✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुन्हा पानिपत!

म
मनो यांनी
Tue, 12/01/2020 - 03:58  ·  लेख
लेख
elephant भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, पानिपतावर झालेल्या, मराठे आणि अब्दाली यांच्यातील युद्धाचा १४ जानेवारी २०२१ हा २६० वा स्मृतिदिन. "स्मृतीभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति" असं गीतेच्या दुसऱ्या अध्यायात म्हणल्याप्रमाणे या युद्धाचे धडे आणि या युद्धाची स्मृती आजच्या काळातही उपयोगी आहे, त्यामुळेच आज पानिपत या विषयावर लिहिलेले, गेल्या १० वर्षातील माझ्या संशोधनाचे फलित असे " Battle of Panipat, in light of rediscovered paintings" हे इंग्रजी पुस्तक या स्मृतिदिनाच्या आधी पूर्ण करताना मला आज खूप समाधान वाटते आहे. या विषयावर आजपर्यंत अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. लढाईनंतर लगेच बखरी लिहिल्या गेल्या जाऊ लागल्या. आधुनिक काळात मराठी इतिहासाचे भीष्मपितामह वि का राजवाडे, शेजवलकर, फाटक, पगडी, पांडुरंग बलकवडे, विश्वास पाटील यांनी लिहिलेली कादंबरी ही या विषयावर लिहिलेल्या साहित्यातील अगदी काही निवडक ढोबळ नावे. डॉ उदय कुलकर्णी यांनीही गेल्या काही वर्षात इंग्रजी आणि मराठीत पानिपताबद्दल लिहिले आहे, व्याख्यानांच्या द्वारे लोकांसमोर मांडले आहे. माझ्या मित्राच्या भाषेत सांगायचे तर "अगदी पिळून कोरड्या केलेल्या" अश्या या विषयावर मी का अजून एक पुस्तक प्रकाशित करतो आहे? त्याचं कारण असं आहे की, कित्येक पुस्तकांमधून आपल्याला लेखक स्वतः मराठ्यांच्या बरोबर पानिपतमध्ये "लढताना" आढळतात. मराठ्यांनी दाखवलेला पराक्रम हा प्रशंसनीय तर आहेच. आपल्या पूर्वजांचे स्मरण करताना आपल्याला अभिमान वाटेल अश्या गोष्टी समोर ठेवायच्या असतात, त्यामुळे अशी पुस्तके लिहू अथवा वाचू नयेत असे माझे म्हणणे नाही. पण वस्तुनिष्ठ दृष्टीने या लढाईबाबत मराठी साधने काय सांगतात, एवढेच नव्हे तर शत्रूच्या बाजूची फारसी, दारी, पश्तो साधने काय सांगतात, या लढाईत भाग न घेतलेले इंग्रज, फ्रेंच आपल्याला काय सांगतात हे तपासून पाहिलं तर एक आजवर न उलगडलेलं विश्वच आपल्यासमोर अवतीर्ण होतं. त्या विश्वात रंग भरण्याचं काम करतात ती परदेशातील आणि भारतातील आजवर अप्रकाशित असलेली चित्रे. या विश्वानं मला मोहात पाडलं. वाचकांनाही या गतकाळातील स्मृतिचित्रांचा मोह पडेल अशी मला अशा आहे. कित्येक दिवस, महिने, वर्षे, महिने अभ्यास केल्यावर इतक्या विस्तीर्ण विषयावर लिहिलेल्या अनेक पुस्तकांतील न उलगडलेल्या बाबी मला समजू लागल्या. त्या पक्क्या करण्यासाठी मी ज्या मूळ साधनांवरून हे ग्रंथ लिहिले आहेत ती मिळवण्याचा प्रयत्न केला. ही वाट खूप खडतर होती. त्यासाठी आवश्यक असणारे फारसी, दारी, पश्तो वाचनाचे ज्ञान, मोडी लिपी वाचन हे शिकताना मला अनेक लोकांची प्रचंड मदत झाली. श्री. गजानन भास्कर मेहेंदळे आणि दिल्लीचे फारसी प्राध्यापक डॉ चंद्रशेखर यांच्या मदतीने अनेक वाटा खुल्या झाल्या. मूळ साधने घरबसल्या अभ्यासून पाहताना या पुस्तकाची कल्पना माझ्या मनात साकारत गेली. या पुस्तकासाठी मी जगभरातून अनेक तपशील मिळवले आहेत. नावंच सांगायची तर इंग्लंड, अमेरिकेतील साधने तर आहेतच, पण पॅरिस येथील फ्रेंच साधने, मध्य-पूर्वेतील कुवैत, अफगाण शाहनामा-पेशावर, पाकिस्तानातील लाहोर, खैबर-पख्तुनवा, भारतातील सागर, डीग, हैदराबाद, जोधपूर, जयपूर अश्या अनेक मराठी वाचकांना अपरिचित अश्या जगातून इतिहासाचे कण गोळा केलेले आहेत. या नवीन पुस्तकाच्या रूपाने मागच्या पंचवीस-तीस वर्षातील संशोधन आणि अनेक अप्रकाशित नवीन चित्रे, साधने अन माहिती वाचकांच्या समोर ठेवताना मला आनंद होत आहे. cover मिसळपाव हे संकेतस्थळ माझ्यासाठी खास आहे, कारण इथे लिहिलेल्या माझ्या लेखनाला अनेक इतिहासप्रेमी वाचकांनी आणि मित्र-मैत्रिणींनी खूप प्रोत्साहन दिले आहे. एवढेच नव्हे तर नुसतं पुस्तक लिहितो आहे हे समजताच काहींनी त्याच वेळी आपली प्रत राखून ठेवली आहे! आज पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु करताना मला आपल्या सर्वांचा असाच भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. पुस्तकाचे प्रकाशन २० डिसेंबर २०२० रोजी करण्याचं ठरवलं आहे. ज्यांना पुस्तक हवे असेल त्यांनी आपले नाव इथे नोंदवावे. https://panipat-signup.web.app/ दोन पर्याय उपलग्ध आहेत: १) गूगल पे, अँपल पे अथवा क्रेडिट कार्ड इत्यादीद्वारे रुपये ७५०/- देऊन नोंदणी किंवा २) सध्या पैसे न देता फक्त नाव,पत्ता देउन नोंदणी करता येईल - (पुणेरी स्वभावाला न अनुसरून!) कुठलीही काटकसर न करता उत्तम दर्जाच्या जाड कागदावर, ८०+ चित्रे सुबकपणे या जाड पुठ्ठयाच्या (hardcover) पुस्तकात छापली आहेत. - पुस्तक जगभर कुठेही पाठवता येईल अशी सोय करण्याचा प्रयत्न चालू आहे - पुस्तकाची किंमत रुपये १५००/- आहे, पण २० डिसेंबरपर्यंत ते रुपये ७५०/- म्हणजे ५०% सवलतीत मिळेल - पुस्तक दिलेल्या पत्त्यावर प्रकाशन झाल्यावर हणजे २० डिसेंबरनंतर पाठवले जाईल - पुस्तक प्रकाशन झाल्यावर amazon किंवा दुकानातही मिळू शकेल, तशी व्यवस्था करणे चालू आहे - नोंदणी करताना काही अडचण आल्यास panipat.rediscovered अँट gmail.com या पत्यावर किंवा इथे संपर्क करावा धन्यवाद !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
कला
इतिहास
वाङ्मय
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
बातमी
शिफारस
माहिती

प्रतिक्रिया द्या
32580 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

पुस्तक मिळाले

मित्रहो
Tue, 12/22/2020 - 19:50 नवीन
आजच पुस्तक मिळाले. पुस्तक वाचायला सुरवात केली नाही पण पुस्तकाची एकूण रचना, कागदाचा दर्जा, चित्रे अतिशय सुंदर आहे. हे पुस्तक नक्कीच संग्रहणीय असे पुस्तक आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

मनो
गुरुवार, 12/24/2020 - 01:30 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो

उत्तम.

कंजूस
Wed, 12/23/2020 - 05:09 नवीन
खूप कष्ट घेऊन पुस्तक लेखनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

ज्यांनी आत्तापर्यंत घेतलेले

मनो
गुरुवार, 12/24/2020 - 01:47 नवीन
ज्यांनी आत्तापर्यंत घेतलेले नाही, त्यांच्यासाठी पुस्तक या तीन ठिकाणी मिळू शकेल https://panipat-signup.web.app/ http://sahyadribooks.com/battle-of-panipat/ https://www.amazon.in/Battle-Panipat-Light-Rediscovered-Paintings/dp/B08PW5W3WZ/ Amazon USA https://www.amazon.com/dp/B08PW5W3WZ?ref=myi_title_dp आजच जरूर मागवा.
  • Log in or register to post comments

अमेरिकेत मागवण्यासाठी

चित्रगुप्त
गुरुवार, 12/24/2020 - 07:08 नवीन
पुस्तक अमेरिकेत मागवण्यासाठी मी मागे नोंदणी केली होती, तेंव्हा किंमत १० डॉलर दाखवली जात होती. आता अ‍ॅमॅझोनवर बघता १९.९९ दाखवत आहे. काय करावे ? सध्या मी अमेरिकेतच आहे.
  • Log in or register to post comments

काका, मी पाठवतो. आजच अमेरिकेत

मनो
Fri, 12/25/2020 - 00:27 नवीन
काका, मी पाठवतो. आजच अमेरिकेत (सुखरूप) परतलो आहे, तुम्हाला कसं करायचं त्याचा पत्ता लावून व्य नि करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

आजच पुस्तक मिळाले. पुस्तक खुप

नीलस्वप्निल
गुरुवार, 12/24/2020 - 14:20 नवीन
आजच पुस्तक मिळाले. पुस्तक खुप सुन्दर आहे... उद्या पासुन ३ दिवस सुट्टी आहे, योगायोगाने... :)
  • Log in or register to post comments

पुस्तक मिळाले

चांदणे संदीप
गुरुवार, 12/31/2020 - 13:45 नवीन
आज पुस्तक मिळाले. मोठा खजिना हाती लागल्याचा फील येतोय. सं - दी - प
  • Log in or register to post comments

याचसाठी केला होता अट्टहास.

मनो
गुरुवार, 12/31/2020 - 20:37 नवीन
याचसाठी केला होता अट्टहास. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

ग्रंथ मिळाला.

चित्रगुप्त
Sun, 01/10/2021 - 02:02 नवीन
ग्रंथ मिळाला. कागद, छपाई उत्तम आहे. अजून वाचायला सुरुवात केलेली नाही. ... "सदरहू ग्रंथात पार्श्वभूमिचा रंग पांढर्‍या ऐवजी साधारणपणे हस्तिदंती म्हणता येईल असा वापरल्याने पुस्तक अधिकच देखणे झालेले आहे" .... हे वाक्य टंकल्यावर मी ग्रंथ पुन्हा एकदा उघडून बघितो, तर तो पांढराच कागद असल्याचे दिसून आले. मी काल रात्री कृत्रीम उजेडात, तर आता नैसर्गिक उजेडात पुस्तक बघितले आहे. 5000 Kelvin चे 'ग्लोब' त्यातल्या त्यात नैसर्गिक प्रकाशासारखा उजेड देतात असे वाचून मी मुद्दाम ते मागवून लावलेले आहेत. आज रात्री पुन्हा वेगवेगळ्या दिव्यांच्या प्रकाशात जाऊन बघेन. हे मी मुद्दाम प्रकाशाबद्दल/चित्रांबद्दल संवेदनशील असणारांसाठी लिहित आहे, कारण अश्या ठिकाणी चित्रांचा रंग नेमका दिसणे महत्वाचे असते. नाना फडणविसांच्या आणि अन्य काही चित्रांबद्दल मी पुन्हा नंतर लिहीन. चिकाटी, तळमळ, याबरोबरच दीर्घ प्रयत्नांनी आगळे-वेगळे संशोधन करून हा अद्वितीय ग्रंथ रचल्याबद्दल ग्रंथकर्त्याचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

काका,

तुषार काळभोर
Sun, 01/10/2021 - 07:30 नवीन
चित्रकाराच्या दृष्टिकोनातून या पुस्तकाविषयी वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

धन्यवाद. आपल्यासारख्या

मनो
Sun, 01/10/2021 - 09:00 नवीन
धन्यवाद. आपल्यासारख्या चित्रकाराकडून अशी दाद मिळणं ही माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. चित्रे योग्य प्रकारे छापली जावीत यासाठी आम्हाला बरेच कष्ट पडले. अनेक प्रकारचे, वेगवेगळ्या जाडीचे कागद मागवून त्यातून निवड केली. छापखान्यातले मॉनिटर आणि माझा मॉनिटर एकसारखी चित्रे दाखवतील याकरता त्यांचे कलर कॅलिब्रेशन केले. त्यानंतरही डमी छापल्यावर त्यातील छापाईनुसार CMYK मधील के म्हणजे काळा रंग चित्राची झळाळी (luminance) कमी करणार नाही अश्या प्रमाणात कमीजास्त केला. या सर्व प्रयत्नात स्पेक्ट्रम ऑफसेटचे विभाकर वैद्य आणि त्यांचे मंगेश उत्तेकर यांनी न कंटाळता सुरेख काम केलं त्यांच्यामुळे आज आपल्याला पुस्तक या स्वरूपात दिसते आहे. वर तु.का. अर्थात पैलवान यांनी म्हणल्याप्रमाणे तुमच्या चित्रांवरील प्रतिक्रियांची जरुर वाट पाहतो आहोत. जमल्यास नवीन धागाच काढुयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

खास चित्रांसाठी नवीन धागा काढावा.

चित्रगुप्त
Sun, 01/17/2021 - 00:01 नवीन
@मनो, तुमच्या ग्रंथातील चित्रे तुम्हाला कसकशी मिळत गेली, त्यासाठी काय काय प्रयास करावे लागले, कुणाकुणाची मदत झाली, कुठकुठे प्रवास करावा लागला तसेच काही मोठ्या चित्रांचे वर्णन, त्यातील तपशीलांबद्दल माहिती यासाठी एक नवीन धागा काढावा असे सुचवतो. पुस्तकातील नाना फडणविसांचे चित्रातील चेहरा बराच गडद, काळपट दिसतो आहे, त्यावरून मला वाटले होते की ब्रिटिश चित्रकाराला गौरवर्णीय सोडून इतरांची चित्रे रंगवायची म्हटल्यावर अमूक रंग (उदा बर्न्ट सायना, बर्न्ट अंबर वगैरे) वापरायची सवय असावी, त्यामुळे तसे झाले असावे. जालावर शोध घेता मात्र हेच चित्र कुठे काळपट- तैलरंगात केलेले, तर कुठे हलक्या जलरंगात असल्यासारखे दिसले. त्यामुळे हा फरक फोटोग्राफी, छपाई, शिवाय आपण बघत असलेल्या लॅपटॉप आदिंमुळे पडत असल्याचे लक्षात आले. Image removed. Image removed. वर लिहील्याप्रमाणे ब्रिटिश चित्रकाराबद्दल मला तसे वाटण्याचे कारण म्हणजे पूर्वी भारतातील राजे- रजवाडे त्यांच्या राजघराण्यातील व्यक्तींची तैलचित्रे रंगवण्यासाठी ब्रिटिश चित्रकारांना पाचारण करीत. ते चित्रकार भरजरी वस्त्रे, दाग-दागिने संगमरवरी खांब, वगैरे उत्तम रितीने रंगवत, मात्र त्यांना भारतियांची अंगकांती, वर्ण हे जमत नसे. त्यामुळे त्या काळी मुंबईला जे.जे मधे शिक्षक असलेले प्राख्यात भारतीय चित्रकार 'त्रिंदाद मास्तर' Antonio Xavier Trindade (1870-1935) यांच्याकडून चेहरे रंगवून घेत. यातून त्रिंदाद यांना भरपूर धनप्राप्ती होत असे, त्यातून त्यांनी माहीमला समुद्रकाठी बंगला बांधला होता. माझ्या सुदैवाने सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वी बरेचदा त्या बंगल्यात बरेचदा जाऊन त्रिंदाद यांची उत्तमोत्तम चित्रे बघण्याची संधी मिळाली. (आता तो बंगला आणि ती चित्र तिथे आहेत की नाहीत ठाऊक नाही) त्रिंदाद मास्त॑रांविषयी वरील माहिती मी बहुधा चित्रकार प्रल्हाद अनंत धोंड, यांच्या 'रापण' या पुस्तकात वाचल्याचे आठवते. चित्रकला-प्रेमींनी 'रापण' अवश्य वाचावे अशी शिफारस करतो. त्रिंदाद यांचे माझे अतिशय आवडते चित्रः (दिल्लीच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयातील) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

माझा एक अंदाज असा आहे की

मनो
Sun, 01/17/2021 - 00:29 नवीन
माझा एक अंदाज असा आहे की चित्रातील कपडे पांढरे असल्याने जेंव्हा कॉम्प्युटरवर कलर ऑटो बॅलन्स केले जातायत त्या वेळी compensate केल्याने चेहेरा काळा होतोय. ज्यांना फोटोशॉपची चांगली माहिती आहे त्यांना विचारून पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

पुस्तक मिळाले. कागद आणि

रुपी
Mon, 01/11/2021 - 10:57 नवीन
पुस्तक मिळाले. कागद आणि चित्रे खूप दर्जेदार आहेत. पुस्तक वाचायला सुरुवात केली नाही, लवकरच वाचेन. जमल्यास goodreads वर add करा, म्हणजे पुस्तक तिकडून ही वाचकांना माहीत होईल.
  • Log in or register to post comments

अभिनंदन....

मुक्त विहारि
Mon, 01/11/2021 - 12:09 नवीन
एक उत्तम विषय परत मांडलात. पुस्तक, मराठीत आले की नक्कीच वाचणार. पानिपत हा अभ्यासाचा विषय आहे. पानीपतामुळे 3 गोष्टी शिकायला मिळाल्या.... 1. बाजारबुणगे जवळ बाळगू नयेत. 2. अवघड काम असेल तर, बायकामुले घरीच ठेवावीत. 3. रसद भरपूर ठेवावी.
  • Log in or register to post comments

बॅटल ऑफ पनिपत : रसग्रहणात्मक लेख

चौथा कोनाडा
Sat, 01/16/2021 - 17:52 नवीन

+१

बॅटल ऑफ पनिपत या इंग्लिश मधील ग्रंथाचा आजच्या दै लोकसत्ता म्हणजे दि. १६ जाने २०२१, शनिवार च्या अ़ंकात "बुकमार्क" या सदरात "‘पानिपता’चे चित्रचरित्र" या मथळ्याखाली ले. निखिल बेल्लारीकर यांचा रसग्रहणात्मक लेख प्रकशित झालेला आहे. https://epaper.loksatta.com/2960733/loksatta-pune/16-01-2021#clip/57753863/c33325ae-264f-4ecf-adac-5e4af33037f9/1595.5555555555557:1035.5583548461216 https://www.loksatta.com/athour-mapia-news/battle-of-panipat-in-light-of-rediscovered-paintings-book-review-abn-97-2380669/
  • Log in or register to post comments

नक्की वाचा. वाचायला विसरू

चौथा कोनाडा
Sat, 01/16/2021 - 17:57 नवीन
नक्की वाचा. वाचायला विसरू नकात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

कालच पुस्तक आले. प्रथम दर्शनी

जानु
Sat, 01/16/2021 - 18:42 नवीन
कालच पुस्तक आले. प्रथम दर्शनी आवडले. चित्रे आणि रेखाटने सुंदर आहेत. पेपर सुंदर आणि ग्लॉसी आहे. बाकी वाचल्यावर मत सांगतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा