Skip to main content

देवाचं नांव कुणी ठेवलं ?

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 16/06/2020 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
देवाचं नांव कुणी ठेवलं ? या एका प्रष्णासरशी देवाच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो. तुमचं जीवन निर्भार होतं; सुरुवातीला थोडी धाकधूक वाटते, पण अवलंबित्व हाच भीतीचा आधार आहे, एकदा निरावलंब झालो की सगळी भीती संपली ! कुठली पूजा-अर्चा नाही; कसलं नामस्मरण नाही, कोणताही जप नाही, कुठलंही व्रतवैकल्य नाही. कुठल्याही कुलदैवताला जाण्याचा त्रास नाही, कोणतंही तिर्थाटन नाही, की निर्बुद्ध परिक्रमा नाही. कोणतीही अपवित्रता नाही, सोवळं-ओवळं नाही, कसले विधी नाहीत, कुठे डोकं टेकायला नको, की शेवटी पुजार्‍याचं धन होणारी दानपेटी नाही. कुठे दिवे लावायला नको, धूप जाळायला नको, कोणतेही यज्ञ-याग नाही. कुठले नवस बोलायला नको की फेडायला नको, कोणत्याही समस्येला वस्तुनिष्ठपणे आणि वैज्ञानिकदृष्टीनं, निर्भिडपणे सामोरं जायला आपण सज्ज. घरातल्या सगळ्या भींती क्लिअर, सगळे कोपरे स्वच्छ; सगळे ग्रंथ, पोथ्या, चरित्र रद्दीत, बुकशेल्फ निम्मी रिकामी. स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि निर्बुद्धपणावर खर्च न झाल्यानं वाचलेला, तुमच्या कष्टाचा पैसा ! आणखी काय हवं आयुष्य मोकळं व्हायला ? _____________________________________ देवाचं नांव कुणी ठेवलं ? इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर ! प्रष्ण सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला; आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं ! कुठल्या गुरुकडे जायला नको, 'मी कोण' असं स्वतःलाच विचारुन, स्वतःचा छळ नाही, आणि चेहेर्‍यावर कायम प्रष्णचिन्ह घेऊन करायचा वेडगळ शोध नाही. वर्षानुवर्ष करायची नामसाधना नाही, जरा लक्ष विचलीत झालं की भंगणारा जप नाही, की भ्रमिष्टावस्थेत नेणारा अजपा नाही. एका प्रष्णात काम तमाम ! _____________________________ एक गोष्ट मात्र नक्की, स्वतःला बावळट समजायचं नाही ! इतकी वर्ष काय झक मारलीस का ? या मनाच्या उपहासाला, एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं. मग मेलेल्याला जीवंत करणारे तुमचा पिच्छा सोडतील, पोट दुखायला लागल्यावर तुम्ही कालीचा धावा करण्याऐवजी सरळ डॉक्टरकडे जाल, वाघावर बसून आकाशमार्गे येणार्‍यांच्या आणि भींत चालवणार्‍यांच्या सिद्धींपेक्षा; तुमचं आयुष्य सहज आणि सुलभ करणार्‍या वाहनांचे शोध लावणारे शास्त्रज्ञ, तुम्हाला जवळचे वाटतील. पाण्यात दिवे पेटवणार्‍यांऐवजी, रात्रंदिवस खपून आपल्याला अखंड विजपुरवठा करणार्‍या कामगारांप्रती, तुमचा मैत्रभाव जागेल. चमत्कार, सिद्धी, असामान्यत्व असल्या भाकड कल्पनांमुळे, आपण त्यांच्यापुढे छपरी, हा नाहक खोल गेलेला न्यूनगंड संपेल. एक सामान्य, वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय, संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी, अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला, साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही निर्भ्रांत जगायला लागाल ! अगदी आजपासून !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 92127
प्रतिक्रिया 379

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगेन म्हणतो. १.
योगा म्हणजे गेटींग कनेक्टेड टू वनसेल्फ !
बरोबर. आसनं व प्राणायाम ही योगाची पहिली पायरी आहे. काही लोकांना या पहिल्या पायरीच्या पुढे जाण्यात रस नाही. म्हणून आसनं व प्राणायाम निरुपयोगी ठरतात का? मग काही लोकांना स्वत:शी कनेक्ट होण्यासाठी देवाची मदत लागंत असेल तर देव भ्रामक कसा काय? जितका योग भ्रामक व सत्य आहे, तितकाच देव ही भ्रामक किंवा सत्य आहे ना? २.
अर्थात ! आत्मा निराधारच आहे. आणि आपणच आत्मा आहोत. त्यामुळे आपण सर्वव्यापी आणि अभंग आहोत, आपलं स्वतःपासून विभाजन असंभव आहे. हे भ्रामक विभाजन संपवण्याचा मार्ग म्हणजे योगा !
आपण स्वत: जर सर्वव्यापी आणि अभंग आहोत, तर मग योग हा देखील भ्रामकच ठरतो. तसाच देव हा ही भ्रामक ठरला तर काय बिघडलं? ३.
एकदा आपणच सत्य आहोत हा उलगडा झाला, की आपल्याला स्वतःची इंद्रियांमार्फत होणारी, भ्रामक जाणीव संपते.
एकदम मान्य. पण ज्या लोकांना हा उलगडा झाला नाहीये त्यांनी काय करायचं? माया ही अशी आश्चर्यजनक नदी आहे की ती ओलांडल्यावर मागे वळून पाहता नाहीशी होते. तुम्ही मायानदी ओलांडली आहे हे मान्य. पण माझ्यासारख्या ज्यांनी ती ओलांडली नाहीये, त्यांचं काय? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

> हे मान्य. पण माझ्यासारख्या ज्यांनी ती ओलांडली नाहीये, त्यांचं काय? तो एवढा काही मोठा लफडा नाही. सरळ समोर बघितलं की स्वच्छ स्वरुप दिसतं. कशाला पाहिजेत त्या प्रतिमा आणि पूजा अर्चा ? एकदा टाइमपास सुरु केला की त्याला अंत नाही, आणि एकदा कत्पना कवटाळली की तोच आधार ! मग भ्रमाला अंत नाही. त्यापेक्षा सरळ समोर बघा, हुकलात, काही गोंधळ होतोयं असं वाटलं, परत शांतपणे समोर बघा एकदा निराकाराशी संलग्नता जमली की कोणताही आधार लागत नाही.

In reply to by गामा पैलवान

> हे मान्य. पण माझ्यासारख्या ज्यांनी ती ओलांडली नाहीये, त्यांचं काय? तो एवढा काही मोठा लफडा नाही. सरळ समोर बघितलं की स्वच्छ स्वरुप दिसतं. कशाला पाहिजेत त्या प्रतिमा आणि पूजा अर्चा ? एकदा टाइमपास सुरु केला की त्याला अंत नाही, आणि एकदा कत्पना कवटाळली की तोच आधार ! मग भ्रमाला अंत नाही. त्यापेक्षा सरळ समोर बघा, हुकलात, काही गोंधळ होतोयं असं वाटलं, परत शांतपणे समोर बघा एकदा निराकाराशी संलग्नता जमली की कोणताही आधार लागत नाही.

देव आहे ह्याचा पुरावा देता येत नाही. म्हणून देव नाही हे कोणी स्वीकारत नाही. बहुसंख्य लोक देव नाकारत नाहीत त्याची कारण आपण चुकीच्या ठिकाणी शोधत आहोत. कारण अशी खूप लोक आहेत ते विज्ञान मानतात त्याच बरोबर देव पण मानतात. दिवसभर प्रयोगशाळेत काम करणारा नवीन शोध घेणारा व्यक्ती रात्री पूजा अर्चा करतात. म्हणजे देव नाही हे सिद्ध करून सुद्धा धार्मिक देव मानणाऱ्या लोकांची संख्या बिलकुल कमी होत नाही.उच्च शिक्षित लोक सुद्धा देव धर्म सोडायला तयार नाहीत ह्याची कारण वेगळीच आहेत. ती कारणे कोणती ह्या वर पहिली चर्चा झाली पाहिजे.

संजय क्षीरसागर, १.
तो एवढा काही मोठा लफडा नाही.
तेच तर मी सांगतोय. तुम्ही ओलांडलेला लफडा आमच्यासाठी बराच मोठा आहे. तुमच्यासाठी नसेल कदाचित. २.
परत शांतपणे समोर बघा
ही शांतीच तर बेटी गायब आहे. म्हणून लोकं देवाकडे जातात. नवसात जे काही मागितलं असेल त्यातनं पुढे शांती मिळेल अशी आशा असतेच. तुम्ही देव मोडीत काढायला निघालात. त्यामुळे लोकं शांत न होता क्षुब्ध होतात. खळबळलेल्या मनात यथार्थ बिंब कसं प्रकट होणार? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

> म्हणून लोकं देवाकडे जातात. नवसात जे काही मागितलं असेल त्यातनं पुढे शांती मिळेल अशी आशा असतेच. तुम्ही देव मोडीत काढायला निघालात. त्यामुळे लोकं शांत न होता क्षुब्ध होतात. खळबळलेल्या मनात यथार्थ बिंब कसं प्रकट होणार? तुम्ही नेमका मुद्दा काढलात ! प्रचंड धन्यवाद ! अशी चर्चा झाली तर संकेतस्थळाचं भाग्यच ! ____________________________ आपणच तर ती शांती आहोत ! आणि नामस्मरणामुळेच तर ती भंगतेयं, म्हणजे ती हरवल्याचा भास होतोयं. हेच तर मी कित्येक प्रतिसादात सांगतोयं, पण लोकांनी अशी काही जालीम स्तोत्रं आणि मंत्र, दशकानु दशकं घोकलेत की त्यांना वाटतं, आता आणखी घोकू, आलोयं जवळच ! जोपर्यंत ही नामस्मरणाची घंटा बंद होत नाही, तोपर्यंत शांतीशी, आपल्या स्वरुपाशी आपण कनेक्ट होणं असंभव आहे पण पब्लिक विडंबनं काय टाकतंय, कविता काय पाडतायंत, खरडफळा काय बडवतायंत, धागा काय भरकटवतायंत, काय वाट्टेल ते चाललंय ! _______________________________ बघा एकदम साधी गोष्ट आहे : देव हा भंकसपणा आहे कारण त्याच्या बारश्यापासून सगळे सोहोळे आपणच केलेत. आपण मूळातच मौन आहोत, भाषा शिकायला लागते, मौन आपला स्वभाव आहे. तस्मात, संस्कृत काय, वेदघोष काय, मंत्र-स्त्रोतं काय सगळी भंकस आहे शांती आपण खुद्द आहोत, शांतीपासून दूर जाण्याचा उपायच नाही कारण शांती भंग होऊच शकत नाही, मग तुम्ही काय वाट्टेल ती बोंब मारा ! पण या नामघोषानी आपलं अवधान मात्र स्वतःकडे येण्याऐवजी, नामघोषाकडे लागून राहतं आणि मग जन्मभर आपण शोधत राहतो, आणि मग म्हणतो : ही शांतीच तर बेटी गायब आहे !

