फुस्स...
दत्तुमामा आलेत.
म्हंजे आमच्या आत्याचा नवरा.
आमच्या तीन आत्या.
एक पुन्याची. हे तिचे नवरे.
दुसरी तिकडं फालटन का काय तिकडं.
तिसरी मेली. कधी? म्हायती न्हाई.
म्या तिला बघिटलीचं न्हवं.
दत्तुमामा खाऊ आन्तेत.
म्याबी तांब्या भरूण पानी देते त्यास्नी पेयाला.
आय चा करत व्हती.
म्या येकलीच व्हती त्यांच्यासंग बोलाया.
दत्तुमामा म्हन्ले, “कितवीला तू आता?”
दर बारीला हेच विचारतेत.
दिवाळीला आलते, तवा मी पयलीत व्हते.
आताशिक सकरात आली जवळ.
मंग आताबी पयलीतच –हाणार की!
म्या दामटून म्हन्ली, “तिसरीला”
दत्तुमामा म्हनले, “वा! छान, अभ्यास कर हं, मोठी हो”.
येकदम फुस्स !
हे आयकत न्हाईत कायी. नुस्तं इचारतेत.
यास्नी आता कधीबी पानी देनार न्हाय!
* शतशब्दकथा
वाचने
16103
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
वॉव. :)
In reply to वॉव. by अभ्या..
अतिवासतै एक छोटीशी शंका.
हा भाषेचा लहेजा बीड-उस्मानाबादचा की बार्शी-पंढरपूरचा?
बाकी तुम्ही अगदी हुकूमत मिळवलेला शतशब्द कथांचा फॉर्म्याट ट्राय करावा असे फार फार वाटू लागले आहे. :)
केवळ अप्रतिम आणि अप्रतिम.
In reply to भाषेचा लहेजा by अभ्या..
मध्येच नाक खुपसतोय, पण अभ्या अशी भाषा मिरजेत देखील ऐकलेली आहे - फार फरक नाही जाणवला कधी. काय बरोबर का?
In reply to नासिकाक्षेप by बॅटमॅन
हम्म. भाषेबाबतीत बॅट्याआप्पांची दखल हवीच. ;)
मिरजेत काय पूर्ण ग्रामीण महाराष्ट्रात चालू शकेल. पण हेच संवाद जरा मनाशी बोलून बघ ना. फरक जाणवेल तुला.
मला तर लगेच जाणवतोय.
In reply to हम्म. भाषेबाबतीत by अभ्या..
आनतेत, विचारतेत, जातेत, इ. रूपे आपल्याकडे इतकी नसतात- आन्त्यात, जात्यात, इ. रूपे जास्त. हा मुद्दा नजरेतून सुटून गेला होता, तो लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद अभ्या :)
In reply to आनतेत, विचारतेत, जातेत, इ. by बॅटमॅन
आता लेखिकाताई जवा सांगतील तवाच खरं कळल म्हना. ;)
आपण बसलाव नुसते वावड्या उडवीत.
In reply to आता लेखिकाताई जवा सांगतील by अभ्या..
:) खरंय.
In reply to खरंय. by बॅटमॅन
अभ्या, बॅटमन;
या लेखनमालेतली ही एक मोठी उणीव आहे की यात वापरलेली भाषाशैली एका भौगोलिक प्रदेशातली नाही. कधी ती लातूर-उदगीर वाटते; कधी बीडची वाटते; तर कधी मिरज-सांगलीची.
माझा विविध भागांशी जवळचा संबंध आल्यामुळे या सगळ्या शैलींचे काही ना काही संस्कार माझ्यावर झाले आहेत.
त्यामुळे असं म्हणावं लागेल की या कथेतली छोटी मुलगी अशा एका (काल्पनिक) गावात राहतेय की तिथं या सगळ्या भाषाशैलींचा प्रभाव असणारी भाषा आहे :-)
लेखकाला असलेल्या स्वातंत्र्याचा मी असा फायदा घेते आहे!!
In reply to भाषेचा लहेजा by अभ्या..
अभ्या,
माझ्या वाचनात तरी मराठीत हा प्रकार आलेला नाही आजवर. इंग्रजी ब्लॉगविश्वात हा प्रकार आणि "फिक्शन ५५" - म्हणजे ५५ शब्दांतली गोष्ट - मोठ्या प्रमाणात वापरले जातात.
मराठीतही तो अनेक लोकांनी वापरला, म्हणजे त्यात लिहिले, तर समृद्ध होईल तो फॉर्मॅट (आणि मराठीही)अधिक.
जरुर लिहा, मला वाचायला आवडेल नक्की.
शुभेच्छा :-)
हे आयकत न्हाईत कायी. नुस्तं इचारतेत.आवडलं!
भारीच!!!
दत्तु मामा म्हंजी घराचं जावायबाप्पू. सनावाराला याचं, जावयाचा मान घ्याचा, जिऊन जायचं. सपला इषय. कसं?
त्येन्ला काय पडलं पोरगी शाळंत जाती, पास हुती, नापास हुती का आनकी काय त्ये.
लई भारी. आवडली. :)
In reply to दत्तु मामा म्हंजी घराचं by प्यारे१
आयला ! म्हंजे, पोरान्लाबी लSSSय अक्कल अस्ती, तेबी तुमाला तोलून बगत्यात, इचार करून आपलं त्वांड उगडावं. हे बी कळंना व्हय जावायबाप्पून्ला ? ;)
झकास!
एकदम पर्सन्ग समोर 'हुबा केलासा'.
नेहेमीप्रमाणेच झकास शतशब्दकथा!
(एक फालतू शंका - आत्याचा नवरा मामा कसा काय बुवा?)
In reply to नेहेमीप्रमाणेच झकास शतशब्दकथा by आदूबाळ
(फालतु उत्तर- सगळ्या आत्यांचे नवरे मामाच असतात, अन सगळ्या मावश्यांचे काका! रुल इज रुल!)
सरळ उत्तर- सगळी नाती ही कुळ-गोत्र वेगळ हे दाखवणारी असतात. वडीलांचा भाऊ हा समगोत्र त्याच्याशी विवाह संबंध होत नाहीत. पण मामा हा आईचा भाऊ वेगळ्या गोत्राचा म्हणुन मामेभावाशी विवाह संबंध चालतात. तेच मावशीच. त्यांच्या घरात आईची बहिण, आईसारखी, म्हणुन तिचे घर समगोत्र मानुन तिथे विवाह केला जात नाही.
In reply to (फालतु उत्तर- सगळ्या आत्यांचे by स्पंदना
येकदम बरोब्बर! म्हणूनच आम्हाला आत्याच्या नवर्याला काका म्हणणार्यांचं हसू येतं.
In reply to नेहेमीप्रमाणेच झकास शतशब्दकथा by आदूबाळ
(एक फालतू शंका - आत्याचा नवरा मामा कसा काय बुवा?)
हाहा! कुणी कुणा दुस-या व्यक्तीला काय हाक मारावी हे आपण कसं ठरवणार?
माझ्या ओळखीच्या दत्तात्रय नाव असलेल्या एका गृहस्थांना इतर लोकांबरोबर त्यांची स्वतःची मुलंही "दत्तुमामा" म्हणायची आणि मुलांच्या आईला गाव "मामी" म्हणायचं म्हणून मुलंही आईला "मामी" म्हणायची....
समाज तर्कानुसार चालत नाही - आणि ते किती बरं आहे :-)व्वा! अतिवास शतशब्दावलीला शत प्रणाम!
100 % :-)
नेहमीप्रमाणेच सुरेख कथा/
तुमची या कथाप्रकारावर चांगलीच हुकूमत आहे.
In reply to नेहमीप्रमाणेच सुरेख कथा/ by प्रचेतस
यप्प... अगदी सहमत :) :)
ब्येस!
आवडली....
येकदम फुस्स ! हे आयकत न्हाईत कायी. नुस्तं इचारतेत. यास्नी आता कधीबी पानी देनार न्हाय!च्यामारी दत्तुमामालाच एकदम फाट्यावर मारलं किहो …. ह्या ह्या ह्या :-)
सुंदर फॉर्मॅट. आत्तापर्यंतच्या सर्व आवडल्या. खास आहेत एकाहून एक.
अडकू नका. प्रयोगशीलता बदलत राहूदे.
In reply to सुंदर फॉर्मॅट. by गवि
लेख आवडला.
हा अनुभव आम्हा शहरी बाळांनाही आला आहे ?
' कोण तू ", यमीचा लेक का ? कितवीत आहेस ? अरे, नानासाहेब, कधी आलात ?".. वगैरे वगैरे. आम्ही तोंड वासून उभेच! नुसतेच इचारतात.
न्हान मुलगी म्हनून काय झालं? बराबर समजतंय तिस्ला ! कथा आवडली.
हे आयकत न्हाईत कायी. नुस्तं इचारतेत.
हा अनुभव आम्हा शहरी बाळांनाही आला आहे ?
' कोण तू ", यमीचा लेक का ? कितवीत आहेस ? अरे, नानासाहेब, कधी आलात ?".. वगैरे वगैरे. आम्ही तोंड वासून उभेच!
लहान मुलांच्या भावविश्वाला थोडक्यात पण प्रभावी शब्दरुप
लई ब्येस लिवलंय ! लासच्या दोन वळी जंक्शन हायती. आजून बक्कळ लिवा.
एकदम रांगडी कविता ! आवडली :-)
दत्तुमामाचा चांगलाच मामा केला :)
असे अनुभव बरेच आहेत. ते ही दोन्ही बाजूंचे ;)
काय करणार, बर्याच वेळा औपचारीकता पाळावी लागते.
लई झ्याक! (हांगाशी असं म्हणणार होतो पण शब्दाचा अर्थ माहीत नाही. बहुदा "लय बेस" वा "लई झ्याक" असाच आहे काय? हांगाशी शब्द ऐकायला खूप आवडतो.)
In reply to लई झ्याक! by सुधीर
हांगाशी = हां बग अशी= बरोबर, योग्य, भारी, इ.इ. संधी झालाय त्याचा.
In reply to हांगाशी = हां बग अशी= बरोबर, by बॅटमॅन
हो हो अस्स आहे होय. शब्द भारीच आहे मग. आवडला.
झक्कास!
- (100 नंबरी) सोकाजी
छोटीच्या मनातल्या भावना मस्त उतरल्यात. त्याला पुरक अश्या भाषेचा साजही खासच.
नावही तोडीस तोड. :)
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.
खरंय! बोलती तोंडे मिळतात अनेक, मात्र ऐकते कान मिळणे अवघडच असते!!
फक्त एवढ्या बारक्या चिमुरडीला हे लक्षात आले हेच कौतुक आहे.
पुन्हा एकदा लाजवाब कथा.. आवडली..
हाहाहा
मस्त :D
मागचाच एखादा प्रतिसाद उचला आता .. तुम्ही लिहित राहायचे आणि आम्ही वाचत जायचे..
वॉव.