Skip to main content

ते पंधरा लाख !

लेखक सुधीर मुतालीक यांनी सोमवार, 04/06/2018 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक अकौंटमध्ये पंधरा लाख जमा करू अशी घोषणा झाली आणि जणू प्रत्येक भारतीय कधी एकदा तो एसेमेस आपल्या मोबाईलवर येतोय याची डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता. दोन तीन वर्षे झाले तरी असे काही झाले नाही हे जाणवून कळवळलेल्या जनसमुदायांनी " फेकतोय साला" अशी ओरड सुरु केली. माझ्या मते ते पंधरा लाख प्रत्येकाच्या अकौंटमध्ये कधीच जमा झाले आहेत. कल्पना अशी असेल की ते पैसे प्रत्यक्षात जमा व्हावेत आणि त्यातून आपण गाडी खरेदी करावी वा माडी बांधावी तर तसे फुकटच्या पाकट का बरे व्हावे आणि कशासाठी ? हे समजावून सांगण्याची गरज असू शकते. पण समजावून सांगितलं नाही हे ही ठीकच आहे. कारण मग ज्यांचा भ्रमनिरासच झाला आहे किंवा ज्यांना पोटदुखीच आहे त्यांनी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मधल्या " सोन्याच्या टोपीची" आठवण झाली असती आणि फेकू ऐवजी नाम्या म्हणून टिंगल केली असती, पण टिंगल चुकलीनसती. वैफल्य वगैरे. आपल्या अकाऊंट मध्ये पंधरा लाखच काय कोट्यवधी रुपये या सरकारने जमा केले आहेत. फक्त एकच म्हंजे उदाहरणार्थ : मागील सरकारने एकूण पेट्रोल खरेदीचे फक्त ५५ % बिल इराणला अदा केले होते. उर्वरित बिलाचे कर्ज देशावर म्हंजे तुमच्या माझ्या डोक्यावर २०१४ मध्ये आणि अलीकडेपर्यंत होते. आजच्या आकड्या नुसार ही रक्कम होती पाच हजार करोड रुपये. ही रक्कम आपल्या डोक्यावर देय होती. ती रक्कम एक टाकी अदा भारत सरकारने अलीकडे केली आहे. आता फक्त एका व्यवहाराने पाच हजार करोड भागिले एकशे तीस करोड एवढी रक्कम तुमच्या माझ्या डोक्यावरून कर्ज कमी झाले, म्हणजे खात्यात जमा झाली आहे. दर डोई पंधरा लाख कधीच वसूल झाले होते. असे अनेक व्यवहार आहेत ज्याचा स्वतंत्र अभ्यास करता येईल. आणखी उदाहरणार्थ नोटबंदी नंतर सुमारे अडीच लाख कंपन्या व्यवहारात गडबड जाणवल्यामुळे बंद करायचे आदेश सरकारने दिले. त्यांची बॅंकांमधली सुमारे तेहतीस हजार कोटी रुपयांची ठेव ही आजवर कुणीच व्यक्ती वा कंपनी मागायला आली नाही, म्हंजे क्लेम वगैरे केला नाही. ती संपुर्ण रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल. शिवाय अशा सर्व ठेवींचा स्रोत अज्ञात ठरवून ती ठेवणाऱ्या व्यक्ती वा कंपनी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश इन्कम टॅक्सवाल्याना दिले आहेत. दंडाची वसुली त्यातून जी होईल ती रक्कम आणखी काहीपट असेल. काय पंधरा लाखाचं कौतुक करत बसलीय जनता !

वाचने 65649
प्रतिक्रिया 264

प्रतिक्रिया

In reply to by नाखु

जो तो स्वतः:चेच पहात असतो. काँग्रेसने रस्ते केले , एम्स काढले , पण मंदिर बांधले नाही ना ? मग काँग्रेस ब्लॅक लिस्टमध्ये सगळे असेच करत असतात . त्यात काय चुकीचेही नाही.

In reply to by manguu@mail.com

काँग्रेसने रस्ते केले , एम्स काढले LOL पहील AIMS साल १९५६ दिल्लीला त्पानंतर ५ AIMS ऐकाच २०१२ सालात लोकांच्या डोळ्यात धुळ झोकण्यासाठी !! पण भाजप सरकारने २०१६ सालात दोन AIMS निर्माण केले !! ईंग्रजांनी १९४७ पर्यंत ९४००० किमीची रेल्वे लाईन टाकली त्यांच्या स्वतःच्या ब्रिटीश सरकारच्या पैश्यावर !! पण कॉंग्रेसने १९४७ नंतर ६५ वर्षांत फक्त ११००० किमी रेल्वे लाईन टाकली ? २०१४ पुर्वी महामार्ग बनवण्याचा वेग होता २ ते ३ किमी/दिवस आणी आता २० किमी/दिवस .

In reply to by डँबिस००७

इंग्रजानी आधीच रेल्वे निर्माण केली होती , ती मोडून पुन्हा नव्याने सुरू करायला हवी होती ? एम्स म्हणजे दिल्लीचे एम्स वाजपेयींनी कुठल्या एम्स काढल्या म्हणे ?

In reply to by manguu@mail.com

अगोदरच्या काळात म्हणजे ७० वर्षात १५००० किमी रेल्वे मार्ग बांधले गेले. २०१४ पासून त्याला जास्त वेग आला हि वस्तुस्थिती आहे. परंतू सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रेल्वे बजेटच काढून टाकले आणि ते मुख्य अर्थ संकल्पात जोडून घेतले. यामुळे आता रेल्वे मंत्री पद हे फारसे प्रतिष्ठेचे राहिलेले नाही. यामुळे स्वतःच्या मतदार संघाचंच काम करायचे आणि बाकी रेल्वेला उन्हात उभे करायचे हे वर्षानुवर्षे लहान पक्षांनी चालवलेले धोरण आता रद्दबातल झाले आहे. लालू प्रसाद यांनी आपल्या मतदार संघ मधेपुरा येथे रेल्वे इंजिनांचा कारखाना आणला मग त्याचा मुख्य रेळे मार्गाशी संपर्क नसला तरी चालेल. ए बी एघनी खान चौधरी यांनी दिल्ली कलकत्त्यापासून पासून आपल्या मालदा मतदारसंघापर्यंत नव्या गाड्या चालू केल्या मग त्यात प्रवासी असोत कि नसोत. ममता बॅनर्जी यांनी असाच सवता सुभा राबवला. या प्रकरणात रेल्वेची भाडेवाढ १५ वर्षात झालीच नाही. भारतीय रेल्वे जगात सर्वात स्वस्त आहे फक्त ३६ पैसे एका किमीला. रिक्षा एक किमी ला १० रुपये घेते. एस टी बस रुपये साडे सहा घेते तर शिवनेरी १५ रुपये किमी ला. यामुळे रेल्वे सतत तोट्यात चालत आहे. मग हा तोटा भरून काढायला मालवाहतुकीवर भाडे वाढवले. त्यामुळे माल रस्त्यावरून जायला लागला आणि रेल्वे परत तोट्यातच राहिली. २०१६ मध्ये श्री सुरेश प्रभू यांनी राजधानी शताब्दी सारख्या आरामदायी गाडयांची भाडेवाढ केली त्यावर विरोधी पक्षानी केवढा गदारोळ केला होता याची आठवण झाली.https://www.firstpost.com/politics/railway-passenger-fare-hike-why-the-… त्यामुळे नंतर झालेल्या अपघातामुळे श्री सुरेश प्रभुना मंत्रालय सोडावे लागले यानंतर परत रेल्वे भाडेवाढ करून राजकीय हाराकिरी करण्याची तसदी पुढच्या मंत्र्यांनी घेतली नाही आणि श्री जेटलींनी ते मंत्रिमंडळ शक्तिहीन करून टाकले यामुळे आता रेलवे ला हळू हळू भाडेवाढ करून तोट्यात चालणारी रेल्वे फायद्यात आणण्याचं मार्ग चालू तर केला आहे. परंतु पुढच्या निवडणूक वर्षात हि भाडेवाढ करणे भाजपाला परवडणार नाही असेच दृश्य आहे.

In reply to by सुबोध खरे

त्यामुळे नंतर झालेल्या अपघातामुळे श्री सुरेश प्रभुना मंत्रालय सोडावे लागले>>> ==>> अपघात हे निम्मित झाले, बुलेट ट्रेन ला विरोध केला म्हणून प्रभूंना नारळ दिला असे ऐकण्यात आले होते. खरे खोटे वरचेच जाणो! === पण प्रभूंनी लोकांच्या लक्ष्यात राहील असे काम चालू केले होते, पण जनता आपली कमनशिबी आहे ना ! काय करणार.

In reply to by विशुमित

अपघात हे निम्मित झाले, बुलेट ट्रेन ला विरोध केला म्हणून प्रभूंना नारळ दिला असे ऐकण्यात आले होते. खरे खोटे वरचेच जाणो! जालावर खोदकाम केले असता फक्त "श्री राज ठाकरे" तसं म्हणताना आढळले आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हा एक प्रश्नच आहे. http://www.dnaindia.com/mumbai/report-live-updates-raj-thackeray-mns-mu… परंतु बाकीचे बरेचसे दुवे श्री सुरेश प्रभू बुलेट ट्रेनचे समर्थनच करताना दिसतात. मुळात जर ते बुलेट ट्रेनला विरोध करत असते तर या शिवसेनेने अडगळीत टाकलेल्या या गुणी नेत्याला शोधून त्याला इतके महत्त्वाचे खाते देण्याचे वर त्याला आंध्र प्रदेशातून राज्यसभेवर पाठवायचे मोदी याना काहि कारण असावे असे वाटत नाही. त्यांना वाणिज्य आणि उद्योग हे दुसरे महत्त्वाचे खाते दिले गेले आहे कारण रेल्वे मंत्रालयाचे महत्त्व कमी करायचा बेत ठरला असावा. https://www.ndtv.com/india-news/is-there-deliberate-misinformation-on-b…

In reply to by नाखु

ज्या गोष्टी माझ्याशी संबंधित आहे त्या मी बघणार.. सामान्य नैसर्गिक तत्व आहे हे.. मोदींनी कोणत्या खेड्यात कुठे वीज आणली असेल. पण त्या खेडेगावात ना मी राहतो ना माझा कुणी नाते वाईक तर त्याबद्दल मी कशाला कौतूक करु. थोडक्यात काय तर प्रत्येकच वर्गासाठी काहीतरी करायला पाहिजे ना.. सब का साथ सब का विकास असं बोलले होते ना मोदी. शहरी मध्यम/उच्च मध्यम वर्गाकरिता काही केलेलं दिसत नाहीये.. आयकर कमी केला असता तरी काहीतरी केलं असं म्हंटलं असतं. असो. अजून एक वर्ष आहे. या वर्गाकरिता काही करता येतं का ते बघावं मोदी सरकारने..

In reply to by मराठी कथालेखक

भले शाबास ! मंग गावाकड्च्या लोकांन्नी त्येंच्यापुरत बगून मतदान क्येलं (त्येंची संक्या जास्त है बर्का ;) ) आनि तुमच्यासारक्या शहरात्ल्या लोकांला बांदावर बशिवलं तर मंग बोंबा मारू नका बर्का. :) आशी शिकलीसवर्ली मान्सं त्येला काय म्हंतात त्ये "वैयक्तिक स्वार्थ" समोर ठ्येवून त्ये आपलं "कॉमन गुड" इसराया लागली की देश्याचे चांगभलं व्हनारंच बगा... कारन याच गोष्टीचा राजकारनी फाय्दा घेत्यात नव्हं. ह्ये आपलं आपलं अडानी मत. तुमी म्होटी लोकं ज्यास्त शानी असताल. आता म्हारास्ट्रात बी मतं जमवाय्ला तामीलनाडू वानी शेरातल्या परत्येकाला येक येक कलर टीवी, मिस्कर, साडी, धोतर... नव्हं, नव्हं... जीनची पँट देयाला पायज्ये, नाय्का ?!

In reply to by मराठी कथालेखक

खरे आहे ! म्हणूनच म्हणतात की लोकशाहीत, "यथा प्रजा तथा राजा" असे असते. स्वार्थी लोक स्थार्थी नेता निवडून देतात... किंबहुना स्वार्थी लोकांची नाडी ओळखून नेता स्वार्थी निवडून येतो व "आवळा देऊन कोहळा काढणे" ही म्हण सार्थ करतो. अश्या परिस्थितीत, "आम्ही निवडून दिलेल्या नेत्यानं आमचं भलं करण्या ऐवजी स्वतःचंच भलं केलं" ही बोंब मारायचा हक्क लोकांना कसा असेल ? !

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मराठी कथालेखका, अरे , मोदी सरकारची धोरणे,योजना ह्या मुख्यत्वे गरीब वर्गासाठी बनवल्या आहेत, राबवल्या जात आहेत. तेव्हा प्रत्येक योजनेचा फायदा हा प्रत्येक नागरिकास मिळेलच असे नाही
माईसाहेब कुरसूंदीकर , अगं तू म्हणतेस ते खरंच आहे. पण ज्याला फायदा मिळणार नाही तो वर्ग निवडणूकीत पाठिंबा देईल याची शक्यता कमीच.

In reply to by गामा पैलवान

त्यामुळे तुम्ही आश्चर्य व्यक्त केलं की तुम्ही मोदीद्वेष्टे आहात यावर शिक्कामोर्तब होतं
ना मी मोदीप्रेमी आहे ना मोदीद्वेष्टा.. माझ्यासाठी मोदी एक पंतप्रधान आहे जसे आतापर्यंत अनेक पंतप्रधान होवून गेलेत. बाकी सरकारच्या प्रत्येक योजनेचं आणि निर्णयाचं श्रेय मोदीना एकट्याला देण्याच्या मोदीभक्तांच्या खास सवयीमुळे भाजपातील इतर मंत्री /दिग्गज नेते दुखावले गेलेत आणि परिणामी २०१९ मध्ये स्पष्ट बहूमतापासून भाजप दूर राहिला तर मात्र मी आश्चर्य व्यक्त करणार नाही.

In reply to by मराठी कथालेखक

पण ज्याला फायदा मिळणार नाही तो वर्ग निवडणूकीत पाठिंबा देईल याची शक्यता कमीच
फायदा फक्त आर्थिकच नसतो. उ.दा. रेल्वेची सेवा सुधारली, स्थानके स्वच्छ असली, बसस्थानकांवर पिचकार्या मारणे बंद झाले तर अनेक लोकांना आनंद होईल. आजूबाजुला गरीबीत राहणार्या अनेकांचे जीवनमान सुधारताना दिसले तर (निदान आमच्यासारख्यांना तरी) आनंद होतो. नोटाबंदीमुळे लोकांच्या हालाला पारावर उरला नाही.. आता जिंकणे कठीण आहे असे चित्र रंगवले गेले पण उत्तर प्रदेशात भाजपावाले जिंकले.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

फायदा फक्त आर्थिकच नसतो
मान्य. पण इतरही फायदे विशेष दिसत नाहीयेत. उदा : स्वच्छ भारत - मी राहतो त्या पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसते, शहर विद्रुप करणार्‍यांवर काही कारवाई होताना दिसत नाही. आता सगळ्याच बाबी केंद्राच्या अखत्यारीत येत नाहीत ह्याची मला कल्पना आहे म्हणून इथे सगळे मुद्दे लिहित नाही. रेल्वे - सुमारे एक दीड महिन्यापुर्वी एक पाच-सव्वा पाच तासांचा रेल्वे प्रवास केला, पण या प्रवासाला १ तास ४५ मिनिटे विलंब झाला तर रेल्वे सुधारली असं कसं म्हणू मी ? नाही म्हणायला कल्याण स्टेशनवरची स्वच्छता वाखाणण्याजोगी होती हे पण मान्य करतो. कायदा व सुव्यवस्था - ही बाब प्रामुख्याने राज्याच्या अखत्यारीत येते (कारण पोलिस दल राज्याचे असते) पण तरी केंद्र काहीच प्रभाव टाकू शकत नाही का ? तसा काही प्रभाव टाकून कायदा व सुव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला असता तर मला आनंद वाटला असता. माझ्या अपेक्षा फार साध्या आहेत - मध्यरात्री फटाके वाजवणार्‍यांना पुरता धाक बसेल अशी कारवाई व्हावी, रस्त्यातून उलट्या दिशेने वाहन चालवणार्‍यांचा बंदोबस्त व्हावा, रस्त्यातील अतिक्रमणे निघून जावी , मोठे प्रदूषण करणार्‍या रिक्षा व इतर वाहनांवर कारवाई व्हावी. रस्ते - हा विषय सुद्धा महापालिका / राज्याच्या अखत्यारीत आहे, पण तरी केंद्राने प्रभाव टाकावा. मी हिंजवडीत नोकरी करतो. हिंजवडी भागातील वाहतू़क कोंडी सर्वश्रुत आहेच. त्या कोंडीत कितीतरी वेळ आणि इंधन वाया जातेच पण प्रदूषण वाढते, माझा प्रदूषणाशी संपर्क अधिक वेळ राहतो. मी वर्षाला मोठा टॅक्स भरतो, बदल्यात माझी सरकारकडून इतकीच अपेक्षा आहे की मला माझ्या कामाच्या ठिकाणी सहज जाता यावे आणि रात्री माझ्या घरात सुखाने झोपता यावे.

In reply to by मराठी कथालेखक

प्लिज नका देऊ मत भाजप ला , तुम्ही जर भाजप ला मत दिले तर तुमच्या अपेक्षा पूर्ण करता न आल्यामूळे भाजपचे मंत्रिमंडळ व कार्यकर्त्यांना फाशी घ्यायला झाडे कमी पडतील .

In reply to by सोमनाथ खांदवे

बरं आजोबा !! [मिपावर वावरताना एकमेकांच्या वयाचा काहीही अंदाज नसताना मला उगाच 'काका' म्हणण्यात मला तुमचा खोडसाळपणा दिसतो, त्याची मी केलेली परतफेड. असो ]

In reply to by मराठी कथालेखक

जशी न केलेल्या अपेक्षांची आपली यादी आहे तर केलेल्या किंवा आपल्याला ठळकपणे दिसून येणार्या कामांची यादी आहे का? नसल्यास ते कळवणे पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास असलेला मिपाकर नाखु

In reply to by नाखु

२०१४ च्या पुढे दिसणारे बदल .......आता तरी काही आठवत नाहीयेत.. पण आठवलेत तर नक्की लिहिन कारण मी मोदी वा भाजपद्वेष्टा नाहीये (आणि भक्तपण नाहीये !!) एक दोन गोष्टी मी वर मान्य केल्या आहेतच - जसे नोटाबंदी नंतरच्या सुरवातीच्या त्रासानंतर आता काही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे पदरात पडत आहेत.

In reply to by मराठी कथालेखक

मकले साहेब, जर सरकारी योजनांचा प्रत्येकाला होणाऱ्या फायद्यांचा विचार करायचा झाला तर प्रत्येक योजना प्रत्येक व्यक्तीलाच नव्हे तर समाजातल्या प्रत्येक घटकांनाही फायदेशीर असणे शक्य नाही. उदा. मदरश्यांना लागू होणाऱ्या योजना समस्त हिंदूंना काही कामाच्या नाहीत. उज्ज्वला योजना शहरी लोकांच्या उपयोगाची नाही कारण टारगेट ग्रुप वेगळा आहे. सगळ्या ग्राहकांना लाभ व्हावा अशी GST करप्रणाली लागू केली गेली. पण त्यावर व्यापारी वर्ग नाराज झाला, तसेच बऱ्याच व्यावसायिकांनी, उदा. रेस्टॉरंटवाले, कर कमी झाल्याने होणारा फायदा पुढे ग्राहकापर्यंत पोचवला नाही. प्रत्येक जण आपापला स्वार्थ बघतोय याचं हे उदाहरण नाही का? इथे तुम्हीही फक्त "मला काय फायदा झाला" याचाच विचार करताय. पेट्रोल २-५ रुपयाने महाग झालं पण का झालं? अजूनही सबसिडी देऊन किमती कमी ठेवाव्या असं वाटतं का? कर कमी करायचं म्हणाल तर राज्यस्तरीय कर पण आहेत. बिगरभाजप राज्य कर कमी करून इतर राज्यांवर आणि केंद्र सरकारवर दबाव का निर्माण करत नाहीत? माझ्या फायद्याची एकही योजना जर का राबवली गेली नसेल तर इतरांच्या फायद्याने खूष होवून मी सरकारचे गुणगान करणार नाही योजना म्हणजे अगदी शेतकरी कर्ज माफी योजनेसारखी एखादी योजना आयटी मधील आणि त्यातही हिंजवडीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी पाहिजे का? इन्फ्रास्ट्रक्चर मधील सुधारणा, नोटबंदी/ जीएसटी मुळे घरांच्या कमी झालेल्या किंवा स्टेबल झालेल्या किमती आणि त्याचबरोबर गृहकर्जाचे कमी झालेले व्याजदर, तसेच रेरा सारख्या कायद्यामुळे ग्राहकांना मिळालेले संरक्षण - यापैकी काहीच तुम्हाला फायद्याचं नाहीये? गुणगान करावं असं म्हणणं नाही पण नावं पण ठेवण्यासारखं काय आहे ते दाखवून द्या. स्थानिक गोष्टींमध्ये मोदी लक्ष घालू शकणार आहेत का? तुमच्या शहरातील/ गावातील/ विभागातील स्वच्छतेसाठी तिथली जनता आणि मुनिसिपालिटी जबाबदार नाही का? इथे तुम्ही नुसती योजना चालू केली आणि पुढे स्वच्छता झाली नाही/ राहिली नाही म्हणून मोदींना दोष देताय पण त्याचप्रमाणे कित्येक योजना चालू करून त्या नीट न राबवणारी, किंबहुना भ्रष्टाचार करणारी, काँग्रेस का बरं दोषी नाही? त्याच योजना थोड्या सुधारणा करून मोदींनी नीट राबवून दाखवल्या तर त्याचे श्रेय न देता वर जुन्याच "नावाच्या" योजना राबवल्या म्हणून नावं ठेवली जातात? जनता म्हणून आपले काही कर्तव्य आहे याची जाणीव का नाही? परदेशात फिरण्यासाठी म्हणून गेलेला भारतीय सुद्धा कचरा करत नाही कारण जबर दंड असतो, अमेरिकेत रस्त्यांवर कचरा करणाऱ्यास $१००० दंड आहे असे बोर्ड लावलेले असतात. आपल्या इथे रु. १००० दंड लावला तरी लोक सरकारला नावं ठेवणार आणि त्यातही अजून एक भ्रष्टाचाराची संधी शोधणार.

In reply to by ट्रेड मार्क

माफ करा तुम्हाला माझा प्रतिसाद नीट कळालेला दिसत नाहीये.
रत्येक जण आपापला स्वार्थ बघतोय याचं हे उदाहरण नाही का?
खरी गोष्ट आहे, प्रत्येक जण आपापला स्वार्थ बघणार आणि ते अगदी नैसर्गिक आहे. दुसर्‍याच ओरबाडून मला काही नकोय... पण मलाही काहीतरी हवंय इतकं नक्की.
योजना म्हणजे अगदी शेतकरी कर्ज माफी योजनेसारखी एखादी योजना आयटी मधील आणि त्यातही हिंजवडीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी पाहिजे का?
मी वर म्हणालोय की मला अर्थिक फायद्यांची विशेष अपेक्षा नाही. मी कमावतो आहेच. पण माझे जीवन सुकर व्हावे यासाठी केंद्रातील सरकार काही करु शकते का ?
इन्फ्रास्ट्रक्चर मधील सुधारणा
दिसत नाहीयेत.. मी वर रेल्वेचे उदाहरण दिलेय. गाड्यांना होणारा विलंब यामुळे रेल्वे बदनाम आहे, यात सुधारणा केली का ? मला ५:१५ तासाच्या प्रवासाला १:४५ तास विलंब झाला (एप्रिल २०१८). ही बाब तर केंद्राच्याच अखत्यारीत येते ना ? मी याचा दोष मोदी सरकारलाच देतो आहे असे नाही. पण गौरव करावा असेही काही दिसत नाही. हिंजवडितल्या होणार्‍या वाहतूक कोंडीचा मी वर उल्लेख केलाय. मान्य की ही बाब केंद्राच्या थेट अखत्यारीत येत नाही. पण या ठिकाणी लाखो लोक काम करतात त्यातून कित्येक कोटींचा महसूल केंद्रास मिळत असणार (बहूतेक सगळ्या कंपन्या नफ्यात आहेत, त्यांच्या नफ्यावर मिळणारा कंपनी कर, आम्हा कर्मचार्‍यांचा आयकर ई) तर असे असताना केंद्राने या बाबतीत लक्ष घातले असते , आमचा रोजचा प्रवास थोडा सुखकर झाला असता तर नक्कीच काही कौतूक केले असते. आता मेट्रोचा घाट घातला आहे. त्याचा कितपत उपयोग होईल ते माहित नाही. मी नकारात्मक दृष्टीकोन ठेवत नाही , कदाचित खूप चांगली च्यवस्था असू शकेल ती. पण भविष्यात कार्यान्वित होणार्‍या गोष्टीसाठी मी आताच कौतुक व निंदा दोन्ही करणार नाही.
नोटबंदी/ जीएसटी मुळे घरांच्या कमी झालेल्या किंवा स्टेबल झालेल्या किमती
याबद्दल नक्की माहित नाही. तसेही माझे २०१० मध्ये घर खरेदी करुन झाले आता सध्या तरी काही विचार नाही म्हणून घरांच्या किमती बघितल्या नाहीत.
त्याचबरोबर गृहकर्जाचे कमी झालेले व्याजदर,
काही प्रमाणात खरंय. पण याचं नेमकं श्रेय कुणाला द्यायचं ते मला माहित नाहि. मी अर्थतज्ञ नाही. अधिक अर्थशास्त्रीय चर्चा न करता तुम्ही म्हणत असाल तर ते श्रेय मोदींचे म्हणू हवं तर. पण हे किती दीर्घकाळ टिकणार ? माझ्या गृहकर्जाचे काही दर मी खाली नमूद करतो आहे ते पहा. येवू घातलेला पुढचा दरही यात आहे. व्याजदर पुन्हा वाढायला सुरवात होते आहे , पुन्हा ते २०१४ च्या पातळीवर जातील काय ? 01-DEC-2013 - 10.75 01-MAR-2014 - 10.25 01-JUN-2015 - 10.05 01-JUL-2015- 9.90 01-JAN-2016 - 9.65 01-APR-2017 - 9.50 01-APR-2018 - 9.70 01-JUL-2018 - 9.80
इथे तुम्ही नुसती योजना चालू केली आणि पुढे स्वच्छता झाली नाही/ राहिली नाही म्हणून मोदींना दोष देताय पण त्याचप्रमाणे कित्येक योजना चालू करून त्या नीट न राबवणारी, किंबहुना भ्रष्टाचार करणारी, काँग्रेस का बरं दोषी नाही?
नाही. मी मोदींना दोष देत नाहीये. पण त्यांचा गौरव करावा असेही काही दिसत नाही ना. आणि काँग्रेस दोषी नाही असंही मी म्हणत नाही. पण मग काँग्रेसच्या पातळीचं काम भाजप करत असेल तर विशेष गौरव तरी का करावा याचं उत्तर देवू शकता का ?
त्याच योजना थोड्या सुधारणा करून मोदींनी नीट राबवून दाखवल्या तर त्याचे श्रेय न देता वर जुन्याच "नावाच्या" योजना राबवल्या म्हणून नावं ठेवली जातात?
माझ्या प्रतिसादात हे कुठे दिसलं ? कोणतीही योजना कोणत्याही नावानं राबवा त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. मी केवळ वस्तुनिष्ठ विचार करतो.
परदेशात फिरण्यासाठी म्हणून गेलेला भारतीय सुद्धा कचरा करत नाही कारण जबर दंड असतो, अमेरिकेत रस्त्यांवर कचरा करणाऱ्यास $१००० दंड आहे असे बोर्ड लावलेले असतात. आपल्या इथे रु. १००० दंड लावला तरी लोक सरकारला नावं ठेवणार आणि त्यातही अजून एक भ्रष्टाचाराची संधी शोधणार.
सत्तेचा मोह असणार्‍या सरकारांना लोक नाव ठेवणार याची भिती असते आणि ते लोकधार्जिणे निर्णय घेत राहतात, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ठोस पाउले उचलावीत.

In reply to by मराठी कथालेखक

एका अनुभवावरून मत बनवून टाकलं का? मी जेव्हा लांब पल्ल्याच्या गाडीने प्रवास केला तेव्हा ट्रेन्स अगदी वेळेवर होत्या. एवढंच नव्हे तर ७-८ तासाच्या प्रवासात २ वेळा तरी रेल्वेचे लोक स्वतःहून येऊन डबा पुसून गेले. रेल्वे स्थानके आणि डबे सुद्धा बरेच स्वच्छ दिसले. हिंजवडीचं म्हणाल तर मी स्वतः सुद्धा हिंजवडीला रोज प्रवास केलेला आहे, त्यालाही ७-८ वर्ष होऊन गेली. माझ्या मते ट्राफिक जॅमला लोकही तितकेच जबाबदार आहेत. प्रत्येक चारचाकीत एक माणूस दिसतो, कारपूल करावा किंवा कंपनीच्या बस वापराव्या किंवा जाण्यायेण्याच्या वेळा थोड्या बदलाव्या असा कोणी विचार करत नाही. मी हिंजवडीत असताना कंपन्यांनी स्वतः पुढाकार घेऊन इन आऊट टाईमिंग्स बदलले होते, ते सध्या बारगळलं का? मी मोदींना दोष देत नाहीये. पण त्यांचा गौरव करावा असेही काही दिसत नाही ना एकूण तुमच्या प्रतिसादांवरून तुम्ही फारच छोट्या परिघात विचार करताय असं वाटतं, कदाचित तुम्ही म्हणताय तसं मला तुमचा प्रतिसाद कळला नसावा. तुमच्या माझ्या दोष देण्याने किंवा गौरव करण्याने मोदींना काही फरक पडेल असं वाटत नाही. एवढंच काय २०१९ मध्ये पंतप्रधान पद नाही मिळालं तरी त्यांना काही फरक पडेल असं मला तरी वाटत नाही. काँग्रेसच्या पातळीचं काम भाजप करत असेल तर एका ट्रेनच्या प्रवासावरून आणि तुमच्या येणाजाण्याच्या रस्त्यावरून तुम्ही मत बनवताय. यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवताय. पण दुसरीकडे व्याजदर कमी झाले त्याचं श्रेय मात्र मोदी सरकारला नाही देत आणि म्हणताय "मी केवळ वस्तुनिष्ठ विचार करतो."! शहरांतर्गत रस्ते कोणाच्या अखत्यारीत येतात हे जरा बघा. "रेपो रेट" हे शब्द कधीतरी ऐकले असतील अशी आशा करतो, हे काय आहे आणि त्याचा ग्राहक कर्जाशी काय संबंध असतो हे जरा गुगलून बघा. गृहकर्ज का स्वस्त झालं हे इथे वाचा आणि इथे पण वाचा. दुसऱ्या बाजूने विचार केला तर कर्जाचे दर आणि ठेवींचे दर एक एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे ठेवींवर १०% आणि कर्ज मात्र ८% असं होऊ शकत नाही. म्हणून कर्जाचे दर कमी करायचे झाले तर ठेवींचे दर पण कमी करायला लागणार. म्हणजे मग ठेवीदार, मुख्यतः ज्येष्ठ नागरिक रागावणार. हा तिढा कसा सोडवायचा सांगा बघू. सत्तेचा मोह असणार्‍या सरकारांना लोक नाव ठेवणार याची भिती असते आणि ते लोकधार्जिणे निर्णय घेत राहतात माझ्या मते तरी निश्चलीकरण आणि जीएसटी या निर्णयांसाठी मोदींना सगळीकडून शिव्या बसल्या आहेत. छोटे आणि मध्यम व्यापारी, जे मोदींचे समर्थक मानले जात होते, त्या लोकांना या दोन्ही निर्णयांचा फटका बसला. निश्चलीकरणात सामान्य माणसाचे पण हाल झाले असं म्हणतात. मग हा सत्तेचा मोह आहे म्हणता येईल का? त्यापुढे जाऊन भ्रष्टाचार कमी करण्यासाठी डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर सारख्या योजना आग्रहाने राबवल्या. त्यामुळे मधल्यामध्ये पैसे खाणारे लोक नाराज झाले. पेट्रोल/ डिझेल वरील सबसिडी बंद करून ते जागतिक दरांशी संलग्न केले, त्यामुळे जगभरात कच्च्या तेलाचे दर वाढल्यावर भारतातले पण दर वाढले. ते वाढायला लागल्याबरोबर लगेच मोदींवर टीका झाली. कर हा त्यातला मोठा भाग आहे आणि ते कमी करावेत अशी मागणी होते आहे. पण त्यात राज्यस्तरीय करांचा पण मोठा सहभाग आहे. जर राज्य तयार नसतील तर काय करायचं?

In reply to by ट्रेड मार्क

एका अनुभवावरून मत बनवून टाकलं का?
आता ४ वर्षांत मी एकदाच ट्रेनने फिरलो तर एकच अनुभव येणार ना ? एक असेल तर तो मोजायचा नसतो का ? बरं ट्रेनला विलंब व्हायला काही तात्कालिक कारणही दिसत नव्हते (खराब हवामान, अपघात ई) आणि काही मित्रांच्या सांगण्यावरुन हे ही कळले की हे ट्रेन नेहमीच अशी धावते ..म्हणजे मला आलेला अनुभव अगदीच चुकून आला होता असंही नाही ना.
एका ट्रेनच्या प्रवासावरून आणि तुमच्या येणाजाण्याच्या रस्त्यावरून तुम्ही मत बनवताय.
बरं मग ? यावरुन मत बनवू नये असा नियम आहे का ? कारण बाकी गोष्टी अर्थिक आहेत ज्यांचा केंद्राशी संबंध आहे (पेट्रोल दरवाढ , आयकर कमी होणे ई) पण अर्थिक लाभाची अपेक्षा ठेवत नाही. केंद्र गरीबांसाठी काहीतरी करत असल्याने नोकरदार मध्यमवर्गाला अधिक अर्थिक लाभ देवू शकत नाही तर ठीक आहे, त्याबद्दल तक्रार नाही. पण आमचे जीवन सुखकर करण्यासाठी काही करु शकते का ?
यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवताय. पण दुसरीकडे व्याजदर कमी झाले त्याचं श्रेय मात्र मोदी सरकारला नाही देत
हा खोडसाळपणा झाला. मी अगदी स्पष्टपणे म्हंटलं आहे की व्याजदर कमी झाल्याच श्रेय मी मोदीला द्यायला तयार आहे. पुन्हा वाचा हवं तर
पण याचं नेमकं श्रेय कुणाला द्यायचं ते मला माहित नाहि. मी अर्थतज्ञ नाही. अधिक अर्थशास्त्रीय चर्चा न करता तुम्ही म्हणत असाल तर ते श्रेय मोदींचे म्हणू हवं तर.
झालंच तर हिंजवडीच्या वाहतुकीचा वा रेल्वेच्या विलंबाचा दोषही मी मोदींच्या माथी मारलेला नाहीच.
शहरांतर्गत रस्ते कोणाच्या अखत्यारीत येतात हे जरा बघा.
पुन्हा एकदा खोडसाळ वाक्य. मी स्पष्टच म्हंटले आहे -
मान्य की ही बाब केंद्राच्या थेट अखत्यारीत येत नाही.
हवं तर माझा त्या संबंधीचा परिच्छेद पुन्हा वाचा.
"रेपो रेट" हे शब्द कधीतरी ऐकले असतील अशी आशा करतो, हे काय आहे आणि त्याचा ग्राहक कर्जाशी काय संबंध असतो हे जरा गुगलून बघा. गृहकर्ज का स्वस्त झालं हे इथे वाचा आणि इथे पण वाचा.
समजा की मला यातलं काहीच कळत नाही. आणि ते समजण्याची माझी कुवत पण नाही. पण व्याजदर कमी होण्याचं श्रेय मी मोदी सरकारला द्यायला तयार आहे असं मी म्हंटलं आहेच ना ? मग वाद कुठे यात ? आता व्याजदर कमी होण्याच श्रेय जर मोदी सरकारला गेलं तर व्याजदर पुन्हा समजा या सरकारच्या कार्यकाळात वाढलेत तर त्याचा दोष ही या सरकारला घ्यावा लागेल ना ? 'श्रेय मोदी सरकारचं दोष दुसर्‍या कुणाचा' अशी तुमची भूमिका असेल तर सांगा अन्यथा यात अधिक वाद करण्यासारखे काही दिसत नाही.
एकूण तुमच्या प्रतिसादांवरून तुम्ही फारच छोट्या परिघात विचार करताय असं वाटतं,
हो.. अर्थातच.. मी काही कु़णी जगाचे ज्ञान असलेला विचारवंत नाही ,मी एक सामान्य माणूस आहे. मी स्वतः , माझे कुटूंब आणि आणि माझे मित्रमंडळी यांचे अनुभव ई वर माझा परीघ अवलंबून आहे तो छोटाच आहे. आणि ते मान्य करण्यात मला अजिबात कमीपणा नाही.

In reply to by मराठी कथालेखक

साहेब, आमचा दंडवत स्वीकारावा. या प्रतिसादातील खालील वाक्यांमुळे जरा गैरसमज झाला. त्याचबरोबर गृहकर्जाचे कमी झालेले व्याजदर, काही प्रमाणात खरंय. पण याचं नेमकं श्रेय कुणाला द्यायचं ते मला माहित नाहि. मी अर्थतज्ञ नाही. अधिक अर्थशास्त्रीय चर्चा न करता तुम्ही म्हणत असाल तर ते श्रेय मोदींचे म्हणू हवं तर. मी म्हणतो म्हणून का होईना तुम्ही मोदींना याचं श्रेय द्यायला तयार झालात, तुमचं मन खरंच मोठं आहे. हे मनापासून म्हणतोय बर्का, नाहीतर तुम्हाला खोडसाळपणा वाटायचा.

In reply to by ट्रेड मार्क

मी म्हणतो म्हणून का होईना तुम्ही मोदींना याचं श्रेय द्यायला तयार झालात, तुमचं मन खरंच मोठं आहे.
धन्यवाद... पण खरंच या अर्थिक बाबी गुंतागुंतीच्या असतात. व्याजदर कमी असलेले चांगले की जास्त असलेले इतका छोटा मुद्दा घेतला तरी मोठ्या चर्चा घडू शकतात. त्यामुळे अर्थिक आघाडीपेक्षा मी इतर मुद्द्यांकडे अधिक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय. त्यात दैनंदिन शहरी-नोकरदार माणसाच्या जीवनात केंद्राच्या अखत्यारित असलेल्या बाबींशी थेट संबंध कमीच येतो. मी नकारात्मक विचार नक्कीच करत नाहीये. किंवा मोदी सरकारवर टीका करणे हे उद्दिष्टही नाही. हो पण माझी मत कुठेतरी सरकारपर्यंत पोहोचली आणि सरकारने उरलेल्या एक वर्षात जरी काही पाऊले उचलली तरी मला या सरकारला पाठिंबा द्यायला आवडेल. मला इतकेच म्हणायचेय की शहरी मध्यमवर्गाकडेही सरकारने लक्ष द्यावे १) रेल्वेतील सुधारणा - तुम्ही म्हंटलंय तसं काही गाड्या वेळेवर धावतात हे खरेच आहे (सुपरफास्ट एक्स्प्रेस) आणि त्यातली स्वच्छता, सुविधा पण चांगल्या असतात. पण त्याचवेळी काही गाड्या (बहूधा मेल एक्स्प्रेस ) अजिबात वेळापत्रकाप्रमाणे धावत नाहीत , इतर गाड्यांच्या पासिंग साठी वेळोवेळी थांबवल्या जातात. रेल्वेचा हा दुजाभाव जुनाच असला तरी आता तो संपुष्टात आला पाहिजे. बरेच रेल्वे अपघातही होत असतात. गेल्या चार वर्षातही झालेत. त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. २) शहरातील प्रदूषण - कारखाने तसेच , वाहनांमुळे होणार्‍या प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. शहरात प्रत्यक्षात प्रचंड धूर ओकत असूनही PUC प्रमाणपत्र घेवून फिरणारी अनेक वाहने आढळून येतात. PUC शी संबंधित जुनाट कायदे बदलले गेले पाहिजे. वाहन प्रदूषण करत असूनही खोटे आकडे टाकून PUC प्रमाणपत्र देणार्‍या केंद्राने जबर बसणे गरजेचे आहे. ३) संरक्षण - सीमेवरील संरक्षणाच्या परिस्थितीबद्दल बोलण्याइतका माझा काही अभ्यास नाही. पण शहरी भागात लष्करी हद्दीतील विकासकामे , रस्ता रुंदीकरण , पुण्यातील लोहगाव येथील लष्करी-नागरी विमानतळाची क्षमता वाढवणे या बाबी संरक्षण मंत्रालयाने मार्गी लावणे गरजेचे आहे. ४) ध्वनी प्रदूषणाबाबत कठोर कायदे करणे गरजेचे आहे. सध्या तरी सर्वोच्च न्यायालयाच्या १० नंतर लाऊडस्पीकर फटाके यांना बंदी या निर्णयाचाच काहीसा आधार आहे. पण या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी ज्यायोगे होईल असे कायदे केंद्र बनवू शकेल काय ?

In reply to by मराठी कथालेखक

निवडणुकेत मत कोणाला द्यायचं हा वेगळा विषय आहे. पण कॉमनमॅन जर तक्रार करणार नाहि, अपेक्षा व्यक्त करणार नाहि तर लोकशाहीचा काहि उपयोग नाहि.

In reply to by मराठी कथालेखक

ह्ये लंच ब्येस म्हंतो मी ! "६० वर्षातली घान चार वर्षात येकदम सपासाट क्येली नाय म्हून साठ वर्सं घान करन्यार्यांना परत आजून घान कराया निवडून द्येनार काय ?!*" वारं गब्रू वा, ह्येलाच शिक्शित मानून म्हन्तात व्हय ? * : ह्या परश्न आमाच्या श्येतातल्या रामा गड्यानं आमच्या लोकल न्येत्याला (सरपंच रामभाव) इचारला व्हता. (तेवा रामभावची दातखिळ बस्ली, त्ये येग्ळं :) ).

In reply to by गब्रिएल

माफ करा पण आपल्या लेखनशैलीमुळे मला आपल्याशी अधिक संवाद /प्रतिसाद शक्य होणार नाही. धन्यवाद.

In reply to by manguu@mail.com

ब्रिटिश इंडियाची फाळणी झाली तेव्हा मुस्लिम बहुसंख्य तो पाकिस्तान आणि हिंदु बहुसंख्य तो भारत अशी झालेली आहे ! हा देश हिंदुंचाच आहे ! हिंदुंनी स्वयं प्रेरणेने सर्वधर्मसम्भाव हे तत्व स्विकारुन देश धर्मनिरपेक्ष ठेवला आहे. हिंदु बहुसंख्य नसते तर देश धर्म निरपेक्ष राहिलाच नसता. ह्या येथुन पार युरोपात जाई पर्यंत तुम्हाल एकही* धर्मनिरपेक्ष देश दिसणार नाही. धर्मनिरपेक्षता हा हिंदुंचा वीक पॉईट नसुन इतिहास आहे , इथे आमच्या महाराष्ट्रात सातवाहनांनी बौध्द जैन सर्वांना समान वागणुक दिलेली आहे २००० वर्षांपुर्वी ! . तस्मात हिंदुना धर्मनिरपेक्षतेचे नाव काढुन डिवचणारे स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेले लोक हेच हिंदुंमधील हिंदुराष्ट्र ह्या संकल्पनेच्या आग्रहाला कारणीभुत आहेत ! ( * एक तुर्कस्तान दिसेल पण लक्षात ठेवा कि तसा तो धर्म निरपेक्ष होवु नये म्हणुन ज्या गटाने चळवळ केलेली त्यांना तुमच्याच महान नेत्याने पाठिंबा दिला होता, केमाल पाशाने तो गाढवपणा मोडीत काढला धर्मनिरपेक्ष देश करायचा प्रयत्न केला अन तुमचे महान नेते तोंडावर आपटले )

In reply to by प्रसाद गोडबोले

इथे आवडत नसेल तर सिरीयाला जा / न्यूयॉर्कला जा / मंगळावर जा , असे नेटवर कितीतरी लोक बोलत असतात , म्हणून मीही बोललो.

In reply to by manguu@mail.com

सिरीया हा जाहीरेपणे बा'अथिझम ला सपोर्त करणारा इस्लामिक देश आहे , न्यु यॉर्क पक्षी अमेरिका हा जरी धर्मनिरपेक्ष देश असला तरीही इथे प्रोटेस्टंट खिर्श्चनंचा जाहीर प्रभाव आहे ! इन फॅक्ट , हिरव्या नोटेवर स्पष्ट लिहिलेले असते " इन गॉड वी ट्रस्ट" . ( हे असे आपल्या नोटेवर , स्वतःला सनातनी म्हणणार्‍या गांधीबाबाच्या फोटुच्यावर लिहिले तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल नै ! कित्ती मजा येईल तुमचा तळतळाट बघायला =)))) ) बाकी बोलत राहा , फार मनोरंजन होते तुमचे प्रतिसाद पाहुन :)

दुबईत ड्राईव्हींग लायसन सहज मिळत नाही, बर्याच ट्रेनिंग टेस्टींग नंतरच लायसन मिळत ! पण युरोप अमेरिकेतुन आलेल्या लोकांना त्याच्या मायदेशातल्या लायसनच्या बदल्यात युऐईच लायसन मिळत ! ह्या लिस्ट मध्ये आता चायनातुन आलेल्या लोकांचाही सामावेश केला आहे !! विचार करा अश्या फॅसिलीटीसाठी भारताचा कधी विचार होउ शकेल ? रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणार्या डंपर ट्रक ने समोरुन धडक दिल्याने अहमदाबाद मधल्या ऐकाच कुटुंबातील ६ लोकांचा बळी घेतला. अश्या ट्रक ड्राईव्हरनां काय शिक्षा करता येईल ? मला वाटत की अश्यांना समोरुन गोळ्याच घालाव्यात अस मला वाटत !

In reply to by डँबिस००७

पण युरोप अमेरिकेतुन आलेल्या लोकांना त्याच्या मायदेशातल्या लायसनच्या बदल्यात युऐईच लायसन मिळत
व्हिसाचेही तसे आहे असे ऐकले आहे. म्हणजे युरोपियन पास्पोर्ट असणारे नागरिक अमेरिका/ऑस्ट्रेलिया/कॅनडा येथे तात्पुरते जाण्यास टुरिस्ट विसाची गरज नसते. आपला देश बदलतोय पण अजूनही भारत तिसर्या जगातला(थर्ड वर्ल्ड कंट्री) देश म्हणूनच ओळखला जातो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

त्यात काहि प्रॉब्लेम नाहि. मुळात थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणजे मागासलेले देश नाहित तर शीतयुद्धकालीन जगाच्या रचनेत अमेरीका आणि रशीया, पक्षी एन.डी.ए आणि यु.पी.ए पासुन फारकत घेतलेले थर्ड फ्रंट टाईप देश. पण थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणजे मागासलेले असच साधारणपणे समजल्या जातं हे ही खरं आहे.

डोळे भरून पावले , तुम्ही थोडी तरी कामे मान्य केलीत . आम्हाला तरी भाजप कुठं सतत बोकांडी पाहिजे ? पण 5 वर्षात हिशोब मागणे , सरकार बदलने अशा विचारांचे असू नये देशात 70 % जनता ही गरीब दरिद्री असल्यामुळे त्याचें जीवनमान भाजप लगेचच नाही बदलू शकणार . 10 / 15 वर्षा नंतर तुलनात्मक काँग्रेस जर वरचढ वाटली तर आणू परत काँग्रेस ला निवडुन !

In reply to by सोमनाथ खांदवे

नाव एल्गार काम विखार मग "प्रकाश"कुठलाही असूदे अंधारच अंधार चोहीकडे,आनंदी आनंद गडे!! चुकाही होत असतील नव्हे आहेतच पण काम करत आहेत म्हणूनच चुका होतात हे समजत आहै.लोक प्रश्न विचारत आहेत म्हणजे अपेक्षा आहे आणि हेच सरकार करेल याबाबत बहुतांश सकारात्मक बदल ठेवून आहैत,एखाद दुसरा तोंडाळ, उपद्रवी गणंग साफ होतीलच रस्त्याच्या कामांचा वेग , संरक्षण खात्यात भरीव पायाभूत सुविधा विकसित होत आहेत,पुण्यातील मेट्रोला मागील सरकारने फक्त कागदावरच घोडे नाचवून ७-८ वर्ष घालवली बेंगळुरू, पुणे एकाच वेळी प्रस्ताव सादर करण्यात आले होते याची नोंद घ्यावी पाठपुरावा करून तीन वर्षांत सगळ्या परवानग्या,हरीत लवादाच्या आक्षेपांचा सोक्षमोक्ष लावून प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले आहे. सगळं काही आलबेल आहे असं नाही पण बदल होत आहेत,याच चार वर्षांत पुनः पुन्हा निघणारे मोर्चे प्रतिमोर्चे,धृवीकरणासाठी केलेल्या दंगली, जातीयवादी शक्तींना खतपाणी घालून ( सत्ता भ्रष्ट नेत्यांची लालसा), या सर्व पार्श्वभूमीवर कामकाजात प्रगती आहे अगदी १८० कोनातून नसेलही पण पाऊल पुढे नक्कीच आहे आता लक्ष फक्त तुलनेत कमी असलेल्या बाजूकडे द्यायचं का मला मोफत, विनासायास,कुणाच्या हक्क मारून काहीच दिले नाही म्हणून प्रत्येक विकासकामात कण्हायचं, ज्याचं त्यानं ठरवावं कुठेही पाच पैसे ही सभासद नसलेला नाखु चिल्लर खुर्दा

In reply to by नाखु

विकासकामांबद्दल लोक भ्रमिष्ट झाले आहेत. विकासकामांत भूसंपादनास जास्त काळ जातो , नंतरची कामे वेगात होतात. खुद्द गुजरात मेट्रो 2003 पासून अडकली आहे. आणि आमची मुंबई मोनोरेल सगळे होऊनही एकदाच ( की एकदाची ! ) आग लागल्याने तशीच पडून आहे . ( चालू झाली की मी डायरेकट हाजी अलीला जाणार आहे . )

In reply to by अर्धवटराव

हा ना राव, त्ये न्हेमिच्या तिरकस लिवन्याच्या सवयीचं इक्त गुलाम झाल्याती की त्येंच्याकडं दुसर कायबाय हाय की नाय ह्ये त्येंना म्हाईत पडंनासं व्हतं. =)) =)) =))

In reply to by manguu@mail.com

मंगु बाबा , तूंच्या वैचारिक प्रवाह ची नस बरुबर सापडली बगा . म्या म्हणतुय तिकडं पाकिस्तान ची टीव्ही च्यानल वाले मोदी सरकार च्या योजना चें तोंड फाटस्तवर कौतुक करतंय या , आन आमचा मंगुबाबा च का किरकिर कर्तुया ? न्हाई म्हंजी अस्तिल थोड्या उणीवा भाजप सरकार च्या पण नांदवून घ्यायचं नाय आन सारख काडीमोड ची धमकी ह्ये आसल यल्गार वालच करत्याल बगा . खायचं आन हागायच याच्या पुढ त्यांची डोस्की चालतच नाय .

In reply to by सोमनाथ खांदवे

नाव एल्गार काम विखार मग "प्रकाश"कुठलाही असूदे अंधारच अंधार चोहीकडे,आनंदी आनंद गडे!! चुकाही होत असतील नव्हे आहेतच पण काम करत आहेत म्हणूनच चुका होतात हे समजत आहै.लोक प्रश्न विचारत आहेत म्हणजे अपेक्षा आहे आणि हेच सरकार करेल याबाबत बहुतांश सकारात्मक बदल ठेवून आहैत,एखाद दुसरा तोंडाळ, उपद्रवी गणंग साफ होतीलच रस्त्याच्या कामांचा वेग , संरक्षण खात्यात भरीव पायाभूत सुविधा विकसित होत आहेत,पुण्यातील मेट्रोला मागील सरकारने फक्त कागदावरच घोडे नाचवून ७-८ वर्ष घालवली बेंगळुरू, पुणे एकाच वेळी प्रस्ताव सादर करण्यात आले होते याची नोंद घ्यावी पाठपुरावा करून तीन वर्षांत सगळ्या परवानग्या,हरीत लवादाच्या आक्षेपांचा सोक्षमोक्ष लावून प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले आहे. सगळं काही आलबेल आहे असं नाही पण बदल होत आहेत,याच चार वर्षांत पुनः पुन्हा निघणारे मोर्चे प्रतिमोर्चे,धृवीकरणासाठी केलेल्या दंगली, जातीयवादी शक्तींना खतपाणी घालून ( सत्ता भ्रष्ट नेत्यांची लालसा), या सर्व पार्श्वभूमीवर कामकाजात प्रगती आहे अगदी १८० कोनातून नसेलही पण पाऊल पुढे नक्कीच आहे आता लक्ष फक्त तुलनेत कमी असलेल्या बाजूकडे द्यायचं का मला मोफत, विनासायास,कुणाच्या हक्क मारून काहीच दिले नाही म्हणून प्रत्येक विकासकामात कण्हायचं अन् कुंथायचं, ज्याथचं त्यानं ठरवावं कुठेही पाच पैसे ही सभासद नसलेला नाखु चिल्लर खुर्दा

CORPORATES SELL TO REPAY BANK LOANS - Modi ends the free rides given by Manmohan - Chidambaram gang Biggest ever Sale of Indian Corporate Assets in Indian History.. The so called Suited Booted Sarkar has really booted the rear of the Corporates who borrowed easy Public Money during Congress rule to buy Assets for themselves.. Jindal Steels is selling 49% of its Rail business, 5% of its Energy exchange and its 3,500 MW Power plant.. Essar is selling a huge stake in its Steel business and 49% of its Oil to a Russian Oil business.. GVK sold 33% of its Bangalore Airport stake as well as its controlling stake in Bombay Airport and its complete Road assets.. DLF is selling its Saket Mall and 40% of all its Rental Assets and Land Assets.. GMR Highway Projects, South African Coal Mine, Istanbul Airport, 70% in a Singapore Power Project, 2 Coal Mines in Indonesia.. JP Group sold all its Cement Assets to Ultra Tech Cements.. Yamuna Expressway stake, Power to JSW Energy.. Tata is selling its Corus Steel in UK.. Dhamra Port, Communications Arm Neotel in South Africa.. Land in Bombay.. Lanco Assets in Power Generation on sale in Andhra and Udupi.. Videocon selling Telcom Spectrum in 6 circles.. Oil assets in Mozambique.. Renuka Sugars is selling its Brazil Power, Sugar and Bio-fuel business.. Sahara groups 86 Real Estate Assets are on sale.. 42% stake in Formula 1, Mumbai's Sahara Hotel, Grosvernor House Hotel London, New York Plaza Hotel, The Dream New York Hotel and 4 Airplanes.. Nearly all of Vijay Mallya's Assets are on Sale.. Reliance Infrastructure is selling 49% in Electricity Generation, Transmission in Mumbai.. Cement business to Birla Corp.. Also it's entire Portfolio of Road Projects, 100% of it.. Have you heard in 60 years any Indian Promoter selling their Company to repay Bank Loans.!? Now you know who is cracking the Whip . http://www.thehindu.com/business/Industry/the-biggestever-fire-sale-of-…

In reply to by डँबिस००७

जो घेणार तोही ह्याच्यासाठी लोनच घेईल ना ? राजाने हत्ती विकायला काढला म्हणून फिदीफिदी हसायचे. पण तो घेणार कोण आणि कसा ? तसे तर व्हाट्सप तज्ज्ञ बोलतात - मोदींमुळे कराची बंदरही विकायला काढले आहे म्हणे .

गोरक्षेचा मुद्दा आला , त्यात मुसलमानांना आत टाकले आता भीमा कोरेगाव प्रकरणात दलित आणि आदिवासीना. एकंदर आपल्या probable विरोधी गटाला कशात ना कशात अडकवलयागत वाटते आहे.

‌ ‌1 ) गेल्या 70 वर्षात लाखों कोटींची माया काँग्रेस नेते आमदार ,खासदार व नगरसेवकांनी गोळा केली तरी निवडणूक लढण्या साठी जनते कडे भीक मागणारी काँग्रेस , ‌2 ) ज्या 'आप ' ने काँग्रेस ला हाकलताना खारू चा वाटा उचलला त्याच्या च बरुबर निर्लल्ज पनाणं युती चर्चा सुरू करणारी काँग्रेस , ‌3 ) 70 वर्ष संपूर्ण भारत देश 'गांधी लिमिटेड कंपनी ' प्रमाणे चालवणारी काँग्रेस , ‌4 ) 70 वर्ष काँग्रेस पक्षात गांधी परिवारा व्यतिरिक्त दुसरे नेतृत्व बहरू न देणारी काँग्रेस , ‌5 ) मुबंई हल्ल्या वेळी खंबीरपणा न राखता दोन तासात चार वेळा कपडे बदलणारे नेते असलेली काँग्रेस ‌6 ) ' मुबंई हल्ल्या मध्ये पाकिस्तानी आई एस आई चा हात आहे ' हे नवाज शरीफ ने मान्य केले पण त्या हल्ल्यात आर एस एस ला गुंतवण्या साठी पुस्तक प्रसिद्ध करणारी काँग्रेस , ‌7 ) पाकिस्तान मध्ये जाऊन तेथील मीडिया ला ' भाजप ला हरवण्यासाठी मदत करा ' अशी विनंती करणारे नेते असलेली काँग्रेस , ‌8 ) दिल्ली बाटला हाऊस हल्ल्यातील आतेरिकी अफगाणिस्तान मध्ये सापडला , परंतु त्या हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या इंस्पेक्टर चांद बद्दल सदभावना व्यक्त न करता त्यात आतेरिकी मारला गेला म्हणून रात्रभर न झोपता दुःख व्यक्त करणारी अध्यक्ष असलेली काँग्रेस , ‌9 ) आझाद मैदान मुंबई वरील दंगली मध्ये रझाकार संघटने केलेले जाळपोळ ,नुकसान व महिला पोलिसां च्या विनयभंग बद्दल एक ही खटला उभा न करता केस दाबणारी काँग्रेस , ‌10 ) देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी बांधण्यात येत असलेल्या आदर्श मध्ये फ्लॅट बाळकवणारे नेते असलेली काँग्रेस . ‌ ‌निर्लल्जपणाचा कळस असलेली काँग्रेस ची सध्या थोडीच उदाहरणे दिली आहेत , ‌याबद्दल तुमचे काय मत आहे मुंबा बाबा ?. ‌मी सुद्धा कित्येकवेळा पूर्वी काँग्रेस ला मत दिलय पण ‌काँग्रेस सुधारायच नावच घेत नाय वो .

आदरणीय श्री मोदीजींच्या नेत्‌त्वाखाली प्रबळ असलेल्या भाजपाला निवडणुकीत तोंड देण्यासाठी विरोधी पक्षाने शेवटी महा ठग बंधन केल आहे ह्या ठग बंधनाच्या पं प्र साठी उमेदवाराची निवड केली आहे, मायावतीची !! ह्या पुर्ण गेम मध्ये कॉंग्रेस अगदी महत्वाची अशी नगण्य छोट्या भावाची भुमिका पार पाडत आहे.

हा धागा कोना सामान्य व्यक्तीचा नाहीये. ज्यांना आपण एरवी समाजधुरीण म्हणतो त्या वर्गातील व्यक्तीचा हा धागा आहे. अनके अर्थाने हा धागा वैशिष्ट्य पूर्ण आहे.
  • धागा लेखकाने चर्चेत फारसा भाग घेतलेला नाही
  • लेखकाने, उपरोधाने का होईना, परंतु जनतेचा १५ लाख रुपयांचा दावा मान्य केला आहे हे महत्वाचे आहे
  • जनतेला १५ लाख आधीच मिळाले आहेत याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी ५००० कोटी रुपयांचे देणे सरकारने दिले आहे, त्यामुळे आपल्याला १५ लाख मिळाल्यातच जमा आहे असा त्यांचा दावा आहे. देशाची लोकसंख्या १२५ कोटी आहे. त्यातील ४० कोटींच कमावते आहे असे मानले तरी फक्त काल्पनिक फक्त १२५ (सव्वाशे) रुपये आपल्याला आत्तापर्यंत मिळाले आहेत. म्हणजे १४ लाख ९९ हजार ८७५ रुपये अजून येणे आहेत
  • विद्यमान सरकारची एकूणच आकडेवारी फारशी विश्वासार्ह नाही. त्यामुळेच सरकारी पातळीवर केले जाणारे दावे वास्तवात दिसत नाही. उज्वल योजनेखाली जर एव्हडी भरमसाट गॅस कनेक्शन्स दिले असतील तर जागो जागी जनतेच्या लांबच लांब रांगा गॅसच्या दुकानाबाहेर दिसायला हव्या होत्या. त्या उलट पुण्यात बऱ्याच वितरकांना आता दूर दूरपर्यंत गॅस वितरित करावा लागतोय कारण पाईप गॅस मुळे त्यांचे ग्राहक कमी झालेत

हा धागा कोना सामान्य व्यक्तीचा नाहीये. ज्यांना आपण एरवी समाजधुरीण म्हणतो त्या वर्गातील व्यक्तीचा हा धागा आहे. अनके अर्थाने हा धागा वैशिष्ट्य पूर्ण आहे.
  • धागा लेखकाने चर्चेत फारसा भाग घेतलेला नाही
  • लेखकाने, उपरोधाने का होईना, परंतु जनतेचा १५ लाख रुपयांचा दावा मान्य केला आहे हे महत्वाचे आहे
  • जनतेला १५ लाख आधीच मिळाले आहेत याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी ५००० कोटी रुपयांचे देणे सरकारने दिले आहे, त्यामुळे आपल्याला १५ लाख मिळाल्यातच जमा आहे असा त्यांचा दावा आहे. देशाची लोकसंख्या १२५ कोटी आहे. त्यातील ४० कोटींच कमावते आहे असे मानले तरी फक्त काल्पनिक फक्त १२५ (सव्वाशे) रुपये आपल्याला आत्तापर्यंत मिळाले आहेत. म्हणजे १४ लाख ९९ हजार ८७५ रुपये अजून येणे आहेत
  • विद्यमान सरकारची एकूणच आकडेवारी फारशी विश्वासार्ह नाही. त्यामुळेच सरकारी पातळीवर केले जाणारे दावे वास्तवात दिसत नाही. उज्वल योजनेखाली जर एव्हडी भरमसाट गॅस कनेक्शन्स दिले असतील तर जागो जागी जनतेच्या लांबच लांब रांगा गॅसच्या दुकानाबाहेर दिसायला हव्या होत्या. त्या उलट पुण्यात बऱ्याच वितरकांना आता दूर दूरपर्यंत गॅस वितरित करावा लागतोय कारण पाईप गॅस मुळे त्यांचे ग्राहक कमी झालेत

In reply to by सर टोबी

आपल्या विधानांना काही पुरावा वगैरे ? की असंच हवेत? का गरिबांना फुकट गॅस कनेक्शन दिल्याचा हेवा वाटतोय?

In reply to by सर टोबी

तुमचे असे म्हणणे आहे की बिल्डिंग मध्ये राहणारे पाईप ने गॅस भेटण्या अगोदर फ्लॅट मध्ये चूल पेटवत होते ? त्यांच्या कडे पूर्वी सुद्धा कनेक्शन असणार ना . जर नव्हते , तर आता पुण्यातील वितरकाकंडे गॅस शिल्लक कसा राहिला व त्याच्यावर दूर दूर पर्यंत वितरित करण्याची वेळ का आली ? दोनच शक्यता आहेत 1) गॅस चे प्रोडक्शन ज्यास्त होत आहे 2 काळाबाजार थांबविण्यात यश आले ज्या रंगाचा चष्मा घालू तसे दिसणार .

In reply to by सोमनाथ खांदवे

गॅस चे प्रोडक्शन ज्यास्त होत आहे हे शक्य नाही कारण भारत गॅस आयात करतो. याचा अर्थ दुसरा पॉईंट बरोबर आहे.

In reply to by डँबिस००७

पूर्वी तर टेलिफोनलाही रान्गा लागायच्या. लोक्सण्ख्या वाढेल, गावाचा विस्तार वाढेल , तशा एजन्सीही वाढल्या, स्पर्धेमुळे लोकाना चाण्गली सुविधा मिळू लागली. केबल ऑपरेटर , गॅस एजन्सी , मोबाइल सगळ्या व्यवसायात हेच चित्र आहे. पूर्वी विकणार्याचे मार्केट होते, आज ग्राहकांचे आहे. पण काय आहे, उद्या सूर्यग्रहण सुटले तरी ते मोदींमुळे सुटले, असे म्हणायची पद्धत आहे. जगभर एल ई डी दिव्याच्या किमती कमी झाल्या हेच सप्रमाण दाखवले तरी मोदींच्या योजनेमुळे भारतातील बल्बच्या किमती ढासळल्या , यावर भक्त ठाम असतात.

In reply to by manguu@mail.com

मोगा खान India orders 770 million LED light bulbs, prices drop 83 per cent https://www.theregister.co.uk/2016/04/01/india_orders_770_million_led_l…

आपण चष्मा लावलेला असल्याने आपले डोळे उघडले तरी आपल्याला अंधारच दिसणार आहे.

पण इतर लोकांच्या माहितीसाठी वरील दुवा पाठवला आहे जो भारतातील पत्रकारांचा नसून विलायतेतील आहे. त्यांनी The scheme's already seen over 50 million LED bulbs distributed and India's reportedly placed massive orders with manufacturers as it chases a target of 770 million LED bulbs. No wonder the price is going down: India may well be scoring bulk purchase discounts.असा म्हटलं आहे. मोदीद्वेष असला किंवा हिरवा चष्मा लावला कि असाच होतंय.

In reply to by सुबोध खरे

http://www.ledlightsinindia.com/news/led-bulb-will-get-cheaper-worldwide Philips Electronics is also offering low-cost LED bulbs. You can buy Philips’s 10.5-watt LED at The Home Depot for less than $15, which is 50% less compared to competing LED bulbs. The company plans to provide a same bulb for below $10 by the end of 2013. Philips 10.5-watt LED bulbs are as bright as 60-watt incandescent lighting. They are even 80% more efficient and don’t have mercury. These bulbs cannot be dimmed like expensive ones. 2013 ची बातमी आहे , 11 जून 2013 जरा मोगाद्वेष बाजूला ठेवून राष्ट्रहित पहा

In reply to by manguu@mail.com

हायला तुम्हाला उंदराबद्दल फारच आकर्षण आहे असं वाटतंय. जेंव्हा पाहावा तेंव्हा डोंगर पोखरुन उंदीर काढताय? २०१३ चा दुवा देताय ज्यात एल इ डी चा भाव ६५० रुपयाचा आसपास दाखवला आहे/ होता. मी दुवा दिला आहे जो २०१६ चा आहे ज्यात एल इ डी चा भाव ५५ रुपये दिला आहे. बाकी सर्व सोडा निदान दुवा उघडून पाहायचे कष्ट तरी घ्या. आणि हो डोळे उघडले नाही तर अंधार दिसणारच. उगाच मोगा द्वेष करायला तुम्ही माझ्या खिजगणतीतहि नाही. तुमच्या भंपक आणि बिनबुडाच्या वाक्यांचा प्रतिवाद मात्र मी करतो.

In reply to by सुबोध खरे

2013 साली worldwide हे शब्द त्यात आहेत. असे bulb ग्राहपोपयोगी असले तरी ते company च्या पायावर धोंडा हाणानारे आहे , कारण bulb ची life वाढल्याने कमी पिसेस भविष्यात विकले जाणार , त्यामुळे जितका मिळेल तितका बिझनेस , किमतीत अडून न रहाता करणे क्रमप्राप्त होते. पूर्वी 60 जीबी हार्ड डिस्कचा पीसी 30 हजारला यायचा. आता 500 जीबी चा 18000 त असेंम्बल करून मिळतो, पण म्हणून काँग्रेसने computer क्रअंती आणली , म्हणून किमती कमी झाल्या , असे कुणी म्हणत नाही कंपन्या त्यांचे प्रॉफिट कुणाच्या सांगण्यावरून कमी करत नाहीत मै व्यापारी हू, तसे , वो भी व्यापारीही है

In reply to by manguu@mail.com

मोगा खान तुमचा दुवा असुरक्षित आहे त्यामुळे उघडत नाही.

In reply to by manguu@mail.com

कंपन्या त्यांचे प्रॉफिट कुणाच्या सांगण्यावरून कमी करत नाहीत तुम्ही व्यापारी असलात तर तुम्हाला व्यापारात काही कळत नाही असेच म्हणावे लागेल. लोक एवढी प्रचंड ऑर्डर मिळवण्यासाठी जेमतेम नफ्यावरही काम करण्यास तयार होतात. ७७ कोटी एल इ डी बल्ब ची ऑर्डर किती प्रचंड आहे हे समजतंय का? एकदाच ऑर्डर पूर्ण करून आयुष्यभर बसून खाता येईल इतकी आहे. अगदी १० रुपये नफा धरला तरी ७७० कोटी होतील. ५ रुपये नफा धरला तरी ३८८ कोटी होतात. आणि एल इ डी बल्ब चे आयुष्य ५ वर्षे धरले तरी त्याची परत मिळणारी ऑर्डर परत तितकीच मोठी आहे.