Skip to main content

वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 21/06/2020 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाची सर जशी बरसून गेली वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली! गुणगुणत होतीस का तू गझल माझी? एक कोकीळा इथे गावून गेली! नभ-नभाला देत होते आज टाळी वीज अवकाशातुनी चमकून गेली! आज पदरावर तुझ्या सजवू म्हणालो, रात सारे चांदणे उचलून गेली! गारव्याने भाव रोमांचीत झाले, आठवांची गोधडी उसवून गेली! —सत्यजित
लेखनविषय:

वाचने 10884
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

In reply to by प्रमोद देर्देकर

कविदास म्हणा सर हवं तर,कवीश्वर वगैरे काही नाही हो मी. भरभरुन दाद दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

In reply to by प्राची अश्विनी

'गज़ल'चा अर्थच 'बातचीत करणे'. गज़ल वाचताना अनेकदा,शब्द कवीस अपेक्षित असतील तसेच्या तसे आपणास ध्वनीत होतातच असे नाही! मला अपेक्षित असल्याप्रमाणेच आपण तो वाचला आहे! आपल्यातील रसिकास अभिवादन!