✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

ट
ट्रेड मार्क यांनी
Tue, 11/08/2016 - 21:38  ·  लेख
लेख
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs-1000-notes/ कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
मत

प्रतिक्रिया द्या
307022 वाचन

💬 प्रतिसाद (1112)

प्रतिक्रिया

माझ्याकडे सगळ्याची उत्तरं

नितिन थत्ते
Mon, 09/03/2018 - 10:00 नवीन
माझ्याकडे सगळ्याची उत्तरं आहेत असं सांगून कोणीतरी निवडून आलेत. इतरांकडून उपाय कशाला मागवावे?
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

हा दावा कुणाचा?

गामा पैलवान
Mon, 09/03/2018 - 11:53 नवीन
नितीन थत्ते, उपरोक्त दावा मोदींचा नक्कीच नाही. कुणाचा आहे हे कृपया स्पष्ट करावे. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

वैयक्तिक तुमचे किंवा किती मिपाकरांचे पैसे बुडले हे सांगा बघू ??

अभिजित - १
Mon, 09/03/2018 - 15:53 नवीन
अहो ट्रेड मार्क - मिपा कर काय , काळा पैसे वाले काय , कोणाचेच पैसे बुडाले नाहीत ना !! म्हणून तर आम्हा तटस्थ जनतेच्या पोटात दुखते. कि मोदी मोठ्या टेचात सांगत होते, ३ /४ लाख कोटी रु चलनातून नष्ट होतील ( कारण ते गंगा मी डुबाय जायेंगे , काळा पैशा वाल्या कडून ) जनता त्रास सहन करत होती. कारण कोणी तरी या माजलेल्या काळा पैसे वाल्यांची मारावी हि सामान्य जनतेची इच्छा होती. ( माका काय बी होवू दे. तुका रस्त्या वर आणतोय कि नाय बघ . या type मधली ) पण तसे काहीच झाले नाही. सगळा पैसा बँक मध्ये परत !! थोडक्यात सफेद झाला !! देशाचे १.२८ लाख कोटी पाण्यात. जनता त्रास सहन करून वेडी ठरली. काळा पैसे वाले मज़ेत !! आणि हे इतके सगळे होऊन हि भक्त मोदीच कसे बरोबर यातुन बाहेर पडायला तयार नाहीत !! झापडं लावलेले बैल. रहाट भोवती जसे गोल गोल फिरत असतात. तसेच हे. जरा मोदी प्रेमाची झापडं काढा !!
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

सगळा पैसा बँक मध्ये परत !!

सुबोध खरे
Mon, 09/03/2018 - 19:24 नवीन
सगळा पैसा बँक मध्ये परत !! थोडक्यात सफेद झाला !! बेसिक मध्ये लोच्या आहे. खाल्लेले पैसे एखाद्या पोलिसाने बँकेत भरले कि ते सफेद होतात का? ज्ञात उत्पन्नच्या स्रोतांपेक्षा जास्त पैसे नावाचा गुन्हा महिती आहे का? श्रीमती जयललिता या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री ज्यासाठी तुरुंगात होत्या.
↩ प्रतिसाद: अभिजित - १

नोटबंदीच्या काळात पैसा बँकेत

विशुमित
Mon, 09/03/2018 - 20:57 नवीन
नोटबंदीच्या काळात पैसा बँकेत कसा जमा झाला ह्या बेसिक मध्येच लोचा आहे. जय हो..!
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कशाला फाटे फोडताय कंपूबाजी

सुबोध खरे
Tue, 09/04/2018 - 09:18 नवीन
कशाला फाटे फोडताय कंपूबाजी करून? एक साधा प्रश्न विचारतोय बँकेत पैसे जमा केले म्हणजे ते पांढरे कसे झाले ते सांगा बरं?
↩ प्रतिसाद: विशुमित

डॉ खरे साहेब. इथे काहीही कंपूबाजी नाहीए !!

अभिजित - १
Tue, 09/04/2018 - 11:33 नवीन
जे धडधडित सत्य सर्वाना समोर दिसतंय ते मान्य करायला तुमचं मन ( बुद्धी म्हणणार नाही मी इथे ) . मनच . तयार नाहीए. त्यामुळे निव्वळ बाष्कळ वाद तुमचाच कंपू इथे घालतोय. पैसे बँक मध्ये जमा झाले , तर ते पांढरे कसे झाले ? हा तुमचा प्रश्न. मी - काळा पैसे वाले इतके माजलेत कि सगळे काही सेटल करू शकतो याचा त्यांना विश्वास होता / आहे आणि यापुढे हि राहणार. मोदी काय प्रत्येकाची बँक अकाउंट तपासणार नाहीत. IT ऑफिसर तपासतात. ते खाबू बाबू query काढणार. चोर बनिया ती सेटल करणार. काम तमाम !! इथेच तर खरी मेख आहे. माझा प्रश्न तुम्हाला - काळा पैसा बँक जमा करून जवळ जवळ २ वर्ष झाली. माझ्या मते तो पांढरा झाला. तुमच्या मते तो तसा पांढरा होत नाही. मला सांगा २ वर्षात किती लोकांना ( ज्यांनी काळा पैसा जमा केला ) त्यांना शिक्षा झाली ? त्यांचा पैसा सरकार जमा झाला ? काही यादी ? लिस्ट ? किती लाख कोटी रु ? कृपया कंपन्या बंद झाल्या वगैरे सांगू नका. त्याचे उत्तर मी आधीच ट्रेडमार्क ना दिले आहे. ते वाचा. वैयक्तिक किती लोक आत गेले ? त्यांचा पैसा सरकार जमा होऊन ते रस्तावर आले ? काहि उत्तर आहे ? आणि आता लोक चोर आहेत तर मोदी काय करणार वगैरे फोल समर्थन करू नका. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या नाहीतर पैसा पांढरा झाला हे मान्य करा. A very simple Question !!
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

स्क्रुटिनी सात वर्षे पर्यंत

सुबोध खरे
Tue, 09/04/2018 - 12:13 नवीन
स्क्रुटिनी सात वर्षे पर्यंत काढता येते हे आपल्याला माहिती आहे का? पुरावा असेल तर कितीही जुनी केस परत काढता येते. या वर्षी २५ लाख रुपये बँकेत भरले आणि पुढच्या वर्षी उत्पन्न खाली गेले तर संगणक आपोआप स्क्रुटिनी काढतो हे आपल्याला माहिती आहे का? १८ लाख लोकांना आयकर खात्याच्या नोटीस गेल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे का? 18 lakh taxpayers to get Income Tax notices to explain large deposits Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/56895280.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst हे वाचून पहा मग आपण चर्चा करू. जर चष्मा लावणार नसाल तर पैसा पांढरा करताना बऱ्याच लोकांचे डोळे पांढरे व्हायची पाळी आली आहे
↩ प्रतिसाद: अभिजित - १

आता आपला आयकर जवळच्या आयकर

सुबोध खरे
Tue, 09/04/2018 - 12:33 नवीन
आता आपला आयकर जवळच्या आयकर भवनात ना जात गुवाहाटी किंवा मदुराईचा आयकर अधिकारी याच्या कडे जातो त्यामुळे ऍडजस्ट करणे जास्त कठीण झाले आहे हे आपल्याला माहिती आहे का? अशा अधिकाऱ्याने काढलेली केस हि दिल्लीच्या कार्यालयातील मुख्य संगणकात नोंद होते हे आपल्याला माहिती आहे का?
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुमची लिंक चुकली. हि घ्या खाली योग्य लिंक.

अभिजित - १
Tue, 09/04/2018 - 17:32 नवीन
https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/18-lakh-taxpayers-to-get-income-tax-notices-to-explain-large-deposits/articleshow/56895280.cms Updated: Feb 01, 2017, 01.12 AM IST वाचली. feb २०१७ मधली आहे. दीड वर्ष झाली बातमी येऊन. पुढे काय ? किती लाख कोटी पकडले ? बरं संपूर्ण पराभव पत्करायची लाज वाटत असली/ मनाला वेदना होत असल्या तर आपण एक करू. तुम्ही मान्य करा - २ वर्षात नोटबंदी मधून जितकी मोदींनी हवा केली होती. त्या प्रमाणात काळा पैसा पकडला गेला नाहीए. नोटबंदी मुख्य उद्दिष्ट काळा पैसा पकडणे. यात आत्ता पर्यंत तरी ती फेल गेली आहे !! आणि स्क्रुटिनी सात वर्षे पर्यंत फक्त ?? हा हा हा !! मी मान्य करतो - कि पुढील ७ वर्षात जर या प्रमाणात काळा पैसा पकडला गेला तर नोटबंदी यशस्वी १ लाख कोटी - बऱ्या पैकी यशस्वी .. २ लाख कोटी - चांगलीच यशस्वी ... ३ लाख कोटी - संपूर्ण यशस्वी !! मी हरलो तर मला आनंदच होईल. पण तसे होणे नाही. काय करणार का हे मान्य ? मी भाजप किंवा काँग्रेस कोणाचाही समर्थक नाही. नोटबंदी यशस्वी झाली असती तर मला नक्कीच आनंद झाला असता. पण ती फेल जाणार हे सुरुवाती पासूनच दिसत होते. माझे काही जुने मेसेज आहेत तसे इथे. तेव्हा भक्तनि मला वेड्यात काढले होते. असो. सत्य कटु असते. जितके लवकर तिचा स्वीकार कराल तितके लवकर पुढे काहीतरी चांगले निष्पन्न होऊ शकते. खोट्याला कवटाळून काहीही साध्य होणार नाही !!
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अ‍ॅक्चुअली

अभ्या..
Tue, 09/04/2018 - 17:58 नवीन
अ‍ॅक्चुअली. ह्या चार बंद्या एकापाठोपाठ बघितल्या ना की हसू येते. कोणी कशा स्वरुपात केल्या हे बाजूला ठेवू पण प्लानिंग आणि ईक्झिक्युशन बघायला गेले की सामान्य माणूस पण खदखदून हसेल. मला नवल वाटते उच्चक्शीतीत आणि हुच्चभ्रु म्हणवणार्‍यांवर कुठलं भूत सवार आहे? द्वेष, विरोध बिरोध काही नाही हो, अगदी दणकून मतदान केलेले त्यांनाच. पण आहोत सामान्यच आम्ही. सगळ्या बंद्या सामान्य माणसांचे भले हे दाखवून केल्या त्याबाबत काहीही शंका नाही पण आता बघा. १) गुटखा बंदी (ही राज्य सरकारची बरंका) : गुटख्यावर बंदी, पान मसाल्यावर नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात कूथल्याही पानपट्टीवर जावा, हमखास मिळणार. कसं काय चालतं हो? अहो एमपी कर्नाटकातून येतो. बरं एकेका टपरीवर पन्नाससाठ हजाराचा माल असतो, कुठून येतो माल? कुठे असतात गोडाऊन, तिथे कमीत कमी करोडोंचा माल असतो. कसे चालते इतके मोठे लॉजिस्टिक्स? कशी इतकी साठवण आणि वाहतूक बिनभोभाट होते. पैसे, हप्ते बिनभोभाट. आता कारण पुढे येते लोकांचेच. त्यांचाच सहभाग अपेक्षित आहे. २) हायवे दारु बंदी: ५०० मीटरची बंदी, नंतर म्हणले वॉकेबल डिस्टन्स, नॉट एरियल डिस्टन्स, नंतर जागेचा क्लिअरन्स, नंतर परमिङ्ट रिन्यु, पैसे, हप्ते बिनभोभाट. आता कारण पुढे येते लोकांचेच. त्यांचाच सहभाग अपेक्षित आहे. ३) प्लास्टिक बंदी: (ही पण राज्य सरकार): ५० मायक्रोन खाली बंदी, आता गम्मत बघा. दणकून दंड लोकांना. तपासणार्‍या लोकांना बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आणि नॉर्मल ह्यातला फरक कळत नाही, मायक्रॉन मोजणार कसा ह्याची परफेक्ट मेथड नाही. नॉन वोव्हनवर बंदी. ते कशाला म्हणतात निम्म्या लोकांना माहीत नाही. ज्युट बॅग म्हनून दाबून खपतात सध्याही. पातळ पिशव्या जप्त की जप्त. दाबून दंड वसूल. पैसे, हप्ते बिनभोभाट. आता कारण पुढे येते लोकांचेच. त्यांचाच सहभाग अपेक्षित आहे. ४) नोटाबंदी: केली तर केली, पहिले कारण काळा पैसा, नंतर फेक करन्सी, नंतर अ‍ॅडव्हान्सड करन्सी नोटस, नंतर ऑनलाईन व्हा म्हणून, नंतर सगळ्यांनी कॅश लेस होत बँकेत पैसे ठेवा म्हनून, लोकांना वाटले बँकेत पैसा आला आता कर्जे बिर्जे स्वस्त होतील, घराचे ब्लॅक मनी प्रमाण कमी होईल, लाचलुचपत कमी होईल, दहशतवाद प्रमाण कमी होईल, भोगू थोडा त्रास. झाले काय? परिणाम दिसायला वेळ लागेल म्हणले तर होत आली दोन वर्षे, आले पण रिपोर्ट बँकाचे. ते बोलतात, काळे पैसे, हप्ते बिनभोभाट. आता कारण पुढे येते लोकांचेच. त्यांचाच सहभाग अपेक्षित आहे. . आता तर म्हन्ताहेत शिस्त हवी, केली तर लोक हुकुमशहा म्हणतात. बाकी काही नाही, शहाण्याने ओळखून घ्यायची पुढची पावले.
↩ प्रतिसाद: अभिजित - १

पण ती फेल जाणार हे सुरुवाती

सुबोध खरे
Tue, 09/04/2018 - 18:45 नवीन
पण ती फेल जाणार हे सुरुवाती पासूनच दिसत होते तुम्ही द्रष्टे आहात हे मान्य करतो कारण भल्याभल्याना जे कळले नाही ते तुम्हाला कळले होते. तुम्ही एवढा भुभुक्कार करीत आहात तर तुमची अपॆक्षा काय आहे? मुख्य आयुक्तांनी किती लोकांना नोटीस दिल्या आहेत हे तुम्हाला येऊन सांगायला हवंय? बाकी सर्व ठीक आहे पण

काळा पैसा पांढरा झाला हे आपले भंपक गृहीतक

अजूनही कवटाळूनच आहात हे पाहून

मणोरंजण

झाले. ज्यांना अशा नोटीसा आल्या आहेत असे लोक एकदा पाहून घ्या म्हणजे "मणाचे समाधाण" होईल. बाकी आयकर अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जरी झालेल्या आहेत कि शक्यतो लोकांना छळू नका ज्यांना मुख्य प्रवाहात यायचे आहे त्यांना कर आणि त्यावरील दंड भरून "मोकळे करा". आपल्याच दुव्यातील वाक्य देतो आहे. The tax department has enabled online verification of these transactions to ensure people do not face harassment at the hands of tax officials. ज्या खात्यात ५ लाख रुपये आहेत किंवा २ लाखाच्या वर रुपये भरले आहेत त्यांना KYC केल्याशिवाय पैसे काढता येणार नाहीत. हा पैसा सरकारजमा होईल कि खातेदार प्रामाणिक आहे याची १ कोटी खात्यांची खातरजमा करणे हे खाऊचे काम वाटते आहे का? All accounts that have a balance of Rs 5 lakh or in which Rs 2 lakh was deposited during the demonetisation period will need to be compliant with knowyour-customer (KYC) norms. Without this, the Reserve Bank of India won’t allow money to be withdrawn from them. During the seven-week deposit window, more than Rs 2 lakh was deposited as cash in more than 1 crore accounts that have more than 70 lakh unique permanent account numbers attached to them, Chandra said. ७० लाख PAN बरोबरच्या खात्यांची तपासणी करणे हे काम संगणकावर बोटं लावण्याइतकं सोपं नाही तेसुद्धा तुमचं नेहमीच काम सांभाळून. आयकर खात्यावर केवढा प्रचंड कामाचा बोजा आला आहे हे एकदा एखादा मित्र असेल तर त्याला विचारून पहा. बाकी तुम्ही द्रष्टे आणि सर्वज्ञ आहातच . जाता जाता -- जिज्ञासूंनी अभ्या शेट नि दिलेला दुवा पूर्ण वाचून पाहावा हि विनंति ( तो त्यांनीच नीट वाचला नसावा अशी शंका येत आहे- सेल्फ गोल चे दुसरे चांगले उदाहरण नसावे )
↩ प्रतिसाद: अभिजित - १

इतके मोठी टायपो गिरी करण्याचा

अभिजित - १
Tue, 09/04/2018 - 18:55 नवीन
इतके मोठी टायपो गिरी करण्याचा त्रास करण्या पेक्षा माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. किती काळा पैसा गेल्या २ वर्षात पकडला गेला ?
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

खरे

विशुमित
Tue, 09/04/2018 - 18:07 नवीन
तुमच्या कंपूतील सायकल वाले आणि जून महिन्यापर्यंत मिपावर सुट्टी घेणारे कथित गुरूजी कुठे गायब झालेत. दिसत नाहीत आजकाल.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गुरुजी हे technical / logical

अभिजित - १
Tue, 09/04/2018 - 18:57 नवीन
गुरुजी हे technical / logical / तात्विक भक्त आहेत. त्या मुळे अंध भक्त गिरी करणे त्यांच्या मनाला पटत नसावे. त्या मुळे ते इकडे फिरकत नसावे !!
↩ प्रतिसाद: विशुमित

तुमच्या कंपूतील सायकल वाले

मोदक
Fri, 09/07/2018 - 00:23 नवीन
तुमच्या कंपूतील सायकल वाले आणि जून महिन्यापर्यंत मिपावर सुट्टी घेणारे कथित गुरूजी कुठे गायब झालेत. दिसत नाहीत आजकाल. नारायण राणेंना भाजपाने पाठिंबा दिला तर पुन्हा भाजपाची बाजू मांडणार नाही असे इथे कुठेतरी लिहिले होते - त्याचे पालन करत आहे. तुमच्या धन्याने पट्टा आवळला की तुमचा आवाज बंद, सैल सोडला की आवाज सुरू.. असे आमच्या बाबतीत होत नाही. मी लिहिलेल्या शब्दाचे पालन करतो, तुमच्यासारखी भाटगिरी केली असती तर शब्द फिरवून / मागे घेऊन इथेच प्रतिसाद दिले असते. बाकी विनाकारण माझी आठवण काढू नका. तुमचाही ट्रक धरणात जाईल.
↩ प्रतिसाद: विशुमित

असं वय..

विशुमित
Sun, 09/23/2018 - 17:40 नवीन
असं वय.. जान जाए पण वचन न जाए पाळणारे ह्या कलियुगी तसे दुर्मिळच ! आमचं जाऊ द्या पण तुमच्या गळ्यातला पट्टा कोणीतरी आवळला होता अशी कुणकुण ऐकून आहे. खरं काय अन् खोटं काय हे तुम्ही आणि तुमचे मालकच जाणू.. विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
↩ प्रतिसाद: मोदक

तुम्ही नेहमीप्रमाणे चुकीचे

मोदक
Mon, 09/24/2018 - 10:36 नवीन
तुम्ही नेहमीप्रमाणे चुकीचे ऐकले आहे. इतक्या वर्षात अजाण बालकेही बालवाडीतून पायर्‍या चढत वर जातात.. (ते ही स्वत:च्या जीवावर..) मी कुठे आहे, काय करतो आहे हा भोचकपणा करण्याऐवजी तुमच्या गजराच्या घड्याळाचा काटा आहे तिथेच अडकला आहे त्याचे कांहीतरी बघा. तुम्हाला बालवाडीतून वर येण्यासाठी आणि मोठे होण्यासाठी शुभेच्छांची आवश्यकता आहेच. त्यामुळे गेट वेल सून..!
↩ प्रतिसाद: विशुमित

मोदीद्वेषाची झापडं

ट्रेड मार्क
Mon, 09/03/2018 - 23:01 नवीन
तुम्ही मोदीद्वेषाची झापडं लावलीयेत त्याचं काय? तुम्ही ध्रुव राठी, वायर, स्क्रोल वगैरे बघणं वाचणं बंद करा. म्हणजे तुम्हाला खरंच आजूबाजूला काय चालू आहे ते कळेल. मिपा कर काय , काळा पैसे वाले काय , कोणाचेच पैसे बुडाले नाहीत ना !! हे कशावरून सांगताय? तुम्हाला काय माहित कोणाचेच पैसे बुडाले नाहीत? केवळ बँकेत नोटा परत आल्या म्हणजे पैसे बुडाले नाहीत हा तर्क लावताय. धनदांडग्यांनी गरीब लोकांना रांगेत उभं करून त्यांच्या खात्यात पैसे भरून तात्पुरता प्रश्न सोडवला. यात त्या गरिबांना पण मधल्यामध्ये कमिशन मिळून गेलं. ही खाती सरकारच्या रडारवर आली. जरा बदल म्हणून हा व्हिडीओ बघा. तुम्ही नेहमी बघता त्या तुमच्या लाडक्या कोणाचा हा व्हिडिओ नसल्याने कदाचित तुम्हाला पटणार/ आवडणार नाही. पण जरा तटस्थ राहून ऐकून तर बघा. जनता त्रास सहन करत होती. कारण कोणी तरी या माजलेल्या काळा पैसे वाल्यांची मारावी हि सामान्य जनतेची इच्छा होती. मोदीकाकांनी त्यांना जो बरोबर वाटला तो उपाय केला. मग भले तो यशस्वी झाला नसेल, पण उपाय तर केला. तुम्हाला उपाय पटला नाही तर मग काय करायला पाहिजे होतं किंवा अजून पुढे काय करता येईल हे सांगा. ही मागणी मी कितीतरी वेळा केलेली आहे, पण तुम्ही झापडं लावलेले बैल. रहाट भोवती जसे गोल गोल फिरत असतात तसेच मोदीद्वेषाची झापडं लावून गोल गोल फिरत आहात. परत एकदा माझी मागणी नोंदवतो - मोदींनी नोटबंदी करून चूक केली असं आपण मान्य करू. मग काळा पैसा, लोकांनी दडवून ठेवलेला पैसा, कर चुकवण्यासाठी रोखीत चाललेले व्यवहार, हवाला व्यवहार, खोट्या नोटा, रोखीत होणारे टेररिस्ट आणि नक्षलवाद्यांना फंडिंग वगैरे प्रश्न कसे सोडवायचे याचा काहीतरी प्लॅन द्या. गेलाबाजार पूर्ण प्लॅन नसेल तर आराखडा तरी द्या. आपण त्यावर पुढे चर्चा करून फुलप्रूफ प्लॅन तयार करू. जरी मोदी फॅसिस्ट असल्याने त्यांनी आपला प्लॅन ऐकला नाही तरी २०१९ मध्ये राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावर त्याला आपण हा प्लॅन सादर करू. म्हणजे मग २०१९ नंतर सगळं कसं सुरळीत होईल. काय म्हणता?
↩ प्रतिसाद: अभिजित - १

उपाय

नितिन थत्ते
Tue, 09/04/2018 - 18:36 नवीन
>>काळा पैसा, लोकांनी दडवून ठेवलेला पैसा, कर चुकवण्यासाठी रोखीत चाललेले व्यवहार, हवाला व्यवहार, खोट्या नोटा, रोखीत होणारे टेररिस्ट आणि नक्षलवाद्यांना फंडिंग वगैरे प्रश्न कसे सोडवायचे याचा काहीतरी प्लॅन द्या. खरं तर यातल्या बर्‍याच समस्यांवरचे उपाय काय आहेत हे बर्‍याच लोकांनी वेगवेगळ्या वेळी सांगितलेले आहेत. त्या समस्यांवर नोटाबंदी हा सर्वात कमी परिणामकारक किंवा निरुपयोगी उपाय आहे. काळा पैसा हा रोखस्वरूपात फारसा नसून जमीन/रिअल इस्टेट, शेअर्स, सोने दागिने या अ‍ॅसेटच्या स्वरूपात साठवलेला असतो हे सर्वज्ञात आहे. आणि हे ज्ञान ८ नोव्हेंबर नंतर झालेले नसून आधीपासून आहे. त्यामुळे नोटबंदीने काळ्यापैशाच्या एकूण साम्राज्यावर ओरखडाही उठणार नाही हे उघड होते. काळ्या पैशाचे दोन भाग आहेत. एक म्हणजे कर चुकवलेला पैसा आणि दुसरा भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा. कर चुकवेगिरी कमी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करता येतो आणि योग्य त्या इंटिग्रेशनने ते हळूहळू साधता येईल. जीएसटीच्या मार्फत अप्रत्यक्ष करांच्याबाबतीत हे आता साधायची सुरुवात झाली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीत खरे तर ही गोष्ट अगदी चांगली आहे. आयकराच्या बाबतीत ही प्रक्रिया अनेक वर्षांपासून चालू आहे. त्यात टीडीएसचा ताळा इन्कमटॅक्स रिटर्नशी लावणे वगैरे उपाय करणे चालू आहे. जे योग्य दिशेने चालू आहे. भ्रष्टाचारातून मिळणारा काळा पैसा रोखणे ही फार अवघड गोष्ट आहे. कारण भ्रष्टाचार म्हणजे रोख स्वरूपात दिलेली लाच इतकीच त्याची व्याप्ती नसून "इन काइंड" किंवा फेवर्स या स्वरूपात केला जाणारा भ्रष्टाचार शोधणे फार अवघड. एखाद्या अधिकार्‍याला पाच लाख रुपये रोख लाच न देता एक गाडी घेऊन दिली तर ती सापडू शकत नाही. गाडी कागदोपत्री लाच देणार्‍याच्या नावावर असू शकते. त्यात मोदी फार काही करू शकतील याची अपेक्षा नाही. तिसरा भाग राजकीय पक्षांच्या उत्पन्नस्रोतांचा ज्याबाबतीत या सरकारने काही केलेले नाही. इतकेच नाही तर अनेकांच्या मते अपारदर्शकता वाढवणारे बदल या सरकारने केले आहेत. टेरर फंडिंग म्हणाल तर त्यावर नोटबंदी हा अगदीच हास्यास्पद उपाय आहे. तो योग्य उपाय ठरण्यासाठी दर दोन वर्षांनी ती करावी लागेल. नोटबंदी फेल जात आगे/गेली आहे असे दिसू लागल्याच्या काळात भक्तांमार्फत जमीनी/सात बारा यांवर मोदी सरकारची पुढची कारवाई असणार आहे वगैरे मेसेज फॉरवर्ड होत होते. तसे काही घडलेले नाही. तर उपाय काय हे परत परत विचारले म्हणून हा प्रतिसाद दिला. अन्यथा कुडमुड्या अर्थतज्ञांवर विसंबणार्‍या सरकारला खरोखरचे उपाय करायचे नाहीयेत असे वाटते. वर मी म्हटलेला जीएसटी आणि आयकरातील इंटिग्रेशनचा मार्ग योग्य आहे. पण त्यासाठी नोटाबंदी करण्याची काहीच आवश्यकता नाही. नोटाबंदीने काही साध्य झाले तर इतकेच की मोदी काहीही करू शकतात हे लोकांना. भले ते "काहीतरीच" का असेना.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

हा प्रतिसाद केवळ नोटबंदी या

नितिन थत्ते
Tue, 09/04/2018 - 18:38 नवीन
हा प्रतिसाद केवळ नोटबंदी या विषयी आहे. बँक्रप्सी कोड आणि रेरा हे या सरकारचे अत्यंत स्तुत्य कायदे आहेत. त्यासाठी हे सरकार प्रशंसेस पात्रच आहे.
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

हायला

सुबोध खरे
Tue, 09/04/2018 - 18:59 नवीन
हायला थत्ते चाचा मोदी सरकारचे कौतुक करताहेत मला तर गहिवरून आलंय असो चाचा भ्रष्टाचारातून मिळणारा काळा पैसा रोखणे ही फार अवघड गोष्ट आहे. हि अवघड नाही अशक्य गोष्ट आहे. कितीही कड्या कुलुपे सी सी टी व्ही पोलीस गुप्तहेर ठेवा चोऱ्या होणारच कारण हाव आणि लोभ हि मानवी प्रवृत्ती आहे. पण हा उंदीर मांजराचा खेळ अनादी कालापासून अनंत काला पर्यंत चालू राहणार आहेच बाकी काळा पैसा हा रोखस्वरूपात फारसा नसून जमीन/रिअल इस्टेट, शेअर्स, सोने दागिने या अ‍ॅसेटच्या स्वरूपात साठवलेला असतो हे सर्वज्ञात आहे. यातील सर्वात जास्त पैसा हा जमीन/रिअल इस्टेट क्षेत्रात आहे. यासाठी तर या सरकारने बेनामी मालमत्ता कायदा आणला आहे शिवाय प्रत्येक व्यवहार हा आधार कार्डशी संलग्न केला आहे. या कायद्यामुळे आता बेनामी मालमत्ता विकणे अशक्य झाले आहे. कारण मालमत्ता विकताना आपल्या हाताचे ठसे घेतात ते जुळले नाही तर आपली मालमत्ता हस्तांतरण करता येत नाही. म्हणून तर आधार कार्डला एवढा मानवाधिकार वाल्यांचा जोरदार विरोध आहे. आणि याच कारणासाठी १९८८ साली संसदेने पास केलेला कायदा नोकरशाहीच्या गुंत्यात गुंतवून ठेवला होता. बहूसंख्य छोट्या मोठ्या स्थानिक राजकारण्यांची गोची यामुळेच झाली आहे. कारण निवडणूक लढवताना मालमत्ता जाहीर करायला लागते आणि आता एकदम एवढी मालमत्ता कुठून आली म्हणून विचारले जाते. (काही अतिप्रगतिशील शेतकऱ्यांनी एका एकरात काही कोटी रुपये शेतीच्या करमुक्त उत्पन्नातून कमावले याचे गमक हेच तर आहे.) हि मालमत्ता अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीच्या नावाने घेतली होती ती आता विकत येत नाहीये. हे अवघड जागी दुखणे आहे आणि गावातला एकमेव डॉक्टर जावई असेल तर जी स्थिती होते ती झाली आहे.
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

नवीन छापलेल्या प्रत्येक नोटा

शिद
Mon, 09/03/2018 - 16:30 नवीन
नवीन छापलेल्या प्रत्येक नोटा (२०००, ५००, २००, इ.) अगदी बकवास आणि बंडल आहेत. पहिल्यांदा पाहिल्यावर मलातर ह्या नोटा खर्या आहेत की नवा व्यापार मधल्या आहेत हेचं कळत नव्हतं. अतिशय रद्दड डिजाईन व छपाई.
↩ प्रतिसाद: अभ्या..

खालील सिरीजमधील पुढील शब्द

सतिश गावडे
Sun, 09/02/2018 - 21:55 नवीन
खालील सिरीजमधील पुढील शब्द ओळखा: १. कॅश लेस २. लेस कॅश ३. फेक नोटा ४. ?

काल एक भयानक युक्तिवाद ऐकला:

पुंबा
Tue, 09/04/2018 - 14:25 नवीन
काल एक भयानक युक्तिवाद ऐकला: नोटाछपाईमध्ये स्वयंपुर्णता आणण्यासाठीचा हा मास्टरस्ट्रोक होता म्हणे.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

नेक

नाखु
Mon, 09/24/2018 - 15:54 नवीन
नेक लोटा. अनुप जलोटा ते चमनगोटा सारे एकसमान असल्याचे मिपाव्यासपीठातील नाखु
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आज दहीहंडीच्या निमित्ताने

तेजस आठवले
Mon, 09/03/2018 - 14:38 नवीन
आज दहीहंडीच्या निमित्ताने धाग्यावर माझी हजेरी लावून जातो. आमच्या ठाण्यातल्या कोटी कोटी रुपयांच्या दहीहंड्या काही वर्षांपूर्वी बंद पडल्या.आता लाख लाख रुपयांची बक्षिसे आहेत असे ऐकतो. हया निमित्ताने गोविंदांचे 'कमळा'च्या आकाराचे उभारलेले थर, अल्पवस्त्रांकित रशियन नर्तकीचे सात्विक नृत्य दाखवत दाखवत राष्ट्रवादाचा पाया घालणारी 'संघर्ष'पूर्ण पद्धतीने उभारलेली कोटीमोलाची दहीहंडी, महाराष्ट्रात दुष्काळ असूनही गोविंदावर खास अग्निशमन बंबातून उडवलेले भगव्या रंगाचे भासमान पाणी हे सर्व आठवले. नोटबंदी, २०१४ चा सत्ताबदल आणि माझी प्रतिक्रिया ह्यांचा एकमेकांशी संबंध आहे का नाही माहित नाही.

