✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २०२०

त
तुषार काळभोर यांनी
Fri, 07/23/2021 - 16:32  ·  लेख
लेख
नमस्कार, https://upload.wikimedia.org/wikipedia/en/1/1d/2020_Summer_Olympics_logo_new.svg दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होतात, आपण दरवर्षी एक मोठ्ठा संघ पाठवतो. आणि दोन-चार पदके कमावतो. १९९६ मध्ये लिअँडर पेसने टेनिस पुरुष एकेरी मध्ये कांस्य जिंकलं आणि खूप वर्षांचा पदकांचा आणि खूप दशकांचा वैयक्तिक पदकांचा दुष्काळ संपवला. त्यानंतर दरवर्षी वैयक्तिक पदके १-२-३-४ मिळत आहेत. २०१६ रियो ऑलिम्पिक : एक रजत, एक कांस्य २०१२ लंडन ऑलिम्पिक : दोन रजत, चार कांस्य २००८ बिजिंग ऑलिम्पिक : एक सुवर्ण, दोन कांस्य २००४ अथेन्स ऑलिम्पिक : एक रजत २००० सिडनी ऑलिम्पिक : एक कांस्य असा या शतकातील प्रवास आहे. यंदा देखील मोठा संघ, मोठा सपोर्ट स्टाफ, मोठ्या आशा आणि अपेक्षासह भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाला सुरुवात होत आहे. मिपाचे लोकप्रिय क्रीडा लेखक जे पी मॉर्गन यांनी गार्‍हाणं मांडून शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर स्पर्धेचे अपडेट्स, विशेष बातम्या आणि अर्थातच भारतीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्पर्धांविषयी येथे चर्चा करुयात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
54899 वाचन

💬 प्रतिसाद (191)

प्रतिक्रिया

दिवस ८: ३१ जुलै - निकाल

तुषार काळभोर
Sat, 07/31/2021 - 10:31 नवीन
१. घोडेस्वारी : (Eventing Dressage) दुसरा दिवस (भाग तीन) फवाद मिर्झा नवव्या क्रमांकावर २. महिला थळी फेक गट A फेरी (अंतिम फेरीसाठी किमान ६४ मीटर फेक आवश्यक किंवा किमान १२ खेळाडू पात्र) सीमा पूनिया : ६०.५७ मीटर (सहावा क्रमांक) कमलप्रित कौर : ६४.०० मीटर : अंतिम फेरीसाठी पात्र ३. तिरंदाजी उप उपांत्यपूर्व फेरी (१/८ elimination) अतनू दास पराभूत विरुद्ध जपान स्पर्धेतून बाहेर ५. बॉक्सिंग पुरुष फ्लाय वेट (४८-५२) पात्रता फेरी अमित पराभूत विरुद्ध कोलंबिया
  • Log in or register to post comments

संमिश्र निकाल येत आहेत.

खेडूत
Sat, 07/31/2021 - 12:50 नवीन
संमिश्र निकाल येत आहेत. काल मेरी अणि आज अतानु दास हे पूर्वी पदक मिळवणारे खेळाडु बाहेर गेले. अमित हा चांगलं मानांकन असलेला बॉक्सर बाहेर गेला. :( आज सिन्धू कडून खूप आशा आहे, तिला शुभेच्छा! आज हा सामना दुपारी साडेतीनला भारतात पहाता येईल. कमलप्रीत ने आज कमाल केली. तिचा स्वत:चा आधीचा उच्चांक (६६ मी.) मोडला नाही तरी ६३.९७ मीटर्स थाळी फेकली. एकूण स्पर्धकांत दुसरी असल्याने पदकाच्या आशा आहेत. लवलिनाची पुढची फेरी कधी आहे माहीत नाही. (एकूण यात मराठी टक्का नगण्य आहे हे मात्र खुपते आहे! )
  • Log in or register to post comments

एकूण यात मराठी टक्का नगण्य आहे हे मात्र खुपते आहे!

तुषार काळभोर
Sat, 07/31/2021 - 15:04 नवीन
मराठी खेळाडू तेजस्विनी सावंत राही सरनौबत प्रवीण जाधव अविनाश साबळे हॉकी महिला संघ (दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळलेला संघ) हरियाणा 9 पंजाब 1 ओडिशा 1 झारखंड 2 उत्तरप्रदेश 1 मिझोरम 1 मणिपूर 1 पुरुष हॉकी संघ (काल जपान विरुद्ध खेळलेला संघ) हरियाणा 1 पंजाब 10 ओडिशा 2 मध्यप्रदेश 1 उत्तरप्रदेश 1 तामिळनाडू 1 कर्नाटक 1 मणिपूर 1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

महिला ५० मीटर रायफल आणि हॉकी

तुषार काळभोर
Sat, 07/31/2021 - 14:41 नवीन
अंजुम आणि तेजस्विनी सावंत दोघी अनुक्रमे १५ व ३३ व्या स्थानी राहिल्या. फक्त आठ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र आहेत. महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिका संघावर ४:३ असा विजय मिळवला.
  • Log in or register to post comments

पुजा राणी पराजीत..

नावातकायआहे
Sat, 07/31/2021 - 15:56 नवीन
पुजा राणी पराजीत..
  • Log in or register to post comments

आणि सिंधु.... :-(

नावातकायआहे
Sat, 07/31/2021 - 16:44 नवीन
आणि सिंधु.... :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे

सिंधूचा उपांत्य फेरीत १८-२१,

श्रीगुरुजी
Sat, 07/31/2021 - 16:45 नवीन
सिंधूचा उपांत्य फेरीत १८-२१, १२-२१ असा पराभव झाला.
  • Log in or register to post comments

आजचा दिवस खूप वाईट गेला.

श्रीगुरुजी
Sat, 07/31/2021 - 16:46 नवीन
आजचा दिवस खूप वाईट गेला.
  • Log in or register to post comments

सिंधूचा १८-२१, १२-२१ अशा सरळ

श्रीगुरुजी
Sat, 07/31/2021 - 16:52 नवीन
सिंधूचा १८-२१, १२-२१ अशा सरळ गेम्समध्ये पराभव झाला. पहिल्या गेममध्ये सिंधू ११-८ अशी आघाडीवर असूनही १८-२१ अशी हरली. दुसऱ्या गेममध्ये ८-८ अशा बरोबरीनंतर सिंधूने वेगाने गुण गमावले व ८-१४ अशी मागे पडली. तेथेच बहुतेक तिने हाय खाल्ली व शेवटी १२-२१ असा पराभव झाला.
  • Log in or register to post comments

महिला हॉकी आणि सिंधू

तुषार काळभोर
Sat, 07/31/2021 - 20:52 नवीन
महिला हॉकी : भारताची कामगिरी फारशी चांगली नव्हती मात्र आयर्लंड ची कामगिरी त्याहून वाईट झाल्याने भारताचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश झाला आहे. :) दुसरीकडे सिंधू आता कांस्य पदकासाठी खेळेल. एकूण चंदेरी किनार असलेला वाईट दिवस.
  • Log in or register to post comments

अमित बॉक्सिंग

कंजूस
Sat, 07/31/2021 - 21:11 नवीन
अमित हा चांगलं मानांकन असलेला बॉक्सर बाहेर गेला. त्याचा प्रतिस्पर्धी फारच भारी खेळत होता आणि अमित दूर पळत होता किंवा त्याला धरून ठेवत होता.
  • Log in or register to post comments

होऊन गेलेले खेळ

कंजूस
Sat, 07/31/2021 - 22:25 नवीन
भारतीय खेळाडुंचे dd sports (1) free dish dth वर दिसतात. आणि 'dd national hd' channel >वर >paid dth = ( dishtv, tata sky,Videocon... वगैरे)
  • Log in or register to post comments

दिवस ९ : १ ऑगस्ट

तुषार काळभोर
Sun, 08/01/2021 - 09:58 नवीन
१. गोल्फ चौथी आणि पदक फेरी अनिर्बन लाहिरी आणि उदयन माने जिंकण्याच्या स्थितीत नाहीत. २. घोडेस्वारी फवाद मिर्झा स्पर्धेतून बाहेर ३. बॉक्सिंग हेविवेट (९१+) उपांत्यपूर्व फेरी सतीश कुमार पराभूत ५:० विरुद्ध उझबेकिस्तान हा सामना पूर्ण एकतर्फी झाला. उझबेकिस्तान चा बाखोदिर जलालोव त्याच्या उंचीचा आणि चापल्याचा फायदा उठवत लागोपाठ ठोसे लगावत होता. सामना पाहताना सतिशचा पराभव स्पष्ट दिसत होता. ४. बॅडमिंटन महिला एकेरी कांस्य पदकासाठी सामना संध्याकाळी ५.०० सिंधू विरुद्ध चीन ५. हॉकी पुरुष उपांत्यपूर्व फेरी संध्याकाळी ५.३० भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन
  • Log in or register to post comments

लढलाच नै

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/01/2021 - 11:58 नवीन
बॉक्सिंग हेविवेट (९१+) उपांत्यपूर्व फेरी प्रतिस्पर्ध्याची उंची पाहता तो जिंकेल असे सुरुवातीलचा वाटले. त्याचे खेळणे लाजवाब होते. आपण लढलो, सतीशकुमार लढलाच नै असे वाटले. अजून दोन चार ठोसे दिले असते तर जमले असते असेही वाटले पण ते शक्य नव्हते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

बॅडमिंटन महिला एकेरी

तुषार काळभोर
Sun, 08/01/2021 - 19:04 नवीन
भारताचे दुसरे पदक. कांस्य पदक सामन्यात पी व्ही सिंधूने चीनच्या बिंग जियाओ हे हिला २-० असं हरवलं. सामना बघताना सिंधूची देहबोली एकदम वेगळीच होती. सुवर्णपदक लढत असल्यासारखी सिंधू खेळली.

अभिनंदन सिंधू!

  • Log in or register to post comments

...

हेमंतकुमार
Sun, 08/01/2021 - 19:30 नवीन
अभिनंदन सिंधू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

अभिनंदन सिंधू!

गॉडजिला
Sun, 08/01/2021 - 19:58 नवीन
सोनं नाही पण कांस्य पदक आणलेस याचा आनंद आहे... असुदे जे व्हायच ते चांगलेच झालं म्हणुया, अन फुडच्या वेळी सुवर्णकामगीरी करुन आमचा आनंद द्विगुणित नक्कि करावास अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

पदक तालिका

तुषार काळभोर
Sun, 08/01/2021 - 18:19 नवीन
चीन, अमेरिका आणि जपान पहिल्या तीन स्थानी. भारत ६४ वरून ५९ व्या स्थानी.
  • Log in or register to post comments

जब तक स्कुलमे maths teacher

गॉडजिला
Sun, 08/01/2021 - 22:50 नवीन
जब तक स्कुलमे maths teacher sports का पिरियड लेते रहेंगे हमारे मेडल नही आयेंगे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

हॉकी पुरुष संघ

तुषार काळभोर
Sun, 08/01/2021 - 21:21 नवीन
उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटन विरुद्ध ३:१ असा दिमाखदार विजय मिळवत उपांत्य फेरीत पोहचला आहे. पहिल्या सामन्यातील ७:० अशा दारुण पराभवानंतर भारतीय संघाने राखेतून भरारी घेत सफाईदार विजय मिळवले आहेत. उपांत्य फेरी जिंकून अंतिम सामन्यात सुवर्ण पदक जिंकण्यासाठी शुभेच्छा!! नोट: भारताने हॉकी मध्ये शेवटचं पदक १९८० साली मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेत जिंकले होते. त्यानंतर कधीही भारत अंतिम चारमध्ये सुद्धा पोहोचलेला नाही. तब्बल चाळीस वर्षांनी भारतीय संघ हॉकीच्या उपांत्य फेरीत पोचला आहे.
  • Log in or register to post comments

दिवस १० : २ ऑगस्ट

तुषार काळभोर
Sun, 08/01/2021 - 21:31 नवीन
१. ॲथलेटीक्स महिला २०० मीटर पात्रता फेरी = ०७:२४ द्यूती चंद २. नेमबाजी ५० मीटर 3 पोझिशन पुरुष पात्रता फेरी = ०८:०० ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर संजीव राजपूत ३. हॉकी महिला उपांत्यपूर्व = ०८:३० विरुद्ध ऑस्ट्रेलिया ४. थाळीफेक महिला अंतिम फेरी = १६:३० कमलप्रित कौर
  • Log in or register to post comments

वेळ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/01/2021 - 20:15 नवीन
किती वाजता आहे मॅचेस ? तुम्ही सांगितलं म्हणून आजचे सामने पाहता आले. हॉकी आणि बॅडमिंटन दोन्ही पाहिले आणि दोन्ही जिंकून दिले. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

वाह

Bhakti
Sun, 08/01/2021 - 21:21 नवीन
सर थाळीफेक मधील मेडल पक्क करून द्यावे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बरं बघतो...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/02/2021 - 09:04 नवीन
सध्या भारत ऑस्ट्रेलिया महिला हॉकी पाहतोय. आपण १-० ने आघाडी घेतलीय. ही आघाडी टिकली पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

जिंकलो....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/02/2021 - 10:06 नवीन
महिला हॉकीने ऑस्ट्रेलियाला १-० धूळ चारली. मजा आली. दिल की धड़कने तेज हो गई थी....! मजा आली. जय हो...! आता कब है थाली ? थाली फेक. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Indian girls hockey team

श्रीगुरुजी
Mon, 08/02/2021 - 09:49 नवीन
Indian girls hockey team leads 1-0 against Australia in the quarter final match. Just 8:00 minutes to go. 2 penalty corners saved.
  • Log in or register to post comments

भारतीय मुलींनी अत्यंत बलाढ्य

श्रीगुरुजी
Mon, 08/02/2021 - 10:14 नवीन
भारतीय मुलींनी अत्यंत बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला १-० असे पराजित करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने तब्बल ७ पेनल्टी कॉर्नर वाचविले व १-० अशी आघाडी जवळपास ४५ मिनिटे अबाधित ठेवली. पराभवानंतर ऑस्ट्रेलियन मुलींना रडू आवरत नव्हते.
  • Log in or register to post comments

जबरदस्त मॅच झाली!

तुषार काळभोर
Mon, 08/02/2021 - 10:56 नवीन
ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य आणि कणखर संघातील खेळाडू रडवेल्या झाल्या, यात त्या निकालाचं प्रतिबिंब होतं. दोन्ही हॉकी संघ आता उपांत्य फेरीत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हिरमुसले ग मन माझे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/02/2021 - 11:38 नवीन
Image removed.Image removed. हिरमुसले ग मन माझे....! आता आपली सेमी फ़ायनला अशी अवस्था होऊ नये म्हणजे झालं. भारतीयांना अजून जोश दाखवणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

भारतीय महिला हॉकी संघ बलाढ्य

पराग१२२६३
Mon, 08/02/2021 - 12:03 नवीन
भारतीय महिला हॉकी संघ बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला हरवून पहिल्यांदाच ऑलिंपिक उंपात्य फेरीत दाखल झालाय.
  • Log in or register to post comments

दोघांनाही सुवर्णपदक !!

हेमंतकुमार
Mon, 08/02/2021 - 14:32 नवीन
उंच उडी प्रकारात.... मुताज बर्सहिम आणि तेम्बेरी यांच्यादरम्यान सुवर्णपदकासाठी स्पर्धा होणार होती. मात्र त्यापूर्वीच बर्सहिमने येथील पंचांना “आम्हाला दोघांनाही सुवर्णपदक मिळू शकतं का?”, असं विचारलं असता अधिकाऱ्यांनी चक्क होकारार्थी उत्तर दिलं आणि या दोघांनी एकाचवेळी जल्लोष सुरु केला.
  • Log in or register to post comments

ग्रेट! ऐकावं ते नवलंच!! पण

राघव
Mon, 08/02/2021 - 14:45 नवीन
ग्रेट! ऐकावं ते नवलंच!! पण छान झालं हे खरं. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

असं कुठं असतं व्हय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/02/2021 - 19:13 नवीन
प्रतिसाद माहितीपूर्ण आहे, पण स्पर्धा म्हटल्यावर असं कुठं असतं व्हय. स्पर्धा स्पर्धा असते आणि विजेता विजेता. स्पर्धा संयोजकांचा मेल आयडी आहे का ? स्पर्धेच्या ध्येय धोरणाबाबत तक्रार करायची आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

घोडेस्वारी

तुषार काळभोर
Mon, 08/02/2021 - 16:33 नवीन
फवाद मिर्झा अंतिम फेरीतील २५ जणात पात्र ठरला आहे. (पदकाची शक्यता शुन्यवत आहे. पण अंतिम फेरीत दाखल झाला ही अभिमानाची गोष्ट!)
  • Log in or register to post comments

महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत

श्रीगुरुजी
Mon, 08/02/2021 - 18:51 नवीन
महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताची कमलप्रीत कौर ६ वी आल्याने पदक मिळाले नाही.
  • Log in or register to post comments

दोन खेळाडू, एकच पराक्रम, दोन मार्ग.

तुषार काळभोर
Mon, 08/02/2021 - 21:22 नवीन
सिंधूने दुसरं ऑलिंपिक पदक जिंकून इतिहास घडवला. दोन ऑलिंपिक पदके मिळवणारी ती पहिली आणि तूर्त एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. याआधी दोन वैयक्तिक ऑलिंपिक पदके मिळवण्याचा पराक्रम कुस्ती खेळाडू सुशील कुमार याने केला होता. २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकल्यानंतर २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने रजत पदक जिंकून इतिहास घडवला होता. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू होता. नऊ वर्षांनी सिंधूने तोच पराक्रम केल्यावर सर्व माध्यमांनी सुशील कुमार समोर माईक धरून ' अब आपको कैसे लग रहा है' असा प्रश्न विचारला असता. पण सुशील कुमार उत्तर द्यायला उपलब्ध नव्हता. कदाचित त्याला सिंधूचा तो सामनाही पाहता आला नसेल. कारण तो दुसऱ्या कुस्तीगीरचा खून केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.
  • Log in or register to post comments

२०१६ मधील ऑलिम्पिक

श्रीगुरुजी
Mon, 08/02/2021 - 22:06 नवीन
२०१६ मधील ऑलिम्पिक स्पर्धैसाठी सुशीलकुमार ऐवजी भारतीय संघात नरसिंग यादवचा समावेश केला होता. हा सुशीलकुमारवर अन्याय होता. त्याने रिओमध्ये कदाचित तिसरे पदक मिळविले असते. ऑलिम्पिक स्पर्धैपूर्वी झालेल्या डोपिंग टेस्टमध्ये नरसिंग यादव अपयशी ठरल्याने तो सुद्धा जाऊ शकला नाही व त्या गटात भारताचा एकही स्पर्धक शिल्लक राहिला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

मला वाटते सुशीलकुमारनेच आपला

अभिजीत अवलिया
Mon, 08/02/2021 - 22:29 नवीन
मला वाटते सुशीलकुमारनेच आपला 'गेम' केला असा काहीसा संशय नरसिंग यादवने व्यक्त केला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

दिवस ११ : ३ ऑगस्ट

तुषार काळभोर
Tue, 08/03/2021 - 05:51 नवीन
१. भाला फेक महिला पात्रता फेरी अन्नू राणी अंतिम फेरीसाठी पात्रता निकष ६३ मीटर फेक. अन्नू राणीची सर्वोत्तम कामगिरी ६३.२४ मीटर आहे. मात्र पाच खेळाडू तिच्यापेक्षा किमान ४ मीटर सरस आहेत. त्यामुळे अंतिम फेरी कदाचित होईलही,मात्र पदकाची आशा कमीच आहे. २. हॉकी पुरुष उपांत्य सामना विरुद्ध बेल्जियम. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ सलग विजयी झाला आहे. या सामन्यात बेल्जियम वर मात करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळावा या शुभेच्छा.. ३. गोळा फेक पुरुष पात्रता फेरी ताजिंदरपाल सिंह तूर वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी २१.४९ मीटर अंतिम सामन्यासाठी पात्रता २१.२० पाच खेळाडू २२+ मीटर कामगिरी केलेले आहेत. ४. कुस्ती - महिला फ्री स्टाईल - ६२ किलो (१/८ फेरी) सोनम विरुद्ध मंगोलिया
  • Log in or register to post comments

दिवस ११ : ३ ऑगस्ट निकाल

तुषार काळभोर
Tue, 08/03/2021 - 06:50 नवीन
१. भाला फेक महिला पात्रता फेरी अन्नू राणी अंतिम फेरीसाठी पात्रता निकष ६३ मीटर फेक. अन्नू राणी ने ५४.०४ मीटर फेक केली. चौदाव्या स्थानी असल्याने अंतिम फेरीत प्रवेश नाही. तिच्या ६३.२४ मीटर या सर्वोत्तम पेक्षा फारच सुमार कामगिरी.
  • Log in or register to post comments

बेल्जियम वि. भारत उपांत्य

श्रीगुरुजी
Tue, 08/03/2021 - 08:24 नवीन
बेल्जियम वि. भारत उपांत्य फेरी - २-२ अजून ११ मिनिटे आहेत.
  • Log in or register to post comments

बेल्जियम ३-२ ने पुढे

श्रीगुरुजी
Tue, 08/03/2021 - 08:25 नवीन
बेल्जियम ३-२ ने पुढे
  • Log in or register to post comments

हॉकी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/03/2021 - 08:41 नवीन
पेनल्टी स्ट्रोकमुळे बेल्जियमचा चौथा गोल. ४ -० ने आघाडी मला वाटतं शेवटच्या दोन मिनिटात अजुन दोन गोल आवश्यक पण आता हे शक्य वाटत नाही. बेल्जियमची संरक्षण फळी मजबूत असल्यामुळे भारतीयांसाठी आजची सकाळ खराब म्हणावी लागेल. आता काही चमत्कारच वाचवू शकेल. गुड्डे ऑल...! :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बेल्जियम ५-२ विजय

श्रीगुरुजी
Tue, 08/03/2021 - 08:44 नवीन
बेल्जियम ५-२ विजय
  • Log in or register to post comments

४ सत्रांपैकी पहिल्या

श्रीगुरुजी
Tue, 08/03/2021 - 08:49 नवीन
४ सत्रांपैकी पहिल्या सत्राअंती भारत २-१ असा आघाडीवर होता. परंतु शेवटी २-५ असा पराभव झाला.
  • Log in or register to post comments

अजुन एक पराभव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/03/2021 - 09:05 नवीन
महिला कुश्तीही हरलो 2 -0 ने आघाडी होती. शेवटच्या 40 सेकंद राहिले होते, मंगोलियाच्या खेळाडूने शेवटच्या डावाने 2-2 ने बरोबरी नव्हे तर घेतलेल्या आघाडीमुळे मंगोलिया विजयी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आता आशा लवलीना आणि महिला हॉकी

तुषार काळभोर
Tue, 08/03/2021 - 10:55 नवीन
आता आशा लवलीना आणि महिला हॉकी यांच्यावर..
  • Log in or register to post comments

सोनम मलिक पहिली कुस्ती हरली

रात्रीचे चांदणे
Tue, 08/03/2021 - 12:05 नवीन
सोनम मलिक पहिली कुस्ती हरली असली तरीही अजून बाहेर पडलेली नाही, कदाचित तिला अजून एक संधी मिळू शकेल.
  • Log in or register to post comments

दिवस १२ : ४ ऑगस्ट

तुषार काळभोर
Tue, 08/03/2021 - 22:30 नवीन
१. गोल्फ महिला पहिली फेरी अदिती अशोक आणि दिक्षा डागर २. भाला फेक पुरुष पात्रता फेरी. अंतिम फेरीत जाण्यासाठी निकष ८३.५० मीटर नीरज चोप्रा. याचा वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८८.०७मीटरअसून जागतिक रँकिंग १३ आहे. ३. कुस्ती पुरुष (१/८) उप उपांत्यपूर्व फेरी भारताचे तीन खेळाडू आहेत. रवी कुमार विरुद्ध कोलंबिया अंशू विरुद्ध बेलारूस दीपक पुनिया विरुद्ध नायजेरिया ४. बॉक्सिंग (६४-६९) महिला वेल्टर वेट उपांत्य फेरी लवलिना विरुद्ध टर्की ५. हॉकी महिला उपांत्य फेरी विरुद्ध अर्जेंटिना
  • Log in or register to post comments

धमाल चालु आहे

टिनटिन
Wed, 08/04/2021 - 10:04 नवीन
  • रवी कुमार आणि दीपक पुनिया उपान्त्य फेरीत. दुपारी २ ४५ नन्तर सामने
  • आन्शु मलिक हरली
  • नीरज चोप्रा भालाफेक अन्तिम फेरिमध्ये. शनिवारी १६ ३० ला अन्तिम सामना
  • मुष्टियुद्धा उपान्त्य सामना ११ वाजता
  • महिला हॉकी सामना १५ ३० वाजता
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा