Skip to main content

वजन कमी करणारा आहार

लेखक बाबा पाटील यांनी बुधवार, 04/03/2015 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
वजन कमी करणारा आहार १) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे. २) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी. ३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा. ४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री) घालुन घेणे. ५) रात्रीचे जेवण ; दुपार प्रमाणेच घ्यावे. ६) जेवणात गोड पदार्थचा समावश करु नये. तसेच चिंकु, केळी, द्राक्ष,आंबा ही फळे सोडुन बाकी सर्व फळे खावीत.चाकलेट्स बेकरी प्राडक्टस ,शितपेय, फास्ट फुड, होटेलींग, मिठाई बंद करावी. ७) योग्य आहाराला योग्य व्यायाम व आयुवेदीक औषधीची जोड दिल्यास दर आढवडयाला एक ते दिड किलो वजन कमी होते व पुन्हा वाढत नाही तसेच शरीराचे कु्ठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. ८)जेवणात मिठ कमी घ्यावे.

वाचने 67841
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

In reply to by चौकटराजा

वय वर्षे ६० वाचले नाही का?

त्याच पाण्यात whale पण राहतात जे हत्ती च्या तिपटीने मोठे असतात हे आपण विसरलेले दिसता. प्रतिसाद द्यायचा म्हणून काहीही लिहीत जाऊ नका

=)) रोचक चर्चा -सडसडीत (स्पा)

In reply to by स्पा

स्पावड्या मित्रा, काही वर्षांपूर्वी मी पण असाच हसायचो डायट करणार्‍यांना. हा काय पालापाचोळा खाताय म्हणून हिणवायचो. कधी आपण या किनार्‍यावरून त्या किनार्‍यावर पोचतो कलत बी नाय. ते एका नव्या पक्षाचे लोक इंग्रजीमधला कोट बोलते ना, की पयले इग्नोर मारतील, मंग हसतील अन मंग शिरेसली घेतील. ह्ये बी तसंच हाय... ;-).

खरं सांगू का बाबा पाटिल, या अश्या मॉड फॅडां ऐवजी तुम्ही आयुर्वेदवर आधारित काही सांगाल अशी अपेक्षा होती. जसे की जवसाचा आहारात समावेश, भाज्या फळं आणि मध यांचे उपयोग. डाळीचे पाणी काही झेपले नाही, आणि स्किम मिल्क तर अजिबात नाही आवडत. डाळ ही प्रोटिनयुक्त असते. अन प्रोटिन आपल्या आहारात अतिशय गरजेचे. तसेच ताज्या भाज्या अन कोशिंबीरी, शेंगदाणे हे सगळच तुम्ही सुचवु शकत होता.

माझे थोडे वेगळेच मत आहे.. काही गाड्या खूप फ्युएल एफिशिअंट असतात. त्यांना इंधन जपून वापरायची सवय असते. काही गाड्या मात्र उधळ्या असतात. तसंच मेटेबॉलिझमचे असते असे मला वाटते. आता मेटॅबॉलिझमला उधळपट्टीची सवय कशी लावायची ते मात्र मला माहीत नाही. त्यावर विचार सध्या चालू आहे.

