Skip to main content

चालू घडामोडी एप्रिल भाग २

लेखक साहना यांनी बुधवार, 07/04/2021 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
चालू घडामोडीच्या जुन्या धाग्यावर बराच राजकीय धुराळा उडत असल्याने बिन राजकीय घडामोडीचा हा दुसरा धागा. - कपिल शर्माला पुत्र रत्न प्राप्त झाले आहे. त्याने आपल्या मुलाचे नाव तृषान असे ठेवले आहे. हे नाव पूर्ण पणे निरर्थक आहे. आपल्या अपत्यांना चांगली नवे द्यावीत. गुगल वर अवलंबून राहू नये. आमचे मित्र श्री नित्यानंद मिश्रा ह्यांचे सुनाम हे पुस्तक विकत घ्यावे आणि अपेक्षित पालकांना भेट म्हणून द्यावे. - बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या आणि डॉक्टर श्रीमती स्वप्ना पाटकर ह्यांनी महाराष्ट्रांतील थोर, साक्षांत वाचस्पती श्री संजयजी राऊतजी ह्यांच्यावर खूप आरोप केले आहेत. त्यांनी आपल्याला अश्लील कॉल केले, मानसिक छळ केला इत्यादी. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. अक्ख्या महाराष्ट्राला विद्वत्ता पुरवणाऱ्या ह्या माणसाला काय काय सहन करावे लागते हे वाचून डोळे पाणावतात. - फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन एका संकेतस्थळावर प्रकाशित झाला. आपण सुद्धा ह्यांत आहात तर इथे तपासून पहा : https://haveibeenfacebooked.com/ - चीन ने सायबर युवान ह्या १००% डिजिटल पैश्यांची सिस्टम सुरु केली आहे. (ह्याचा क्रिप्टो करन्सी शी संबंध नाही). https://www.wsj.com/articles/china-creates-its-own-digital-currency-a-f… - आनंद महिंद्रा ह्यांनी आपला शब्द पाळत इडली अम्माला तिचे स्वतःचे घर आणि किचन बनवून दिले https://indianexpress.com/article/trending/trending-in-india/tamil-nadu… - बायजु ह्या कंपनीने आकाश ट्युटोरिअल ह्या कंपनीला १ अब्ज डॉलर मध्ये विकत घेतले. भारतीय शिक्षण क्षेत्रांत ज्या गोष्टी सुदैवाने अद्याप सरकारी नियंत्रणाखाली नाहीत तिथे भारत वेगाने प्रगती करत आहे. - पुनावाला ह्यांनी आपली कंपनी प्रचंड मेहनत करून दिवसाला २ दशलक्ष व्हॅक्सीन्स बनवत आहे असे सांगितले. सध्या भारत दिवसाला २-३ दशलक्ष वॅक्सीन देऊ शकत आहे त्यामुळे वॅक्सीन ची निर्यात बंद झाली आहे. वॅक्सीन क्षमता वाढवण्यासाठी ३००० कोटी रुपयांची गुंतवणूक आहे असं SSI ने सांगितले. - मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे. मोदींनी ह्या स्कीम मध्ये ३७% कपात केली आहे. हि चांगली गोष्ट आहे. - एप्रिल २०२३ मध्ये भारतीय रेलवे वर खाजगी रेल्वे ऑपरेटरच्या रेलवे धावतील अशी अपेक्षा आहे. साधारण १५१ रूट्स वर खाजगी ऑपरेटर आपल्या रेल्वे चालवतील. - सौदी अरेबिया ने कृत्रिम रित्या तेलाच्या किमती वर ठेवल्याने भारतीय कंपन्यांनी सौदी कडून तेल घेणे ३०% नि कमी केले आहे.

वाचने 54645
प्रतिक्रिया 205

प्रतिक्रिया

तारे तारका यांच्या पोरांच्या नावात रस असणारे रिकामटेकडे खूप आहेत म्हणून ते टवीत करतात अन् लोक वाचतात, व्यक्त होतात. मधे बाळ तैमूरच्या भावाचे नाव काय असेल याचीही चर्चा होती. :( फेसबुक डेटा दाखवणारी वेबसाईट इकडे चालत नाही..! (451 - Unavailable For Legal Reasons )

In reply to by खेडूत

> नावात रस असणारे रिकामटेकडे खूप आहेत सर्वच मंडळी रिकामटेकडी नाहीत. नित्यानंद मिश्रा व्याकरण शास्त्री असून विविध शब्द, त्यांची व्युत्पत्ती आणि अर्थ ह्यांच्यावर लिहीत आहेत आणि अक्खे पुस्तक लिहिले आहे. अनेकदा सामान्य मंडळी सेलिब्रिटींचे अनुकरण करत असल्याने नावांसह अर्थ लोकांसमोर आणणे अवश्य आहे नाहीतर मंडळी "आरव" सारखे घाणेरडे नाव आपल्या मुलांना देतात. (किंवा ईशानी)

In reply to by साहना

गल्लत होतेय का? आरव म्हणजे नाद. जसे की गुंजारव म्हणजे भुंग्याच्या गुनगुनन्याचा आवाज. आणि ईशानी हे तर दुर्गेचे नाव, सत्ताधीशीनी या अर्थाने.

