✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चालू घडामोडी एप्रिल भाग २

स
साहना यांनी
Wed, 04/07/2021 - 01:46  ·  लेख
लेख
चालू घडामोडीच्या जुन्या धाग्यावर बराच राजकीय धुराळा उडत असल्याने बिन राजकीय घडामोडीचा हा दुसरा धागा. - कपिल शर्माला पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव तृषान असे ठेवले आहे. हे नाव पूर्ण पणे निरर्थक आहे. आपल्या अपत्यांना चांगली नवे द्यावीत. गुगल वर अवलंबून राहू नये. आमचे मित्र श्री नित्यानंद मिश्रा ह्यांचे सुनाम हे पुस्तक विकत घ्यावे आणि अपेक्षित पालकांना भेट म्हणून द्यावे. - बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या आणि डॉक्टर श्रीमती स्वप्ना पाटकर ह्यांनी महाराष्ट्रांतील थोर, साक्षांत वाचस्पती श्री संजयजी राऊतजी ह्यांच्यावर खूप आरोप केले आहेत. त्यांनी आपल्याला अश्लील कॉल केले, मानसिक छळ केला इत्यादी. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. अक्ख्या महाराष्ट्राला विद्वत्ता पुरवणाऱ्या ह्या माणसाला काय काय सहन करावे लागते हे वाचून डोळे पाणावतात. - फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन एका संकेतस्थळावर प्रकाशित झाला. आपण सुद्धा ह्यांत आहात तर इथे तपासून पहा : https://haveibeenfacebooked.com/ - चीन ने सायबर युवान ह्या १००% डिजिटल पैश्यांची सिस्टम सुरु केली आहे. (ह्याचा क्रिप्टो करन्सी शी संबंध नाही). https://www.wsj.com/articles/china-creates-its-own-digital-currency-a-first-for-major-economy-11617634118 - आनंद महिंद्रा ह्यांनी आपला शब्द पाळत इडली अम्माला तिचे स्वतःचे घर आणि किचन बनवून दिले https://indianexpress.com/article/trending/trending-in-india/tamil-nadu-idli-amma-new-home-workspace-promise-anand-mahindra-7256916/ - बायजु ह्या कंपनीने आकाश ट्युटोरिअल ह्या कंपनीला १ अब्ज डॉलर मध्ये विकत घेतले. भारतीय शिक्षण क्षेत्रांत ज्या गोष्टी सुदैवाने अद्याप सरकारी नियंत्रणाखाली नाहीत तिथे भारत वेगाने प्रगती करत आहे. - पुनावाला ह्यांनी आपली कंपनी प्रचंड मेहनत करून दिवसाला २ दशलक्ष व्हॅक्सीन्स बनवत आहे असे सांगितले. सध्या भारत दिवसाला २-३ दशलक्ष वॅक्सीन देऊ शकत आहे त्यामुळे वॅक्सीन ची निर्यात बंद झाली आहे. वॅक्सीन क्षमता वाढवण्यासाठी ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे असं SSI ने सांगितले. - मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे. मोदींनी ह्या स्कीम मध्ये ३७% कपात केली आहे. हि चांगली गोष्ट आहे. - एप्रिल २०२३ मध्ये भारतीय रेलवे वर खाजगी रेल्वे ऑपरेटरच्या रेलवे धावतील अशी अपेक्षा आहे. साधारण १५१ रूट्स वर खाजगी ऑपरेटर आपल्या रेल्वे चालवतील. - सौदी अरेबिया ने कृत्रिम रित्या तेलाच्या किमती वर ठेवल्याने भारतीय कंपन्यांनी सौदी कडून तेल घेणे ३०% नि कमी केले आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
54288 वाचन

💬 प्रतिसाद (205)

प्रतिक्रिया

वाक्य ओफ द ईयर ;)

Bhakti
गुरुवार, 04/08/2021 - 09:46 नवीन
हा हा...काल हे ऐकून अर्धा तास हसत बसले होते.आज परत आठवण करून दिली बर केलं..हा..हा.हा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

राज ठाकरेंंच्या हातात राज्य

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/08/2021 - 11:08 नवीन
राज ठाकरेंंच्या हातात राज्य नाही आणि त्यांच्यावर राज्यही आलेले नाही. मुळात ते खेळातून केव्हाच बाद झालेत. त्यामुळे आता मैदानाबाहेर बसून निर्रथक कोट्या करणे एवढेच ते करू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हे सगळं ठीक आहे.पण मध्यंतरी

Bhakti
गुरुवार, 04/08/2021 - 12:21 नवीन
हे सगळं ठीक आहे.पण मध्यंतरी मासे व्यापारी, सिनेमावाले अजून बर्याच संघटना राज ठाकरेंकडे गार्हाणे मांडायला गेले होते , ते सत्तेत नाही आणि येणार नाही मग ते लोक का गेले? कधी कधी ऐकून घेणार आणि दोन सुनावणारही पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

या paid news असतात. आपल्यात

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/08/2021 - 12:34 नवीन
या paid news असतात. आपल्यात अजून थोडी धुगधुगी शिल्लक आहे हे दाखविण्यासाठी असे दिखाऊ सोहळे घडवून आणले जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

अच्छा!

Bhakti
गुरुवार, 04/08/2021 - 12:36 नवीन
अच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

झालं ते झालं... राजकारण गेलं

Bhakti
गुरुवार, 04/08/2021 - 10:58 नवीन
झालं ते झालं... राजकारण गेलं चूलीत..पुढचं काही दिवस महाराष्ट्रासाठी खुप महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

मंत्र्याच्या बंगल्यावर प्रत्येकी 90 कोटी रुपये खर्च

दिगोचि
गुरुवार, 04/08/2021 - 09:13 नवीन
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घोषित केले आहे की या बगल्याच्या डागडुजीसाठी 3800 कोटी रुपये खर्च होणार आहे. याबाबत काय वाटते?
  • Log in or register to post comments

काय वाटणार?

मुक्त विहारि
गुरुवार, 04/08/2021 - 09:24 नवीन
80% लोकांनी, शिवसेनेला मतदान केले न्हवते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिगोचि

भारतातून येणाऱ्यांना न्यूझीलंडमध्ये No Entry.....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/08/2021 - 09:34 नवीन
.... स्वत:च्या नागरिकांनाही प्रवेश नाकारला..... https://www.loksatta.com/desh-videsh-news/new-zealand-temporarily-suspending-travel-from-india-pm-jacinda-ardern-scsg-91-2439284/ रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान भारतातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला न्यूझीलंडमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात नव्याने आढळून आलेल्या २३ रुग्णांपैकी १७ रुग्ण हे भारतातून न्यूझीलंडमध्ये दाखल झालेले प्रवासी आहेत. त्यामुळेच भविष्यात ही संख्या वाढू नये म्हणून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना पुढील दोन आठवडे परवानगी नाकारण्यात आलीय.
  • Log in or register to post comments

जेसिका ताई

चौकस२१२
गुरुवार, 04/08/2021 - 13:23 नवीन
स्वतःचं नागरिकांवर असे बंधन घातले जात नाही सहसा ... खरं तर जेसिका ताई तश्या उदारमतवादी पक्षाच्या आहेत पण कसे काय असे केले ! पण जेव्हा पूर्वी परत प्लेग भारतात आला होता तेव्हा सुद्धा अनेक देशांनी हे बंधन घातले होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

इन्स्टाग्रामद्वारे ड्रग्ज विकणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/08/2021 - 10:19 नवीन
..... एनसीबीकडून अटक.... https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-news-ncb-arrests-21-year-old-girl-for-selling-drugs-via-instagram-981237 ड्रग्सच्या व्यवसायात, मुस्लिम लोकांचे जास्त आर्थिक संबंध आहेत का?
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 04/08/2021 - 10:54 नवीन
"ड्रग्सच्या व्यवसायात, मुस्लिम लोकांचे जास्त आर्थिक संबंध आहेत का?" हे म्हणजे अंडरवर्ल्डमध्ये मराठी लोकांचे आर्थिक संबंध आहेत का ? असे विचारण्यसारखे. दोघांचेही उत्तर 'हो' असे आहे पण सरसकटीकरण अयोग्य वाटते. अनेक कारणे आहेत त्यामागे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सरसकटीकरण अयोग्य वाटते.

मुक्त विहारि
गुरुवार, 04/08/2021 - 11:47 नवीन
नोटेड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

रेमडेसिवीर प्रोडक्टशन

Bhakti
गुरुवार, 04/08/2021 - 10:51 नवीन
रेमडेसिवीर प्रोडक्टशन कंपन्यांशी आरोग्य मंत्री टोपे आज बैठक घेणार.याचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य , केंद्र दोघांचीही जबाबदारी आहे.
  • Log in or register to post comments

https://www.loksatta.com

मराठी_माणूस
गुरुवार, 04/08/2021 - 11:08 नवीन
https://www.loksatta.com/kolhapur-news/shivaji-university-tops-in-quality-abn-97-2439185/ शिवाजी विद्यापीठाचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments

अभिनंदन वगैरे करायला आपली

खेडूत
गुरुवार, 04/08/2021 - 11:38 नवीन
अभिनंदन वगैरे करायला आपली हरकत नाही. अभिनंदन! पण हे सगळे घडवून आणता येते हे आपल्या माहितीसाठी सांगतो. वास्तविक पाहता सगळीकडे दर्जा खालावत चालला आहे. सध्या पुण्यातली सुमार अभिमत विद्यापीठ सुध्धा असेच मानांकन मिरवतात.. मग त्यांचाही दर्जा चांगला म्हणावा लागेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

नविन परीक्षण पध्दतीत हे सर्व

मराठी_माणूस
Fri, 04/09/2021 - 09:25 नवीन
नविन परीक्षण पध्दतीत हे सर्व करणे खुप अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

काय आणि कुणाला अवघड आहे कळलं

खेडूत
Fri, 04/09/2021 - 14:01 नवीन
काय आणि कुणाला अवघड आहे कळलं नाही!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

मानांकन मिळवणे .

मराठी_माणूस
Fri, 04/09/2021 - 14:47 नवीन
मानांकन मिळवणे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

ओक्के.

खेडूत
Fri, 04/09/2021 - 14:55 नवीन
ओक्के. मग अवघड काम करून दाखवले म्हणून अभिनंदन करूयात. दर्जा आहे म्हणून नको ...! एक शंका, अवघड आहे ( नक्की काय अवघड देवाक ठाऊक) ते सोपं करायचा प्रयत्न का करत नाहीत ही विद्यापीठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

तुमच्या दृष्टीने कोणते

मराठी_माणूस
Fri, 04/09/2021 - 15:00 नवीन
तुमच्या दृष्टीने कोणते दर्जेदार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

सोप्पंय..

खेडूत
Fri, 04/09/2021 - 15:19 नवीन
सोप्पंय.. ज्यांना असे मानांकन मिळवणे अवघड जात नाही ती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

ह्यांनी ते घडवुन आणले असे

मराठी_माणूस
Fri, 04/09/2021 - 15:44 नवीन
ह्यांनी ते घडवुन आणले असे तुम्ही कशावरुन ठरवले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

ह्यांनी घडवून आणले असं कुठं

खेडूत
Fri, 04/09/2021 - 15:57 नवीन
ह्यांनी घडवून आणले असं कुठं वाचलत? माहितीसाठी सांगितलं की असं बरीच विद्यापीठे करतात त्यामुळं मानांकन मिळणे म्हणजे चांगल्या दर्जाची खात्री नव्हे. नंतर असं सांगत होतो की त्यात अवघड काहीच नाही. (असो. इथे थांबतो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

असं बरीच विद्यापीठे करतात.

मराठी_माणूस
Fri, 04/09/2021 - 16:12 नवीन
असं बरीच विद्यापीठे करतात.
ह्यांनी सुध्दा असेच केले असेल असे प्रतिसादा वरुन वाटले. थांबालात हे बरे केलेत . मीही थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

महाराष्ट्र सरकार कसे कुचकामी

Rajesh188
गुरुवार, 04/08/2021 - 11:42 नवीन
महाराष्ट्र सरकार कसे कुचकामी आणि केंद्रातील bjp सरकार कसे कर्तृत्व वान अशी मत वाचायचा आता विट आला आहे. Bjp च प्रचार इथे चालू आहे का
  • Log in or register to post comments

वाचु नका ;)

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 04/08/2021 - 11:57 नवीन
आवडत नसेल तर न वाचणे हा एक उत्तम उपाय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

अहो यांचे शेंडा न बुड असलेले

बिटाकाका
गुरुवार, 04/08/2021 - 12:08 नवीन
अहो यांचे शेंडा न बुड असलेले प्रतिसाद वाचण्याचा किती विट येत असेल याचा विचार कोण करणार? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

तुम्ही ह्या सरकारने केलेल्या कामाचे गुणगान करा

मुक्त विहारि
गुरुवार, 04/08/2021 - 12:05 नवीन
मी देखील आता, बटाट्या पासून सोने बनवणारे मशीन कधी येणार आहे? ह्याची वाट बघत आहे... बाय द वे, शिवभोजन थाळी घरपोच मिळते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

सेम तू यु र१८८

चौकस२१२
गुरुवार, 04/08/2021 - 13:27 नवीन
सेम तू यु आणि शेम तू यु पण ( आपल्या आधीच्या काही "दर्जेदार कमेंट" बद्दल ) ( नुकताच बीजेपी आयटी सेल चा पगार आला म्हणून उत्सहाने लिहित आहे एवढेच )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

संभाजी भिडेंचे दिव्य विचार

Vichar Manus
गुरुवार, 04/08/2021 - 13:39 नवीन
संभाजी भिडेंचे दिव्य विचार https://www.loksatta.com/maharashtra-news/sambhaji-bhide-statement-on-corona-patients-guidelines-sgy-87-2439498/
  • Log in or register to post comments

आजच्या बातम्यांमध्ये

कपिलमुनी
गुरुवार, 04/08/2021 - 14:04 नवीन
आज महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी लसीकरण बंद पडले आहे. फसवणीस तर केंद्राचा पिल्लू असल्या सारखा बोलतोय. नुसती टीका करतोय , त्याला जनतेशी काहिही देणे घेणे नाहीये
  • Log in or register to post comments

तीन दिवसांचा साठा एक दिवसात

बिटाकाका
गुरुवार, 04/08/2021 - 14:16 नवीन
तीन दिवसांचा साठा एक दिवसात संपला व्हय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

जनतेनेच घरी बसवलें न त्यांना?

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 04/08/2021 - 23:20 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

दोन प्रश्न

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 04/08/2021 - 14:30 नवीन
महाराष्ट्रात रेमेडिसिव्हीर औषधाचा आणि नाशिकसारख्या काही ठिकाणी ऑक्सिजनचाही तुटवडा आहे असे बातम्यांमध्ये सांगत आहेत. हे औषध आणि ऑक्सिजन नक्की कुठून येतो? तो पण केंद्राकडूनच येतो का? दुसरे कोणत्या राज्याला किती लशी द्याव्यात हे नक्की कसे ठरवले जाते? म्हणजे जिल्हास्तरीय प्रशासन (जिल्हाधिकारी किंवा आरोग्याधिकारी वगैरे) जिल्ह्यात एकूण किती लसीकरण केंद्रे आहेत, किती लोक लस घ्यायला पात्र आहेत (४५ वरील वय) आणि किती लोकांना दररोज लस देता येईल अशी यंत्रणा उपलब्ध आहे तसेच लस साठविण्यासाठी किती यंत्रणा जिल्ह्यात उपलब्ध आहे याचा अंदाज घेऊन प्रत्येक जिल्ह्यात किती लसी पाहिजेत हे requisition राज्य सरकारला दिले जाते आणि सगळ्या जिल्ह्यांचे आकडे एकत्र करून ते केंद्राला दिले जाते किंवा कसे? म्हणजे महाराष्ट्रात लोकसंख्या आणि रूग्णांची संख्या दोन्ही जास्त म्हणून जास्त लसी दिल्या जाव्यात ही अपेक्षा ठीक आहे पण या लसी अशाप्रकारे requisition मिळाल्यानंतर केंद्राकडून पाठवल्या जातात की अशाच पाठवल्या जातात? लसी अशाच पाठवल्या जात असतील ही शक्यता जरा कमी. तसे असल्यास महाराष्ट्र सरकारने 'आम्हाला अमुक इतक्या लसी हव्या आहेत' हा आकडा पाठवला त्यापैकी किती लसी प्रत्यक्षात पाठवल्या गेल्या, इतर राज्यांत किती पाठवल्या गेल्या ही तुलना करता येईल. फेसबुकवर वाचले की गुजरातमध्ये लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा कमी असूनही २०० लसीकरण केंद्रे जास्त आहेत. हा आकडा कितपत विश्वासार्ह आहे याची कल्पना नाही. याविषयी कोणाला काही माहित आहे का?
  • Log in or register to post comments

माझ्या अंदाजाने राज्याच्या

बिटाकाका
गुरुवार, 04/08/2021 - 15:02 नवीन
माझ्या अंदाजाने राज्याच्या लोकसंख्येचा आणि दिलेल्या लसींचा काही संबंध नाही. प्रत्येक राज्यात पात्र लोकसंख्या किती आहे यानुसारच लसी दिल्या जात असाव्यात. ************ मंदभक्त आणि गुलामांना, या माहितीशी काहीही देणे घेणे नाहीये आणि वरून आव असा आणतात की जणूकाही यांनाच जनतेची फार काळजी आहे. केंद्राने आकडेवारीसह स्पष्ट केले आहे की कुठल्या राज्याला किती लसी दिल्या जात आहेत. कालच ३ दिवसाचा पुरवठा आहे असे असताना आज लगेच केंद्र बंद कशी पडतात? आणि केंद्राकडून राज्याकडे लसी आल्यानंतर केंद्रापर्यंत वितरणाची जबाबदारी कुणाची? असले प्रश्न मंदभक्तीच्या नादात पडत नसावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

फडणवीस

Rajesh188
गुरुवार, 04/08/2021 - 14:47 नवीन
फडणवीस आणि एकंदरीत राज्य bjp ल राज्याच्या जनतेच्या हिताशी काही ही देणेघेणे नाही असं त्यांचे वागणं बघुन वाटत. त्यांना फक्त सरकार कधी अडचणीत येतंय आणि फडणवीस बाशिंग बांधून कधी बोहल्यावर चढतात ह्या विषयी च इंटरेस्ट आहे. ह्याची फळ त्यांना नक्की भोगायला लागणार आहेत.
  • Log in or register to post comments

काही प्रश्र्नांची उत्तरे मिळतील का?

मुक्त विहारि
गुरुवार, 04/08/2021 - 16:36 नवीन
1. साधू हत्याकांड आणि भाजपचा काही संबंध आहे का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली, ह्या गोष्टीचा आणि भाजपचा काही संबंध आहे का? आधी ह्या साध्या प्रश्र्नांची उत्तरे दिलीत तर उत्तम ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

ठाकरे सरकारने वारंवार भाजपला

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/08/2021 - 17:55 नवीन
ठाकरे सरकारने वारंवार भाजपला फुलटॉस चेंडू टाकले आणि भाजपने त्यावर षटकार मारल्यानंतर पंचाच्या नावाने खडे फोडणे सुरु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आता काय?

नावातकायआहे
गुरुवार, 04/08/2021 - 17:11 नवीन
https://timesofindia.indiatimes.com/india/breaking-news-live-updates-uttarakhand-cm-seeks-report-on-naming-ghats-after-saints/liveblog/81961378.cms
  • Log in or register to post comments

काशी विश्वनाथ मंदिर- ज्ञानवापी मशीद वाद : ....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/08/2021 - 17:27 नवीन
.... न्यायालयाने पुरातत्व खात्याला दिली सर्वेक्षणाची परवानगी... https://www.loksatta.com/desh-videsh-news/varanasi-civil-court-allows-asi-survey-of-gyanvapi-mosque-adjacent-to-kashi-vishwanath-temple-scsg-91-2439698/ आता, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, काय प्रतिसाद देतात, हे बघणे रोचक ठरेल.
  • Log in or register to post comments

स्वागतार्ह निर्णय

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/08/2021 - 17:58 नवीन
स्वागतार्ह निर्णय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सर्वोच्च न्यायालयाचे आजचे तीन निर्णय

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 04/08/2021 - 17:32 नवीन
आज सर्वोच्च न्यायालयाने तीन निर्णय दिले आहेत त्यामुळे समस्त पुरोगाम्यांना भोकाड पसरायची संधी मिळणार आहे. १. अनील देशमुख आणि महाराष्ट्र सरकारने देशमुखांच्या सीबीआय चौकशीविरोधात केलेले अपील नाकारले आहे. २. जम्मूतून रोहिंग्यांची म्यानमारला परतपाठवणी करण्याला स्थगिती द्यायला नकार दिला आहे. ३. काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूलाच ग्यानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण करायचे आदेश पुरातत्व खात्याला दिले आहेत. या तथाकथित मशीदीचा पुढील फोटो बघायला मिळाला Image removed. डावीकडे मंदिराचे खांब अगदी स्पष्ट दिसत आहेत.
  • Log in or register to post comments

माहिती बद्दल धन्यवाद

मुक्त विहारि
गुरुवार, 04/08/2021 - 17:45 नवीन
परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष काय म्हणतात, हे बघणे रोचक ठरेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

उत्तर प्रदेश मध्ये

Rajesh188
गुरुवार, 04/08/2021 - 19:06 नवीन
उत्तर प्रदेश मध्येच जास्त असले प्रकर झाले आहेत .तेथील हिंदू नी अन्याय च विरोध केलाच नाही असे वाटत. सर्वात जास्त हिंदू ची लोकसंख्या उत्तर प्रदेश मध्येच असेल तरी ही अवस्था.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

संख्या कितीही असो ...

मुक्त विहारि
गुरुवार, 04/08/2021 - 19:14 नवीन
एकजूट महत्वाची असते ... इतकेसे इस्त्रायल, अरब राष्ट्रांना पुरून उरले ते एकी मुळे... दुसर्या महायुद्धाच्या काळांत, ज्यू लोकं आर्थिक दृष्टीने संपन्न असूनही, एकी नसल्याने बळी पडली... ज्यू लोकं इतिहासातून शिकले, हिंदू कधीच शिकले नाहीत... घराणीच तुटतात तिथे समाजाचे काय घेऊन बसायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

मशिदीच्या पायर्‍या देवळातले

सौंदाळा
गुरुवार, 04/08/2021 - 18:27 नवीन
मशिदीच्या पायर्‍या देवळातले शिलालेख, मुर्ती तोडुन बनवल्या होत्या आणि काही वर्षांपुर्वीपर्यंत ते दिसत पण होते असे वाचनात होते. नंतर झिजुन गुळगुळीत झाले. कदाचित त्याचे फोटो पण सापडतील. रोज हे शिलालेख मशिदीत येणार्‍यांच्या पायाखाली यावे अशी 'पवित्र' इच्छा होती. बाबरीच्या मानाने हे खुपच अलीकडील काळात झालेले (औरंगजेबाच्या वेळी) काम आहे लवकरच या केसचा योग्य तो निर्णय लागावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

आता लवकर निर्णय लागण्याची शक्यता आहे ....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/08/2021 - 18:53 नवीन
कारण, कट्टर हिंदू हितवादी मतांचे, भाजप कडे, धृवीकरण होत आहे... पण काही उदारमतवादी हिंदूंनी, भाजप कडे वळू नये, ह्यासाठी कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, मोडता नक्कीच घालणार नाहीत...ह्यावेळी कॉंग्रेसची अवस्था, सहनही होत नाही आणि सांगता पण येत नाही, अशी झाली आहे... ह्या निर्णयांचा फायदा, (मंदिर असो वा नसो, रोहिंगे असो वा नसो) दोनच पक्षांना होणार... भाजप आणि MIM..... हिंदूंच्या मतांना दिलेली शून्य किंमत, कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना आता मोजावी लागेलच... हिंदू जागा होत आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

काशी विश्वनाथ मंदिर – ज्ञानवापी मशीद वाद आहे तरी काय?

मुक्त विहारि
गुरुवार, 04/08/2021 - 19:30 नवीन
https://www.loksatta.com/explained-news/explained-gyanvapi-mosque-and-kashi-vishwanath-temple-issue-scsg-91-2439744/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

छत्तिसगडमध्ये कोब्रा कमांडोची नक्षलवाद्यांकडून सुटका

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 04/08/2021 - 18:54 नवीन
छत्तिसगडमध्ये काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी सी.आर.पी.एफ च्या २२ जवानांना चकमकीत ठार मारले. त्याबरोबरच राकेश्वरसिंग मनहास या कोब्रा कमांडोचे अपहरण केले होते. त्याची त्यांनी सुटका केली आहे. सी.आर.पी.एफमध्ये कोब्रा कमांडो सगळ्यात प्रशिक्षित कमांडो असतात असे ऐकले आहे. अशा कमांडोचे अपहरण होणे ही धक्कादायक घटना होती. अर्थात एकदम ३००-४०० नक्षलवाद्यांनी घेरल्यावर कितीही वाकबगार असला तरी कोब्रा कमांडोचेही चालणे कठीणच होते. त्याची सुटका झाली हे चांगले आहे. जाताजाता एक गोष्ट लिहितो. २०१० मध्ये छत्तिसगडमध्ये असाच एक भयानक हल्ला झाला होता आणि त्यात ७५ जवानांची हत्या झाली होती. तेव्हा जनेयुमध्ये तो हल्ला साजरा केला गेला होता असे वाचल्याचे आठवते. जर कोणत्यातरी कोपर्‍यात चर्चवर कोणीतरी दगड मारले तर त्याचा जाब समस्त मोदीसमर्थकांना विचारला जातो त्याप्रमाणेच असा काही प्रकार होत असेल तर त्याचा जाब जनेयुमधील विचारवंतांना का विचारला जाऊ नये? जर पुलवामामध्ये सी.आर.पी.एफ च्या तुकडीवर हल्ला झाल्यानंतर सरकारने हुर्रियतच्या नेत्यांची सुरक्षा आणि त्यांना दाखवला जाणारा नेवैद्य बंद केला असेल तर असे काही झाल्यावर जनेयुतल्या निदान काही प्रोफेसरचे सरकारकडून दिले जाणारे पगार का बंद केले जाऊ नयेत? https://timesofindia.indiatimes.com/india/chhattisgarh-ambush-maoists-release-abducted-crpf-commando-say-sources/articleshow/81970907.cms
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा