लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ढुशक्लेमरः- माझा भाजप पक्षाशी कोणाताही संबध नाही आणि मी मोदीभक्तही नाही. जे जे मनात आलं आणि आठवलं तसं तसं लिहत गेलो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज अयोध्येत पं.प्र. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.
हा त्यांचा सरकारा आल्यापासुनचा आणखीन एक धार्मिक स्ट्राईक म्हणा हवं तर.
जे काम गेले ७० वर्षे सरकार असुन कॉंग्रेसला जमले नाही ते काम श्री, मोदींनी करुन दाखवलं.
सरकार चालवत असताना देशाच्या कामासंबधी काही निर्णय घेणे आणि त्याच बरोबर त्याची लगेच त्वरेने अंमलबजावणी करणे या बाबतीत मला वाटते श्री. मोदी सर्व पंतप्रधानांमध्ये सरस ठरतात. अर्थात त्यांचे काही स्ट्राईक चुकले असतीलही. मिपावर त्यावरुन बरीच घमासान चर्चा झालेली आहे होते आहे.
पण काही स्ट्राईक आपण धडाडीचे काम म्हणु खुप चांगले परिणाम करणारे आहेत.
मला आठवत आहे ते जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा या आधी कोणाला सुचले नाही ते करुन दाखवलं.
या आधी एव्हढे प्रधान मंत्री होवुन गेले पण कोणाला आसेतु हिमाचल पर्यत असलेल्या शाळा शाळां मधुन शिकणार्या मुलांशी संवाद साधवा असं वाटलं नाही ते काम मोदींनी केले. हा त्यांचा पहिला स्ट्राईक.
मग नोटाबंदी आली मग उरीचा बदला म्हणुन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केलेला सर्जिकल स्ट्राईक.
मग बेकायदा परदेशी नागरिकांना देशाबाहेर घालवण्यासाठी घेतलेला निर्णय असो की टाळेबंदीच्या दरम्यान सर्व भारत देशवासीयांनी करोना लोकांच्या सेवेत झटणार्या लोकांसाठी केलेले आभार प्रदर्शन म्हणुन टाळ्या वाजवणे अथवा दीप प्रज्वलन करणे या साठी घेतलेला निर्णय असो.
मोदी नेहमीच कितीही वाद झाले तरी अंमलबजावणी करुन पुढे निघुन जातात.
आज इतक्या वर्षांची सर्व भारतीयांची मनोकामना मंदिर बांधण्याच्या शुभारंभाने पुर्ण होत आहे.
जर लोकांना खरोखरच श्री. मोदींनी उचलले पाऊल पसंत नसतं तर शेकडो हजारोंच्या संखेने स्वेच्छेने किलोच्या चांदीच्या वीटा आणि सोन्याची नाणी दान म्हणुन दिली गेली नसती.
हे मंदिर होणारच हे आमच्या ठाण्याच्या कै. श्री. आनंद दिघे यांना ही माहित होते आणि म्हणुन त्यांनी त्यांच्या हयातीतच सगळ्यात पहिले चांदीची वीट मंदिर संस्थेला दान केलेली होती.
!जय श्री राम!
प्रतिक्रिया
बाळासाहेबांबद्दल बोलत असाल तर त्यांच्या चिरंजीवांनी आणि नातवाने सगळे मुसळ केरात टाकलय.
आमंत्रण मागात फिरायचे. आणि मिळाले की जाणार नाही म्हणायचे ( बारामतीच्या काकांच्या धाकामुळे).
इकडे राउताने रडायचे आणि तिकडे यांनी खडे फोडायचे.
( मुख्यमंत्री साहेब बहुतेक शीबीआय चौकशीत काय बोलायचे याची प्रॅक्टीस करत असावेत)
चिरंजीवांनी सगळे मुसळ केरात टाकलय.
१००%
बारामतीच्या काकांच्या धाकामुळे ! ... लै हस्लो
चला मंदिर झालं ...
आतातरी पायभूत सुविधा, अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या ..
पायभूत सुविधा, !
थांबा अजून काही वर्ष,, आपला राजकुमार गादीवर येईल आणि एक झटक्यात जादूची कांडी चालवून सुविधा सरळ करतील ना...
तो पर्यंत बर्नाल जवळ असुद्या ...पप्पू गादीवर येईपर्यंत अजून एक दोन झटके बसतील बहुतेक..
पायभूत सुविधा, !
थांबा अजून काही वर्ष,, आपला राजकुमार गादीवर येईल आणि एक झटक्यात जादूची कांडी चालवून सुविधा सरळ करतील ना...
तो पर्यंत बर्नाल जवळ असुद्या ...पप्पू गादीवर येईपर्यंत अजून एक दोन झटके बसतील बहुतेक..
परदेशात वेस्टर्न कमोडवर बसून वर्षानुवर्षे एकाहाताने टिशशू पेपर रगडत बसून , दुसऱ्या हाताने मोबाईलवरून भारतीयांना अक्कल शिकवू नये. शिवाय पप्पूला पण तुमच्या सोबत घेऊन जावे.
परत कमोड.. अरेरे
जशी प्रतिक्रियेची लायकी त्यानुसार "कमोड" देतो आम्ही...
मशिदी साठी दिलेली ५ एकर देशासाठी दिली तर अर्थव्यवस्थेला हातभारच लागेल
आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. सर्वांनी जरूर गोडधोड खाऊन हा दिवस साजरा करावा. ज्या साऱ्यांनी कष्ट घेतले त्या सगळ्यांचे अभिनंदन !
आता काशी मथुरा इथल्या मंदिरांचे कायदेशीर पुनर्स्थापन करण्याकडे लक्ष द्यावे. २६/११ चा बदला अजून बाकी आहे. फोंड्यातल्या मशिदीला सुद्धा कायदेशीर पुनर्निर्माणाची गरज आहेच. हे सगळं करायला मोदी आणि कंपनीचीच गरज आहे.
देर्देकर साहेब,
ढुशक्लेमर टाकायची काही गरज नव्हती. दुसऱ्यांच्या दु:खात आनंद मानणारा आपला हिंदू धर्म नाही. अर्थात ज्यांच्या बुडाला आग लागली आहे त्यांच्या दु:खाला आता पारावार राहिला नाही आणि आपण ते दूर करायचा प्रयास करण्याची काहीच गरज नाही. आजचे अग्रलेख पाहिलेत तरी कल्पना येईल. एकतर्फी निर्णयाने हा सोहळा चालू आहे वगैरे दिवे डावरे नक्षली कुबेरांनी पाजळले आहेतच. काही वाकड्या तोंडाच्या लोकांनी जमेल तेवढा काड्याघालू पाचकळपणा करायचा प्रयत्न नेहमीप्रमाणे केलाच. असो. समाजकंटकांकडे दुर्लक्ष करावे.
रावण सीतेला पळवून नेत असताना चिऊसैनिकांनी त्यांना अडवायचा प्रयत्न केला होता ; ब्रिज बांधायला माकडे पण आम्हीच पुरवली होती ई. ई. असंही म्हणायला काही लोक कमी करायचे नाहीत. श्रेय उपटायला हे लोक काहीही करतील. आपण मज्जा बघावी.
तुमचे वय माहिती नाही पण त्याकाळी जाणत्या असणाऱ्या लोकांना विचारा, बाकी सगळे "आम्ही नाही त्यात" म्हणत असताना फक्त ठाकरे च होते ज्यांनी होय आम्ही पाडली म्हणाले
पाडली असेल तर अभिमान आहे असे म्हणाले होते. आम्ही पाडली असे नाही.
बाकी सगळे "आम्ही नाही त्यात" म्हणत असताना फक्त ठाकरे च होते ज्यांनी होय आम्ही पाडली म्हणालेठाकरे यांनी थेट आम्ही पाडली असे न म्हणता ' पाडणारात शिवसैनीक असतील तर त्यांचा मला अभिमान वाटेल असा नरो वा कुंजरोवा पावित्रा घेतला होता. त्या बोलण्याचा विपर्यास केलाय लोकांनी आणि अर्थातच सेना त्याचे श्रेय परस्पर घेतेय
याचे कारण श्री अडवाणी यांच्यावर खटला भरला तसा आपल्यावर येऊ नये म्हणून हि पळवाट शोधली.
त्यांना स्पष्ट विचारले होते कि आपण शिवसैनिकांना पाठवले होते का? त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले होते.
हि मुलाखत मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली होती.
अर्थात मशीद पाडल्याचा आपल्याला आनंद झाला एवढे मात्र ते स्पष्टपणे म्हणाले हि सुद्धा वस्तुस्थिती आहे.
त्यांनी उगाच सर्वधर्म समभाव, फुरोगामी पणा वगैरे दाखवला नाही
खरे डॉक्टर,
माझ्या मते वादग्रस्त वास्तू पाडणं नियोजित नसून उत्स्फूर्त होतं. त्यामुळे बाळासाहेबच काय कोणीही असा दावा करू शकंत नाही की मी माणसं पाठवलेली.
आ.न.,
-गा.पै.
आपण शिवसैनिकांना पाठवले होते का? त्यावर त्यांनी नाही असे उत्तर दिले होते.
मी तुम्हास जेवण पाठवले नाही,
म्हणजे तुम्ही उपाशी आहात , असे ठरवायचे का ?
जि के,
मुळात हि वेळ का आली ( जमावाने मशीद पडण्याची) याचा विचार केलाय कधी?
स्वान्त्र्यापासून "सर्वधर्मसमभाव " या शब्दाचा बरोबर उलट अर्थ काँग्रेस ने राबवला
(मुस्लिम आक्रमकांनी सत्ता स्थापन करताना स्थानिक धर्म कसा नेस्तनाबूत करता येईल हे पहिले .. हा इतिहास पण जणू घडलाच नाही !)
अल्पकसंख्याकांचे "टोकाचे" लांगुनचालन केले
आणि केवळ म्हणून आज लोक :"काँग्रेस इतर " पर्याय स्वीकारू लागले ते सुद्धा लोकशाही मार्गाने . तरी तुम्ही मात्त्र फक्त विरोध आणि असले फुकाचे वाद घालत राहा...
मंदिर झाले त्याने काही देशाचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत... हे भाजपसमर्थकांना हि कळते
बरं अजून एक सांगा.. असे सक्तीचे प्रार्थनास्थळ बदलणे जर तुम्हाला आक्षेपार्थ वाटते ना तर मग "हया सोफिया" चे परत सक्तीने मशिदीत रूपांतर केले तेव्हा ख्रिस्ती लोकांनां दुख्ख वाटले तेव्हा त्यांना साथ दिलीत का? तेव्हा मूग गिळून गप्प.. ( आणि वरती हि मखलाशी करू नका " कि हा भारताचा प्रश्न नाही!")
मी तुम्हास जेवण पाठवले नाही,
म्हणजे तुम्ही उपाशी आहात , असे ठरवायचे का ?
ठरवा कि
तुम्ही मुखत्यार आहात.
त्यात काय अयोध्येत पूर्वेकडच्या मक्का आणि काबा पण आहे म्हणा कि.
फक्त उघड पणे असं (मक्का आणि काबा) म्हणून नका. नाही तर सैतान म्हणून तुम्हाला दगड पण मारतील.
))=((
खरे डॉक्टर,
अगदी बरोबर. जे खरंय ते सांगितलं.
आ.न.,
-गा.पै.
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोSस्म्यहम् ।
रामे चित्तलय: सदा भवतु मे भो राम मामुद्धर ।।
या आधी एव्हढे प्रधान मंत्री होवुन गेले पण कोणाला आसेतु हिमाचल पर्यत असलेल्या शाळा शाळां मधुन शिकणार्या मुलांशी संवाद साधवा असं वाटलं नाही ते काम मोदींनी केले. हा त्यांचा पहिला स्ट्राईक.
हं
त्या काळात शाळेत गल्लीत टीव्ही , स्क्रीन , इंटरनेट होते का ?
बाबरी कमिटीला पाच एकर दिलेत म्हणे , त्याचे काय झाले ?
सर्व जात आणि धर्म यांनी आपल्या मधले देहभाव विसरुन आणि राम मंदिर सिद्ध झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ एकत्र येऊन या पाच एकर जागेवर सर्व धर्मांच्या एकतेचे प्रतीक असलेली एखादी हॉस्पिटलची मोठी वास्तू बांधावी
अरे जी के तुझे जी. के. खरंच कमी आहे काय रे?
बाकी सगळं न्हवतं पण रेडियो तर होता ना. त्या द्वारे तरी संवाद साधता आला असता ना?
कुणी मनातून कुणी हातातून, धनातून पाठिंबा दिला त्या सगळ्यांनाच श्रेय देतो.
बाकी मोदींनी त्यांच्या पद्धतीने खुर्चीत बसून संसदीय आणि न्यायालयाच्या मदतीने काम केलं हे नाकारता येत नाही. पूर्वी याच गोष्टी तरवारीच्या धारेवर केल्या गेल्या आहेत. पण आताचा काळ लोकशाहीचा.
यावरून आठवलं. मध्य प्रदेशच्या झाशी, उज्जैन, इंदोरमध्ये फिरताना होळकर आणि शिंदे यांनी प्रांताला गतवैभव प्राप्त करून दिलं याची त्यांना मनोमन जाण आहे.
अहिल्याबाईंनी तर सोमनाथ, काशिविश्वेश्वरासह कित्येक मंदिरे परत उभारली.
नाशिकचे त्र्यंबकेश्वर जे मुसलमानांनी बटवले होते ते पेशव्यांनी परत बांधले. प्रेम मंदिर ज्याची मशीद झालेली होती ते पुन्हा ताब्यात मिळण्यामध्ये पेशव्यांचे सरदार फडके आणि सरदार नारोशंकर यांचे मोठे कर्तृत्व होते. तसेच उज्जैन चा महाकाल हादेखील मशिदीत परावर्तित झालेला होता जो शिंदे यांचे सरदार सुखटणकर यांनी हस्तगत केला आणि आणि मंदिराची मशिद करण्यासाठी जे बांधकाम होते ते काढून पूर्वीचे मंदिर मोकळे केले.
गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या म्हणण्यानुसार अहिल्यादेवींनी केलेल्या या आणि अशा अनेक "धर्म' कार्यामुळेच यांना "देवि" ही उपाधी प्राप्त झाली
प्रस्तावनेची गरज नव्हती..
राम मंदिर निर्माणाला मनापासुन शुभेच्छा..
आजचा दिवस खासच
...
वयक्तिक मत -
लालकृष्ण अडवाणी यांना बोलवायला पाहिजे होते..
अभिनंदन
राजीव गांधी , बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचेही अभिनंदन
बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचेही ( जुन्या ) अभिनंदन मान्य , पण राजीव गांधींचे?
शाहबानो प्रकरणात ठेच पोचल्यावर हिंदूंना सांभाळण्यासाठी राजीव गांधींनी शिलान्यासाला परवानगी दिली होती
हे माहित नवहते... आणि असेल तसे ,, पण म्हणजे हा जुलमाचा रामराम होता ( नो पन इंटेंडेड !)
एक वेळ नसती दिली परवानगी तरीचालले असते,, (न्यायालयीन प्रयतन चालूच राहिले असते ) ..राजीव गांधींनी शहाबानो प्रकरणी जे देशातील महिलांचे नुकसान केल ते जास्त धोकादायक होतं
राजीव गांधींनी वादग्रस्त इमारतीचे कुलूप काढले व हिंदूंना पूजा करण्यास परवानगी दिली, शिलान्यासही केला होता
https://youtu.be/tsOpzH38oN4
गेल्या आठवड्यात भाजपाचे सुब्रमण्यम स्वामीही हेच बोलले
पण नंतर न्यायालयाने ती परवानगी रद्द केली होती
राजीव गांधींचे नक्कीच अभिनंदन करायला पाहिजे.
कारण त्यांनी जन्माला घातलेल्या नररत्नाच्या कृपेनेच भाजप ला दुसऱ्यांदा प्रचंड बहुमताने सतत मिळाली आहे.
त्यांच्या इतका भाजपचा स्टार प्रचारक दुसरा नसेल.
तेंव्हा त्यांचे आभार मानलेच पाहिजेत.
त्याचबरोबर त्या नररत्नाचे देखील आभार मानायला पाहिजेत.. कि त्याने अजुन एखाद्या नर रत्नाला जन्माला घातले नाहीये.. या भूमीवर उपकार अनंत उपकार केलेत. Thank you.
BTW,
ज्यांच्या रक्तातच गांधी आडनावाची हुजरेगिरी करायची सवय भिनलीये फक्त त्यांच्यासाठी एखादया वद्रा राजपुत्रालाच गांधी म्हणून प्रोजेक्ट करतील.. असे वाटते.
शहाचे पोर्गे क्रिकेट बोर्डात घातले आणि करोना येऊन क्रिकेट बंदच पडले
पनवती शहा
ह्याच्यापेक्षा नेहरू गांधी परवडले
गेलाबाजार पुरोगाम्यांचे सध्याचे दैवत श्री रावण, कुंभकर्ण, शूर्पणखा, मेघनाद, इंद्रजित यांचे अभिनंदन त्यांना का सोडा
उगाच त्यांना वाईट वाटायला नको.
बाबराचे पण आभार माना.
त्याने तेथे मशीद बांधली नसती तर ती पाडण्याची वेळच आली नसती. आणि मशीद पाडली गेली नसती तर त्याजागी मंदीराचा शिलान्यास करायचीही वेळ आली नसती
इतिहासाच्या घटना
-------------
पुन्हा मुळ लेख वाचला...
वरती मी रिप्लाय दिला होताच आजचा दिवस खास, आणि त्यात प्रस्तावना देण्याची गरज नव्हती..
पुन्हा लेख वाचताना लक्षात आले, की मंदिर, श्री राम या पेक्षा ही मोदींनी करून दाखवले हे जास्त सांगण्यात आले..
मी त्यांचा जाहीर विरोधक आहे.. आपल्याला नाटकी माणसे आवडत नाहीत.. पण तीन तलाख, काश्मिर आणि राम मंदिर या मुद्द्यावर मला आताचे सरकार योग्य वाटते..
मात्र मूळ लेखात लिहिलेले, नोटबंदी, अर्थव्यवस्था ह्या एकदम फसलेल्या गोष्टी. अत्यंत चूकीच्या पद्धतीने हाताळल्या..
याखेरीज सामाजिक ऐक्य बिघडवण्यात हि या सरकारचा जास्त हात आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.. आणि सोशल वार यांचीच निर्मिती आहे..
याचा अर्थ असा नाही मी की आधीच्या काँग्रेस सरकारला माझा पुर्ण पाठींबा किंवा अंध भक्ती होती, त्यांच्या हि बऱ्याच भ्रष्ट गोष्टींना माझा कायम विरोध होता..
हे सांगण्याचे कारण की तेंव्हा विरोधात बोलले तरी कोणी मनावर घेत नव्हते, जे बरोबर ते बरोबर असे होते, आता चूक असो वा बरोबर मोदीच अंतिम सत्य आहेत, नाहीतर तुमच्यावर शाब्दिक हल्ले, देशविरोधी इतकेच काय तुम्ही हिंदू विरोधी असे हि बोलले जाते..
माझ्या वयक्तिक मताने.. बाबर हा बाहेरून आलेला मुस्लिम होता, आणि नंतर बांधलेल्या मशिदी ह्या बऱ्याचदा मंदिर तोडून बांधलेल्याच होत्या.. हे माझे वयक्तिक मत आहे, त्यामुळे एक हिंदू भावनिक किणार या मंदिर प्रकरणाला होती..
असो..
तरीही भाजपा सरकार मुळेच ह्या मंदिराच्या बाजूने निकाल लागला हि सत्य परिस्थिती आहे..
या हि पुढे जाऊन, राम मंदिर प्रेम की राजकारण ह्यात नक्कीच अंतर असेल असे माझे साधे मन म्हणत आहे..
बाकी लेख हा पुर्ण इतिहासात्मक किंवा राममंदिर किंवा रामावर आधारित हवा होता.. पण
येथे हि पुन्हा मोदीच श्रेष्ठ हे ठसवण्यात आल्या सारखे लिहिलेले आहे..
असो प्रत्येकाचे मत वेगळे असते.. त्याचा आदर आहेच..
असो जास्त बोलत नाही... एक लिंक सापडली त्रिपाठी यांनी लिहिलेली ती पहिल्या लाईनीत दिली आहे.
तोच इतिहास असा माझा दावा नाही, पण त्यात घटना व्यवस्थित दिल्या आहेत, काय काय झाले बाबर नंतर..
बघा वाचून आणि अभिप्राय सांगा.. काय खरे काय खोटे माहित नाहि..
आज दिवसभर मनाची एखादा सण असावा तशी उत्सवी अवस्था होती.
(मी कट्टर मोदी समर्थक नाही आहे पण मोदींना पर्याय म्हणुन ओवेसी,रागा आणि उठा शपा ह्यांच्याकडे पाहायची हिंमत होत नाही.)
मोदी नव्हते तेंव्हा देश चालत नव्हता का ?
मोदी नाहीत म्हणून जसोदाबेन उपाशी राहिली का ?
ते स्वतःच बोलतात , मी झोला घेऊन जाईन तुम्ही आत्मनिर्भर व्हा
मोदींशीवाय कोण आहे का ? असे विचारणारे मूर्ख आहेत , मोदी स्वतः बोलतात , आत्मनिर्भर व्हा , आणि हे मोदी मोदी करत नाचतात, मोदींचा वैचारिक पराभव त्यांचे भक्तच करतात
इतके सैरभैर का होताय भौ!
तुमचे बरोबर आहे. मोंदीचा पराभव त्यांचे भक्त करतात आणि मोंदीना मोठे त्यांचा पराकोटीचा द्वेष करणारे नमोरुग्ण करतात.
मी देखील आजच्या या सुवर्णक्षणाचा संबंध कोणत्याही राजकारणाशी लावू इच्छित नाही.पण ही खुप मोठी प्रक्रिया होती.आधी बाबरच आक्रमण, इंग्रजांची दुफळी, हिंदूंची घुसमट, वैज्ञानिक रीतीने सिद्ध होऊनही न्यायालयाची २ पिढ्यांची लढाई.आणि शेवटी रामलल्लाचा आज ५०० वर्षांपासूनचा वनवास संपणे. ज्यांच्यामुळे घडलं त्यांच कौतुक .
आज खरच सोनियाचा दिनु आहे.
याच साठी केला होता अट्टहास... हिच अनेकांची भावना असेल आज.
अवांतरः
टेक्नीकली हा मंदीर-मशीद वाद न्यायालयाने सोडवला आहे. त्यामुळे कोण्या एका माणसाला/संघटनेला श्रेय देता येत नाहि.
पण.. गोष्टी खरच इतक्या सरळ असतात का? तसं वाटत नाहि. संवेदनशील प्रकरणांत सरकार आणि न्याययंत्रणेत काहि ना काहि अंडरस्टँडींग नक्कीच असेल.
पुरातत्व विभागाने आपले अहवाल नि:संदीग्धपणे मंदीराच्या बाजुने दिले. सरकार पातळीवर अभय नसतं तर त्यात फेरफार झाले नसते काय? सांगता येत नाहि. उदारणार्थ, लालुंनी स्थापन केलेल्या समितीने गोध्रा रेल्वे जळीतकांड एक अपघात होता म्हणुन निर्णय दिला होता.
शेवटच्या चरणात न्यायीक प्रक्रीयेची रोज सुनावणी होणे, इतर कुठल्याच पक्षाला/पिटीशनला एका विशिष्ट तारखेनंतर त्या प्रकरणी ढवळाढवळ न करु देणे, सगळ्या संबंधीत पार्ट्यांना स्ट्रीमलाईन करायला आवष्यक तिथे नोकरशाहीचा वापर करणे... हे सर्व भाजपाची केंद्रात आणि राज्यात स्वबळावर सत्ता नसताना झालं असतं काय? शंकाच आहे. भाजपचे सरकार असुन देखील मोदि पं.प्र. नसते तर हे घडलच नसतं का? सांगता येत नाहि. शक्यतो इतर कुठल्याही भाजप पं.प्र. ने हे प्रकरण तडीस नेलच असतं... मोदिंच्या बाबतीत मात्र हि गॅरेण्टी अगदी १००% होती.
कोरोना प्रकरण नसतं तर सिनियर भाजपेयी नेत्यांचा आणि इतर मान्यवरांचा सोहळा सहभाग असताच असता. निदान अडवाणी, जोशी मंडळी तरी नक्की आली असती. मोहन भागवतांनी तसाही अडवाणींचा उल्लेख केला आपल्या भाषणात.
रामनामाचा आनंद भोगण्याचा दिवस आहे. उगाच खुसपटी काढुन आपल्याच आनंदात विरजण पाडुन घेऊ नये.
_/\_ जय श्री राम _/\_
आज खरोखरीच आनंदाचा क्षण आहे. राम मंदिर व्हावे ही इच्छा बाळगणार्या सर्वांनाच आज आनंद झाला आहे. वर उल्लेख केलेल्या प्रमाणे काही व्यक्तींना राम मंदीर प्रकरणी मोदींचे योगदान कमी व नगण्य वाटते मात्र देशभर डाव्यांनी, महाराष्ट्राच्या जा.रा. इत्यादींनी पंतप्रधानांनी धार्मिक कार्यक्रमास हजेरी लावू नये, धर्मनिरपेक्षता जपावी अशा जो लकडा लावला होता त्यास न जुमानता ह्या कार्यक्रमास हजेरी लावली तेच माझ्यामते सर्वश्रेष्ठ योगदान आहे.
राम मंदिराची अजून एक लढाई साता समुद्रापार न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर देखील लढली गेली. न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरला राम मंदिराचा फोटो झळकला.काही मुस्लिम संघटनांनी यावर आक्षेप घेतला होता मात्र त्यांच्या विरोधास योग्य ती जागा दाखविली गेली.
कलम ३७० हटविणे, राम मंदिर बांधणे हे आपल्या वचननाम्यातील दोन महत्वाचे वायदे पुर्ण केल्यामुळे माझे पुढील लोकसभेचे मत भाजपालाच. मग पंतप्रधान पदाचा उमेदवार कोणी का असेना.
काही मुस्लिम संघटनांनी यावर आक्षेप घेतला होतासजीव माणसाचे चित्र हे हराम आहे.
माझा_डूआइडी,
राम सजीव आहे तर! प्रगती आहे एकंदरीत.
आ.न.,
-गा.पै.
वाह