✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फिफा वर्ल्ड कप २०१८

क
कपिलमुनी यांनी
Tue, 05/29/2018 - 14:34  ·  लेख
लेख
fifa यंदाचा फिफा वर्ल्ड कप रशिया मध्ये खेळवला जाणार आहे. भारत या खेळात मागे असला तरी भारतामध्ये या खेळाचे चाहते खूप संख्येने आहेत. यंदा निवडणूकांमुळे या वर्ल्ड कपची वातावरण निर्मिती म्हणावी तशी झाली नाही. यंदाचा वर्ल्ड कप रशिया मध्ये १४ जून पासून सुरू होणार आहे. त्याची माहिती आणि चर्चा करण्यासाठी हा धागाप्रपंच या वर्षी एकूण ३२ टीम भाग घेणार आहेत . ( रशिया ही यजमान टीम आहे त्यामुळे त्यांना क्वालिफाय ना खेळता सहभाग मिळतो असे विकिने सांगितले , भारताला या प्रकारे आयोजन करून सहभागी व्हावे लागेल :) ) Groups इटली , नेदरलँड आणि चिलि या बलाढ्य टीम यंदा नसतील . या खेळात कोणतेही भाकीत करणे अवघड आहे . यंदाच्या स्ट्राँग टीम जर्मनी , फ्रान्स आणि पोर्तुगाल आहेत ब्राझील , पोर्तुगाल आणि अर्जेंटीना या एकाद्या दुसर्‍या खेळाडू वर अवलंबून आहेत . ते ब्लॉक झाले तर यांचा परफॉर्मन्स ढासळतो पण ते ( नेमार , रोनाल्डो , मेस्सी) चालले तर मात्र टीम जोशात येतात. डार्क हॉर्स : पोलंड , उरुग्वे , कोस्टा रीका यांचे भाकीत करता येणे अवघड आहे ह्या टीम धक्का देत सेमि फायनल पर्यंत पोचू शकतात प्रत्येक देशाचे खेळाडू , व्यूहरचना , गोलकीपर , प्रशिक्षक यावर प्रतिसादात अपडेट करेन आणि सर्वांनी त्यात भर घालावी ! यंदाच्या फिफा वर्ल्ड कपचा शुभंकर mascot
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
49335 वाचन

💬 प्रतिसाद (161)

प्रतिक्रिया

हो :) हेच लिहिणार होते.

निशाचर
Sun, 07/01/2018 - 23:43 नवीन
हो :) हेच लिहिणार होते. अंडरडॉग्सचा खेळ मस्त होतोय आणि प्रस्थापित संघांना धक्के मिळत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

दोन्ही संघाचा छान खेळ

Ranapratap
Mon, 07/02/2018 - 00:20 नवीन
डाव प्रतिडाव यांचा सुंदर मिलाफ म्हणजे आता चालू असलेला खेळ
  • Log in or register to post comments

उत्कंठावर्धक खेळात क्रोएशियाचा विजय!

निशाचर
Mon, 07/02/2018 - 02:30 नवीन
उत्कंठावर्धक खेळात क्रोएशियाचा विजय! अधिकच्या वेळात डेन्मार्कच्या रडीच्या डावाने क्रोएशियाचा गोल होताहोता राहिला. शेवटी आज पुन्हा एकदा पेनल्टी शूट आउटस् होऊन क्रोआट्स जिंकले.
  • Log in or register to post comments

स्पेन रशिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/02/2018 - 07:25 नवीन
स्पेन रशिया म्याच मस्त झाला. स्पेनचे पासेस अप्रतिम होते. बॉल तर सतत स्पेन कड़ेच होता त्यांनी रशियापेक्षा जास्त धड़का गोलपोष्ट मधे मारल्या. पेनल्टी शूट आऊट मधे रशिया जरी जिंकले तरी मनं स्पेनने जिंकली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

स्पेन ने काल विक्रमी (वर्ल्ड

sagarpdy
Mon, 07/02/2018 - 10:33 नवीन
स्पेन ने काल विक्रमी (वर्ल्ड कप मधील) ११३७ पास केले, पैकी १०२९ यशस्वी झाले. याआधी अर्जेंटिना चा ७००+ पास चा रेकॉर्ड होता. तिथेच रशिया ने केवळ २०२ पास केले. एक हेडलाईन : "Toothless Spain breaks passing record"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या कंटाळवाण्या टीका-टाका

sagarpdy
Mon, 07/02/2018 - 10:44 नवीन
या कंटाळवाण्या टीका-टाका पेक्षा मला रशिया चा opportunist खेळ मला वैयक्तिक रित्या आवडला, एवढे पास करूनही स्पेन ला एकही गोल करता आलेला नाही, झाला तो रशियाचा स्वयंगोल, तोही कॉर्नर वर. रशिया कडे गेम प्लॅन होता, आणि तो त्यांनी व्यवस्थितपणे राबवला, परिणामतः ते जिंकले. स्पेन कडे काहीच प्लॅन नव्हता, पासिंग करायचे स्किल भरपूर होते, त्यामुळे ते आपापसात पास पास खेळत राहिले. Image removed. हे चित्र पहा, स्पेन चे पास बाहेर च्या बाहेरच आहेत, त्यात आक्रमण करायची इच्छाच दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्र आवडलं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 07/03/2018 - 06:20 नवीन
आभार....! खेळ पाहण्यातला इंट्रेष्ट असा वाढतो बघा. भेटल्यावर बसू......!;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

आज ब्राझील

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/02/2018 - 15:36 नवीन
बघुया कोण जिंकते ते ? धन्यवाद प्रशांत सामन्याची आठवण करून दिल्याबद्दल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मजा येईल आज

प्रचेतस
Mon, 07/02/2018 - 15:41 नवीन
मजा येईल आज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मॅचेस मधील काही खास

राघव
Mon, 07/02/2018 - 17:40 नवीन
मॅचेस मधील काही खास जाणवलेल्या गोष्टी: . जर्मनी Vs मेक्सिको: मेक्सिकोचा बचाव खरंच भक्कम होता. कमीत कमी ६ खेळाडू डिफेंस करत होतेत, ४ पुढे आणि २ मागे असे. जर्मनीचा गेम नीट अभ्यासून त्यांनी योजना आखली होती. जर्मनीचे बरेचसे गोल्स "आऊटर डी" च्या जवळून जोरदार किक्सवर होतात. मेक्सिकोनं तेच रोखण्यावर प्राधान्य दिलं. किक मारण्यासाठी समोरील एकाला चकवलं तरी मागच्या २ पैकी एक मधेच उभा असायचा.. प्लेयर ब्लॉक करण्यापेक्षा त्यांनी शॉट ब्लॉक करण्यावर भर दिला. जर्मनीनं तरीही २४ डीप आक्रमणं केलीत आणि गोलपोस्ट वर ९ शॉट्स झालेत.. त्या कीपरची कमाल. योजना नसती तर जर्मनीनं किती गोल्स केले असतेत कल्पना नाही.. :-) . ब्राझील च्या मॅचेस मधे तो "झील" जाणवत नाही यातच काय ते आलं. नेमार आहे.. चांगला आहे.. वगैरे सगळं ठीक आहे.. पण तो जेवढे चान्सेस वाया घालवतो तेवढे रोनाल्डो / रोनाल्डिन्हो ना मिळाले असतेत तर.. ? असो जर तर च्या गोष्टी बाजूला ठेवून बघीतलं तरी हा पडण्यातच जास्त वेळ घालवतो असं वाटतं. ;-) बाकी एक मात्र खरं.. अतिशय सुंदर पासेस देवून गोल साठी संधी उपलब्ध करण्यात त्याचा हातखंडा जाणवतो. . उरुग्वेनं ज्या पद्धतीनं खेळ केलाय ते पाहता ते फायनल मधे पोहोचायला हवेत. अप्रतीम खेळताहेत. लॅटीन अमेरिकन देशांच्या खास शैलीत देखील त्यांचा खेळ युरोपियन्स च्या धसमुसळ्या खेळाला तोडीस तोड होतोय. . लॅटीन अमेरिकन देशांच्या शैलीवर तोडगा काढल्यासारखे, युरोपियन्स त्यांच्या पायांवर धावून जातात. ज्यामुळे ४-५ सेकंदांहून जास्त वेळ एका खेळाडूकडे बॉल राहतच नाही.. ताबा कायम राखण्यासाठी त्यांना लगेच बॉल पास करावा लागतो. या प्रकारात चालीच रचता न आल्यामुळे आक्रमणातील धार बोथट होऊन जाते. यावर उपाय म्हणजे वेगवान हालचाली आणि ड्रिबलिंग स्किल्स. मजा येते अशी चुरस बघायला! - ब्राझील आणि मेक्सिकोची मॅच बघायला मजा येईल. खरे तर मला दोघांचाही खेळ आवडलाय. कमीत कमी सेमीज मधे ही मॅच व्हायला पाहिजे होती! पण मजा येईल हे नक्की! :-)
  • Log in or register to post comments

