!जय श्री राम! - अखेर श्री. मोदींनी करुन दाखवलं
ढुशक्लेमरः- माझा भाजप पक्षाशी कोणाताही संबध नाही आणि मी मोदीभक्तही नाही. जे जे मनात आलं आणि आठवलं तसं तसं लिहत गेलो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज अयोध्येत पं.प्र. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.
हा त्यांचा सरकारा आल्यापासुनचा आणखीन एक धार्मिक स्ट्राईक म्हणा हवं तर.
जे काम गेले ७० वर्षे सरकार असुन कॉंग्रेसला जमले नाही ते काम श्री, मोदींनी करुन दाखवलं.
सरकार चालवत असताना देशाच्या कामासंबधी काही निर्णय घेणे आणि त्याच बरोबर त्याची लगेच त्वरेने अंमलबजावणी करणे या बाबतीत मला वाटते श्री. मोदी सर्व पंतप्रधानांमध्ये सरस ठरतात. अर्थात त्यांचे काही स्ट्राईक चुकले असतीलही. मिपावर त्यावरुन बरीच घमासान चर्चा झालेली आहे होते आहे.
पण काही स्ट्राईक आपण धडाडीचे काम म्हणु खुप चांगले परिणाम करणारे आहेत.
मला आठवत आहे ते जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा या आधी कोणाला सुचले नाही ते करुन दाखवलं.
या आधी एव्हढे प्रधान मंत्री होवुन गेले पण कोणाला आसेतु हिमाचल पर्यत असलेल्या शाळा शाळां मधुन शिकणार्या मुलांशी संवाद साधवा असं वाटलं नाही ते काम मोदींनी केले. हा त्यांचा पहिला स्ट्राईक.
मग नोटाबंदी आली मग उरीचा बदला म्हणुन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेला सर्जिकल स्ट्राईक.
मग बेकायदा परदेशी नागरिकांना देशाबाहेर घालवण्यासाठी घेतलेला निर्णय असो की टाळेबंदीच्या दरम्यान सर्व भारत देशवासीयांनी करोना लोकांच्या सेवेत झटणार्या लोकांसाठी केलेले आभार प्रदर्शन म्हणुन टाळ्या वाजवणे अथवा दीप प्रज्वलन करणे या साठी घेतलेला निर्णय असो.
मोदी नेहमीच कितीही वाद झाले तरी अंमलबजावणी करुन पुढे निघुन जातात.
आज इतक्या वर्षांची सर्व भारतीयांची मनोकामना मंदिर बांधण्याच्या शुभारंभाने पुर्ण होत आहे.
जर लोकांना खरोखरच श्री. मोदींनी उचलले पाऊल पसंत नसतं तर शेकडो हजारोंच्या संखेने स्वेच्छेने किलोच्या चांदीच्या वीटा आणि सोन्याची नाणी दान म्हणुन दिली गेली नसती.
हे मंदिर होणारच हे आमच्या ठाण्याच्या कै. श्री. आनंद दिघे यांना ही माहित होते आणि म्हणुन त्यांनी त्यांच्या हयातीतच सगळ्यात पहिले चांदीची वीट मंदिर संस्थेला दान केलेली होती.
!जय श्री राम!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाह
बाळासाहेबांबद्दल बोलत असाल तर
चिरंजीवांनी सगळे मुसळ केरात
चला मंदिर झालं ...
आपला राजकुमार
आपला राजकुमार
परदेशात वेस्टर्न कमोडवर बसून
परत कमोड.. अरेरे
जशी प्रतिक्रियेची लायकी
मशिदी साठी दिलेली ५ एकर
आज अतिशय आनंदाचा दिवस आहे.
चिऊसैनिक
पाडली असेल तर अभिमान आहे असे
बाकी सगळे "आम्ही नाही त्यात"
याचे कारण श्री अडवाणी
पळवाट नसावी माझ्या मते
आपण शिवसैनिकांना पाठवले होते
.
जि के,
मी तुम्हास जेवण पाठवले नाही,
खरं ते सांगितलं
रामो राजमणि: सदा विजयते रामं
.
.
हॉस्पिटल
अरे जी के तुझे जी. के. खरंच
कुणी मनातून कुणी हातातून,
मंदिरे आणि मराठे
गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या
प्रस्तावनेची गरज नव्हती..
छान
राजीव गांधींचे?
शाहबानो प्रकरणात ठेच
राजीव गांधींनी
.
पण नंतर न्यायालयाने ती
राजीव गांधींचे नक्कीच अभिनंदन
त्याचबरोबर त्या नररत्नाचे
हं
गेलाबाजार पुरोगाम्यांचे
बाबराचे पण आभार माना.
इतिहासाच्या घटना
आज दिवसभर मनाची एखादा सण
.
इतके सैरभैर का होताय भौ!
मी देखील आजच्या या
_/\_ _/\_जय श्रीराम_/\__/\_
आज खरोखरीच आनंदाचा क्षण आहे.
आक्षेप
राम सजीव आहे तर