मुसोलिनीचा उदयास्त भाग-१० शेवटचा.
भाग - १
भाग - २
भाग - ३
भाग - ४
भाग - ५
भाग - ६
भाग - ७
भाग - ८
भाग - ९
भाग- १०
मुसोलिनी, क्लॅरेट्टा आणि इतर १५ जणांची प्रेते त्यांनी त्याच गाडीत टाकून मिलान शहरात आणली आणि रात्रीच्या अंधाराचा फायद घेत त्यांनी ज्या चौकात त्यांच्या कॉम्रेडसना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते, त्याच चौकात, पिआत्झाले लोरेटोच्या चौकात आणून फेकली. खरंच फेकली.
दुसर्या दिवशी बाहेर पडलेल्या नागरिकांना तेथे थोड्याफार बघ्यांची गर्दी दिसली. कोणीतरी मुसोलिनीचा मानदंड त्याच्या हातात आडवा ठेवला होता आणि त्याचे मस्तक क्लॅरेट्टाच्या पांढर्या शुभ्र ब्लाऊजवर विसावले होते. बाजूला वार्ताहर त्याचे फोटो घेण्यात गुंग झाले होते. एका शहाण्याने मुसोलिनीच्या चेहर्यावर उजेड पडावा म्हणून त्याचे डोके जरा तिरपे केले आणि त्याच्या हनुवटीच्या खाली एका बंदूकीचा आधार दिला.
एका अमेरिकन वार्ताहराने तेथे हजर असलेल्या एका बंदूकधारी कम्युनिस्ट बंडखोराला विचारले “मुसोलिनीचा जर इटालियन्स एवढा तिरस्कार करत असतील तर त्याला त्याच्या प्रेयसीबरोबर शेवटची रात्र तरी कशाला घालवू दिली ?”
त्या माणसाने आपले हात हवेत फेकले आणि तो म्हणाला “शेवटी आम्ही सगळेव इटालियन्च आहोत ना !” याला संदर्भ होता इटालियन रंगेलपणाचा.
येथपर्यंत सगळे ठीक होते. लोक येत होते बघत होते कुजबुजत होते, काही जण तर रडतही होते. तेवढ्यात एका माणसाने एक अत्यंत घृणास्पद कृत्य केले. त्याने मुसोलिनीच्या प्रेताच्या मस्तकावर एक लाथ झाडली. या येथून इतिहासातील माणूसकीला काळिमा लावणारे एक काळे नाट्य चालू झाले आणि मुसोलिनीच्या शत्रूंनीही शरमेने मान खाली घातली. जमलेल्या लोकांनी त्या सगळ्या प्रेतांभोवती फेर धरून नाचायला सुरवात केली. एका स्त्रीने आपले पिस्तोल काढले आणि मुसोलिनीच्या त्या लोटांगण घातलेल्या प्रेतावर पाच गोळ्या झाडल्या. “लढाईत मृत्यू पावलेल्या माझ्या ५ मुलांच्या बदल्यात या पाच गोळ्या” असे म्हणत ती जमिनीवर थुंकली.
एका माणसाने मुसोलिनीचा शर्ट फाडला आणि त्याचा पेटता बोळा करून त्याने तो त्याच्या उघड्या तोंडात घालायचा प्रयत्न चालवला. सगळ्यात भीषण अशी घटना नंतर घडली, जी जगात आत्तापर्यंत कोणी बघितली नव्हती ना ऐकली होती. उपस्थित बायकांनी आपापले स्कर्ट मुसोलिनीच्या चेहर्यावर पसरले आणि त्याच्या तोंडात त्या चक्क मुतल्या.
तेथे हजर असलेल्या कम्युनिस्टांच्या तुकडीच्या प्रमुखाने त्याच्या सैनिकांना ती गर्दी हटविण्यासाठी हवेत गोळीबार करायला सांगितला पण त्याचा काडीचाही उपयोग झाला नाही त्या हिंसक जमावाने त्या प्रेतांना तुडवले आणि विद्रूप केले. ३०० सैनिकांनाही हा जमाव आवरत नव्हता. जमावाने त्यांच्याच कपड्याच्या फाडून चिंध्या केल्यावर त्यांनी तातडीने माघार घेतली. त्यांनी आग विझवायच्या बंबाला बोलवून जमावावर पाण्याचा जोरदार मारा केला पण ती सुडाची व तिरस्काराची फडफडणारी ज्वाला काही ते पाणी विझवू शकले नाही. तो बंबही मागे नेण्यात आला.
