Skip to main content

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

लेखक ट्रेड मार्क यांनी मंगळवार, 08/11/2016 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे. त्यामुळे जिथे खूप प्रमाणात नोटा आहेत असे दिसेल ते ठिकाण ट्रॅक करता येईल. मला तरी हे स्वागतार्ह पाऊल वाटत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो, धागाकर्त्याच्या परवानगीने ५०० व १००० च्या नोटा बदलण्यासाठी आवश्यक असणार्‍या फॉर्मची लिंक येथे टाकतो आहे. http://reviews.trekbook.in/download-pdf-request-slip-exchange-rs-500-rs… कृपया १-२ कॉपीज जास्तं बरोबर ठेवा. अपंग व्यक्ती आणि जेष्ठ नागरिकांना वेळप्रसंगी एखादी कॉपी देता येईल. धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 311129
प्रतिक्रिया 1112

प्रतिक्रिया

In reply to by ट्रेड मार्क

अहो ट्रेड मार्क - मिपा कर काय , काळा पैसे वाले काय , कोणाचेच पैसे बुडाले नाहीत ना !! म्हणून तर आम्हा तटस्थ जनतेच्या पोटात दुखते. कि मोदी मोठ्या टेचात सांगत होते, ३ /४ लाख कोटी रु चलनातून नष्ट होतील ( कारण ते गंगा मी डुबाय जायेंगे , काळा पैशा वाल्या कडून ) जनता त्रास सहन करत होती. कारण कोणी तरी या माजलेल्या काळा पैसे वाल्यांची मारावी हि सामान्य जनतेची इच्छा होती. ( माका काय बी होवू दे. तुका रस्त्या वर आणतोय कि नाय बघ . या type मधली ) पण तसे काहीच झाले नाही. सगळा पैसा बँक मध्ये परत !! थोडक्यात सफेद झाला !! देशाचे १.२८ लाख कोटी पाण्यात. जनता त्रास सहन करून वेडी ठरली. काळा पैसे वाले मज़ेत !! आणि हे इतके सगळे होऊन हि भक्त मोदीच कसे बरोबर यातुन बाहेर पडायला तयार नाहीत !! झापडं लावलेले बैल. रहाट भोवती जसे गोल गोल फिरत असतात. तसेच हे. जरा मोदी प्रेमाची झापडं काढा !!

In reply to by अभिजित - १

सगळा पैसा बँक मध्ये परत !! थोडक्यात सफेद झाला !! बेसिक मध्ये लोच्या आहे. खाल्लेले पैसे एखाद्या पोलिसाने बँकेत भरले कि ते सफेद होतात का? ज्ञात उत्पन्नच्या स्रोतांपेक्षा जास्त पैसे नावाचा गुन्हा महिती आहे का? श्रीमती जयललिता या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री ज्यासाठी तुरुंगात होत्या.

In reply to by विशुमित

कशाला फाटे फोडताय कंपूबाजी करून? एक साधा प्रश्न विचारतोय बँकेत पैसे जमा केले म्हणजे ते पांढरे कसे झाले ते सांगा बरं?

In reply to by सुबोध खरे

जे धडधडित सत्य सर्वाना समोर दिसतंय ते मान्य करायला तुमचं मन ( बुद्धी म्हणणार नाही मी इथे ) . मनच . तयार नाहीए. त्यामुळे निव्वळ बाष्कळ वाद तुमचाच कंपू इथे घालतोय. पैसे बँक मध्ये जमा झाले , तर ते पांढरे कसे झाले ? हा तुमचा प्रश्न. मी - काळा पैसे वाले इतके माजलेत कि सगळे काही सेटल करू शकतो याचा त्यांना विश्वास होता / आहे आणि यापुढे हि राहणार. मोदी काय प्रत्येकाची बँक अकाउंट तपासणार नाहीत. IT ऑफिसर तपासतात. ते खाबू बाबू query काढणार. चोर बनिया ती सेटल करणार. काम तमाम !! इथेच तर खरी मेख आहे. माझा प्रश्न तुम्हाला - काळा पैसा बँक जमा करून जवळ जवळ २ वर्ष झाली. माझ्या मते तो पांढरा झाला. तुमच्या मते तो तसा पांढरा होत नाही. मला सांगा २ वर्षात किती लोकांना ( ज्यांनी काळा पैसा जमा केला ) त्यांना शिक्षा झाली ? त्यांचा पैसा सरकार जमा झाला ? काही यादी ? लिस्ट ? किती लाख कोटी रु ? कृपया कंपन्या बंद झाल्या वगैरे सांगू नका. त्याचे उत्तर मी आधीच ट्रेडमार्क ना दिले आहे. ते वाचा. वैयक्तिक किती लोक आत गेले ? त्यांचा पैसा सरकार जमा होऊन ते रस्तावर आले ? काहि उत्तर आहे ? आणि आता लोक चोर आहेत तर मोदी काय करणार वगैरे फोल समर्थन करू नका. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या नाहीतर पैसा पांढरा झाला हे मान्य करा. A very simple Question !!

In reply to by अभिजित - १

स्क्रुटिनी सात वर्षे पर्यंत काढता येते हे आपल्याला माहिती आहे का? पुरावा असेल तर कितीही जुनी केस परत काढता येते. या वर्षी २५ लाख रुपये बँकेत भरले आणि पुढच्या वर्षी उत्पन्न खाली गेले तर संगणक आपोआप स्क्रुटिनी काढतो हे आपल्याला माहिती आहे का? १८ लाख लोकांना आयकर खात्याच्या नोटीस गेल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे का? 18 lakh taxpayers to get Income Tax notices to explain large deposits Read more at: //economictimes.indiatimes.com/articleshow/56895280.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst हे वाचून पहा मग आपण चर्चा करू. जर चष्मा लावणार नसाल तर पैसा पांढरा करताना बऱ्याच लोकांचे डोळे पांढरे व्हायची पाळी आली आहे

In reply to by सुबोध खरे

आता आपला आयकर जवळच्या आयकर भवनात ना जात गुवाहाटी किंवा मदुराईचा आयकर अधिकारी याच्या कडे जातो त्यामुळे ऍडजस्ट करणे जास्त कठीण झाले आहे हे आपल्याला माहिती आहे का? अशा अधिकाऱ्याने काढलेली केस हि दिल्लीच्या कार्यालयातील मुख्य संगणकात नोंद होते हे आपल्याला माहिती आहे का?

In reply to by सुबोध खरे

https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/18-lakh-taxpay… Updated: Feb 01, 2017, 01.12 AM IST वाचली. feb २०१७ मधली आहे. दीड वर्ष झाली बातमी येऊन. पुढे काय ? किती लाख कोटी पकडले ? बरं संपूर्ण पराभव पत्करायची लाज वाटत असली/ मनाला वेदना होत असल्या तर आपण एक करू. तुम्ही मान्य करा - २ वर्षात नोटबंदी मधून जितकी मोदींनी हवा केली होती. त्या प्रमाणात काळा पैसा पकडला गेला नाहीए. नोटबंदी मुख्य उद्दिष्ट काळा पैसा पकडणे. यात आत्ता पर्यंत तरी ती फेल गेली आहे !! आणि स्क्रुटिनी सात वर्षे पर्यंत फक्त ?? हा हा हा !! मी मान्य करतो - कि पुढील ७ वर्षात जर या प्रमाणात काळा पैसा पकडला गेला तर नोटबंदी यशस्वी १ लाख कोटी - बऱ्या पैकी यशस्वी .. २ लाख कोटी - चांगलीच यशस्वी ... ३ लाख कोटी - संपूर्ण यशस्वी !! मी हरलो तर मला आनंदच होईल. पण तसे होणे नाही. काय करणार का हे मान्य ? मी भाजप किंवा काँग्रेस कोणाचाही समर्थक नाही. नोटबंदी यशस्वी झाली असती तर मला नक्कीच आनंद झाला असता. पण ती फेल जाणार हे सुरुवाती पासूनच दिसत होते. माझे काही जुने मेसेज आहेत तसे इथे. तेव्हा भक्तनि मला वेड्यात काढले होते. असो. सत्य कटु असते. जितके लवकर तिचा स्वीकार कराल तितके लवकर पुढे काहीतरी चांगले निष्पन्न होऊ शकते. खोट्याला कवटाळून काहीही साध्य होणार नाही !!