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, मला वाटतं की शांती हा कळीचा मुद्दा आहे. नाम घेतल्याने तुमची शांती बिघडते. याउलट इतरांना ती प्राप्त होत असावी. हे असं का याचा शोध घ्या म्हणून सुचवेन. मी ही घेईन. मला काही सापडलं तर सांगेन तुम्हांस. मी इथे थांबतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

फार बेसिक मिस्टेक केलीत गामाश्री ! शांती तुमची, माझी, इतरांची असा प्रकारच नाही. माझी बिघडते, तुमची वाढते ही कल्पनाच अनुभवशून्यता दर्शवते. शांतता एकच आहे आणि ते आपल्या सर्वांचं मूळ स्वरुप आहे. स्वरूप याचा अर्थ जे आपण मुळातच आहोत. भाषा शिकावी लागते, शांतता आपण खुद्द आहोत. शांतता आणि माझ्यात काहीही फरक नाही, तस्मात माझी शांतता कमी जास्त होण्याचा प्रश्रच नाही. तुम्हाला प्रतिसाद कळला तर तुमचा शोध संपेल ! मला काहीही शोधायची गरज उरलेली नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, तुम्ही शांतिस्वरूप आहात हे मान्य. तसे असूनही तुमच्या विधानांवर लोकं इतके प्रक्षुब्ध का होतात, हे एक गूढच आहे. त्याचा छडा लावणे रोचक ठरावे. उपरोक्त विरोधाभासावरून माझ्या एका जुन्या संदेशाची आठवण झाली. 'प्रेक्षकाचं मन क्षुब्ध राहिलं तर त्या कलाकृतीतून बोध घेता येईल का', असा प्रश्न उपस्थित केला होता. संदर्भ : https://www.maayboli.com/comment/3555998#comment-3555998 असो. काहीही शोधायची गरज तुम्हाला उरलेली नाही म्हणता, तर या धाग्याचं प्रयोजन काय? हे देखील एक गूढच आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१. > तुमच्या विधानांवर लोकं इतके प्रक्षुब्ध का होतात कारण त्यांच्या धारणांना धक्का बसतो ! आणि अशा चुकीच्या धारणांचा समुच्चय म्हणजेच : व्यक्तिमत्व ! अहंकार म्हणजे व्यक्तिमत्व, परंपरागत अध्यात्मातल्या विनम्रभावनं ते फक्त मॉडिफाय होतं. धारणा संपल्या की व्यक्ती मुक्त होते. आणि तर्कसंगत विचार करणार्‍यांना, धारणा मोडीत निघाल्यानं अतीव शांतता लाभते. _______________________________________ २. > काहीही शोधायची गरज तुम्हाला उरलेली नाही म्हणता, तर या धाग्याचं प्रयोजन काय? मला काहीही शोधायची गरज उरलेली नाही, आणि लोकांचा चुकीच्या मार्गानं चाललेला शोध थांबावा, त्यांना ही काही शोधायची गरज राहू नये . पोस्टमधे पाहा : एक सामान्य, वस्तुनिष्ठ, विज्ञानवादी, व्यासंगी, छंदप्रिय, संतुलित मनाचा पण कुशाग्र आणि हजरजवाबी, अस्तित्वाप्रती कायम कृतज्ञ असलेला, साधा, सरळ माणूस म्हणून तुम्ही निर्भ्रांत जगायला लागाल ! अगदी आजपासून !

संक्षी जी .. एक नवीन धागा किंवा ह्यातच अजून एक प्रश्न वाढवा . जर देवाला कोणी पाहिले नाही तर तो कसा दिसतो हे पण माहिती नाही, मग त्याची चित्रे , मुर्त्या कशावरन तयार केल्या? बहुतांश फोटो हे रविवर्म्याच्या चित्रांवरून प्रेरित आहेत असं वाचलेले कुठे तरी.

In reply to by साबु

> तर तो कसा दिसतो हे पण माहिती नाही, मग त्याची चित्रे , मुर्त्या कशावरन तयार केल्या ? तुमचं बरोबरे > सगळया चित्रकारांच्या कल्पना !

In reply to by संजय क्षीरसागर

String theory ni जगाची उत्पती कशी झाली हे स्पष्ट होते आणि जगाच्या उत्पत्ती बद्द्ल आता आम्हाला सर्व काही माहीत झाले आहे अशी भाषा नामांकित संशोधक वापरतात . खरे तर काहीच माहीत झालेलं नाही. तर आपल्या सारखी सामान्य लोक मला सर्व माहीत झालेलं आहे आणि बोलतो तेच सत्य आहे असे समजणार च. त्या मध्ये त्यांचा दोष नाही.

जवळपास आपण सगळेच लहानपणापासून अस्तिक वातावरणात वाढलो. त्यामुळे सहाजिकच आपण सर्व अस्तिक विचारधारा मानायला लागलो. परंतु शिक्षणामुळे आपली तर्कसंगत विचार करण्याची क्षमता वाढल्याने आपण प्रत्येकाने देव आहे की नाही हा प्रश्न स्वतःला विचारायलाच हवा आणि तर्कसंगत विचार करून त्याचा निष्कर्ष काढायला हवा. हा विषय वाद घालून निकालात काढता येण्यासारखा नाही. पूर्वापार या विषयावर अनेक वाद झाले आहेत आणि होत राहतील. ज्याला देव मानायचा असेल त्यांनी जरूर मानावा, फक्त एकच विनंती की कमीत कमी एकदा धाडसाने त्याच्या अस्तित्वाबद्दल विज्ञानाच्या निकषांवर विचार करावा, तुम्हाला उत्तर नक्की मिळेल.

In reply to by कळस

> त्याच्या अस्तित्वाबद्दल विज्ञानाच्या निकषांवर विचार करावा, तुम्हाला उत्तर नक्की मिळेल. बरोब्बर ! आणि विज्ञानापर्यंत जाण्याची सुद्धा गरज नाही. एक साधा विचार की मन हे जीवनाचा आधार असू शकत नाही. आणि त्यामुळे मानसिक कल्पना तर त्याहून नाही. पण लोक ज्याला श्रद्धा म्हणतात ती खरं तर भीती असते : फिअर ऑफ द अननोन ! त्यामुळे देवाची कल्पना सोडवत नाही. आधार शोधून भीतीचा संकोच होईल, पण ती जाणार नाही. भीती घालवायचा एकमेव मार्ग म्हणजे निराधार होणं ! ते आपल्याला स्वरुपाशी संलग्न करतं, कारण स्वरुप निरालंब आहे. मग व्यक्ती पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि विज्ञानवादी होते, भीतीची जागा साहस घेतं !

अतिशय शिक्षित,लोक दिवसभर रोजच्या जीवनात तर्कसंगत विचार करून विविध क्षेत्रात चांगले काम करत असतात आणि आस्तिक पण असतात. त्या मुळे हा गैरसमज काढून टाका की आस्तिक लोक तर्कसंगत विचार करत नाहीत. देव नाकरा ,धर्म नाकारा ह्याची जाहिरात कशाला करताय,आग्रह कशाला धरताय लोक समजदार आहेत काय नाकारायचे ह्याचे उत्तर ते स्वतः शोधतील.

In reply to by Rajesh188

दोनशे २२५ मधले जवळजवळ ३०/४० प्रतिसाद तुमचे असतील ! तुम्ही फक्त एकदा तर्कसंगतीनं देव सिद्ध करुन दाखवाल का ?

आता सर्व व्यवसाय झाला आहे आताचे संशोधक च विज्ञान चे सर्व नियम पडताळून न पाहता शोध निबंध प्रसिद्ध करतात. सर्व नियम पाळून शोध निबंध प्रसारित करण्याचे प्रमाण फक्त 18% टक्के आहे बाकी खोटे पुरावे जोडणे ,दुसऱ्या नी शोधलेले पुरावे स्वतःच्या नावा वर देणे,भलत्याच प्रयोगाचे पुरावे निष्कर्ष वापरणे असले उद्योग करतात.

संजय क्षीरसागर,
लोकांचा चुकीच्या मार्गानं चाललेला शोध थांबावा, त्यांना ही काही शोधायची गरज राहू नये .
मला वाटतं की लोकांचा चुकीच्या मार्गाने चाललेला शोध तसाच चालू राहू द्यावा. जेणेकरून त्यांना वस्तू गवसल्याचा आनंद लाभेल. या समाधानावर तुम्ही गदा आणीत आहात, अशी काहीशी लोकांची धारणा होत आहे. (परत तिच्यायला धारणा उपटलीच!) तुमचा मार्ग विहंगम आहे हे मान्य. पण मुंगीला जर आपला प्रवास थांबवून उलटं जायला सांगितलं तर ते पटणार नाही आणि रुचणार तर नाहीच नाही. पुढे अमुकेक अडचणी येण्याची शक्यता आहे, इतकं मार्गदर्शन तिला पुरे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

> तुमचा मार्ग विहंगम आहे हे मान्य. पण मुंगीला जर आपला प्रवास थांबवून उलटं जायला सांगितलं तर ते पटणार नाही अहो कुठली मुंगी आणि कसला विहंगम मार्ग ? एकदा सगळंच सत्य आहे म्हटल्यावर आपण ही सत्यच आहोत ! ते ही आत्ता आणि इथेच ! कशाला पुढे कळेल, शोधू दे ? तुम्हाला कळलं असेल तर जयघोष करा, नाही तर पुन्हा वाचा ! नक्की कळेल.

In reply to by गामा पैलवान

गा मा जी फक्त एका व्यक्तीला पेटवण्यासाठी कशाला रक्त आठवतंय. त्यांना योग्य वाटत ते त्यांनी ठरवावे आपल्याला योग्य वाटत आहे ते आपण करणारच.

In reply to by संजय क्षीरसागर

मी देव आहे हे प्रत्यक्ष विज्ञान च्या कसोटी वर सिध्द करू शकत नाही कारण देवाचे स्वरूप नक्की काय आहे हे माहीत नाही. पण विश्वास मात्र आहे की पृथ्वी वरील जीव सृष्टी निर्माण करणार कोणी तरी आहे (विश्व विषयी बोलत नाही तो विषय अतिशय अवघड आहे) काही रासायनिक क्रिया होवून सुध्म जीव तयार होतात पण जटिल यंत्रणा असलेले जीव कसे तयार झाले हेच कोणाला माहित नाही. कधी rna कारणीभूत आहे असा समज झाला पण तो स्वतःची कॉपी करत नाही. Kadhi dna कारणीभूत आहे ही शक्यता वर्तवली गेली पण अजुन तरी त्या प्रश्नांचे उत्तर कोणाकडे नाही. शेवटी जे मटेरियल जटिल जीवन निर्माण करण्यास कारणीभूत आहे ते नष्ट झाले आहे आणि आता अस्तित्वात नाही हा सोयीचा मार्ग निवडला गेला. हा प्रश्न जेव्हा सुटेल तेव्हा मी काय सर्वच देव नाकरातील तो पर्यंत संयम ठेवा.

In reply to by Rajesh188

काही रासायनिक क्रिया होवून सुध्म जीव तयार होतात पण जटिल यंत्रणा असलेले जीव कसे तयार झाले हेच कोणाला माहित नाही. कधी rna कारणीभूत आहे असा समज झाला पण तो स्वतःची कॉपी करत नाही. Kadhi dna कारणीभूत आहे ही शक्यता वर्तवली गेली पण अजुन तरी त्या प्रश्नांचे उत्तर कोणाकडे नाही. शेवटी जे मटेरियल जटिल जीवन निर्माण करण्यास कारणीभूत आहे ते नष्ट झाले आहे आणि आता अस्तित्वात नाही हा सोयीचा मार्ग निवडला गेला. हा प्रश्न जेव्हा सुटेल तेव्हा मी काय सर्वच देव नाकरातील तो पर्यंत संयम ठेवा.
ह्या गोष्टींची उत्तर माहित नाहीत असे म्हणण्यास काय हरकत आहे ? बळेच देवाने केले म्हणण्यास काय अर्थ ?

संजय क्षीरसागर, तुमचा इथला संदेश वाचला. माझं मत सांगतो. १.
अहो कुठली मुंगी आणि कसला विहंगम मार्ग ? एकदा सगळंच सत्य आहे म्हटल्यावर आपण ही सत्यच आहोत ! ते ही आत्ता आणि इथेच !
मग लोकांचा भ्रम हे ही सत्यंच ना? २.
तुम्हाला कळलं असेल तर जयघोष करा, नाही तर पुन्हा वाचा ! नक्की कळेल.
हे पटलं. नामस्मरण असंच असतं. जोवर अनुभूती येत नाही तोवर जयघोष करायचा असतो. मनातल्या मनांत. एखादी गोष्ट परत परत सांगितली की ती खरी वाटू लागते, असं सु/कु प्रसिद्ध डॉक्टर गोबेल्स म्हणून गेलेत. नामस्मरण ही या नियमाची भारतीय परंपरेतली आवृत्ती आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

@गामा पैलवान, तुम्ही शांतिस्वरूप आहात हे मान्य. माया ही अशी आश्चर्यजनक नदी आहे की ती ओलांडल्यावर मागे वळून पाहता नाहीशी होते. तुम्ही मायानदी ओलांडली आहे हे मान्य >>>>>>> तुम्ही वरील वाक्ये संक्षींना उद्देशून लिहिली आहेत ते खरोखर तुमचे त्यांच्याविषयीची प्रामाणिक मत आहे की उपरोधपणाने लिहिली आहेत? उपरोधिक असतील तर ठीक. परंतु तुमचे तसे प्रामाणिक मत असेल तर खालील 'सत्य' जरूर ध्यानात घ्यावे आणि मगच आपले मत बनवावे. १. जो मनुष्य देवाचे नाव काढले की चवताळून फक्त देव नाही हेच दहावेळा सान्गत बसतो तो शांतीप्रिय असू शकेल? २. मिपावर गोंधळ घातल्यामुळे ज्याला तब्बल ३ वषे मिपावरून ब्लॉक करण्यात आलं होतं तो शांतीप्रिय असू शकेल? ३. जो मनुष्य स्वतःच्या दुराग्रहाखातर आणि अहंकारामुळे ज्ञानेश्वर, शंकराचार्य, रामकृष्ण परमहंस अशा वंदनीय महापुरुषांना चुकीचे आणि भ्रमित ठरवतो, मी म्हणतो तेच बरोबर आणि बाकी सगळं झूट अशी टिमकी लावत बसतो त्याने हि मायानदी पार केली असे खरेच तुम्हाला वाटते? ४. ज्याला ईश्वराचे अस्तित्व मान्य नाही, जो मनुष्य रामायण, महाभारत केवळ कविकल्पना आहेत, राम कृष्ण, कालीमाता सर्व कल्पना आहेत हे टेप लावत बसतो, देवाचे नाव कोणी ठेवले असले निरर्थक प्रश्न विचारत बसतो तो मायानदी ओलांडून पैलतीरी पोहोचायची शक्यता खरीच आहे असे तुम्हाला वाटते? ५. जो मनुष्य "आयडी ब्लॉक झाला नसता सत्तांतर होण्याची शक्यता होती" असली फाजील आणि भंपक विधानं करतो आणि पुन्हा त्याला डिफेन्ड करण्याचा प्रयत्नही करतो, मेमरी स्ट्रिंग प्रत्यारोपण असली अवैज्ञानिक विधाने करून इतरांना वैज्ञानिक प्रोसेस (तेही अर्धवट आणि चुकीची) सांगायला बघतो आणि वैज्ञानिक पुरावे मागतो आणि त्यांना मागितल्यास त्याकडे धादांत दुर्लक्ष करतो तो मायेपलीकडे गेला असू शकेल? ६. ज्या माणसाला सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म यांचे एकत्व अनेकदा समजावून सांगितले तरी मान्य नाही, सर्वच सत्य असेल तर सगुण पूजा पण सत्यच हे कळून घ्यायचे नाही त्याने मायेवर विजय मिळवला असेल असे तुम्हाला वाटते? आता याची दुसरी बाजू पाहुयात. आपल्याकडे योगमार्गाचे आणि ज्ञानमार्गाचे बरेच संत होऊन गेले परंतु त्यातल्या अनेकांनी भक्तिमार्गाला पाठिंबाच दिला आहे. ज्ञानदेव माउलींनी हरिपाठ सांगितला आहे. साक्षात्कार झाला तेंव्हा ते म्हणतात 'सबाह्य अभ्यंतरीं अवघा व्यापक मुरारी आज हरी पहिला रे हरी पहिला'. कट्टर अद्वैतवादी शंकराचार्यांनी इतर कोणीच रचली नसतील तेवढी जवळपास सर्वच देवांची स्तोत्रे रचली आहेत, पंचायतन पूजा सांगितली आहे, अनेक देवळांची स्थापना केली आहे. रमण महर्षी, विवेकानंद यांनी सुद्धा भक्तीचे महत्व सांगितले आहे. पतंजलीनी योगसूत्रात ईश्वराचे अस्तित्व दर्शवले आहे. या सर्वांनी ज्ञान आणि भक्ती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सांगून ज्ञानोत्तर भक्ती आणि भक्त्युत्तर ज्ञान हे एकच आहे हे पण वारंवार सांगितले आहे. बाकी तुम्ही मायानदीचा विषय काढलाच आहे तर या नदीमध्ये कोण कसे बुडून जातात आणि खरे कोण तरून जातात याचे रसभरीत वर्णन आपण ज्ञानेश्वरीत वाचलेले असेलच. उगाच ४ पुस्तके वाचून केवळ बुद्धीला समजणे वेगळे आणि खरा त्या सत्याचा अनुभव येणे वेगळे हे न समजताच जो अर्धवट ज्ञानाने स्वतः सर्वज्ञ असल्याचा दावा करतो त्या अहंकारी माणसाचे मायानदीतले वर्णन सुद्धा आपण जाणतच असाल. बाकी मायानदी तरून जाण्यासाठी सद्गुरुरूपी होडीच काय तो एकमेव पर्याय हे जाणून समर्थ म्हणतात तसे सद्गुरूंनी दिलेल्या उपासनेसी दृढ चालवावे. आणि सद्गुरू लाभ झाला नसल्यास इष्टदेवतेचा मंत्रजप, दैनिक पूजा अर्चना, ग्रंथाभ्यास किंवा चित्तशुद्धीसाठी काही साधना हेच सत्य जोपर्यंत मायेत आहोत. बाकी सर्व पोकळ गप्पा आणि शब्दांचे खेळ. आता हा सर्व संदर्भ लावून वर सांगितलेले गुण उधळणार्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा की संत वचनावर याचा निर्णय करणे कोणासही फार अवघड नसावे.