एवढी विटंबना कमी होती की काय म्हणून त्यांनी ती सगळी प्रेते उलटी केली आणि तेथेच एक उध्वस्त झालेला पेट्रोलपंप होता त्याच्या तुळयांना टांगली. पहिल्यांदा वर गेला मुसोलिनी, त्यानंतर क्लॅरेट्टा. क्लॅरेट्टाचा स्कर्ट उलटा होऊन तिचे सर्व शरीर उघडे पडले. एकाला लाज वाटून त्याने तो स्कर्ट एका पट्ट्याने तिच्या पायाला बांधला. तिचे गोरेपान पाय बघून एकजण ओरडला “ काहीही म्हणा हिचे पाय मात्र सुंदर होते”.....
तेवढ्यात तेथे मुसोलिनीचा एक जुना सहकारी स्ट्रासी याला तेथे आणण्यात आले. तो बिचारा राजकारणातून दोन वर्षापूर्वीच बाहेर पडला होता. त्याला मुसोलिनीचे प्रेत दाखवल्यावर त्याने मोठ्या धैर्याने त्या प्रेताला सॅल्यूट केला. ते बघितल्यावर त्याची तेथेच हत्या करण्यात आली आणि त्याचे प्रेतही मुसोलिनीच्या शेजारी टांगण्यात आले.
मुसोलिनी मेला. ही बातमी मिलानमधून सार्या इटलीत पसरली आणि तेथून जगभर. मुसोलिनीची विटंबना झाली तेव्हा हिटलर त्याच्या शेवटच्या बंकरमधे इव्हा ब्राऊन बरोबर रहात होता त्यालाही ही बातमी कळालीच. रशियाचे रणगाडे फक्त अर्धा मैलावर आग ओकत होते. त्याचा विश्वासू साथीदार हिमलर दोस्तराष्ट्रांबरोबर बोलणी करतोय हीही धक्कदायक बातमी त्याला त्याच सुमारास समजली. त्याच रात्री त्याने सगळ्यांचा निरोप घेतला आणि आपली आणि इव्हा ब्राऊनची या जगातून प्रस्थान ठेवण्याची तयारी चालू केली.
चर्चिलला ही बातमी मिळाली तेव्हा तो क्लबमधे होता. ही बातमी कळताच तो त्याच्या आलेल्या पाहुण्यांकडे धावला आणि ओरडला “ते रानटी जनावर मेले ! मेले !” पण जेव्हा त्याला त्या विटंबनेची बातमी मिळाली तेव्हा त्याने त्या प्रकरणाच्या सखोल चौकशीचा आदेश दिला.
जनरल आयझेनहॉवर दोस्त राष्ट्रांच्या सेनेच्या एकत्रीत मुख्यालयात होते. त्यांना ही बातमी मिळाल्यावर ते उद्गारले “ भयंकर ! भयंकर शेवट”.
रॅशेल मुसोलिनीलाही अटक करण्यात येऊन तिला स्त्रियांच्या तुरुंगात डांबण्यात आले. तिला तिच्या दोन मुलांपासून तोडण्यात आले त्याचे तिला खूपच दु:ख झाले. तिचा तो दिवस फारच भयंकर गेला. बाहेर एक माणूस यादीतील नावे वाचत होता आणि एक नाव वाचून झाल्यावर बंदूकीची फैर झडत होती. तिला मुसोलिनीच्या हत्येची बातमी मिळाली होती पण आता ती सर्व सुखदु:खाच्या पलिकडे गेली होती.
दुपारी २ वाजता अमेरिकन कर्नल पोलेट्टीने इटलीच्या स्वातंत्र्यानंतरचा पहिला संपर्क प्रस्थापित केला. इटालियन बंडखोरांचा कमांडर फेरूशिओ पारी याच्याशी ही भेट झाली. पहिले अभिवादन झाल्यावर त्याच्या मनात जे खदखदत होते ते बाहेर पडले. “फारच अमानूष आणि माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य. याने आमच्या चळचळीचे कधीही न भरून येणारे नुकसानच होणार आहे.”
त्याचे सांत्वन करत पोलेट्टी म्हणाला” जे झाले ते झाले. पण मी येथे आलोय ते ती सगळी प्रेते ताबडतोब खाली उतरवा हे सांगण्यासाठी आणि मला हे परत दिसले नाही पाहिजे हा माझा हुकूम समज.”
“पण त्याला कुठे घेऊन जाऊ आता ?” पारीने विचारले.
“आमच्याकडे अमेरिकेत शवगृहे असतात असे काही नाही का तुमच्या येथे ?
“आहे एक बेवारस प्रेतांसाठीचे”
“ठीक आहे. ती प्रेते तिकडे नेऊन ठेवा आणि त्या प्रेतांना कोणीही हात लावू नका कारण युद्ध आता संपले आहे. त्याची कसलीही विटंबना करू नका, कसलीही”
मुसोलिनीची समाधी
समाप्त.
रॅशेल : ही नंतर तुरूंगातून सुटली आणि हिने एक आत्मचरित्र लिहिले. तिच्या मुळ गावात ती एक हॉटेल चालवत होती. ती तेथे स्वत: हाताने लोकांना पिझा बनवून द्यायची. हिला एक मुलगी व तीन मुले. हिनेच मुसोलिनीचे अवशेष दफनासाठी नंतर ताब्यात घेतले
व्हिट्टिरिओ : हा जेव्हा मुसोलिनीला पहिल्यांदा अटक झाली तेव्हा जर्मनीत पळून गेला होता. जेव्हा मुसोलिनीला सोडवून जर्मनीत आणले होते तेव्हा हा जर्मनीत होता पण बापाला भेटला नाही असे म्हणतात. युद्धा नंतर उत्तर इटलीमधे याने फॅसिस्ट पुढार्यां च्या शरणागती बाबत बरेच काम केले. हा त्यानंतर नाहीसा झाला.
रोमॅनो : हा राजकारणात कधीच नव्हता. याची मुलगी नंतर इटालियन राजकारणात आली. हा एक चांगला पिआनिस्ट होता.
एड्डा : ही नंतर काउंटेस म्हणून आरामात जगली.
बेलिनी : हाही इटलीच्या राजकारणात बराच पुढे गेला. त्यानेही एका पुस्तकात मुसोलिनीला पकडले त्याची हकीकत लिहिली आहे.
वॉल्टर : याने मुसोलिनीला मारले असे म्हणतात. पण यात मतभेद आहेत. हा नंतर इटलीच्या लिकसभेमधे निवडून गेला आणि एका तेल कंपनीतून मोठ्या अधिकाराच्या पदावरून निवृत्त झाला. काही वर्षापूर्वीच तो मेला.
स्कोर्झेनी : याला दोस्त सैन्याने पकडल्यावर त्याला अमेरिकन सैन्याने पळून जायला मदत केली. याला कारणे दोन. काही म्हणतात याच्याकडे चर्चीलने मुसोलिनीला लिहिलेली स्फोटक पत्रे होती आणि दुसरे कारण म्हणजे अमेरिकेने जी काही माणसे अमेरिकेला नेली त्यात एक जनरल गेलेन नावाचा होता. त्याने CIAच्या उभारणीस वाहून घेतले होते. या माणसाने याचा मध्यपूर्वेत वापर केला. स्कोर्झेनी इजीप्त, लिबीया, इराक या देशात सल्लागार म्हणून काम करत असे म्हणतात.
मित्रहो, या दहाव्या भागाबरोबर मुसोलिनीची हकीकत संपली. आपल्याला आवडली असेल असे गृहीत धरतो.
BBye !
जयंत कुलकर्णी.
ता.क. वल्ली आणि अन्या डॉन यांनी ही लेखमालिका संपल्याची कृपया नोंद घ्यावी आणि माझ्या पार्टीची तयारी करावी. :-)

ता.क. वल्ली आणि अन्या डॉन यांनी ही लेखमालिका संपल्याची कृपया नोंद घ्यावी आणि माझ्या पार्टीची तयारी करावी. :-)Book traversal links for मुसोलिनीचा उदयास्त भाग-१० शेवटचा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जबरदस्त आणी तितकेच भयानक सुद्धा
व्वा!!
लिखाण झपाटून केले आहे. त्या
खरं आहे..
धन्यवाद जयंतराव!
सुंदर लेखमाला....
!!..स्टँडींग ओवेशन..!!
अप्रतिम लेखमाला आणि भीषण
वल्ली पर्ल हार्बर्वर लिहायला
धन्स काका.
अरेपण पार्टीचे काय ......?
एक अविस्मरणीय लेखमाला
पूर्ण वाचली...
अतिशय भयंकर विटंबना! लेखमाला
मीश्र भावना !!
सुंदर लेखमाला.. पण इतकी भीषण
उत्तम लेखमाला. पण हे असे सगळे
_/\_ _/\_ _/\_
उत्तम माहिती, हा असा इतिहास
आशावाद भाबडा आहे.
हॅट्स ऑफ... जयंतराव! फोटोज
मा़झ्याही मनत हा विचार आला
_/\_ _/\_ _/\_
+१
सावरकरांना मुसोलिनीची खरे जीवन कळले होते का?
सावरकरांनी मुसोलिनीच्या
छान लेखमाला .. आवडली. फारच.
अतिषय सुंदर लेखन ... शेवटचे ४
मि तुमचे सर्व भाग
मी जे झाले ते लिहिले आहे.
केवळ संग्राह्य...!
फार छान लिहिले आहे..
जबरदस्त आणी तितकेच भयानक
सलग वाचून काढली आज हि मालिका.
सर