Skip to main content

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २०२०

लेखक तुषार काळभोर यांनी शुक्रवार, 23/07/2021 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, https://upload.wikimedia.org/wikipedia/en/1/1d/2020_Summer_Olympics_logo_new.svg दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होतात, आपण दरवर्षी एक मोठ्ठा संघ पाठवतो. आणि दोन-चार पदके कमावतो. १९९६ मध्ये लिअँडर पेसने टेनिस पुरुष एकेरी मध्ये कांस्य जिंकलं आणि खूप वर्षांचा पदकांचा आणि खूप दशकांचा वैयक्तिक पदकांचा दुष्काळ संपवला. त्यानंतर दरवर्षी वैयक्तिक पदके १-२-३-४ मिळत आहेत. २०१६ रियो ऑलिम्पिक : एक रजत, एक कांस्य २०१२ लंडन ऑलिम्पिक : दोन रजत, चार कांस्य २००८ बिजिंग ऑलिम्पिक : एक सुवर्ण, दोन कांस्य २००४ अथेन्स ऑलिम्पिक : एक रजत २००० सिडनी ऑलिम्पिक : एक कांस्य असा या शतकातील प्रवास आहे. यंदा देखील मोठा संघ, मोठा सपोर्ट स्टाफ, मोठ्या आशा आणि अपेक्षासह भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाला सुरुवात होत आहे. मिपाचे लोकप्रिय क्रीडा लेखक जे पी मॉर्गन यांनी गार्‍हाणं मांडून शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर स्पर्धेचे अपडेट्स, विशेष बातम्या आणि अर्थातच भारतीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्पर्धांविषयी येथे चर्चा करुयात.

वाचने 55208
प्रतिक्रिया 191

प्रतिक्रिया

In reply to by तुषार काळभोर

बॉक्सिंग,कुस्ती... गुणपद्धती केविलवाणी आहे. सुमो कुस्ती बरी. तळपायाव्यतिरिक्त अंग जमिनीला लागले/ रिंगणाबाहेर गेले की हरला.

१२. जलतरण पुरुष १०० मीटर बटरफ्लाय गट फेरी सजन प्रकाश दुसर्‍या स्थानी (सर्व गटांतील मिळून टॉप १६ उपांत्य फेरीत खेळतील.) जर सजन प्रकाश पहिल्या सोळात असेल, तर उद्या उपांत्य फेरी आहे. २६ जुलैला सजन प्रकाश याने पुरुष २०० मीटर बटरफ्लाय गट फेरीमध्ये सहभाग घेतला होता, पण तो पहिल्या सोळात नव्हता, त्यामुळे तो उपांत्य फेरीत सहभागी होऊ शकला नाही.

पिझ्झा प्रेमी मीराबाई यांना लाईफ टाईम ऑफर ! :) टिवटिव दुवा :- https://twitter.com/dominos_india/status/1418915109154471941?lang=en

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - China on Radar: India Deploys Rafale Fighters on Eastern Front


ज्या प्रकारात सर्वाधिक पदकांची लयलूट होते, ते अ‍ॅथलेटीक्स खेळ उद्यापासून सुरू होत आहेत. पदक तालिकेत वर्चस्व गाजवणारे देश इथेच सर्वाधिक पदके कमावतात. पुरुष १०० मीटर पुरुष २०० मीटर पुरुष ४०० मीटर पुरुष ८०० मीटर पुरुष १५०० मीटर पुरुष ५००० मीटर पुरुष १०००० मीटर पुरुष मॅराथॉन पुरुष ३००० मीटर स्टिपलचेस पुरुष ११० मीटर अडथळा पुरुष ४०० मीटर अडथळा पुरुष उंच उडी पुरुष पोल व्हॉल्ट पुरुष लांब उडी पुरुष तिहेरी उडी पुरुष गोळा फेक पुरुष थाळी फेक पुरुष हातोडा फेक पुरुष भाला फेक पुरुष डेकॅथलॉन पुरुष २० किमी चालणे पुरुष ५० किमी चालणे पुरुष ४*१०० मीटर रिले पुरुष ४*४०० मीटर रिले महिला १०० मीटर महिला २०० मीटर महिला ४०० मीटर महिला ८०० मीटर महिला १५०० मीटर महिला ५००० मीटर महिला १०००० मीटर महिला मॅराथॉन महिला ३००० मीटर स्टिपलचेस महिला १०० मीटर अडथळा महिला ४०० मीटर अडथळा महिला उंच उडी महिला पोल व्हॉल्ट महिला लांब उडी महिला तिहेरी उडी महिला गोळा फेक महिला थाळी फेक महिला हातोडा फेक महिला भाला फेक महिला हेप्टॅथलॉन महिला २० किमी चालणे महिला ४*१०० मीटर रिले महिला ४*४०० मीटर रिले मिश्र ४*४०० मीटर रिले या प्रकारात ४८ सुवर्ण , ४८ रौप्य आणि ४८ कांस्य अशी एकूण १४४ पदके उपलब्ध आहेत. भारताचा समावेश केवळ तीन प्रकारात आहे: जास्तीत जास्त तीन पदके मिळण्याची शक्यता. १. पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस शर्यत (पहिली फेरी) - अविनाश साबळे २. पुरुष ४०० मीटर अडथळ्यांची शर्यत (पहिली फेरी) - पलियालिल मदारी ३. मिश्र ४*४०० मीटर रिले शर्यत (पहिली फेरी) - अ‍ॅलेक्स अ‍ॅन्टोनी, सार्थक भांबरी, रेवती वीरमणी, सुभा वेंकटेशन

