नवरा बायकोचं भांडण
असं काहीच नसतं
तो म्हणतो पूर्व, ती म्हणते पश्चिम
बस एवढंच म्हणणं असतं
बघितलं तर ती ही एक गंमत असते
हाताबाहेर जाईल
एवढं ताणायचं नसतं
दोन चार दिवसांच्या अबोल्यानंतर
आपोआपच नरम व्हायचं असतं
वीजांच्या कड्कडाटानंतर पावसानं
धरणीला भिजवायचं असतं
तिनं हळूच
कुशीत शिरायचं असतं
त्यानं हळूवार
कुरवळायचं असतं
मायेच्या ओलाव्यात
नवीन जग फुलवायचं असतं
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4336
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान !
धन्यवाद दुवि!
In reply to छान ! by दुर्गविहारी
अहो नेहेमी नवरोबानेच नरम
एवढं करायची गरज नाही, एक "
जोडीला गालभर मिशा जरूर नाहीत?
In reply to एवढं करायची गरज नाही, एक " by प्रसाद गोडबोले
ह्ही ह्ही ह्ही ,, मस्तय फोटू आणि प्रतिसाद
छान!