Skip to main content

चालू घडामोडी एप्रिल भाग २

लेखक साहना यांनी बुधवार, 07/04/2021 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
चालू घडामोडीच्या जुन्या धाग्यावर बराच राजकीय धुराळा उडत असल्याने बिन राजकीय घडामोडीचा हा दुसरा धागा. - कपिल शर्माला पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव तृषान असे ठेवले आहे. हे नाव पूर्ण पणे निरर्थक आहे. आपल्या अपत्यांना चांगली नवे द्यावीत. गुगल वर अवलंबून राहू नये. आमचे मित्र श्री नित्यानंद मिश्रा ह्यांचे सुनाम हे पुस्तक विकत घ्यावे आणि अपेक्षित पालकांना भेट म्हणून द्यावे. - बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या आणि डॉक्टर श्रीमती स्वप्ना पाटकर ह्यांनी महाराष्ट्रांतील थोर, साक्षांत वाचस्पती श्री संजयजी राऊतजी ह्यांच्यावर खूप आरोप केले आहेत. त्यांनी आपल्याला अश्लील कॉल केले, मानसिक छळ केला इत्यादी. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. अक्ख्या महाराष्ट्राला विद्वत्ता पुरवणाऱ्या ह्या माणसाला काय काय सहन करावे लागते हे वाचून डोळे पाणावतात. - फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन एका संकेतस्थळावर प्रकाशित झाला. आपण सुद्धा ह्यांत आहात तर इथे तपासून पहा : https://haveibeenfacebooked.com/ - चीन ने सायबर युवान ह्या १००% डिजिटल पैश्यांची सिस्टम सुरु केली आहे. (ह्याचा क्रिप्टो करन्सी शी संबंध नाही). https://www.wsj.com/articles/china-creates-its-own-digital-currency-a-f… - आनंद महिंद्रा ह्यांनी आपला शब्द पाळत इडली अम्माला तिचे स्वतःचे घर आणि किचन बनवून दिले https://indianexpress.com/article/trending/trending-in-india/tamil-nadu… - बायजु ह्या कंपनीने आकाश ट्युटोरिअल ह्या कंपनीला १ अब्ज डॉलर मध्ये विकत घेतले. भारतीय शिक्षण क्षेत्रांत ज्या गोष्टी सुदैवाने अद्याप सरकारी नियंत्रणाखाली नाहीत तिथे भारत वेगाने प्रगती करत आहे. - पुनावाला ह्यांनी आपली कंपनी प्रचंड मेहनत करून दिवसाला २ दशलक्ष व्हॅक्सीन्स बनवत आहे असे सांगितले. सध्या भारत दिवसाला २-३ दशलक्ष वॅक्सीन देऊ शकत आहे त्यामुळे वॅक्सीन ची निर्यात बंद झाली आहे. वॅक्सीन क्षमता वाढवण्यासाठी ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे असं SSI ने सांगितले. - मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे. मोदींनी ह्या स्कीम मध्ये ३७% कपात केली आहे. हि चांगली गोष्ट आहे. - एप्रिल २०२३ मध्ये भारतीय रेलवे वर खाजगी रेल्वे ऑपरेटरच्या रेलवे धावतील अशी अपेक्षा आहे. साधारण १५१ रूट्स वर खाजगी ऑपरेटर आपल्या रेल्वे चालवतील. - सौदी अरेबिया ने कृत्रिम रित्या तेलाच्या किमती वर ठेवल्याने भारतीय कंपन्यांनी सौदी कडून तेल घेणे ३०% नि कमी केले आहे.

वाचने 54645
प्रतिक्रिया 205

प्रतिक्रिया

In reply to by मराठी_माणूस

ह्यांनी घडवून आणले असं कुठं वाचलत? माहितीसाठी सांगितलं की असं बरीच विद्यापीठे करतात त्यामुळं मानांकन मिळणे म्हणजे चांगल्या दर्जाची खात्री नव्हे. नंतर असं सांगत होतो की त्यात अवघड काहीच नाही. (असो. इथे थांबतो)

In reply to by खेडूत

असं बरीच विद्यापीठे करतात.
ह्यांनी सुध्दा असेच केले असेल असे प्रतिसादा वरुन वाटले. थांबालात हे बरे केलेत . मीही थांबतो.

महाराष्ट्र सरकार कसे कुचकामी आणि केंद्रातील bjp सरकार कसे कर्तृत्व वान अशी मत वाचायचा आता विट आला आहे. Bjp च प्रचार इथे चालू आहे का

In reply to by Rajesh188

मी देखील आता, बटाट्या पासून सोने बनवणारे मशीन कधी येणार आहे? ह्याची वाट बघत आहे... बाय द वे, शिवभोजन थाळी घरपोच मिळते का?

