रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे.
काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे.
असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल.
मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय?
हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे.
http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/
कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल.
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
त्यातूनही नोटा बदलायलाच
अवघड आहे
क्लायंट कडून चेकनेच पैसे घेतो, परंतु हाताखालील मजुरांना रोख द्यावे लागत म्हणून बँकेतून रोख रक्कम काढत असे.नोटबंदी करण्यामागे हे एक कारण असेल का? तुम्हाला चेकने पैसे मिळत होते पण पुढील व्यवहार रोखीत होता. तुम्ही रोखीत काही व्यवहार करूनही ते सफेद आहेत असं आपण मान्य करूया. पण असे कितीतरी छोटेमोठे व्यावसायिक असतील जे रोखीत व्यवहार करून दाखवत नसतील? तुम्हाला आणि सगळ्यांनाच अडचण झाली असेल यात शंकाच नाही पण जास्त अडचण रोखीत व्यवहार करणाऱ्यांना झाली हे तर मान्य कराल? तुम्ही मजुरांना रोखीत पैसे देत होतात याने रोख रकमेचा कसा ट्रेल तयार होतो हे बघा. मजुरांची कमाई टॅक्सच्या जाळ्यात येण्याएवढी नसेल, पण हेच मजूर ज्या वाण्याकडून सामान खरेदी करत असतील त्याला रोख पैसे देत असतील. हा वाणी ज्या होलसेलर कडून सामान घेत असेल त्यालाही रोखीत पैसे देत असेल आणि अशीच ही चेन चालू रहात असेल. यातले वाणी आणि होलसेलर हे रोखीत व्यवहार असल्याने किती टॅक्स चुकवत असतील? याच धाग्यात मी आधी कधी तरी विचारलंय की वस्तू रोखीत घेतल्यावर आपल्यापैकी किती जण पक्के बिल घेतात? किरकोळ खरेदी तर जाऊच दे, पण सोन्यासारख्या मोठ्या खरेदीत पण किती जण टॅक्सचे पैसे वाचवावे म्हणून पक्के बिल घेत नाहीत? हे थांबवायला तुम्ही कुठला उपाय सुचवाल? टॅक्सचा रेट जास्त आहे याचं काय कारण असेल असं तुम्हाला वाटतं? सव्वाशे कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशात निदान ४० कोटी लोक तरी काही ना काही काम धंदा करत असतील? यातले अगदी अर्धे लोक आयकराच्या स्लॅब मध्ये येत नाहीत असं म्हणलं तरी २० कोटी लोक इमानदारीत टॅक्स भरतात का? सव्वाशे कोटीपैकी निदान ६० कोटी लोक तर काही ना काही खरेदी करत असतील, किती ठिकाणी रोख व्यवहार करूनही पक्के बिल घेतात. त्याही पुढे जाऊन किती व्यापारी रोख खरेदी झाली तरी इमानदारीत सगळे टॅक्स भरत होते? तुमच्या लक्षात येईल अशी आशा आहे.इतके रामायण सांगून रामाची सीता कोण म्हणून विचारताय...आणि परिच्छेदतुमचा राम कोण आणि सीता कोण यातच गोंधळ होतोय. तुम्ही बँकेची कामं करायला कोणी ठेवलं नसेल आणि जर स्वतःच करत असाल तर तुमच्या वेळापत्रकात बँकेची कामे करण्यासाठी वेळ असला पाहिजे. नोटा बदलण्यासाठी कदाचित तुम्हाला नेहमीपेक्षा जरा जास्त वेळ लागला असेल पण ते एकदा किंवा दोनदा असावं असं गृहीत धरतो. कारण तुम्ही नुसतेच गोल गोल फिरताय, कुठलीच आकडेवारी देत नाही. तुमचा वेळ ब्यांकेत जास्त गेला म्हणून तुमचे वेळेचे आणि पर्यायाने पैश्याचे नुकसान झाले हे असू शकते. पण म्हणून जुनी ५००ची नोट बदलून नवीन ५०० ची घेतल्यावर तीचे मूल्य ४०० झाले असं होत नाही ना?हे सर्व मोदींच्या मूर्ख निर्णयामुळे करावे लागलेहा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. तुम्हाला मोदींचा हा निर्णय मूर्खपणाचा वाटतो तर मला विरोध करणारे मूर्ख वाटतात. तिघेही आपापल्या जागी बरोबर असू शकतात. यातुन तुम्ही काय शिकलात? अजून तरी तुमच्या मजुरांना बँक खाती काढायला सांगितलं का?माझ्याकडे काळा पैसा नसताना मला हा नाहक भुर्दंड पडला.वैयक्तिक तुमच्याकडे नसेल हो पण तुम्ही नकळतपणे काळा पैसा तयार व्हायला कसा हातभार लावत होतात हे मी वर स्पष्ट केलं आहे. सुक्याबरोबर ओलंही जळतं तसं झालं.मुद्यापासून पळ काढण्यासाठी तुम्ही ही अनावश्यक टिप्पणी करत आहात हे दिसते आहेमी पळ काढत नाही. तुम्हाला एवढा राग का आला हे मला समजलं नाही, राहुल गांधी आवडत नसेल तर मला आवडत नाही हे सरळ सांगायचं, असेल तर राग यायचं कारण नाही. बाकी तुम्ही अंधभक्त, मोदीभक्त असे बऱ्याच प्रतिसादात म्हणलेले आहे पण असे कुठलेही विशेषण न देता मी फक्त राहुल गांधी आवडतो म्हणण्याने राग यावा याचे आश्चर्य वाटत आहे. मोदींना तुम्ही मूर्ख समजता म्हणजे ज्यांना मोदीभक्त तुम्ही म्हणत आहात त्यांना तुम्ही काय समजता हे स्पष्ट होतंय. त्या सगळ्यांची बिनशर्त माफी मागा मग मी माझे विधान मागे घेतो. रच्याकने: मोदी आवडणाऱ्यांना जसे अंधभक्त म्हणले जाते तसे राहुल गांधी आवडणाऱ्याला मंदभक्त का म्हणू नये?हे सगळं ठीक असलं तर मग
http://www.newindianexpress
त्याशिवाय आणखी धक्कादायक बाब
नोटबंदी करण्यामागे हे एक कारण
गोडसेबुवा
तुमच्यासारख्या
पण डॉ खरे पण इकडे अजिबात
पण डॉ खरे पण इकडे अजिबात फिरकले नाहीत ? खरे साहेब लेख वाचलात का ? पटला का ?
तुमचं बेन्ड फारच ठणकतंय असं दिसतंय. काही उपचार करून घ्या कि. किती ती जळजळ आणि ठस ठस? मी कुठे फिरकावं, काय वाचावं आणि त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी याचा आपण ठेका घेतला आहे का? सोडून द्या कि. आपला इलाज चांगल्या डॉक्टरकडून करून घ्या.The Secret World Of Indian
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- वक्रतुंड महाकाय (Vakratunda Mahakaya) / अवधूत गुप्ते /आदर्श शिंदे/Sagarika Musichttps://economictimes
हाहाहा