ब्राझील × मेक्सिको

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/02/2018 - 20:42 नवीन
सेकंड हाफ मधे चागल्या पासवर नेमारने गोल करून आघाडी घेतली. ब्राझील १-० उत्तम खेळ बघायला मिळतोय मजा येतेय. खेळाची ५६ मिनिटे संपली आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

ब्राझीलचा दूसरा गोल

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/02/2018 - 21:21 नवीन
८७ व्या मिनिटाला नेमारच्या पासवर आणखी एक गोल. शेवटची आता एक्स्ट्रा वेळेतली दोन मिनिटे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ब्राझील

कपिलमुनी
Mon, 07/02/2018 - 21:39 नवीन
ब्राझील जिंकली, आज डेन्मार्कने चांगला खेळ केला पण गोल करू शकले नाहीत. ब्राझीलचा डिफेन्स (नेहमीप्रमाणे) कमजोर आहे.
  • Log in or register to post comments

मेक्सिको

sagarpdy
Mon, 07/02/2018 - 23:49 नवीन
मेक्सिको
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

जपान

कपिलमुनी
Mon, 07/02/2018 - 21:40 नवीन
बेल्जियमचे पारडे जड आहे, एक एशियन संघ म्हणून जपान जिंकावे अशी इच्छा आहे.
  • Log in or register to post comments

जपान चांगला खेळ खेळत आहे. पण

sagarpdy
Mon, 07/02/2018 - 23:51 नवीन
जपान चांगला खेळ खेळत आहे. पण त्यांना आक्रमण करून गोल मारता येईल का शंका वाटते. बेल्जियम ला किती थोपवून धरतात हेच बघायचं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

नेमार खूप रडी पण खेळतो राव !!

सोमनाथ खांदवे
Mon, 07/02/2018 - 22:34 नवीन
नेमार खूप रडी पण खेळतो राव !!!! आज सकाळी मेक्सिको च्या कोच चे नेमार बद्दल म टा मध्ये स्टेटमेन्ट आलं होतं की " तो D मध्ये जाणूनबुजून पडतो " .अगदी तसच पाहायला भेटलं .
  • Log in or register to post comments

धक्कादायक

Ranapratap
Tue, 07/03/2018 - 00:41 नवीन
जपान 2-0 ने पुढे
  • Log in or register to post comments

जपान- बेलजीएम

Ranapratap
Tue, 07/03/2018 - 00:58 नवीन
2-1
  • Log in or register to post comments

जपान-बेल्जियम

Ranapratap
Tue, 07/03/2018 - 01:02 नवीन
2-2
  • Log in or register to post comments

श्या, जपान जिंकायला हवा होता.

निशाचर
Tue, 07/03/2018 - 01:26 नवीन
श्या, जपान जिंकायला हवा होता... जीव तोडून खेळत होते. पण शेवटच्या क्षणी बेल्जियमचा अप्रतिम गोल.
  • Log in or register to post comments

जपान-बेलजीएम

Ranapratap
Tue, 07/03/2018 - 01:28 नवीन
2-3 छोट्या चणीच्या जपानी खेळाडूंनी कडवी लढत दिली पण शेवटच्या 40 सेकंदात त्यांनी गोल स्वीकारला, सामना बेळजीयाम ने जिंकला पण माने मात्र जपान ने जिंकली, या वर्ल्ड कप मधील ही सर्वोत्तम मॅच.
  • Log in or register to post comments

मस्त मॅच

कपिलमुनी
Tue, 07/03/2018 - 01:33 नवीन
दोन्ही संघांनी केलेला फेयर प्ले , आक्रमण आणि बचाव यांचा प्रदर्शन , जपान गोलकीपराचे सेव्ह अशा क्षणांनी भरलेली उत्कृष्ट मॅच ! बराच काळ लक्षात राहिल
  • Log in or register to post comments

जपान अनपेक्षित रित्या फारच

sagarpdy
Tue, 07/03/2018 - 07:28 नवीन
जपान अनपेक्षित रित्या फारच मस्त खेळले, हा वर्ल्ड कप अंडरडॉग्स गाजवतायत त्यामुळे फार इंटरेस्टिंग झालाय
  • Log in or register to post comments

कोलंबिया विरुद्ध इंग्लंड

महासंग्राम
Wed, 07/04/2018 - 09:47 नवीन
कोलंबिया विरुद्ध इंग्लंड शूटआऊट मध्ये ४-३ अश्या फरकाने जिंकलं, प्रचंड शूट आऊट प्रचंड थरारक प्रकार होता. शेवटी इंग्लंड शूटआऊट मध्ये हरण्याच्या शापातून मुक्त झाला म्हणायचं. आता तहात जिंकतात का पाहाण औत्सुक्याचे ठरेल.
  • Log in or register to post comments

उरुग्वे ब्राझिल

कपिलमुनी
Wed, 07/04/2018 - 10:13 नवीन
उरुग्वे फ्रान्स मध्ये उरुग्वे ला अधिक संधी आहे . ब्राझीलची खेळण्याची शैली आवडत असली तरि बेल्जियमचि टीम अधिक संतुलीत आणि अनुभवी आहे. त्यामुळे बेल्जियम स्वीडन इंग्लडमध्ये नक्कीच इंग्लड ! स्वीडन पुढे गेले तर चमत्कार मानावा लागेल. रशिया क्रोएशिया मध्ये क्रोएशिया (पुतीनने सेटींग लावलि नसेल तर = )) )
  • Log in or register to post comments

जपानची म्याच अजून पाहताच आली

कंजूस
Wed, 07/04/2018 - 13:04 नवीन
जपानची म्याच अजून पाहताच आली नाही. भयानक पावसाने सिग्नल गायब. दुसरे दिवशीही नाहीच. दोन मिनिटाच्या युट्युबवर समाधान. चार म्याच शुटाउट झाल्या, फायनलला चार तास खेळवा पण हे नको.
  • Log in or register to post comments

पुटीनने सेटिंग लावली नसेल तर

Ranapratap
Wed, 07/04/2018 - 13:05 नवीन
कपिल इथेही फिक्ससिंग??????
  • Log in or register to post comments

ब्राझील

sagarpdy
Wed, 07/04/2018 - 15:40 नवीन
ब्राझील ची टीम माझी फेव्हरेट नसली तरी - ब्राझील बॅलन्स खेळतेय, कदाचित लक्षात येत नसला तरी त्यांचा बचाव शिस्तीत आहे (उदा. जर्मनी, स्पेन यांचे बचावपटू कुठेही पळत होते, हमेल्स तर स्ट्रायकर बरोबर होता कधी कधी). अर्थात बेल्जीयम काही कमी नाही - ते ब्राझील ला धक्का देण्यास पूर्णतः समर्थ आहेत, पण जपान ज्या प्रकारे त्यांचा बचाव मोडू शकली ते पाहता माझा बेल्जीयन्स वरील विश्वास कमी झाला आहे. या बाजूने उरुग्वे, फ्रांस, ब्राझील, बेल्जीयम म्हणजे सगळेच तगडे संघ आहेत, कोणीही कोणालाही हरवू शकते. मला वैयक्तिक रित्या फ्रांस किंवा बेल्जीयम फायनल ला गेलेली आवडेल. दुसऱ्या बाजूचा ड्रॉ बघता इंग्लंड बहुधा फायनल गाठेल असे वाटते.
  • Log in or register to post comments

बेल्जीयम

कपिलमुनी
Wed, 07/04/2018 - 16:33 नवीन
बेल्जीयमची सर्वात आवडलेलि गोष्ट म्हणजे २-० अशी पिछाडि असूनही त्यांची लय बिघडलि नव्हती, धसमुसळा खेळ नसल्याने फाउल कमी होते. आणि अक्युरसी चांगली होती. ब्राझीलची आक्रमणे चांगली आहेत, पण गोलच्या दिशेने बॉल मारताना बरीच गडबड आहे . योग्य दिशा देवून कीपरला चकवण्यात ते कमी पडत आहेत. ग्लोरी शॉट्स ही ब्राझीलची कायम दोकेदुखी असते. गोलपोस्ट जवळ नेवून बॉल ढकलण्यापेक्षा दुरून ताकद लावून , अवघड शॉट्स मारायला ब्राझिलियन खेळाडूंना आवडते. हे टाळले पाहिजे. या वर्षी उरुग्वे जिंकेल असा वाटत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

या वर्षी उरुग्वे जिंकेल असा

sagarpdy
Wed, 07/04/2018 - 18:31 नवीन
या वर्षी उरुग्वे जिंकेल असा वाटत आहे हो, मलाही वाटतंय. फक्त येत्या मॅच ला कदाचित काव्हानी नाही खेळू शकणार, त्याचा परिणाम कसा होतो ते बघितलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

म्हणाल्या प्रमाणे, कव्हनी ची

sagarpdy
Fri, 07/06/2018 - 21:22 नवीन
म्हणाल्या प्रमाणे, कव्हनी ची कमतरता राहिली. एका सुआरेझ ला मार्क करायला सोपं गेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

चुकवू नये अशा मॅच

कपिलमुनी
Fri, 07/06/2018 - 17:15 नवीन
आज फ्रान्स उरुग्वे आणि ब्राझील बेल्जियम मॅच आहेत . आजचे माझे फेव्हरीट उरुग्वे ,ब्राझील स्पर्धेतल्या खेळानुसार :उरुग्वे ,बेल्जियम ब्राझील बेल्जियम मॅच हाय स्कोअरिन्ग असा अन्दाज आहे .
  • Log in or register to post comments

उरुग्वे

कपिलमुनी
Fri, 07/06/2018 - 23:21 नवीन
उरुग्वे बाहेर , गचाळ गोल किपिंग आणि सुआरेज एकटा पडल्याने स्कीम गंडली. ब्राझील जिंकेल अशी आशा आहे
  • Log in or register to post comments

ब्राझिल-बेलजीएम

Ranapratap
Sat, 07/07/2018 - 00:03 नवीन
0-2
  • Log in or register to post comments

ब्राझिल

Ranapratap
Sat, 07/07/2018 - 00:04 नवीन
बहुतेक बाहेर जाणार
  • Log in or register to post comments

ब्राझील बेल्जीयम चांगली चालू

sagarpdy
Sat, 07/07/2018 - 00:05 नवीन
ब्राझील बेल्जीयम चांगली चालू आहे. बेल्जीयन्स प्रतिहल्ल्यांवर भर देऊन चांगली खेळतेय. ब्राझील चा हल्ला चांगला आहे पण बेल्जीयम बहुतांश वेळी जवळपास बस पार्क करत आहे. ब्राझील 0-2 बेल्जी
  • Log in or register to post comments

1-2 ब्राझील परत येणार?

sagarpdy
Sat, 07/07/2018 - 01:04 नवीन
1-2 ब्राझील परत येणार?
  • Log in or register to post comments

प्रथमच ब्राझील, अर्जेंटिना व

sagarpdy
Sat, 07/07/2018 - 01:26 नवीन
प्रथमच ब्राझील, अर्जेंटिना व जर्मनी या तीनही टीम नसणारी सेमी फायनल होणार. बेल्जीयम जबरा खेळ
  • Log in or register to post comments

ब्राझील बाहेर

Ranapratap
Sat, 07/07/2018 - 01:27 नवीन
पहिला फुटबॉल विश्वचषक ज्यामध्ये ब्राझील, जर्मनी, अर्जेंटिना सेमिफायनल मध्ये नाही. या वर्षी सगळे अंदाज खोटे ठरवत भलतीच टीम विजेता होणार
  • Log in or register to post comments

रोनाल्डो ,मेस्सी, नेमा यांना

कंजूस
Sat, 07/07/2018 - 06:47 नवीन
रोनाल्डो ,मेस्सी, नेमा यांना फारच भाव दिलेला ते गेले. बरं झालं. आता नवोदित खेळाडुंचा उत्साह वाढणार. --- बेल्जम जपान ही मॅच फार छान झाली होती. शेवटचा चाळीस सेकंदातला बेल्जमचा गोल जबरा होता. जपान हरले पण पण काय छान खेळले होते!
  • Log in or register to post comments

रशिया-क्रोअशिया

Ranapratap
Sun, 07/08/2018 - 00:08 नवीन
रशियाचा जबरदस्त गोल, रशिया 1-0 ने पुढे बहुतेक फ्रान्स मधील वर्ल्ड कॅप ची पिनरावृत्ती होणार असे दिसतें
  • Log in or register to post comments

सामना बरोबरीत

Ranapratap
Sun, 07/08/2018 - 00:12 नवीन
1-1 रशियन खेळाडूंचा ढिलेपणा नडला
  • Log in or register to post comments

हो. मला वाटलं होतं आता

sagarpdy
Sun, 07/08/2018 - 00:16 नवीन
हो. मला वाटलं होतं आता रशीयन्स यांना पण स्पेन स्टाईल मध्ये रडवणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ranapratap

क्रोअशिया चा अप्रतिम गोल

Ranapratap
Sun, 07/08/2018 - 01:42 नवीन
रशियन खेळाडू व गोलकीपर पहातच राहिले
  • Log in or register to post comments

रशियाचा नाट्यमय गोल. गोलकीपर

sagarpdy
Sun, 07/08/2018 - 02:03 नवीन
रशियाचा नाट्यमय गोल. गोलकीपर ची इंज्युरी लक्षात घेता क्रोएशिया ला पेनल्टी जड पडणार
  • Log in or register to post comments

पेनलटी शूट आउट

Ranapratap
Sun, 07/08/2018 - 02:09 नवीन
पाहू कोण जिंकतो
  • Log in or register to post comments

भारी मॅच. रशिया ने खरच

sagarpdy
Sun, 07/08/2018 - 02:31 नवीन
भारी मॅच. रशिया ने खरच अनपेक्षित रित्या मोठी मजल मारली या वेळी. वाटेत इजिप्त, स्पेन या बलाढ्याना धक्के दिले. क्रोएशिया ला पण चांगलं थकवल.
  • Log in or register to post comments

आणखी एक पेनल्टी गेम.

कंजूस
Sun, 07/08/2018 - 05:26 नवीन
आणखी एक पेनल्टी गेम.
  • Log in or register to post comments

फ्रांस वि बेल्जीयम

sagarpdy
Tue, 07/10/2018 - 17:52 नवीन
आज फ्रांस वि बेल्जीयम. माझ्या मते हि फायनलच आहे स्पर्धेची. यात जो संघ विजयी होईल तोच फायनल जिंकेल बेल्जीयमचा अनुभव व मॅनेजमेंट जरी लक्षात घेतली तरी मी फ्रांस ला किंचित झुकतं माप देईन. हझार्ड, डी ब्रुईने, लुकाकू यांची जादू आणि सांघिक कामगिरी - हे दोन्ही जमलं तरच बेल्जीयमला वाव आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा