Skip to main content

फिफा वर्ल्ड कप २०१८

लेखक कपिलमुनी यांनी मंगळवार, 29/05/2018 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
fifa यंदाचा फिफा वर्ल्ड कप रशिया मध्ये खेळवला जाणार आहे. भारत या खेळात मागे असला तरी भारतामध्ये या खेळाचे चाहते खूप संख्येने आहेत. यंदा निवडणूकांमुळे या वर्ल्ड कपची वातावरण निर्मिती म्हणावी तशी झाली नाही. यंदाचा वर्ल्ड कप रशिया मध्ये १४ जून पासून सुरू होणार आहे. त्याची माहिती आणि चर्चा करण्यासाठी हा धागाप्रपंच या वर्षी एकूण ३२ टीम भाग घेणार आहेत . ( रशिया ही यजमान टीम आहे त्यामुळे त्यांना क्वालिफाय ना खेळता सहभाग मिळतो असे विकिने सांगितले , भारताला या प्रकारे आयोजन करून सहभागी व्हावे लागेल :) ) Groups इटली , नेदरलँड आणि चिलि या बलाढ्य टीम यंदा नसतील . या खेळात कोणतेही भाकीत करणे अवघड आहे . यंदाच्या स्ट्राँग टीम जर्मनी , फ्रान्स आणि पोर्तुगाल आहेत ब्राझील , पोर्तुगाल आणि अर्जेंटीना या एकाद्या दुसर्‍या खेळाडू वर अवलंबून आहेत . ते ब्लॉक झाले तर यांचा परफॉर्मन्स ढासळतो पण ते ( नेमार , रोनाल्डो , मेस्सी) चालले तर मात्र टीम जोशात येतात. डार्क हॉर्स : पोलंड , उरुग्वे , कोस्टा रीका यांचे भाकीत करता येणे अवघड आहे ह्या टीम धक्का देत सेमि फायनल पर्यंत पोचू शकतात प्रत्येक देशाचे खेळाडू , व्यूहरचना , गोलकीपर , प्रशिक्षक यावर प्रतिसादात अपडेट करेन आणि सर्वांनी त्यात भर घालावी ! यंदाच्या फिफा वर्ल्ड कपचा शुभंकर mascot

वाचने 49763
प्रतिक्रिया 161

प्रतिक्रिया

अर्जेंटीनाला संधी मिळत नै ये आणि फ्रांसचे आक्रमणात किमान अजुन दोन गोल होता होता राहिले. मस्त म्याच सुरु आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डीमारिया चा मोकळ्या जागेतून जबरा गोल. आत्ताशी बरं वाटलं. ४४ व्या मिनिटाला स्कोर १-१ -दिलीप बिरुटे

In reply to by कंजूस

तो फ्रांसचा एम्बापे एकटाच सुसाट चेंडू घेऊन पळतोय त्याच्या वेगापुढे अर्जेंटीना पहिल्या हाफ मधे थकुन गेलीय. मला मेस्सीचा गोल बघायचा आहे, मी आज अर्जेंटीनाकडून आहे मनाने. साला खेळ आवडतोय फ्रांसचा. :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्जेंटीनाचा आणखी एक जबरा गोल. अर्जेंटीना २-१ -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज फ्रांसचा खेळ पाहता त्यांचा आणखी एक गोल. फ्रांस ३ अरजेंटिना २. मेस्सीला काही जमेना आज. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एम्बापेचा आणखी एक गोल ४-२ . अर्जेंटीनाला अजिबात चांस दिसत नै ये, अतिशय वेगवान खेळ फ्रांसचा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फ्रांसचा खेळ बघायला मजा येत्येय. २ मिनिटं उरली आहेत आता फक्त..

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तीसरा गोल झाला पण फ्रांसचा दमदार विजय. अर्जेंटीना बाहेर. फ्रांस ४ अर्जेंटीना ३ . उरुग्वे आणि पोर्तुगालच्या सामण्यासाठी भेटू भाप्रवे ११:३० ला. -दिलीप बिरुटे (अर्जेंटीनाच्या पराभवाने मूड गेलेला) :(

फ्रान्सचा 4-3 ने विजय, संपूर्ण सामन्या दरम्यान अर्जेंटिना लौकिकाला साजेसा खेळ करू शकली नाही. शेवटी अर्जेंटिना खेळाडू चे वर्तन गालबोट लावणारे होते. त्यांनी पराभव मान्य करायला हवा होता.

In reply to by sagarpdy

नाटकीपणा, खोटारेडापणा, भरपूर मनोरंजनाने भरलेला खेळ :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पोर्तुगालचा गोल, रोनाल्डोला पुरता घेरून टाकलेय.

उरुग्वेचा बचाव आणि आक्रमक खेळ त्यांनी डी मधे बचावासाठी उभी केलेली भिंत पोर्तुगालला भेदताच आली नाही. शुभ रात्री. -दिलीप बिरुटे

पोर्तुगाल चा रोनाल्डो आणि अर्जेंटिना चा मेस्सी यांचा अफलातून खेळ मला माहीत होता म्हणून फक्त त्यांच्याच मॅच मी बघितल्या , आता त्या दोन्ही टीम बाहेर पडल्या आहेत तर इथून पुढे कुठल्या टीम च्या कोणत्या खेळाडू चा खेळ पाहण्यासारखा आहे ? कोणी सांगू शकेल का ? . थोडीफार खेळाडू ची माहिती असेल तर मॅच पाहायला मजा येते .

In reply to by सोमनाथ खांदवे

बेल्जियम, क्रोएशिया यांसोबत कालचे विजेते फ्रांस आणि उरुग्वे चांगले संघ आहेत. फुटबॉल हा 'वन मॅन शो' गेम नाही हेच कालच्या दोन्ही सामन्यांनी दाखवून दिले.

स्पेन गोलक्षेत्रात स्पेनच्या खेळाडुकडून हँड झाल्यानं रशियाला पेनलटी किक मिळाली व ती रशियाने सत्कारणी लावली.

30 मिनिटाच्या ज्यादा वेळेत गोल न झालेने निकाल पेनलटी शूट आउट वर, स्पेन च्या टिकी टाका खेळास रशियाचे चोख प्रतियतुर

In reply to by sagarpdy

हो :) हेच लिहिणार होते. अंडरडॉग्सचा खेळ मस्त होतोय आणि प्रस्थापित संघांना धक्के मिळत आहेत.

उत्कंठावर्धक खेळात क्रोएशियाचा विजय! अधिकच्या वेळात डेन्मार्कच्या रडीच्या डावाने क्रोएशियाचा गोल होताहोता राहिला. शेवटी आज पुन्हा एकदा पेनल्टी शूट आउटस् होऊन क्रोआट्स जिंकले.

स्पेन रशिया म्याच मस्त झाला. स्पेनचे पासेस अप्रतिम होते. बॉल तर सतत स्पेन कड़ेच होता त्यांनी रशियापेक्षा जास्त धड़का गोलपोष्ट मधे मारल्या. पेनल्टी शूट आऊट मधे रशिया जरी जिंकले तरी मनं स्पेनने जिंकली. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पेन ने काल विक्रमी (वर्ल्ड कप मधील) ११३७ पास केले, पैकी १०२९ यशस्वी झाले. याआधी अर्जेंटिना चा ७००+ पास चा रेकॉर्ड होता. तिथेच रशिया ने केवळ २०२ पास केले. एक हेडलाईन : "Toothless Spain breaks passing record"

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या कंटाळवाण्या टीका-टाका पेक्षा मला रशिया चा opportunist खेळ मला वैयक्तिक रित्या आवडला, एवढे पास करूनही स्पेन ला एकही गोल करता आलेला नाही, झाला तो रशियाचा स्वयंगोल, तोही कॉर्नर वर. रशिया कडे गेम प्लॅन होता, आणि तो त्यांनी व्यवस्थितपणे राबवला, परिणामतः ते जिंकले. स्पेन कडे काहीच प्लॅन नव्हता, पासिंग करायचे स्किल भरपूर होते, त्यामुळे ते आपापसात पास पास खेळत राहिले. स्पेन चे पास हे चित्र पहा, स्पेन चे पास बाहेर च्या बाहेरच आहेत, त्यात आक्रमण करायची इच्छाच दिसत नाही.

In reply to by sagarpdy

आभार....! खेळ पाहण्यातला इंट्रेष्ट असा वाढतो बघा. भेटल्यावर बसू......!;) -दिलीप बिरुटे

बघुया कोण जिंकते ते ? धन्यवाद प्रशांत सामन्याची आठवण करून दिल्याबद्दल. -दिलीप बिरुटे

मॅचेस मधील काही खास जाणवलेल्या गोष्टी: . जर्मनी Vs मेक्सिको: मेक्सिकोचा बचाव खरंच भक्कम होता. कमीत कमी ६ खेळाडू डिफेंस करत होतेत, ४ पुढे आणि २ मागे असे. जर्मनीचा गेम नीट अभ्यासून त्यांनी योजना आखली होती. जर्मनीचे बरेचसे गोल्स "आऊटर डी" च्या जवळून जोरदार किक्सवर होतात. मेक्सिकोनं तेच रोखण्यावर प्राधान्य दिलं. किक मारण्यासाठी समोरील एकाला चकवलं तरी मागच्या २ पैकी एक मधेच उभा असायचा.. प्लेयर ब्लॉक करण्यापेक्षा त्यांनी शॉट ब्लॉक करण्यावर भर दिला. जर्मनीनं तरीही २४ डीप आक्रमणं केलीत आणि गोलपोस्ट वर ९ शॉट्स झालेत.. त्या कीपरची कमाल. योजना नसती तर जर्मनीनं किती गोल्स केले असतेत कल्पना नाही.. :-) . ब्राझील च्या मॅचेस मधे तो "झील" जाणवत नाही यातच काय ते आलं. नेमार आहे.. चांगला आहे.. वगैरे सगळं ठीक आहे.. पण तो जेवढे चान्सेस वाया घालवतो तेवढे रोनाल्डो / रोनाल्डिन्हो ना मिळाले असतेत तर.. ? असो जर तर च्या गोष्टी बाजूला ठेवून बघीतलं तरी हा पडण्यातच जास्त वेळ घालवतो असं वाटतं. ;-) बाकी एक मात्र खरं.. अतिशय सुंदर पासेस देवून गोल साठी संधी उपलब्ध करण्यात त्याचा हातखंडा जाणवतो. . उरुग्वेनं ज्या पद्धतीनं खेळ केलाय ते पाहता ते फायनल मधे पोहोचायला हवेत. अप्रतीम खेळताहेत. लॅटीन अमेरिकन देशांच्या खास शैलीत देखील त्यांचा खेळ युरोपियन्स च्या धसमुसळ्या खेळाला तोडीस तोड होतोय. . लॅटीन अमेरिकन देशांच्या शैलीवर तोडगा काढल्यासारखे, युरोपियन्स त्यांच्या पायांवर धावून जातात. ज्यामुळे ४-५ सेकंदांहून जास्त वेळ एका खेळाडूकडे बॉल राहतच नाही.. ताबा कायम राखण्यासाठी त्यांना लगेच बॉल पास करावा लागतो. या प्रकारात चालीच रचता न आल्यामुळे आक्रमणातील धार बोथट होऊन जाते. यावर उपाय म्हणजे वेगवान हालचाली आणि ड्रिबलिंग स्किल्स. मजा येते अशी चुरस बघायला! - ब्राझील आणि मेक्सिकोची मॅच बघायला मजा येईल. खरे तर मला दोघांचाही खेळ आवडलाय. कमीत कमी सेमीज मधे ही मॅच व्हायला पाहिजे होती! पण मजा येईल हे नक्की! :-)

सेकंड हाफ मधे चागल्या पासवर नेमारने गोल करून आघाडी घेतली. ब्राझील १-० उत्तम खेळ बघायला मिळतोय मजा येतेय. खेळाची ५६ मिनिटे संपली आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

८७ व्या मिनिटाला नेमारच्या पासवर आणखी एक गोल. शेवटची आता एक्स्ट्रा वेळेतली दोन मिनिटे. -दिलीप बिरुटे

ब्राझील जिंकली, आज डेन्मार्कने चांगला खेळ केला पण गोल करू शकले नाहीत. ब्राझीलचा डिफेन्स (नेहमीप्रमाणे) कमजोर आहे.

बेल्जियमचे पारडे जड आहे, एक एशियन संघ म्हणून जपान जिंकावे अशी इच्छा आहे.

In reply to by कपिलमुनी

जपान चांगला खेळ खेळत आहे. पण त्यांना आक्रमण करून गोल मारता येईल का शंका वाटते. बेल्जियम ला किती थोपवून धरतात हेच बघायचं

नेमार खूप रडी पण खेळतो राव !!!! आज सकाळी मेक्सिको च्या कोच चे नेमार बद्दल म टा मध्ये स्टेटमेन्ट आलं होतं की " तो D मध्ये जाणूनबुजून पडतो " .अगदी तसच पाहायला भेटलं .

श्या, जपान जिंकायला हवा होता... जीव तोडून खेळत होते. पण शेवटच्या क्षणी बेल्जियमचा अप्रतिम गोल.

2-3 छोट्या चणीच्या जपानी खेळाडूंनी कडवी लढत दिली पण शेवटच्या 40 सेकंदात त्यांनी गोल स्वीकारला, सामना बेळजीयाम ने जिंकला पण माने मात्र जपान ने जिंकली, या वर्ल्ड कप मधील ही सर्वोत्तम मॅच.

दोन्ही संघांनी केलेला फेयर प्ले , आक्रमण आणि बचाव यांचा प्रदर्शन , जपान गोलकीपराचे सेव्ह अशा क्षणांनी भरलेली उत्कृष्ट मॅच ! बराच काळ लक्षात राहिल

जपान अनपेक्षित रित्या फारच मस्त खेळले, हा वर्ल्ड कप अंडरडॉग्स गाजवतायत त्यामुळे फार इंटरेस्टिंग झालाय

कोलंबिया विरुद्ध इंग्लंड शूटआऊट मध्ये ४-३ अश्या फरकाने जिंकलं, प्रचंड शूट आऊट प्रचंड थरारक प्रकार होता. शेवटी इंग्लंड शूटआऊट मध्ये हरण्याच्या शापातून मुक्त झाला म्हणायचं. आता तहात जिंकतात का पाहाण औत्सुक्याचे ठरेल.

उरुग्वे फ्रान्स मध्ये उरुग्वे ला अधिक संधी आहे . ब्राझीलची खेळण्याची शैली आवडत असली तरि बेल्जियमचि टीम अधिक संतुलीत आणि अनुभवी आहे. त्यामुळे बेल्जियम स्वीडन इंग्लडमध्ये नक्कीच इंग्लड ! स्वीडन पुढे गेले तर चमत्कार मानावा लागेल. रशिया क्रोएशिया मध्ये क्रोएशिया (पुतीनने सेटींग लावलि नसेल तर = )) )

जपानची म्याच अजून पाहताच आली नाही. भयानक पावसाने सिग्नल गायब. दुसरे दिवशीही नाहीच. दोन मिनिटाच्या युट्युबवर समाधान. चार म्याच शुटाउट झाल्या, फायनलला चार तास खेळवा पण हे नको.

ब्राझील ची टीम माझी फेव्हरेट नसली तरी - ब्राझील बॅलन्स खेळतेय, कदाचित लक्षात येत नसला तरी त्यांचा बचाव शिस्तीत आहे (उदा. जर्मनी, स्पेन यांचे बचावपटू कुठेही पळत होते, हमेल्स तर स्ट्रायकर बरोबर होता कधी कधी). अर्थात बेल्जीयम काही कमी नाही - ते ब्राझील ला धक्का देण्यास पूर्णतः समर्थ आहेत, पण जपान ज्या प्रकारे त्यांचा बचाव मोडू शकली ते पाहता माझा बेल्जीयन्स वरील विश्वास कमी झाला आहे. या बाजूने उरुग्वे, फ्रांस, ब्राझील, बेल्जीयम म्हणजे सगळेच तगडे संघ आहेत, कोणीही कोणालाही हरवू शकते. मला वैयक्तिक रित्या फ्रांस किंवा बेल्जीयम फायनल ला गेलेली आवडेल. दुसऱ्या बाजूचा ड्रॉ बघता इंग्लंड बहुधा फायनल गाठेल असे वाटते.

In reply to by sagarpdy

बेल्जीयमची सर्वात आवडलेलि गोष्ट म्हणजे २-० अशी पिछाडि असूनही त्यांची लय बिघडलि नव्हती, धसमुसळा खेळ नसल्याने फाउल कमी होते. आणि अक्युरसी चांगली होती. ब्राझीलची आक्रमणे चांगली आहेत, पण गोलच्या दिशेने बॉल मारताना बरीच गडबड आहे . योग्य दिशा देवून कीपरला चकवण्यात ते कमी पडत आहेत. ग्लोरी शॉट्स ही ब्राझीलची कायम दोकेदुखी असते. गोलपोस्ट जवळ नेवून बॉल ढकलण्यापेक्षा दुरून ताकद लावून , अवघड शॉट्स मारायला ब्राझिलियन खेळाडूंना आवडते. हे टाळले पाहिजे. या वर्षी उरुग्वे जिंकेल असा वाटत आहे

In reply to by कपिलमुनी

या वर्षी उरुग्वे जिंकेल असा वाटत आहे हो, मलाही वाटतंय. फक्त येत्या मॅच ला कदाचित काव्हानी नाही खेळू शकणार, त्याचा परिणाम कसा होतो ते बघितलं पाहिजे.

In reply to by sagarpdy

म्हणाल्या प्रमाणे, कव्हनी ची कमतरता राहिली. एका सुआरेझ ला मार्क करायला सोपं गेलं.

आज फ्रान्स उरुग्वे आणि ब्राझील बेल्जियम मॅच आहेत . आजचे माझे फेव्हरीट उरुग्वे ,ब्राझील स्पर्धेतल्या खेळानुसार :उरुग्वे ,बेल्जियम ब्राझील बेल्जियम मॅच हाय स्कोअरिन्ग असा अन्दाज आहे .

उरुग्वे बाहेर , गचाळ गोल किपिंग आणि सुआरेज एकटा पडल्याने स्कीम गंडली. ब्राझील जिंकेल अशी आशा आहे

ब्राझील बेल्जीयम चांगली चालू आहे. बेल्जीयन्स प्रतिहल्ल्यांवर भर देऊन चांगली खेळतेय. ब्राझील चा हल्ला चांगला आहे पण बेल्जीयम बहुतांश वेळी जवळपास बस पार्क करत आहे. ब्राझील 0-2 बेल्जी

पहिला फुटबॉल विश्वचषक ज्यामध्ये ब्राझील, जर्मनी, अर्जेंटिना सेमिफायनल मध्ये नाही. या वर्षी सगळे अंदाज खोटे ठरवत भलतीच टीम विजेता होणार