✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Once in a lifetime....!

ड
डॉ श्रीहास यांनी
Sat, 09/12/2020 - 13:35  ·  लेख
लेख
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ? मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच. भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ... प्रचंड तणावाखाली कामं करणारी पोरं ,हो पोरंच कारण तिशी पण ओलांडलेली नाही त्यांनी !! तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ , मामा , मावश्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं असं रोज वाटलेलं .... घाईत होतो पण पेशंटच्या मुलाशी बोललो “तब्येत बरी आहे पण किमान दोन दिवस आयसीयुत ठेवून मगच निगेटिव्ह वाॅर्डात शिफ्ट करू.” त्यावर त्यानी थॅंक्यू म्हणून कडक सॅल्यूट करून जयहिंद म्हणाल्यावर मी त्यांना थांबवून म्हटलं “अहो मला सॅल्यूट नका हो करू.” तर तो हलकसं हसला. मी ज्या बिल्डींग मधे जायचो तिथले पाॅझिटिव्ह ,निगेटीव्ह आणि मृत्यु चे रोजचे आकडे पाहून येत होतो.... पहीले दोन दिवसही आशादायक आकडे होते स्वत:वरचा ताण मला बराच कमी झाल्यासारखा वाटायला लागला काही पेशंट्सला inhaler सुरू केलेलं, दोन दिवसांमधे त्यांना फरक पडलाय जे की encouraging होतं. MICU मधले दोन पेशंट निगेटिव्ह होऊन वाॅर्डात गेले , त्यांना तिथे जाऊन भेटलो तर नातेवाईकांना खूप बरं वाटलं.मी प्रत्येक वेळेस ICU मधे जाण्याआधी पेशंटचे नातेवाईक दिसल्यास बोलून जायचो आणि परत आल्यावर सविस्तर चर्चा करायचो जेणेकरून त्यांचं समाधान व्हावं आणि ICU च्या डाॅक्टरांवरचा ताण कमी व्हावा. तिसऱ्या दिवशी ICU तून बाहेर पडलो तोच एक पेशंटची बायको जवळ येऊन म्हणाली “डाक्टरसाब हमारे शौहर को एकबार देख लिजिए गा। बहूत चिढचिढ करते है , सोते भी नही, घरमें चार साल की छोटी बच्ची है और ये यहा ॲडमिट होने के बाद हमारे घरपे कोई आता भी नही और हमसें बात तक नही करते लोग।” तिच्या सोबत जाऊन पेशंटला बघीतलं आणि ड्युटीवरच्या डाॅक्टरला औषधाबाबत सल्ला देऊन आलो. बाहेर आल्यावर तिनं मला माझं नाव विचारलं तेव्हा म्हणालो मी इथं काम करत नाही काही दिवस ड्युटीकरण्यासाठी आलोय. त्यावर तिनं इतकी दुवा दिली की पुढे मी काही बोलूच शकलो नाही. PPE KIT हे फक्त २-२:३० तास घालून ३ वेगवेळ्या ICU चे राउंडस् घ्यायचो , अर्धे कपडे घामानी गच्च भिजून जायचे तिथले डाॅक्टर्स आणि स्टाफ ६-८ तास रोजचे गेले ५ महिने कसे राहीले असतील ह्याची कल्पनाही करवत नाही .... 12 एके दिवशी ड्युटी आटोपुन गाडीत बसतांना दोघांनी जवळ येऊन विचारलं “डाॅक्टर ऐम्ब्युलन्स मधून पाॅसिटिव्ह पेशंटला घेऊन जाता येईल का ? “ मी समजावण्याच्या सुरात म्हटलो “अहो इथे सर्वात चांगला ईलाज होतो आहे तुम्हाला दुसरीकडे कुठेही ॲडमिशन साठी बेड मिळणार नाही हो.” त्यावर त्यांच्यातला एकजण अगदी सहज बोलला “डाॅक्टर बाॅडी न्यायची आहे हो.” नंतर नंतर डोळ्यासमोर रोजचे होणारे मृत्यू हा विषय निरूत्तर करून टाकायचा.... मृत्यूला दरवळतांना पाहीलंय ... थकलेले डाॅक्टर आणि स्टाफ , हताश नातेवाईक आणि घाबरलेले पेशंट असं सतत डोळ्यासमोरचं चित्र वेड लावायला पुरेसं होतं. पण तिथं काम कराणाऱ्या प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळत होतं , रोजच !! बाहेर ड्युटीवर तैनात असलेले पोलीस आणि SRPF चे जवान देखील काही न बोलता शिकवून गेले. PPE किट घ्यायला ICU च्या सिस्टर इंचार्ज कडे जायचो , थोड्या गप्पा व्हायच्या तेव्हा त्या बोलून गेल्या “डाॅक्टर आज रात्री पावणेतीनलाच जाग आली , ICU चं ऑक्सीजन संपलंय असं स्वप्न पडलं हो, नंतर झोपच लागली नाही.” ३५ पेक्षा जास्त पोस्टग्रॅज्यूऐशन करणारे डाॅक्टर्स कोव्हिड ची बाधा झाले आणि बरं झाल्यावर परत ड्युटीवर रुजू झाले. इतकी शक्ती ह्या पोरांमधे येते कोठून ? मला हा प्रश्न रोज पडतोय. काही जण तर सिरियस होते १० दिवस ऑक्सीजन वरही होते हे ऐकून तर मी मनोमन नमस्कार करून टाकला. त्या परिसरात कोणताही राजकीय पक्षाचा माणूस किंवा ब्युरोक्रॅट / बाबू फिरकलेला दिसला नाही किंवा येऊन गेल्याचं ऐकलं नाही. ह्या लोकांना फक्त PPE Kit घालून ICU च्या दारात जरी उभं केलं ना तरी २-३ मिनिटात बेशुद्ध तरी होतील किंवा PPE Kit पांढऱ्याचं पिवळं करतील !! अशक्य अश्या परिस्थितीत ही डाॅक्टर लोकं काम करत आहेत, आपल्या देशाला अतीउत्तम डाॅक्टर्स लाभणार ह्या मला तिळभरही शंका नाहीये. फाईल्स बघतांना एका ठिकाणी नोट्स मधे लिहीलेलं दिसलं की पेशंटची तब्येत अतिशय सिरिअस आहे आणि घरच्यांना फोन करून कळवण्याचा प्रयत्न केला तर कोणीही फोन रिसिव्ह करत नाहीये. आत राउंड घेतांना ती व्हेंटीलेटरवरची पेशंट बघून मला एवढंच वाटलं की जिचं कोणीच नाही तिच्यासाठी एवढी मरमर करणाऱ्या डाॅक्टरच्या मनात काय विचार येत असतील? का तिला वाचवून पुढच्या पेशंटकडे वळणाऱ्या डाॅक्टर ला विचार करायलाही वेळ मिळत नसेल ? मी करोना योद्धा आहे का ? नाही मी करोना योद्ध्यांचा साक्षीदार आहे एका दिव्यत्वाची प्रचिती आलेला डाॅक्टर आहे .माझा खारीचा का होईना पण वाटा आहे हे आयुष्यभरासाठी पुरेल समाधान दोन आठवड्यात मिळवलंय. डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. -डॉ.श्रीहास सु. बर्दापुरकर
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
आरोग्य
औषधोपचार
व्यक्तिचित्र
व्यक्तिचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
सद्भावना
प्रतिक्रिया
लेख
अनुभव
माहिती
प्रश्नोत्तरे
मदत
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
23986 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

डॉक्टर सलाम तुम्हांला आणि

महासंग्राम
Sat, 09/12/2020 - 13:48 नवीन
डॉक्टर सलाम तुम्हांला आणि तुमच्यासारख्या असंख्य अनाम देवदूतांना जे तहान,भूक,स्थळ,काळ,जीव,वेळ यांची पर्वा न करता लोकांना बरे करण्यासाठी झटता आहात . तुम्ही जे करताय त्याचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुमचे आयुष्य भर ऋणी असू आणि स्वतःची काळजी घ्या ! सलाम
  • Log in or register to post comments

हॅट ऑफ

भ ट क्या खे ड वा ला
Sat, 09/12/2020 - 13:51 नवीन
डॉक तुम्ही व तुमच्या सर्व टीम चे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. काय परिस्थितीतुन एक एक क्षण जात असाल तुम्ही . जशा महायुद्धाच्या कथा आपण वाचतो तसे हे अनुभवकथन पूढच्या पिढ्या नक्कीच वाचतील.
  • Log in or register to post comments

ब्राव्हो डॉक... सलाम.

गवि
Sat, 09/12/2020 - 13:52 नवीन
ब्राव्हो डॉक... सलाम.
  • Log in or register to post comments

+१११

हेमंतकुमार
Sat, 09/12/2020 - 13:56 नवीन
मनापासून कौतुक व सदिछा !
  • Log in or register to post comments

व्वा !

संजय क्षीरसागर
Sat, 09/12/2020 - 14:08 नवीन
डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.
शीर्षक, कथन आणि तुमचा अनुभव सगळंच कौतुकास्पद आहे.
  • Log in or register to post comments

दंडवत डॉक ! __/\__

नावातकायआहे
Sat, 09/12/2020 - 15:04 नवीन
दंडवत डॉक ! __/\__
  • Log in or register to post comments

भारी लिहिलंय.

शा वि कु
Sat, 09/12/2020 - 15:56 नवीन
.
  • Log in or register to post comments

सलाम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 09/12/2020 - 16:37 नवीन
डॉक्टरसाहेब लेखन वाचून गहिरवरलो. सॅल्युट तुम्हाला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

_/\_

टवाळ कार्टा
Sat, 09/12/2020 - 16:37 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

बोलायला शब्द नाहीत! शतशत नमन

विनिता००२
Sat, 09/12/2020 - 16:47 नवीन
बोलायला शब्द नाहीत! शतशत नमन __/\__
  • Log in or register to post comments

तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ

चौथा कोनाडा
Sat, 09/12/2020 - 17:02 नवीन
तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ , मामा , मावश्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं असं रोज वाटलेलं .... मी त्यांना थांबवून म्हटलं “अहो मला सॅल्यूट नका हो करू.” तर तो हलकसं हसला. त्यांच्यातला एकजण अगदी सहज बोलला “डाॅक्टर बाॅडी न्यायची आहे हो.” मृत्यू हा विषय निरूत्तर करून टाकायचा.... मृत्यूला दरवळतांना पाहीलंय ... थकलेले डाॅक्टर आणि स्टाफ , हताश नातेवाईक आणि घाबरलेले पेशंट असं सतत डोळ्यासमोरचं चित्र .. ICU चं ऑक्सीजन संपलंय असं स्वप्न पडलं हो, नंतर झोपच लागली नाही.” ३५ पेक्षा जास्त पोस्टग्रॅज्यूऐशन करणारे डाॅक्टर्स कोव्हिड ची बाधा झाले आणि बरं झाल्यावर परत ड्युटीवर रुजू झाले. इतकी शक्ती ह्या पोरांमधे येते कोठून ? मला हा प्रश्न रोज पडतोय. काही जण तर सिरियस होते १० दिवस ऑक्सीजन वरही होते हे ऐकून तर मी मनोमन नमस्कार करून टाकला. आपल्या देशाला अतीउत्तम डाॅक्टर्स लाभणार ह्या मला तिळभरही शंका नाहीये. मी करोना योद्धा आहे का ? नाही मी करोना योद्ध्यांचा साक्षीदार आहे एका दिव्यत्वाची प्रचिती आलेला डाॅक्टर आहे .माझा खारीचा का होईना पण वाटा आहे हे आयुष्यभरासाठी पुरेल समाधान दोन आठवड्यात मिळवलंय. डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं ! सलाम दंडवत _/\_
  • Log in or register to post comments

छान

Gk
Sat, 09/12/2020 - 17:52 नवीन
छान
  • Log in or register to post comments

अवाक झालो ....

चौकटराजा
Sat, 09/12/2020 - 18:58 नवीन
पी पी ई किट सारखाच माझा रेनकोट आहे त्यात मी जस्तीत जास्त अर्धा तास राहू शकतो . त्यावरून तुम्ही लोक किती व कोणत्या अवस्थांमधून जाउ शकता याची कल्पना मला आहे. १९१८ ते २०१९ या काळात डॉक पेशन्टला विचारीत " तुम्ही कसे आहात ?" एबोला, स्वाईन फ्लू सार्स ई साथी येउन गेल्या पण गेल्या काही वर्षात जगात अर्थिक असमतोल इतका आहे व लोकान्ची हाव इतकी वाढली आहे त्यामूळे प्रत्येक सुशिक्शित घरातला एक तरी व्यक्ती परदेशी आहे अतः कोणतीही साथ आली तरी ती पॅन्डेमिकच असणार आहे ! आता " डॉक तुम्ही कसे आहात ? " अशी विचारणा सामान्य लोक करीत आहेत. करोना हा वृद्धाना गाठून मारतो ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट आहे.हे माझे वाक्य फारच विचित्र वाटेल पण ते वास्तवाला धरून आहे. ( मी ६७ वर्षाचा आहे ! ). विषाणू व मानव यान्च्या आर अन्ड डी ची लढाई सनातन आहे पण लहान झालेल्या जगाने तिचे स्वरूप कधी नव्हे इतके भेसूर करून टाकले आहे.
  • Log in or register to post comments

_/\_

रातराणी
Sun, 09/13/2020 - 04:38 नवीन
_/\_ फार कठीण परिस्थितीत काम करीत आहात डॉक! थ्री चियर्स अँड अ बिग हग =))
  • Log in or register to post comments

दण्डवत!

अन्या बुद्धे
Sun, 09/13/2020 - 08:27 नवीन
दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..
  • Log in or register to post comments

दण्डवत!

अन्या बुद्धे
Sun, 09/13/2020 - 08:27 नवीन
दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..
  • Log in or register to post comments

दंडवत साहेब तुम्हाला.

सनईचौघडा
Sun, 09/13/2020 - 09:30 नवीन
दंडवत साहेब तुम्हाला.
  • Log in or register to post comments

हॅट्स ऑफ तुम्हाला आणि सर्व

शलभ
Sun, 09/13/2020 - 16:20 नवीन
हॅट्स ऑफ तुम्हाला आणि सर्व कोविड योद्ध्यांना. _/\_
  • Log in or register to post comments

जबरदस्त अनुभवकथन आणी त्याग व

सिरुसेरि
Sun, 09/13/2020 - 20:17 नवीन
जबरदस्त अनुभवकथन आणी त्याग व कर्तव्य भावना . +१००
  • Log in or register to post comments

प्रथम डोळे पुसले.

शाम भागवत
Sun, 09/13/2020 - 20:41 नवीन
प्रथम डोळे पुसले. आता तुम्हां सर्वांना नमस्कार करतोय. _/\_
  • Log in or register to post comments

तुमच्या कार्याला सलाम!

कोहंसोहं१०
Sun, 09/13/2020 - 20:41 नवीन
तुमच्या कार्याला सलाम! धन्यवाद डॉक्टर.
  • Log in or register to post comments

धन्यवाद डॉक्टर

तुषार काळभोर
Sun, 09/13/2020 - 21:36 नवीन
एकीकडे खाजगी रुग्णालयातून व्हिटॅमिन च्या गोळ्या अन वाफ घेण्यासाठी लाखो रुपये आकारले जात असण्याच्या कथा कानावर येतात. अन् दुसरीकडे ' रुग्णांना तपासताना आपल्याला सुद्धा आज ना उद्या विषाणू ची लागण होणार आहे ' हे गृहीत धरून तपासणी चालू ठेवणारे डॉक्टर खरे आणि तुमचे अनुभव वाचनात येतात. खाजगी रुग्णालयांची माणुसकी अन विवेक जागृत होवो, अन सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या तुम्हा डॉक्टरांना आरोग्य अन दीर्घायु लाभो, ही प्रार्थना...
  • Log in or register to post comments

टोटल रिस्पेक्ट

फारएन्ड
Sun, 09/13/2020 - 23:18 नवीन
टोटल रिस्पेक्ट!
  • Log in or register to post comments

तुमच्या कर्तव्य तत्परतेला सलाम _/\_

चामुंडराय
Mon, 09/14/2020 - 00:09 नवीन
तुमच्या कर्तव्य तत्परतेला सलाम _/\_ हा खरंच एकमेवाद्वितीय अनुभव आहे. रच्याकने - आजकाल बाष्प शोषून घेणारे जॅकेट्स मिळतात (Thin polyester mesh liner wicks moisture to keep you comfortable) असे काही ह्या PPE किट्स बद्दल करता येणार नाही का?
  • Log in or register to post comments

_/\_

राघव
Mon, 09/14/2020 - 00:28 नवीन
काय बोलणार.. नि:शब्द.
  • Log in or register to post comments

सॅल्यूट डॉक्टर साहेब !!!

राघवेंद्र
Mon, 09/14/2020 - 02:17 नवीन
सॅल्यूट डॉक्टर साहेब !!!
  • Log in or register to post comments

सगळ्या

सुमो
Mon, 09/14/2020 - 04:57 नवीन
  • Log in or register to post comments

सगळ्या

सुमो
Mon, 09/14/2020 - 05:00 नवीन
कोविड योध्यांना आणि तुम्हाला दंडवत डॉ.श्रीहास. _/\_
  • Log in or register to post comments

ग्रेट!

निनाद
Mon, 09/14/2020 - 06:10 नवीन
तुमचा अनुभव आणि तुमचे विचार हे फार कौतुकास्पद आहेत.
  • Log in or register to post comments

शाबास...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 09/14/2020 - 11:00 नवीन
तुमच्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य लोकांविषयी तळमळ असलेल्या डॉक्टरांची समाजाला नेहमीच गरज असते सध्याच्या काळात तर ती फारच जास्त आहे. नेहमी प्रमाणेच प्रेरणादायी आणि प्रांजळ अनुभव कथन मनःपूर्वक धन्यवाद पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

सलाम

नीलस्वप्निल
Mon, 09/14/2020 - 13:01 नवीन
सलाम डॉक्टर साहेब !!
  • Log in or register to post comments

रिस्पेक्ट

चिर्कुट
Mon, 09/14/2020 - 13:05 नवीन
रिस्पेक्ट आणि सॅल्युट _/\_
  • Log in or register to post comments

तुम्हा सर्वांचे आभार _/\_

डॉ श्रीहास
Wed, 09/16/2020 - 08:02 नवीन
मी जे काही अनुभवलं आहे ते कधीही शब्दात मांडू शकणार नाहीये. हे सगळं थोडं थोडं करत लिहीत गेलो होतो कारण रोजच असं काही घडतांना दिसायचं की मती गुंग होईल पण त्याचवेळेस एक माणूस म्हणून , एक डाॅक्टर म्हणून खूप काही अनुभवत होतो. तुमच्या शुभेच्छा मी त्या सर्व लढवय्यांतर्फे स्विकारतो.एक सैनिक सिमेवर जे करतो तेच आम्ही सर्व frontline workers करत आहोत हे अतिशय अभिमानानी सांगतोय. तुम्हासर्वांचा लोभ असाच राहू द्या, ही गोष्ट खूप शक्ती देऊन जाते. पुनश्च धन्यवाद.
  • Log in or register to post comments

प्रेरणादायी अनुभव कथन

डीप डाईव्हर
Wed, 09/16/2020 - 11:10 नवीन
प्रेरणादायी अनुभव कथन 🙏
  • Log in or register to post comments

कौतुक करावे तितके कमी आहे डॉक.

MipaPremiYogesh
Wed, 09/16/2020 - 11:58 नवीन
कौतुक करावे तितके कमी आहे डॉक. पर्वा आम्ही झाड वाटप करायला गेलो होतो तेंव्हा एक मित्र म्हणाला कि आम्ही संघाचे लोकं एका स्लम वस्ती मध्ये पाहणी करण्यासाठी गेलो होतो. ppe किट घालून आणि २ तासांनी जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा शरीरातला सगळं घाम निघाला अक्षरशः अंघोळ झाली. खरंच तुम्हाला सलाम डॉ . हॅट्स ऑफ
  • Log in or register to post comments

निःशब्द!

मालविका
Wed, 09/23/2020 - 13:09 नवीन
निःशब्द! सुंदर अनुभवकथन! आणि सलाम तुमच्या कार्याला!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा