Skip to main content

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २०२०

लेखक तुषार काळभोर यांनी शुक्रवार, 23/07/2021 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, https://upload.wikimedia.org/wikipedia/en/1/1d/2020_Summer_Olympics_logo_new.svg दर चार वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होतात, आपण दरवर्षी एक मोठ्ठा संघ पाठवतो. आणि दोन-चार पदके कमावतो. १९९६ मध्ये लिअँडर पेसने टेनिस पुरुष एकेरी मध्ये कांस्य जिंकलं आणि खूप वर्षांचा पदकांचा आणि खूप दशकांचा वैयक्तिक पदकांचा दुष्काळ संपवला. त्यानंतर दरवर्षी वैयक्तिक पदके १-२-३-४ मिळत आहेत. २०१६ रियो ऑलिम्पिक : एक रजत, एक कांस्य २०१२ लंडन ऑलिम्पिक : दोन रजत, चार कांस्य २००८ बिजिंग ऑलिम्पिक : एक सुवर्ण, दोन कांस्य २००४ अथेन्स ऑलिम्पिक : एक रजत २००० सिडनी ऑलिम्पिक : एक कांस्य असा या शतकातील प्रवास आहे. यंदा देखील मोठा संघ, मोठा सपोर्ट स्टाफ, मोठ्या आशा आणि अपेक्षासह भारताच्या ऑलिम्पिक प्रवासाला सुरुवात होत आहे. मिपाचे लोकप्रिय क्रीडा लेखक जे पी मॉर्गन यांनी गार्‍हाणं मांडून शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर स्पर्धेचे अपडेट्स, विशेष बातम्या आणि अर्थातच भारतीय खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्पर्धांविषयी येथे चर्चा करुयात.

वाचने 55208
प्रतिक्रिया 191

प्रतिक्रिया

उद्घाटन सोहळ्यात भारतीय ध्वजवाहक बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह हे दोघे होते. आज (२३ जुलै) भारतासाठी तिरंदाजीच्या चार स्पर्धा आहेत. मिश्र सांघिक पुरुष सांघिक महिला एकेरी पुरुष एकेरी

आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा !

धन्यवाद हा धागा काढल्याबद्दल तुषार. भारतीय खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा.

धन्यवाद, वाचत राहीन आणि जमेल तशी भर घालेन

२०१३ मध्ये २०२० चे ओलिंपिक्स जपानला दिले गेले पण पुढे काय होणार त्यांना काय माहीत. प्रेक्षकच नसल्याने सर्वात महागडा समारंभ आणि खेळस्पर्धा आयोजन ठरणार. आतापर्यंतच्या सोहोळ्यात बीजिंग ओलिंपिक्स सोहाळा गाजला. चीन काय आहे ते जगाला दाखवले पेपर उघडून. जपान काही तरी सुंदर दाखवेल ही अपेक्षा होती. पण महामारी आली आडवी. ---------- धावणे, रीले धावणे, पोहणे, शूटिंग इत्यादीमध्ये आपले गुण आणि जागतिक उच्चांक तुलनात्मक अगोदरच माहीत असतात. पण कुस्तीत काहीही होऊ शकते. बघू काय होते?

का कोणास ठाऊक, पण या ऑलम्पिक मध्ये नेहमीपेक्षा आपण एखाद्दुसरं जादा पदक कमावू असं मला वाटतंय (सिक्स्थ सेन्स म्हणा हवं तर )

कालच जाहीर झाले २०३२ वर्षाचे ऑलिम्पिक ऑस्ट्रेलिया मध्ये होणार आहे ... फक्त २. कोटी लोकसंख्येचं देशाने ३ ऱ्यांदा हा मान मिळवला आहे !

२०३२ वर्षाचे ऑलिम्पिक ऑस्ट्रेलिया मध्ये होणार आहे कारण बाकी कोणीच बोली लावली नाही.

In reply to by नावातकायआहे

बर मग? यात काही विशेष सांगण्यासारखे नाही असे म्हणायचे आहे का तुम्हाला ? तस असेल तरी पिंपरी चिंचवड नि लावयायाची होती ना बोली ! अहो का उगा खवचटपणा करताय ... मी काही भारताला नावे ठेवली नाहीत ,, फक्त ज्या देशात राहतो त्या छोट्या देशाने काहीतरी करून दाखवले त्याची निंदा केली तर ते चुकले का ... यापूढे कानाला खडा जाऊदे

In reply to by नावातकायआहे

माझ्या मते भारताने यात अजुन तरी पडु नये. या आयोजनाचा खर्च आव्याढव्य असतो. त्यात जर अपेक्षित परतावा मिळाला नाही तर केलेली गुंतवनुक पांढरा हत्ती होते. स्पर्धेसाठी बनवलेली क्रीडांगणे वापराअभावी पडुन राहतात. खेळाडुंची निवासस्थाने गावाबाहेर असल्यामुळे त्याचा वापर होत नाही. त्यापेक्षा तो पैसा इथे पायाभुत सुविधा वाढवण्यावर वापरला तर दिर्घकालीन फायदा होइल. ऑलिम्पिक मधे पदके मिळण्यासाठी खुप आधीपासुन तयारी करावी लागते .. म्हणजे मुले लहान असतात तेव्हाच .. पुढे विद्यालयीन / महाविद्यालयीन शिक्षण घेताना तशी तयारी करुन घ्यावी लागते. तेव्हा कुठे हजारात एक खेळाडु तयार होतो. आपल्याकडे क्रिकेट सोडले तर इतर कुठल्याही खेळाला प्रतिष्ठा नाही .. सपोर्ट नाही .. ते आधी बदलावे लागेल. आताच ठरावीक खेळाडुंवर प्रेशर टाकुन पदकांची अपेक्षा करणे बरोबर नाही...

मुंबई गोवा रस्ता खड्डे बुजवून रूंद केलेला असेल. गेली पंचवीस वर्षे खटपट चालू आहे. कोस्टल रोडचे काही पूल बांधलेले असतील.

कालचा दिवस (Day-0) होता. आज भारत: महिला १० मीटर एअर रायफल >> भारत बाहेर तिरंदाजी मिश्र सांघिक >> भारत विरुद्ध दक्षिण कोरिया, उपांत्यपूर्व फेरी ११.०० वाजता टेबल टेनिस महिला एकेरी पात्रता फेरी >> पाहिली फेरी मनिका बात्रा विरुद्ध इंग्लंड, 12.00 वाजता पहिली फेरी सुतीर्था मुखर्जी विरुद्ध स्वीडन 1.00 वाजता टेबल टेनिस मिश्र दुहेरी उप उपांत्यपूर्व >> पराजित विरुद्ध तैवान पुरुष १० मीटर एअर पिस्टल पात्रता फेरी >> चालू आहे. पुरुष हॉकी A ग्रुप >> भारत विजयी 3-2 विरुद्ध न्युझीलंड बॅडमिंटन पुरुष दुहेरी ग्रुप A विरुद्ध तैवान >> वेट लिफ्टींग महिला - ४९ किलो गट >> टेनिस पुरुष एकेरी पहिली फेरी>> बॅडमिंटन पुरुष एकेरी ग्रुप D - विरुद्ध इस्राईल >> रोइंग पुरुष दुहेरी >> ज्युडो महिला ४८ किलो >> भारत बाहेर. बॅडमिंटन पुरुष दुहेरी ग्रुप A >> विरुद्ध तैवान बॉक्सिंग पुरुष (63-69 किलो) >> विकास किशन विरुद्ध जपान 4.00 वाजता हॉकी महिला ग्रुप A >> विरुद्ध नेदरलँड असा आजचा कार्यक्रम आहे.

In reply to by तुषार काळभोर

रोइंगचे चित्रण सकाळी पाहिले. मग विचार केला की हा खेळ वाढवायचा तर ते infrastructure किती महाग पडेल. पुण्याच्या बालेवाडीत आहे म्हणतात . आहे का?

In reply to by तुषार काळभोर

अभिनंदन! वेट लिफ्टींग महिला - ४९ किलो गट रजत-मीराबाई चानू

पहिल्याच दिवशी वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारताला रौप्यपदक मिळवून दिले.

In reply to by कंजूस

आज चारला आपला हॉकी नेदरलॅंड सोबत आणि उद्या Australia बरोबर आहे. शिवाय उद्या सिंधू बॅडमिंटन वैयक्तिक आणि अजून काही सामने आहेत. सकाळी सहापासून टी व्ही समोर!

पहिले पदक...माहितीसाठी सर्वांचे धन्यवाद.

टेबल टेनिस महिला एकेरी पात्रता फेरी >> पाहिली फेरी मनिका बात्रा विजयी विरुद्ध इंग्लंड तिरंदाजी मिश्र सांघिक >> भारत पराभूत विरुद्ध दक्षिण कोरिया, उपांत्यपूर्व फेरी पुरुष १० मीटर एअर पिस्टल पात्रता फेरी >> मिरत चा सौरभ चौधरी पात्रता फेरीत सर्वाधिक गुण मिळवून अंतिम फेरीत. बॅडमिंटन पुरुष दुहेरी ग्रुप A विरुद्ध तैवान >> विजयी वेट लिफ्टींग महिला - ४९ किलो गट >> मीराबाई चानू रजत पदक टेनिस पुरुष एकेरी पहिली फेरी>> सुमित नागल विजयी विरूद्ध उझबेकिस्तान बॅडमिंटन पुरुष एकेरी पहिली फेरी>> बाहेर रोइंग पुरुष दुहेरी >> बाहेर बॅडमिंटन पुरुष दुहेरी ग्रुप A >> सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी विजयी विरुद्ध तैवान तिरंदाजी मिश्र सांघिक >> भारत पराभूत विरुद्ध दक्षिण कोरिया

सौरभ चौधरी पात्रता फेरीत पहिला आला होता, पण अंतिम फेरीत फारच सुमार कामगिरी झाली. आठपैकी सातव्या स्थानावर आला.

सुतीर्था मुखर्जी हिने देखील मानिका बात्रा पाठोपाठ पहिली फेरी जिंकली. टेबल टेनिस महिला एकेरीत आता भारताच्या दोन खेळाडू दुसऱ्या फेरीत दाखल झाल्या आहेत

In reply to by कंजूस

पण जिथे मि मार्शल आर्ट शिकलो तिथे समोरच्याचा पंच अथवा किक व्यवस्थित ब्लॉक केली की अर्धा गुण, आपली किक समोरच्या चेहऱ्याला लागली तर दोन गुण, पंच /किक बेल्टच्यावर अन मानेच्या खाली असेल तर एक गुण आपला पंच चेहऱ्यावर लागला तर अर्धा गुण कट आपली पंच/ किक जर बेल्ट च्या खाली मारली तर अर्धा गुण कट कोणत्याही कारणाने आपला बेल्ट जमिनीला टेकला (आपण पडलो) तर पाच गुण कट असे नियम होते.

बॉक्सिंग पुरुष (63-69 किलो) >> विकास किशन पराभूत विरुद्ध जपान हॉकी महिला ग्रुप A >> भारत पराभूत विरुद्ध नेदरलँड हे दोन्ही पराभव ५-० असे दारुण होते.

चीन अपेक्षेनुसार सुरुवातीपासून आघाडीवर आहे. काही मिनिटांसाठी भारत एका रजत पदकासह दुसऱ्या स्थानी होता. (त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवलाय ;) ) सध्या भारत बाराव्या स्थानी आहे. . . एकदा का athletics मुख्य स्पर्धा (धावणे, लांब उंच उडी, पोहणे, इत्यादी) सुरू झाल्या की अमेरिका आणि युरोपची लयलूट सुरू होईल.

महिला १० मीटर पिस्तूल >> पात्रता फेरी (मनू भाकर आणि यशस्विनी सिंह देस्वाल) पुरुष स्कीट शूटिंग >> पात्रता फेरी (राज्यवर्धन राठोड यांना ज्यात रजत पदक मिळालं होतं) मैराज अहमद खान अंगद विरसिंह बाजवा रोईंग पुरुष दुहेरी >> (पुनः प्रयत्न) पात्रता फेरी अरुण लाल जाट अरविंद सिंग बॅडमिंटन महिला एकेरी ग्रुप J राऊंड >> पी व्ही सिंधू विरुद्ध इस्रायल टेनिस महिला दुहेरी >> पहिली फेरी सानिया मिर्झा+ अंकिता रैना विरुद्ध युक्रेन नौकानयन Laser Radial Women नेत्रा कुमानन 2 १०मीटर एअर रायफल पुरुष एकेरी >> पात्रता फेरी दीपक कुमार दिव्यांश पनवर नौकानयन Laser Radial Women >> दुसरी रेस नेत्रा कुमानन टेबल टेनिस पुरुष एकेरी >> दुसरी फेरी साथीयन G नौकानयन Laser Radial पुरुष >> पहिली + दुसरी शर्यत विष्णू सर्वानन टेबल टेनिस महिला एकेरी >> दुसरी फेरी मनिका बात्रा विरुद्ध युक्रेन बॉक्सिंग महिला फ्लाय वेट (४८-५१) >> पात्रता फेरी मेरी कोम हॉकी पुरुष >> ग्रुप A दुसरा सामना विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग पुरुष लाईट वेट (५७-६३)>> पात्रता फेरी मनीष कौशिक जलतरण महिला १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट १ माना पटेल जलतरण पुरुष १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट ३ श्रीहरी नटराज हुश्श! भरगच्च कार्यक्रम आहे!

महिला १० मीटर पिस्तूल >> पात्रता फेरी (मनू भाकर आणि यशस्विनी सिंह देस्वाल) बाहेर *** आर्टिस्टिक जिमॅस्टिक महिला>> पात्रता फेरी प्रणती नायक बाहेर मागच्या वेळी दीपा कर्माकरचं पदक थोडक्यात हुकलं होतं. नेत्रा कुमानन, दीपा कर्माकर, प्रणती नायक अशा खेळात प्रतिनिधित्व करतात ज्यांची नावे वाचल्यावर हे काय आहे, ते पाहण्यासाठी गुगल करावं लागतं. अशा परिस्थितीत त्या तिथपर्यंत पोहचल्या, हेच खूप मोठं यश आहे. अर्थात अल्पसंतुष्टपणा नाही, पण पदक न मिळताही त्यांना यशस्वी म्हणावं लागेल. *** रोईंग पुरुष दुहेरी >> (पुनः प्रयत्न) पात्रता फेरी अरुण लाल जाट अरविंद सिंग >> उपांत्य फेरीत दाखल **** बॅडमिंटन महिला एकेरी ग्रुप J राऊंड >> पी व्ही सिंधू विजयी विरुद्ध इस्रायल **** टेनिस महिला दुहेरी >> पहिली फेरी सानिया मिर्झा+ अंकिता रैना पराभूत विरुद्ध युक्रेन **** १०मीटर एअर रायफल पुरुष एकेरी >> पात्रता फेरी दीपक कुमार दिव्यांश पनवर बाहेर **

एक गोष्ट लक्षात आली आहे, इतर देशांच्या खेळाडूंच्या कपड्यांवर स्पॉन्सरचे लोगो दिसतात. भारतीय खेळाडूंच्या कपड्यांवर (अर्थात अपवाद सोडून) लोगो दिसत नाहीत. बहुतेक सगळे भारतीय खेळाडू वैयक्तिक अथवा सरकारी अर्थसाहाय्यावर अवलंबून आहेत.

पुरुष स्कीट शूटिंग >> पात्रता फेरी दिवस-१ : भारत बाहेर. (राज्यवर्धन राठोड यांना ज्यात रजत पदक मिळालं होतं) मैराज अहमद खान - ७१ गुण, २५ स्थान अंगद विरसिंह बाजवा - ७३ गुण (Count back 13) , ११ स्थान. (टॉप सहा खेळाडू अंतिम फेरी खेळतील. ) कदाचित यात दिवस २ आहे, ज्यात रँकिंग उंचावण्याची संधी असेल. **** नौकानयन Laser Radial Women नेत्रा कुमानन सोळाव्या स्थानी आहे. पण पुढील फेरीत जाण्याचे नियम माहिती नाहीत. उद्या कदाचित कळेल. **** टेबल टेनिस पुरुष एकेरी >> दुसरी फेरी साथीयन G हाँगकाँग विरुद्ध चुरशीच्या सामन्यात पराभूत झाला. **** टेबल टेनिस महिला एकेरी >> दुसरी फेरी मनिका बात्रा विजयी विरुद्ध युक्रेन **** बॉक्सिंग महिला फ्लाय वेट (४८-५१) >> पात्रता फेरी मेरी कोम विजयी विरुद्ध डॉमिनिकन रिपब्लिक २०१२ लंडन मध्ये कांस्य विजेती, चार मुलांची आई, ३८ वर्षे वय. जिगरबाज!! **** खालील लढती आज बाकी आहेत. हॉकी पुरुष >> ग्रुप A दुसरा सामना विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग पुरुष लाईट वेट (५७-६३)>> पात्रता फेरी मनीष कौशिक जलतरण महिला १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट १ माना पटेल जलतरण पुरुष १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट ३ श्रीहरी नटराज

भारताच्या प्रिया मलिक ला सुवर्ण

हॉकी पुरुष >> ग्रुप A दुसरा सामना विरुद्ध ऑस्ट्रेलिया ५-१ पहाणे सोडून दिले!

हॉकी पुरुष >> ग्रुप A दुसरा सामना भारत पराभूत विरुद्ध ऑस्ट्रेलिया १:७ अतिशय दारुण पराभव. भारतीय पुरुष हॉकी संघाचा ऑलिंपिक स्पर्धेत इतका वाईट पराभव कधी झाला नसावा. **** बॉक्सिंग पुरुष लाईट वेट (५७-६३)>> पात्रता फेरी मनीष कौशिक पराभूत विरुद्ध इंग्लंड ४:१ **** जलतरण महिला १०० मीटर बॅक स्ट्रोक >> पात्रता फेरी माना पटेल बाहेर. एकूण खेळाडूंमध्ये ३९वा क्रमांक. केवळ टॉप १६ खेळाडू उपांत्य फेरीत पात्र ठरले. *** जलतरण पुरुष १०० मीटर बॅक स्ट्रोक >> हिट ३ श्रीहरी नटराज बाहेर. एकूण खेळाडूंमध्ये २७ वा क्रमांक. केवळ टॉप १६ खेळाडू उपांत्य फेरीत पात्र ठरले. **** एकूण आजचा दिवस वाईटच गेला. जे पराभव झाले ते अतिशय वाईट झाले. मेरी कोम, सिंधू, मनिका बात्रा आणि अरुण लाल जाट व अरविंद सिंग अशा केवळ चार स्पर्धात पुढील फेरीत जाण्यापुरते यश मिळाले. त्यातील पहिले दोन अपेक्षित होते.

In reply to by तुषार काळभोर

आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरताना भारतीय पुरुष संघाने सात गोल स्वीकारले. 1928 ते 1956 दरम्यान च्या सर्व सहा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मिळून भारताने केवळ सात गोल स्वीकारले होते.

चीन, जपान आणि अमेरिका अनुक्रमे ६, ५ व ४ सुवर्ण पदकांसह पहिल्या तीन स्थानी. भारत एक रजत पदकासह २४ वा क्रमांक.

१. टेनिस पुरुष एकेरी : दुसरी फेरी सुमित नागल विरुद्ध रेफ्यूजी ROC संघाचा दानील मेदवेदेव *** २. तिरंदाजी पुरुष सांघिक : उपांत्यपूर्व विरुद्ध कझाकस्तान *** ३. टेबल टेनिस महिला एकेरी : तिसरी फेरी मनिका बात्रा विरुद्ध ऑस्ट्रिया *** ४. तलवारबाजी (फेन्सिंग) : Women's individual sabre पहिली फेरी भवानी देवी विरुद्ध ट्यूनीशिया *** ५. टेबल टेनिस पुरुष एकेरी : दुसरी फेरी शरथ कमल अचंता विरुद्ध पोर्तुगाल *** ६. बॅडमिंटन पुरुष दुहेरी : पहिली फेरी गट A सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी *** ७. नेमबाजी पुरुष एकेरी - Skeet : दिवस २ मैराज अहमद खान - ७१ गुण, २५ स्थान अंगद विरसिंह बाजवा - ७३ गुण (Count back 13) , ११ स्थान. *** ८. जलतरण पुरुष एकेरी : २०० मीटर बटरफ्लाय : पात्रता फेरी साजन प्रकाश *** ९. बॉक्सिंग पुरुष मिडलवेट : पात्रता फेरी आशिष कुमार विरुद्ध चीन *** १०. हॉकी महिला : गट फेरी A विरुद्ध जर्मनी