८ नोव्हेंबर २०१६ च्या

अथांग आकाश
Tue, 09/04/2018 - 12:37 नवीन
८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री पासून लागू झालेल्या नोटाबंदी या विषयावर ४ सप्टेंबर २०१८ ला हि चर्चा चालू आहे. हा विषय अजून किमान पाचदहा वर्षे चघळला जाईल अशी अपेक्षा आहे. खरंतर देशातील ५०० आणि १००० ची एकतरी नोट ज्याच्यापाशी आहे अशा प्रत्येक नागरिकाने तीचे परिणाम अनुभवले आहेत. ती लागू करताना आणि नंतरही जी कारणे सांगितली गेली आहेत त्या व्यतिरिक्त अनेक अंतस्थ हेतूही त्यामागे असणार हे नक्की. नोटाबंदी चांगली कि वाईट हे प्रत्येकाला त्याकाळात आलेल्या अनुभवावरून तो ठरवू शकतो पण केवळ दोनचार वर्षात तिचे सगळेच भले बुरे परिणाम समोर येतील हि शक्यता कमी वाटते. वरती झालेल्या चर्चेत नोताबंदीचे काहीजणांनी समर्थन केलंय तर काहीजणांनी निषेध व्यक्त केलाय. कुणाला बँकेत भरलेले पैसे पांढरे झाले असे वाटतंय तर कुणाला काळे पैसेवाल्यांनी तो व्यवस्थित जीरवला असल्याची खात्री पटली आहे. परंतु तो बँकेत भरलेला काळा पैसा पंधरा कसा झाला आणि ज्या लोकांनी तो जिरवला असेल तर तो कसा जिरवला याची माहिती कोणी दिली नाहीये. ज्यांच्याकडे मुबलक काळा पैसा होता अशा दुकानदार, व्यावसायिक, कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, दलाल व राजकारणी लोकांनी काय काय शकली लढवल्या त्याची ऐकीव माहिती मोठी रंजक आहे. कोणी कर्मचार्यांना वर्षभराचा पगार दिवाळी बोनस सकट रोखीत आगाऊ देऊन टाकला. तर कोणी बँकेचा वा पतपेढीचा मासिक हफ्ता त्यांना देण्याच्या बोलीवर कर्मचारी व कार्यकर्त्यांच्या छोट्या मोठ्या जसे कि वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जांची मुदतपूर्व परतफेड करण्यासाठी रोख रक्कम दिली. बराच जास्त काळा पैसा असणार्यांनी कित्येक गरिबांना कमिशनवर मोठ्या रकमा त्यांच्या खात्यात भरायला दिल्या. नोताबंदी नंतरच्या एका भाषणात पंतप्रधानांनी अशा लोकांना मिळालेला पैसा हा त्याचा झाला असून तो परत करण्याची आवश्यकता नाही असा सूचक इशाराही दिला होता. आता खरा गदारोळ तेव्हा होईल जेव्हा बँक खात्यात त्यावेळी भरणा झालेल्या रकमेच्या आधारावरून दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांची नावे त्या यादीतून वगळली जातील तेव्हा! खरोखर दारिद्र्य रेषेखाली नसताना केवळ सरकारी योजनांचा आणि अनुदानांचा लाभ उठवणारे बाहेर काढले जातीलच पण क्षणिक मोहात अडकून या कामात सहभागी झालेले खरोखरचे गरीब जेव्हा त्या लाभाला मुकतील तेव्हा त्यांच्या तक्रारीला मात्र कोणताही कायदेशीर आधार असणार नाही.

प्रतिसाद खूप आवडला.

विशुमित
Tue, 09/04/2018 - 17:24 नवीन
प्रतिसाद खूप आवडला. प्रथमदर्शनी कंक्लुजन एकच दिसतंय... गरीब आणि सामान्य नागरिकच पुन्हा भरडले जाणार. ज्यांचा काळा पैसा बँकेत भरला गेला ते नामानिरळं राहतील याची जास्त शक्यता वाटते.
↩ प्रतिसाद: अथांग आकाश

पंतप्रधान यांनी

नाखु
Mon, 09/24/2018 - 16:02 नवीन
निर्वाळा दिला आहे अश्या संशयास्पद व मूळ खातेदारांना अंधारात ठेवून भरणा केलेल्या रकमा गोठवल्या असल्यातरी त्यावर व्याज मिळत राहील व ते खातेदार वापरु शकतात.नक्की पुढे काही उपाययोजना असणारच आहे.जनधनवर पैसे भरले आहेत. कटाक्षाने सहकारी बँक यांना दूर ठेवले होते त्यामुळे या सरकारी बाबूंना बोलतं केलं जाईल हे नक्की. पद्धत वेगळी राहील.
↩ प्रतिसाद: विशुमित

नीती आयोग व्हाईस चांसलर

डँबिस००७
Wed, 09/05/2018 - 00:56 नवीन
नीती आयोग व्हाईस चांसलर slams Demonitization Critic.... https://youtu.be/Mnq7Wu4l7gg

Vice Chairman अस वाचाव !!

डँबिस००७
Wed, 09/05/2018 - 00:58 नवीन
Vice Chairman अस वाचाव !!

अगदी स्पष्ट दिसणारी गोष्ट

स्वधर्म
Wed, 09/05/2018 - 14:59 नवीन
नीट मांडलीय. मिलिंद मुरूगकर यांचा हा लेख नोटबंदी समर्थकांना पटणार नाही, पण जर कुणी समजून घ्यायचा प्रयत्न केलाच, तर त्यांच्यासाठी https://www.loksatta.com/mati-mansa-aani-maya-news/the-impact-of-demonetisation-on-the-common-man-1744279/

ट्रेड मार्क एक चक्की चालवतात. मोदी भक्तीचे पीठ तिथून बाहेर पडते.

अभिजित - १
Fri, 09/07/2018 - 21:27 नवीन
त्यातील काही भुकुटी ते इकडे वेगवेगळ्या टॉपिक वर मारत असतात. त्यांना आपण सोडून देऊ या. पण डॉ खरे पण इकडे अजिबात फिरकले नाहीत ? खरे साहेब लेख वाचलात का ? पटला का ? कि अजूनही हृदय तयार नाही सत्य मानायला ? ... पण दुसरा जास्त खोलवरचा मुद्दादेखील होता. ‘या निर्णयामुळे श्रीमंत लोकांचा काळा पसा गेला, त्यांचे नुकसान झाले याचा असूयारूपी आनंद गरीब लोकांना झाला आणि तो स्वतच्या नुकसानाच्या दु:खापेक्षा जास्त होता’ असे विश्लेषण केले गेले आहे ..
↩ प्रतिसाद: स्वधर्म

चक्की

ट्रेड मार्क
Fri, 09/07/2018 - 21:55 नवीन
चक्की तर तुम्ही पण चालवताय, मोदी द्वेषाची! पण त्यातून भुकटीच काय काहीच बाहेर पडत नाहीये. त्यांना आपण सोडून देऊ या. ना मी तुम्हाला धरलंय ना तुम्ही मला. पण डॉ खरे पण इकडे अजिबात फिरकले नाहीत ? डॉक्टरसाहेबांचं जाऊ द्या हो, पण तुम्ही तुमच्याच धाग्यावर फिरकला नाही. या धाग्यावर जरी तुम्ही मोदीद्वेषाची चक्की चालवली होतीत तरी मी मोदीभक्तीची चक्की चालवली नव्हती. माझ्या मुद्द्यांचा प्रतिवाद करता आला नाही म्हणून चक्क पलायन केलंत. पण दुसरा जास्त खोलवरचा मुद्दादेखील होता. ‘या निर्णयामुळे श्रीमंत लोकांचा काळा पसा गेला, त्यांचे नुकसान झाले याचा असूयारूपी आनंद गरीब लोकांना झाला आणि तो स्वतच्या नुकसानाच्या दु:खापेक्षा जास्त होता’ असे विश्लेषण केले गेले आहे ज्याला ज्याचा आनंद झाला असेल तो होऊ दे. तुम्हाला कसलं दुःख होतंय ते आम्हाला माहित आहे. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी तुमची स्थिती झालेली आहे. टीप: माझे या प्रतिसादातील मुद्दे पटत नसतील तर तुम्ही तुमचेच लेख आणि त्यावरील सर्व प्रतिक्रिया परत वाचाव्यात ही विनंती.
↩ प्रतिसाद: अभिजित - १

हे वाक्य लोकसत्ता लेखातील आहे. माझे नाही.