In reply to by कोहंसोहं१०

मेलेल्याला जीवंत करून त्याच्याकडून पुस्तक लिहून घेतलं इतकी भाबडी कल्पना मान्य करणाऱ्या व्यक्तिच्या लेखनाची दखल, कुणीही सूज्ञ घेणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मेलेल्याला जीवंत करून त्याच्याकडून पुस्तक लिहून घेतलं इतकी भाबडी कल्पना मान्य करणाऱ्या व्यक्तिच्या लेखनाची दखल >>>>> काय लिहिताय? मेलेल्याला जिवंत करून पुस्तक लिहून घेतले हे मी कधी म्हणालो? इतरांना भ्रमित म्हणता म्हणता तुम्हीच भ्रमित झालेले दिसताय. मी न म्हणालेली वाक्यंपण आता माझ्या नावावर टाकताय. खरंच भ्रमित झालात की प्रत्युत्तर नव्हते म्हणून उगाच खोटे आरोप करताय?

In reply to by गामा पैलवान

ज्या लॉजिकसाठी तुमच्याशी संवाद चालू होता, तेच हरवतंय ! १. > मग लोकांचा भ्रम हे ही सत्यंच ना ? काय बोल्ता ? भ्रम सत्य असेल तर मग नामस्मरण तरी कशाला ? सत्याचा शोध कशापायी ? २. > हे पटलं. नामस्मरण असंच असतं. जोवर अनुभूती येत नाही तोवर जयघोष करायचा असतो. मनातल्या मनांत. एखादी गोष्ट परत परत सांगितली की ती खरी वाटू लागते, असं सु/कु प्रसिद्ध डॉक्टर गोबेल्स म्हणून गेलेत. नामस्मरण ही या नियमाची भारतीय परंपरेतली आवृत्ती आहे. मग भ्रम गहन झाला की तोतापुरींसारखा अवलिया बोलवावा लागतो, जो एका झटक्यात सगळा भ्रमनिरास करतो ! त्यापेक्षा माझं काम किती डेलिकेट आहे पाहा : नुसतं शांतपणे वाचलं आणि एक साधा प्रश्न स्वतःला विचारला, की घरच्या घरी, बसल्या बसल्या, देव गुल ! देवाचं नांव कुणी ठेवलं ?

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, १.
सत्याचा शोध कशापायी ?
मलाही हाच प्रश्न पडलाय. लोकांनी त्यांचे भ्रम जरूर जोपासु द्यावेत. आपल्याला आपल्यापुरतं सत्य समजलं की झालं. २.
एक साधा प्रश्न स्वतःला विचारला, की घरच्या घरी, बसल्या बसल्या, देव गुल ! देवाचं नांव कुणी ठेवलं ?
जो स्वसंवेद्य आहे त्यानेच हे नाव ठेवलं. ॐ आणि अथ हे शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातनं सर्वप्रथम बाहेर आले. संदर्भ : http://dnyaneshvari.blogspot.com/2012/02/blog-post.html आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१. तुम्ही म्हटलं होतं : मग लोकांचा भ्रम हे ही सत्यंच ना ? त्यावर मी तो प्रतिसाद दिला आहे. २. > लोकांनी त्यांचे भ्रम जरूर जोपासु द्यावेत. आपल्याला आपल्यापुरतं सत्य समजलं की झालं. तुम्ही भ्रम जोपासा, मी सत्याचा उद्घोष करत राहीन > काय प्रॉब्लमे ? ३. > जो स्वसंवेद्य आहे त्यानेच हे नाव ठेवलं. ॐ आणि अथ हे शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातनं सर्वप्रथम बाहेर आले ? अहो, सत्य ही ध्वनीपूर्व स्थिती आहे. इतका वेळ तुम्ही ज्या` शांतीची' चर्चा करत होतात, ती स्थिती आहे. ती अनिर्मित स्थिती असल्यानं तिथे उच्चारणाला काही अर्थच नाही, मग ते ॐ असो का आणखी काही. ४. > हे शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातनं सर्वप्रथम बाहेर आले ? हा ब्रह्मदेव आता कुठून काढला ? तो कुणाला आणि केंव्हा भेटला होता ? त्याच्या कंठातून ॐ आणि अथ हे शब्द आल्याचं त्या ब्लॉगवाल्याला कसं कळलं ? आणि आता बॅक टू स्क्वेअर वन ! त्याचं ब्रह्मदेव हे नांव कुणी ठेवलं ?

माणूस बोलायला कधी लागला आणि भाषा कधी निर्माण झाल्या आणि भाषा शोधून काढणाऱ्या लोकांची नावं काय आहेत. त्या बाबत पुरावा आहे का. मला वाटतं ह्या प्रश्नांची पहिली उत्तर शोधली पाहिजेत त्या नंतर देवाचे. नाव कोणी ठेवलं? हा प्रश्न समजायला सोपा जाईल. नाव ठेवण्यासाठी पहिली भाषा हवी ना. तर माझी धागा कर्त्याला विनंती आहे ह्याची उत्तर द्यावीत.

In reply to by Rajesh188

माणूस बोलायला लागल्यावर, त्यानं देवाचं नांव ठेवलं ! थोडक्यात ही सगळी माणसाची करामत आहे, मग भाषा कुणी का शोधली असेना.

In reply to by संजय क्षीरसागर

भाषा असेल तरच नाव ठेवणार ना. त्या मुळे हा प्रश्न तुमच्या धाग्या शी संबंधित आहे. हा प्रश्न टाळू नका. 1) माणूस बोलायला कधी लागला? 2) आणि भाषा कशा निर्माण झाल्या त्या कोणी शोधल्या? आणि पुरावा सहित उत्तर ध्या. तुम्ही पुरावा शिवाय विश्वास ठेवत नाही ना . तुमच्या पोस्ट वाचून आमच्यात पण तो गुण आलंय .

असे कसे . मग ह्या वाक्याचे अनेक अर्थ निघतील. भाषा माणसांनी शोधल्याच नाही. भाषेचा निर्माता माणूस नाही असे आम्ही म्हणू शकतो. त्या साठी तुम्हाला हे सिध्द करावेच लागेल पुरावा देवून की. भाषा मानव निर्मित आहेत आणि अमका तमका त्याचा शोध कर्ता आहे. आणि हे त्याचे पुरावे . तुम्ही देवून takach

In reply to by Rajesh188

पुनश्च. भाषेचा उगम कुठून झाला हे माहित नाही असा तर्क काढला तरी भाषेची निर्मिती देवाने केली असे म्हणून तुम्ही मोकळे झाला तरी तुमच्या दावा अर्थपूर्ण होणार नाही. काय राव राजेश. एव्हाना आम्हाला तुमचे सगळे आर्ग्युमेन्ट कळाले. तुम्ही मात्र अजून तोच तोच खेळ पुन्हा पुन्हा खेळताय.

In reply to by शा वि कु

पुनश्च. भाषेचा उगम कुठून झाला हे माहित नाही असा तर्क काढला आणि त्यावरून भाषेची निर्मिती देवाने केली असे म्हणून जरी तुम्ही मोकळे झाला म्हणजे काय तुमचा दावा अर्थपूर्ण होत नाही. काय राव राजेश. एव्हाना आम्हाला तुमचे सगळे आर्ग्युमेन्ट कळाले. तुम्ही मात्र अजून तोच तोच खेळ पुन्हा पुन्हा खेळताय.

तुमच्या सोयीचा अर्थ काढण्यासाठी तुम्ही सर्व प्रश्न उडवून लावताय. ज्याची उत्तर माहीत नाहीत. ज्या प्रश्नाची उत्तर माहीत नसतात त्या प्रश्नांची संभाव्य उत्तर एका पेक्षा जास्त असतात.

देवाच्या अस्तित्वाचे सबळ पुरावे नाहीत म्हणून त्याची दोन संभाव्य उत्तर आहेत. देव असेल. किंवा देव नसेल पण. दोन्ही उत्तर नाकारता येणार नाहीत.

In reply to by Rajesh188

तुम्ही एक तरी प्रतिवाद प्रतिसाद वाचताय का याबद्दल शंका येत आहे. 1,2 या दोन प्रतिसादांव्यतिरिक्त सुद्धा इथे कोणीही देवाच्या अस्तित्वाची शक्यता नाकारता नाहीच आहे. इथे केवळ आत्ता पुराव्याच्या अभावव्यर देवावर विश्वास ठेवायचा का ? हि चर्चा चालू आहे. पुन्हा विचारतो. ऍटलासच्या/शेषनागाच्या अवयवावर सम्पूर्ण विश्व सामावले आहे, त्यावर पण विश्वास ठेवायचा काय, असे असण्याची अशक्यता सिद्ध करता येत नाही म्हणून ?

In reply to by संजय क्षीरसागर

उत्सुकता आहे, तर्कामध्ये कुठेही फट उरली नाही की काय रिऍक्शन आहे पाहायची :)) पण अवघड दिसतंय.

In reply to by शा वि कु

इथे स्वतः धागा कर्ता आणि काही आयडी ठाम पने देव नाही असे म्हणत आहेत. जे देव मानतात त्यांना देव भोळे ,अडाणी म्हणत आहेत हे तुमच्या वाचनात येत नाही का. की सरळ सरळ खोटे बोलणे हे पुरोगामी होण्यासाठी आवश्यक गुण च आहे. प्रश्न ची उत्तर मिळत नाही म्हणून तर निर्माता असावा असे विचार मांडले जातात. तुम्ही घरी गेला आणि घरात कोणी नसताना घरात सर्व जेवण तयार असेल तर हे जेवण कोणी बनवलं हा प्रश्न पडेल ना तुम्हाला. आणि हा प्रश्न तो पर्यंत प्रश्न च राहील जो पर्यंत उत्तर मिळत नाही.

In reply to by Rajesh188

तुम्ही ठामपणे म्हणाल का की ड्रॅगन नावाचा प्राणी अस्तित्वातच नाही ? का तिथेही असू शकतो बुवा असं उत्तर आहे ?

In reply to by शा वि कु

पृथ्वी वर जे जीवन दिसत आहे ते अतिशय सुनियोजित आहे. इथे प्रत्येक सजीवाला अन्न आहे. प्रतेक प्राणी स्वतःची पुनरुत्पादन करतो. हवेतील सर्व वायूचे प्रमाण योग्य आहे. हे सर्व अस्तित्वात आहे .नष्ट झालेले नाही . पण हे एवढे सूनियाजित कसे आहे त्या पाठची कारणे काय आहेत ह्याची उत्तरं अजुन पण माणसाला माहीत नाहीत. त्या मधील फक्त दोनच उदाहरणे तुम्हाला दिली होती. जटिल रचना असलेले जीव निर्माण कसे झाले ह्याचे उत्तर कोणाकडे नाही. फक्त माणसाच्याच मेंदू ची उत्क्रांती का झाली . भाषा कशा निर्माण झाल्या. असे किती तरी प्रश्न आहेत. देव आहे हे सिध्द करता येत नसले तरी जीवसृष्टी आता अस्तित्वात आहे ना ती दिसतोय ना. ड्रॅगन चे पुरावे नसतील आणि आता पण तो अस्तित्वात नसेल तर तो आहे असे समजायला आम्ही काय वेडे आहोत काय.

In reply to by Rajesh188

ड्रॅगन चे पुरावे नसतील आणि आता पण तो अस्तित्वात नसेल तर तो आहे असे समजायला आम्ही काय वेडे आहोत काय.
हाच विचार मनात घोळवावा ही ईनंती करून मी माझे भाषण संपवतो :))

In reply to by शा वि कु

माझ्या पूर्ण प्रतिसाद च अर्थ काय आहे हे चांगले समजून सुद्धा फक्त चारच सोयी ची वाक्य घेवून राजकारणी मंडळी सारखे प्रतिसाद का देताय.

In reply to by Rajesh188

तुमचा मुद्दा intelligent design सिद्ध करण्यासाठी आहे ना ? कि बुवा इतकं सुसज्ज आणि सुनियोजित जग हे केवळ एक निर्मातच करू शकतो ? खरोखरी उत्क्रांतीची आणखीन माहिती घ्या. हा दावा जेव्हा ख्रिश्चन व्यक्तींनी केला, तेव्हा माणूस 10000 वर्षांपूर्वी असाच्या असा तयार झाला असा त्यांचा (गैर)समज होता. तुमचा असा समज नसावा. पण तुम्हाला हे जे सुनियोजित जग दिसतंय ते असे काही सुरु नाही झाले. आजूबाजूचे वातावरण काही केवळ आज दिसते तश्या जीवनाला तारण्यासाठी तयार नाही झाले, तर जीवन या वतातवरणात स्वतःला तारता येईल असे निर्माण झाले. सुरुवातीचा जीव जन्मला तेव्हा एकंदरीत जीवनासाठी परिस्थिती भयंकर प्रतिकूल होती. त्यामुळे जगण्यासाठी आवश्यक हे बदल जीवांमध्ये घडत गेले, आणि मग ही तुमची सुनियोजित पृथ्वी बनली. आता तुम्ही उत्क्रांती कशी भंपक आहे हे सांगा. वाट बघीन हो :)

In reply to by शा वि कु

निर्जीव मधून सजीव निर्माण झाले हा दावा केला गेला. हे सत्य आहे का हे शोधून काढण्या साठी विविध प्रयोग संशोधक मंडळी नी केले आणि विविध रसायने मिळून एक जैविक घटक बनत आहे तो सजिवाची लक्षणे दाखवतो हे दिसून आले . पण त्या स्थिती पासून जटील रचना असलेले जीव कसे बनले. जटिल जीव निर्माण होण्यासाठी गुणसूत्र आवश्यक असतात . ती कशी निर्माण झाली हे आज पर्यंत प्रयोगातून सिद्ध झालेले नाही. तुम्ही जे उत्क्रांती चे उदाहरण देत आहात ती खूप पुढची स्टेप आहे सजीव निर्मिती पूर्ण झाल्या नंतरची. डार्विन नी मुळात उत्पती विषयी दावा केलाच नाही. वनस्पती विषयी एक चक्कार शब्द त्यांनी काढला नाही. थोडक्यात उत्क्रांती वाद उत्पती विषयी काहीच भाष्य करत नाही. तुम्ही उत्क्रांती चा सिद्धांत चा संबंध कोठे ही जोडू नका. धूमकेतू द्वारे जीवन पृथ्वी वर उत्पन्न झाले असे अनेक गृहितक आहेत. वातावरण बदलत गेले तसे जीवन फुलत गेले हे गृहितक आहे ते काही सिद्ध झलेला सिद्धांत नाही. ऑक्सिजन असेल तरच सजीव निर्मिती होईल हे खरे नाही. पृथ्वी वर असे काही अप्रगत जीव आहेत त्यांना ऑक्सिजन ची गरज नाही. अती उच्च तापमानात जिवंत राहणारे पण जीव आहेत. त्यामुळे सजीव निर्मिती साठी अमकेच तापमान हवे असे काही नाही. अजुन पर्यंत बाकी ठिकाणी सजीव सृष्टी चा शोध न लागण्याचे हेच तर कारण आहे. आपण ऑक्सिजन,पाणी,तापमान च शोधत बसलोय . असे माझे नाही संशोधकांचे मत आहे.

In reply to by Rajesh188

पृथ्वी वर जे जीवन दिसत आहे ते अतिशय सुनियोजित आहे. इथे प्रत्येक सजीवाला अन्न आहे. प्रतेक प्राणी स्वतःची पुनरुत्पादन करतो. हवेतील सर्व वायूचे प्रमाण योग्य आहे. हे सर्व अस्तित्वात आहे .नष्ट झालेले नाही . पण हे एवढे सूनियाजित कसे आहे त्या पाठची कारणे काय आहेत ह्याची उत्तरं अजुन पण माणसाला माहीत नाहीत.
हे तुमचे आर्ग्युमेन्ट भयंकर जुने आणि तितकेच हाणून पाडलेले आहे. पाश्चात्य थिओलॉजिस्ट याला वॉचमेकर आर्ग्युमेन्ट म्हणतात. खरोखर चर्चा करायची असल्यास हे वाचा- A Failed Metaphor for Intelligent Design

In reply to by शा वि कु

प्रतिवाद जुनाच असेल पण अजुन अनुत्तरीत आहे. तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये हवेतच तिर मारले आहेत . तुम्ही दिलेल्या लिंक मधले विचार का पटवून ghavet असा उलट प्रश्न ते वाचणाऱ्या व्यक्ती ल नक्कीच पडतील. Baseless orgument आहे. स्टिफन हॅकिंग आणि बाकी संशोधक मंडळी नी स्ट्रिंग theory ni विश्वाचे रहस्य उलगडले आहे असे दावे केले ते कसे हास्यास्पद होते हे किती तरी लोकांनी योग्य उदाहरणे देवून सिद्ध केले आहे. वाद प्रतिवाद आमच्या पण वाचनात असतात. आपल्या बुध्दी ला जोपर्यंत पटत नाही तो पर्यंत कोणी सांगतोय म्हणुन ते खरे असेल हे मी समजत नाही.

In reply to by Rajesh188

स्ट्रिंग थियरी समजल्याचे आणि हाणून पाडल्याचे दावे. इथे स्वतःला विज्ञाननिष्ठ म्हणणारा माणूस पण त्यावर काही कमेंट करणार नाही मात्र तुमचं चालू आहेच. ते स्ट्रिंग थियरी चा प्रतिवाद करणारे लोक काय तर्काला फाटा मारत नाहीत.
तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये हवेतच तिर मारले आहेत . तुम्ही दिलेल्या लिंक मधले विचार का पटवून ghavet असा उलट प्रश्न ते वाचणाऱ्या व्यक्ती ल नक्कीच पडतील.
वा रे वा. अस चालत नाही भौ. काय पटलं नाही ते सांगायचं असतंय. मुळात निर्मात्याने जग निर्मिले हाच हवेतला दावा आहे. प्रतिवाद कसा जमिनीवर होणार ? ठीक आहे. पुन्हा तेच. हवेत तिर मारणे हे पण जरा मनात घोळवावे हि ईनंती :))