In reply to by साहना

काही कळले नाही. एखाद्या गोष्टीचा तालबद्ध आवाज म्हणजे नाद. त्यात वाईट काय ते कळले नाही. तेच ईशानी बाबतीत. तुम्ही दिलेलं संस्कृत संकेतस्थळ ईशान चा अर्थ राज्य करणारा (राज्य करणारा ईश, महादेव या अर्थाने) असा दाखवत आहे. आणि ईशानी चा अर्थ मात्र कापसाचे झाड? हे काही कळले नाही. ईशानी हे दुर्गेच्या/महालक्ष्मीच्या १००० नावांमध्ये येते. थोडक्यात ठेवणार्याने आरव म्हणजे नाद आणि ईशानी म्हणजे दुर्गा असे नाव ठेवले असल्यास चूक ते काय? ************* अर्थात बरीच लोकं विचित्र नावे ठेवतात हा मुद्दा मान्य. पार्थिव हे नाव का ठेवले जाते ते अजून समजलेले नाही.

In reply to by बिटाकाका

रजस्वला, ह्या नावाचा किस्सा वाचलेला आठवतो... एक अतिशय शिकलेले जोडपे, आपल्या मुलीला हे नांव ठेवणार होते ...

In reply to by मुक्त विहारि

काही मुलांचे "शर्विल" असे नाव असते. या नावाला तसा अर्थ नाही. "मृच्छकटिक" नाटकातील एका चोराचे नाव "शर्विलक" असे आहे. तेव्हापासून शर्विलक म्हणजे चोर असे समजले जाते. रिहान, सोहा अशी मुस्लिम वाटणारी नावे सुद्धा ठेवली जातात.

In reply to by बिटाकाका

मृण्मयी हे हे नाव ही का ठेवले जाते? अनेकांना संस्कृत भाषा व त्याभाषेतील नावांचा अर्थ माहीत नसेल हे कारण असावे..

In reply to by साहना

आर्यन हे नाव ही तसेच.तद्दन फिल्मी नाव वाटते ते. कार्तिक आर्यन चे मूळ आडनाव तिवारी आहे पण तिवारी हे अगदीच गरीब नाव वाटत असल्याने त्याने ते आर्यन असे बदलले.

फेसबुक चा काही डेटा हॅक होऊन एका संकेतस्थळावर प्रकाशित झाला. याच बरोबर हे देखील समोर आले की स्वतः मार्क झुकरबर्ग हा व्हॉट्सअ‍ॅप न वापरता सिग्नल मेसेंजर वापरतोय. :))) ========================================================================= करोनामुळे सामान्य जनतेची पार पुंगी वाजली असुन त्यांच्या नोकरी धंध्याचा पार बाजार उठला असुन अनेक जण आयुष्यातुन उठले असुन अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मध्यम वर्ग पिचला गेला असुन येणार्‍या काळात समाजातील मोठ्या वर्गाची आर्थिक परिस्थीती अजुन खालावली जाणार आहे ! :( जाता जाता :- परवाच माझ्या पेक्षा वयाने मोठा असलेल्या सोसायटी मधील मित्राची बायको भेटली. [ मी आणि बायडी बाहेरुन घरी परत येत असताना. ] माझा तो मित्र हॉटेल लाइन मध्ये आहे. ती म्हणाली तो ८ महिने घरी होता आणि या काळात त्याला पगार मिळाला नाही, तीचा मुलगा कॉलेज मध्ये आहे त्याचा शिक्षणाचा खर्च आणि घर चालवण्याच्या खर्चात बचतीचे जवळपास सगळे पैसे उडाले. आता हा परत मिनी लॉकडाऊन, ती म्हणाली या महिन्याचे वाण सामान देखील देखील तीला टाकता आले नसुन असे कुढत जगण्या पेक्षा एक प्रलय येउन त्यात जाउन कायमचे सुटलेले बरे. :( माझ्या माहितीत असलेल्या अनेकांची अवस्था अतिशय कठीण झालेली आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mera Saaya Saath Hoga... :- Mera Saaya

In reply to by मदनबाण

हाॅटेल लाईन, कपडे, भांडी, ह्या व्यवसायांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे ... इतर राज्यांत जर ही परिस्थिति नसेल तर, ह्या गोष्टीला, महाराष्ट्र सरकारच जबाबदार आहे...

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लसीकरण सुरू आहे आणि येत्या 3 दिवसांनंतर लशींचा तुटवडा होणार आहे. दुसरीकडे अदर पुनावाला म्हणतायेत जूनपासून लसी पुन्हा एकदा एक्स्पोर्ट करू शकतो ... काय कळेना झालंय .. भारतीय नागरिकांना द्यायच्या आहेत की नाही केंद्राला ? नेमका प्रॉब्लेम कुठे आहे ? घोडं अडलंय कुठे ? मुक्ता चैतन्य (फेबुवरुन साभार)

In reply to by बिटाकाका

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे स्टेटमेंट बेजबाबदार आणि संकुचित वृत्ती चे आहे.देशाचे आरोग्य मंत्री स्वतःची जबाबदारी टाळू शकत नाहीत. राज्यांना टार्गेट करून त्यांना बदनाम करण्याचे राजकारण केंद्रीय आरोग्य मंत्री करत आहेत. महाराष्ट्रात देशभरातील करोड लोक राहत आहेत देशातील सर्व राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांची संख्या महाराष्ट्रात देशेतील बाकी राज्यांपेक्षा अती प्रचंड आहे. त्या मुळे विविध राज्यातील corona badhit- महाराष्ट्रात महाराष्ट्रात येत असल्या मुळे इथे corona जास्त वाढत आहे. देशातील लोकांना रोजगार देणे ही केंद्राची जबाबदारी आहे ती जबाबदारी महाराष्ट्र ला निभवावी लागत आहे. अनेक देशातून अनेक प्रकारचे covid चे विविध strain mumbai maharashtra मध्ये च प्रवासी लोकांमुळे आले आहेत. बाहेरच्या देशातून दुसऱ्या राज्यातील लोक येत आहेत ती पण मुंबई मध्येच उतरून नंतर त्यांच्या राज्यात जात आहेत. केंद्राला जे सर्व माहीत नसेल तर धन्य ते केंद्र सरकार. आणि धन्य ती bjp जी मेलेल्या माणसाच्या टाळू वरचे लोणी खाण्याचे राजकारण करत आहे.

In reply to by बिटाकाका

मायबोली या संकेतस्थळावर हे व इतर काही नेहेमी बाहजपाच्याविरुद्धा लिहीत असत. आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यावर दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याच्या आरोपावर हे सर्व गप्प आहेत.

In reply to by उपयोजक

आदर भाऊ त बोलले की अमरिका अन युरोप न कच्चा माल थांबवला, आता लशी काय बनत नै म्हणून? https://www.loksatta.com/desh-videsh-news/serum-institute-ceo-adar-poon… नमोजी साहेबांनी उगाच सगळीकडे लशी पाठविल्या.

देशमुखांनी मागितली होती २ कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट... https://www.loksatta.com/desh-videsh-news/sachin-vaze-writes-letter-to-… ह्या चौकशीतून अजून काय काय बाहेर येईल, ते सांगता येत नाही...

In reply to by मुक्त विहारि

मीडिया रिपोर्ट गंभीर पण घ्यायचे नसतात . मीडिया रिपोर्ट सत्य स्थिती पासून खूप दूर असतात .. त्या मुळे न्यूज वाले काय सांगतात ते गंभीर पने घेण्याची गरज नाही.

In reply to by मुक्त विहारि

> “२०२० मध्ये मला पोलिस दलात घेण्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. माझी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी शरद पवारांची इच्छा होती. मात्र, आपण शरद पवारांचं मतपरिवर्तन करू. त्याचबरोबर गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती करू, असं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला नागपूरमधून फोनवर सांगितलं होतं. या कामासाठी देशमुख यांनी मला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती,” असा दावा वाझे यांनी पत्रात केला आहे. हे वाचून प्रचंड धक्का बसला. फवारांच्या मत्परिवर्तनाची किंमत फक्त २ कोटी रूपये ? बारामतीत इतकी कठीण परिस्थिती ? लोक तर ह्यांना अखिलकोटी ब्रह्मांडनायक समजत होते.

मनरेगा मरण्याच्या वाटेवर जात आहे. मोदींनी ह्या स्कीम मध्ये ३७% कपात केली आहे. हि चांगली गोष्ट आहे.
एक व्हिडिओ लिंक देत आहे वेळ असेल तर नीट ऐका. २ पैसे जास्त खर्च करुन जर गरजु आणि गरिबाला अन्न मनरेगातुन मिळत असेल, आणि हिच योजना नफा आणि तोटाच्या पट्टिवर मोजायची असेल तर, २०१४ नंतंरची सद्सद् विवेकबुध्दीची व्याख्या पुन्हा शोधावी लागेल https://www.youtube.com/watch?v=6UB9pdhLCiw

In reply to by साहना

संपत्ती ची हक्क मूलभूत हक्क नाही सरकार कधी पण तो हक्क नाकारू शकते.सरकारी सार्वजनिक यंत्रणा,कायदे,सुविधा ह्याचा फायदा घेवून च संपत्ती निर्माण केली जाते. ह्या सर्व यंत्रणाच फायदा न घेता एक रुपया सुद्धा कोणी कमवू शकत नाही त्या मुळे माझी संपत्ती हा प्रकार अस्तित्वात नसतो जो पर्यंत मान्यता आहे तो पर्यंत ती संपत्ती व्यक्ती ची असेल. सार्वजनिक कोणत्याच सुविधा ,यंत्रणा ह्यांचा फायदा घेवू नका ,अगदी बाजाराचा सुद्धा फायदा घेवू नका आणि संपत्ती कमवा मग ती तुमची संपत्ती नाही तर नाही . कोणती ही खासगी मालमत्ता समाज हित साठी सरकार ताब्यात घेवू शकते . आता कोविद काळात खासगी हॉस्पिटल ताब्यात घेण्याचा सरकार ल पूर्ण अधिकार आहे .एका आदेश नी सरकार ती ताब्यात घेवू शकतात.. आणि जागतिक प्रतेक देशातील सरकार नी तो अधिकार कधी ना कधी वापरलेला आहे.

गुजरातची लोकसंख्या 6.50कोटी असताना गुजरात ला करोना डोस 80 लाख आणि महाराष्ट्र ची लोकसंख्या गुजरात पेक्षा जवळपास दुप्पट 12.30 कोटी असताना करोना डोस 85 लाख याचा अर्थ काय? महाराष्ट्राला जास्तीची लस देणार नाही, gst चे पैशे पण देणार नाही , निधी राज्याला नाही तर देशाला देणार.. lock down करू नका म्हणून पण ओरडणार , केस वाढल्या की तिकडून पण बोंबा मारणार. हा कोणालाच नीच पणा वाटत नाहीये का? जेंव्हा मागे भारतात केसेस वाढल्या तरी त्याला जवाबदार मोदींना मी तरी धरले नव्हते, ना कि करोना मुळे अर्थ व्यवस्था वाईट असताना वाढवलेल्या पेट्रोल वर पण करोना मुळे मी चूक नाहीच हे मत दिलेले.. पण दुटप्पी भूमिका का?

In reply to by गणेशा

जावडेकर मात्र वेगळा आकडा (१ कोटी+) सांगत आहे:

In reply to by अनन्त अवधुत

कालपासुन न्यूज पाहतोय, मला वाटते त्या हि बंद कराव्यात.. पुर्ण मराठी न्यूज चॅनेल वरती - साताऱ्यात लसी संपल्या, पुण्यात ३ दिवस पुरेल असा च फक्त साठा.. मुंबईत चार दिवस पुरतील एव्हड्याच लसी.. मग या न्यूज चॅनेल फेक न्यूज देत असतील तर त्यावर बंदी का नाही? अशीच एक न्यूज.. https://www.hindustantimes.com/india-news/not-enough-covid-19-vaccine-d… --- बरं आपण मान्य करू व्यवस्थित लस येतायेत केंद्राकडे.. जसे जावडेकर म्हणतायेत ते मान्य करू.. पण बाकीचे काय, Gst चे पैसे लवकर द्यायचे नाही.. Pm care ला पैसे टाका म्हणुन पण सांगायचे.. Lockdown केला तरी ओरडायचे.. आणि cases वाढल्या तरी ओरडायचे.. हे सुद्धा दुटप्पी पणा नाहीये काय? बाकी काय बोलू.. माझे म्हणणे इतकेच आहे, जेथे जास्त गरज तेथे जास्त लस पाठवाव्यात.. आणि विरोधकांनी राजकारण करू नये.. सत्ता कोणाचीही असो त्याला साथ द्या..

In reply to by अनन्त अवधुत

Lockdown मला वयक्तिक रित्या फालतू गिरी वाटते.. हे माझे म्हणणे गेल्या वर्षी हि सेम होते आणि या वर्षी हि.. ते का तसे वाटते मला तर लिहितोय... माझे म्हणणे आहे, lockdown हे या साठी पाहिजे कि सरकार ने त्यांच्या कडे असलेल्या सोई सुविधा, सेवा यांच्यात managment करायला, त्याला वाढावायला पुरेसा वेळ मिळावा म्हणुन या lockdown चा वापर करावा.. पण असल्या कसल्याही गोष्टीं न करता lockdown म्हणजे साखळी तोडण्याचे हत्यार असे समजुन एका नंतर एक लॉक डाऊन करने काहीच फायड्याचे नाही.. त्यामुळे केंद्राने केलेले मागाच्यावेळेस आणि राज्याने केलेले आता दोन्ही lockdown मला योग्य वाटत नाही.. जर या lockdown नंतर हि गेल्या वर्षी सारखे आपण आपल्या आरोग्य सेवा सुविधा व्यवस्थित व्यवस्थित वाढवू शकलो नाही तर असे हजार lockdown पण व्यर्थ आहेत करोना रोखायला.. हे माझे वयक्तिक मत आहे.. कोणाला नसेल पटत तर सोडून द्यावे.. पण मोदी नी केले कि बरोबर आणि उद्धव किंवा आघाडी ने केले कि चूक असला दुटप्पी पणा माझ्याकडे नाही..

In reply to by गणेशा

मोदींनी केलेला lockdown हा गरजेचा होता, कारण त्या वेळी करोना बद्दल जास्त माहिती नव्हती. PPE किट नव्हते तर टेस्टिंग ची सुविधाही नव्हती. गेल्यावर्षी सोलापूर , उस्मानाबाद इत्यादी ठिकाणी चा एखाद्या करोना संशयिताचा swab हा सोलापुर हुन पुण्याला यायचा तेही जर तो दुपारच्या आदी घेतला तर,नाहीतर तो दुसऱ्या दिवशी पुण्यात जायचा. पुण्यातही जास्त लॅब नव्हत्या. रेपोर्ट येण्यात कमीत कमी 3 दिवस जायचे. साध्याला अशी परिस्थिती नाही, अगदी एका दिवसात रिपोर्ट येतो. अत्ता लसीकरणाची प्रक्रिया ही चालू आहे, त्यामुळे अत्ता lockdown गरजेचा वाटत नाही. लसीचा खरोखरच तुटवडा चालू आहे, माझ्या गावाकडे गेल्या 3 दिवसांपासून लस नाही म्हणून लोकांना माघारी पाठवत आहेत, आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटतेय की काल आपल्या आरोग्य मंत्र्यांनी आपल्या राज्यात फक्त 3 दिवस पुरेल इतकाच साठा आहे आस सांगितलंय परंतु राज्याच्या काही भागात गेल्या 2-3 दिवसांपासून लसीचा तुटवडा चालू आहे. याचाच अर्थ लस उपलब्ध आहे पण तिचे ग्रामीण भागात योग्य वितरण योग्य नाही. कदाचित मुंबई , पुणे नागपूर साठी डोस साठवून ठेवले असतील.

In reply to by रात्रीचे चांदणे

मोदींनी केलेला पहिला lockdown एकवेळ ठीक मानू नंतर तो जो वाढवला तो चुकीचाच.. पहिल्या lockdown लावण्याच्या वेळा याबद्दल बरेच दा चर्चा झाली आहे, ते नाही करत.. मोदींनी केलेला बरोबर आणि आता चुकीचा असले काही नाही.. Lockdown म्हणजे साखळी तुटण्यासाठी केलेले आहे हे किती चुकीचेच आहे हे सर्वांना माहित आहे.. तबाकी गावाकडे तुटवडा आहे हे नशिब सांगितले, कारण न्यूज खोट्या आहेत आणि जावडेकर खरे बोलतायेत असे वाटलेले मला.. टोपे म्हणत आहेत, पुण्या मुंबई मध्ये तीन दिवस पुरेल येव्हडाच साठा आहे, सातारा हे पुण्या पासून जवळ आहे तेथे हि साठा संपला आहे.. कदाचीत शहरी भागाला जास्त साठा allocate केला असेल कारण तेथे जास्त लोक घनता आहे.. माझे मुळ म्हणणे हे आहे. केंद्र, राज्य फलाना राजकारण करू नका.. केंद्राने महाराष्ट्राला अतिरिक्त साठा द्यावा.. आणि नसेल तर ते मान्य करा.. यात कोणी लगेच अपराधी तुम्ही म्हणत नाहीये... पण राज्य सरकार कसे बेजबाबदार हे दाखवण्यात काय हाशील? जसे मोदी जनतेसाठी करतात तसेच इतर हि करत आहेत.. कोविड मुळे ना मोदींना ना उद्धव ला ना कोणालाच लोकांना मरायला सोडायचे आहे असे वाटत नाही.. राजकीय मते वेगळी असतील हि, पण म्हणुन लोकांना कोणी मरू देणार नाही.. पण आताचे राजकारण पाहता.. Lockdown लावले तरी चूक.. करोना केसेस वाढल्या तरी चूक.. पैसे pm care ला द्या.. लसी केंद्राने दिल्यात.. राज्य सरकार चूक हे सगळेच मला चूक वाटत आहे.. मिळून लोकांचे आयुष्य वाचवन्यात सरकार लक्ष देत असेल असे मानतो. आणि आधी वितरणात तूट असेल तर ती भरून काढून जिथे जास्त गरज तिथे जास्त लस असे समीकरण निदान ठेवले जाईल हि अपेक्षा बाळगतो.. असो..

In reply to by गणेशा

Lockdown मला वयक्तिक रित्या फालतू गिरी वाटते.. जगात एवढे घडतंय तरी आपण हे म्हणता याचे वाटले ..आश्चर्य .. लोकडवून कधी करावा कसा किती प्रमाणात याबद्दल मतभेद असू शकतात पण हा एक उपाय म्हणून विचारच करायचा नाही कि काय? खालील ३ गोष्टी गृहीत धरून पुढे प्रतिसाद देतो १) करोना हेच थोडांत आहे असे काही आपले मत नसावे ...फक्त त्यावर चाल्लेलले उपाय यावर आपण बोलत आहात २) यात राजकरण जरा बाजूला ठेवत आहोत ३) लोकडोवन चे २-३ प्रकार गृहीत धरुयात, जमावबंदी, प्रवास बंदी आणि प्रवासानंतर गृहबांदी ( हॉटेल QUARANTINE ) तर जमावबंदी हा अनेक पैकी एक उपाय कुचकामी आहे असे आपले म्हणेन दिसतंय परंतु तो आपण म्हणता तसा अगदि कुचकामी "नसावा" आपण खालील गोष्ट पण जरा विचारात घ्या - कोणताही साथीचा रोग संपर्क द्वारे पसरतो म्हणून संपर्क कमी करणे हा उपाय जगभर वापरला जातोय - खूप लोकसंख्या आणि जिथे " प्रत्यक्ष गेल्याशिवाय बरीच कामे होत नाहीत " अशी परिस्थिती असेललाय भारतासारख्य देशात वरील बंदी एकीकडे अवयषयक पण आहे आणि ती राबवणे हे पण जास्त अवघड दोन्हि नाही का? - "बंदी " नको असे धोरण सुरवातीला राबवलेल्या स्वीडन सारख्या देशाचे काय झाले ! - रोग फार झपाट्याने पसरलं तर उपचार यंत्रणेवरील भार सांभाळता येणार नाही म्हनुन तो मुळातच पसरवू दयायचा नाही हि रणनीती जगभरचे "हेल्थ डिपार्टमेंट चे तज्ज्ञ वापरात आहेत ते सगळेच चुकीचे ? - परदेशातून आलेल्या परंतु निरोगी असेल्यालनवार सक्तीची केलेली हॉटेल QUARANTINE.. उदाहरण देतो : माझ्य देशातील राज्यात गेली काही महिन्यात झालेल्या रोगप्रसारापैकी जवळ जवळ ९०% हे "परदेशी प्रवासी " होते १०% फक्त स्थानिक प्रसारण .. आता सांगा हे जर हॉटेल QUARANTINE सक्तीचे नसते तर या लागण झालेल्या लोकांनी अजून रोग पसरवलं नस्ता का? जगभर लोकडवून चा त्रास सगळ्यांना होतोय फक्त भारतात नव्हे पण केवळ आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे याला विरोध करणे कितीपत यौग्य आहे? प्रत्येक देशात वेगळे प्रश्न असतात हेच बघा कसा विरोधाभास भारत लशीकरण बऱयापैकी हाताळलं जातंय पण रोग प्रसरण आटोक्यात नाही ऑस्ट्रेलिया: रोग प्रसारण जास्त आटोक्यात पण लशीकरना डगमगतंय ...सरकार म्हणताय यूरोप ने लक्ष पाठवली नाही आणि स्थानिक लास उत्पादनाला वेळ लागतोय .. अमेरिकेत पण सध्या तरी लशीकरण बऱयापैकी हाताळलं जातंय पण रोग प्रसरण आटोक्यात नाही

In reply to by चौकस२१२

@चौकस सर, माझे मत तसे का हे हि त्या वाक्याखाली लिहिलेले होते
माझे म्हणणे आहे, lockdown हे या साठी पाहिजे कि सरकार ने त्यांच्या कडे असलेल्या सोई सुविधा, सेवा यांच्यात managment करायला, त्याला वाढावायला पुरेसा वेळ मिळावा म्हणुन या lockdown चा वापर करावा.. पण असल्या कसल्याही गोष्टीं न करता lockdown म्हणजे साखळी तोडण्याचे हत्यार असे समजुन एका नंतर एक लॉक डाऊन करने काहीच फायद्याचे नाही..
करोना थोतांड नाही हे माझे हि मत आहे.. तुम्ही सर्व लिहिलेले बरोबर आहे.. पण फक्त lockdown करणे हे चूक नाही का? Lockdown म्हणजे साखळी तुटते का? टाळ्या वाजवून बाजूला अंतरनाद होऊन करोना मरतो का? थाळ्या वाजवून कोणत्या dr. चे कौतुक होते का? Cosara सारख्या नव्या कंपनीच्या kit साठी वेळ घालवून इतर कंपनीला त्यापासून वेळ लावण्यात काही अर्थ होता का? त्यामुळे आरोग्य सुविधा वाढवणे हेच lockdown मध्ये सरकारला करता आले पाहिजे ते नाही केले तर अशी १००० lockdown काय कामाची असे ते पुर्ण वाक्य आहे माझे.. तुम्ही अर्धेच घेऊन लिहले आहे. जर lockdown मुळे करोना आटोक्यात येत असेल तर ती चूक आहे.. मोदी नी केला तेंव्हा हि माझे हे मत होते तेंव्हा मी मोदीविरोध करतोय असे म्हंटले गेले आता मी हेच बोलतोय तेंव्हा हि राजकारण वाटत आहे.. पण खरेच माझे हे मत राजकीय पक्ष बघुन नाही.. मला माहित आहे, अजूनही lockdown मोदी यांनी केला तर लोक त्याला पाठींबा देतील.. किंवा महाराष्ट्रामुळे असे करावे लागले अशी दुषणे देतील.. पण आपली मते चूक असु शकतील कदाचीत पण ती पक्ष नेते बघुन बदलतात का हे प्रत्येकाने बघावे.. माझे हे मत राजकीय नसून सामाजिक पद्धतीचे आहे.. असो.. माझे मत चूक असु शकेल पण त्यात राजकारण नाहीये.. खरेच फक्त lockdown ने साखळी तुटत नाही.. हॉस्पिटल, खाटा, आरोग्य विषयक किट्स, ज्ञान, लस अश्या अनेक गोष्टी जास्त लोकांसाठी तयार करायला वेळ मिळावा म्हणुन lockdown असावा, ना कि साखळी तुटते म्हणुन.. Lockdown हे करोना ला थांबवू शकत नाही... असो.. राग लोभ नसावा.. माझे म्हणणे नक्कीच जास्त विरोधी नाहीये

In reply to by गणेशा

१) टाळ्या वाजवून बाजूला अंतरनाद होऊन करोना मरतो का? २) थाळ्या वाजवून कोणत्या dr. चे कौतुक होते का? हे कुठं यात.. आपण फक्त लाकडाउन उपायांबद्दल बोलतोय ना? पण आपण हा विषय काढलातच म्हणून १) "टाळ्या वाजवून " नक्कीचं नाही मरत..केवळ एक सामूहिक मनोबल वाढवण्यास मनुष्य असे काहीतरी सार्वजनिक करीत असतो .. २) "थाळ्या वाजवून" अरे बापरे .. अहो ते ते केवळ प्रतीकात्मक होता हे का कोणी लक्षात घेत नाही ? वैद्यकीय काम करणाऱ्यांना धन्यवाद म्हणून... आणि केवळ भारतातच नाही तर इतर देशात हि असे सार्वजनिक प्रतीकात्मक केलं गेले..जसे मूक मोर्चे किंवा काळ्या फिती किंवा ठराविक रंगाच्या गोष्टी एकाचवेळी सर्वांनी परिधान करणे ई... माफ करा गणेश पण हे घंटानाद वैगरे वरून एकूण जी चेष्टा लोक करातात ना ते हा यातील मुळ मुद्दा ना लक्षात घेता केवळ "या सरकारने" सांगितले म्हणून चेष्टेचा विषय राजकीय हेतूने प्रेरीत होऊन केलेलि केवल टिका वाटते ( अप्लाय मनात नसेल तसे कदाचित ) असो तर लाकडाउन ने साखळी तोडली जाते का.. मी जे अनुभवलंय त्यात हो असे म्हणणे इस्टर ला येथे ४ दिवस एकूण सुट्टी असते त्यामुळे प्रवास वाढतो .. + शाळेला सुट्ट्या ... त्याआधी परत रोग पसरला होता ( २० लाख शहरात १३- २० रुग्ण ) तरी राज्य सरकरने येथे हे शार ३ दिवस लोकडोवन मध्ये ठेवले.. फायदा झालाच .. येथे हे मला नमूद केले पाहिजे कि येथे आरौग खाते २ प्रकारचं रोग पसरनायबद्दल लक्ष ठेवून आहे १) आंतरराष्ट्रीय प्रवासी कि ज्यांच्यावर १४ दिवसाचं हॉटेल QUARANTINE मुले सहज रित्या लक्ष ठेवता येते २) स्थानिक रोग प्रसार ज्याचे स्तोत्र सापडत नाही यातील क्रमांक २ च्या साथीला सरकार जास्त घाबरून आहे, कारण उगम दिसत नाही भारतात कदाचित आता एकूणच इतकं हाताबाहेर जातंय कि कुठलेच उपाय लागू होतं नसावेत .. पण म्हणून सरसकट जगात लोकडॉन हे शस्त्र उपयोगी नाहि असे म्हणू नये एवढेच ..

In reply to by गणेशा

लस अन औषध फरक असतो. हा आरोप तेव्हाच मान्य असता, जेव्हा औषध अस्ते ;) १५ मार्चपासुन केंद्र सरकार ओरडत होते, की कोरोना वाढतोय, गर्दी कमी करा. पण नाही. आता काय कप्पाळ फोडुन ओरडायच? अन जीएस्टीचे पैसे घेउन काय महाराश्ट्र सरकार पैसे वाटणारे का जॉब गेलेल्यांना?

In reply to by गणेशा

गुजरातची लोकसंख्या 6.50कोटी असताना गुजरात ला करोना डोस 80 लाख आणि महाराष्ट्र ची लोकसंख्या गुजरात पेक्षा जवळपास दुप्पट 12.30 कोटी असताना करोना डोस 85 लाख उत्तर प्रदेशची लोकसंख्या २३ कोटी, पण डोस मिळाले फक्त ७६ लाख (म्हणजे महाराष्ट्राच्या निम्मे). राजस्थानची लोकसंख्या ८ कोटी, पण डोस मिळाले ७८ लाख (म्हणजे महाराष्ट्राच्या दीडपट).

देश संकटा तून जात असताना सुद्धा नीच राजकारण bjp करत आहे ,ह्यांचे आरोग्य मंत्री अत्यंत फालतू स्टेटमेंट देत आहेत महाराष्ट्रात bjp अत्यंत नीच राजकारण खेळत आहे..लोकांना सर्व समजत आहे अंध भक्त अंध च असल्या मुळे त्यांना काही दिसण्याचा प्रश्न च नाही . भारतीय लोकांनी एवढे नीच राजकारण पहिल्यांदाच पाहिले आहे . कधी एकदा लोकसभेच्या निवडणुका होतात आणि ह्या राष्ट्र द्रोही पक्षाचे सरकार हाकलून देतो असे जनतेला झाले आहे.

जे धागे काढले जात आहेत ते सर्व अंध भक्त काढत आहेत . चालू घडामोडी म्हणजे मोदी साहेबांचा उदो उदो आणि bjp चे गुणगान करणे हाच अंतर्गत हेतू ह्या लोकांचा आहे मी bjp अंध भक्त नाही असे सांगायचे आणि त्या नंतर फक्त सत्य स्थिती शी विपरीत दावे करून bjp च प्रचार करायचा हा उद्योग येथील ठराविक आयडी करत आहेत... बाकी लोकांनी अशा धाग्या पासून लांब च राहवे ..ह्या अंध भक्तांना आपसात च चर्चा करू ध्या.

In reply to by Rajesh188

कोविड रोग आटोक्यात आणण्यात आलेले राज्य सरकारचे अपयश, हे सगळे विषय चर्चेला आणले तर, त्यात सामान्य माणसाचा काय दोष आहे? मुळात, पोलीसांना आणि साधूंना त्याच वेळी संरक्षण देणे, ही राज्य सरकारचीच जबाबदारी होती... कोविड पसरू नये ह्यासाठी, योग्य ती खबरदारी घेणे, ही पण राज्य सरकारचीच जबाबदारी आहे...

https://www.loksatta.com/desh-videsh-news/union-health-minister-harsh-v… इतर राज्यांपेक्षा, महाराष्ट्राची परिस्थिति गंभीर आहे...

डॉ. हर्षवर्धन योग्यच बोलत आहेत. गेले एक वर्ष राज्य सरकारला आरोग्य सेवासुधारण्याची संधी होती. पण बराचसा वेळ नट-नट्यांवर टिपण्णी करणे, उखाड दिया वगैरे.. ज्यात काडीचेही ज्ञान नाही अशा चीन-पाकिस्तान/कश्मिर विषयावर बोलणे/बेळगाव सीमा प्रश्न ह्यात सरकारच्या मंत्र्यांचा वेळ गेला. बाकीच्या राज्यांचे मंन्त्री वर्षभर मान खाली घालुन काम करत असताना महाविकास आघाडीचे मंत्री नको त्या कारणांसाठी हेडलाईन्समध्ये होते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

राज ठाकरे यांनी एक प्रश्र्न विचारला आहे की, उद्धव ठाकरे यांच्या हातमध्ये राज्य आलंय, की, त्यांच्यावरती राज्य आलंय?

In reply to by मुक्त विहारि

राज ठाकरेंंच्या हातात राज्य नाही आणि त्यांच्यावर राज्यही आलेले नाही. मुळात ते खेळातून केव्हाच बाद झालेत. त्यामुळे आता मैदानाबाहेर बसून निर्रथक कोट्या करणे एवढेच ते करू शकतात.

In reply to by श्रीगुरुजी

हे सगळं ठीक आहे.पण मध्यंतरी मासे व्यापारी, सिनेमावाले अजून बर्याच संघटना राज ठाकरेंकडे गार्हाणे मांडायला गेले होते , ते सत्तेत नाही आणि येणार नाही मग ते लोक का गेले? कधी कधी ऐकून घेणार आणि दोन सुनावणारही पाहिजे.

In reply to by Bhakti

या paid news असतात. आपल्यात अजून थोडी धुगधुगी शिल्लक आहे हे दाखविण्यासाठी असे दिखाऊ सोहळे घडवून आणले जातात.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घोषित केले आहे की या बगल्याच्या डागडुजीसाठी 3800 कोटी रुपये खर्च होणार आहे. याबाबत काय वाटते?

.... स्वत:च्या नागरिकांनाही प्रवेश नाकारला..... https://www.loksatta.com/desh-videsh-news/new-zealand-temporarily-suspe… रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान भारतातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला न्यूझीलंडमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात नव्याने आढळून आलेल्या २३ रुग्णांपैकी १७ रुग्ण हे भारतातून न्यूझीलंडमध्ये दाखल झालेले प्रवासी आहेत. त्यामुळेच भविष्यात ही संख्या वाढू नये म्हणून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना पुढील दोन आठवडे परवानगी नाकारण्यात आलीय.

In reply to by मुक्त विहारि

स्वतःचं नागरिकांवर असे बंधन घातले जात नाही सहसा ... खरं तर जेसिका ताई तश्या उदारमतवादी पक्षाच्या आहेत पण कसे काय असे केले ! पण जेव्हा पूर्वी परत प्लेग भारतात आला होता तेव्हा सुद्धा अनेक देशांनी हे बंधन घातले होते

..... एनसीबीकडून अटक.... https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-news-ncb-arrests-21-year… ड्रग्सच्या व्यवसायात, मुस्लिम लोकांचे जास्त आर्थिक संबंध आहेत का?

In reply to by मुक्त विहारि

"ड्रग्सच्या व्यवसायात, मुस्लिम लोकांचे जास्त आर्थिक संबंध आहेत का?" हे म्हणजे अंडरवर्ल्डमध्ये मराठी लोकांचे आर्थिक संबंध आहेत का ? असे विचारण्यसारखे. दोघांचेही उत्तर 'हो' असे आहे पण सरसकटीकरण अयोग्य वाटते. अनेक कारणे आहेत त्यामागे.

रेमडेसिवीर प्रोडक्टशन कंपन्यांशी आरोग्य मंत्री टोपे आज बैठक घेणार.याचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य , केंद्र दोघांचीही जबाबदारी आहे.

In reply to by मराठी_माणूस

अभिनंदन वगैरे करायला आपली हरकत नाही. अभिनंदन! पण हे सगळे घडवून आणता येते हे आपल्या माहितीसाठी सांगतो. वास्तविक पाहता सगळीकडे दर्जा खालावत चालला आहे. सध्या पुण्यातली सुमार अभिमत विद्यापीठ सुध्धा असेच मानांकन मिरवतात.. मग त्यांचाही दर्जा चांगला म्हणावा लागेल!

In reply to by मराठी_माणूस

ओक्के. मग अवघड काम करून दाखवले म्हणून अभिनंदन करूयात. दर्जा आहे म्हणून नको ...! एक शंका, अवघड आहे ( नक्की काय अवघड देवाक ठाऊक) ते सोपं करायचा प्रयत्न का करत नाहीत ही विद्यापीठे?