अभिजित - १
Fri, 09/07/2018 - 22:06 नवीन
लेखकाचा ई-मेल id आहे लेखाखाली. त्याला जरूर कळवा !! मला नाही .. ------------------------------------------------------------------------- लोकसत्ता लेख - पण दुसरा जास्त खोलवरचा मुद्दादेखील होता. ‘या निर्णयामुळे श्रीमंत लोकांचा काळा पसा गेला, त्यांचे नुकसान झाले याचा असूयारूपी आनंद गरीब लोकांना झाला आणि तो स्वतच्या नुकसानाच्या दु:खापेक्षा जास्त होता’ असे विश्लेषण केले गेले आहे trademark - ज्याला ज्याचा आनंद झाला असेल तो होऊ दे. तुम्हाला कसलं दुःख होतंय ते आम्हाला माहित आहे. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी तुमची स्थिती झालेली आहे. -----------------------------------------------------------------------------
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

>>या निर्णयामुळे श्रीमंत

नितिन थत्ते
Fri, 09/07/2018 - 22:23 नवीन
>>या निर्णयामुळे श्रीमंत लोकांचा काळा पसा गेला, त्यांचे नुकसान झाले याचा असूयारूपी आनंद हे बाकी थोर आहे. कुणाचाही काळा पैसा गेला नाही हे दोन वर्षांनी धडधडीत कळूनही तसे झाले हे भक्तांना पटवण्यात मोदीजी कमालीचे यशस्वी झाले आहेत.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

थत्ते सर

नाखु
Sun, 09/23/2018 - 18:10 नवीन
(जेष्ठ मिपाकर, विचारवंत) तोंड दाबून बुक्क्यांचा मार. जर खरेच या राज,उद्धव,शरद पवार यांना नोटाबंदीचा काहीच फरक पडला नाहीतर दोन वर्षानंतर ही का त्याच्यावर कंठशोष करत आहेत? क्षणभरासाठी धरू यशस्वी झाली नाही तर शंभर टक्के अयशस्वी ठरली असे तर होत नाही ना? आयकराच्या जाळ्यात अडकले प्रकरणानंतर माहीती पडेलच की. पांढरपेशा आणि पांढर पैसा नाखु बिनसुपारीवाला
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

बर्‍याच जणांना अजूनही असं

नितिन थत्ते
Sun, 09/23/2018 - 20:46 नवीन
बर्‍याच जणांना अजूनही असं वाटतं हे मोदींचं यश आहे हे मी आधीच मान्य केलंय !!
↩ प्रतिसाद: नाखु

काळा पैसा नष्ट करण्यासाठी

मार्मिक गोडसे
Mon, 09/24/2018 - 14:49 नवीन
काळा पैसा नष्ट करण्यासाठी निरपराध जनतेला का वेठीस धरले मोदींनी? निरपराध जनतेचे आर्थिक नुकसान भरून देणार आहेत का मोदी? मोदींना देशाचा कारभार व्यवस्थित करता यावा म्हणून जनतेने त्यांना बहुमताने निवडून दिले. नोकरशहांना कामाला लावेल असं वाटलं होतं,पण कसलं काय मोदींनी नोटाबंदी करून वाटमारी सुरू केली. नोटाबंदिची नेमकी उद्दिष्टे काय हे सांगितले नाही,आणि आता अमुक इतके करदाते वाढले ,तमुक इतके पैसे बँकेत आले असं सांगत आहेत. नोटबंदीपूर्वी देशात १७ लाख कोटी रुपये होते , दीड वर्षानंतर हीच संख्या १८.५ लाख कोटी इतकी झाली. ही संख्या का वाढली ह्याचे उत्तर मोदी का देत नाही? नोटबंदीनंतर काही दिवस ' कॅश लेस' व्यवहार वाढले म्हणून सरकार श्रेय घेत होते आज कॅशलेस चे प्रमाण किती आहे? का मोदी गप्प आहेत? नवीन काळा पैसा पुन्हा निर्माण होऊ लागला आहे. तो आता कसा नष्ट करणार?
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

देशातील सर्वसामन्य जनता

प्रसाद_१९८२
Mon, 09/24/2018 - 15:36 नवीन
देशातील सर्वसामन्य जनता कधीकाळी नोट बंदी झाली होती, हे आता विसरुन देखील गेली असेल. मात्र नोटबंदी होऊन आता दोन वर्षे उलटली तरी नोटबंदीचा तुम्हाला लागलेला "ठणका" अजून काही थांबायचे नाव घेत नाही.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

आयटी सेलवर पोसलेली मेंढर नाही

मार्मिक गोडसे
Mon, 09/24/2018 - 15:46 नवीन
आयटी सेलवर पोसलेली मेंढर नाही आम्ही नोटाबंदी विसरायला.
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

नोटबंदीने तुमचे फारच आर्थिक

प्रसाद_१९८२
Mon, 09/24/2018 - 16:53 नवीन
नोटबंदीने तुमचे फारच आर्थिक नुकसान झालेय असे दिसतेय. तेंव्हा चालूदे तुमचा त्रागा ! :))
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

देशातील प्रत्येक निरपराध

मार्मिक गोडसे
Mon, 09/24/2018 - 17:59 नवीन
देशातील प्रत्येक निरपराध नागरिकाचे आर्थिक नुकसान झाले आहे , त्यात मी सुद्धा आहे. मेंढरांना फायदा नुकसान काय कळणार?
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

मार्मिक गुरुजी

ट्रेड मार्क
Mon, 09/24/2018 - 18:43 नवीन
जरा इस्कटून सांगता का? काय, कसे आणि किती नुकसान झाले? नुसतं लायनीत उभं राहायला लागलं म्हणून ४ तास गेले असं नाही, कारण आपण लायनीत तर बऱ्याच गोष्टींसाठी उभं राहतो. तर तुमच्याकडे योग्य तो कर भरल्यानंतर (क्ष) रुपये होते जे आता (क्ष - य) झाले, अगदी खरी रक्कम नाही सांगितली तरी चालेल पण निदान पर्सेंट मध्ये किती कमी झाले ते तर सांगू शकता. त्याचबरोबर ते का आणि कसे कमी झाले असं तुम्हाला वाटतं हे पण सांगा. टीप: तुम्ही "देशातील प्रत्येक निरपराध नागरिकाचे आर्थिक नुकसान झाले आहे , त्यात मी सुद्धा आहे" असं लिहिलं आहे म्हणून वरील प्रश्न विचारले आहेत. फार अवघड वाटत असेल तर तसं सांगा म्हणजे ऊत्तर देणं टाळता येईल.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

