फुस्स...
दत्तुमामा आलेत.
म्हंजे आमच्या आत्याचा नवरा.
आमच्या तीन आत्या.
एक पुन्याची. हे तिचे नवरे.
दुसरी तिकडं फालटन का काय तिकडं.
तिसरी मेली. कधी? म्हायती न्हाई.
म्या तिला बघिटलीचं न्हवं.
दत्तुमामा खाऊ आन्तेत.
म्याबी तांब्या भरूण पानी देते त्यास्नी पेयाला.
आय चा करत व्हती.
म्या येकलीच व्हती त्यांच्यासंग बोलाया.
दत्तुमामा म्हन्ले, “कितवीला तू आता?”
दर बारीला हेच विचारतेत.
दिवाळीला आलते, तवा मी पयलीत व्हते.
आताशिक सकरात आली जवळ.
मंग आताबी पयलीतच –हाणार की!
म्या दामटून म्हन्ली, “तिसरीला”
दत्तुमामा म्हनले, “वा! छान, अभ्यास कर हं, मोठी हो”.
येकदम फुस्स !
हे आयकत न्हाईत कायी. नुस्तं इचारतेत.
यास्नी आता कधीबी पानी देनार न्हाय!
* शतशब्दकथा
वाचने
16103
वाचनखूण
प्रतिक्रिया
43
वॉव.
In reply to वॉव. by अभ्या..
भाषेचा लहेजा
In reply to भाषेचा लहेजा by अभ्या..
नासिकाक्षेप
In reply to नासिकाक्षेप by बॅटमॅन
हम्म. भाषेबाबतीत
In reply to हम्म. भाषेबाबतीत by अभ्या..
आनतेत, विचारतेत, जातेत, इ.
In reply to आनतेत, विचारतेत, जातेत, इ. by बॅटमॅन
आता लेखिकाताई जवा सांगतील
In reply to आता लेखिकाताई जवा सांगतील by अभ्या..
खरंय.
In reply to खरंय. by बॅटमॅन
शैली?
In reply to भाषेचा लहेजा by अभ्या..
लिहा...
मस्त!
भारीच!!!
दत्तु मामा म्हंजी घराचं
In reply to दत्तु मामा म्हंजी घराचं by प्यारे१
आयला ! म्हंजे, पोरान्लाबी
झकास!
नेहेमीप्रमाणेच झकास शतशब्दकथा
In reply to नेहेमीप्रमाणेच झकास शतशब्दकथा by आदूबाळ
(फालतु उत्तर- सगळ्या आत्यांचे
In reply to (फालतु उत्तर- सगळ्या आत्यांचे by स्पंदना
येकदम बरोब्बर! म्हणूनच
In reply to नेहेमीप्रमाणेच झकास शतशब्दकथा by आदूबाळ
(एक फालतू शंका - आत्याचा नवरा
(एक फालतू शंका - आत्याचा नवरा मामा कसा काय बुवा?)हाहा! कुणी कुणा दुस-या व्यक्तीला काय हाक मारावी हे आपण कसं ठरवणार? माझ्या ओळखीच्या दत्तात्रय नाव असलेल्या एका गृहस्थांना इतर लोकांबरोबर त्यांची स्वतःची मुलंही "दत्तुमामा" म्हणायची आणि मुलांच्या आईला गाव "मामी" म्हणायचं म्हणून मुलंही आईला "मामी" म्हणायची.... समाज तर्कानुसार चालत नाही - आणि ते किती बरं आहे :-)व्वा! अतिवास शतशब्दावलीला शत
100 %
नेहमीप्रमाणेच सुरेख कथा/
In reply to नेहमीप्रमाणेच सुरेख कथा/ by प्रचेतस
+१
ब्येस!
मस्त..
येकदम फुस्स !
सुंदर फॉर्मॅट.
In reply to सुंदर फॉर्मॅट. by गवि
ब्येस
ब्येस
नेहमीप्रमाणे..
लई ब्येस लिवलंय ! लासच्या दोन
मस्त
दत्तुमामाचा चांगलाच मामा केला
हा हा हा
लई झ्याक!
In reply to लई झ्याक! by सुधीर
हांगाशी = हां बग अशी= बरोबर,
In reply to हांगाशी = हां बग अशी= बरोबर, by बॅटमॅन
धन्यवाद!
100 नंबरी
छोटीच्या मनातल्या भावना मस्त
आभार
बारक्या चिमुरडीला हे लक्षात आले हेच कौतुक आहे
सुंदर..
हाहाहा मस्त
मागचाच एखादा प्रतिसाद उचला