संजय क्षीरसागर, आपला इथला प्रतिसाद वाचला. माझं मत सांगतो. १.
तुम्ही भ्रम जोपासा, मी सत्याचा उद्घोष करत राहीन > काय प्रॉब्लमे ?
काहीच नाही. सत्याचा उद्घोष व नामस्मरण एकसारखे आहेत, इतकंच सांगायचं होतं. २.
अहो, सत्य ही ध्वनीपूर्व स्थिती आहे.
ते स्वसंवेद्य असल्याने त्याला स्वत:ला वाटेल ते कार्य करू शकते. ३.
इतका वेळ तुम्ही ज्या` शांतीची' चर्चा करत होतात, ती स्थिती आहे.
बरोबर. ४.
ती अनिर्मित स्थिती असल्यानं तिथे उच्चारणाला काही अर्थच नाही,
का म्हणून? ते जे काही सत्य आहे, त्याला काही करावंसं वाटलं तर अडवणारं कोणीच नाही. त्याने स्वत:च्या अस्तित्वाचा आवाज काढला तर तो निरर्थक कसा काय? ५.
त्याच्या कंठातून ॐ आणि अथ हे शब्द आल्याचं त्या ब्लॉगवाल्याला कसं कळलं ? त्याचं ब्रह्मदेव हे नांव कुणी ठेवलं ?
बालक त्याच्या आईच्या सांगण्यावरनं एखाद्या पुरुषाला बाप म्हणू लागतं. तसाच तो पहिला जीव हा आपल्या सगळ्यांचा आदिपिता आहे. त्याचं नाव ब्रह्मदेव असो वा अब्राहम वा अजून काही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१. > सत्याचा उद्घोष व नामस्मरण एकसारखे आहेत ? सत्याचा उद्घोष म्हणजे आपण सत्य आहोत याचा उद्घोष, आणि नामस्मरण म्हणजे काल्पनिक देवाच्या नांवाचा पुकारा. २. > ते स्वसंवेद्य असल्याने त्याला स्वत:ला वाटेल ते कार्य करू शकते. काय बोल्ता ? सत्य ही स्थिती आहे आणि ती कायम अकर्ता आहे. ३. > जे काही सत्य आहे, त्याला काही करावंसं वाटलं तर अडवणारं कोणीच नाही. त्याने स्वत:च्या अस्तित्वाचा आवाज काढला तर तो निरर्थक कसा काय? वर २. वाचा ४. > बालक त्याच्या आईच्या सांगण्यावरनं एखाद्या पुरुषाला बाप म्हणू लागतं. तसाच तो पहिला जीव हा आपल्या सगळ्यांचा आदिपिता आहे. त्याचं नाव ब्रह्मदेव असो वा अब्राहम वा अजून काही. आता हा पहिला जीव कुठून काढला ? तो सगळ्यांचा आदिपिता आहे हे तुम्हाला कसं कळलं ? ही आदीपिता थिअरी प्रस्थापित बायॉलॉजीला कसा हरताळ फासते ? थोडक्यात, या आदीपित्याचे पेरेंटस कुठे असतात ? त्यांची नांव काय आणि ती कुणी ठेवली ?

हा प्रश्न तर विचारून झाला . पण भाषा कशी निर्माण तिचा निर्माता कोण है पुराव्या नी सिध्द करा असे सांगितले तर त्याला फाटे फोडण्यात आले आणि हा गैर सोयीच्या प्रश्न कडे दुर्लक्ष केले गेले. भाषा च नसेल तर नाव कसे देणार. त्या साठी भाषा मानव निर्मित आहे हे तर सिद्ध करा. हे सिद्ध झाले की देव माणसाने निर्माण केले असे कबुल करण्यात आम्हाला काही कमी पना नाही.

In reply to by Rajesh188

बाकी चर्चेत जास्त भाग घेतला नाही.. भाषे बद्दल थोडेसे बोलतो.. हे असे पण सिद्ध करता येईल : जर सिद्ध करायचे असल्यास.. दोन लहान मुलगा मुलगी जे जन्मले आहेत नुकतेच ज्यांना भाषा येत नाही त्यांना एकत्र ठेवा खुप वर्षे.. कोणाशी न बोलता.. त्यांना भाषा येणार नाही.. मग नंतर कायम एकत्र असल्यावर त्यांचे हावभाव.. बोलणे.. वगैरे सगळे टिपा.. आणि ते जर कसल्याही सांकेतिक भाषेत बोलले.. किंवा कसे तर ती त्यांची भाषा.. आणि नाहीच बोलले.. कसलेच एकमेकां प्रती हावभाव, सांकेतिक चिन्ह.. तर मान्य करू भाषा ही अशीच develop झाली आहे.. एका रात्रीत मराठी, इंग्लिश भाषा develop झाली नाहीच.. नाईल नदी किनारी सांकेतिक संदेश सापडलेले आहेच.. बाकी मूळ धागा खूपच विनाकारण लांबला गेला आहे.. असे वाटते.. मला इतकेच म्हणायचे आहे.. देव असेलही असे तुमच्या म्हणण्याने मी मान्य करेल..कोणाला का दुखवावे.. आपले आपल्या पाशी पण पण पृथ्वी समुद्रात बुडाली म्हणुन विष्णूने वराह अवतार घेऊन तिला उचलून आणले.. तर ती कुठल्या समुद्रात बुडाली होती..? का तो समुद्र आटला.. म्हणजे निदान देव आहे हे मनातले सोडू नका.. पण ह्या असल्या कथा मानवाने निर्माण केल्यात हे तरी मान्य करावेच लागेल.. बाकी काय बोलू..

In reply to by गणेशा

संस्कृत ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे हे अनेकांनी मान्य केले आहे . पण इथे देव नाही असे ठाम पने सांगणारे संस्कृत ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे हे सिद्ध झालेले असून सुद्धा मान्य करणार नाहीत. आणि संस्कृत ला देवाची भाषा असे सुद्धा म्हंटले जाते.

संजय क्षीरसागर, तुमचा वरचा संदेश वाचला. माझं मत सांगतो. १.
सत्याचा उद्घोष म्हणजे आपण सत्य आहोत याचा उद्घोष, आणि नामस्मरण म्हणजे काल्पनिक देवाच्या नांवाचा पुकारा.
आपण सत्य आहोत याचा सतत उद्घोष करावा तर लागतोच ना? तसंच नामस्मरण सतत करावं लागतं. २.
सत्य ही स्थिती आहे आणि ती कायम अकर्ता आहे.
सत्य ही स्थिती होऊच शकंत नाही. स्थिती बदलते. सत्य बदलंत नाही. ३.
आता हा पहिला जीव कुठून काढला ?
ज्याअर्थी सजीवापासनं सजीव उत्पन्न होतांना दिसतो, त्याअर्थी प्रत्येक सजीवास बाप आहे. ही साखळी मागे नेली की कोणतरी एक आदिपिता असणार हे तर्कानं ताडता येतं. ४.
तो सगळ्यांचा आदिपिता आहे हे तुम्हाला कसं कळलं ?
बालक आईला विचारतं की माझा बाप कोण. तसंच आपण सिद्धपुरुषांन विचारायचं आदिपिता कोण. ५.
ही आदीपिता थिअरी प्रस्थापित बायॉलॉजीला कसा हरताळ फासते ?
प्रस्थापित जीवशास्त्राला तर उत्क्रांती म्हणजे काय हे ही नीटसं कळलेलं नाही. फार काय आधुनिक जीवशास्त्रात सजीवाची अधिकृत व्याख्याही उपलब्ध नाही. ६.
थोडक्यात, या आदीपित्याचे पेरेंटस कुठे असतात ? त्यांची नांव काय आणि ती कुणी ठेवली ?
आदिपिता स्वयंभू आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१. > आपण सत्य आहोत याचा सतत उद्घोष करावा तर लागतोच ना? तसंच नामस्मरण सतत करावं लागतं. आपण सत्य आहोत हा उलगडा एकदाच होतो मग `तुम्ही सत्य आहात' हा उद्घोष, ज्यांना `उलगडा झालेला नाही' त्यांचासाठी केला जातो. तो उद्घोष करणार्‍याचा छंद असतो, अनिवार्यता नाही. या उलट नामस्मरणाचा हेतू (काल्पनिक) देव आहे, हे स्वतःला सतत पटवण्यापलिकडे काहीही नसतो. नामस्मरण हा वरकरणी भक्ताचा आनंद वाटला, तरी मुळात ती त्याची अनिवार्यता असते. थोडक्यात, ते खेळणं मागणार्‍या लहान मुलाचं (म्हणजे मनाचं) लक्ष दुसरीकडे वळवणं आहे. एकदा मुलाचं लक्ष तुम्ही केलेल्या विक्षेपावरुन (नामस्मरणावरुन) हटलं की मुलाचा पुन्हा खेळण्याचा हट्ट सुरु (मन पुन्हा कार्यान्वित) ! भक्तानी नामस्मरण थांबवलं की देव गुल ! ___________________________________ आता मूळ विषय : अ) तुम्ही नामसाधनेचा जोरदार पुरस्कार केलायं ब) वर एका प्रतिसादात तुम्ही स्पष्टपणे म्हटलंय : ही शांतीच तर बेटी गायब आहे. म्हणून लोकं देवाकडे जातात. नवसात जे काही मागितलं असेल त्यातनं पुढे शांती मिळेल अशी आशा असतेच. तुम्ही फक्त एक गोष्ट सिद्ध करा : नामघोषातून शांती कशी मिळते ? आणि नामस्मरणात विक्षेप आल्यावर किंवा नाम घेणं बंद केल्यावर त्या शांतीचं काय होतं ? क) नामसाधनेची परिणीती इष्ट देवता दिसण्यात होते हा सर्व संतांचा दावा आहे. उदा. परमहंसांना कालीमाता दिसे आणि ते तिच्याशी गप्पा मारत. मग तोतापुरींना तो भ्रम घालवण्यासाठी, त्यांच्या आज्ञाचक्रावर तीक्ष्ण वस्तूनं हल्ला करावा लागला. हा नामस्मरणाचा हा नोन रिझल्ट आहे. शेवटी काली घालवायचीचे तर इतका खटाटोप कशापायी ? आणि सगळ्यांना भास व्हायला लागले, तर इतके तोतापुरी आणायचे कुठून ?

In reply to by संजय क्षीरसागर

पुन्हा तोतापुरी!! मागच्या एका धाग्यात रामकृष्ण परमहंस आणि तोतापुरीची पूर्ण कथा देऊन मी तुमचे अज्ञान उघडे पडले होते. मी तेंव्हाच सांगितले होते की तोतापुरींनी कालीचे अस्तित्व कसे मान्य केले आणि त्या कथेचा संदर्भ, पुरावा ही दिला होता. हेही सांगितले होते की हा प्रसंग रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य यांनी त्यांच्या पुस्तकात नोंदवला आहे. एवढेच नाही तर आणि तो प्रसंग अगदी चित्रपटात सुद्धा आला होता आणि मी त्या चित्रपटाची लिंक अगदी वेळेसकट दिली होती. एवढे देऊन सर्वांना इथे तुमचे अज्ञान समजले आहे अर्थात तुमच्यासारख्या अहंकारी माणसाने ते कळूनही केवळ अहंकारास्तव त्यालाही विरोध केला होता पण पुन्हा तोच विषय इथे काढून परत परत स्वतःचा अज्ञानीपणा कशाला चव्हाट्यावर आणलाय? उगाच आपला चुकीचा मुद्दा प्रूव्ह करण्यासाठी नवीन धागा काढायचा आणि आडून आडून त्याच गोष्टी परत लिहायच्या यावरून खरंच मलाही तुम्ही हे सर्व पेड अजेन्डयाखातर करताय अशी शंका यायला लागलीये.

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, १.
तुम्ही फक्त एक गोष्ट सिद्ध करा : नामघोषातून शांती कशी मिळते ? आणि
शांती ही अनुभवायची चीज आहे. ती मिळवण्यासाठी नामस्मरण हा पहिला टप्पा आहे. मात्र तुमचा मार्ग वेगळा असू शकतो. २.
शेवटी काली घालवायचीचे तर इतका खटाटोप कशापायी ?
शेवटी हा#यचं आहे तर गिळायचं कशाला, असा हा प्रश्न आहे. थेट सूर्यप्रकाश का नये पिऊ? याचं उत्तर असं की बहुसंख्य शरीरांची रचनाच तशी आहे म्हणून. निर्गुणसाधना करण्यासाठी आधी सगुणसाधनेत पारंगत असावं लागतं. ३.
आणि सगळ्यांना भास व्हायला लागले, तर इतके तोतापुरी आणायचे कुठून ?
गुरूंचा शोध हा साधनेचा भाग आहे. डिमांड-सप्लाय व्यवहार नव्हे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

१. > शांती ही अनुभवायची चीज आहे. ती मिळवण्यासाठी नामस्मरण हा पहिला टप्पा आहे खरा मुद्दा हा आहे : नामघोषातून शांती कशी मिळते ? आणि नामस्मरणात विक्षेप आल्यावर किंवा नाम घेणं बंद केल्यावर त्या शांतीचं काय होतं ? २. > शेवटी काली घालवायचीचे तर इतका खटाटोप कशापायी ? शारीरिक प्रक्रिया साधनेच्या फलिताशी जोडणं हा तर्कहीन प्रकार आहे. खाण्याचा आणि साधनेचा काहीएक संबंध नाही. शिवाय तुमच्या तर्कहीन विधानातून होणारा विनोद पाहा : नामस्मरणाची परिणीती देव दिसण्यात होते असा सर्व संतांचा दावा आहे > नाम हे खाणं असेल तर मग रिझल्ट काय येईल ? ३. > गुरूंचा शोध हा साधनेचा भाग आहे. डिमांड-सप्लाय व्यवहार नव्हे. तुम्हाला मुद्दा कळला नाही, किंवा तुम्ही तो सोयिस्कररित्या टाळतायं ! प्रश्न गुरु शोधण्याचा नाही. पुन्हा वाचा : क) नामसाधनेची परिणीती इष्ट देवता दिसण्यात होते हा सर्व संतांचा दावा आहे. उदा. परमहंसांना कालीमाता दिसे आणि ते तिच्याशी गप्पा मारत. मग तोतापुरींना तो भ्रम घालवण्यासाठी, त्यांच्या आज्ञाचक्रावर तीक्ष्ण वस्तूनं हल्ला करावा लागला. हा नामस्मरणाचा हा नोन रिझल्ट आहे. शेवटी काली घालवायचीचे तर इतका खटाटोप कशापायी ? आणि सगळ्यांना भास व्हायला लागले, तर इतके तोतापुरी आणायचे कुठून ?

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर, तुमच्या प्रश्नांना यथाशक्ती उत्तरं देतो. १.
नामघोषातून शांती कशी मिळते ?
हे असं असल्याचं अनेकांच्या अनुभवास आलेलं आहे. २.
नामस्मरणात विक्षेप आल्यावर किंवा नाम घेणं बंद केल्यावर त्या शांतीचं काय होतं ?
नामस्मरण पक्कं झालं की अजपाजप सुरू होतो. शांती तशीच राहते. हे (किंवा तत्सम) माऊलींनी सांगितलेलं आहे. ३.
शारीरिक प्रक्रिया साधनेच्या फलिताशी जोडणं हा तर्कहीन प्रकार आहे.
शारीरिक प्रक्रिया उदाहरण म्हणून दिली होती. तुम्ही मेमरी स्ट्रिंग्ज, आणि डिस्क ड्राईव्ह फॉर्माटिंगची उदाहरणं दिलेली होती. त्याच धर्तीवर मी खाण्याच्या रचनेचं उदाहरण दिलं. ४.
खाण्याचा आणि साधनेचा काहीएक संबंध नाही.
साधकाने साधकासारखं वागणं इष्ट असतं. मात्र तुमच्या स्वत:च्या आवडी भिन्न असू शकतात. ५.
नामसाधनेची परिणीती इष्ट देवता दिसण्यात होते हा सर्व संतांचा दावा आहे.
बरोबर. सर्वंच नसले तरी बहुतांश संत हेच म्हणतात. ६.
हा नामस्मरणाचा हा नोन रिझल्ट आहे.
आजीबात नाही. ही नामस्मरणाच्या मागे उभ्या असलेल्या निर्गुण तत्त्वाची अनुभूती आहे. ७.
शेवटी काली घालवायचीचे तर इतका खटाटोप कशापायी ?
काली सगुण आहे. सगुण घालवायचं असेल तर त्यासाठी निर्गुणाची अनुभूती यायला हवी. तुम्हाला काली झटकून टाकायची ( = डिसमिस करायची ) आहे. याउलट तोतापुरींना कालीच्या पल्याड असलेलं निर्गुण तत्त्व दाखवून द्यायचं होतं. मात्र प्रत्येकाची प्रक्रिया वेगळी असते. ज्ञानेश्वरांनी नामदेवाचा सगुण विठोबा घालवला नाही. त्यांनी नामदेवांस विसोबा खेचरांकडे पाठवलं. ८.
आणि सगळ्यांना भास व्हायला लागले, तर इतके तोतापुरी आणायचे कुठून ?
म्हणूनंच साधक परमेश्वरास आर्तपणे विनवतात. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

त्याबद्दल प्रथम तुम्हाला शुभेच्छा ! १. > नामघोषातून शांती कशी मिळते ? हे असं असल्याचं अनेकांच्या अनुभवास आलेलं आहे. थोडक्यात, तुमचा तसा अनुभव नाही, आणि जे तसा अनुभव क्लेम करतात ते `माझा पास' म्हणून उत्तर टाळतायंत. म्हणजे एकूणात काय परिस्थिती आहे हे लक्षात आलं असेल. __________________________________ २. > नामस्मरण पक्कं झालं की अजपाजप सुरू होतो. शांती तशीच राहते. हे (किंवा तत्सम) माऊलींनी सांगितलेलं आहे. आता नीट वाचा : अजपा याचा अर्थ मन पूर्णपणे अनैच्छिक होणं, मनाची क्रिया इतकी अनियंत्रित होते की ती थांबवणं अशक्य होतं. एखादा अविरत ध्वनी मेंदूत घुमू लागला तर तो मनाच्या ऐच्छिक क्रियेत कायम विक्षेप करत राहील. अशा व्यक्तीची स्मृती अस्ताव्यस्त होईल कारण काही आठवायचं म्हटलं की तो ध्वनी सारखा मधेमधे येत राहील. अशीच अवस्था तरुण प्रेमिकांची होते, (तारुण्यात प्रेम केलं असेल, तर आठवून पाहा) त्यांना एकमेकांशिवाय इतर काही सुचत नाही; याचं कारण मन अनैच्छिक होणं हे असतं, त्यामुळे यांचा वास्तवावरचा फोकस दिशाहीन होतो. _________________________________________ ३.> नामसाधनेची परिणीती इष्ट देवता दिसण्यात होते हा सर्व संतांचा दावा आहे. >बरोबर. सर्वंच नसले तरी बहुतांश संत हेच म्हणतात. एकाही संतानी नाम बंद करा असं सांगितलेलं नाही. __________________________________ ४. > हा नामस्मरणाचा हा नोन रिझल्ट आहे. >आजीबात नाही. ही नामस्मरणाच्या मागे उभ्या असलेल्या निर्गुण तत्त्वाची अनुभूती आहे. तोच तर मुद्दा आहे ! एका हातानं नामस्मरणाची घंटा सतत बडवत राहिल्यावर दुसरीकडे, त्यातून निर्गुण शांती लाभेल हा दावाच हास्यास्पद आहे ! थोडक्यात, व्यक्ती पळायचं सोडणार नाही आणि मनात मात्र स्थिर व्हायची इच्छा करणार ! ___________________________________________ ४. > तुम्हाला काली झटकून टाकायची ( = डिसमिस करायची ) आहे. याउलट तोतापुरींना कालीच्या पल्याड असलेलं निर्गुण तत्त्व दाखवून द्यायचं होतं. आता हे तर खरंच शांतपणे वाचा : काली ही निर्गुणानं स्वतःची केलेली भ्रमिष्ठ अवस्था आहे. निर्गुण कालीच्या मागे असता तर एक वेळ ठीक आहे, पण निर्गुणंच काली सोडायला तयार नाही ! म्हणून तोतापुरींना वार करायला लागतो. ______________________________________ ५. > आणि सगळ्यांना भास व्हायला लागले, तर इतके तोतापुरी आणायचे कुठून ? > म्हणूनंच साधक परमेश्वरास आर्तपणे विनवतात. आता परत वरचा ४ शांतपणे वाचा ! ज्या परमेश्वराची तुम्ही निर्मिती केलीये तो बोगस आहे, आणि ज्याला तुम्ही त्याच्यापासून सुटकेसाठी बोलावतायं, तोही तितकाच बोगस आहे. कारण दोन्हीही परमेश्वर तुमच्या मेंदूपलिकडे कुठेही नाहीत ! _____________________________________ आणि ही उघड गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा संपूर्ण लेखाचा आणि माझ्या प्रतिसादांचा एकमेव उद्देश आहे.

In reply to by गामा पैलवान

निर्गुणाचा (ही) बोध हे केवळ उपांग आहे. सगुण-निर्गुण एकच तत्व आहे हा संपूर्ण बोध, हे देखील नामस्मरण साधनेचं एक फलीत आहे. ज्याप्रमाणे दुधात पोषक तत्वं असतात, व दुध पिल्याने ति पोषक तत्व शरीरात आत्मसात होतात, त्याचप्रमाणे नामात सच्चीदानंद आहे.. नाम साधनेने ते तत्व शरीर, मन, बुद्धी आणि आत्म्याला आत्मसात करायला होतं. अगदी पहिल्या दिवसापासुन हा अनुभव येतो का? तर सुरुवात अगदी पहिल्या स्मरणापासुन होते. पण ज्या प्रमाणे प्रत्येक शरीराची पचन क्षमता भिन्न असते व त्याप्रमाणे दुधातले पोशकतत्वे आत्मसात केले जातात त्याच प्रमाणे प्रत्येक मनुष्याला नामसाधनेतुन सच्चीदानंद कसा आणि कधि गवसतो यात भिन्नता असते. पण एण्ड रिझल्ट पक्का असतो. तुमच्या चर्चेत लुडबुड करण्याची अजीबात इच्छा नाहि. पण यदाकदाचीत कोणि हि चर्चा वाचलीच तर उगाच त्याचे/तिचे नामसाधनेबद्दल गैरसमज होऊ नये म्हणु हा प्रतिसाद प्रपंच.

संजय क्षीरसागर, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझं मत सांगतो. १.
थोडक्यात, तुमचा तसा अनुभव नाही, आणि जे तसा अनुभव क्लेम करतात ते `माझा पास' म्हणून उत्तर टाळतायंत. म्हणजे एकूणात काय परिस्थिती आहे हे लक्षात आलं असेल.
जेव्हढा अनुभव आहे त्यावर तर्क बांधायला काय हरकत आहे? २.
अजपा याचा अर्थ मन पूर्णपणे अनैच्छिक होणं,
I doubt that. माझ्या मते अजपा म्हणजे स्वत: मुद्दाम न करता आपोआप होणारा जप. ३.
मनाची क्रिया इतकी अनियंत्रित होते की ती थांबवणं अशक्य होतं.
असू शकेल. ४.
एखादा अविरत ध्वनी मेंदूत घुमू लागला तर तो मनाच्या ऐच्छिक क्रियेत कायम विक्षेप करत राहील.
आजिबात होत नाही. स्वानुभव आहे. ५.
अशा व्यक्तीची स्मृती अस्ताव्यस्त होईल कारण काही आठवायचं म्हटलं की तो ध्वनी सारखा मधेमधे येत राहील.
नाही होत असं. स्वानुभव आहे. ६.
.... त्यामुळे यांचा वास्तवावरचा फोकस दिशाहीन होतो.
अमान्य. ऐच्छिक मनाच्या पलीकडे बरंच मोठं अनैच्छिक मन आहे. ७.
काली ही निर्गुणानं स्वतःची केलेली भ्रमिष्ठ अवस्था आहे. निर्गुण कालीच्या मागे असता तर एक वेळ ठीक आहे, पण निर्गुणंच काली सोडायला तयार नाही ! म्हणून तोतापुरींना वार करायला लागतो.
उलट उदाहरणही उपलब्ध आहे. विसोबा खेचरांनी कुठलाही वार न करता नामदेवांचा सगुण विठोबा अलगदपणे सोडवला. ८.
ज्या परमेश्वराची तुम्ही निर्मिती केलीये तो बोगस आहे, आणि ज्याला तुम्ही त्याच्यापासून सुटकेसाठी बोलावतायं, तोही तितकाच बोगस आहे. कारण दोन्हीही परमेश्वर तुमच्या मेंदूपलिकडे कुठेही नाहीत !
आपल्या मेंदूवर सर्वस्वी आपलंच नियंत्रण असतं, असं थोडंच आहे? मेंदूची बरीच ( ९० % ? ) क्षमता म्हणे सुप्त असते. ९.
.... आणि ही उघड गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा संपूर्ण लेखाचा आणि माझ्या प्रतिसादांचा एकमेव उद्देश आहे.
मेंदूच्या पलीकडे चैतन्य असतं, ही एकमेव गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझ्या प्रतिसादांचा एकमेव उद्देश आहे. १०.
गामा पैलवान : नामस्मरणावरचा एकमेव प्रामाणिक प्रतिसाद ! त्याबद्दल प्रथम तुम्हाला शुभेच्छा !
प्रसंसेबद्दल धन्यवाद! मला मात्र हे कथन नैसर्गिक वाटतं. खास काही सांगितल्याचं वाटंत नाही. तुम्हांस ते प्रामाणिक वाटलं, हा तुमचा मोठेपणा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

पुन्हा एकदा प्रामाणिक प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! सर्व नामसाधकांना या प्रतिसादाचा अतोनात आणि कायमचा उपयोग होईल. आता शांतपणे वाचा : १. > जेव्हढा अनुभव आहे त्यावर तर्क बांधायला काय हरकत आहे ? > आजिबात होत नाही. स्वानुभव आहे. > नाही होत असं. स्वानुभव आहे. याचा अर्थ शांती लाभेल हा तुमचा अनुभव नसून तर्क आहे आणि अजपाजप हा स्वानुभव होऊनही तुम्हाला ती लाभलेली नाही. थोडक्यात, नामस्मरणाच्या दुसर्‍या पायरीवरही रिझल्ट नाही. _______________________________________________________________ आता नामसाधनेच्या अंतीम पायरीवरचा इष्ट देवतेचं दर्शन, हा शेवटचा भ्रम उरला आहे ! आणि त्याबद्दल तुमची अशी कल्पना आहे : > विसोबा खेचरांनी कुठलाही वार न करता नामदेवांचा सगुण विठोबा अलगदपणे सोडवला. हे भव्य विधान आहे ! याचा अर्थ तुम्ही आधी विठोबा तयार करणार आणि मग तुम्हाला अनिवार्यपणे, त्याच्यापासून सुटका करुन घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. थोडक्यात, हा तुम्हीच निर्माण केलेला विठ्ठल, तुम्हाला निर्गुणाचं दर्शन होण्याच्या मार्गात अडसर होणार ! मग त्या कामासाठी तुम्ही तोतापुरींऐवजी विसोबा शोधणार ! _______________________________________________ एकतर विसोबानी नामदेवांचा विठ्ठल कसा सोडवला, या प्रक्रियेची तुम्हाला काहीही माहिती नाही, दुसरी गोष्ट, इथे फुल कॉपी / पेस्ट मारणार्‍या एका सदस्याच्या लेखातला हा उतारा वाचा : संत नामदेवांचे नामस्मरणाची महती सांगणारे एक पुस्तक १९३७ साली महर्षींच्या वाचनात आले. महर्षींच्या पलंगाजवळ असलेल्या पुस्तकांच्या छोट्या कपाटावर सहज हाती येईल अशा जागी त्या पुस्तकाची एक प्रत महर्षींनी ठेवली. ही प्रत आयुष्याच्या शेवटच्या १३ वर्षांच्या कालखंडात महर्षींनी तिथून कधीच हलवली नाही. जप किंवा नामस्मरणाविषयी आश्रमात आलेल्या अभ्यागतांनी प्रश्न विचारले, तर महर्षी नेहेमी त्या पुस्तकातली वचने वाचून दाखवत असत. महर्षींनी कित्येक वेळा या पुस्तकाचे मुक्तकंठाने गुणगान केल्याने तसेच या पुस्तकातले सातत्याने दाखले दिल्याने महर्षी त्यातल्या आशयाशी पूर्णपणे सहमत होते असे म्हणावे तर ते वास्तवाला धरूनच होईल. प्रकरण ११ - मंत्र, जप आणि नामस्मरण. थोडक्यात, उपलब्ध कागदपत्रांनुसार, विसोबांनी नामदेवांचा विठ्ठल सोडवलेला दिसत नाही. _________________________________ एकूणात तुमच्या प्रामाणिक आणि स्वानुभवातून लिहीलेल्या प्रतिसादाची इतीश्री अशी की नामस्मरण हा निव्वळ टाइमपास आहे, त्यातून शांती लाभणं तर दूरच, परत विसोबा खेचर शोधावा लागतो, आणि तो विसोबा सुद्धा नामदेवांचा विठ्ठल सोडवू शकत नाही ! _______________________________ > मेंदूच्या पलीकडे चैतन्य असतं, ही एकमेव गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझ्या प्रतिसादांचा एकमेव उद्देश आहे. अर्थात ! पण ते चैतन्य पराकोटीच्या ध्वनीशून्यतेत काम करतं, त्याचा नामस्मरणाशी सुतराम संबंध नाही. सूर्याभोवतीचं १५ कोटी किलोमिटर त्रिज्येचं वर्तुळ, पृथ्वी ज्या सहजतेनं आवर्तीत करतेयं त्यात इतकी ध्वनीशून्यता आहे की आपणही तिच्याबरोबर ती परिक्रमा करतोयं, याची कुणाला यत्किंचितही जाणीव नाही.