https://www.indiatoday.in/sports/tokyo-olympics/story/tokyo-2020-china-… खरच कालच मला स्वप्न पडलं होते हे!पहाटे पडलं असेल तर नक्की सत्यात उतरेल :) चायनीज विजेता खेळाडू डोपींगमध्ये सदोष आढळण्याची शक्यता तेव्हा मीराबाई चानु यांना गोल्ड मिळण्याची शक्यता आहे.

https://www.indiatoday.in/sports/tokyo-olympics/story/tokyo-2020-china-… खरच कालच मला स्वप्न पडलं होते हे!पहाटे पडलं असेल तर नक्की सत्यात उतरेल :) चायनीज विजेता खेळाडू डोपींगमध्ये सदोष आढळण्याची शक्यता तेव्हा मीराबाई चानु यांना गोल्ड मिळण्याची शक्यता आहे.

१. टेनिस पुरुष एकेरी : दुसरी फेरी सुमित नागल पराभूत विरुद्ध रेफ्यूजी ROC संघाचा दानील मेदवेदेव *** २. तिरंदाजी पुरुष सांघिक :उप-उपांत्यपूर्व विजयी ६:२ विरुद्ध कझाकस्तान उपांत्यपूर्व : पराभूत विरुद्ध द. कोरिया *** ३. टेबल टेनिस महिला एकेरी : तिसरी फेरी मनिका बात्रा पराभूत विरुद्ध ऑस्ट्रिया *** ४. तलवारबाजी (फेन्सिंग) : Women's individual sabre पहिली फेरी भवानी देवी विजयी १५:३ विरुद्ध ट्यूनीशिया दुसरी फेरी भवानी देवी पराभूत विरुद्ध फ्रान्स *** ५. टेबल टेनिस पुरुष एकेरी : दुसरी फेरी शरथ कमल अचंता विजयी ४:२ विरुद्ध पोर्तुगाल *** ६. बॅडमिंटन पुरुष दुहेरी : पहिली फेरी गट A सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी पराभूत विरुद्ध इंडोनेशिया *** ७. नेमबाजी पुरुष एकेरी - Skeet : दिवस २ मैराज अहमद खान - ७१ गुण, २५ स्थान अंगद विरसिंह बाजवा - ७३ गुण (Count back 13) , ११ स्थान. स्पर्धेतून बाहेर. *** टेबल टेनिस महिला एकेरी : दुसरी फेरी सुतीर्था मुखर्जी ०:४ पराभूत पोर्तुगाल *** नौकानयन पुरुष एकेरी + महिला एकेरी : दोघेही पात्रता फेरीत बर्‍यापैकी पिछाडीवर आहेत. आतापर्यंत चार शर्यती झाल्या आहेत. अजून किती शर्यती आहेत कुणास ठाऊक! *** बॉक्सिंग : मिडलवेट पात्रता फेरी आशिष कुमार : पराभूत विरुद्ध चीन *** जलतरण पुरुष २०० मीटर बटरफ्लाय प्रकाश साजन : पहिल्या गटात आठपैकी चौथ्या स्थानावर आहे. एकूण बत्तीसपैकी पहिले सोळाजण उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील. *** बाकी: १०. हॉकी महिला : गट फेरी A विरुद्ध जर्मनी एकूणच आजचा दिवस कालच्या पेक्षा अधिक निराशादायक. केवळ शरथ अचंता पुढील फेरीत दाखल व प्रकाश साजन अजून बाकी गटांच्या निर्णयावर अवलंबून

१. १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक : पहिल्या फेरीत मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी पहिला क्रमांक मिळवला, पण दुसऱ्या पात्रता फेरीत सातव्या क्रमांकावर राहिले. आव्हान संपुष्टात. २. हॉकी पुरुष गट A: विजयी ३:० विरुद्ध स्पेन ३. बॅडमिंटन पुरुष दुहेरी : गट फेरी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी विजयी २:० विरुद्ध ब्रिटन ४. टेबल टेनिस पुरुष एकेरी : तिसरी फेरी शरथ अचंता पराभूत १:४ विरुद्ध चीन ५. सेलिंग मध्ये नेत्रा कुमानान आणि विष्णू सरवानान यांनी प्रत्येकी सहा शर्यती पूर्ण केल्या आहेत. ६. १० मीटर मिश्र सांघिक एलावेनिल वलरीवन आणि दिव्यांश सिंह पन्वर बाराव्या स्थानी आणि बाहेर. ७. बॉक्सिंग महिला वेल्टर वेट (६४-६९): पात्रता फेरी लवलिना बोर्गोहेन विजयी विरुद्ध जर्मनी एकूण बरा दिवस. हॉकी, बॅडमिंटन, बॉक्सिंग मध्ये समाधानकारक विजय मिळाले. हॉकी मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पराभव विसरून चांगली सुरुवात केली असं दिसतंय. पुढचा प्रवास असाच जोषपूर्ण होवो... बॅडमिंटन आणि बॉक्सिंग मध्ये आशा पल्लवित झाल्या आहेत.

In reply to by तुषार काळभोर

फिर चाहे वो लडकी लाये या लडका... पण लडके फार काही करत आहेत असे दिसत नाही ऑलिम्पिकमधे

१. महिला हॉकी (गट फेरी) पराभूत ४:१ विरुद्ध ब्रिटन २. बॅडमिंटन महिला एकेरी (गट फेरी) सिंधू विजयी २:० विरुद्ध हाँगकॉंग ३. तिरंदाजी (३२ ची पात्रता फेरी) तरुणदीप राय विजयी ६:४ विरुद्ध युक्रेन (अंतिम १६ मध्ये पराभूत विरुद्ध इस्रायल) ४. रोइंग पुरुष डबल स्कल प्रकार (उपांत्य फेरी) अरुण लाल जाट आणि अरविंद सिंग (अंतिम सामना -ब) साठी पात्र) ५. तिरंदाजी पुरुष एकेरी (३२ ची पात्रता फेरी) प्रवीण जाधव विजयी विरुद्ध रेफ्यूजी ROC संघाचा Galsan BAZARZAHPOV .. प्रवीण जाधव पराभूत विरुद्ध युएसए ६. तिरंदाजी महिला एकेरी (३२ ची पात्रता फेरी) दिपीका कुमारी विजयी विरुद्ध भुतानची कर्मा १६ ची पात्रता फेरी दीपिका कुमारी विजयी विरुद्ध युएसए (अंतिम आठ - उपांत्यपूर्व मध्ये दाखल) ७. बॅडमिंटन पुरुष एकेरी (गट फेरी) साई प्रणिथपराभूत ०:२ विरुद्ध नेदरलॅण्ड्स ८. बॉक्सिंग महिला मिडलवेट (६९-७५ किलो) (१६ पात्रता फेरी) पुजा राणी विजयी विरुद्ध अल्जीरिया आतापर्यंत बरा दिवस..

M1 आपल्या देशातील जाहिरात करणार्‍या कंपन्यांनी देशास गौरव प्राप्त करुन देणार्‍या, खेळाडु , शास्त्रज्ञ, विध्यार्थी इ इ इ. यांना आता जाहिरातीत घेतले पाहिजे. बॉलिवुडवाले आता बास्स झाले. लोकांना जाहिरातीत या देशातील खरे "हिरो" पहायला अधिक आवडतील आणि अनेकांना प्रेरणा देखील मिळेल आणि खेळाडुंना प्रोत्साहन देखील. :) फिलिपाईन्सला ऑलिंपिकच्या आत्ता पर्यंत इतिहासातील पहिले सुवर्ण पदक मिळाल्याची बातमी वाचनात आली आहे, तेथील सरकार ने खेळाडुंवर विशेष बक्षिसे देखील जाहीर केलेली होती.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - मेरे तो गिरधर गोपाल, दूसरो ना कोई... :- मीरा


In reply to by मदनबाण

होय, रिनच्या जाहीरातमधील भवानी देवी (भारताची पहिली महिला ऑलिंपिक तलवारबाजी पटू) दरवेळी लक्ष वेधून घेते.

In reply to by Bhakti

रिन म्हणजे "माझ्या खेळासाठी आईने सोनं विकलं. आई, बघ मी सोनं जिंकून आणलं !" - तीच जाहिरात ना? थम्सअपने पण चेंज म्हणून रणवीरसिंग ऐवजी, मनू भाकरला घेऊन जाहिरात केली आहे. (आता बहुतेक अजून २-३ जण घेतले आहेत त्यात). बदल चांगला आहे, पण दुर्दैवाने या चतु:वार्षिक उचक्या आहेत. १५ ऑगस्टनंतर परत रणवीर सिंग (आणि महेश बाबू) परत येतील. (आता जाहिराती येताहेत आठ पंधरा दिवसांसाठी. पण कुठल्याच खेळाडूच्या कपड्यांवर पुरस्कर्त्यांचा लोगो नाही दिसत.)

In reply to by तुषार काळभोर

हो तीच https://youtu.be/gbMsDZjb-Bo कोल्ड्रिंक्सच/पेय ;) आवडत नाही. कोल्ड्रिंक्सच्या /पेयाच्या जाहिराती तर नाहीच नाही.

१. गोल्फ पुरुष पहिली फेरी अनिर्बन लाहिरी उदयन माने २. रोइंग पुरुष डबल स्कल प्रकार (अंतिम फेरी B) अरुण लाल जाट आणि अरविंद सिंग ३. नेमबाजी २५ मीटर पिस्तूल महिला एकेरी पात्रता फेरी राही सरनौबत मनू भाकर ४. हॉकी पुरुष गट फेरी विरुद्ध अर्जेंटिना ५. बॅडमिंटन महिला एकेरी उपउपांत्यपूर्व सामना सिंधू विरुद्ध डेन्मार्क ६. तिरंदाजी पुरुष एकेरी (३२ ची पात्रता फेरी) अतनू दास ७. Sailing laser radial पुरुष सातवी आणि आठवी शर्यत विष्णू सरवानन ८. Sailing laser radial महिला सातवी आणि आठवी शर्यत नेत्रा कुमानन ९. Sailing 49er पुरुष पाचवी आणि शर्यत गणपती केल्पंडा वरुण ठक्कर १०. बॉक्सिंग सुपर हेवी (९१+ वजन) : १६ची पात्रता फेरी सतीश कुमार विरुद्ध जमैका ११. बॉक्सिंग फ्लाय वेट (४८-५१) १६ ची फेरी मेरी कोम विरुद्ध कोलंबिया १२. जलतरण पुरुष १०० मीटर बटरफ्लाय गट फेरी सजन प्रकाश

मैदानी हॉकी स्पर्धेत भारतीय पुरूष संघाने अर्जैंटिना संघावर ३-१ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पी. व्ही. सिंधूने आपला सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

In reply to by श्रीगुरुजी

मैदानी हॉकी स्पर्धेत भारतीय पुरूष संघाने अर्जैंटिना संघावर ३-१ असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. >>> ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारूण पराभवाने पेटून उठलेले दिसताहेत. सिंधूकडून पुष्कळ आशा आहेत. साईना जेव्हा तिच्या खेळाच्या शिखरावर होती, तेव्हा दुर्दैवाने ऑलिम्पिक स्पर्धेत तिला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती.

तिरंदाजीमध्ये अतानू दासने प्रथम तैवानच्या डेंग यू चेंगचा ६-४ असा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यानंतर दासने २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या जिन हायकचा शूट आउटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले. बॉक्सिंगमध्ये पुरुषांच्या ९१ किलो वजनी गटात भारताच्या सतीशकुमारने जमैकाच्या रिकोर्डो ब्राउनचा ४-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आजचा दिवस चांगला चाललाय.

In reply to by नावातकायआहे

तीन फेर्‍यांमध्ये ५ परीक्षकांपैकी दोघांनी मेरी कोमच्या पक्षात गुण दिले तर तिघांनी विरोधात. पण फरक केवळ एका गुणाचा होता. १४२ विरुद्ध १४३

In reply to by तुषार काळभोर

:( मनापासून वाईट वाटले... मेरी को एक पदक मंगताच