In reply to by अभिजित - १

अ‍ॅक्चुअली. ह्या चार बंद्या एकापाठोपाठ बघितल्या ना की हसू येते. कोणी कशा स्वरुपात केल्या हे बाजूला ठेवू पण प्लानिंग आणि ईक्झिक्युशन बघायला गेले की सामान्य माणूस पण खदखदून हसेल. मला नवल वाटते उच्चक्शीतीत आणि हुच्चभ्रु म्हणवणार्‍यांवर कुठलं भूत सवार आहे? द्वेष, विरोध बिरोध काही नाही हो, अगदी दणकून मतदान केलेले त्यांनाच. पण आहोत सामान्यच आम्ही. सगळ्या बंद्या सामान्य माणसांचे भले हे दाखवून केल्या त्याबाबत काहीही शंका नाही पण आता बघा. १) गुटखा बंदी (ही राज्य सरकारची बरंका) : गुटख्यावर बंदी, पान मसाल्यावर नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात कूथल्याही पानपट्टीवर जावा, हमखास मिळणार. कसं काय चालतं हो? अहो एमपी कर्नाटकातून येतो. बरं एकेका टपरीवर पन्नाससाठ हजाराचा माल असतो, कुठून येतो माल? कुठे असतात गोडाऊन, तिथे कमीत कमी करोडोंचा माल असतो. कसे चालते इतके मोठे लॉजिस्टिक्स? कशी इतकी साठवण आणि वाहतूक बिनभोभाट होते. पैसे, हप्ते बिनभोभाट. आता कारण पुढे येते लोकांचेच. त्यांचाच सहभाग अपेक्षित आहे. २) हायवे दारु बंदी: ५०० मीटरची बंदी, नंतर म्हणले वॉकेबल डिस्टन्स, नॉट एरियल डिस्टन्स, नंतर जागेचा क्लिअरन्स, नंतर परमिङ्ट रिन्यु, पैसे, हप्ते बिनभोभाट. आता कारण पुढे येते लोकांचेच. त्यांचाच सहभाग अपेक्षित आहे. ३) प्लास्टिक बंदी: (ही पण राज्य सरकार): ५० मायक्रोन खाली बंदी, आता गम्मत बघा. दणकून दंड लोकांना. तपासणार्‍या लोकांना बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आणि नॉर्मल ह्यातला फरक कळत नाही, मायक्रॉन मोजणार कसा ह्याची परफेक्ट मेथड नाही. नॉन वोव्हनवर बंदी. ते कशाला म्हणतात निम्म्या लोकांना माहीत नाही. ज्युट बॅग म्हनून दाबून खपतात सध्याही. पातळ पिशव्या जप्त की जप्त. दाबून दंड वसूल. पैसे, हप्ते बिनभोभाट. आता कारण पुढे येते लोकांचेच. त्यांचाच सहभाग अपेक्षित आहे. ४) नोटाबंदी: केली तर केली, पहिले कारण काळा पैसा, नंतर फेक करन्सी, नंतर अ‍ॅडव्हान्सड करन्सी नोटस, नंतर ऑनलाईन व्हा म्हणून, नंतर सगळ्यांनी कॅश लेस होत बँकेत पैसे ठेवा म्हनून, लोकांना वाटले बँकेत पैसा आला आता कर्जे बिर्जे स्वस्त होतील, घराचे ब्लॅक मनी प्रमाण कमी होईल, लाचलुचपत कमी होईल, दहशतवाद प्रमाण कमी होईल, भोगू थोडा त्रास. झाले काय? परिणाम दिसायला वेळ लागेल म्हणले तर होत आली दोन वर्षे, आले पण रिपोर्ट बँकाचे. ते बोलतात, काळे पैसे, हप्ते बिनभोभाट. आता कारण पुढे येते लोकांचेच. त्यांचाच सहभाग अपेक्षित आहे. . आता तर म्हन्ताहेत शिस्त हवी, केली तर लोक हुकुमशहा म्हणतात. बाकी काही नाही, शहाण्याने ओळखून घ्यायची पुढची पावले.

In reply to by अभिजित - १

पण ती फेल जाणार हे सुरुवाती पासूनच दिसत होते तुम्ही द्रष्टे आहात हे मान्य करतो कारण भल्याभल्याना जे कळले नाही ते तुम्हाला कळले होते. तुम्ही एवढा भुभुक्कार करीत आहात तर तुमची अपॆक्षा काय आहे? मुख्य आयुक्तांनी किती लोकांना नोटीस दिल्या आहेत हे तुम्हाला येऊन सांगायला हवंय? बाकी सर्व ठीक आहे पण

काळा पैसा पांढरा झाला हे आपले भंपक गृहीतक

अजूनही कवटाळूनच आहात हे पाहून

मणोरंजण

झाले. ज्यांना अशा नोटीसा आल्या आहेत असे लोक एकदा पाहून घ्या म्हणजे "मणाचे समाधाण" होईल. बाकी आयकर अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जरी झालेल्या आहेत कि शक्यतो लोकांना छळू नका ज्यांना मुख्य प्रवाहात यायचे आहे त्यांना कर आणि त्यावरील दंड भरून "मोकळे करा". आपल्याच दुव्यातील वाक्य देतो आहे. The tax department has enabled online verification of these transactions to ensure people do not face harassment at the hands of tax officials. ज्या खात्यात ५ लाख रुपये आहेत किंवा २ लाखाच्या वर रुपये भरले आहेत त्यांना KYC केल्याशिवाय पैसे काढता येणार नाहीत. हा पैसा सरकारजमा होईल कि खातेदार प्रामाणिक आहे याची १ कोटी खात्यांची खातरजमा करणे हे खाऊचे काम वाटते आहे का? All accounts that have a balance of Rs 5 lakh or in which Rs 2 lakh was deposited during the demonetisation period will need to be compliant with knowyour-customer (KYC) norms. Without this, the Reserve Bank of India won’t allow money to be withdrawn from them. During the seven-week deposit window, more than Rs 2 lakh was deposited as cash in more than 1 crore accounts that have more than 70 lakh unique permanent account numbers attached to them, Chandra said. ७० लाख PAN बरोबरच्या खात्यांची तपासणी करणे हे काम संगणकावर बोटं लावण्याइतकं सोपं नाही तेसुद्धा तुमचं नेहमीच काम सांभाळून. आयकर खात्यावर केवढा प्रचंड कामाचा बोजा आला आहे हे एकदा एखादा मित्र असेल तर त्याला विचारून पहा. बाकी तुम्ही द्रष्टे आणि सर्वज्ञ आहातच . जाता जाता -- जिज्ञासूंनी अभ्या शेट नि दिलेला दुवा पूर्ण वाचून पाहावा हि विनंति ( तो त्यांनीच नीट वाचला नसावा अशी शंका येत आहे- सेल्फ गोल चे दुसरे चांगले उदाहरण नसावे )

In reply to by सुबोध खरे

इतके मोठी टायपो गिरी करण्याचा त्रास करण्या पेक्षा माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. किती काळा पैसा गेल्या २ वर्षात पकडला गेला ?

In reply to by सुबोध खरे

तुमच्या कंपूतील सायकल वाले आणि जून महिन्यापर्यंत मिपावर सुट्टी घेणारे कथित गुरूजी कुठे गायब झालेत. दिसत नाहीत आजकाल.

In reply to by विशुमित

गुरुजी हे technical / logical / तात्विक भक्त आहेत. त्या मुळे अंध भक्त गिरी करणे त्यांच्या मनाला पटत नसावे. त्या मुळे ते इकडे फिरकत नसावे !!

In reply to by विशुमित

तुमच्या कंपूतील सायकल वाले आणि जून महिन्यापर्यंत मिपावर सुट्टी घेणारे कथित गुरूजी कुठे गायब झालेत. दिसत नाहीत आजकाल. नारायण राणेंना भाजपाने पाठिंबा दिला तर पुन्हा भाजपाची बाजू मांडणार नाही असे इथे कुठेतरी लिहिले होते - त्याचे पालन करत आहे. तुमच्या धन्याने पट्टा आवळला की तुमचा आवाज बंद, सैल सोडला की आवाज सुरू.. असे आमच्या बाबतीत होत नाही. मी लिहिलेल्या शब्दाचे पालन करतो, तुमच्यासारखी भाटगिरी केली असती तर शब्द फिरवून / मागे घेऊन इथेच प्रतिसाद दिले असते. बाकी विनाकारण माझी आठवण काढू नका. तुमचाही ट्रक धरणात जाईल.

In reply to by मोदक

असं वय.. जान जाए पण वचन न जाए पाळणारे ह्या कलियुगी तसे दुर्मिळच ! आमचं जाऊ द्या पण तुमच्या गळ्यातला पट्टा कोणीतरी आवळला होता अशी कुणकुण ऐकून आहे. खरं काय अन् खोटं काय हे तुम्ही आणि तुमचे मालकच जाणू.. विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

In reply to by विशुमित

तुम्ही नेहमीप्रमाणे चुकीचे ऐकले आहे. इतक्या वर्षात अजाण बालकेही बालवाडीतून पायर्‍या चढत वर जातात.. (ते ही स्वत:च्या जीवावर..) मी कुठे आहे, काय करतो आहे हा भोचकपणा करण्याऐवजी तुमच्या गजराच्या घड्याळाचा काटा आहे तिथेच अडकला आहे त्याचे कांहीतरी बघा. तुम्हाला बालवाडीतून वर येण्यासाठी आणि मोठे होण्यासाठी शुभेच्छांची आवश्यकता आहेच. त्यामुळे गेट वेल सून..!

In reply to by अभिजित - १

तुम्ही मोदीद्वेषाची झापडं लावलीयेत त्याचं काय? तुम्ही ध्रुव राठी, वायर, स्क्रोल वगैरे बघणं वाचणं बंद करा. म्हणजे तुम्हाला खरंच आजूबाजूला काय चालू आहे ते कळेल. मिपा कर काय , काळा पैसे वाले काय , कोणाचेच पैसे बुडाले नाहीत ना !! हे कशावरून सांगताय? तुम्हाला काय माहित कोणाचेच पैसे बुडाले नाहीत? केवळ बँकेत नोटा परत आल्या म्हणजे पैसे बुडाले नाहीत हा तर्क लावताय. धनदांडग्यांनी गरीब लोकांना रांगेत उभं करून त्यांच्या खात्यात पैसे भरून तात्पुरता प्रश्न सोडवला. यात त्या गरिबांना पण मधल्यामध्ये कमिशन मिळून गेलं. ही खाती सरकारच्या रडारवर आली. जरा बदल म्हणून हा व्हिडीओ बघा. तुम्ही नेहमी बघता त्या तुमच्या लाडक्या कोणाचा हा व्हिडिओ नसल्याने कदाचित तुम्हाला पटणार/ आवडणार नाही. पण जरा तटस्थ राहून ऐकून तर बघा. जनता त्रास सहन करत होती. कारण कोणी तरी या माजलेल्या काळा पैसे वाल्यांची मारावी हि सामान्य जनतेची इच्छा होती. मोदीकाकांनी त्यांना जो बरोबर वाटला तो उपाय केला. मग भले तो यशस्वी झाला नसेल, पण उपाय तर केला. तुम्हाला उपाय पटला नाही तर मग काय करायला पाहिजे होतं किंवा अजून पुढे काय करता येईल हे सांगा. ही मागणी मी कितीतरी वेळा केलेली आहे, पण तुम्ही झापडं लावलेले बैल. रहाट भोवती जसे गोल गोल फिरत असतात तसेच मोदीद्वेषाची झापडं लावून गोल गोल फिरत आहात. परत एकदा माझी मागणी नोंदवतो - मोदींनी नोटबंदी करून चूक केली असं आपण मान्य करू. मग काळा पैसा, लोकांनी दडवून ठेवलेला पैसा, कर चुकवण्यासाठी रोखीत चाललेले व्यवहार, हवाला व्यवहार, खोट्या नोटा, रोखीत होणारे टेररिस्ट आणि नक्षलवाद्यांना फंडिंग वगैरे प्रश्न कसे सोडवायचे याचा काहीतरी प्लॅन द्या. गेलाबाजार पूर्ण प्लॅन नसेल तर आराखडा तरी द्या. आपण त्यावर पुढे चर्चा करून फुलप्रूफ प्लॅन तयार करू. जरी मोदी फॅसिस्ट असल्याने त्यांनी आपला प्लॅन ऐकला नाही तरी २०१९ मध्ये राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावर त्याला आपण हा प्लॅन सादर करू. म्हणजे मग २०१९ नंतर सगळं कसं सुरळीत होईल. काय म्हणता?

In reply to by ट्रेड मार्क

>>काळा पैसा, लोकांनी दडवून ठेवलेला पैसा, कर चुकवण्यासाठी रोखीत चाललेले व्यवहार, हवाला व्यवहार, खोट्या नोटा, रोखीत होणारे टेररिस्ट आणि नक्षलवाद्यांना फंडिंग वगैरे प्रश्न कसे सोडवायचे याचा काहीतरी प्लॅन द्या. खरं तर यातल्या बर्‍याच समस्यांवरचे उपाय काय आहेत हे बर्‍याच लोकांनी वेगवेगळ्या वेळी सांगितलेले आहेत. त्या समस्यांवर नोटाबंदी हा सर्वात कमी परिणामकारक किंवा निरुपयोगी उपाय आहे. काळा पैसा हा रोखस्वरूपात फारसा नसून जमीन/रिअल इस्टेट, शेअर्स, सोने दागिने या अ‍ॅसेटच्या स्वरूपात साठवलेला असतो हे सर्वज्ञात आहे. आणि हे ज्ञान ८ नोव्हेंबर नंतर झालेले नसून आधीपासून आहे. त्यामुळे नोटबंदीने काळ्यापैशाच्या एकूण साम्राज्यावर ओरखडाही उठणार नाही हे उघड होते. काळ्या पैशाचे दोन भाग आहेत. एक म्हणजे कर चुकवलेला पैसा आणि दुसरा भ्रष्टाचारातून मिळवलेला पैसा. कर चुकवेगिरी कमी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करता येतो आणि योग्य त्या इंटिग्रेशनने ते हळूहळू साधता येईल. जीएसटीच्या मार्फत अप्रत्यक्ष करांच्याबाबतीत हे आता साधायची सुरुवात झाली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीत खरे तर ही गोष्ट अगदी चांगली आहे. आयकराच्या बाबतीत ही प्रक्रिया अनेक वर्षांपासून चालू आहे. त्यात टीडीएसचा ताळा इन्कमटॅक्स रिटर्नशी लावणे वगैरे उपाय करणे चालू आहे. जे योग्य दिशेने चालू आहे. भ्रष्टाचारातून मिळणारा काळा पैसा रोखणे ही फार अवघड गोष्ट आहे. कारण भ्रष्टाचार म्हणजे रोख स्वरूपात दिलेली लाच इतकीच त्याची व्याप्ती नसून "इन काइंड" किंवा फेवर्स या स्वरूपात केला जाणारा भ्रष्टाचार शोधणे फार अवघड. एखाद्या अधिकार्‍याला पाच लाख रुपये रोख लाच न देता एक गाडी घेऊन दिली तर ती सापडू शकत नाही. गाडी कागदोपत्री लाच देणार्‍याच्या नावावर असू शकते. त्यात मोदी फार काही करू शकतील याची अपेक्षा नाही. तिसरा भाग राजकीय पक्षांच्या उत्पन्नस्रोतांचा ज्याबाबतीत या सरकारने काही केलेले नाही. इतकेच नाही तर अनेकांच्या मते अपारदर्शकता वाढवणारे बदल या सरकारने केले आहेत. टेरर फंडिंग म्हणाल तर त्यावर नोटबंदी हा अगदीच हास्यास्पद उपाय आहे. तो योग्य उपाय ठरण्यासाठी दर दोन वर्षांनी ती करावी लागेल. नोटबंदी फेल जात आगे/गेली आहे असे दिसू लागल्याच्या काळात भक्तांमार्फत जमीनी/सात बारा यांवर मोदी सरकारची पुढची कारवाई असणार आहे वगैरे मेसेज फॉरवर्ड होत होते. तसे काही घडलेले नाही. तर उपाय काय हे परत परत विचारले म्हणून हा प्रतिसाद दिला. अन्यथा कुडमुड्या अर्थतज्ञांवर विसंबणार्‍या सरकारला खरोखरचे उपाय करायचे नाहीयेत असे वाटते. वर मी म्हटलेला जीएसटी आणि आयकरातील इंटिग्रेशनचा मार्ग योग्य आहे. पण त्यासाठी नोटाबंदी करण्याची काहीच आवश्यकता नाही. नोटाबंदीने काही साध्य झाले तर इतकेच की मोदी काहीही करू शकतात हे लोकांना. भले ते "काहीतरीच" का असेना.

In reply to by नितिन थत्ते

हा प्रतिसाद केवळ नोटबंदी या विषयी आहे. बँक्रप्सी कोड आणि रेरा हे या सरकारचे अत्यंत स्तुत्य कायदे आहेत. त्यासाठी हे सरकार प्रशंसेस पात्रच आहे.

In reply to by नितिन थत्ते

हायला थत्ते चाचा मोदी सरकारचे कौतुक करताहेत मला तर गहिवरून आलंय असो चाचा भ्रष्टाचारातून मिळणारा काळा पैसा रोखणे ही फार अवघड गोष्ट आहे. हि अवघड नाही अशक्य गोष्ट आहे. कितीही कड्या कुलुपे सी सी टी व्ही पोलीस गुप्तहेर ठेवा चोऱ्या होणारच कारण हाव आणि लोभ हि मानवी प्रवृत्ती आहे. पण हा उंदीर मांजराचा खेळ अनादी कालापासून अनंत काला पर्यंत चालू राहणार आहेच बाकी काळा पैसा हा रोखस्वरूपात फारसा नसून जमीन/रिअल इस्टेट, शेअर्स, सोने दागिने या अ‍ॅसेटच्या स्वरूपात साठवलेला असतो हे सर्वज्ञात आहे. यातील सर्वात जास्त पैसा हा जमीन/रिअल इस्टेट क्षेत्रात आहे. यासाठी तर या सरकारने बेनामी मालमत्ता कायदा आणला आहे शिवाय प्रत्येक व्यवहार हा आधार कार्डशी संलग्न केला आहे. या कायद्यामुळे आता बेनामी मालमत्ता विकणे अशक्य झाले आहे. कारण मालमत्ता विकताना आपल्या हाताचे ठसे घेतात ते जुळले नाही तर आपली मालमत्ता हस्तांतरण करता येत नाही. म्हणून तर आधार कार्डला एवढा मानवाधिकार वाल्यांचा जोरदार विरोध आहे. आणि याच कारणासाठी १९८८ साली संसदेने पास केलेला कायदा नोकरशाहीच्या गुंत्यात गुंतवून ठेवला होता. बहूसंख्य छोट्या मोठ्या स्थानिक राजकारण्यांची गोची यामुळेच झाली आहे. कारण निवडणूक लढवताना मालमत्ता जाहीर करायला लागते आणि आता एकदम एवढी मालमत्ता कुठून आली म्हणून विचारले जाते. (काही अतिप्रगतिशील शेतकऱ्यांनी एका एकरात काही कोटी रुपये शेतीच्या करमुक्त उत्पन्नातून कमावले याचे गमक हेच तर आहे.) हि मालमत्ता अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीच्या नावाने घेतली होती ती आता विकत येत नाहीये. हे अवघड जागी दुखणे आहे आणि गावातला एकमेव डॉक्टर जावई असेल तर जी स्थिती होते ती झाली आहे.

In reply to by अभ्या..

नवीन छापलेल्या प्रत्येक नोटा (२०००, ५००, २००, इ.) अगदी बकवास आणि बंडल आहेत. पहिल्यांदा पाहिल्यावर मलातर ह्या नोटा खर्या आहेत की नवा व्यापार मधल्या आहेत हेचं कळत नव्हतं. अतिशय रद्दड डिजाईन व छपाई.

In reply to by सतिश गावडे

काल एक भयानक युक्तिवाद ऐकला: नोटाछपाईमध्ये स्वयंपुर्णता आणण्यासाठीचा हा मास्टरस्ट्रोक होता म्हणे.

आज दहीहंडीच्या निमित्ताने धाग्यावर माझी हजेरी लावून जातो. आमच्या ठाण्यातल्या कोटी कोटी रुपयांच्या दहीहंड्या काही वर्षांपूर्वी बंद पडल्या.आता लाख लाख रुपयांची बक्षिसे आहेत असे ऐकतो. हया निमित्ताने गोविंदांचे 'कमळा'च्या आकाराचे उभारलेले थर, अल्पवस्त्रांकित रशियन नर्तकीचे सात्विक नृत्य दाखवत दाखवत राष्ट्रवादाचा पाया घालणारी 'संघर्ष'पूर्ण पद्धतीने उभारलेली कोटीमोलाची दहीहंडी, महाराष्ट्रात दुष्काळ असूनही गोविंदावर खास अग्निशमन बंबातून उडवलेले भगव्या रंगाचे भासमान पाणी हे सर्व आठवले. नोटबंदी, २०१४ चा सत्ताबदल आणि माझी प्रतिक्रिया ह्यांचा एकमेकांशी संबंध आहे का नाही माहित नाही.

८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री पासून लागू झालेल्या नोटाबंदी या विषयावर ४ सप्टेंबर २०१८ ला हि चर्चा चालू आहे. हा विषय अजून किमान पाचदहा वर्षे चघळला जाईल अशी अपेक्षा आहे. खरंतर देशातील ५०० आणि १००० ची एकतरी नोट ज्याच्यापाशी आहे अशा प्रत्येक नागरिकाने तीचे परिणाम अनुभवले आहेत. ती लागू करताना आणि नंतरही जी कारणे सांगितली गेली आहेत त्या व्यतिरिक्त अनेक अंतस्थ हेतूही त्यामागे असणार हे नक्की. नोटाबंदी चांगली कि वाईट हे प्रत्येकाला त्याकाळात आलेल्या अनुभवावरून तो ठरवू शकतो पण केवळ दोनचार वर्षात तिचे सगळेच भले बुरे परिणाम समोर येतील हि शक्यता कमी वाटते. वरती झालेल्या चर्चेत नोताबंदीचे काहीजणांनी समर्थन केलंय तर काहीजणांनी निषेध व्यक्त केलाय. कुणाला बँकेत भरलेले पैसे पांढरे झाले असे वाटतंय तर कुणाला काळे पैसेवाल्यांनी तो व्यवस्थित जीरवला असल्याची खात्री पटली आहे. परंतु तो बँकेत भरलेला काळा पैसा पंधरा कसा झाला आणि ज्या लोकांनी तो जिरवला असेल तर तो कसा जिरवला याची माहिती कोणी दिली नाहीये. ज्यांच्याकडे मुबलक काळा पैसा होता अशा दुकानदार, व्यावसायिक, कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, दलाल व राजकारणी लोकांनी काय काय शकली लढवल्या त्याची ऐकीव माहिती मोठी रंजक आहे. कोणी कर्मचार्यांना वर्षभराचा पगार दिवाळी बोनस सकट रोखीत आगाऊ देऊन टाकला. तर कोणी बँकेचा वा पतपेढीचा मासिक हफ्ता त्यांना देण्याच्या बोलीवर कर्मचारी व कार्यकर्त्यांच्या छोट्या मोठ्या जसे कि वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जांची मुदतपूर्व परतफेड करण्यासाठी रोख रक्कम दिली. बराच जास्त काळा पैसा असणार्यांनी कित्येक गरिबांना कमिशनवर मोठ्या रकमा त्यांच्या खात्यात भरायला दिल्या. नोताबंदी नंतरच्या एका भाषणात पंतप्रधानांनी अशा लोकांना मिळालेला पैसा हा त्याचा झाला असून तो परत करण्याची आवश्यकता नाही असा सूचक इशाराही दिला होता. आता खरा गदारोळ तेव्हा होईल जेव्हा बँक खात्यात त्यावेळी भरणा झालेल्या रकमेच्या आधारावरून दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांची नावे त्या यादीतून वगळली जातील तेव्हा! खरोखर दारिद्र्य रेषेखाली नसताना केवळ सरकारी योजनांचा आणि अनुदानांचा लाभ उठवणारे बाहेर काढले जातीलच पण क्षणिक मोहात अडकून या कामात सहभागी झालेले खरोखरचे गरीब जेव्हा त्या लाभाला मुकतील तेव्हा त्यांच्या तक्रारीला मात्र कोणताही कायदेशीर आधार असणार नाही.

In reply to by अथांग आकाश

प्रतिसाद खूप आवडला. प्रथमदर्शनी कंक्लुजन एकच दिसतंय... गरीब आणि सामान्य नागरिकच पुन्हा भरडले जाणार. ज्यांचा काळा पैसा बँकेत भरला गेला ते नामानिरळं राहतील याची जास्त शक्यता वाटते.

In reply to by विशुमित

निर्वाळा दिला आहे अश्या संशयास्पद व मूळ खातेदारांना अंधारात ठेवून भरणा केलेल्या रकमा गोठवल्या असल्यातरी त्यावर व्याज मिळत राहील व ते खातेदार वापरु शकतात.नक्की पुढे काही उपाययोजना असणारच आहे.जनधनवर पैसे भरले आहेत. कटाक्षाने सहकारी बँक यांना दूर ठेवले होते त्यामुळे या सरकारी बाबूंना बोलतं केलं जाईल हे नक्की. पद्धत वेगळी राहील.

नीट मांडलीय. मिलिंद मुरूगकर यांचा हा लेख नोटबंदी समर्थकांना पटणार नाही, पण जर कुणी समजून घ्यायचा प्रयत्न केलाच, तर त्यांच्यासाठी https://www.loksatta.com/mati-mansa-aani-maya-news/the-impact-of-demone…

In reply to by स्वधर्म

त्यातील काही भुकुटी ते इकडे वेगवेगळ्या टॉपिक वर मारत असतात. त्यांना आपण सोडून देऊ या. पण डॉ खरे पण इकडे अजिबात फिरकले नाहीत ? खरे साहेब लेख वाचलात का ? पटला का ? कि अजूनही हृदय तयार नाही सत्य मानायला ? ... पण दुसरा जास्त खोलवरचा मुद्दादेखील होता. ‘या निर्णयामुळे श्रीमंत लोकांचा काळा पसा गेला, त्यांचे नुकसान झाले याचा असूयारूपी आनंद गरीब लोकांना झाला आणि तो स्वतच्या नुकसानाच्या दु:खापेक्षा जास्त होता’ असे विश्लेषण केले गेले आहे ..

In reply to by अभिजित - १

चक्की तर तुम्ही पण चालवताय, मोदी द्वेषाची! पण त्यातून भुकटीच काय काहीच बाहेर पडत नाहीये. त्यांना आपण सोडून देऊ या. ना मी तुम्हाला धरलंय ना तुम्ही मला. पण डॉ खरे पण इकडे अजिबात फिरकले नाहीत ? डॉक्टरसाहेबांचं जाऊ द्या हो, पण तुम्ही तुमच्याच धाग्यावर फिरकला नाही. या धाग्यावर जरी तुम्ही मोदीद्वेषाची चक्की चालवली होतीत तरी मी मोदीभक्तीची चक्की चालवली नव्हती. माझ्या मुद्द्यांचा प्रतिवाद करता आला नाही म्हणून चक्क पलायन केलंत. पण दुसरा जास्त खोलवरचा मुद्दादेखील होता. ‘या निर्णयामुळे श्रीमंत लोकांचा काळा पसा गेला, त्यांचे नुकसान झाले याचा असूयारूपी आनंद गरीब लोकांना झाला आणि तो स्वतच्या नुकसानाच्या दु:खापेक्षा जास्त होता’ असे विश्लेषण केले गेले आहे ज्याला ज्याचा आनंद झाला असेल तो होऊ दे. तुम्हाला कसलं दुःख होतंय ते आम्हाला माहित आहे. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी तुमची स्थिती झालेली आहे. टीप: माझे या प्रतिसादातील मुद्दे पटत नसतील तर तुम्ही तुमचेच लेख आणि त्यावरील सर्व प्रतिक्रिया परत वाचाव्यात ही विनंती.

In reply to by ट्रेड मार्क

लेखकाचा ई-मेल id आहे लेखाखाली. त्याला जरूर कळवा !! मला नाही .. ------------------------------------------------------------------------- लोकसत्ता लेख - पण दुसरा जास्त खोलवरचा मुद्दादेखील होता. ‘या निर्णयामुळे श्रीमंत लोकांचा काळा पसा गेला, त्यांचे नुकसान झाले याचा असूयारूपी आनंद गरीब लोकांना झाला आणि तो स्वतच्या नुकसानाच्या दु:खापेक्षा जास्त होता’ असे विश्लेषण केले गेले आहे trademark - ज्याला ज्याचा आनंद झाला असेल तो होऊ दे. तुम्हाला कसलं दुःख होतंय ते आम्हाला माहित आहे. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी तुमची स्थिती झालेली आहे. -----------------------------------------------------------------------------

In reply to by ट्रेड मार्क

>>या निर्णयामुळे श्रीमंत लोकांचा काळा पसा गेला, त्यांचे नुकसान झाले याचा असूयारूपी आनंद हे बाकी थोर आहे. कुणाचाही काळा पैसा गेला नाही हे दोन वर्षांनी धडधडीत कळूनही तसे झाले हे भक्तांना पटवण्यात मोदीजी कमालीचे यशस्वी झाले आहेत.

In reply to by नितिन थत्ते

(जेष्ठ मिपाकर, विचारवंत) तोंड दाबून बुक्क्यांचा मार. जर खरेच या राज,उद्धव,शरद पवार यांना नोटाबंदीचा काहीच फरक पडला नाहीतर दोन वर्षानंतर ही का त्याच्यावर कंठशोष करत आहेत? क्षणभरासाठी धरू यशस्वी झाली नाही तर शंभर टक्के अयशस्वी ठरली असे तर होत नाही ना? आयकराच्या जाळ्यात अडकले प्रकरणानंतर माहीती पडेलच की. पांढरपेशा आणि पांढर पैसा नाखु बिनसुपारीवाला

In reply to by नितिन थत्ते

काळा पैसा नष्ट करण्यासाठी निरपराध जनतेला का वेठीस धरले मोदींनी? निरपराध जनतेचे आर्थिक नुकसान भरून देणार आहेत का मोदी? मोदींना देशाचा कारभार व्यवस्थित करता यावा म्हणून जनतेने त्यांना बहुमताने निवडून दिले. नोकरशहांना कामाला लावेल असं वाटलं होतं,पण कसलं काय मोदींनी नोटाबंदी करून वाटमारी सुरू केली. नोटाबंदिची नेमकी उद्दिष्टे काय हे सांगितले नाही,आणि आता अमुक इतके करदाते वाढले ,तमुक इतके पैसे बँकेत आले असं सांगत आहेत. नोटबंदीपूर्वी देशात १७ लाख कोटी रुपये होते , दीड वर्षानंतर हीच संख्या १८.५ लाख कोटी इतकी झाली. ही संख्या का वाढली ह्याचे उत्तर मोदी का देत नाही? नोटबंदीनंतर काही दिवस ' कॅश लेस' व्यवहार वाढले म्हणून सरकार श्रेय घेत होते आज कॅशलेस चे प्रमाण किती आहे? का मोदी गप्प आहेत? नवीन काळा पैसा पुन्हा निर्माण होऊ लागला आहे. तो आता कसा नष्ट करणार?

In reply to by मार्मिक गोडसे

देशातील सर्वसामन्य जनता कधीकाळी नोट बंदी झाली होती, हे आता विसरुन देखील गेली असेल. मात्र नोटबंदी होऊन आता दोन वर्षे उलटली तरी नोटबंदीचा तुम्हाला लागलेला "ठणका" अजून काही थांबायचे नाव घेत नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

नोटबंदीने तुमचे फारच आर्थिक नुकसान झालेय असे दिसतेय. तेंव्हा चालूदे तुमचा त्रागा ! :))

In reply to by प्रसाद_१९८२

देशातील प्रत्येक निरपराध नागरिकाचे आर्थिक नुकसान झाले आहे , त्यात मी सुद्धा आहे. मेंढरांना फायदा नुकसान काय कळणार?

In reply to by मार्मिक गोडसे

जरा इस्कटून सांगता का? काय, कसे आणि किती नुकसान झाले? नुसतं लायनीत उभं राहायला लागलं म्हणून ४ तास गेले असं नाही, कारण आपण लायनीत तर बऱ्याच गोष्टींसाठी उभं राहतो. तर तुमच्याकडे योग्य तो कर भरल्यानंतर (क्ष) रुपये होते जे आता (क्ष - य) झाले, अगदी खरी रक्कम नाही सांगितली तरी चालेल पण निदान पर्सेंट मध्ये किती कमी झाले ते तर सांगू शकता. त्याचबरोबर ते का आणि कसे कमी झाले असं तुम्हाला वाटतं हे पण सांगा. टीप: तुम्ही "देशातील प्रत्येक निरपराध नागरिकाचे आर्थिक नुकसान झाले आहे , त्यात मी सुद्धा आहे" असं लिहिलं आहे म्हणून वरील प्रश्न विचारले आहेत. फार अवघड वाटत असेल तर तसं सांगा म्हणजे ऊत्तर देणं टाळता येईल.

In reply to by ट्रेड मार्क

जरा इस्कटून सांगता का? काय, कसे आणि किती नुकसान झाले? https://www.misalpav.com/comment/1010885#comment-1010885 नोटबंदी नसती केली तर तुमच्या माझ्याकडील ५०० आणि १००० ₹ चे मूल्य तितकेच राहिले असते. नोट बदलण्यासाठी झालेला वाहतूक खर्च आणि वाया गेलेला वेळ हा धरणार की नाही? माझे हातावर पोट आहे, त्यामुळे मला तसा विचार करणे भाग आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

तुमच्याकडचे ५०० आणि १००० रुपयाच्या नोटेचे मूल्य ८ नोव्हेंबर २०१६ च्या आधी किती होते आणि ८ नोव्हेंबर २०१६ नंतर किती झाले हे कुठे सांगितलंय? नुसते मूल्य कमी झाले म्हणून ओरडताय, तसे तर पैश्याचे मूल्य दर दिवशी कमी होतच असते. Time value of money हे तुम्हाला माहित आहे का? एक सोप्प गणित तुम्हाला करायला सांगतो - ५०० रुपयाची ७ नोव्हेंबर २०१६ रोजीची किंमत - ९ नोव्हेंबर २०१६ रोजीची किंमत - (काळ X महागाई निर्देशांकामुळे कमी झालेली प्रतिदिन किंमत) असं करून उत्तर सांगा. नोट बदलण्यासाठी झालेला वाहतूक खर्च आणि वाया गेलेला वेळ हा धरणार की नाही? तुमच्याकडे एकच नोट होती? इथेही एक गणित घालतो - तुमच्या कडील ५०० + १००० च्या नोटांची किंमत - (वाहतूक खर्च + (वाया गेलेले तास * प्रतितास मोबदला)) याचं उत्तर सांगा. माझे हातावर पोट आहे, त्यामुळे मला तसा विचार करणे भाग आहे. हा विचार करण्यात आणि तो विचार इथे टाइपण्यात तुम्ही फार वेळ घालवताय असं नाही वाटत? ताळेबंद मांडायचा झाला तर इथेही एक गणित घालायला लागेल, फार अवघड नाही हो - तुमचे नोटबंदीमुळे वरील २ गणितांनुसार झालेले नुकसान - (हा मनस्ताप + हा विचार करण्यात घालवलेला वेळ** + मिपावर टैपण्यात घालवलेला वेळ**) ** तुम्हाला आता तुमच्या प्रत्येक तासाची किंमत माहित आहेच, त्यामुळे या गणितात तुम्हाला सहज वापरता येईल

In reply to by ट्रेड मार्क

तुमच्याकडचे ५०० आणि १००० रुपयाच्या नोटेचे मूल्य ८ नोव्हेंबर २०१६ च्या आधी किती होते तुमच्या बेसिक मध्ये लोच्या आहे. नोटबंदीपूर्वी माझ्याकडील किंवा तुमच्याकडील नोटेचे मूल्य हे कधीच वेगळे नव्हते. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी ५० पैसे आणि १००० च्या नोटेला त्यांच्या मूल्याच्या समप्रमानातच होते. ८ नोव्हेंबर २०१६ नंतर किती झाले हे कुठे सांगितलंय? माझ्या कामाचे दर प्रती मिनिट कामाच्या स्वरूपावर असतात आणि नेमके नोटबंदी च्या काळात हातात कामेही भरपूर होती, परंतु नोटा बदलायला माझा बहुमूल्य वेळ वाया गेला त्यामुळे मी बदलून घेतलेल्या नोटांचे मूल्य negative झाले. नोटा न बदलता तशाच ठेवू द्याव्या तर तो गुन्हा ठरला असता. मोदींच्या मुर्खपणामुळे देशातील कित्येक जणांचे माझ्यासारखे नुकसान झाले. हा विचार करण्यात आणि तो विचार इथे टाइपण्यात तुम्ही फार वेळ घालवताय असं नाही वाटत? अजिबात नाही. हातावर पोट असल्यामुळे आणि कामाचे वेळापत्रक फिक्स नसल्याने मी नेहमी फावल्या वेळातच असली कामे करतो मग कधी तो दिवस असतो तर कधी रात्र, त्यामुळे माझा वेळही चांगला जातो . आता तरी नोटबंदीमुळे माझ्या ५०० आणि १००० च्या नोटांचे मूल्य घटले हे मान्य कराल का?

In reply to by मार्मिक गोडसे

तुमच्या नुसत्या बेसिक मधेच नाही तर तर्कबुद्धीत लोच्या आहे. एवढं नुसतं बहुमूल्य वेळ वाया गेला म्हणताय पण किती वेळ वाया गेला? अश्या किती नोटा तुमच्याकडे होत्या आणि त्या बदलायला किती वेळा जायला लागलं? नक्की तुमचे किती नुकसान झालं? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देतच नाहीये. खूप काम केल्याने खूप रोख रक्कम जमा झाली होती का? त्यावर टॅक्स वगैरे भरला होता का? सगळं नियमित असेल तर ५० दिवस होते आणि त्यातूनही नोटा बदलायलाच पाहिजे होत्या असं काही नव्हतं, त्या खात्यात भरण्याची पण सोय होती. एकीकडे कामाचे वेळापत्रक फिक्स नसतं म्हणताय आणि मग ५० दिवसात एकही दिवस तुम्हाला खात्यात पैसे भरणे/ काढणे व बदलून घेणे यासाठी सवड झाली नाही? हे तुमच्या लाडक्या राहुल गांधींसारखं झालं की - नुसता इथे घोटाळा झालाय म्हणायचं पण कसा झाला, किती रकमेचा झाला हे सांगता येत नाही. तुम्हाला राहुल गांधी का आवडतो याचं कारण आता स्पष्ट झालं आहे. आता तरी नोटबंदीमुळे माझ्या ५०० आणि १००० च्या नोटांचे मूल्य घटले हे मान्य कराल का? जरी तुमच्या कामात खंड पडल्याने तुम्हाला पैसे मिळाले नाहीत असं म्हणलं तरी तुमच्या हातात असलेल्या नोटेचे मूल्य कमी झाले असं म्हणत नाहीत. तर त्या व्यवहारात तुमचे नुकसान झाले असं म्हणतात.

In reply to by ट्रेड मार्क

त्यातूनही नोटा बदलायलाच पाहिजे होत्या असं काही नव्हतं, त्या खात्यात भरण्याची पण सोय होती. माझ्या हाताखालील मजुरांना रोखीत पैसे द्यावे लागतात. नोटबंदीमुळे ५००, १००० च्या नोटा कोणी स्वीकारत नव्हते, कमी रकमेच्या नोटांची टंचाई होती,बँकेतून/एटीम मधून बचतीचे पैसे काढण्यावर मर्यादा होती आणि यात वेळ जात होता आणि वेळेवर मिळत नव्हते. बँकेच्या कामाच्या वेळेतच हे सर्व करावे लागत होते,त्यामुळे व्यवसायाचे वेळापत्रक कोलमडत होते. नोटबंदी पूर्वी अशी अडचण येत नव्हती. खूप काम केल्याने खूप रोख रक्कम जमा झाली होती का? क्लायंट कडून चेकनेच पैसे घेतो, परंतु हाताखालील मजुरांना रोख द्यावे लागत म्हणून बँकेतून रोख रक्कम काढत असे. मला मिळालेला प्रत्येक पैसा हा सफेद होता. तुम्ही टॅक्सची काळजी करू नका. जरी तुमच्या कामात खंड पडल्याने तुम्हाला पैसे मिळाले नाहीत असं म्हणलं तरी तुमच्या हातात असलेल्या नोटेचे मूल्य कमी झाले असं म्हणत नाहीत. इतके रामायण सांगून रामाची सीता कोण म्हणून विचारताय. पुन्हा सांगतो, नोटबंदी नसती तर माझ्याकडील ५००,१०००च्या नोटा कोणीही स्वीकारल्या असत्या, परंतू नोटबंदीनंतर कोणी स्वीकारत नसल्याने मला हातातली कामे सोडून बँकेतून त्या बदलून घ्यायला लागल्या,हे सर्व मोदींच्या मूर्ख निर्णयामुळे करावे लागले. नुकसान कितीचं झाले हा मुद्दा नाही, माझ्याकडे काळा पैसा नसताना मला हा नाहक भुर्दंड पडला. तुम्हाला राहुल गांधी का आवडतो याचं कारण आता स्पष्ट झालं आहे. मुद्यापासून पळ काढण्यासाठी तुम्ही ही अनावश्यक टिप्पणी करत आहात हे दिसते आहे, आता हे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. सिद्ध करा अथवा हा आरोप मागे घ्या.

In reply to by मार्मिक गोडसे

क्लायंट कडून चेकनेच पैसे घेतो, परंतु हाताखालील मजुरांना रोख द्यावे लागत म्हणून बँकेतून रोख रक्कम काढत असे. नोटबंदी करण्यामागे हे एक कारण असेल का? तुम्हाला चेकने पैसे मिळत होते पण पुढील व्यवहार रोखीत होता. तुम्ही रोखीत काही व्यवहार करूनही ते सफेद आहेत असं आपण मान्य करूया. पण असे कितीतरी छोटेमोठे व्यावसायिक असतील जे रोखीत व्यवहार करून दाखवत नसतील? तुम्हाला आणि सगळ्यांनाच अडचण झाली असेल यात शंकाच नाही पण जास्त अडचण रोखीत व्यवहार करणाऱ्यांना झाली हे तर मान्य कराल? तुम्ही मजुरांना रोखीत पैसे देत होतात याने रोख रकमेचा कसा ट्रेल तयार होतो हे बघा. मजुरांची कमाई टॅक्सच्या जाळ्यात येण्याएवढी नसेल, पण हेच मजूर ज्या वाण्याकडून सामान खरेदी करत असतील त्याला रोख पैसे देत असतील. हा वाणी ज्या होलसेलर कडून सामान घेत असेल त्यालाही रोखीत पैसे देत असेल आणि अशीच ही चेन चालू रहात असेल. यातले वाणी आणि होलसेलर हे रोखीत व्यवहार असल्याने किती टॅक्स चुकवत असतील? याच धाग्यात मी आधी कधी तरी विचारलंय की वस्तू रोखीत घेतल्यावर आपल्यापैकी किती जण पक्के बिल घेतात? किरकोळ खरेदी तर जाऊच दे, पण सोन्यासारख्या मोठ्या खरेदीत पण किती जण टॅक्सचे पैसे वाचवावे म्हणून पक्के बिल घेत नाहीत? हे थांबवायला तुम्ही कुठला उपाय सुचवाल? टॅक्सचा रेट जास्त आहे याचं काय कारण असेल असं तुम्हाला वाटतं? सव्वाशे कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशात निदान ४० कोटी लोक तरी काही ना काही काम धंदा करत असतील? यातले अगदी अर्धे लोक आयकराच्या स्लॅब मध्ये येत नाहीत असं म्हणलं तरी २० कोटी लोक इमानदारीत टॅक्स भरतात का? सव्वाशे कोटीपैकी निदान ६० कोटी लोक तर काही ना काही खरेदी करत असतील, किती ठिकाणी रोख व्यवहार करूनही पक्के बिल घेतात. त्याही पुढे जाऊन किती व्यापारी रोख खरेदी झाली तरी इमानदारीत सगळे टॅक्स भरत होते? तुमच्या लक्षात येईल अशी आशा आहे. इतके रामायण सांगून रामाची सीता कोण म्हणून विचारताय...आणि परिच्छेद तुमचा राम कोण आणि सीता कोण यातच गोंधळ होतोय. तुम्ही बँकेची कामं करायला कोणी ठेवलं नसेल आणि जर स्वतःच करत असाल तर तुमच्या वेळापत्रकात बँकेची कामे करण्यासाठी वेळ असला पाहिजे. नोटा बदलण्यासाठी कदाचित तुम्हाला नेहमीपेक्षा जरा जास्त वेळ लागला असेल पण ते एकदा किंवा दोनदा असावं असं गृहीत धरतो. कारण तुम्ही नुसतेच गोल गोल फिरताय, कुठलीच आकडेवारी देत नाही. तुमचा वेळ ब्यांकेत जास्त गेला म्हणून तुमचे वेळेचे आणि पर्यायाने पैश्याचे नुकसान झाले हे असू शकते. पण म्हणून जुनी ५००ची नोट बदलून नवीन ५०० ची घेतल्यावर तीचे मूल्य ४०० झाले असं होत नाही ना? हे सर्व मोदींच्या मूर्ख निर्णयामुळे करावे लागले हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. तुम्हाला मोदींचा हा निर्णय मूर्खपणाचा वाटतो तर मला विरोध करणारे मूर्ख वाटतात. तिघेही आपापल्या जागी बरोबर असू शकतात. यातुन तुम्ही काय शिकलात? अजून तरी तुमच्या मजुरांना बँक खाती काढायला सांगितलं का? माझ्याकडे काळा पैसा नसताना मला हा नाहक भुर्दंड पडला. वैयक्तिक तुमच्याकडे नसेल हो पण तुम्ही नकळतपणे काळा पैसा तयार व्हायला कसा हातभार लावत होतात हे मी वर स्पष्ट केलं आहे. सुक्याबरोबर ओलंही जळतं तसं झालं. मुद्यापासून पळ काढण्यासाठी तुम्ही ही अनावश्यक टिप्पणी करत आहात हे दिसते आहे मी पळ काढत नाही. तुम्हाला एवढा राग का आला हे मला समजलं नाही, राहुल गांधी आवडत नसेल तर मला आवडत नाही हे सरळ सांगायचं, असेल तर राग यायचं कारण नाही. बाकी तुम्ही अंधभक्त, मोदीभक्त असे बऱ्याच प्रतिसादात म्हणलेले आहे पण असे कुठलेही विशेषण न देता मी फक्त राहुल गांधी आवडतो म्हणण्याने राग यावा याचे आश्चर्य वाटत आहे. मोदींना तुम्ही मूर्ख समजता म्हणजे ज्यांना मोदीभक्त तुम्ही म्हणत आहात त्यांना तुम्ही काय समजता हे स्पष्ट होतंय. त्या सगळ्यांची बिनशर्त माफी मागा मग मी माझे विधान मागे घेतो. रच्याकने: मोदी आवडणाऱ्यांना जसे अंधभक्त म्हणले जाते तसे राहुल गांधी आवडणाऱ्याला मंदभक्त का म्हणू नये?

In reply to by ट्रेड मार्क

हे सगळं ठीक असलं तर मग नोटबंदीपूर्वी जितक्या रकमेच्या नोटा होत्या त्याहून जास्त रकमेच्या नोटा सरकारने पुन्हा बाजारात का सोडल्या आहेत? तुमच्या या सगळ्या लॉजिकनुसार मोदीसरकार पुन्हा काळे व्यवहार करणार्‍यांची सोय करून देत नाहीये का?

In reply to by नितिन थत्ते

http://www.newindianexpress.com/business/2018/mar/31/normalcy-returns-a… money, currency, economy Image for representational purpose only. By Express News Service MUMBAI: The currency in circulation in the country crossed the pre-demonetisation level at Rs 18.27 lakh crore as on March 23, indicating that full remonetisation is now complete and that currency pumping has resumed the normal course. The move comes 15 months after the government rolled out the economic reform invalidating high-value notes on November 8, 2016. The latest RBI data released on Friday shows that the currency in circulation stood at Rs 18.27 lakh crore as on March, 23 as against Rs 13.35 lakh crore a year before. Prior to demonetisation, currency in circulation stood at Rs 17.97 lakh crore, 86.4 per cent of which comprised high-denomination banknotes of Rs 500 and Rs 1,000.

In reply to by नितिन थत्ते

त्याशिवाय आणखी धक्कादायक बाब म्हणजे तीन चार महिन्यांपूर्वीपर्यंत २००० रुपयांच्या नोटा एटीएममधून मिळत नव्हत्या. तेव्हा असे वाटत होते की सरकार २००० च्या नोटा चलनातून हळूहळू काढून टाकणार आहे. परंतु गेल्या दीड दोन महिन्यापासून एटीएममधून रेग्युलरली २०००च्या नोटा मिळू लागल्या आहेत. म्हणजेच मोठ्या मूल्याच्या नोटांमुळे काळे व्यवहार सुलभ होत असतील तर सरकार त्यास हातभार लावत आहे.

In reply to by ट्रेड मार्क

नोटबंदी करण्यामागे हे एक कारण असेल का? मोदिंनी तसं स्पष्ट सांगितले नाही, आणि तेच कारण असेल तर नोटबंदी केल्याने रोख व्यवहार कायमचे थांबले का? माझ्यामते नाही, ह्याचा अर्थ नोटबंदी हा त्यावर उपाय नक्कीच नाही. तुम्ही मजुरांना रोखीत पैसे देत होतात याने रोख रकमेचा कसा ट्रेल तयार होतो हे बघा. हे माहीत आहे हो, उगाच पाल्हाळ लाऊ नका. तुमचा राम कोण आणि सीता कोण यातच गोंधळ होतोय. तुमचाच होतोय, मी स्पष्ट शब्दात सांगितलय, नोटाबंदीमुळे माझ्याकडे रोख स्वरुपात असलेल्या ५०० , १००० च्या मला बदलताना खर्च झाला आणि व्यावसायिक नुकसानही झाले, आणि हे सर्व मोदिंनी मुर्खपणाने लादलेल्या नोटाबंदीमुळे झाले. तुम्ही बँकेची कामं करायला कोणी ठेवलं नसेल आणि जर स्वतःच करत असाल तर तुमच्या वेळापत्रकात बँकेची कामे करण्यासाठी वेळ असला पाहिजे. नोटाबंदीपुर्वी अशी समस्या मला उद्भवली नव्हती, नोटाबंदीचा काळ वगळता आजही अशी गरज वाटत नाही, मग कशाला उगाच मुर्ख लोकांचे सल्ले ऐकुन खर्च करा. तुमचा वेळ ब्यांकेत जास्त गेला म्हणून तुमचे वेळेचे आणि पर्यायाने पैश्याचे नुकसान झाले हे असू शकते. धन्यवाद, माझे नुकसान झाले हे मान्य केल्याबद्दल. पण म्हणून जुनी ५००ची नोट बदलून नवीन ५०० ची घेतल्यावर तीचे मूल्य ४०० झाले असं होत नाही ना? मला व्यवसायकरता रोख रक्कम लागत असते, नोटाबंदीपूर्वी बँकेतून मला ५००, १००० च्या ऐवजी त्यापेक्षा कमी रकमेच्या नोटा मिळाल्या असत्या तर , नोटाबंदीमुळे मला बँकेत नोटा बदलायला जावे लागले नसते आणि माझे आर्थिक नुकसानही झाले नसते. ५०० , १००० च्या नोटा माझ्याकडे असल्यामुळे खर्च झाला आणि माझे नुकसान झाले हे वर तुम्ही मान्य केलं आहे. नोटाबंदीमूळे ह्या नोटेंचे मुल्य जपण्यासाठी माझा वेळ आणि पैसा खर्च झाला. नसता खर्च केला तर त्या नोटेंचे मुल्य 'शुन्य' होउन ते कागदाचे तुकडे माझ्या गळ्याचा फास बनले असते. त्या नोटेंचे मुल्य शुन्य कसे झाले असते ते हे तुम्हाला समजत असेल तर बदलेल्या माझ्याकडील नोटांचे मुल्य माझ्याकरता कमी कसे झाले हे ही तुम्हाला समजेल. अजून तरी तुमच्या मजुरांना बँक खाती काढायला सांगितलं का? काहीही. तुम्हाला व्यवहारज्ञान अजिबात नाही हे स्पष्ट दिसतंय. एक तर तुम्हाला माझ्या व्यवसायाचं स्वरुप माहीत नसताना तुम्ही असे (संपादित) सल्ले देत आहात(तुम्ही १००% कॅशलेस व्यवहार कसे करता ह्याची मला खूप उत्सुकता आहे). माझ्याकडे कायमस्वरुपी मजूर कामाला नसतात.जिथे माझे काम असेल तेथील स्थानिक मजुरांकडून मी काम करुन घेतो.काम झाले की लगेच रोख पैसे द्यावे लागतात,ह्या मजुरांचे बँक खाते असले तरी ते रोख पैसेच घेतात.रोख पैसे मिळाले तरच त्यांच्या कुटुंबाला दोन वेळचे जेवण मिळते. चेकने पैसे देण्यास किंवा स्विकारण्यास मला कोणतीच अडचण नाही. कॅशलेस व्यवहारांसाठी सरकारी पातळीवरुन कायमस्वरुपी प्रयत्न झाल्यास त्याचे मी स्वागतच करीन. नोटाबंदी हा त्यावर कायमस्वरुपी उपाय नाही हे सिद्ध झाले आहे. सरकारने कॅशलेस व्यवहार करण्यासाठी लागणार्‍या आवश्यक पायाभूत सुविधा संपूर्ण भारतात उपलब्ध करुन द्याव्यात, असंही देशातील १०० % खेड्यांमध्ये सरकारने वीज पोचवल्यामुळे इंटरनेटही पोचवणे कठीण नाही. हे सर्व झाले की सगळ्या नोटाच रद्द करुन टाकाव्या, म्हणजे ना काळा पैसा निर्माण होणार, ना कोणी कर चुकवनार, ना दहशदवादी हल्ले होणार. हे सगळं करण्याऐवजी मोदी मुर्खासारखे नोटाबंदी करत बसले. सुक्याबरोबर ओलंही जळतं तसं झालं. मान्य केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद' राहुल गांधी आवडत नसेल तर मला आवडत नाही हे सरळ सांगायचं, असेल तर राग यायचं कारण नाही. चर्चेचा तो विषय नसताना तुम्ही अनावश्यकपणे तसे खोडसाळ विधान केले. तसं सिद्ध करण्याचे आव्हान स्विकारायच्या ऐवजी पळ काढत आहात. खात्री करुन आरोप करावे, अन्यथा माफी मागून मोकळे व्हावे. मोदींना तुम्ही मूर्ख समजता म्हणजे ज्यांना मोदीभक्त तुम्ही म्हणत आहात त्यांना तुम्ही काय समजता हे स्पष्ट होतंय. त्या सगळ्यांची बिनशर्त माफी मागा मग मी माझे विधान मागे घेतो. मी आतापर्यंत जे खुलेपणे मोदीचे समर्थन करतात त्यांनाच मोदीभक्त असे संबोधले आहे. अजुनपर्यंत कोणीही त्यावर आक्षेप घेतलेला नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्हाला गाढव आवडत असेल, त्याचा आवाजही आवडत असेल आणि त्यामुळे तुम्हाला मी 'गाढवभक्त' म्हणल्याने तुम्ही गाढव होत नाही किंवा तुमचा आवाजही गाढवासारखा होत नाही, त्यामुळे तुम्हाला राग येण्याचे कारण नाही, आणि राग येत असेल तर गाढवाची भक्ती करणे सोडुन द्यावे. ज्याची त्याची आवड. मोदी आवडणाऱ्यांना जसे अंधभक्त म्हणले जाते तसे राहुल गांधी आवडणाऱ्याला मंदभक्त का म्हणू नये? म्हणा की.

In reply to by मार्मिक गोडसे

खरंच अवघड केस आहे तुमची. मी आधी तुमच्या धंद्याच्या स्वरूपाबद्दल विचारलं तेव्हा तुम्ही सांगितलं नाही. मग आता कशाला ओरडताय? आणि वर मला मूर्ख म्हणणारे तुम्ही कोण. हा वैयक्तिक हल्ला आहे ना? आता संपादक मंडळ इकडे लक्ष देतंय का बघू. मी जर म्हणलं की मजुरांबरोबर काम करून तुमची बुद्धी पण तेवढीच झालीये तर? जसे तुम्ही मोदींना शिव्या घालताय तसेच चोर पण पोलिसांना, न्यायालयांना घालत असतात. म्हणजे पोलीस आणि न्यायालये चूक आहेत का? जाऊदे, मी शक्यतो वैयक्तिक टीका करत नाही. तुम्ही वैयक्तिक झालात म्हणून नाईलाज झाला. (संपादित) तुम्ही मोदींना शिव्या देत बसा...ना त्यांना काही फरक पडणार आहे ना इतरांना. ते त्यांचं काम करत रहातील. संपादक मंडळ: मार्मिक गोडसे यांनी मला (संपादित) म्हणल्याने मी हा प्रतिसाद दिला आहे. त्यांनी माझी माफी मागितली तर हा प्रतिसाद उडवून टाकावा. मला कोणावरही वैयक्तिक टिप्पणी करण्यात रस नाहीये.

In reply to by ट्रेड मार्क

(संपादित) अरे व्वा! हे बरंय तुमचं, मला (संपादित) संबोधून वर सं. मंडळाकडे माझी तक्रार करताय. एक तर मुद्यावर चर्चा न करता विनाकारण वैयक्तिक झालात, माझ्या व्यवसायाशी काय देणेघेणे तुम्हाला. नसत्या चांभार चौकश्या. वर फुकटचे बालिश सल्ले देत बसलात. आता प्रतिवाद करता येत नाही म्हणून काही तरी निमित्त करून बसले रडत. मी राहुल भक्त आहे हा जावईशोध तुम्हाला कुठून लागला हे सुध्दा स्पष्ट करा, अथवा ते विधान मागे घ्या.

In reply to by अभिजित - १

पण डॉ खरे पण इकडे अजिबात फिरकले नाहीत ? खरे साहेब लेख वाचलात का ? पटला का ?

तुमचं बेन्ड फारच ठणकतंय असं दिसतंय. काही उपचार करून घ्या कि. किती ती जळजळ आणि ठस ठस? मी कुठे फिरकावं, काय वाचावं आणि त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी याचा आपण ठेका घेतला आहे का? सोडून द्या कि. आपला इलाज चांगल्या डॉक्टरकडून करून घ्या.

https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/demonetisation… Now that the RBI has admitted that 99.3% of all demonetised notes came back to the banking system (not counting what remains in Nepal and Bhutan), it is fairly clear that demonetisation was a flop. In economic terms. But it was a huge success in political terms for the prime minister personally and for his party in the Uttar Pradesh assembly elections भक्त - छ्या .. ET फालतू पेपर आहे. संध्यानंद बरा !! ET विकला गेलाय !!

In reply to by अभिजित - १

हाहाहा, म्हणे ET विकला गेलाय! कोण घेणार विकत असला अंगठाछाप पेपर? हा जो काळा पैसा आहे किनई, तो परत आलाय किनई, त्याने किनई, परतीच्या प्रवासात किनई, एके ठिकाणी किनई, हा#न ठेवलंय. त्याचा सुवास किनई सर्वत्र दरवळत नसून, फक्त किनई आयकर खात्यालाच येतो. होक्किनई? -गा.पै.