जरा इस्कटून सांगता का? काय,

मार्मिक गोडसे
Mon, 09/24/2018 - 19:46 नवीन
जरा इस्कटून सांगता का? काय, कसे आणि किती नुकसान झाले? https://www.misalpav.com/comment/1010885#comment-1010885 नोटबंदी नसती केली तर तुमच्या माझ्याकडील ५०० आणि १००० ₹ चे मूल्य तितकेच राहिले असते. नोट बदलण्यासाठी झालेला वाहतूक खर्च आणि वाया गेलेला वेळ हा धरणार की नाही? माझे हातावर पोट आहे, त्यामुळे मला तसा विचार करणे भाग आहे.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

अहो ट्रेड मार्क ,मी इस्कटून

मार्मिक गोडसे
Fri, 09/28/2018 - 11:16 नवीन
अहो ट्रेड मार्क ,मी इस्कटून सांगितले, माझे नुकसान झाले हे मान्य तरी करणार की नाही?
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

अहो गोडसे

ट्रेड मार्क
Fri, 09/28/2018 - 20:12 नवीन
तुमच्याकडचे ५०० आणि १००० रुपयाच्या नोटेचे मूल्य ८ नोव्हेंबर २०१६ च्या आधी किती होते आणि ८ नोव्हेंबर २०१६ नंतर किती झाले हे कुठे सांगितलंय? नुसते मूल्य कमी झाले म्हणून ओरडताय, तसे तर पैश्याचे मूल्य दर दिवशी कमी होतच असते. Time value of money हे तुम्हाला माहित आहे का? एक सोप्प गणित तुम्हाला करायला सांगतो - ५०० रुपयाची ७ नोव्हेंबर २०१६ रोजीची किंमत - ९ नोव्हेंबर २०१६ रोजीची किंमत - (काळ X महागाई निर्देशांकामुळे कमी झालेली प्रतिदिन किंमत) असं करून उत्तर सांगा. नोट बदलण्यासाठी झालेला वाहतूक खर्च आणि वाया गेलेला वेळ हा धरणार की नाही? तुमच्याकडे एकच नोट होती? इथेही एक गणित घालतो - तुमच्या कडील ५०० + १००० च्या नोटांची किंमत - (वाहतूक खर्च + (वाया गेलेले तास * प्रतितास मोबदला)) याचं उत्तर सांगा. माझे हातावर पोट आहे, त्यामुळे मला तसा विचार करणे भाग आहे. हा विचार करण्यात आणि तो विचार इथे टाइपण्यात तुम्ही फार वेळ घालवताय असं नाही वाटत? ताळेबंद मांडायचा झाला तर इथेही एक गणित घालायला लागेल, फार अवघड नाही हो - तुमचे नोटबंदीमुळे वरील २ गणितांनुसार झालेले नुकसान - (हा मनस्ताप + हा विचार करण्यात घालवलेला वेळ** + मिपावर टैपण्यात घालवलेला वेळ**) ** तुम्हाला आता तुमच्या प्रत्येक तासाची किंमत माहित आहेच, त्यामुळे या गणितात तुम्हाला सहज वापरता येईल
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

तुमच्याकडचे ५०० आणि १०००

मार्मिक गोडसे
Fri, 09/28/2018 - 23:56 नवीन
तुमच्याकडचे ५०० आणि १००० रुपयाच्या नोटेचे मूल्य ८ नोव्हेंबर २०१६ च्या आधी किती होते तुमच्या बेसिक मध्ये लोच्या आहे. नोटबंदीपूर्वी माझ्याकडील किंवा तुमच्याकडील नोटेचे मूल्य हे कधीच वेगळे नव्हते. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी ५० पैसे आणि १००० च्या नोटेला त्यांच्या मूल्याच्या समप्रमानातच होते. ८ नोव्हेंबर २०१६ नंतर किती झाले हे कुठे सांगितलंय? माझ्या कामाचे दर प्रती मिनिट कामाच्या स्वरूपावर असतात आणि नेमके नोटबंदी च्या काळात हातात कामेही भरपूर होती, परंतु नोटा बदलायला माझा बहुमूल्य वेळ वाया गेला त्यामुळे मी बदलून घेतलेल्या नोटांचे मूल्य negative झाले. नोटा न बदलता तशाच ठेवू द्याव्या तर तो गुन्हा ठरला असता. मोदींच्या मुर्खपणामुळे देशातील कित्येक जणांचे माझ्यासारखे नुकसान झाले. हा विचार करण्यात आणि तो विचार इथे टाइपण्यात तुम्ही फार वेळ घालवताय असं नाही वाटत? अजिबात नाही. हातावर पोट असल्यामुळे आणि कामाचे वेळापत्रक फिक्स नसल्याने मी नेहमी फावल्या वेळातच असली कामे करतो मग कधी तो दिवस असतो तर कधी रात्र, त्यामुळे माझा वेळही चांगला जातो . आता तरी नोटबंदीमुळे माझ्या ५०० आणि १००० च्या नोटांचे मूल्य घटले हे मान्य कराल का?
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

हाहाहा

ट्रेड मार्क
Sat, 09/29/2018 - 00:39 नवीन
तुमच्या नुसत्या बेसिक मधेच नाही तर तर्कबुद्धीत लोच्या आहे. एवढं नुसतं बहुमूल्य वेळ वाया गेला म्हणताय पण किती वेळ वाया गेला? अश्या किती नोटा तुमच्याकडे होत्या आणि त्या बदलायला किती वेळा जायला लागलं? नक्की तुमचे किती नुकसान झालं? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देतच नाहीये. खूप काम केल्याने खूप रोख रक्कम जमा झाली होती का? त्यावर टॅक्स वगैरे भरला होता का? सगळं नियमित असेल तर ५० दिवस होते आणि त्यातूनही नोटा बदलायलाच पाहिजे होत्या असं काही नव्हतं, त्या खात्यात भरण्याची पण सोय होती. एकीकडे कामाचे वेळापत्रक फिक्स नसतं म्हणताय आणि मग ५० दिवसात एकही दिवस तुम्हाला खात्यात पैसे भरणे/ काढणे व बदलून घेणे यासाठी सवड झाली नाही? हे तुमच्या लाडक्या राहुल गांधींसारखं झालं की - नुसता इथे घोटाळा झालाय म्हणायचं पण कसा झाला, किती रकमेचा झाला हे सांगता येत नाही. तुम्हाला राहुल गांधी का आवडतो याचं कारण आता स्पष्ट झालं आहे. आता तरी नोटबंदीमुळे माझ्या ५०० आणि १००० च्या नोटांचे मूल्य घटले हे मान्य कराल का? जरी तुमच्या कामात खंड पडल्याने तुम्हाला पैसे मिळाले नाहीत असं म्हणलं तरी तुमच्या हातात असलेल्या नोटेचे मूल्य कमी झाले असं म्हणत नाहीत. तर त्या व्यवहारात तुमचे नुकसान झाले असं म्हणतात.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
  • «
  • ‹
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • 21
  • 22
  • 23
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा