‘क’ जीवनसत्व : आंबट फळांची दणकट देणगी !
(चित्रः जालावरुन साभार )
औषधरूपातील ‘क’ आणि आजार प्रतिबंध :
‘क’ हे पाण्यात विरघळणारे असल्याने ते औषधरुपात जरी गरजेपेक्षा जास्त घेतले तरी बिघडत नाही. शरीराला गरज नसलेला जास्तीचा भाग लघवीतून बाहेर पडतो. त्याच्या या गुणधर्माचा गैरफायदा वैद्यकात बऱ्याचदा घेतला गेला आहे. आयुष्यात अनेक दीर्घकालीन कटकटीचे आजार आपल्याला सतावतात. त्यांच्यावर उपचार म्हणून विविध उपचारपद्धतींची औषधे आपण घेतो. तरीसुद्धा बऱ्याचदा रुग्णाचे पुरेसे समाधान होत नाही. तो कमीअधिक प्रमाणात पिडलेलाच असतो. मग अशा आजारांमध्ये पूरक उपचार म्हणून ‘क’ चा वापर केला जातो. त्याला फारसा शास्रीय पाया नसतो. पण, ‘क’चा एखादा गुणधर्म त्या आजारात “उपयोगी पडू शकेल” अशा आशेने ते मोठ्या डोसमध्ये दिले जाते. कधी आजार-प्रतिबंध म्हणून तर कधी ‘रामभरोसे’ उपचार म्हणून. त्यातूनच पुढे समाजात त्याबद्दलचे गैरसमज पसरतात. मग त्याचा उठसूठ गैरवापर होऊ लागतो.
आता अशा आजारांची यादी बघूया:
१. सर्दी-पडसे
२. कर्करोग
३. हृदयविकार
४. मोतीबिंदू व दृष्टीपटलाचे काही आजार
५. उच्च रक्तदाब .
यातील सर्दी वगळता बाकीच्या यादीकडे पाहिल्यास वाचकांच्या भुवया लगेचच उंचावतील ! तेव्हा त्यातील दोन आजारांचे वास्तव समजून घेऊ.
१. सर्दी : वरवर ‘साधा’ दिसणारा पण रुग्णास अगदी सतावणारा हा आजार. ऋतुबदलातील सर्दी तर बहुतेक सर्वांना होणारी. त्यावर नक्की उपाय काय हा अगदी पेचात टाकणारा प्रश्न. ‘क’ आपली साधारण प्रतिकारशक्ती वाढवते या तत्वास अनुसरून सर्दीच्या रुग्णांवर त्याचे प्रयोग झाले. त्यांचे निष्कर्ष उलटसुलट. आजमितीस एवढे म्हणता येईल की सर्दीचा प्रतिबंध काही ‘क’ देण्याने होत नाही. पण ती झाली असता तिची तीव्रता व कालावधी त्याच्या डोसने कमी होऊ शकतो.
२. कर्करोग : हा तर गंभीर आजार. त्याचे विविध उपचारही अंगावर काटा आणणारे. त्यामुळे त्याच्या प्रतिबंधावर संशोधनाचे लक्ष्य केंद्रित होणे स्वाभाविक आहे. गेल्या शतकापासून अनेकांनी त्यासाठी ‘क’ चा वापर करून पाहिला आहे. अलीकडे या रोगाच्या केमोथेरपी बरोबर ‘क’ चे पूरक उपचार करण्याचेही प्रयोग झाले आहेत. त्यांचे निष्कर्ष अद्याप तरी दखलपात्र नाहीत.
वरच्या यादीतील अन्य आजारांबाबतही यासंदर्भात कोणतेही ठाम विधान करता येत नाही. अनेक उलटसुलट दावे आणि अपुरे संशोधन यामुळे ‘क’ आणि गंभीर आजारांचा प्रतिबंध हा विषय सध्या वादग्रस्त आहे.
......
तर असे हे Ascorbic acid उर्फ ‘क’. स्वतः ‘तब्बेतीने’ नाजूक आहे खरे, पण आपल्याला कसे बळकट करून जाते !
*********************************************
पूर्वप्रसिद्धी : दै. सकाळ, पुणे.
In reply to जेम्स, अनेक आभार. शंकानिरसन: by हेमंतकुमार
In reply to चालेल! by जेम्स वांड
In reply to यीस्ट किंवा किंवा यात अजीबात by सुबोध खरे
In reply to यीस्ट किंवा किंवा यात अजीबात by सुबोध खरे
In reply to "क" जीवनसत्त्व यासाठी रोजचे by सुबोध खरे
In reply to "क" जीवनसत्त्व यासाठी रोजचे by सुबोध खरे
याउलट १०० ग्राम आवळ्यात १००० ते १८०० मिग्रॅ असते म्हणजेच आवळ्याच्या दोन फोडी जरी खाल्ल्या तरी त्यात आपल्याला भरपूर क जीवन सत्त्व मिळते.आवळा शिजवून केलेल्या मोरावळ्यातून क जीवनसत्व याच प्रमाणात मिळते का ?
In reply to धन्यू डॉक. by सस्नेह
In reply to क जीवनसत्व (ऍस्कॉर्बिक ऍसिड) by सुबोध खरे
In reply to ‘क’ आणि उष्णता : वेगळी माहिती by हेमंतकुमार
In reply to झेन, आभार. by हेमंतकुमार
In reply to एक विशेष सूचना-- क जीवनसत्व by सुबोध खरे
In reply to @ मार्कस, by हेमंतकुमार
In reply to Metabolic acidosis हा आजार by charming atheist
In reply to मला सध्या कोणताही किडनीविकार by charming atheist
In reply to आपल्यास ऍसिडिटीचा त्रास आहे by सुबोध खरे
In reply to शंकानिरसन by हेमंतकुमार
In reply to शंकानिरसन by हेमंतकुमार
In reply to मला पोटातील आम्लता म्हणायचे by charming atheist
In reply to जालावर मी अभिप्राय देत नाही. by सुबोध खरे
In reply to रोहिणीतील रक्ताचा पी एच by हेमंतकुमार
In reply to जागु, by हेमंतकुमार
In reply to ओके. मला ही शंका आली कारण by जागु
In reply to माहितगार, आभार व शंकानिरसन by हेमंतकुमार
In reply to चुकीची समजून दूर केल्या बद्दल खूप खूप आभार. by माहितगार
In reply to पदार्थास आंबट चव असली कि by सुबोध खरे
In reply to ही घ्या ‘क’ ची फळयादी : by हेमंतकुमार
In reply to ही घ्या ‘क’ ची फळयादी : by हेमंतकुमार
अनुक्रमणिका : विनंती