लैचं वेळा वजन कमी केल्यानी अनुभवाचा सल्ला देतो. रोज ५ मिनिट जॉगिंग, ५ मिनिट सायकलिंग आणि ५ मिनिट क्रॉसस्टेपर/ इलिप्टीइकल पासुन सुरुवात करायची. दररोज एक मिनिट प्रत्येक प्रकारात वाढवत जायचं. प्रत्येकी ३० मिनिट (९० मिनिट कार्डिओ रोज) प्रत्येकी पर्यंत साधारणपणे दिड महिन्यामधे पोहोचता येतं. प्रत्येक व्यायामप्रकारानंतर इलेक्ट्राल वॉटरचे २-३ घोट घ्यायचे २ ते ५ मिनिट रिलॅक्स व्हायचं (बसायचं नाही. हळु हळु इकडुन तिकडे चालायचं. लागलेला दम कमी झाला की पुढच्या व्यायाम प्रकाराकडे वळायचं) हा व्यायाम झाला की ५ मिनिट ब्रिदिंग एक्सरसाईजेस करायचे जेणेकरुन रक्तामधली ऑक्सीजनची पातळी योग्य प्रमाणात येते. गुढगेदुखी वाल्यांनी एवढा व्यायाम टाळा. त्यांनी त्याऐवजी रोज जलद चालणे (६ कि.मी. प्रतितास) हा व्यायामप्रकार दोन ४५ मिनिटांच्या सेशनमधे करुन बघा. ज्यांना दमा आणि फिट्स चा वगैरे त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय व्यायाम करु नये. हे झालं की रोज एक किंवा दोन अवयवांच मसल ट्रेनिंग करायचं. साधारणपणे ८ व्यायामप्रकार प्रत्येकी ३ सेट १०-१२-१५ च्या रिपिटेशनप्रमाणे (आपली क्षमता लक्षात घेऊन आणि ट्रेनरच्या सल्ल्याने). दोन व्यायामप्रकार करणं मला जास्त फायदेशिर दिसतं. आहार म्हणाल तर, उठल्या उठल्या एक मोठ्ठा ग्लास गरम पाणी. व्यायाम सुरु करायच्या आधी एक ग्लास कच्च गायीचं दुध+ बोर्न्व्हिटा अर्धा चमचा साखर घालुन. व्यायाम झाल्यावर १ अंड+ कॉफी+ १ प्लेट मोड आलेली कडधान्य+ १ छोटी प्लेट उपमा, पोहे किंवा एक फळ २. जेवणामधे ३ पोळ्या+ भाजी+ सॅलड आणि एक वाटी ताक हिंग घालुन (बैठं काम असणार्‍यांनी ३ ऐवजी २ पोळ्या) भात मी आवडत नाही म्हणुन खात नाही. प्यायला कोमट पाणी लिंबु पिळुन. ३. जेवण झाल्यावर तीन तास अजिबात काही खायचं नाही. ४. ३ तासानी परत एखादं फळ किंवा एखादी पोळी आणि चहा/ कॉफी वगैरे साखर घालुन. ५. नंतर परत २-३ तासाने अगदी नियमानी ३०० मि.ली. लिंबु पाणी साखर प्रमाणात घालुन ६. रात्रीचं जेवणं म्ह्णजे २ पोळ्या+ भाजी/ आमटी+ मोठी डिशभरुन परत कडधान्यं. जेवण झालं की परत कमीत कमी अर्धा तास चालुन येणं (आमच्याकडे वेगळं जायला लागत नाही, कुत्र्याला फिरवतानाचं ह्याच्याहुन जास्त चालणं होतं) ७. आठ ते साडेआठ तास झोप अनिवार्य. कमी झोपलात तर आदल्या दिवशीची झिज अजिबात भरुन येणार नाही आणि वजन कमी व्हायच्या ऐवजी अजुन मसल टिअर वगैरे दुष्परिणाम दिसतील. एवढा व्यायाम मला झेपतो म्हणुन तुम्ही थेट करायला जाउ नका. हळु हळु सुरुवात करा भले एवढ्या व्यायामापर्यंत पोचायला २ वर्ष लागली तरी चालतील. आणि आठवड्यातुन एक दिवस आळशी व्हायचं. अजिबात व्यायाम करायचा नाही. पण तोंडावर मात्र नियंत्रण ठेवायचं. मद्यपान, धुम्रपान वगैरे करणार्‍या मंडळींनी हे दोन्ही प्रकार बंद करायचे. काही अडचण आल्यास नक्की विचारा. (लोका सांगे ब्रम्हज्ञान...सद्ध्या व्यायाम बंद आहे) कॅजॅस्पॅ.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

वरच्या व्यायामांना बरोब्बर अडीच ते पावणेतीन तास लागतात. त्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाईजेस मस्ट. व्यायामानंतर अंगावर वारा बसु देउ नका. गरम पाण्यानी अंघोळ करा. २ आठवड्यामधे फरक दिसायला लागेल. एकदा गोडी लागली की स्वतःहुन व्यायाम केला जातो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सल्ला समतोल वाटतो आहे. सर्व कळतं, प्रयत्नही करतो पण सातत्य राहात नाही. पण सततच्या प्रयत्नांनी वजन कमी झालं नाही तरी आहे तिथे स्थिर आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कॅप्टन, अ‍ॅरोबिक अ‍ॅनारोबिक चं प्रमाण चुकतंय माझ्या दृष्टीने तुमच्या सल्ल्यात. वेट ट्रेनिंग अधिक असावं. तसंच कार्डिओ रोजच्यारोज करणं श्रेयस्कर नाही. वाचलेली माहिती.

In reply to by वेल्लाभट

प्रत्येकाच्या शरिराप्रमाणे बदलतं...वेट ट्रेनिंग दुय्यम ठेवायचं कारण असं की मला मसल बिल्ट अप करायची हौस नाही. मला अ‍ॅरोबिक चा फायदा जास्त होतो. एक म्हणजे शरीर हालचालींमधे रहात दुसरं म्हणजे ताजतवानं वाटतं दिवसभर\.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मला मसल बिल्ट अप करायची हौस नाही.
अतिशय चुकीचा समज. तुम्ही जो अ‍ॅरोबिक व्यायाम करता, किंवा ज्या दैनंदिन हालचाली करता त्या करायला मसल्स, जॉइंत्स, लिगामेंट्स बळकट असणे अनिवार्य आहे, त्यात हौसेचा भाग नाही. उद्या इतक्या कार्डियोला जोड पुरेशा स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंगची नसेल तर सांधे, अवयव दुखायला सुरुवात होऊ शकते. होते. असेच आपापले समज करून घेऊन त्यानुसार आपणच चांगला वाईट व्यायाम ठरवून करणारे अनेक असतात. तसं नको. तेंव्हा या गैरसमजाचा पुनर्विचार करा असा आग्रह करतो.

In reply to by वेल्लाभट

अतिशय चुकीचा समज. तुम्ही जो अ‍ॅरोबिक व्यायाम करता, किंवा ज्या दैनंदिन हालचाली करता त्या करायला मसल्स, जॉइंत्स, लिगामेंट्स बळकट असणे अनिवार्य आहे, त्यात हौसेचा भाग नाही. उद्या इतक्या कार्डियोला जोड पुरेशा स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंगची नसेल तर सांधे, अवयव दुखायला सुरुवात होऊ शकते. होते.
खरं आहे. मी मसल ट्रेनिंग पुरेश्या प्रमाणात करतो. सद्ध्या स्पायनल इंज्युरीमुळे व्यायाम बंद आहे एवढचं. नाहीतर एकमेकांना पुरक प्रमाणामधे दोन्ही व्यायामप्रकार केले जातात. दिवाळी पर्यंत पुन्हा फिट टु वर्काउट होईन त्यावेळेला परत शुन्यामधुन सुरुवात करायची आहे. :( त्यावेळेस तु म्हणतोय्स तसही करुन पाहिन. उपयोग झाला तर बेष्टचं की :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

काही दिवसांपूर्वी मी एका पुस्तकाबद्दलचा धागा टाकला होता. तो बघा. ते पुस्तक वाचा जमल्यास दिवाळी पर्यंत. ही त्यातलीच वाचीव माहिती आहे.

In reply to by वेल्लाभट

सहमत! चालणे फिरणे नंतर नंतर त्रासदायक होत गेल्याची उदाहरणे पाहिली आहेत :) स्नायू मजबूत नसतील तर काहीच शक्य नाही, त्यामुळे आधी स्नायू मजबूत करून मगच फिरणे, धावणे प्रकार सुरु :D (अर्थात, नॉर्मली सगळ्यांचे स्नायू चालण्यासाठी मजबूत असतातच :) )

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कच्च दुध घेणे अतिशय धोकादायक आहे. दुधात क्षय रोगाचे विषाणू असू शकतात, जे तापविल्यानंतर मरतात. त्यामुळे कच्चे नकोच. गायीचे दुध घेतांना ती देशी (खोंड असलेली) गाय आहे हे तपासून पहा. आजकाल पिशवीत जे दुध मिळते ते जर्शीचे असते, ते अतिशय हानिकारक आहे ज्याने ऑटीझम, कॅन्सर, मधुमेह सारखे आजार सुरु होणे कारणीभूत ठरत आहे. त्यापेक्षा म्हशीचे तापवून साय काढलेले दुध कधीही चांगले!

In reply to by आयुर्हित

कच्चं दुध म्हणजे पाश्चराईज्ड हो. पिशवी फोडल्यावर गारच्या गार प्यायचं. मला उकळवलेल्या दुधाचा वास सहन होत नाही त्यामुळे मी कच्च पितो.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

काही वेळेला मध्येच वीज जाते, काहीवेळेला मशीन खराब झाले आहे म्हणून दुरुस्तीला बाहेर काढले किंवा बायपास केले असण्याची शक्यता जास्त असते. काही ठिकाणी दुध घालणारेच त्यांच्या घरात दुध बनवून छापील पिशव्यांत पॅकिंग करतात. बऱ्याच दुधसंकलन/पॅकिंग केंद्रात फक्त "डिग्री"(density) सोडले तर काहीही चेक होत नसते! भारतात FDA आहे कि नाही असा मोठ्ठा प्रश्न आहेच. असलाच तर त्यांची पद्धतीही माहित असेलच!!

In reply to by आयुर्हित

काही वेळेला मध्येच वीज जाते, काहीवेळेला मशीन खराब झाले आहे म्हणून दुरुस्तीला बाहेर काढले किंवा बायपास केले असण्याची शक्यता जास्त असते. काही ठिकाणी दुध घालणारेच त्यांच्या घरात दुध बनवून छापील पिशव्यांत पॅकिंग करतात. बऱ्याच दुधसंकलन/पॅकिंग केंद्रात फक्त "डिग्री"(density) सोडले तर काहीही चेक होत नसते! भारतात FDA आहे कि नाही असा मोठ्ठा प्रश्न आहेच. असलाच तर त्यांची पद्धतीही माहित असेलच!!
खरंय!! एक म्हैस घ्यायचा विचार करतोय!!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कोणी गाय घेतलीत तर सांगा, म्हशीचं दूध पिणारी माणसं पण म्हशीसारखी आळशी होतात असं दिवकरकाकू एका पुस्तकात म्हणून गेल्यात.

प्रचंड ईच्छा होत आहे कि दिलेलं डाएट आणि थोडा माफक व्यायाम करावा. आरशात पोटाचा घेर (स्वःताचचं) पाहिला कि प्रचंड लाज वाटते. ईच्छा खुप आहे पण सातत्याने करण्यात कमी पडतो.

वजन कमी करणे, पोटाचा घेर कमी करणे, कोलेस्टेरॉल कमी करणे, acidity,triglycerides वगैरे वर मात करणे तसेच डायबेटीस पूर्वस्थितीतून बाहेर पडणे यासाठी डॉ जगन्नाथ दिक्षितांचा एक व्हिडीओ लिंक देत आहे. पहिली ३० मिनिटे प्रास्ताविक झाल्यावर भाषण सुरू होते. ते टाळा असे सुचवत नसून काहीजण कंटाळून व्हिडिओच बंद करतात म्हणून सांगतो आहे. भाषणाची लिंक\a> किंवा ही लींक नवीन पानावर काॅपी पेस्ट करा.https://www.youtube.com/watch?v=edKaI5gxaNQ हे भाषण कै.श्रीकांत जिचकारांच्या या आॅडीओवर आधारीत आहे. किंवा ही लींक नवीन पानावर काॅपी पेस्ट करा.https://www.youtube.com/watch?v=8-kw3hGU मुख्य म्हणजे हेच खा किंवा हे खाऊ नका अशी बंधने नाहीत. मटण मासे तूप लोणी सगळ चालते. २८००० जण सध्या या पध्दतीचा फायदा घेत आहेत.