पावसाची सर जशी बरसून गेली
वाटले की ती,अशी...जवळूृृृऽन गेली!
गुणगुणत होतीस का तू गझल माझी?
एक कोकीळा इथे गावून गेली!
नभ-नभाला देत होते आज टाळी
वीज अवकाशातुनी चमकून गेली!
आज पदरावर तुझ्या सजवू म्हणालो,
रात सारे चांदणे उचलून गेली!
गारव्याने भाव रोमांचीत झाले,
आठवांची गोधडी उसवून गेली!
—सत्यजित
वाचने
10840
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहा! क्या बात!
वा कविश्वर वा मस्त कविता.
कविदास...
In reply to वा कविश्वर वा मस्त कविता. by प्रमोद देर्देकर
सुरेख !!!
_/\_
रच्याकने, तो "जवळूsन" भारीच्च
In reply to _/\_ by सत्यजित...
अशी दाद ही विरळाच! खूप धन्यवाद!
In reply to रच्याकने, तो "जवळूsन" भारीच्च by प्राची अश्विनी
सुरेख!!
धन्यवाद!
In reply to सुरेख!! by रातराणी
मस्तच ! नेहमीप्रमाणे...
धन्यवाद!
In reply to मस्तच ! नेहमीप्रमाणे... by सस्नेह
सुरेख!!
छान !
धन्यवाद!