In reply to by Rajesh188

सेम तू यु आणि शेम तू यु पण ( आपल्या आधीच्या काही "दर्जेदार कमेंट" बद्दल ) ( नुकताच बीजेपी आयटी सेल चा पगार आला म्हणून उत्सहाने लिहित आहे एवढेच )

आज महाराष्ट्रात बर्याच ठिकाणी लसीकरण बंद पडले आहे. फसवणीस तर केंद्राचा पिल्लू असल्या सारखा बोलतोय. नुसती टीका करतोय , त्याला जनतेशी काहिही देणे घेणे नाहीये

महाराष्ट्रात रेमेडिसिव्हीर औषधाचा आणि नाशिकसारख्या काही ठिकाणी ऑक्सिजनचाही तुटवडा आहे असे बातम्यांमध्ये सांगत आहेत. हे औषध आणि ऑक्सिजन नक्की कुठून येतो? तो पण केंद्राकडूनच येतो का? दुसरे कोणत्या राज्याला किती लशी द्याव्यात हे नक्की कसे ठरवले जाते? म्हणजे जिल्हास्तरीय प्रशासन (जिल्हाधिकारी किंवा आरोग्याधिकारी वगैरे) जिल्ह्यात एकूण किती लसीकरण केंद्रे आहेत, किती लोक लस घ्यायला पात्र आहेत (४५ वरील वय) आणि किती लोकांना दररोज लस देता येईल अशी यंत्रणा उपलब्ध आहे तसेच लस साठविण्यासाठी किती यंत्रणा जिल्ह्यात उपलब्ध आहे याचा अंदाज घेऊन प्रत्येक जिल्ह्यात किती लसी पाहिजेत हे requisition राज्य सरकारला दिले जाते आणि सगळ्या जिल्ह्यांचे आकडे एकत्र करून ते केंद्राला दिले जाते किंवा कसे? म्हणजे महाराष्ट्रात लोकसंख्या आणि रूग्णांची संख्या दोन्ही जास्त म्हणून जास्त लसी दिल्या जाव्यात ही अपेक्षा ठीक आहे पण या लसी अशाप्रकारे requisition मिळाल्यानंतर केंद्राकडून पाठवल्या जातात की अशाच पाठवल्या जातात? लसी अशाच पाठवल्या जात असतील ही शक्यता जरा कमी. तसे असल्यास महाराष्ट्र सरकारने 'आम्हाला अमुक इतक्या लसी हव्या आहेत' हा आकडा पाठवला त्यापैकी किती लसी प्रत्यक्षात पाठवल्या गेल्या, इतर राज्यांत किती पाठवल्या गेल्या ही तुलना करता येईल. फेसबुकवर वाचले की गुजरातमध्ये लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा कमी असूनही २०० लसीकरण केंद्रे जास्त आहेत. हा आकडा कितपत विश्वासार्ह आहे याची कल्पना नाही. याविषयी कोणाला काही माहित आहे का?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

माझ्या अंदाजाने राज्याच्या लोकसंख्येचा आणि दिलेल्या लसींचा काही संबंध नाही. प्रत्येक राज्यात पात्र लोकसंख्या किती आहे यानुसारच लसी दिल्या जात असाव्यात. ************ मंदभक्त आणि गुलामांना, या माहितीशी काहीही देणे घेणे नाहीये आणि वरून आव असा आणतात की जणूकाही यांनाच जनतेची फार काळजी आहे. केंद्राने आकडेवारीसह स्पष्ट केले आहे की कुठल्या राज्याला किती लसी दिल्या जात आहेत. कालच ३ दिवसाचा पुरवठा आहे असे असताना आज लगेच केंद्र बंद कशी पडतात? आणि केंद्राकडून राज्याकडे लसी आल्यानंतर केंद्रापर्यंत वितरणाची जबाबदारी कुणाची? असले प्रश्न मंदभक्तीच्या नादात पडत नसावेत.

फडणवीस आणि एकंदरीत राज्य bjp ल राज्याच्या जनतेच्या हिताशी काही ही देणेघेणे नाही असं त्यांचे वागणं बघुन वाटत. त्यांना फक्त सरकार कधी अडचणीत येतंय आणि फडणवीस बाशिंग बांधून कधी बोहल्यावर चढतात ह्या विषयी च इंटरेस्ट आहे. ह्याची फळ त्यांना नक्की भोगायला लागणार आहेत.

In reply to by Rajesh188

1. साधू हत्याकांड आणि भाजपचा काही संबंध आहे का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली, ह्या गोष्टीचा आणि भाजपचा काही संबंध आहे का? आधी ह्या साध्या प्रश्र्नांची उत्तरे दिलीत तर उत्तम ....

In reply to by मुक्त विहारि

ठाकरे सरकारने वारंवार भाजपला फुलटॉस चेंडू टाकले आणि भाजपने त्यावर षटकार मारल्यानंतर पंचाच्या नावाने खडे फोडणे सुरु आहे.

.... न्यायालयाने पुरातत्व खात्याला दिली सर्वेक्षणाची परवानगी... https://www.loksatta.com/desh-videsh-news/varanasi-civil-court-allows-a… आता, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, काय प्रतिसाद देतात, हे बघणे रोचक ठरेल.

आज सर्वोच्च न्यायालयाने तीन निर्णय दिले आहेत त्यामुळे समस्त पुरोगाम्यांना भोकाड पसरायची संधी मिळणार आहे. १. अनील देशमुख आणि महाराष्ट्र सरकारने देशमुखांच्या सीबीआय चौकशीविरोधात केलेले अपील नाकारले आहे. २. जम्मूतून रोहिंग्यांची म्यानमारला परतपाठवणी करण्याला स्थगिती द्यायला नकार दिला आहे. ३. काशी विश्वनाथ मंदिराच्या बाजूलाच ग्यानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण करायचे आदेश पुरातत्व खात्याला दिले आहेत. या तथाकथित मशीदीचा पुढील फोटो बघायला मिळाला a डावीकडे मंदिराचे खांब अगदी स्पष्ट दिसत आहेत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

परमपूज्य राहुल गांधी आणि त्यांचे मित्रपक्ष काय म्हणतात, हे बघणे रोचक ठरेल...

In reply to by मुक्त विहारि

उत्तर प्रदेश मध्येच जास्त असले प्रकर झाले आहेत .तेथील हिंदू नी अन्याय च विरोध केलाच नाही असे वाटत. सर्वात जास्त हिंदू ची लोकसंख्या उत्तर प्रदेश मध्येच असेल तरी ही अवस्था.

In reply to by Rajesh188

एकजूट महत्वाची असते ... इतकेसे इस्त्रायल, अरब राष्ट्रांना पुरून उरले ते एकी मुळे... दुसर्या महायुद्धाच्या काळांत, ज्यू लोकं आर्थिक दृष्टीने संपन्न असूनही, एकी नसल्याने बळी पडली... ज्यू लोकं इतिहासातून शिकले, हिंदू कधीच शिकले नाहीत... घराणीच तुटतात तिथे समाजाचे काय घेऊन बसायचे?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मशिदीच्या पायर्‍या देवळातले शिलालेख, मुर्ती तोडुन बनवल्या होत्या आणि काही वर्षांपुर्वीपर्यंत ते दिसत पण होते असे वाचनात होते. नंतर झिजुन गुळगुळीत झाले. कदाचित त्याचे फोटो पण सापडतील. रोज हे शिलालेख मशिदीत येणार्‍यांच्या पायाखाली यावे अशी 'पवित्र' इच्छा होती. बाबरीच्या मानाने हे खुपच अलीकडील काळात झालेले (औरंगजेबाच्या वेळी) काम आहे लवकरच या केसचा योग्य तो निर्णय लागावा.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

कारण, कट्टर हिंदू हितवादी मतांचे, भाजप कडे, धृवीकरण होत आहे... पण काही उदारमतवादी हिंदूंनी, भाजप कडे वळू नये, ह्यासाठी कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, मोडता नक्कीच घालणार नाहीत...ह्यावेळी कॉंग्रेसची अवस्था, सहनही होत नाही आणि सांगता पण येत नाही, अशी झाली आहे... ह्या निर्णयांचा फायदा, (मंदिर असो वा नसो, रोहिंगे असो वा नसो) दोनच पक्षांना होणार... भाजप आणि MIM..... हिंदूंच्या मतांना दिलेली शून्य किंमत, कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना आता मोजावी लागेलच... हिंदू जागा होत आहे....

छत्तिसगडमध्ये काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी सी.आर.पी.एफ च्या २२ जवानांना चकमकीत ठार मारले. त्याबरोबरच राकेश्वरसिंग मनहास या कोब्रा कमांडोचे अपहरण केले होते. त्याची त्यांनी सुटका केली आहे. सी.आर.पी.एफमध्ये कोब्रा कमांडो सगळ्यात प्रशिक्षित कमांडो असतात असे ऐकले आहे. अशा कमांडोचे अपहरण होणे ही धक्कादायक घटना होती. अर्थात एकदम ३००-४०० नक्षलवाद्यांनी घेरल्यावर कितीही वाकबगार असला तरी कोब्रा कमांडोचेही चालणे कठीणच होते. त्याची सुटका झाली हे चांगले आहे. जाताजाता एक गोष्ट लिहितो. २०१० मध्ये छत्तिसगडमध्ये असाच एक भयानक हल्ला झाला होता आणि त्यात ७५ जवानांची हत्या झाली होती. तेव्हा जनेयुमध्ये तो हल्ला साजरा केला गेला होता असे वाचल्याचे आठवते. जर कोणत्यातरी कोपर्‍यात चर्चवर कोणीतरी दगड मारले तर त्याचा जाब समस्त मोदीसमर्थकांना विचारला जातो त्याप्रमाणेच असा काही प्रकार होत असेल तर त्याचा जाब जनेयुमधील विचारवंतांना का विचारला जाऊ नये? जर पुलवामामध्ये सी.आर.पी.एफ च्या तुकडीवर हल्ला झाल्यानंतर सरकारने हुर्रियतच्या नेत्यांची सुरक्षा आणि त्यांना दाखवला जाणारा नेवैद्य बंद केला असेल तर असे काही झाल्यावर जनेयुतल्या निदान काही प्रोफेसरचे सरकारकडून दिले जाणारे पगार का बंद केले जाऊ नयेत? https://timesofindia.indiatimes.com/india/chhattisgarh-ambush-maoists-r…

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कुठल्याही प्रकारचा साॅफ्ट काॅर्नर, माझ्या मनांत नाही...

भाजप उमेदवाराची गाडीत इव्हीएम सापडली तरच गोंधळ करायचा, इतर वेळेस मूग गिळून गप्प बसायचे. हे पुरोगाम्यांचे, भाजप विरोधकांचे आणि स्वयंघोषित निष्पक्ष लोकांचे दुटप्पी धोरण क्षणाक्षणाला उघडे पडतेच पडते. https://www.hindustantimes.com/elections/west-bengal-assembly-election/…

*भारतात गलिच्छ राजकारणाचा उदय !!!* ************************** *प्रल्हाद वामन कुलकर्णी*(राजकीय विश्लेषक) यांचा हा लेख कोरोनाची दुसरी लाट पुन्हा जबरदस्त पद्धतीने येताना दिसत आहे. ट्रेन सुरु करा, मंदिर सुरु करा, अमुक सुरु करा तमूक सुरु करा. नाहीतर आंदोलन करू, ठिय्या करू सरकार विरोधात बोंब मारू. भाजपने हि गोष्ट करून करून नियंत्रणात आणलेल्या कोरोनाला वाढीस लावण्यासाठी खतपाणी घातले. आज महाराष्ट्रात कोरोनाचे दरदिवशी ३५ -४० हजारांच्या घरात रुग्ण सापडत आहेत. आता घेणार का याची जवाबदारी भाजप ? सत्ता पिपासु असणाऱ्या भाजपने सत्ता गेल्यावर अक्षरशः बाजार मांडला. सकाळी सोमैय्या, दुपारी शेलार, संध्याकाळी राणे, रात्री फडणवीस यांच्या पत्रकार परिषदांनी अक्षरशः सरकार सह जनतेला त्रास देण्याचे काम केले. कोरोना काळात स्वतःचा निधी महाराष्ट्राच्या सी.एम फंडाला ला नं देता, पी.एम फंडाला देऊन महाराष्ट्रद्रोह तर केलाच. पण त्याचवेळी कोरोना काळात राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याचे सोडून उलट महाराष्ट्र राज्याच्या बदनामीचे धिंडवडे देशभर काढत सुटले. उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाचा अनुभव नसताना ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली. लोकांना धीर दिला, परिस्थितीचा वेध घेऊन टप्प्या टप्प्याने सर्वात अगोदर लोकडाऊन केला, राज्यात कोरोना साठी इतकी मोठी हॉस्पिटलची यंत्रणा उभी केली. एक जवाबदार मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे, त्यापेक्षा अधिक कार्य नवनिर्वाचित असतांना केले. बोंबा-बोम करणे आणि कामं करणे यात जमीन अस्मानाचा फरक असतो. उद्धव अत्यंत शांत पद्धतीने एक एक पाऊल अगदी योग्य टाकत गेले. आज जर फडणवीस मुख्यमंत्री असते तर महाराष्ट्राची बजबजपुरी झाली असतील. एकीकडे उद्धव एक एक पाऊल उचलत होते तर भाजपवाले टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, काळोख करा, दिवे लावा अशी बालिश कामं करून जनतेला मूर्ख बनवत होते. खरं तर सत्ता गेली हें भाजपला सहनच नाही झालंय. पचनी पडायलाच तय्यार नाही आणि त्या वैफल्यग्रस्त भावनेतून महाराष्ट्र सरकारला लक्ष करायचे प्रयत्न सुरु आहेत. सुरवातीला सुशांत सिंग प्रकरणात सरकारवर आणि मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले. नंतर सी.बी. आय चौकशी लावली. मग आता काय झाले त्या सी.बी.आयच्या चौकशी अहवालाचे ?? त्या अहवालात स्पष्ट्पणे सीबीआयने म्हटले आहे कि, यात कुठेही सुशांत चा खून झाला असा सूक्ष्म बिंदू देखील नसून ती आत्महत्या आहे. यामुळे सणसणीत चपराक बसणाऱ्या भाजपने तो सी.बी.आय चा अहवाल आजपर्यंत दाबून ठेवला. झी न्यूज, रिपब्लिक भारत, इंडिया टीवी, आज तक सारखे विकत घेतलेली मीडिया हाताशी धरून हि मीडिया भाजपची अक्षरशः लाळ गळेपर्यंत चाटत आहे. जो विरोधात बोलणार त्यावर इ.डी, सी.बी.आय, सी.आय.डी, इन्कम टॅक्स सारखी यंत्रणा लावून तोंड बंद करायची कामं सुरु आहेत. सत्तेचा हा अफाट दुरुपयोग करून भाजप देशाचे राजकारण खराब करत आहे. काही मुद्दा नाही मिळाला तर हिंदू मुसलमान वाद उकरून काढायचा, सोशल मीडिया मध्ये असे मेसेज पसरावायचे कि हिंदू मुसलमान यांच्यात द्वेषाची भावना तयार होईल. म्हणजे भाजपला ध्रुवीकरण करून मतांचे राजकारण करायला बरे. जे हैदराबादचे एम.आय.एम चे ओविसी हिंदूंच्या विरोधात गरळ ओकतात आणि त्यांना भाजपवाले टीव्ही वर विरोधात बोलतात. त्या ओविसी च्या अत्यंत मर्जीतल्या जवळच्या असणाऱ्या कंपन्यांन कडे केंद्र सरकारची तब्बल १४ हजार कोटींची टेंडर आहेत. आता विचार करा यांचे काय लागेबांदे आहेत ते. ओवीसींना सांगायचे हिंदूंना शिव्या घाल, आम्ही तुला शिव्या घालतो. म्हणजे अल्पसंख्यांक मुसलमान तुला मतदान करतील आणि बहुसंख्य हिंदू भाजपला मतदान करतील. यामुळे काँग्रेसची व्होटबँक असणारी अल्पसंख्यांक मतं त्यांना नं मिळत तुला मिळून, तुझ्या थोड्या जागा निवडून येतील आणि बहुसंख्यांक हिंदूंची मतं घेऊन आम्ही निवडून येऊ. अत्यंत गलिछ राजकारण करून सध्या भाजप देशाचा सत्यानाश तर करत आहेच, पण विरोधी पक्ष संपवून टाकून लोकशाहीचा खून करत आहे. सत्ता जेव्हा डोक्यात जाते तेव्हा जी बेधुंद अवस्था होते आणि मस्तवालपणा येतो तो आज भाजपा मध्ये आणि त्यांच्या नेत्यानं मध्ये निर्माण झालाय. भाजपने या भारतात गलिच्छ राजकारणाचा उदय जरी केला असला तरी, हे सर्व फार काळ टिकत नसते. पण लोकांना समझ येई पर्यंत देश अदाणी अंबानीच्या हातात जाऊन देशाची संपत्ती विकून खासगीकरण होऊ नये म्हणजे झाले. *प्रल्हाद वामन कुलकर्णी* (राजकीय विशेलषक, लेखक)

इंडियन एक्सप्रेस'च्या बातमी नुसार ... "According to official data, four states and the Union Territory of Jammu and Kashmir have reported wastage above the national mark of 6.5 per cent: Telangana (17.6 per cent), Andhra Pradesh (11.6 per cent), Uttar Pradesh (9.4 per cent), Karnataka (6.9 per cent) and J&K (6.6 per cent)." सरकारचा ऑफिशीयल डाटा म्हणतो देशभरात ज्या काही लसी वेस्ट झाल्या आहेत त्याचे संपूर्ण देशात ६.५% आहे ज्यात तेलंगणा लस वेस्ट प्रमाण -१७.६% आंध्र प्रदेश लस वेस्ट प्रमाण -११.६% उत्तर प्रदेश लस वेस्ट प्रमाण -९.४% कर्नाटका लस वेस्ट प्रमाण -६ .९% जम्मू काश्मीर लस वेस्ट प्रमाण -६.६% अस आहे म्हणजे यात महाराष्ट्र कुठे पण नाही मग महाराष्ट्रात रोज ५ लाख लस बर्बाद केल्या जात आहेतआणि त्यामुळे महाराष्ट्र राज्यात लसीचा तुटवडा आहे याला आधार काय प्रकाश जावडेकरजी ?

मि हे आकडे पडताळले नाहीत, कोणाकडे सोर्स आहे का ? आजचे केंद्र सरकार कडुन डोस पुरवठा #महाराष्ट्र ७ लाख ४० हजार उत्तर प्रदेश ४४ लाख मध्य प्रदेश ३३ लाख गुजरात १६ लाख कर्नाटक २३ लाख हरियाणा २४ लाख

In reply to by गणेशा

जर हे खरे असेल, आणि तरी अजुनही महाराष्ट्रातील लोक याला ही काहीतरी मोदी आणि बीजेपी च्या बाजुने कारणे देणार असतील तर याला लाचारीचे उच्च टोक म्हणावे लागेल.. जर हे खोटे असेल तर असे कुठलीही माहिती स्त्रोत न देता पसरवणार्‍या लोकांवर कारवाही करावी..

In reply to by गणेशा

काल पर्यंत तरी महाराष्ट्रा मध्ये सगळ्यात जास्त लसीकरण झालेले होते, म्हणजेच लसीचे डोस पण जास्तच मिळाले असणार. वरचे आकडे हे फक्त काल किंवा परवा मिळलेल्या लसींचे आहेत. तरी पण परिस्तिथी पाहता महाराष्ट्रा ला आणखीन जास्त डोस मिळायला पाहिजे. सध्या आपल्या राज्यात अक्सिजन बरोबरच Rendemcivir चा पण तुटवडा आहे. आणि हे जर खरे असेल तर मग हा दोष कुणाचा?

In reply to by रात्रीचे चांदणे

हे जर खरे असेल तर मग हा दोष कुणाचा? खरचं खुप राग येतो आहे सध्या देशातील व महाराष्ट्रातील परीस्थितीचा. अस वाटत आहे की जगातील महामुर्ख जनता फक्त भारतातच आहे. दोष हा फक्त महामुर्ख असलेल्या जनतेचा आहे.

In reply to by गणेशा

लसीचे डोस मिळालेले टॉप ३ राज्ये (ही अधिकृत आरोग्य खात्याची माहिती) - महाराष्ट्र - १ कोटी ६ लाख २० हजार. गुजरात - १ कोटी ५ लाख २० हजार. राजस्थान - १ कोटी ४ लाख ९५ हजार. पूर्ण देशात झालेले लसीकरण - ९ कोटी १० लाख (साधारणपणे ३ महिन्यांत). उपलब्ध असलेला लस साठा - ४ कोटी ३० लाख उपलब्ध पैकी राज्यांना वितरण चालू असलेला साठा - १ कोटी ९० लाख. कालच राज्याला ३ दिवस पुरेल एवढा साठा होता, आज केंद्र बंद का? मध्यप्रदेश दिवसाला ३.५ ते ४ लाख लसीकरण करत आहे, त्यांच्याकडे उपलब्ध साठा, ६ लाख. त्यांच्या मंत्र्यांचे म्हणणे, केंद्राच्या नियोजनानुसार उद्यापर्यंत २० लाख डोस उपलब्ध होतील. आपल्या बाबतीत केंद्राचे नियोजन काय आहे हे मंत्र्यांनी उघड सांगावे, की केंद्राने उद्या, परवा, तेरवा जेव्हा कधी आणि किती पुढील साठा द्यायचे ठरवले आहे. आमच्याकडे अमुक एवढा साठा आधीच असावा हे धोरण का? हेही सांगावे. केंद्रातील जबाबदार अधिकाऱ्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की प्रत्येक दिवसाचा अधिकतम (optimal) वापर व्हावा याच अनुषंगाने प्रत्येक डोसचे वितरण चालू आहे. अमुक राज्याला एवढे का?, तमुक राज्याला एवढे का? असले प्रश्न आपल्यासारखी अतिसामान्य जनता विचारत असेल तर ठीक आहे, पण जबाबदार लोकांनी नेमकी आकडेवारी द्यावी ना? की केंद्राने अमुक एक निष्कर्ष ठरवला आहे, त्यानुसार राज्यात अमुक एवढे पात्र लोक आहेत, त्यानुसार दिवसाला अमुक एवढे डोस देण्याची आपली क्षमता आहे, त्यानुसार अमुक एवढे डोस आम्हाला पुढील दिवसासाठी उपलब्ध असणे गरजेचे आहे, परंतु केंद्राचे त्या दिवशी आम्हाला ते डोस पुरवण्याचे कुठलेही अधिकृत नियोजन नाही, हे आमचे चौकशी पत्र, त्यावर हे उत्तर मिळाले/मिळाले नाही. का नाही हे सर्व दाखवून केंद्र सरकारला उघडं पाडत? आणि अशी कुठलीही माहिती नसताना कुठल्यातरी संकेतस्थळावरील आकड्यांच्या आधारे, इतक्या महत्वाच्या विषयात गदारोळ उडवून देण्याची लाचारी कुठल्या टोकाची म्हणायची?

In reply to by बिटाकाका

ही अधिकृत आरोग्य खात्याची माहिती Plz हि अधिकृत माहिती स्रोत द्यावा.. जेणे करून कायम पडताळणी करता येईल..

In reply to by बिटाकाका

https://www.mohfw.gov.in/ मी या site वर शोधत आहे, मला सापडत नाहीये.. Plz help. बाकी हर्षवर्धन ऑफिस आणि टोपे ऑफिस दोन्ही आरोग्य मंत्री आहेत ना? मग वेगवगेळ data का? नीच राजकारण वाटत नाहीये का? असो, थांबतो.. आत्ताच कधी महाराष्ट्र ५ लाख डोस वाया घालवतो प्रकाश जावडेकर बोलले होते, अधिकृत data मध्ये तर तसेही नव्हते.. हा खेळ मुद्दाम खेळला जातोय काय? कोणालाच वीट येत नाही का असल्या राजकारणी लोकांचा?

In reply to by गणेशा

वेबसाईटचं माहीत नाही, ट्विटर हँडलवर दिवसभर वेगवेगळया बाबतीतील माहिती येत असते. बाकी टोपे ऑफिसची आकड्यांची माहिती मी बघितलेली नाही त्यामुळे वेगळी का हे सांगू शकणार नाही. तुम्ही ती माहिती टाका म्हणजे किती वेगळी आहे ते तरी कळेल. ************** जावडेकरांचा दावा योग्य नाहीये पण तो चुकीचा आहे का हे मला माहित नाही. तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये जी राज्ये दिली आहेत ती राष्ट्रीय सरासरी (जी ६.५% तो लेख आला तेव्हा म्हणजे १५ दिवसांपूर्वी होती) च्या वर आहेत म्हणून दिली आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रात वेस्टेज नाहीये असा का धरावा? राष्ट्रीय सरासरीने धरले तर ५ एक लाख वेस्टेज येतेच ना? महाराष्ट्राची नक्की टक्केवारी किती ते कळण्याचा स्रोत माझ्याकडे तरी नाही. पण ५ लाख वेस्ट का केल्या हे फक्त महाराष्ट्राला विचारणे योग्य नाही. ************** मला, वैयक्तिक, कोण नीच राजकारण करतंय जाणून घेण्यात नक्कीच रस आहे (मी आधीच अमुक एक बाजू नीच राजकारण करतेय हे ठरवले नसल्यामुळे) कारण त्यावर मला कोणाला मतदान करायचे हे ठरवायचे आहे. त्यामुळे विट येण्याचा प्रश्न नाही. **************

In reply to by बिटाकाका

मी तुम्हाला zee ची पण link दिली आताची आहे. WoHmf पण पाहिले.. असो वयक्तिक नाही.. तुम्ही जे वेस्ट केल्या म्हणताय हे केंद्राला माहिती आहे. हे घ्या त्याचे म्हणणे जे जानेवारी तील आहे..कि १०% खराब होणार ते. https://www.businesstoday.in/coronavirus/10-covid-19-vaccines-will-be-w… एव्हडे सगळे असून कोण खोटे आरोप करते आहे.. कोण नीच पणा करतेय ते कळत आहे.. असो. प्लिज या राजकारण विषयात मी बंद केलेले बोलणे.. आज मात्र हद्द झाली.. आणि असे एक लिहिले कि लिहितच बसावे लागते.. गेले २ तास मी यात घालवले आहे.. खरेच आपण bjp, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी चे गुलाम नाही, जे चूक ते चूक का आपण बोलत नाही.. असो.. प्लिज थांबतो.. असे नाही कि माझ्याकडे data नाही, परंतु मला वेळ नको वाटतोय घालवयाला.. हे घडामोडी धागे, काय घडते आहे त्या पेक्षा bjp कसे बरोबर आणि शिवसेना कशी चूक यावरच चालतात.. Are जे चूक ते चूक.. असो good night..

In reply to by गणेशा

ही एक दिवसाची माहिती आहे ना? आतापर्यंत च्या लसीकरणामध्ये महाराष्ट्र एक नंबरच आहे ना? तो एक नंबर ला कमी वितरण झाल्यामुळे गेला असावा का? आणि यापुढचे नियोजन कसे असणार ते कसे कळणार? साठा का करावा याबद्दलही काही माहिती नाही. आणि ऍक्टिव्ह रुग्णांच्या आणि लसींच्या पुरवठ्याचा संबंध लक्षात आला नाही, ऍक्टिव्ह असो की नसो पात्र लोकसंख्येनुसार वितरण होत असावे असे मला वाटते.

In reply to by बिटाकाका

जनतेला देता आली नाही, ते काय राज्य करू शकणार? आलं अंगावर तर ढकल केंद्रावर, हीच रणनीती आहे... ह्या सरकारच्या कुठल्याही दाव्यावर, माझा तरी विश्र्वास नाही.... 80% लोकांनी नाकारलेला पक्ष, म्हणजे शिवसेना...

https://www.google.com/amp/s/marathi.abplive.com/news/maharashtra/sambh… भिडे - अवघड आहे .. मूर्ख लोक आहेत हे.. काल पासून न्यूज पहायला आणि वाचायला लागलेलो होतो.. असली बकवास गिरी आणि असले बकवास राजकारण या कारणामुळे बातम्या पाहणे पुन्हा बंद करत आहे... केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार आहेत.. पण कुराघोडीचे गल्लीच्छ राजकारण चालू आहे.. इतक्या खालच्या लेवल चे राजकारण मी भारतात आधी कधी हि पाहिलेले नव्हते.. बस.. न्यूज बंद करतो आहे.. न्यूज वाचायचे हि बंद.. असली सगळी नालायक लोक पाहून लाज वाटतेय.. त्या पेक्षा डोळ्या अंधारी तिकडे काय पण करावे त्यांनी..

In reply to by श्रीगुरुजी

पूर्ण संदर्भ (कॉन्टेक्स्ट) काय आहे हे बघावे लागेल. कारण भिडे गुरुजींना विनाकारण आलंकारिक आणि प्रतिकात्मक वाक्ये वापरायची सवय आहे. मागच्या वेळी सुध्दा त्यांना म्हणायचे होते काही वेगळेच आणि आंबा व मुले हा संबंध विनाकारण वापरल्याने काही भलतेच बोलले अशी बातमी झाली होती.

In reply to by कानडाऊ योगेशु

ही पहिली वेळ नाही. ते अनेकदा वादग्रस्त बोलले आहेत. "भारताला बुद्ध नको, संभाजी महाराज हवे", "ज्ञानेश्वर, तुकाराम वगैरे संतांनी समतेचा विचार दिला. मनू त्यांच्या एक पाऊल पुढे होता.", "रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी ३२ मणाचे (म्हणजे १२८० किलो) सोन्याचे सिंहासन हवे", "माझ्या मित्राच्या बागेत असे आंब्याचे झाड आहे ज्याचे फळ खाल्ले तर संतती होते. मुलगा हवा असेल तर मुलगाच होतो." असली विचित्र विधाने करून ते काय मिळवितात समजत नाही.

पब्लिकचा बुद्धिभेद करणे व्यवस्थित सुरुय! रुग्ण जास्त तर लसी आम्हाला द्या म्हणजे जास्त. लसी काय रुग्णांवर उपचारासाठी हव्यात का? 35 ते 45 दिवसांनी अँटिबॉडी तयार होऊन इम्युनिटी येते. तोपर्यंत कोव्हीड भूमितीय श्रेणीत वाढून कोट्यवधींच्या घरात पोचेल! रेमडेसिव्हीर किंवा इतर औषधी अन ऑक्सिजनकडे लक्ष द्यायला हवे तर लसीच्या पुरवठ्याहून फालतुपणा चाललाय.

उधोजींना माझी ह्या बाबतीत सहानुभूती आहे. मोदी - उधोजी ह्यांच्यामध्ये काहीही भांडण असले तरी लस ह्या विषयावरून दोघे मंडळी भांडत बसतील असे मला वाटत नाही. मंत्री संत्री जे बरळत आहेत ते फक्त राजकीय सहानुभूतीसाठी. मुंबई प्रचंड वेगवान आहे आणि प्रचंड लोकसंख्या असलेला प्रदेश आहे. इथे कोविड वाढणारच. त्याचवेळी संपूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगारासाठी मुंबई खूप महत्वाची आहे त्यामुळे मुंबईत काहीही गडबड झाली तर केंद्राच्या विविध आकडेवारीवर सुद्धा खूप वाईट परिणाम होतो. अनेक नागरिक मात्र विनाकारण आणि गरज नसताना इथे इथे फिरत आहेत, पार्ट्या करत आहेत आणि अगदी सध्या सावधानी सुद्धा बाळगत नाही आहेत.

महाराष्ट्रात लसपुरवठ्यावरुन जो काहि शिमगा चाललाय ते बघुन हसावं कि रडावं कळत नाहि. एक मात्र नक्की.. काहि वर्षांनी जेंव्हा हा करोना गोंधळ थांबला आणि देशाचा, राज्याचा इतीहास वगैरे लिहीला जाईल तेंव्हा उधोजी आणि मोदिजी, दोघांचही कौतुक होणार हे निश्चित. प्रशासनाचा शुण्य अनुभव आणि कट्टर विरोधी पक्षांचाच पाठिंबा या पार्श्वभूमीवर उधोजींचं कौतुक होईल. मोदिजींचं कौतुक करायला तर तसं कुठलही निमीत्त चालतं म्हणा :) शिवाय आपल्या बरोबर इतर देशांनाही लसपुरवठा करण्याचं कौतुक विशेष असेल :)

सध्या एक महत्त्वाचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. इंद्रा साहनी खटल्यातील 50% मर्यादेबाबत! 50% मर्यादेचा पुनर्विचार व्हावा या समर्थनाचा सर्व राज्य सरकारे आणि केंद्र सरकार ने युक्तिवाद केला आहे. त्यात काही उलट सुलट verdict आले तर या निर्णयांपेक्षा खूप लॉंग टर्म परिणाम होऊ शकतात. या स्थितीत वेळीच आवर बसत नसेल तर सरकार खाजगी क्षेत्रात आरक्षणाचे निर्णय पण घेऊ शकते (व्यावसायिक विरोध वगैरे करतील हा समज अनाठायी आहे, अनेक व्यवसायात सरकारला लाच देऊन काम करून घेणारे लोक ही असतात अशा वेळी, प्रो-gov रेग्युलेशन पाळणे ही काय मोठी अडचण नाही.) एक फेबु पोस्ट

वाढती रुग्णसंख्या आणि लसींच्या पुरवठ्यावरुन सध्या राज्य सरकार आणि केंद्रामध्ये वाद सुरु असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट संदेश देत करोना महामारीशी लढत असताना आपण कोणत्याही प्रकारच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपाला आपण समर्थन देत नसल्याचं सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना स्थितीवर मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गुरुवारी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. “राज्यांमध्ये सध्या करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन जणू काही स्पर्धा सुरु आहे. हे राज्य पूर्णपणे निरुपयोगी आहे आणि त्यांची संख्या खूप जास्त आहे. ते राज्य खूप चांगलं काम करत आहे. राज्यांची तुलना करणं आजकाल एक फॅशन झाली आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकावर लसींच्या पुरवठ्यावरुन केलेल्या टीकेनंतर नरेंद्र मोदींनी हे विधान केलं आहे. करोनाचे राजकारण करणाऱ्यांना समज द्या! “जर रुग्णसंख्या जास्त असेल तरी तुम्ही जास्त चिंता करु नका असं मी सांगितलं आहे. रुग्णसंख्या जास्त असल्याने आपली कामगिरी खराब आहे अशा दबावात राहू नका. मी आत्ताही तुम्ही टेस्टिंगकडे लक्ष द्या असं सांगत आहे. रुग्णसंख्या जास्त असल्याने आपण खराब कामगिरी करत आहोत असा विचार करण्याची गरज नाही. तुम्ही टेस्टिंग वाढवलं तर रुग्णसंख्या अजून वाढताना दिसेल,” असं नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आश्वस्त करताना सांगत होते. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत श्री नरेंद्र मोदी. ह्यांनी वरील वक्तव्य केले आहे. ते अतिशय असून covid चे राजकारण करणाऱ्या अर्धवट बुध्दीच्या नेत्यांना त्यांनी योग्य संदेश दिला आहे. ह्या मधून केंद्रीय आरोग्य मंत्री,फडणवीस(अर्थवट आणि स्वार्थी नेता)आणि बाकी राज्य bjp नी धडा घ्यावा आणि वागणूक सुधारावी.. श्री नरेंद्र मोदी चे अभिनंदन त्यांनी योग्य वेळी कान पिळले.

हो नक्कीच. त्या बरोबर राणे पिता पुत्र,संजय निरुपम, चंपा,हे सर्व आलेच त्या मध्ये

In reply to by Rajesh188

1. साधू हत्याकांडाचे काय झाले? ही मारहाण भाजपने केली का? 2. सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण केली. ही मारहाण भाजपने केली का? ह्या प्रश्र्नांची उत्तरे तुमच्या कडून बाकी आहेत....

प्रिन्स फिलिप..(म्हणजे राणी एलिझाबेथ २ हीचे यजमान) याचे ९९ व्या वर्षी निधन झाले अशी बातमी आलीय. ब्रिटिश लोकं अजून या घराण्याला मानतात याची गम्मत वाटते कधी कधी.

In reply to by खेडूत

ब्रिटिश लोकं अजून या घराण्याला मानतात याची गम्मत वाटते कधी कधी.>> यात काही नवल नाही भारतात अनेक जण अजुन गान्धी घराण्याला मानतात की. ब्रिटिश राजघराण्यातील अनेक जण उत्तम कामे करतात म्हणुन त्याना मान आहे. असे म्हणतात की आणखी काहि दशकानी जगात फक्त पाच राजे राहतील. पत्त्यामधले चार व ब्रिटिश राजा. ब्रिटिशाना त्यान्च्या राजघराण्याचा अभिमान आहे आणि म्हणुन ते अजुन शिल्लक आहे व राहीलही..

In reply to by दिगोचि

महाराष्ट्रात सुद्धा अजूनही काही जणांचा श्रीमंत, छत्रपती, महाराज, राजे असा उल्लेख होतो व त्यांना काही जण जाहीर मुजरा सुद्धा करतात.

सार्वजनिक सुट्ट्या भरपूर असल्याने आठवडाभर कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन लावावा असे सुचवले.

अमेरिकेचे ७ वे आरमार कोणत्याही पुर्व परवानगीशिवाय, पुर्व विनंतीशिवाय, भारताच्या आर्थिक समुद्री क्षेत्रात घुसुन मुक्त संचार केला. याउपर याची माहिती अमेरिकी नौदलाकडुन देण्यात आली.

In reply to by लिओ

मग ते चुकून आले असेल.प्रेमानी आले असेल. चालायचे इथे आणि तिथे हा प्रकार कोणाला गैर वाटणार नाही.. रोजी रोटी देणारा देश आहे तो.