मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
नमस्कार मंडळी, आजवरच्या छायाचित्रण स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला आहे. याच मालिकेतली नवी स्पर्धा घेऊन येत आहोत. या वेळचा विषय आहे, 'जलाशय'. येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव किंवा सरोवर एवढेच अपेक्षित आहे. प्रवेशिकेतच जलाशयाच्या ठिकाणाची माहिती लिहावी. फारशी माहिती उपलब्ध नसल्यास किमान ठिकाणाचे नाव अवश्य लिहावे. स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. विजेती छायाचित्रे यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित केली जातील. तुमच्या प्रवेशिका उद्या (दिनांक १५ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत) या धाग्यावरील प्रतिसादांद्वारे पाठवा. लॅण्डस्केप प्रकारचे छायाचित्र असल्यास कमाल रुंदी ६४० असेल याची कृपया काळजी घ्या. या पूर्वीच्या स्पर्धांच्या दुव्यांसाठी खालील चित्रांवर क्लिक करावे.
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.

खेडूत 15/10/2015 - 09:59
चांगला विषय! स्पर्धकांकडून केवळ इमेज यूआरेल घेउन सं. मं. ने 'फक्त क्रमांकाने' चित्रे प्रकाशित करण्याची सूचना मागे कुणीतरी केली होती. असं काही करता येईल काय?

In reply to by खेडूत

एस 15/10/2015 - 11:07
तसेच करायला हवे. स्पर्धकांकडून व्यनिने इमेज यूआरएल घेऊन सर्व प्रवेशिका एकाच दिवशी एकाच धाग्यात केवळ अनुक्रमांक देऊन प्रकाशित कराव्यात , स्पर्धकांची नावे टाळून. मग त्याच धाग्यात मतदान घेतले जावे. अनबायस्ड मते मिळतील तसेच उशिरा येणार्‍या प्रवेशिकांनाही समान संधी मिळेल. काय म्हणता?

In reply to by एस

नाव आडनाव 15/10/2015 - 13:27
+१ हेच बाकिच्या स्पर्धांसाठीपण करायला पाहिजे जसं शतशब्द्कथा किंवा अजून नंतर येणार्‍या स्पर्धा.

भटकंती अनलिमिटेड 15/10/2015 - 10:40
सकाळी सुर्योदयाच्या वेळी भिगवणजवळील उजनी धरणाचा जलाशय आणि एक नौका. सूर्योदय

जगप्रवासी 15/10/2015 - 13:08
भटकंती अनलिमिटेड - तुम्ही पंकज झरेकर ना? तुमच्या फोटोचा खूप चाहता आहे मी, तुमचा ब्लॉग पण वाचतो छान आहेत लेख. बर्याच दिवसांनी मिपावर आलात.

बाबा योगिराज 15/10/2015 - 14:19
वा वा

In reply to by स्पा

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 15/10/2015 - 18:55
अप्रतिम आहे. मागच्या २ महिन्यात राजगडावर जायचे ३ बेत या ना त्या कारणामुळे फसले आहेत. आता जमवलेच पाहिजे.

In reply to by स्पा

मृत्युन्जय 19/10/2015 - 14:30
खतरनाक. या स्पावड्याला परीक्षक करुन टाका रे. नाहितर प्रत्येक स्पर्धेत याचाच फोटो पहिला यायचा ;) खुपच सुंदर फोटो आहे. अप्रतिम. केवळ चांगला कॅमेरा असुन चालत नाही. पारखी नजर लागते आणि स्किल आहेच. स्पावड्या कडे ते उदंड आहे.

In reply to by कपिलमुनी

जातवेद 21/10/2015 - 11:09
थान्कू

अजिंक्य विश्वास 15/10/2015 - 23:11
 मस्तानी तलाव डिटेल्स कॅमेरा -६००डी लेन्स- कॅनन १८-५५ एम्‌.एम्‌ लेन्स आय्‌.एस्‌. ओ. - १०० एफ्‌ स्टॉप- एफ्‌ ५.६ एक्स्पोजर टाईम- १/५० सेकंद मोड- मॅन्युअल पोस्ट प्रोसेसिंग- फोटोमॅटिक्स प्रो

एस 16/10/2015 - 00:04
काही प्रवेशिकांच्या विषयवस्तूंमध्ये जलाशय ही मुख्य विषयवस्तू नसून दुय्यम किंवा पूरक घटक आहे. त्यामुळे स्पर्धेच्या विषयाशी अशा प्रतिमा थोड्या विसंगत वाटत आहेत. मला वाटते की अशा स्पर्धकांनी त्याऐवजी दुसर्‍या प्रवेशिका द्याव्यात.

जगप्रवासी 16/10/2015 - 13:36
सुधागडावरील तळे - स्पर्धेसाठी  स्पर्धेसाठी नाही https://lh3.googleusercontent.com/-D70VqoJe7kw/VcCwh_f7rtI/AAAAAAAAORQ/c11iGHAQGNQ/s576-Ic42/IMG_3842.jpg जगप्रवासी

माम्लेदारचा पन्खा 16/10/2015 - 19:31
arabian sea आग्वादच्या तुरूंगाशेजारील चमचमता अरबी समुद्र....

वाचक 17/10/2015 - 01:17
वर्मोंट राज्यात 'सियोन' विभागात असलेला तलाव फॉल कलर्स असल्यामुळे स्पर्धेसाठी नाही. vermont lake आणि होड्या Seyone Lodge lake near Groton, vermont

In reply to by वाचक

श्रीरंग_जोशी 17/10/2015 - 10:57
पहिला फोटो पाहून तो केवळ फॉल कलर्स दर्शवत आहे असे वाटत नाही. तळ्यालाही तेवढेच दर्शवले जात आहे असे वाटते. स्पर्धाविषयानुसार प्रवेशिका अनुरुपच आहे. मुदत संपण्यापूर्वी नवा फोटो काढून तो प्रवेशिका म्हणून सादर करण्याची तुमची योजना असल्यास हा फोटो अवांतर म्हणून चालेलच.

डॉ सुहास म्हात्रे 17/10/2015 - 02:10
शांग्रिला (युन्नान राज्य, चीन) मधिल पुडात्सो राष्ट्रिय उद्यान, तिथे घर करून राहिलेले मूठभर आदीवासी आणि पर्यटकांसाठी केलेली काही व्यवस्था सोडली तर, हजारो वर्षे आधुनिक मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिले आहे. हा परिसर "जागतिक नैसर्गिक वारसा स्थान (world natural heritage area)" म्हणून ओळखले गेले आहे. या उद्यानातील एक जलाशय...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

डॉ सुहास म्हात्रे 18/10/2015 - 22:55
हे स्पर्धेसाठी नाही. आरसी तळे (मिरर लेक) : न्युझिलंडमधिल फियोर्डलँडमधे असलेल्या मिलफर्ड साऊंडकडे जाताना हे तळे लागते. त्याच्या आरसपानी, स्वच्छ आणि नितळ पाण्यामुळे ते जगप्रसिद्ध आहे. त्याच्या खास भौगोलिक जागेमुळे त्याच्या नितळ व तरंगविरहित पाण्यात आजूबाजूच्या पर्वतांचे प्रतिबिंब अगदी एखाद्या बिलोरी आरशात पहावे इतके स्पष्ट दिसते...

In reply to by किल्लेदार

कपिलमुनी 21/10/2015 - 14:35
एवढा सुंदर फोटो स्पर्धेसाठी का नाही? फारीनच्या तळ्यांच्या फोटूसाठी स्वदेशी तळे असावे :)

मृत्युन्जय 19/10/2015 - 14:41
नैनितालच्या भिमताल मधील हा हंस अकेला: Bhimtal स्पर्धेसाठी "नदी" चालणार असेल तर खालील फोटो ग्राह्य धरावा (आणि वरचा रद्द करावा). खालील फोटो पहलगाम मधील बेताब व्हॅलीचा आहे. खाली वाहणारी लीडर नदी. बेताब चित्रपटाचे शूटिंग इथे झाले म्हणुन ही बेताब व्हॅली: Betaab Valley

वेल्लाभट 19/10/2015 - 17:31
लेक लुगानो, लुगानो, स्वित्झर्लंड. येथील एका उंचावरच्या चर्चच्या परिसरातून काढलेला लेक लुगानोचा फोटो a कॅनन पॉवरशॉट एस एक्स २२० एच एस - एफ ४ १/१६०० आयएसओ २००

श्रीरंग_जोशी 20/10/2015 - 09:33
स्थळ: मिनेसोटातील सिल्वर बे मरीना येथून टिपलेले लेक सुपिरिअरचे हे दृश्य. EXIF - Camera: Sony Nex 5N; Lens: 18-35; ƒ/13.0; Exposure: 1/200; ISO: 100 टीपः चित्र मोठ्या आकारमानात पाहण्यासाठी त्यावर क्लिक करावे. काही कारणाने चित्र दिसत नसल्यास पर्यायी दुव्यावर ते पाहता येईल.

In reply to by जागु

मधुरा देशपांडे 21/10/2015 - 14:35
हो एका स्पर्धकाने एकच फोटो द्यायचा आहे. ज्यांनी एकापेक्षा जास्त फोटो दिले आहेत, त्यांनी कुठला स्पर्धेसाठी आहे ते सांगितले आहे.

पुष्करिणी 21/10/2015 - 16:29
Rhine - Dusseldorf

पुष्करिणी 21/10/2015 - 16:33
वरिल फोटो - र्‍हाइन नदीचा आहे, स्पर्धेसाठी नाही. खालचा फोटो स्नोडोनिया पर्वतावरचं एक तळं -मार्च २०१३ snowdon

सोंड्या 23/10/2015 - 16:38
1)(स्पर्धेसाठी नाही)1 2)2 3)3 सर्व फोटो आमच्या गावला पाणीपुरवठा करणार्या मातीच्या धरणाचे आहेत ज्याचे भूमीपुजन 1977 साली तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाले होते. पहिल्या panorama फोटोत ज्या रांगेच प्रतिबिंब ठळक उमटलय तीच्या मध्यभागी गणेश लेणी (गरदलेणी) आहे (पळू). तिसर्या फोटोत डाव्या अंगाला नाणेघाट दिसतोय. सर्व फोटोज मोबाईल कॅपचर्ड आहेत.

In reply to by सोंड्या

श्रीरंग_जोशी 23/10/2015 - 21:03
तुम्ही फोटोजचे दुवे वापरण्याऐवजी फ्लिकरवर ते डिस्प्ले झाल्यावर त्या वेबपेजचे दुवे वापरले आहेत. दुवे खालीलप्रमाणे असायला हवेत बाकी धाग्यात लिहिल्या प्रमाणे रुंदी कमाल ६४० ठेवायला हवी होती. पहिल्या चित्रासाठी ती १२३२ आहे. रुंदी दिल्यावर उंची देण्याची गरज नसते मूळ चित्रातल्या लांबी रुंदीच्या गुणोत्तरानुसार ब्राउझर उंची स्वतः सेट करते. अन आपण उंची चे मूल्य लिहिल्यास रुंदी ब्राउझरद्वारे सेट केली जाते. संपादकांना विनंती आहे की वरच्या प्रतिसादातले दुवे व रुंदीचे मूल्य दुरुस्त केले जावे. अवांतर - चित्र मोठा आकारमानात दाखवायचे असल्यास चित्रावर त्याचाच दुवा देऊन तो नव्या टॅबमध्ये उघडण्याची व्यवस्था करता येते.

वाचने 48822 वाचनखूण प्रतिक्रिया 111