नमस्कार मिपाकरांनो,
दिनांक २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा मराठी भाषा दिन आपण मिपावर शतशब्दकथा स्पर्धेच्या रुपात साजरा करणार आहोत. विषयाला कोणतेही बंधन नाहीये, पण स्पर्धा म्हटली की नियम आणि अटी आलेच. तर ह्या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे आहेत.
१. स्पर्धा १ फेब्रुवारी २०१९ रोजी ००.०० भाप्रवे सुरू होईल आणि २० फेब्रुवारी २०१९ रोजी २३.५९ भाप्रवे संपेल.
२. स्पर्धकांनी आपली कथा साहित्य संपादक या आयडीला व्यनिने पाठवायची आहे.
साहित्य संपादकांना व्यनि पाठवण्यासाठी क्लिक करा.
कोणत्याही साहित्य संपादकाला वैयक्तिक व्यनि किंवा मिसळपाव अथवा सासं च्या इमेल आयडीवर किंवा अन्य कोणत्याही दुसऱ्या मार्गे कथा पाठवू नये.
३. प्रत्येक व्यक्ती एक शशक पाठवू शकते. एकापेक्षा जास्त शशक पाठवल्यास सर्वात प्रथम आलेल्या शशकनंतरच्या सगळ्या शशक रद्द समजल्या जातील.
४. ०१ फेब्रुवारी २०१९ ते २१ फेब्रुवारी २०१९ या काळात दर चोवीस तासांतून एकदा साहित्य संपादक आयडी आलेल्या कथा स्वतःच्या नावाने प्रकाशित करेल. मूळ लेखकाचं नाव जाहीर होणार नाही. ("कथा बघून मत देण्याऐवजी आयडी बघून मत देतात" हा आक्षेप घेतला जाऊ नये म्हणून हे करण्यात आलेलं आहे.). स्पर्धा संपल्यावर लेखकांची ओळख जाहिर करायचीचं आहे.
५. मूळ लेखकाने आपली ओळख जाहीर करू नये अशी अपेक्षा आहे. कथेच्या धाग्यावर, मिपावरच्या सार्वजनिक जागेत (अन्य धाग्यांवर किंवा खरडफळ्यावर), मिपाच्या फेसबुक पानावर किंवा ट्विटर अकाऊंटवर आपली ओळख कथालेखक म्हणून जाहीर केल्यास ती कथा रद्दबातल ठरवून स्पर्धेतून बाद केली जाईल.
६. साहित्य संपादक कथा प्रकाशित करताना मुळाबरहुकूम (म्हणजे जशी आली तशी) करतील. मुद्रितशोधन किंवा अन्य कोणतेही संपादकीय संस्कार केले जाणार नाहीत. स्पर्धेमधल्या शतशब्दकथेमध्ये व्याकरणाचे नियम, शुद्धलेखन, मुद्रितशोधनाची वगैरेची जबाबदारी संपूर्णपणे स्पर्धकाची असेल.
७. शशक ही (शीर्षक वगळता) बरोब्बर शंभर शब्दांत लिहिली जाणं अपेक्षित आहे. आलेली शशक जशीच्या तशी "मायक्रोसॉफ्ट वर्ड" मध्ये चिकटवून वर्डकाऊंट पाहिला जाईल. शंभरपेक्षा कमी अथवा जास्त असल्यास स्पर्धेतून बाद समजली जाईल आणि प्रकाशित होणार नाही.
८. तसंच, कथेत कोणतीही चित्रं, दृक्-श्राव्य दुवे, फॉरमॅटिंग वगैरे असल्यास ते वगळून कथा प्रकाशित केली जाईल.
९. जातिधर्माला दुखावणारं वा अश्लील लेखन आल्यास कथा स्पर्धेसाठी न घ्यायचा निर्णय संपादकीय अधिकारात घेतला जाईल. प्रवेशिका नाकारायचा अधिकार साहित्य संपादक राखून ठेवत आहेत. स्पर्धा संपल्यावर लेखक नियमबाह्य कथा स्वतःच्या जबाबदारीवर प्रकाशित करू शकतात.
१०. कथेला आपण देऊ इच्छित असणारं नावं व्यनिच्या विषयामधे लिहिलेलं असावं.
११. कुठेही पूर्वप्रकाशित कथा स्वीकारली जाणार नाही.
१२. कथा आधारित असल्यास तसा स्पष्ट उल्लेख कथेच्या शेवटी करावा. हे शब्द १०० मध्ये मोजले जाणार नाहीत.
मतदान कथा प्रकाशित झाल्यावर लगेच सुरू होईल आणि दिनांक २५ फेब्रुवारी २३.५९ भाप्रवे पर्यंत करता येईल.
मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.
निकाल २७ फेब्रुवारी २०१९ रोजी म्हणजे मराठी भाषा दिनी जाहीर केला जाईल.
लेखन करण्याविषयी/व्यनिविषयी/स्पर्धेविषयी कोणतीही शंका असल्यास प्रतिसादांमध्ये विचारू शकता.
एक मार्गदर्शिका-
कथा मराठी मध्ये असावी. एखादं हिंदी-इंग्रजी वाक्य कथेची गरज म्हणून चालेल, पण कथा मराठीत हवी. प्रमाण मराठी, झाडीबोली, वऱ्हाडी, खान्देशी, सातारी, पुणेरी, आगरी, मालवणी... कोणतीही पण मराठीत हवी.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचन संख्या
29994
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त...
+1
In reply to मस्त... by ज्ञानोबाचे पैजार
छान. शुभेच्छा!
एका कथेला एकच +१ देऊ शकता.
In reply to छान. शुभेच्छा! by एमी
ओके. धन्यवाद. Like सारखंच आहे
In reply to एका कथेला एकच +१ देऊ शकता. by जव्हेरगंज
मस्त. अलीकडेच मनात येऊन गेलं
अरेवा ! बर्याच दिवसांनी
उद्यापासून स्पर्धा सुरू!!
७. शशक ही (शीर्षक वगळता)
शब्द कमी-जास्त झालेच तर
In reply to ७. शशक ही (शीर्षक वगळता) by विजुभाऊ
अभिनंदन..
कोरडं अभिनंदन??
In reply to अभिनंदन.. by चिगो
पण बक्षीस काय असणार आहे?
शतशब्दकथा हा विशेष लेखनप्रकार
काही सुचवू इच्छितो
कथालेखक जी
In reply to काही सुचवू इच्छितो by मराठी कथालेखक
नियम बदलल्याने कोणावरही
In reply to कथालेखक जी by तुषार काळभोर
शतशब्दकथा स्पर्धा छान चालली
बक्षिस
शशक च्या गुणांक पद्ध्तीत सुधारणा करता येईल काय?
मआंजावर वेगवेगळे कंपू आहेत हे
ही शक्यता आहेच, ती नाकारता
In reply to मआंजावर वेगवेगळे कंपू आहेत हे by एमी
शक्यता माझ्या लक्षात स्वतःहून
In reply to ही शक्यता आहेच, ती नाकारता by यशोधरा
जाऊद्या हो, इथे भारतरत्न,
In reply to शक्यता माझ्या लक्षात स्वतःहून by एमी
शक्यता माझ्या लक्षात स्वतःहून
In reply to शक्यता माझ्या लक्षात स्वतःहून by एमी
शक्यता माझ्या लक्षात स्वतःहून आली नाहीय. मिपावर फारसे एक्टिव नसणारे चार आयडी, जे माबोवर एकाच कंपूत आहेत त्यानी एका कथेला मत दिलंय :Dत्या कंपूतल्या आयडींनी नेमक्या त्यांच्याच माणसाला मतदान केलंय हे तुम्हाला कसं कळालं, कारण इथे कथा लेखकाच्या नावाने प्रकाशित न होता अॅनानिमसली प्रकाशित होत आहेत.कारण त्या कथेला मतदान
In reply to शक्यता माझ्या लक्षात स्वतःहून by किसन शिंदे
मी सोडून दया अशा ह्या गोष्टी,
In reply to कारण त्या कथेला मतदान by एमी
साला मै भोत दिन इधर आया नै या
भोत दिन से इधर आया .... त्या
In reply to साला मै भोत दिन इधर आया नै या by भीमराव
प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद देने
काही ठिकाणी तुम्ही फक्त "१"
In reply to प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद देने by भीमराव
मी आज कथा पाठवू शकतो का?
वेळ उलटून गेली आहे
In reply to मी आज कथा पाठवू शकतो का? by bhagwatblog
मतदानाची वेळ संपलीये !!
दोन / चार ताव कथा कागदावर
निकाल आणि लेखक सांगा पटकन!
थोडेसे अवांतर
+१
In reply to थोडेसे अवांतर by हेमंतकुमार
@ कुमार१,एखादा लेख कष्टपूर्वक
In reply to थोडेसे अवांतर by हेमंतकुमार
पहिली गळ दुसरी ग्लास तिसरी
गॅस चेंबर?
In reply to पहिली गळ दुसरी ग्लास तिसरी by प्रमोद देर्देकर
हो, खूप hilarious होती :)
In reply to गॅस चेंबर? by श्वेता२४
पहिली गळ दुसरी ग्लास तिसरी
निकाल दिसत नाहि
निकाल लागला का? दिसत नाही
निकाल लागेपर्यंत कोणत्या
मस्त आयडीया..
In reply to निकाल लागेपर्यंत कोणत्या by वकील साहेब
मस्त आयडीया..
In reply to निकाल लागेपर्यंत कोणत्या by वकील साहेब
गॅस चेंबर :- अतृप्त आत्मा
In reply to मस्त आयडीया.. by ज्ञानोबाचे पैजार
ग्लास :जव्हेरगंज
आमचा अंदाज
लॉकडाऊन निमित्ताने