विश्वाचे आर्त - भाग १६ - जीएमओ एक तोंडओळख
लेखनप्रकार

वाचने
6729
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
हम्म.. जीएमओ वाईट असे व्यक्तिशः मला देखील वाटत नाही. पण मला त्यावर विश्वास नाही हे देखील तितकेच खरे.
माझ्यापुरते कारण असे आहे की, जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये नैसर्गिकरीत्या बदल होतो, आणि त्यानंतर तो स्थिरावतो तेव्हा निसर्ग त्याच्या असंख्य चाचण्या घेतो. अनेक परम्युटेशन्स बनतात त्यातले एक जगते, म्हणजेच त्याची निसर्गाला असलेली उपयोगिता सिद्ध झालेली असते.
मानवनिर्मित बदलांमध्ये असे होत नाही. कोणता जीन मानवी शरीरात जाऊन नेमके काय करेल हे सांगणारे तंत्रज्ञान अजून तसे बाल्यावस्थेत आहे. त्यामुळे आपल्याला परिणामांची नेमकी जाणीव नसते.
किंबहुना जीएमओ जेव्हा आपण मोठ्या प्रमाणावर वापरतो तेव्हा ते केवळ स्वतःलाच नव्हे, तर आपल्या आजूबाजूच्या क्षेत्राला देखील प्रभावित करते. साधे भाताचे उदाहरण घेऊ.. मी माझ्या शेतावर जीएमओ वापरले, तर त्याचे परागीभवन शेजारच्या शेतातील पिकावरदेखील होणार. म्हणजे मी माझे बियाणे मॉडिफाय केल्याचे परिणाम माझ्या शेजार्याला देखील भोगावे लागणार. हा अगदी साधा प्रकार झाला. याच्यापेक्षा भयंकर गोष्टी देखील होऊ शकतात.
मग जीएमओ वापरूच नये का? याला मात्र माझे उत्तर वेगळे आहे. नियंत्रित प्रकारे वापरावयास काहीच हरकत नाही. वापरले नाही तर पुढे संशोधन कसे होणार? त्यामुळे जीएमओ सरसकट टाकाऊ तर नाहीच. पण तसेच सरसकट ते अँजल पण नाही.
In reply to हम्म.. जीएमओ वाईट असे by आनन्दा
मग जीएमओ वापरूच नये का? याला मात्र माझे उत्तर वेगळे आहे. नियंत्रित प्रकारे वापरावयास काहीच हरकत नाही. वापरले नाही तर पुढे संशोधन कसे होणार?+१ एखाद्या छोट्या बेटावर असे संशोधन होत रहावे. उगाच घाई गडबडीने ते सरसकट अमलात आणू नये कारण परतीचा रस्ता बंद झाला तर मोठीच समस्या उभी राहू शकते.
In reply to हम्म.. जीएमओ वाईट असे by आनन्दा
जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये नैसर्गिकरीत्या बदल होतो, आणि त्यानंतर तो स्थिरावतो तेव्हा निसर्ग त्याच्या असंख्य चाचण्या घेतो. अनेक परम्युटेशन्स बनतात त्यातले एक जगते, म्हणजेच त्याची निसर्गाला असलेली उपयोगिता सिद्ध झालेली असते.मला वाटतं तुम्हाला म्हणायचं आहे की नैसर्गिक बदल हे त्यामानाने हळुवार असतात आणि मानवनिर्मित बदल हे वेगवान असतात. यात कदाचित तथ्य असेल. पण अमुक तमुक नैसर्गिक बदलाची 'निसर्गाला असलेली उपयोगिता' हे म्हणणं योग्य नाही. निसर्गाला उपयोगी असं काही नसतं. निसर्ग केवळ असतो. जनुकांमध्ये बदल होतात, त्यानुसार प्राणी बदलतात. त्या बदलांचा आसपासच्या प्राण्यांवर आणि पर्यायाने निसर्गावर परिणाम होतो. जे बदल टिकाऊ असतात ते टिकतात. म्हणजे जे बदल त्या प्राण्याला टिकून राहायला उपयोगी पडतात ते टिकतात. त्यात इतर प्राण्यांना टिकण्याच्या दृष्टीने तोटा होत असला तरी काही फरक पडत नाही.