In reply to by तुषार काळभोर

चांगली माहिती. बघूया बोल्टचा रेकोर्ड मोडता का कोणी.Fastest Man !

१. गोल्फ : पुरुष दुसरी फेरी अनिर्बन लाहिरी उदयन माने २. घोडेस्वारी : (Eventing Dressage) पहिला दिवस (भाग एक आणि दोन) फवाद मिर्झा ३. नेमबाजी २५ मीटर रॅपिड फेरी मनू भाकर सहावा क्रमांक अंतिम फेरीत दाखल ४. तिरंदाजी महिला एकेरी उपांत्यपूर्व दीपिका कुमारी विजयी विरुद्ध रेफ्यूजी ROC उपांत्य फेरीत दाखल ५. पुरुष ३००० मीटर स्टीपल चेस शर्यत पहिली फेरी अविनाश साबळे ६. हॉकी महिला गट फेरी विरुद्ध आयर्लंड ७. पुरुष ४०० मीटर अडथळा शर्यत पलियाली मदारी ८. बॉक्सिंग महिला लाईट वेट (५७-६०) उप उपांत्यपूर्व सिमरन जीत कौर विरुद्ध थायलंड ९. Sailing 49er पुरुष सातवी आठवी आणि नववी शर्यत गणपती केलापांडा आणि वरुण ठक्कर १०. Sailing laser radial महिला नववी आणि दहावी शर्यत नेत्रा कुमानन ११. बॉक्सिंग महिला वेल्टर वेट (६४-६९) उपांत्यपूर्व फेरी लवलीना बॉर्गोहेन विरुद्ध तैवान १२. महिला १०० मीटर शर्यत पहिली फेरी द्युती चंद १३. Sailing laser radial पुरुष नववी आणि दहावी शर्यत विष्णू सरवानान १४. बॅडमिंटन महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरी सिंधू विरुद्ध जपान १५. हॉकी पुरुष गट फेरी भारत विरुद्ध जपान १६. मिश्र ४*४०० मीटर रिले शर्यत (पहिली फेरी) - अ‍ॅलेक्स अ‍ॅन्टोनी, सार्थक भांबरी, रेवती वीरमणी, सुभा वेंकटेशन

In reply to by श्रीगुरुजी

तिने जिंकलेली फेरी १/८ elimination होती. मला वाटले की आता जिंकून ती १/४ म्हणजे उपांत्य फेरीत गेली. :) उपांत्यपूर्व फेरी आजच दक्षिण कोरिया विरुद्ध आहे.

वरील बऱ्याच प्रतिसादात मी रिफ्यूजी संघाचा उल्लेख केला आहे. ऑलिंपिक च्या अधिकृत माहितीमध्ये ROC असा उल्लेख असतो. मला तो निर्वासित खेळाडूंसाठी असणारा Refugee Olympic Team संघ वाटला होता आणि इतक्या खेळात चांगली कामगिरी करत पदके कमावत असल्याने कौतुकही वाटत होते. आताच लक्षात आलं की तो Russian Olympic Committee संघ आहे. २०१९ मध्ये उत्तेजक द्रव्ये नियमांच्या उल्लांघना साठी रशिया देशावर आंतरराष्ट्रीय खेळात (ऑलिंपिक सहित) सहभाग घेण्यावर बंदी घालण्यात आली. सुरुवातीला चार वर्षे असणारी ही बंदी नंतर कमी केली, तरी ती डिसेंबर २०२२ पर्यंत आहे. त्यामुळे रशियाला यंदाच्या स्पर्धेत भाग घेणे शक्य झाले नाही. मात्र रशिया हा पाश्चात्य देश आहे, ताकदवान देश आहे, ऑलिम्पिक पदक तालिकेत नेहमीच पहिल्या पाच मध्ये असणारा देश आहे. त्यामुळे रशियन खेळाडूंसाठी एक तोडगा काढण्यात आला. काही नियमांखाली त्यांना स्पर्धेत सहभागी करून घेतलं. रशियन खेळाडू ROC या नावाच्या संघासाठी खेळतील. रशियाचे नाव वापरण्यात येणार नाही. रशियाचा ध्वज वापरण्यात येणार नाही. पदक जिंकल्यावर रशियाचे राष्ट्रगीत ना वाजवता Pyotr Tchaikovsky’s “Piano Concerto No. 1 वाजवलं जातं. रशियाचे खेळाडू लाल, निळा व पांढरा या रशियन रंगाचे कपडे घालतात, मात्र त्यावर रशिया हे नाव अथवा रशियाचा झेंडा निर्देशित होणार नाही, हे बघितले जाते. ROC संघाचा ध्वज ऑलिंपिक ची पाच वर्तुळे व त्यावर लाल निळ्या पांढरा रंगातील ऑलिंपिक ज्योत असा आहे. 4 संदर्भ : TIME website वरील बातमी. त्यामुळे वरील सर्व ठिकाणी जिथे रेफ्युजी संघ असा उल्लेख आहे, तिथे ROC असे आहे. चुकीसाठी क्षमस्व..

In reply to by तुषार काळभोर

फ्री स्टाईल स्पर्धाही भरवावी. मग कंपन्यांच्या जाहिराती येतील 'आमची उत्तेजक द्रव्ये घ्या आणि यश मिळवा.'

भारतासाठी दुसरे पदक निश्चित झाले. बॉक्सिंग मध्ये बॉक्सर Lovlina Borgohain ने सेमी फायनल मध्ये जागा निश्चित करून कमीत कमी bronze medal आपल्या नावावर केलं.

In reply to by रात्रीचे चांदणे

अपेक्षित पदकांच्या यादीत लवलिना चं नाव नव्हतं. त्यामुळे लवलीनाचं पदक सुखद धक्का आहे!

अभिनंदन!

आणि उपांत्य फेरी जिंकण्यासाठी शुभेच्छा!!

तिरंदाजी महिला उपांत्यपूर्व फेरी दीपिका कुमारी दक्षिण कोरिया च्या An San कडून पराभूत हॉकी महिला गट फेरी भारत विजयी १:० विरुद्ध आयर्लंड

सिंधू वि. यामागुची यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील सामना पाहिला. सिंधूने २१-१३, २२-२० असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू १५-१० आघाडीनंतर १८-२० अशी मागे पडली होती. नंतर सलग ४ गुण मिळवून तिने सामना जिंकला व पदक नक्की केले.

In reply to by रात्रीचे चांदणे

अंतिम सामन्यात सुवर्ण आणि रौप्य पदक. उपांत्य मध्ये हरलेल्या दोघांत तिसऱ्या स्थानासाठी (कांस्य पदक) एक सामना होईल. बॉक्सिंग मध्ये दोघांना कांस्य मिळतं. त्यामुळे उपांत्य मध्ये दाखल झाल्यावर पदक नक्की होतं.

टेनिसमध्ये पुरुषांच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ क्रोएशियाचे आहेत. म्हणजे अंतिम फेरीतील सर्व चार खेळाडू एकच देशाचे! दुसरीकडे नुकतंच विम्बल्डन जिंकलेला जोकोविच आज उपांत्य सामन्यात जर्मनी विरुद्ध पराभूत झाला. उद्या तो कांस्य पदकासाठी स्पेन च्या पाबलो बुस्ता विरुद्ध खेळेल.

१. गोल्फ : पुरुष दुसरी फेरी अनिर्बन लाहिरी उदयन माने उद्या सुरू राहील २. घोडेस्वारी : (Eventing Dressage) पहिला दिवस (भाग एक आणि दोन) फवाद मिर्झा भाग एक सातवा क्रमांक, भाग दोन सुरू आहे. ३. नेमबाजी २५ मीटर रॅपिड फेरी मनू भाकर पंधरावा क्रमांक स्पर्धेतून बाहेर ४. तिरंदाजी महिला एकेरी उपांत्यपूर्व दीपिका कुमारी विजयी विरुद्ध रेफ्यूजी ROC उपांत्यपूर्व फेरीत पराभूत विरुद्ध दक्षिण कोरिया ५. पुरुष ३००० मीटर स्टीपल चेस शर्यत पहिली फेरी अविनाश साबळे सातवा क्रमांक स्पर्धेतून बाहेर ६. हॉकी महिला गट फेरी विजयी विरुद्ध आयर्लंड ७. पुरुष ४०० मीटर अडथळा शर्यत पलियाली मदारी सातव्या स्थानी स्पर्धेतून बाहेर ८. बॉक्सिंग महिला लाईट वेट (५७-६०) उप उपांत्यपूर्व सिमरन जीत कौर पराभूत विरूद्ध थायलंड ९. Sailing 49er पुरुष सातवी आठवी आणि नववी शर्यत गणपती केलापांडा आणि वरुण ठक्कर १०. Sailing laser radial महिला नववी आणि दहावी शर्यत नेत्रा कुमानन ११. बॉक्सिंग महिला वेल्टर वेट (६४-६९) उपांत्यपूर्व फेरी लवलीना बॉर्गोहेन विजयी विरुद्ध तैवान उपांत्य फेरीत दाखल. पदक नक्की १२. महिला १०० मीटर शर्यत पहिली फेरी द्युती चंद सातवा क्रमांक स्पर्धेतून बाहेर १३. Sailing laser radial पुरुष नववी आणि दहावी शर्यत विष्णू सरवानान १४. बॅडमिंटन महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरी सिंधू विजयी विरुद्ध जपान उपांत्य फेरीत दाखल १५. हॉकी पुरुष गट फेरी भारत विजयी विरुद्ध जपान १६. मिश्र ४*४०० मीटर रिले शर्यत (पहिली फेरी) - अ‍ॅलेक्स अ‍ॅन्टोनी, सार्थक भांबरी, रेवती वीरमणी, सुभा वेंकटेशन आठवा क्रमांक स्पर्धेतून बाहेर लवलीना आणि सिंधू दोघी आपापल्या स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहचल्या. हॉकी महिला आणि पुरुष दोन्ही संघांचे विजय. दीपिका कुमारीची चांगली वाटचाल आज संपुष्टात आली. बाकी ठिकाणी फक्त उपस्थिती होती, त्यामुळे विशेष काही नाही. नौकानयन मध्ये काय चाललंय ते कळत नसलं तरी सर्व प्रकारात भारतीय खेळाडू (ऑलमोस्ट) तळाला आहेत, हे नक्की. एकूण चांगला दिवस.

आरओसी संघा बद्धलची माहिती आवडली. धागा उत्तम पद्धतीने अपडेट होतोय याचा विशेष आनंद आहे... kudos to you. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communism

ऑलिंपिक च्या अधिकृत साईटवर बहुधा काल मला पूर्ण माहिती मिळाली नाही. भारतीय खेळाडू आणखी काही athletics प्रकारात सहभागी आहेत. १. घोडेस्वारी : (Eventing Dressage) दुसरा दिवस (भाग तीन) फवाद मिर्झा पहिल्या दिवसाखेर सातव्या क्रमांकावर आहे. पात्रता अथवा पुढे जायचे नियम माहिती नाहीत. उद्या स्पष्ट होईल. २. महिला थळी फेक गट A फेरी सीमा पूनिया (अंतिम फेरीसाठी पात्रता ६४ मीटर फेकणे, अशी आहे. ६४ मीटर फेक करणारे सर्व खेळाडू किंवा किमान १२ खेळाडू अंतिम फेरीत जातील. सीमा पूनीया हिचा वैयक्तिक उच्चांक ६४.८४ मीटर आहे. पण यंदाच्या मोसमात तिची सर्वाधिक फेक ६३.७२ मीटर होती. उद्या ती ६४ मीटर फेक करून अंतिम फेरीत जाऊ शकेल का, याची उत्सुकता आहे.) ३. तिरंदाजी उप उपांत्यपूर्व फेरी (१/८ elimination) अतनू दास विरुद्ध जपान ४. महिला थळी फेक गट A फेरी कमलप्रित कौर (हिचा वैयक्तिक उच्चांक यंदाच्या मोसमात ६६.४९ मीटर आहे. उद्या ती ६४ मीटर फेक करून अंतिम फेरीत जाऊ शकेल का, याची उत्सुकता आहे.) ५. बॉक्सिंग पुरुष फ्लाय वेट (४८-५२) पात्रता फेरी अमित विरुद्ध कोलंबिया ६. नेमबाजी महिला ५० मीटर थ्री पोझिशन पात्रता फेरी तेजस्विनी सावंत (टॉप आठ खेळाडू अंतिम फेरीत जातील.) ७. नौकानयन 49er दहावी, अकरावी, बारावी शर्यत गणपती केलापांडा आणि वरुण ठक्कर ८. महिला हॉकी गट फेरी विरुद्ध दक्षिण आफ्रिका ९. बॅडमिंटन महिला एकेरी उपांत्य सामना सिंधू विरुद्ध तैवान १०. बॉक्सिंग महिला मिडलवेट (६९-७५ किलो) (उपांत्यपूर्व) पुजा राणी विरुद्ध चीन ११. पुरुष लांब उडी पात्रता फेरी श्रीशंकर (अंतिम फेरीसाठी पात्रता ८.१५ मीटर उडी मारणे, अशी आहे. ८.१५ मीटर फेक करणारे सर्व खेळाडू किंवा किमान १२ खेळाडू अंतिम फेरीत जातील. श्रीशंकर याचा वैयक्तिक उच्चांक ८.२६ मीटर आहे. तो यंदाच्या मोसमात केला आहे. उद्या ८.१५ मीटर उडी मारून अंतिम फेरीत जाऊ शकेल का, याची उत्सुकता आहे.)

बॉक्सिंग मधील गुणपद्धती नेहमीच वादग्रस्त राहिली आहे.. उपांत्यपूर्व सामन्यात तीन राऊंड्स मध्ये पाच परीक्षक गुण देतात. प्रत्येक फेरी कोणत्या खेळाडूला अधिक परीक्षकांनी गुण दिले, तो जिंकतो. त्या सामन्यात पहिल्या फेरीत ४ परीक्षकांनी मेरीच्या विरोधात गुण दिले तर एकाने मेरीच्या पक्षात. त्यामुळे तो राऊंड मेरीने ४:१ असा गमावला. पुढील दोन राऊंड मेरीने ३:२ असे जिंकले. त्यामुळे तीनपैकी दोन राऊंड मेरीने जिंकले होते. १:४ ३:२ ३:२ त्यामुळे मेरी विजेती असायला हवी होती. मात्र कोलंबिया च्या खेळाडूला विजयी घोषित करण्यात आलं. मेरीचं म्हणणं आहे की हा निर्णय चुकीचा आहे. 2 मात्र परिक्षकांचे गुण विचारात घेतले तर त्यांनी असे गुण दिले होते Valencia : Kom ३०:२७ २९:२८ २७:३० २९:२८ २८:२९ एकूण ३:२ त्यामुळे निकाल मेरीच्या विरोधात गेला. शिवाय एकूण गुण १४२:१४१ असे मेरीच्या विरोधात होते. अर्थात जो नियम आहे तो दोघानाही लागू असतो, त्यामुळे मेरीचा विजय झाला असता तर कदाचित या गुनपद्धतीची चर्चा सुद्धा झाली नसती. या सामन्याच्या काही मिनिटे आधी अजून एक गोष्ट झाली. काही कारणास्तव मेरीला तिचा रिंग मधील ड्रेस बदलायला सांगण्यात आलं होतं. खेळाडूंच्या जर्सिवर मागे देशाचं नाव आणि खेळाडूंचं नाव असतं. पण मेरी कोम च्या म्हणण्यानुसार तिला विनाकारण जर्सी बदलायला सांगण्यात आली, ज्यामुळे तिच्या खेळावर परिणाम झाला. बहुतेक लवलीना सुद्धा नेहमीच्या जर्सी शिवाय खेळली होती. दोघींच्या जर्सी बदलण्याविषयी आणि करण्याविषयी खात्रीशीर बातमी सापडली नाही.

In reply to by तुषार काळभोर

पण ज्याअर्थी व्हॅलेंसियाला विजेता घोषित केले त्याअर्थी कुणी किती राउंड जिंकले यापेक्षा अंतिम गुण हा मुख्य क्रायटेरिया असावा. गुगल वरती पण तसेच लिहीलेले सापडले. जर दोन्ही खेळाडूंनी समान गुण मिळवले तर कोणी किती राउंड जिंकले यावर निर्णय होत असेल.

In reply to by तुषार काळभोर

Winner based on score
Not round... आणि मुळात कोम ला धक्का तेंव्हा बसला जेंव्हा तीन परीक्षकांनी तिला गुण दिला नाही... एकाने मात्र दिला...सिंधू प्रमाने जर ती सपशेल हरली असती तरीही पराभव खिलाडू वृत्तीने मान्य करायला अडचण न्हवती ह्युमन एरर... आणखी काय :( Anyways, Meri kom was, is and will be an inspiring soul... always.

१. घोडेस्वारी : (Eventing Dressage) दुसरा दिवस (भाग तीन) फवाद मिर्झा नवव्या क्रमांकावर २. महिला थळी फेक गट A फेरी (अंतिम फेरीसाठी किमान ६४ मीटर फेक आवश्यक किंवा किमान १२ खेळाडू पात्र) सीमा पूनिया : ६०.५७ मीटर (सहावा क्रमांक) कमलप्रित कौर : ६४.०० मीटर : अंतिम फेरीसाठी पात्र ३. तिरंदाजी उप उपांत्यपूर्व फेरी (१/८ elimination) अतनू दास पराभूत विरुद्ध जपान स्पर्धेतून बाहेर ५. बॉक्सिंग पुरुष फ्लाय वेट (४८-५२) पात्रता फेरी अमित पराभूत विरुद्ध कोलंबिया

संमिश्र निकाल येत आहेत. काल मेरी अणि आज अतानु दास हे पूर्वी पदक मिळवणारे खेळाडु बाहेर गेले. अमित हा चांगलं मानांकन असलेला बॉक्सर बाहेर गेला. :( आज सिन्धू कडून खूप आशा आहे, तिला शुभेच्छा! आज हा सामना दुपारी साडेतीनला भारतात पहाता येईल. कमलप्रीत ने आज कमाल केली. तिचा स्वत:चा आधीचा उच्चांक (६६ मी.) मोडला नाही तरी ६३.९७ मीटर्स थाळी फेकली. एकूण स्पर्धकांत दुसरी असल्याने पदकाच्या आशा आहेत. लवलिनाची पुढची फेरी कधी आहे माहीत नाही. (एकूण यात मराठी टक्का नगण्य आहे हे मात्र खुपते आहे! )

In reply to by खेडूत

मराठी खेळाडू तेजस्विनी सावंत राही सरनौबत प्रवीण जाधव अविनाश साबळे हॉकी महिला संघ (दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळलेला संघ) हरियाणा 9 पंजाब 1 ओडिशा 1 झारखंड 2 उत्तरप्रदेश 1 मिझोरम 1 मणिपूर 1 पुरुष हॉकी संघ (काल जपान विरुद्ध खेळलेला संघ) हरियाणा 1 पंजाब 10 ओडिशा 2 मध्यप्रदेश 1 उत्तरप्रदेश 1 तामिळनाडू 1 कर्नाटक 1 मणिपूर 1

अंजुम आणि तेजस्विनी सावंत दोघी अनुक्रमे १५ व ३३ व्या स्थानी राहिल्या. फक्त आठ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र आहेत. महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिका संघावर ४:३ असा विजय मिळवला.

सिंधूचा १८-२१, १२-२१ अशा सरळ गेम्समध्ये पराभव झाला. पहिल्या गेममध्ये सिंधू ११-८ अशी आघाडीवर असूनही १८-२१ अशी हरली. दुसऱ्या गेममध्ये ८-८ अशा बरोबरीनंतर सिंधूने वेगाने गुण गमावले व ८-१४ अशी मागे पडली. तेथेच बहुतेक तिने हाय खाल्ली व शेवटी १२-२१ असा पराभव झाला.

महिला हॉकी : भारताची कामगिरी फारशी चांगली नव्हती मात्र आयर्लंड ची कामगिरी त्याहून वाईट झाल्याने भारताचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश झाला आहे. :) दुसरीकडे सिंधू आता कांस्य पदकासाठी खेळेल. एकूण चंदेरी किनार असलेला वाईट दिवस.

अमित हा चांगलं मानांकन असलेला बॉक्सर बाहेर गेला. त्याचा प्रतिस्पर्धी फारच भारी खेळत होता आणि अमित दूर पळत होता किंवा त्याला धरून ठेवत होता.

भारतीय खेळाडुंचे dd sports (1) free dish dth वर दिसतात. आणि 'dd national hd' channel >वर >paid dth = ( dishtv, tata sky,Videocon... वगैरे)

१. गोल्फ चौथी आणि पदक फेरी अनिर्बन लाहिरी आणि उदयन माने जिंकण्याच्या स्थितीत नाहीत. २. घोडेस्वारी फवाद मिर्झा स्पर्धेतून बाहेर ३. बॉक्सिंग हेविवेट (९१+) उपांत्यपूर्व फेरी सतीश कुमार पराभूत ५:० विरुद्ध उझबेकिस्तान हा सामना पूर्ण एकतर्फी झाला. उझबेकिस्तान चा बाखोदिर जलालोव त्याच्या उंचीचा आणि चापल्याचा फायदा उठवत लागोपाठ ठोसे लगावत होता. सामना पाहताना सतिशचा पराभव स्पष्ट दिसत होता. ४. बॅडमिंटन महिला एकेरी कांस्य पदकासाठी सामना संध्याकाळी ५.०० सिंधू विरुद्ध चीन ५. हॉकी पुरुष उपांत्यपूर्व फेरी संध्याकाळी ५.३० भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन

In reply to by तुषार काळभोर

बॉक्सिंग हेविवेट (९१+) उपांत्यपूर्व फेरी प्रतिस्पर्ध्याची उंची पाहता तो जिंकेल असे सुरुवातीलचा वाटले. त्याचे खेळणे लाजवाब होते. आपण लढलो, सतीशकुमार लढलाच नै असे वाटले. अजून दोन चार ठोसे दिले असते तर जमले असते असेही वाटले पण ते शक्य नव्हते. -दिलीप बिरुटे

भारताचे दुसरे पदक. कांस्य पदक सामन्यात पी व्ही सिंधूने चीनच्या बिंग जियाओ हे हिला २-० असं हरवलं. सामना बघताना सिंधूची देहबोली एकदम वेगळीच होती. सुवर्णपदक लढत असल्यासारखी सिंधू खेळली.

अभिनंदन सिंधू!


In reply to by तुषार काळभोर

सोनं नाही पण कांस्य पदक आणलेस याचा आनंद आहे... असुदे जे व्हायच ते चांगलेच झालं म्हणुया, अन फुडच्या वेळी सुवर्णकामगीरी करुन आमचा आनंद द्विगुणित नक्कि करावास अशी अपेक्षा आहे.

चीन, अमेरिका आणि जपान पहिल्या तीन स्थानी. भारत ६४ वरून ५९ व्या स्थानी.

उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटन विरुद्ध ३:१ असा दिमाखदार विजय मिळवत उपांत्य फेरीत पोहचला आहे. पहिल्या सामन्यातील ७:० अशा दारुण पराभवानंतर भारतीय संघाने राखेतून भरारी घेत सफाईदार विजय मिळवले आहेत. उपांत्य फेरी जिंकून अंतिम सामन्यात सुवर्ण पदक जिंकण्यासाठी शुभेच्छा!! नोट: भारताने हॉकी मध्ये शेवटचं पदक १९८० साली मॉस्को ऑलिंपिक स्पर्धेत जिंकले होते. त्यानंतर कधीही भारत अंतिम चारमध्ये सुद्धा पोहोचलेला नाही. तब्बल चाळीस वर्षांनी भारतीय संघ हॉकीच्या उपांत्य फेरीत पोचला आहे.

१. ॲथलेटीक्स महिला २०० मीटर पात्रता फेरी = ०७:२४ द्यूती चंद २. नेमबाजी ५० मीटर 3 पोझिशन पुरुष पात्रता फेरी = ०८:०० ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर संजीव राजपूत ३. हॉकी महिला उपांत्यपूर्व = ०८:३० विरुद्ध ऑस्ट्रेलिया ४. थाळीफेक महिला अंतिम फेरी = १६:३० कमलप्रित कौर

In reply to by तुषार काळभोर

किती वाजता आहे मॅचेस ? तुम्ही सांगितलं म्हणून आजचे सामने पाहता आले. हॉकी आणि बॅडमिंटन दोन्ही पाहिले आणि दोन्ही जिंकून दिले. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर थाळीफेक मधील मेडल पक्क करून द्यावे! ;)

In reply to by Bhakti

सध्या भारत ऑस्ट्रेलिया महिला हॉकी पाहतोय. आपण १-० ने आघाडी घेतलीय. ही आघाडी टिकली पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महिला हॉकीने ऑस्ट्रेलियाला १-० धूळ चारली. मजा आली. दिल की धड़कने तेज हो गई थी....! मजा आली. जय हो...! आता कब है थाली ? थाली फेक. -दिलीप बिरुटे

Indian girls hockey team leads 1-0 against Australia in the quarter final match. Just 8:00 minutes to go. 2 penalty corners saved.

भारतीय मुलींनी अत्यंत बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला १-० असे पराजित करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने तब्बल ७ पेनल्टी कॉर्नर वाचविले व १-० अशी आघाडी जवळपास ४५ मिनिटे अबाधित ठेवली. पराभवानंतर ऑस्ट्रेलियन मुलींना रडू आवरत नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य आणि कणखर संघातील खेळाडू रडवेल्या झाल्या, यात त्या निकालाचं प्रतिबिंब होतं. दोन्ही हॉकी संघ आता उपांत्य फेरीत आहेत.

In reply to by तुषार काळभोर

AusInd हिरमुसले ग मन माझे....! आता आपली सेमी फ़ायनला अशी अवस्था होऊ नये म्हणजे झालं. भारतीयांना अजून जोश दाखवणे गरजेचे आहे.

