Skip to main content

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 01/01/2019 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

वाचने 227966
प्रतिक्रिया 616

प्रतिक्रिया

In reply to by डँबिस००७

त्यांनी सगळ्या देशांची इकॉनॉमी मोजली , अन आपल्या मोदी सरकारला किती नोटा गोळा झाल्या , हे अजून मोजता येईना . ( आपल्या जुन्या अन नव्या दोन्ही नोटा चुकून वर्ल्ड ब्यांकवाल्यानी हिशोबात धरल्याने इकॉनॉमी वाढली असेल का ? )

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

http://nbt.in/nItG6a/bga via @NavbharatTimes: http://app.nbt.in आता पुन्हा दिल्ली पोलीस , सी बी आय कामाला लागणार . कोणी फोन केला ? हल्ल्याचा प्लान करण्याचा उद्देश्य काय ? हे सगळ चौकशी करून निष्पन्न काय होणार ? तर पुन्हा एकदा केजरीवाल चे थोबाड फोडन्याचा प्लान होता = ) = )

In reply to by डँबिस००७

लोकसंख्या वाढल्याने अर्थव्यवस्थेचा आकार वाढतोय ह्यात कोणत्याही सरकारचे काही कर्तृत्व नाहीय. पर कॅपिटा इनकम, इनकम इक्वॅलिटी, ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स, पर्यावरण संवर्धन ह्या सगळ्या बाबतीत पीछेहाट चालू आहे आणि सरकार जीडीपीचे, पर्यावरण विकासाचे खोटे आकडे पब्लिश करण्यात मश्गुल आहे. नुकताच युएनने भारतीय सरकारने दिलेला जंगलवाढीसंबंधीचा विधा नाकारला आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अंगूठाछाप असलेल्या नेत्याचे तितकेच निर्बुद्ध चेले मात्र आनंदात निथळत असतात. रिसोर्स लिमिट्स व क्लायमेटचेंजमुळे ह्या अवाढव्य लोकसंख्येला किती त्रास होणार आहे ह्या विचाराची तिरीपही ह्यांच्या घनगर्द अंधाऱया मेंदूत पडत नाही. चांगला विकास चालू आहे.

In reply to by नगरीनिरंजन

"गेल्या साडे चार वर्षांत लोकसंख्या वाढल्याने अर्थव्यवस्थेचा आकार वाढतोय ह्यात कोणत्याही सरकारचे काही कर्तृत्व नाहीय " हे वाचुन खुप करमणुक झाली !! गेली कित्येक दशक भारत हा चीन पाठोपाठ लोकसंख्या असलेला देश आहे , मग तेंव्हाच्या अर्थ व्यवस्थेने काय घोड मारल होत की भारताच्या अर्थ व्यवस्थेला पहीला नंबर मिळाला नाही ?

In reply to by सुबोध खरे

' काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशन मध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना डोक्याला कायमचूर्ण चोळायला सांगत ' अस मी कूठ तरी वाचलय बुवा !!!

In reply to by नगरीनिरंजन

अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अंगूठाछाप असलेल्या नेत्याचे तितकेच निर्बुद्ध चेले मात्र आनंदात निथळत असतात.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांच्या म्हणण्यानुसार तर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. आता त्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अंगूठाछाप आहेत की अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अंगूठाछाप नेत्यांच्या तितक्याच निर्बुद्ध चेल्या आहेत की त्यांनी हे पर कॅपिटा इनकम, इनकम इक्वॅलिटी, ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स, पर्यावरण संवर्धन ह्या सगळ्या बाबतींंचा विचार न करता मत ठोकून दिलय हे माहिती नाही. जाता जाता, ही बातमी NDTV Twitter handle वरून घेतली आहे.

In reply to by नगरीनिरंजन

India to become bigger than China eventually: Raghuram Rajan "WEF Annual Meeting 2019" मध्ये, आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी, त्यांच्याच मिपावरील तथाकथित अर्थतज्ज्ञ पाठीराख्यांना, घरचा आहेर देऊन ,तोंडावर पाडले आहे... =)) India will eventually surpass China in economic size and will be in a better position to create the infrastructure being promised by the Chinese side in South Asian countries, former RBI governor Raghuram Rajan said on Tuesday. Addressing a session on Strategic Outlook for South Asia, Rajan said Indian economy would continue to grow while growth rate is slowing down in China.

In reply to by नगरीनिरंजन

India to become bigger than China eventually: Raghuram Rajan मिपावरील तथाकथित अर्थतज्ज्ञांच्या लाडक्या आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांनी, "WEF Annual Meeting 2019" मध्ये, त्यांच्याच पाठीराख्यांना, घरचा आहेर देऊन, तोंडावर पाडले आहे... =)) India will eventually surpass China in economic size and will be in a better position to create the infrastructure being promised by the Chinese side in South Asian countries, former RBI governor Raghuram Rajan said on Tuesday. Addressing a session on Strategic Outlook for South Asia, Rajan said Indian economy would continue to grow while growth rate is slowing down in China.

पंजाब नॅशनल बँकेला करोडो रुपयांचा चुना लावून देश सोडून गेलेला आरोपी मेहुल चोक्सी याला भारतात आणण्याचा मार्ग आता आणखी बिकट होणार आहे. कारण चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडले आहे. एबीपीच्या वृत्तानुसार, चोक्सीने भारतीय पासपोर्ट एंटीगुआ उच्च आयोगामध्ये जमा केला आहे. मेहुल चोक्सीने आपला पासपोर्ट क्र. Z3396732 कन्सिल्ड बुकसोबत जमा केला आहे. भारतीय नागरिकता सोडण्यासाठी त्याला १७७ डॉलरचा ड्राफ्टही जमा करावा लागला आहे. याबाबतची सूचना परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमित नारंग यांनी गृहमंत्रालयाला दिली आहे. नागरिकता सोडण्याच्या फॉर्ममध्ये चोक्सीने आपला नवा पत्ता जॉली हार्बर सेंट मार्कस, एंटीगुआ असा नोंदवला आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

एवढ़ी मोठी भानगड मेहुल एकटा कशी करू शकेल?त्याला इथल्यानोकर्शाहीची साथ असणारच.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

एवढ़ी मोठी भानगड मेहुल एकटा कशी करू शकेल?त्याला इथल्यानोकर्शाहीची साथ असणारच.

Karnataka Congress MLA lands in hospital after 'clash': What happened at resort ! कॉंग्रेसच्या एका आमदाराने दुसर्या आमदाराचे डोके फोडले ते पण जेंव्हा सगळे आमदार एका रीझोर्ट मध्ये लपुन बसलेले होते ! कामल आहे ? हे म्हणे ईतर पक्षांबरोबर महा गठ बंधन करुन देशाला सरकार देणार !! ह्यांचे महाठगबंधन होणार !! Read more at: https://m.timesofindia.com/india/karnataka-congress-mla-lands-in-hospit…

लेह, लडाख, कारगील पाॅवर ग्रीड मधे आल्यावर भारताने आता पुढची खेळी खेळायला सुरवात केली की काय अशी शंका यायला लागलीय. आता काश्मीरमधे विजनिर्मिती वाढवायच्या मागे भारत लागलाय. तस म्हटल तर भारताच्या वाटणीच बरच पाणी पाकिस्तानात वाहून जातय. धरण बांधून ते अडवल पाहिजे. पण ते होत नव्हत. किशनगंबावर धरण बांधून विजनिर्मिती सुरू केली होती व त्याचा फायदा लेह लडाखला व्हायलाही लागला होता, पण पूर्ण क्षमतेने विजनिर्मिती करता येत नव्हती. आता हा विजनिर्मितीचा व्याप वाढवायचा खटाटोप चालू झालाय. इतकेच नव्हे तर चिनाब नदीवरील रातलेच ८५० मेगॅवॅटचा विद्युत प्रकल्पाचे धरणाचेच काम सरकारने चक्क सुरू केलय. दिल्लीतील पाक वकिलातीमधील सल्लागार, तारीख करीम यांनी ०८/११/२०१८ च्या पत्राद्वारे पाकीस्तानला तस कळवलय सुध्दा. (भारत स्वत:हून कशाला हे जाहीर करेल म्हणा.) अस वाटतय की पाॅवर ग्रीडच्या जोडणीचीच जणू सरकार वाट बघत होत. जरा भूतकाळात डोकावल तर अस दिसतय की, हे सर्व एखादी बुध्दीबळावरची खेळी असल्यासारख वाटतय. सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार १९६० साली झाला. पण पुढे काहीच होत नव्हत. भारताच्या वाटणीचे पाणी पाकिस्तानला मिळत होत. पण... जम्मू काश्मीरमधील अतिरेकी कारवायांना शह म्हणून सिंधू नदीचे भारताच्या वाटणीच पाणी अडवायच व पाकिस्तानच नाक दाबायचा प्रयत्न करायचा, शिवाय हे सर्व करत असताना भारत कागाळी करत नसून पाकच आडमुठेपणा करतोय हे जगापुढे मांडायच अस काहीस सुरू व्हायला लागलय. खर तर या कामाला पाकिस्तानने हरकत घेतलीय. त्यांच अस म्हणणे आहे की, रातले विद्युतयोजनेचा आराखडा चुकीचा आहे. काहीही करून भारताला त्याच्या वाटणीच पाणी अडवू द्यायच नाही, जेणेकरून ते पाणी आपोआप पुढे पाकिस्तानात वाहत जाईल इतकी साधीसुधी पाकीस्तानची रणनिती आहे. पाकिस्तानची इच्छा आहे की, ७ सदस्यांच्या आंतरराष्टीय लवाद कोर्टापुढे याचा निवाडा व्हावा. तर भारत म्हणतय की तटस्थ तज्ञ नेमला जावा. (कोर्टापुढे प्रकरण गेले की कालापव्यय करणे सोपे जाते तर तटस्थ तज्ञ फारच चटकन निर्णय देतो.) यात जागतीक बॅंकेने शेवटी लक्ष घालून १२ डिसेंबर २०१६ ला भारताला काम थांबवायला सांगितल. भारताने काम थांबवल. पाकिस्तान खूष झाल. (प्रत्यक्षात जोपर्यंत पाॅवर ग्रीडची जोडणी होत नाही तोपर्यंत विजनिर्मितीच्या प्रयत्नांना काही अर्थच नव्हता) तटस्थ तज्ञ नेमण्याची भारताची मागणी मान्य होणार यात काहीच शंका नव्हती. कारण आंतरराष्ट्रीय लवाद नेमण्यासाठी दोन्ही देशांची परवांगी लागते. कोणी एक देश म्हणतो म्हणून असा लवाद नेमला जात नाही. फक्त याबाबत निर्णय व्हायला वेळ लागणार होता व तेच पाकीस्तानला पाहिजे होते. गंमत म्हणजे भारतालाही ३५० किमीची विजेची लाईन टाकायला वेळ पाहिजेच होता. दोघांनाही वेळ पाहिजे होता. दोघांनाही तो मिळाला. दोघेही खूष होते. ३५० किमी लाइनचे काम सुरू झाले. लेह लडाख बद्दल जेव्हा भारत काही करायला सुरवात करते तेव्हा चीन एकदम सावधगिरीचा पवित्रा घेते. यावेळीही तसेच झाले असावे. भारत ही लाईन चीनपासूनची संरक्षण सिध्दता करण्यासाठी टाकत असावी असा ग्रह पाकचा झाल्यास नवल नव्हते. ही समजूत घट्ट व्हायला डोकलाम प्रकरणाचाही फायदा झाला असावा. प्रत्यक्षात डोकलाम प्रकरण पूर्णपणे वेगळ होत. पण ही लाईन पूर्ण झालीय व भारत चीन संबंधातला ताण खूप निवळला आहे. हा योगायोग आहे का आणखी काही आहे? काय माहिती? तटस्थ तज्ञ नेमण्याचे भारताचे म्हणणेही ३१ मे २०१८ला जागतीक बॅंकेने मान्य केले व तसे पाकिस्तानला कळवले सुध्दा. अर्थात पाकिस्तान तरीही त्याकडे कानाडोळा करत राहीले. त्यांना न्याय मिळण्यात रस नव्हताच. काम बंद पडल्यामुळे ते खूष होते. आता भारताने काम सुरू केलय. पाकिस्तानची ७ सदस्याची अट मान्य होत नाहीये. तटस्थ तज्ञ नेमायला सांगूनही पाकिस्तान ऐकत नाहीये. भारत ऐकत नाहीये ही तक्रार कोणत्या तोंडाने जागतीक बॅंकेकडे करायची असा प्रश्न पाकीस्तानपुढे पडलाय. जर प्रश्न उकरून काढला तर त्याची परिणिती तटस्थ तज्ञ नेमण्यात होणार हे पाकिस्तानला कळून चुकलय. गप्प बसून चालणार नाहीये कारण भारताने धरणाचे काम तर सुरू केलय. धरल तर चावतय...... अशी स्थिती पाकिस्तानची झालीय. भारताकडे मात्र बोलायला बरेच मुद्दे आहेत. जागतीक बॅंकेने जे सांगितले त्याचा आम्ही आदर केलाय. आम्ही १२/१२/२०१६ पासून काम थांबवलय. मात्र ३१ मे २०१८ पासून पाकीस्तान मात्र त्याला जे सांगितले ते ऐकत नसेल तर आम्ही किती वाट पहायची? थोडक्यात स्टे आॅर्डर भारत मोडतय पण पाकिस्तानच्या आडमुढेपणामुळे तस नाईलाजाने कराव लागतय!!!! वगैरे वगैरे. पण भारत गप्प आहे. काय करायचे आहे बोलून? धरणाचे काम तर सुरू केलय!!!!

In reply to by शाम भागवत

ह्याला म्हणतात आंतराष्ट्रिय राजकारण , आता पर्यंतच भारत सरकार अहिंसा, दया बुद्धी वैगेर सारख्या बाळबोध रीतीचा वापर करत होता. आता कुठे चाणक्य नीती सुरु केलेली आहे.

हा ४०० वा प्रतिसाद. अजून महिन्याचे १० दिवस राहील्येत. मे २०१९ ला आठवड्याच्या घडामोडी काढायला लागणार बहुतेक. :)

26 जानेवारी 26 January Speech in Hindi म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिवस. पण बऱ्याच जणांना माहिती नाहीये कि जर २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान पूर्ण झाले तरीही आपण २ महिने का थांबलो. कारण कॉंग्रेसन जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अभूतपूर्व अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणी संपूर्ण देशाला आव्हान केले कि २६ जानेवारी १९३० पासून सबंध भारतभर हा दिवस स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा करावा अन त्यानंतर हा दिवस स्वतंत्रता दिवस म्हणून नेहमी साजरा केला जायचा, अन म्हणूनच या दिवसाच महत्व हजारो वर्ष जसेच्या तसे राहावे म्हणून या दिवसापासून संविधान लागू केले गेले अन हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो

सुधा मूर्ती यांनी विचारलेला प्रश्न https://youtu.be/scRnSo2ZEgw आनंद महिंद्रा यांनी विचारलेला प्रश्न https://youtu.be/5YHE7uo5TqM ठकलपत्रे जशी आली तशी इथे ढकलली आहेत. तज्ञ लोक खर खोट योग्य अयोग्य वगैरे सांगतील अशा अपेक्षेत.

कुणी शुजा नामक हॅकरने 'आप' व भाजपाने ईव्हीएम हॅक करून निवडणूका जिंकल्या होत्या असे सांगितले. काही प्रश्न १) हा हॅकर एवढे वर्षे गप्प का होता? २) निवडणूक आयोगाने चॅलेंज दिला होता. त्यावेळी हा का नाही बोलला? २) ह्याने घेतलेल्या परिषदेत कपिल सिब्बल दिसले. हा काय प्रकार ? ई.व्ही.एम. ला इंटरनेट कनेक्शन नसते मग अशी शेकडो हजारो ई.व्ही.एम्स कशी काय हॅक करता येतील? काँग्रेसवाले अजिबात अभ्यास न करता असले गेम खेळतात व तोंडावर आपटतात असे ह्यांचे मत.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

हा आजच का बोलला , पूर्वी का नाही बोलला , हा युक्तिवाद खरा मानला तर भाजपाला मंदिर मुद्दा स्वाहा करावा लागेल, त्याने सर्व पक्षाच्या लोकांना व निवडणूक आयोगास बोलावणे दिले होते म्हणे,

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

त्याने सरळ टी.व्ही. वर यावे व ई.व्ही.एम. भाजपा व आपने कशी हॅक केली ते सांगावे. 'एथिकल हॅकिंग' का काय म्हणतात ते. "मी इस्रोचा उपग्रह हॅक केला ' असे कोणी विधान केल्यास काय म्हणाल? "सिद्ध करून दाखव' असेच ना? राजकारण व विज्ञान्/तंत्रज्ञान वेगळे आहे. विज्ञान्/तंत्रज्ञानात 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' हा नियम आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

राम मंदिर हा हिंदुंच्या अस्मितेचा प्रश्न आहे ! गेली 70 वर्षे कॉंग्रेसने हिंदुंच्या अस्मितेशी खेळ केलेला ! त्यापुढे जाउन श्री राम हा मिथ्थ असल्याच प्रतिज्ञा पत्र सु कोर्टाला दिल ! आता तेच कॉंग्रेस चे नेते जनतेला उल्लु बनवायला जनैवुधारी म्हणवुन घेत आहेत ! कॉंग्रेसच्या अंध अनुयायांना हे दिसत नाही !

In reply to by डँबिस००७

मग बाबराच्या काळात जो अयोध्यानरेश होता , तो तेंव्हा गप्प का बसला ? ( तो आताच का बोलला, तेंव्हा का नाही बोलला , ह्या चालित हे वाचावे, म्हणून उदाहरण दिले.) (तुम्ही तिथेच काय सगळीकडे राममंदिरे बांधा, माझी हरकत नाही.)

In reply to by डँबिस००७

मोदी राममंदिर का बांधत नाहीत? , तर उत्तर द्यायचे , कोर्ट बांधायचा आदेश देईल, मग काँग्रेसच्या नावाने का बोंबा मारायच्या ? त्यांना कोर्टाचे आदेश लागू होत नाहीत ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

काँग्रेसच्याही आधी 600 वर्षे कुणी ना कुणी हिंदुत्ववादी राजे आयोध्येवर होऊन गेले असतीलच ना ? ते नकाशा रंगवून मोघलांना पाणी पाजले , वगैरे , त्या नकाशात अयोध्या नव्हती का ? मागच्या पुढच्या सगळ्या राजवटीनी गप्प बसले , तर त्यावर सगळे गप्प , अन काँग्रेसने निदान दार तरी उघडून दिले , तर काँग्रेसच दोषी ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आपल्या (कुठल्याही प्रकारच्या) अधोगतीला इतर धर्मीयांना जबाबदार ठरवणं हा हिंदुंचा मागासलेपणा आहे. आमच्या वैदीक विमानांचे (खरे-खोटे देव जाणे) डॉक्युमेण्ट्स जाळले, आमची विद्यापिठं जाळली, आमची मंदीरं लुटली, आमचे लोकं बाटवले, आमच्या देशाची फाळणी केली... अरे.. तुम्ही काय करत होते हे सगळं होत असताना... लाज वाटली पाहिजे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

कॉंग्रेसच्या नावाने बोंबा मारणारच ! कारण मुसलमानांनी वेगळा देश मागीतला आणी कॉंग्रेसने तो दिला मग बाबरी सारख्या जागेवर त्यांचा हक्क रहातच नाही पण कॉंग्रेसचे हलकट नेते पाकीस्तान सारखा वेगळा देश दिल्यावर उरलेल्या देशातल्या सगळ्या वर मुसलमानांचा प्रथम हक्क आहे अस मानतात व ओपनली बोलतात !! ह्या कॉंग्रेसी मध्ये एकही दम असलेला नेता नव्हता ज्यांने ह्याचा जाब विचारला !! मतांसाठी ईतके मिंधे लोक कधी पाहिले नाहीत !!

In reply to by डँबिस००७

इतके आहे तर कशाला काँग्रेसपासून मंदिराची अपेक्षा ठेवायची? अडवाणी फुस्स झाले , वाजपेयी फुस्स झाले , आता लवकर मोदी, योगीकडून बांधून घ्या, नैतर कालचक्र फिरून पुन्हा त्रेतायुग अवतरायचे ,

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

भाजपाचे नेते फुस्स झाले तर होउ द्या तुमचा अख्खा कॉंग्रैस पक्षच ढुस्स झालाय ते बघा आधी !! दुसर्याच वाकुन बघताना तुमची मान मोडायची !!

In reply to by डँबिस००७

पण पाकिस्तान काँग्रेसने नाहि तर हिंदुंनी दिला. अयोध्या, काशि, मथुरा, सोमनाथ... यांची रक्षा हिंदुंना करता आलि नाहि. सगळी जबाबदारी हिंदुंवर येते, काँग्रेसवर नाहि. असो.

In reply to by अर्धवटराव

सहमत. पेन्शनर राजे महाराजे ह्यांच्यावरही जबाबदारी येते, १९४७ साली हिंदू राजाना पत्रे धाडली होती की भारत हे हिंदू राष्ट्र नसेल , त्यामुळे भारतात सामील होऊ नका, त्रावणकोर व अशा अनेक राजाना अशी पत्रे कुणी धाडली होती ? https://www.google.com/search?q=travankor+savrkar&oq=travankor+savrkar&…

त्याने सर्व पक्षाच्या लोकांना व निवडणूक आयोगास बोलावणे दिले होते म्हणे, -- -- मग निवडणुक आयोगाने ई. व्ही. एम. हॅक करण्याचे खुले आव्हान दिले होते, तेंव्हा ही कॉंग्रेसी पिलावळ कुठे लपली होती ? तेंव्हा घ्यायचे की आव्हान. आता परदेशात जाऊन भारतीय निवडणुक आयोगाची बदनामी करण्यात काय अर्थ आहे. -- या कॉंग्रेसी नेते/समर्थकांचा मेंदु बहुतेक गुडघ्यातच असावा. जर सत्तेत नसून २०१४ साली भाजपा मतदान यंत्रे हॅक करुन विजय मिळवू शकला तर आता केंद्रात व राज्यात सत्तेत असूनही तीन राज्याच्या निवडणुका कश्या काय हरला. ऐवढा विचार करण्याइतका ही मेंदू ह्या लोकांच्या डोक्यात नाही.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

हो, लोकही जागृत झाले आहेत , मशीन , वाहन यावर लक्ष ठेवतात , बिन नंबरची गाडी , अनोळखी लोक मशिनजवल सापडणे , अशा घटना उघडकीस आलेल्या आहेत

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

बिन नंबरची गाडी , अनोळखी लोक मशिनजवल सापडणे , अशा घटना उघडकीस आलेल्या आहेत की हे सगळे कॉंग्रेसचेच लोक आहेत !!

Sea Vigil: India kicks off largest-ever coastal defence exercise to test steps taken since 26/11 २६ /११च्या मुंबई हल्ल्या नंतर अश्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारीची चाचपणी १० वर्षांनतर सुरु झालेली आहे . कॉंग्रेस सत्त्येत असताना फक्त मोठ्या बाता ठोकल्या, ग्राउंड लेव्हलला एकही तयारी केली नाही ! वायुदलाला युद्ध सज्ज विमान, ह्या कॉंग्रेसला १२ वर्षांपर्यंत घेउन देता आल नाही त्यांच्याकडुन आणी काय अपेक्षा असणार ? पाकीस्तान कडुनच पंत प्रधान हटवण्याची मदत मागायला मात्र हे कॉंग्रेसवाले पुढे !!

In reply to by डँबिस००७

पाकिस्तानचीही गम्मतच की. काँग्रेसकाळात दोन चार युद्धे होऊन पाक म्हणते, काँग्रेसच पाहिजे आणि मोदी काळात एकही युद्ध नाही ,तरी पाकला भाजपा नको

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल.

2019 मध्ये अपयशाचे खापर डोक्यावर फुटायला नको म्हणून बहिणी ला ऊ प्रदेश च्या सरचिटणीस पदी नेमणुक करून टाकली . हा महाभाग आता पर्यन्त बैकफुट वर सुद्धा खेळत नव्हता , सदनकदा थर्डमैन बावउंड्री वर फील्डिंग करत होता आणि आता फ्रंटफुट वर खेळण्या च्या गमजा = ) = )

In reply to by ट्रम्प

भाजपाच्या घरात दुसरी तिसरी फळी नाही , म्हणून लोक देव पाण्यात ठेवून बसले होते, फळी सापडली का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

कोण लोक?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

अहो !तुम्हाला मुद्दा नीट कधीच समजत नाही का ? !!! पुन्हा एकदा गांधी घरान्यातिल वारसदार 135 करोड़ लोकांच्या उरावर बसायला येत आहे , ते सुद्धा वध्रा नाव न लावता ( जाणीवपूर्वक मीडिया वाले गांधी उच्चारत आहेत ) पूर्वीची जनता अशिक्षित , गरीब होती म्हणून गांधी चलानी नाण्याच्या मागे धावायची !! आता तसे नसताना 2019 मध्ये स्वतःच्या ताकतीवर खान्ग्रेस ला बहुमाता पर्यन्त नेउ शकण्याची खात्री नसल्यामुळे पप्पू शेठ अजुन एक गांधी भारतीय जनतेच्या डोक्यावर बसवत आहेत , आणि तुम्ही त्याचे समर्थन करताय ?? अरे रे !!! किती ही गुलामगिरी !! गांधी घरण्या व्यतिरिक्त एक ही नेता त्यांना उत्तर प्रदेश सरचिटणीस म्हणून नेमता येवू नये ? म्हणजे दोनच शक्यता , एकतर बाकीचे आता त्या लायकीचे राहिले नाही किंवा घराणेशाही पुढे दामटने .

In reply to by ट्रम्प

गान्धी घराण्याला सध्या खच्चुन ३ वारस आहेत , सोनिया, राहुल अन प्रियान्का, कॉम्ग्रेस पक्शात अन देशात ढीगभर खुर्च्या आहेत, कुणीही कुठेही बसु शकतात. प्रियान्का पुढे आली की भ्रुणह्त्या कराय्ला भाजपीय अश्व्त्थामे पुढे येणार हे अपेक्शितच होते. तुमचे लेखन स्वातंत्र्य अबाधित आहेच.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

काय ब्ल्याक क्याटराव परीवाराची री ओढणार्‍यांना त्यांचे वारसपण नीट मोजता येत नाहीत , प्रियांका गांधींना कळवावे लागेल बरे का ! १) सोनीया गांधी आता रितायरमेंटला आहेत असे म्हणतात वय ७२ म्हणजे राजकारणात खूप नाही तरीही आता राणी पदा पेक्षा राजमाता पदात रस असण्याची शक्यता अधिक नाही का ? पण तरीही परिवार भक्तांना त्यांना मोजावेच लागते हेही खरे. २) राहुल गांधी ३) राहुल गांधींनी विवाह केल्यास त्यांची होऊ शकणारी पत्नी ४) राहुल गांधींना मुले झाल्यस त्यांची मुले ५) प्रियांका वड्रा ६ ) रॉबर्ट वड्रा (कुणाचे नाव विसरले ते लक्षात आले का ?) ७) रेहान प्रियांका वड्रा (कुणाचे नाव विसरले ते लक्षात आले का ?) ८) मिराया प्रियांका वड्रा (कुणाचे नाव विसरले ते लक्षात आले का ?) राहुल गांधी , रेहान किंवा मिराया वड्रा निपुत्रिक राहीले तर ९) मनेका संजय गांधी १० ) वरुण संजय गांधी ११) यामिनी वरुण गांधी १२) वरुण गांधींची भविष्यात होऊ शकणारी मुले आता वरुण गांधी ब्रँच निपुत्रिक राहीले तर वड्रांचे इतर नातेवाईक एवढे सगळे असताना तुम्हाला केवळ दोन तीनच नावे आठवली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा (सॉरी परिवाराचा) एवढा घोर अपमान ?

In reply to by माहितगार

सध्या काँग्रेसमध्ये असून सज्ञान, निवडणूकपात्र इतकीच मोजली , जावइ हा लाडका असला तरी तो तिकडचा असतो , म्हणून वदराला धरले नाही, मनेकाबाई भाजपात आहेत , त्यामुळे तिकडचे धरले नाहीत

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

जावै बापूंना तिकडचे आणि मुलांना अज्ञानि म्हनता काय ? तुम्ही आतून भाजपाला फुटले का काय ? काँग्रेस परिवार भक्त हो ब्ल्याक क्याटरावांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात यावे असा प्रस्ताव प्रियांका मुआडम कडे पाठवावा

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ब्ल्याक क्याटराव चुक्याच तुम्हारा, रैहानरावास्नी १८व वरीस लागण्याच्या आसपास दिसत्यात. धाकल्या मालकांस्नी असं विसरून कसं चालन ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

व्यावसाईक आणि वैयक्तिक आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा होण्यासाठी समाजमाध्यमे उपयोगी ठरतात या अर्थाचे संशोधन मागे वाचले होते. मिपा सारख्या व्यासपीठाचा... त्यातही काही ठराविक धाग्यांचा या कामासाठी ज्या सातत्याने आणि सफाईदारपणे वापर होत आहे ती बाब मिपा सारख्या माध्यमांचे महत्व चे आजच्या काळात अधोरेखित करणारी आहे का ? @ Blackcat तुमचे या विषय बद्दलचे मौलिक मत जाणून घ्यायला आवडेल

In reply to by lakhu risbud

देशाच्या राष्ट्रीय आयुष्यातील साचून राहिलेला उद्वेग,निराशा यांचा निचरा कुठे करायचा असतो ?

In reply to by ट्रम्प

निर्मला सीतारामन यांनी राफेलच्या आरोपांना संसदेत उत्तर दिले म्हणून मोदी स्वतःला वाचवण्यासाठी एका स्त्रीला पुढे असा आरोप आत्ताच तर रागाने केला होता. मग आता प्रियंकाला पुढे करणे हे एका स्त्रीच्या मागे लपणे का नाही? स्वतःला काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून घोषित केल्यावर युपी मध्ये हरायची भीती वाटते आहे काय? एवढंच नव्हे तर अमेठीमधून पण हरायची भीती वाटते म्हणून ३ सीट्स वरून लोकसभा निवडणूक लढणार आहे म्हणे.

In reply to by ट्रेड मार्क

राष्ट्रीय अध्यक्ष पद आहे , मग पुन्हा दुसरे पद दुसर्याला द्यावे लागेल ना ? तुम्ही तुमच्या भाजपाच्या फळ्या शोधा

ब्लैककैट राव !!! गोर गरीबाची सेवा करणाऱ्या इमामानां केजरीवाल सरकारने पगार वाढविला !!! आता हिंदू धर्मीय आगपाखड़ करणार . केजरी सरकार वर चाटूगिरि चा आऱोप करणार . पण त्या मूर्ख हिंदू लोकांना इमामाचे पवित्र कार्यच कळत नाही मुळीच !!!! येणाऱ्या सर्व लोकांना सर्वधर्म समभाव शिकवणे , त्यांच्या मनात अतेरिकी विचार येवू न देणे व देशप्रेम वाढावने, अतेरिक्यानां मुक्काम न करून देणे व आलाच तर ताबड़तोड़ पोलिसांना सांगणे , लहान मुलांना कट्टर धार्मिक न बनविता त्यांच्यात सायन्स ची गोडी निर्माण करणे , लहान मुलावर लैंगिक अत्याचार न होवू देणे , अशा प्रकारे चांगले संस्कार देण्याचे पवित्रकार्य बिचारा इमाम करत असतो अन ते सुद्धा किरकोळ पगारात . सध्यातरी दिल्ली सरकार ने या विषयावर आघाडी घेतली आहे पण लवकर च इतर राज्य सरकारे चाटूगिरी ( असे खडूस हिंदू म्हणतिल ) स्पर्धेत उतरतिल दिल्ली में बढ़ाई गई मस्जिदों के इमामों की सैलरी, अब हर महीने मिलेंगे 18 हजार रुपये http://nbt.in/yH3MPZ/bga via @NavbharatTimes: http://app.nbt.in

प्रियांका आल्याने काँग्रेस पक्षात जरा तरतरी येईल असे ह्यांचे मत. सारखे ते राहुलचे काळे जॅकेट बघायचा कंटाळा आलेल्याना आता बनारसी/पैठणी/मॅक्सी पाहता येईल. "डिट्टो इंदिरा' म्हणणार्यांची संख्या आता वाढेल असे आमचे मत. किंबहुना काँग्रेसला तेच हवे आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेस चे धुरंधर नेते ज्यांनी ऊभी हयात सोनिया पुढे ' में आय कम इन म्याडम ? ' बोलत घालवली ते दोन्ही चव्हाण , शिंदे , विखे , थोरात , मुत्तेमवार हे मातब्बर आता इथुन पुढे प्रियंका ला ' में आय कम इन म्याडम ? ' म्हणणार का ? !!!!!!!. पण एक मात्र नक्की या लाचारा मध्ये साहेबांचे नाव कधीच नव्हते व इथुन पुढे ही नसणार !!! कारण त्यांनी वेळीच वेगळा घरोबा केल्या मुळे किमान आयुष्याची संध्याकाळ आत्मसन्मानने घालवतील ( हे मी पूर्णपणे शुद्धित राहून व रा कॉ चे मिपावरिल स्वंयघोषित प्रवक्ते यांना स्मरून लिहित आहे ).

In reply to by ट्रम्प

खरं सांगायचं तर श्री शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काढली तेंव्हा किमान कोणी तरी नेता स्वाभिमानी आहे आणि केवळ गांधी घराण्यातील एकाशी लग्न केल्यामुळे गांधी आडनाव आणि राणीपद प्राप्त झालेल्या ( आणि अजिबात लायकी नसलेल्या) श्री सोनिया गांधी यांच्या (तथाकथित) नेतृत्वापुढे लोटांगण घालत नाही यामुळे त्यांच्या बद्दल प्रचंड आदर निर्माण झाला होता. परंतु पुढे सत्तेसाठी त्यांनी तत्वांना मुरड घालून केलेल्या तडजोडींमुळे त्यांच्या बद्दल च्या आदराला तडा गेला. आता हि जर ते तसेच "ताठ" राहिले तर हा आदर दुणावेल अन्यथा त्यांना पण इतर लोटांगण संस्कृतीच्या काँग्रेसी नेत्यांच्या रांगेतच बसवावे लागेल.

In reply to by सुबोध खरे

पवारांनी वेगळी चूल मांडण्यामागे 'सत्त्ता' हेच कारण होते रे सुबोधा. मध्यम-वर्गाचा आपणास पाठिंबा मिळेल व भाजपाचा परदेशी नागरिक्त्वाच्या मुद्द्यातील हवा आपसूक काढली जाईल असा विचार त्यामागे असावा. पण संगमा/तरिक अन्वर हे द्वितिय फळीतले नेते फक्त पवारांबरोबर गेले. १९८०/८१ च्या सुमारास "राख फासून हिमालयात जाईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही" ही पवारांनी केलेली गर्जना आठवते. त्यानंतर राज्यपातळीवर काँग्रेसमध्ये काड्या करून १९८६ मध्ये पवार मग 'स्वगृही'परतले.

India tests new anti-radiation missile to destroy enemy radars शत्रूच्या रडार आणि इतर विमान/मिसाईल हल्ल्यांपासून बचाव करणार्‍या प्रणालींना उद्ध्वस्त करणार्‍या सुखोई विमानांवर बसवलेल्या मिसाईल्सची यशस्वी चांचणी पुरी झाली आहे. या अगोदर काही दिवसांपूर्वी, Barak long-range surface-to-air missile (LR-SAM) ची चांचणी पुरी झाली आहे. या दोन प्रणाली भारतीय सैन्याची हवाई भेदकता अधिकच वाढवणार आहेत.

Go Back to Italy’: Farmers protest against Rahul Gandhi during his visit to Amethi https://www.financialexpress.com/india-news/go-back-to-italy-farmers-pr… अमेठी, रायबरेली मधुन गांधी परीवारातले वर्षोनवर्षे निवडुन येत आहेत पण ह्या दोन्ही जिल्ह्यात मुलभुत सुविधांचा विकास करायची तसदी सुद्धा गांधी परीवाराने कधीही घेतली नाही त्याविरुद्ध वाराणासी सारख्या जागेचा जो डोळे दिपवणारा विकास झालेला आहे त्या मुळे लोकांचे डोळे आता उघडले आहेत. येत्या निवडणुकीत हे स्पष्ट होईलच !!