मानव निसर्गात॑ ढवळाढवळ करतो, किंवा निसर्गाला हानी पोहचवतो, असं मी मानत नाही. कारण मी मानवाला निसर्गापासून वेगळं समजत नाही. मानव हा निसर्गाचाच भाग आहे. त्यामुळे जर मानवाच्या एखाद्या कृतीने निसर्गाला हानीकारक असे काही होत असेल, तर ते पर्यायाने मानवालाच हानीकारक असेल.
कोणताही जीव त्याच्या बौद्धिक व शारिरीक क्षमतेनुसार काही कृती(अॅक्टिव्हीटी) करत असतो, ज्याचा निसर्गावर काहीतरी परिणाम होतच असतो. मग निसर्गाचाच भाग असलेल्या मानवाच्या क्रियांनी/कृतींनी निसर्गात 'ढवळाढवळ' कशी होईल?
In reply to मानव निसर्गात॑ ढवळाढवळ करतो, by तुषार काळभोर
मानवाची बर्याच वेळेस "ढवळाढवळ" होते कारण
१. मानव त्याच्या नैसर्गिक प्रेरणेनुसार वागत नाही. तो बुद्धी नुसार वागतो.
२. माणसाच्या गरजा अन्न आणि निवारा या नैसर्गिक गरजांच्या खूप पुढे गेल्या आहेत, त्यामुळे तो एक प्रकारे नैसर्गिक जीवनपद्धतीच्या खूप पुढे गेला आहे.
३. मानवाच्या कृतींची परिणाम बर्याच वेळेस विस्तृत प्रमाणावर आणि दीर्घकाळासाठी होऊ शकतात. उदा. अणुबॉंब.
अणु स्फोट करणे ही माझ्या दॄष्टीने ढवळाढवळ आहे. कारण मानवाला त्याचे दूरगामी परिणाम माहीत असतीलच असे नाही. तरी देखील तो ती कृती करतो.
बाकी याच्याशी मात्र अंशतः सहमत - कोणताही जीव त्याच्या बौद्धिक व शारिरीक क्षमतेनुसार काही कृती(अॅक्टिव्हीटी) करत असतो, ज्याचा निसर्गावर काहीतरी परिणाम होतच असतो.
In reply to मानवाची बर्याच वेळेस by आनन्दा
मानव हा निसर्गाचाच भाग नाहीये का?
१. मानव त्याच्या नैसर्गिक प्रेरणेनुसार वागत नाही. तो बुद्धी नुसार वागतो.
>> ती बुद्धीच निसर्गाने मानवाला दिलेली आहे. ती बुद्धी नैसर्गिकच आहे. म्हणून त्या बुद्धीतून निपजणारे सर्व 'नैसर्गिक प्रेरणाच आहे.
२. माणसाच्या गरजा अन्न आणि निवारा या नैसर्गिक गरजांच्या खूप पुढे गेल्या आहेत, त्यामुळे तो एक प्रकारे नैसर्गिक जीवनपद्धतीच्या खूप पुढे गेला आहे.
निवारा ही तरी नैसर्गिक गरज कशी? अगणित सजीव ऊन-वारा-पाऊस सहन करत उघड्यावर जीवन जगतात. किंवा फारतर काही जीव आडोसा शोधतात/वापरतात. काही मोजके जीव निवारा बांधतात (उदा. पक्षी, मुंग्या इ.) मग हे मोजके जीवसुद्धा नैसर्गिक गरजांच्या पुढे गेले आहेत का? बरं, नैसर्गिक निवारा म्हणजे काय? मानवाने कसा आडोसा/निवारा वापरावा? नारळाच्या झावळ्या वापरून केलेला? कोणतेही साहित्य वापरले तरी निवारा 'मानवनिर्मित'च असेल ना?
मग 'नैसर्गिक' व मानवनिर्मित' यात फरक कुठे करावा? नैसर्गिक पदार्थ/वस्तू वापरून केलेले ते नैसर्गिक, असे असेल तर, मानवनिर्मित यच्चयावत वस्तू ही नैसर्गिक घटकांपासूनच तयार झालेली असते ना? नैसर्गिक जीवनपद्धतीची व्याख्या कशी करावी?
३. मानवाच्या कृतींची परिणाम बर्याच वेळेस विस्तृत प्रमाणावर आणि दीर्घकाळासाठी होऊ शकतात. उदा. अणुबॉंब.
अणु स्फोट करणे ही माझ्या दॄष्टीने ढवळाढवळ आहे. कारण मानवाला त्याचे दूरगामी परिणाम माहीत असतीलच असे नाही. तरी देखील तो ती कृती करतो.
>> सर्व हरित वनस्पती, त्यांना निसर्गाने दिलेल्या हरितद्रव्याचा व नैसर्गिक सूर्याने दिलेल्या नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा वापर करून कोट्यावधी वर्षांपासून ऑक्सिजन तयार करत आहेत. ज्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण अत्यल्प होते, तिथे ते वनस्पतींमुळे इतके वाढले की ऑक्सिजनवर जगू शकणारे जीव तयार झाले. ही वनस्पतींची निसर्गातील ढवळाढवळ नव्हे काय? त्यामुळे झालेले परिणाम विस्तृत प्रमाणात व दीर्घकाळासाठीचे नाहीत काय?
मानवाने स्वतःला निसर्गाहून वेगळे असे समजण्यापेक्षा 'आपण निसर्गाचा भाग आहोत' असे मानायला हवे.
In reply to निसर्ग by तुषार काळभोर
प्रतिसाद आवडला. मानव आणि निसर्ग हे द्वैत काही वर्णनात्मक सोयीपुरतंच ठीक आहे. मात्र ते टोकाला नेलं की गोंधळ होऊ शकतात. भाग ३ मध्ये मी याविषयी लिहिलेलं होतं.
आपण निसर्गाला आपल्या शरीराच्या मर्यादेच्या पलिकडचे काहीतरी - असे मानतो. आपण आपल्या शरीराच्या मर्यादेनंतर संपतो - त्याच्या बाहेर जे काही आहे त्याचे आपण नैसर्गिक आणि कृत्रिम असे नीटस दोन भाग करतो. मी - माझ्या आसपास दिसणारे मानवनिर्मित जग - या दोन गोष्टी सोडल्या की बाकीचा सगळा निसर्ग. ही विभागणी अनेक वेळा सोयीची पडते खरी पण अनेक वेळा त्यामुळे अडचणही निर्माण होते. कारण आपणही निसर्गाचाच एक भाग आहोत हे आपल्याला विसरायला होते. अनेक वेळा 'मी आणि निसर्ग' या द्वैताचे रूपांतर 'मी विरुद्ध निसर्ग' या मांडणीत होते. मानवनिर्मित ते सगळे वाईट, आणि नैसर्गिक म्हणजे सर्व काही सुंदर अशा रोमॅंटिक कल्पनाही बळावतात. किंवा निसर्ग गेला खड्ड्यात, माझे सुख तेवढे महत्त्वाचे अशी तद्दन भोगवादी प्रवृत्तीही दिसते.
In reply to निसर्ग by तुषार काळभोर
मी जेव्हा अन्न आणि निवारा असे म्हणतो, तेव्हा त्यामध्ये निवारा याचा अर्थ "आडोसा" असा अभिप्रेत होता. परंतु पक्षांचे उदाहरण मान्य. फक्त फरक इतकाच आहे की हे सगळे निसर्गातील जैव साखळीच्या रूपाने निर्माण होणारे असते.
किंबहुना माझी "नैसर्गिक" ची व्याख्या सोपी आहे - आत्ताच सुचली - निसर्गात जैवसा़खळीच्या योगे जे जे निर्माण होते ते नैसर्गिक. मग यामध्ये मुंग्यांचे वारूळ आले, पक्षांची घरटी देखील आली.
याउलट मानवनिर्मीत म्हणजे रासायनिक अभिक्रिया करून निर्माण केलेले पदार्थ, विशेषतः जे निसर्गात अगोदर उपलब्ध नव्हते - उदा. प्लास्टिक, सिमेंट. परंतु याचबरोबर साचे वापरून बनवलेले पदार्थ - उदा. लोखंडाचे पाईप वगैरे यांचे काय याबद्दल मी देखील सध्या संभ्रमात आहे, पण त्यांना मी तरीही नैसर्गिक म्हणेन, कारण
१. त्यांचा कच्चा माल निसर्गतः उपलब्ध असतो
२. त्यांमध्ये शुद्धीकरण किंवा मिश्रण याशिवय अन्य क्रियांचा अंतर्भाव होत नाही.
३. निसर्गामध्ये या पदार्थांचे विघटन करण्याची क्षमता आहे.,
४. त्यांचे अस्तित्व नैसर्गिक जैवसा़खळीत अडथळा आणत नाही.
आता बाकीच्या गोष्टींकडे वळू -
बुद्धी जरी मानवाला निसर्गाने दिलेली असली, तरी ती नैसर्गिक प्रेरणा म्हणता येणार नाही. याचे कारण प्रेरणा म्हणजे जे ज्ञान उत्क्रांतीमध्ये "आपोआप" पुढे गेलेले आहे. पक्ष्याला घरटे बांधणे शिकवायला लागत नाही. माकडाला झाडावर चढायला शिकवावे लागत नाही.
कुत्र्याला पाय वर करायला शिकवावे लागत नाही
याव्यतिरिक्त जे शिकवले जाते त्याला प्रेरणा म्हणणे मला मान्य नाही - उदा. कुत्र्याला आपण भाषा शिकवतो - ही प्रेरणा नव्हे. ही बुद्धी. थोडक्यात प्रेरणा म्हणजे बुद्धीचा असा भाग जो उत्क्रांतीमध्ये (कदाचित) डीएनए मध्ये गेला आहे.
सर्व हरित वनस्पती, त्यांना निसर्गाने दिलेल्या हरितद्रव्याचा व नैसर्गिक सूर्याने दिलेल्या नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा वापर करून कोट्यावधी वर्षांपासून ऑक्सिजन तयार करत आहेत. ज्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण अत्यल्प होते, तिथे ते वनस्पतींमुळे इतके वाढले की ऑक्सिजनवर जगू शकणारे जीव तयार झाले. ही वनस्पतींची निसर्गातील ढवळाढवळ नव्हे काय? त्यामुळे झालेले परिणाम विस्तृत प्रमाणात व दीर्घकाळासाठीचे नाहीत काय?हे अगदी बरोबर आहे, पण काही काळापूर्वी वनस्पती देखील नव्हत्या, नुसती रसायने होती, त्यांपासून एकपेशीय जीव तयार झाले. त्याला काय म्हणाल? वादासाठी मी असे देखील म्हणेन, की आज मानव जे वागतोय ते सगळे नैसर्गिक आहे, अणुबाँब देखील नैसर्गिकच आहे, आणि असे ५० अणुबाँब वापरणे देखील नैसर्गिकच. त्या अणुबाँब मुळे होणारी म्युटेशन्स पण नैसर्गिकच. वादासाठी मी हे मान्य करू शकतो, पण वास्तवात नैसर्गिक आणि मानवनिर्मित ही आपण आपल्या सोयीसाठी केलेली विभागणी आहे, आणि सर्वसामान्यपणे नैसर्गिक पदार्थांमध्ये जगामध्ये १-२ वर्षांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची क्षमता नाही. नैसर्गिकरीत्या जर उद्या प्लास्टिक तयार झाले, तर कदाचित त्याच वेळेस त्याला रेझिस्टंट सजीव पण तयार होतील कदाचित. पण मानवनिर्मित प्लास्टिकच्या बाबतीत आपण असे म्हणू शकत नाही.. प्लास्टिकचे विघटन करू शकणारे सजीव तयार व्हायला अजून कदाचित लाखो वर्षे जातील, पण प्लास्टिक मात्र आज आहे. म्हणून ते ढवळाढवळ. बाकी याच्याशी मात्र बाडिस सहमत -
मानवाने स्वतःला निसर्गाहून वेगळे असे समजण्यापेक्षा 'आपण निसर्गाचा भाग आहोत' असे मानायला हवे.फक्त त्याबरोबर अजून एक वाक्य - --------------मानवाने स्वतःला निसर्गाहून वेगळे असे समजण्यापेक्षा 'आपण निसर्गाचा भाग आहोत' असे मानायला हवे, आणि त्याबरोबर निसर्गाला पचेल असेच वागायला शिकायला हवे------------------ (अजून मला देखील तसे वागता येत नाही हा भाग वेगळा)
In reply to मी जेव्हा अन्न आणि निवारा असे by आनन्दा
हा लेख अत्यंत छान आअहे यासंदर्भात,
जनुकिय बदल घडवून आणलेल्या बियाणांना विरोध हा केवळ त्याच्या अनैसर्गिक स्वरूपामुळे किंवा अद्याप अज्ञात असलेल्या विध्वंसक वा हानिकारक वैशिष्ट्यांमुळे नाहीये. त्याला आर्थिक बाजूही आहे. सर्वात मोठी भीती ही जीएम कंपन्यांची मक्तेदारी निर्माण होण्याची ही आहे. जीएम बियाणे हे दरवर्षी त्याच कंपन्यांकडून घ्यायचे आहे. त्याची पैदास स्वतः करता येत नाही. दुसरे म्हणजे जीएम बियाणांच्या फैलावामुळे निसर्गात अद्यापही थोड्याफार प्रमाणात टिकून असलेल्या जैववैविध्यावर फार सर्वंकष आणि फार वेगाने परिणाम होण्याची शक्यता आहे.
In reply to जनुकिय बदल घडवून आणलेल्या by एस
अॅक्च्युअली येस. हे अजून एक कारण आहे.
मी याला "वापर करणार्याची नैतिकता" असे म्हणेन. कशावरून वापर करणारा हे तंत्रज्ञान स्वत:च्या अमर्याद फायद्यासाठी वापरणार नाही? मग इतरांचा तोटा झाला तरी चालेल.
अतिशय उत्तम लेख,
बऱ्याच गोष्टी क्लियर झाल्या,
तरीही माझे काही प्रश्न.
१. जीएम फूड्स किंवा इतर सीड्स हे तंत्र उपयुक्त असले तरी ह्याचा पुर्ण उपयोग लोकोपयोगी कार्यात होईल अशी शाश्वती नाही न? आता बघा मी शेतकरी होतो आम्ही कापुस पेरत असू, सीसीआय उर्फ़ कॉटन कॉर्पोरेशन ऑफ़ इंडिया कायम स्टेपल कापसाला जास्त भाव देते (हे तार्किक आहे) मग लॉन्ग स्टेपल कापुस कुठला तर त्याला बीटी कॉटन हे उत्तर आले, बीटी कॉटन पहिल्यांदा बाजारात आणणाऱ्या कंपनी बद्दल मी इथे बोलणे टाळतो घासकड़वी सर, पण ह्या बिया बऱ्याच अंशी "टर्मिनेटर सीड्स" असल्याचा प्रचार झाला होता, तसेच सेमी एरिड ट्रॉपिकल झोन (SAT) मधे ह्या बियांचे जे क्लेम्स होते (कमीत कमी पाणी वापरणार, धागा लांब येणार,कापुसबोंडे/झाड़ उर्फ़ लाग प्रमाण जास्त असणार, बोंडअळीला प्रतिकार करू शकण्याची अंगभूत ताकद जास्त असणार) ते पूर्णपणे जरी नाही तरी बहुतांशी सपशेल फसलेले दिसले उदा. बोंडअळी निर्मूलन झाले तरी तिकडे वळते केलेले डिफेंस मैकेनिज्म बोंड कुरतडणाऱ्या माव्यांविरुद्ध हतबल होणे, धागा लांबी क्लेम पेक्षा कमी (अक्षरशः नॉन स्टेपल जीएम वाणापेक्षाही कमी निघणे) सरकी चे प्रमाण जास्त असणे, ती सरकी टर्मिनेटर प्रकारातली असल्यामुळे पुनः लागवडीला परत महागड़े बी घ्यायचा वरकड़ खर्च, एकंदरित ऑन फार्म बीज प्रक्रिया व्यवस्थेचे उच्चाटन वगैरे भयानक इफेक्ट्स दिसुन आले (माझा जवळपास ८ एकर कापुस होता ज्यात ३ एकर प्रायोगिक तत्वावर जीएम बीटी कॉटन लागवड केली होती). मग ह्याचा अर्थ काय?
अ. सरकारच्या कृषिमंत्रालय अन त्यांच्या जनुकीय समिती (कमेटी फॉर क्लेअरेंस ऑफ़ जीएम ब्रीड्स) ने घाई केली का बियाणे सर्टीफाय करायची?
ब. ह्या घाईचे कारण शेतकऱ्यांना मदत होते की कॉर्पोरेट लॉबिंग होते??
क. मुळात रिसर्च अपुरा राहिला होता का?
२.ऐसेच काहीतरी बीटी वांग्याबद्दल ही ऐकून होतो, अर्थात वांगी लागवड केलेली नाही बीटी ची म्हणून ही माहीती ऐकिव आहे
ह्यावर आपण काही सांगू शकाल का?
In reply to अतिशय उत्तम लेख, by कैलासवासी सोन्याबापु
ह्यावर आपण काही सांगू शकाल का?ह्यावर खरोखरच मी तुम्हाला काही सांगण्याइतका माझा अभ्यास नाही. या लेखमालेची विज्ञानाबद्दलची भूमिका ही मायक्रोपेक्षा मॅक्रो पातळीवर अधिक आहे. मोठा आवाका आणि मर्यादित शब्द घेतले की थोडं बर्ड्स आय व्ह्यू घेणं गरजेच पडतं. तुम्हीच प्रत्यक्ष जमिनीवर शेती करून ती बियाणं वापरून बघितलेली आहेत, त्यांचे जाहिरात केलेले फायदे-तोटे आणि प्रत्यक्ष परफॉर्मन्स याचा अनुभव घेतलेला आहे, इतर शेतकऱ्यांचे अनुभव तुम्हाला माहीत आहेत - तेव्हा तुम्हीच यावर एखादा लेख लिहिला तर मला काहीतरी शिकायला मिळेल.
निसर्गाच्या व्यवहारात ढवळाढवळ म्हणजे पाप वगैरे भानगडीत काहिच अर्थ नाहि हे खरं आहे. नैतीकतेची बंधनं देखील काहि कामाची नाहि. जीएमो च्या बाबतीत सर्वात मोठी भिती मानवी हव्यासाचीच आहे. उत्सुकता, उपयोगीता, गरज वगैरे पासुन सुरु होणारं तंत्रज्ञान व्यवसायाच्या पातळीवर येतं आणि मग त्याचा भस्मासूर होण्याची भिती वाटते. दोन महायुद्धांत विज्ञानाने कमावलेल्या शस्त्रांमुळे काय हाहा:कार उडाला हे जगाने बघितलं आहे. कुठलिही समाजोपयोगी गोष्ट विकेंद्रीत होण्याऐवजी (सत्ता/धन)केंद्रीत झाली कि त्यामुळे उद्भवणारा धोका कल्पनातीत असतो (कल्पनातीत म्हणजे इन्फायनैट या अर्थाने नव्हे, तर ज्याला भोगावं लागतं त्याला काहिच कल्पना नसणे या अर्थाने...)
पण हा वाद 'विज्ञान शाप कि वरदान' या टाईपचा आहे. आणि त्याला उत्तर म्हणजे 'डजण्ट मॅटर... इट्स कमींग...'
In reply to नेहेमीप्रमाणे उत्तम लेख. by अर्धवटराव
+१
हम्म.. जीएमओ वाईट असे