाबतीत होत असं काही वेळा इथे वीस लाखाचा ट्रक फिरवणारे एक महानुभाव आहेत ... तसेच तुम्ही कानपूरचे बैलगाडीवाले म्ह्णून प्रसिद्ध व्हाल

In reply to by hrkorde

चांगल आहे कि मग. खर्च कमी आणी प्रदुषण पन कमी. तुमच्या पोटात का दुखतय? तुम्हि युपी , कानपुर मधे रहाता कि हकिमी करता?

In reply to by hrkorde

तेजाल्ला ते वा योगीजी वा तारीफ साठी होता काय? मला वाटलं उपरोधानी म्हणाल्या कोरडे वहिनी. काय पण बोला तुमच्या इश्श नी नको त्या तारा छेडल्या कोरडे वहिनी. एकदम देवदास आठवला.

In reply to by रंगीला रतन

तुमच्या इश्श नी नको त्या तारा छेडल्या कोरडे वहिनी ह ह पु वा तुमचं रंगीला रतन नाव सार्थ ठरवलं तुम्ही पण या कोरडे वहिनी म्हणजे चंपाबाई उर्फ मोगा उर्फ हितेश उर्फ ..उर्फ ..उर्फ ..उर्फ अशा आहेत ( अर्थात तुम्हाला ते माहित आहेच)

In reply to by रंगीला रतन

खाता महारष्ट्र च आणि पुळका मात्र तुम्हाला यूपी च असतो. तुमचे बिऱ्हाड तिकडेच हलवा.योगी तुम्हाला सुखात ठेवतील बैल गाडी ची सफर घडवून आणतील.