नुकताच एका परिचितांनी ‘उसापोटी कापूस जन्मला’ या म्हणीचा अर्थ विचारला होता. त्यावर शोध घेताना मला रोचक माहिती मिळाली. वास्तविक सदर म्हणीत ‘कापूस’ शब्द नसून ‘काऊस’ हा शब्द आहे. त्याचा अर्थ ‘उसाच्या शेंड्याचा नीरस भाग किंवा कुचकामाचा माणूस’. ‘काऊस’ हा जरा विचित्र शब्द असल्याने याचा कापूस असा सोयीस्कर अपभ्रंश झाला असावा.
या निमित्ताने मनात एक कल्पना आली. वरील म्हणीप्रमाणेच आपल्या भाषेत अनेक शब्द, म्हणी अथवा वाक्प्रचार यांचे अपभ्रंश कालौघात रूढ होतात. त्याची अशी काही कारणे संभवतात :
१. एखादा मूळ शब्द उच्चारायला कठीण असतो
२. तो लोकांत खूप अपरिचित असतो, किंवा
३. भाषेच्या विविध बोली अथवा लहेजानुसार त्यात बदल संभवतात.
म्हणी आणि वाक्प्रचार हे कित्येक शतकांपासून भाषेत रूढ आहेत. तेव्हा त्यांचे विविध अपभ्रंश नक्की कधी झाले हे समजणे तसे कठीण असते. मात्र एकदा का ते रूढ झाले, की त्या पुढील पिढ्यांना तेच जणू मूळ असल्यासारखे भासतात. त्यातून बरेचदा संबंधित म्हणीचा अर्थबोध होत नाही. काहीसे बुचकळ्यात पडायला होते तर काही वेळेस काही शब्द हास्यास्पद भासतात. मग या अपभ्रंशांची नवनवीन स्पष्टीकरणे सामान्यांकडून दिली जातात आणि त्यातून काहीतरी नवेच रूढ होते. काही अपभ्रंशांच्याबाबत विविध शब्दकोश आणि भाषातज्ञात देखील मतांतरे अथवा मतभेद असतात. असे काही वाचनात आले की एखाद्या भाषाप्रेमीचे कुतूहल चाळवते. तो त्याचा अधिकाधिक शोध घेऊ लागतो. अशाच काही मजेदार बदल अथवा अपभ्रंशांची जंत्री करण्यासाठी हा धागा.
माझ्या माहितीतील काही उदाहरणांनी (संदर्भासह) सुरुवात करून देतो. नंतर इच्छुकांनी भर घालत राहावी.
…
१. आठराविश्वे दारिद्र्य
अर्थ : -पूर्ण दारिद्र्य
आता १८ ‘विश्वे’ कोणती असा प्रश्न पडतो.
त्याची २ स्पष्टीकरणे मिळाली :
अ) वीस विश्वे (विस्वे) पैकीं अठराविश्वे म्हणजे जवळ जवळ पूर्ण दारिद्र्य. = 18/20
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF…+)
ब) 'अठरा विसा' याचा अर्थ १८ x २० = ३६० दिवस, असा होतो. ३६० दिवस म्हणजे एक वर्ष. वर्षाचे सर्व दिवस, सदासर्वकाळ दारिद्रय घरात वसतीला असणे, यालाच 'अठरा विश्वे दारिद्रय' म्हणतात (हणमंते, श्री०शा० १९८० : संख्या-संकेत कोश. प्रसाद प्रकाशन, पुणे)
http://maparishad.com/content/%E0%A4%85%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%…
आहे की नाही गम्मत ! गणितानुसारही चक्क २ वेगळे अर्थ झाले :
१८/२० आणि
१८ गुणिले २० !
२. पुराणातली वांगी पुराणात
अर्थ : उपदेश नुसता ऐकावा, करताना हवे ते करावे ( शब्दरत्नाकर).
आता इथे भाजीतील ‘वांगी ’ कुठून आली हा अगदी स्वाभाविक प्रश्न. मी यासाठी शब्दरत्नाकर व बृहदकोश दोन्ही पाहिले असता त्यात ‘वांगी’ च स्पष्ट लिहिलेले आहे. मात्र ‘वांगी’ हा वानगीचा अपभ्रंश असल्याचे संदर्भ मिळतात. उदा :
“यातला मूळ शब्द ‘वानगी’ म्हणजे नमुना हा असावा, ज्याचा नंतर ‘वांगी’ हा अपभ्रंश झाला, असे काही भाषातज्ज्ञांचे मत आहे”.
https://www.loksatta.com/vishesh-news/scientific-research-in-indian-myt…
३. उंसाच्या पोटीं काऊस जन्मला
= हिर्याच्या पोटीं गारगोटी. [सं. कु + इक्षु]
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8
इथे कापूस या अपभ्रंशांने खरेच बुचकळ्यात पडायला होते. ऊस श्रेष्ठ असेल तर कापूस कनिष्ठ कसा?
४. परोक्ष
मूळ अर्थ :
एखाद्याच्या पाठीमागें, गैरहजेरींत; डोळ्या-आड; असमक्ष.
मात्र व्यवहारात त्याचा वापर बरोबर उलट अर्थाने ( समक्ष) केला जातो !
हा पाहा संदर्भ :
“अडाणी माणसें परोक्ष याचा समक्ष या अर्थीं उपयोग करतात व असमक्ष करितां अपरोक्ष योजतात”.
(https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%95…+)
५. मेत(थ)कूट
याचा सर्वपरिचित अर्थ हा:
तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहऱ्या, मेथ्या इ॰ एकत्र दळून केलेलें पीठ व त्यांत दहीं घालून तयार केलेलें एक रुचकर तोंडीलावणें.