उंच उडी प्रकारात.... मुताज बर्सहिम आणि तेम्बेरी यांच्यादरम्यान सुवर्णपदकासाठी स्पर्धा होणार होती. मात्र त्यापूर्वीच बर्सहिमने येथील पंचांना “आम्हाला दोघांनाही सुवर्णपदक मिळू शकतं का?”, असं विचारलं असता अधिकाऱ्यांनी चक्क होकारार्थी उत्तर दिलं आणि या दोघांनी एकाचवेळी जल्लोष सुरु केला.

In reply to by हेमंतकुमार

प्रतिसाद माहितीपूर्ण आहे, पण स्पर्धा म्हटल्यावर असं कुठं असतं व्हय. स्पर्धा स्पर्धा असते आणि विजेता विजेता. स्पर्धा संयोजकांचा मेल आयडी आहे का ? स्पर्धेच्या ध्येय धोरणाबाबत तक्रार करायची आहे. -दिलीप बिरुटे

फवाद मिर्झा अंतिम फेरीतील २५ जणात पात्र ठरला आहे. (पदकाची शक्यता शुन्यवत आहे. पण अंतिम फेरीत दाखल झाला ही अभिमानाची गोष्ट!)

सिंधूने दुसरं ऑलिंपिक पदक जिंकून इतिहास घडवला. दोन ऑलिंपिक पदके मिळवणारी ती पहिली आणि तूर्त एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. याआधी दोन वैयक्तिक ऑलिंपिक पदके मिळवण्याचा पराक्रम कुस्ती खेळाडू सुशील कुमार याने केला होता. २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकल्यानंतर २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने रजत पदक जिंकून इतिहास घडवला होता. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू होता. नऊ वर्षांनी सिंधूने तोच पराक्रम केल्यावर सर्व माध्यमांनी सुशील कुमार समोर माईक धरून ' अब आपको कैसे लग रहा है' असा प्रश्न विचारला असता. पण सुशील कुमार उत्तर द्यायला उपलब्ध नव्हता. कदाचित त्याला सिंधूचा तो सामनाही पाहता आला नसेल. कारण तो दुसऱ्या कुस्तीगीरचा खून केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.

In reply to by तुषार काळभोर

२०१६ मधील ऑलिम्पिक स्पर्धैसाठी सुशीलकुमार ऐवजी भारतीय संघात नरसिंग यादवचा समावेश केला होता. हा सुशीलकुमारवर अन्याय होता. त्याने रिओमध्ये कदाचित तिसरे पदक मिळविले असते. ऑलिम्पिक स्पर्धैपूर्वी झालेल्या डोपिंग टेस्टमध्ये नरसिंग यादव अपयशी ठरल्याने तो सुद्धा जाऊ शकला नाही व त्या गटात भारताचा एकही स्पर्धक शिल्लक राहिला नव्हता.

In reply to by श्रीगुरुजी

मला वाटते सुशीलकुमारनेच आपला 'गेम' केला असा काहीसा संशय नरसिंग यादवने व्यक्त केला होता.

१. भाला फेक महिला पात्रता फेरी अन्नू राणी अंतिम फेरीसाठी पात्रता निकष ६३ मीटर फेक. अन्नू राणीची सर्वोत्तम कामगिरी ६३.२४ मीटर आहे. मात्र पाच खेळाडू तिच्यापेक्षा किमान ४ मीटर सरस आहेत. त्यामुळे अंतिम फेरी कदाचित होईलही,मात्र पदकाची आशा कमीच आहे. २. हॉकी पुरुष उपांत्य सामना विरुद्ध बेल्जियम. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ सलग विजयी झाला आहे. या सामन्यात बेल्जियम वर मात करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळावा या शुभेच्छा.. ३. गोळा फेक पुरुष पात्रता फेरी ताजिंदरपाल सिंह तूर वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी २१.४९ मीटर अंतिम सामन्यासाठी पात्रता २१.२० पाच खेळाडू २२+ मीटर कामगिरी केलेले आहेत. ४. कुस्ती - महिला फ्री स्टाईल - ६२ किलो (१/८ फेरी) सोनम विरुद्ध मंगोलिया

१. भाला फेक महिला पात्रता फेरी अन्नू राणी अंतिम फेरीसाठी पात्रता निकष ६३ मीटर फेक. अन्नू राणी ने ५४.०४ मीटर फेक केली. चौदाव्या स्थानी असल्याने अंतिम फेरीत प्रवेश नाही. तिच्या ६३.२४ मीटर या सर्वोत्तम पेक्षा फारच सुमार कामगिरी.