पूर्वार्ध https://www.misalpav.com/node/42796 इथे आहे
**************
‘ड’चा अभाव आणि आजार :
हा मुख्यतः लहान मुले आणि वृद्धांमध्ये दिसून येतो. अशा अभावाने calcium ची रक्तपातळी नीट राखण्यात अडचण येते. परिणामी हाडे ठिसूळ होतात.
मुलांमध्ये होणाऱ्या आजाराला ‘मुडदूस’ म्हणतात. त्यामध्ये अभावाच्या तीव्रतेनुसार खालील लक्षणे दिसू शकतात:
डोक्याचा खूप मोठा आकार
बरगड्या व पाठीचा कणा वाकणे
मोठे पोट
पाय धनुष्यकृती आकारात वाकणे
मूल वेळेत चालायला न लागणे
दात योग्य वेळेवर न येणे
वृद्धांमध्ये हाडे व स्नायूदुखी आढळते. त्यांची हाडे ठिसूळ झाल्याने अस्थिभंग सहज होण्याचा धोका असतो.
‘ड’ ची शरीरातील स्थिती आणि आजार-प्रतिबंध :
‘ड’ आणि हाडांचे आरोग्य याचा थेट संबंध आहे हे निर्विवाद सत्य आहे. या व्यतिरिक्त त्याचा इतर काही आजारांशी संबंध आहे का, हे एक कोडे आहे. गेली २० वर्षे यावर विपुल संशोधन झालेले आहे. त्यामध्ये मुख्यतः दोन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित झाले होते:
१. हे आजार ‘ड’ च्या अभावाने होऊ शकतात का?, आणि
२.या आजारांमध्ये मुख्य उपचाराबरोबर ‘ड’ चा मोठा डोस देणे उपयुक्त असते का?
या दोन्ही प्रश्नांना अद्याप समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. आता या आजारांची यादी सादर करतो:
* मधुमेह (प्रकार-२)
* Metabolic syndrome : यात स्थूलता, उच्च * कोलेस्टेरॉल व इतर मेद इ. चा समावेश आहे.
* हृदयविकार
* श्वसनदाह (respiratory infections) आणि दमा
*काही कर्करोग : यात फुफ्फुस-कर्करोगावर बरेच संशोधन झाले आहे
* नैराश्य
* पुरुष वंध्यत्व आणि
Multiple sclerosis हा मज्जासंस्था-विकार.
वरील सर्व आजार आणि त्यांच्याशी ‘ड’ चा संबंध यावर खूप वैज्ञानिक काथ्याकूट चालू आहे. काही आजारांच्या बाबतीत थोडा ‘संबंध’ असू शकेल पण, ‘ड’ चा अभाव आणि आजार यांचा कार्यकारणभाव अद्याप सिद्ध झालेला नाही. आजपर्यंत या संशोधनातून कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही.
वरील आजारांपैकी सर्वात जास्त संशोधन हे मधुमेहावर झालेले आहे. संशोधनाची प्रमुख उद्दिष्ट्ये अशी आहेत:
१. ‘ड’ च्या अभावाने मधुमेह(प्र-२) होण्याचा धोका अधिक असतो का?
२.मधुमेहाच्या पूर्वावस्थेत जर ‘ड’ चे मोठे डोस दिले तर मधुमेह-प्रतिबंध होऊ शकतो का?
३.या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी ‘ड’ हे नैसर्गिक स्वरूपात (आहार, सूर्यप्रकाश) घेतलेले चांगले की औषध स्वरूपात?
सद्यस्थितीत तरी या प्रश्नांची ठोस उत्तरे आपल्याजवळ नाहीत. जगभरात अनेक वंशांच्या लोकांवर हे संशोधन चालू आहे. त्यातील एखाद्या प्रयोगाचा निष्कर्ष खूप आशादायक असतो तर अन्य एखाद्याचा निराशाजनक. पुन्हा हे निष्कर्ष बऱ्याचदा वांशिकतेशी निगडीत असल्याचेही दिसते. त्यामुळे ‘ड’ आणि मधुमेह-प्रतिबंध यावर आज तरी सार्वत्रिक विधान करता येत नाही.
दोन मुद्दे मात्र स्वीकारार्ह आहेत.
आपल्या स्वादुपिंडातून इन्सुलिन स्त्रवण्याची जी प्रक्रिया असते त्यामध्ये ‘ड’ मदत करते आणि पेशींमध्ये इन्सुलिनचे कार्य व्यवस्थित होण्यातही त्याचा वाटा असतो.
तसेच आजार प्रतिबंधासाठी ‘ड’ हे नैसर्गिक स्वरूपातूनच मिळालेले अधिक चांगले, असे म्हणता येईल.
‘ड’-जीवनसत्वाची रक्तपातळी :
अलीकडे ही पातळी मोजण्याचे प्रमाण समाजात वाढलेले दिसते.
या जीवनसत्वाचे शरीरात दोन प्रकार(forms) असतात. त्यापैकी कुठला मोजायचा यावर एकमत नाही. हे मोजण्याच्या ज्या प्रयोगशाळा-पद्धती आहेत त्यांच्यात एकवाक्यता नाही. ‘नॉर्मल पातळी’ कशाला म्हणायचे याबाबतीतही गोंधळ आहे. एकाच रक्तनमुन्याची दोन ठिकाणी केलेली मोजणी बरीच जुळणारी नसते. अशा अनेक गुंतागुंतीत ही चाचणी अडकलेली आहे. तेव्हा संबंधित आजार रुग्णात थोडाफार दिसू लागला असेल तरच तिचा विचार व्हावा; सरसकट चाळणी चाचणी म्हणून नको.
समारोप:
आपल्या त्वचेवर पडणाऱ्या पुरेशा सूर्यप्रकाशातून ‘ड’ तयार होते. अर्थात ते अपुरे असल्याने ते काही प्रमाणात आहारातूनही घ्यावे लागते. म्हणूनच ते जीवनसत्व ठरते. ते शरीरात काम करताना एखाद्या हॉर्मोन प्रमाणे वागते. रक्तातील कॅलशियमचे प्रमाण स्थिर ठेवणे आणि हाडांना बळकट करणे हे त्याचे महत्वाचे काम. लहान मुले आणि वृद्धांमध्ये त्याची कमतरता बऱ्यापैकी आढळते. परिणामी हाडे ठिसूळ होतात. त्या व्यतिरिक्त इतर काही आजारांशी ‘ड’ चा संबंध आहे का, यावर बरेच संशोधन होत आहे. अद्याप तरी त्यातून फारसे काही हाती लागलेले नाही. तेव्हा खरी गरज नसताना उगाचच ‘ड’ ची रक्तपातळी मोजणे अथवा त्याचे मोठे डोस औषधरुपात देणे हे हितावह नाही.
वैज्ञानिकांनी 'Sunshine Vitamin’ असे गौरवलेले हे ‘ड’ आज एक कुतूहलाचा विषय झाले आहे खरे.
**********************************************
वाचने
32805
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
टीप :
>>>
या जीवनसत्वाचे शरीरात दोन
पूरक माहितीबद्दल आभार !
२५ हायद्रॉक्सी ड हा साठवणुक
@ कालिंदी :
In reply to २५ हायद्रॉक्सी ड हा साठवणुक by कालिंदी
purist (शुद्धता वादी) आणि
मी प्युरीस्ट किंवा प्राग्मअ
...तुम्ही कसे चुकताय हे
In reply to मी प्युरीस्ट किंवा प्राग्मअ by कालिंदी
सुबोध,
छान माहिती आहे ही सगळी.
‘ड’ आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोग
ड जीवनसत्वाचा डोस किती असावा
ड जीवनसत्वाचा डोस किती असावा?
In reply to ड जीवनसत्वाचा डोस किती असावा by सस्नेह
@ कुमार१,
म्हणजे घरटे उन्हात बांधणे हा शाप नाही :-)
कणकेतून अमूक एक प्रमाणात
ड ची रोजची गरज
जनतेच्या खाद्यतेलात "अ" आणि
अभिनंदनीय प्रयोग !
सत्यस्थिती ...
धन्यवाद!
एकंदरीत 'ड' म्हणजे 'कोवळे' ऊन
D जीवनसत्व आणि त्वचारोग
समज गैरसमज ...
acne, aczema
Acne, Eczema
नाही होणार
ड पेक्षा अ चा संबंध
Vitamin D and skin
Vitamin D and skin
थँक्स डॉक्टर, उद्या वाचतेच.
In reply to Vitamin D and skin by सुबोध खरे
ड आणि त्वचाविकार....
नीलातीत किरण आणि प्रदूषण !
कोणत्या भारतीय आहारातून 'ड'
ड व आहार
mackerel म्हणजे बांगडा.
सर्व सहभागींचे चांगल्या व
शालेय आहार आणि ‘संपन्न’ तेल व मीठ
Psoriasis आणि ‘ड’ : ताजे संशोधन
अधिक डिटेल मध्ये
In reply to Psoriasis आणि ‘ड’ : ताजे संशोधन by हेमंतकुमार
@माहितगार, हे घ्या....
ड जीवनसत्व आणि कोविड
रोचक, फोर्टीफाईडवर अधिक चर्चा हवी
In reply to ड जीवनसत्व आणि कोविड by हेमंतकुमार
ता. क. : मी व्हीटॅमीन ड आणि
In reply to रोचक, फोर्टीफाईडवर अधिक चर्चा हवी by माहितगार
धन्यवाद ,