यात मेथ्या असल्याने ते खरे मेथकूट आहे.
पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा उगम मात्र मित्र + कूट असा आहे.
मेळ; एकी; दृढ मैत्री. 'शिंदे, बाळोबा व भाऊ यांचें मेतकूट झालें होतें.' -अस्तंभा ९६. [सं. मिथः कूट; मित्र-प्रा. मित + कूट] (वाप्र)
दाते शब्दकोश
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95…
......
वानगीदाखल मी काही वर दिले आहे.
येउद्यात अजून असे काही. चर्चा रोचक असेल.
**************************************
वर्गीकरण
वाचने
57137
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक विषय
पण, ‘मेतकूट जमणे / होणे’ याचा
भवानी/बोवनी
खरा शब्द
In reply to भवानी/बोवनी by कानडाऊ योगेशु
लाभ
In reply to भवानी/बोवनी by कानडाऊ योगेशु
+१
In reply to लाभ by सुरिया
धन्यवाद !
बोहणी हा शब्द इतका जुना असेल
In reply to धन्यवाद ! by हेमंतकुमार
‘ ब्रिटिशकालीन किस्से (ऐकीव)
In reply to बोहणी हा शब्द इतका जुना असेल by कानडाऊ योगेशु
रोचक धागा
अजून एक...
दुर्गे दुर्घट भारी
धन्यवाद ...
In reply to दुर्गे दुर्घट भारी by अनन्त्_यात्री
सुखकर्ता दुखहर्ता
ह्या लोकांपुढे "घालीन लोटांगण
In reply to सुखकर्ता दुखहर्ता by चंद्रसूर्यकुमार
उत्तम आणि रोचक धागा
सौंदर्य ,
In reply to उत्तम आणि रोचक धागा by सौन्दर्य
तुंबडीचा मूळ अर्थ जरी रक्त
In reply to सौंदर्य , by हेमंतकुमार
आभार
In reply to सौंदर्य , by हेमंतकुमार
"प्रयत्ने वाळूचे कण रगडिता
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता
In reply to "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता by श्रीगुरुजी
म्हणी व वाक्प्रचार
म्हणी' म्हणजे लोकांनी वारंवार
In reply to म्हणी व वाक्प्रचार by सौन्दर्य
आभार
In reply to म्हणी' म्हणजे लोकांनी वारंवार by श्रीगुरुजी
सौंदर्य,
In reply to म्हणी व वाक्प्रचार by सौन्दर्य
कुमार१
In reply to सौंदर्य, by हेमंतकुमार
मी एक दुसरा अर्थ ऐकला होता
In reply to कुमार१ by सौन्दर्य
पुन्हा एकदा अप्रतिम धागा..
धन्यवाद
रोचक माहिती.. !!!
छान धागा. सुंदर माहीती . . .
सुक्या,
In reply to छान धागा. सुंदर माहीती . . . by सुक्या
धन्यवाद
In reply to सुक्या, by हेमंतकुमार
पूर्वी बैल म्हणजे काही तरी
In reply to छान धागा. सुंदर माहीती . . . by सुक्या
धन्यवाद
In reply to पूर्वी बैल म्हणजे काही तरी by साहना
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
वाह! अभ्यासपूर्ण आणि मस्त धागा!
भक्ती,
चांगला लेख.
हा लेख मला खूप आवडला.
आश्चर्य वाटले
In reply to हा लेख मला खूप आवडला. by साहना
छाप तिलक सब छिन लोहे मोसे नैना मिलायिके
In reply to हा लेख मला खूप आवडला. by साहना
कुछ भी...
In reply to छाप तिलक सब छिन लोहे मोसे नैना मिलायिके by कर्नलतपस्वी
छाप तीलक छिनने = ओळख हिसकावणे
In reply to हा लेख मला खूप आवडला. by साहना
पुस्तक उपलब्ध आहे
पुस्तक उपलब्ध आहे
पुस्तक उपलब्ध आहे
पुस्तक उपलब्ध आहे
उद्भ्रंश
वरील सर्वांना धन्यवाद !
In reply to उद्भ्रंश by अनन्त्_यात्री
रोचक धागा
इंग्लिशमधून मराठीत आलेले शब्द?
निवडणुकीत पण आता 'अटीतटीची
In reply to इंग्लिशमधून मराठीत आलेले शब्द? by चंद्रसूर्यकुमार
चंसूकु,
In reply to इंग्लिशमधून मराठीत आलेले शब्द? by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद
In reply to चंसूकु, by हेमंतकुमार
तसे असेल तर Lot हा शब्द लूट
In reply to चंसूकु, by हेमंतकुमार
सिंहाचा वाटा
In reply to इंग्लिशमधून मराठीत आलेले शब्द? by चंद्रसूर्यकुमार
ब ता,
In reply to सिंहाचा वाटा by बबन ताम्बे
मदत हवी
रोचक
In reply to मदत हवी by हेमंतकुमार
पेग प्याक
येस .....
In reply to पेग प्याक by सुरिया
कॅरॅक्टर अॅक्टर चे शब्दशः
इथे पुन्हा Character हा शब्द
In reply to कॅरॅक्टर अॅक्टर चे शब्दशः by कानडाऊ योगेशु
...
ढवळ्या शेजारी
वाण =. वर्ण; रंग. '. म्ह॰
आणि ...
माझी सगळ्यात आवडती म्हण आहे .
In reply to आणि ... by हेमंतकुमार
पुस्तक उपलब्ध आहे.